पहिला बॉर्डर बघताना थिएटर मधे खूप आवडला होता हे लक्षात आहे. त्यातला सनी एकदम भारी होता. त्यातले थेट पाक-बॅशिंग लाहौर दे गंदी नालविच कीडे वगैरे (पंजाबी चुभूद्याघ्या). त्यातला तेव्हाचा अक्षय खन्ना आता रहमान डकैत च्या पार्श्वभूमीवर वेगळाच वाटेल पुन्हा पाहताना. 'संदेसे आते है' मात्र नेहमीच आवडते.
मात्र आता हाईण्डसाइटमधे बॉर्डर आणि गदर मधे डोक्यात मिक्स अप होते अनेकदा पण ते लाहौर दे गंदी नालविच वगैरे बॉर्डरमधलेच असावे.
नाही, नाही... प्रीती सात वर्षे वगैरे थांबत नाही. (तरीही लग्नाच्या वेळी अंडरएज आहे ती. सोळा की सतरा काहीतरी वय असते तिचे) तिची भाभी, ती स्वतः, तो लहानगा पुतण्या एवढेच काय समस्त गावकरी यांना केव्हाच कळलेले असते की दुसरा सुटेबल हिरो आलेला असल्याने हिंदी चित्रपट नियमांनुसार आधीचा नवरा परत येणे अशक्य आहे. अमरीश पुरीच जरा ऐकत नसतो. मग बाकीच्या जोड्यांची पैरोंमे बंधने तुटली असल्याने व चार जोड्या जमवून सिनेमा संपवायचा असल्याने तो वीसेक सेकंदांत स्वतःचे मनपरिवर्तन करून तिचे आधीचे कुंकू पुसतो आणि ती लगेच तयार होऊन गाणे पूर्ण करायला निघून जाते.
दुसरा सुटेबल हिरो आलेला असल्याने हिंदी चित्रपट नियमांनुसार आधीचा नवरा परत येणे अशक्य आहे >>>
पाहून बरेच दिवस झाले आता पण अमरिश पुरीला इतका दुय्यम तिय्यम रोल क्वचितच मिळाला असेल. आधी तीन मोठे लीड, त्यानंतर तीन लाँच केलेले हीरो. त्यांच्यापैकी त्यातल्या त्यात भावखाऊ रोल उदय चोप्राचा. त्यानंतर जे दोघे उरतात त्यातील एकाच्या हिरॉइनचा सासरा!
याउलट त्याच्या करीयरच्या सुरूवातीला सुद्धा तो बहुधा अमजद, प्राण वगैरेंच्या "वरचा" व्हिलन होता. अमिताभच्या नसीब मधे.
अमजद खान शोले मधे जसा होता तसा तो खूंखार वाटायचा. अपघातानंतर तो फुगत गेल्यानंतर त्याला थेट वडलांचे रोल मिळाले. खुंखार ऐवजी लडीवाळच जास्त वाटू लागला. पुढे त्याला तसे रोलही मिळत गेले. अमरीश पुरींनी मात्र दोन्ही प्रकारच्या भूमिका सुंदर केल्या.
घातक मधला रोल कोण विसरेल ?
हो ऑफ कोर्स! मी फक्त या पिक्चरमधे म्हणत होतो. वाचलेल्या माहितीनुसार अमिताभची कारकीर्द सावरायला त्याला मोहब्बतें मधे रोल यश चोप्राने दिला. हे झाले नसते तर कदाचित म्हातार्या प्रिन्सिपॉलचा रोल अमरिश पुरीकडेच आला असता. त्याने साधारण तसा रोल डीडीलजे मधे केला होताच.
मोहब्बते हा इतका वाईट होता कि अमिताभ बच्चनची उरली सुरली क्रेझ त्याने संपवली.
अमरीश पुरीने ती भूमिका जास्त छान केली असती, पण सिनेमा चांगला झाला असता असं नाही.
९० च्या दशकात मिलिंद इंगळेच्या 'छुई मुई सी तुम लगती हो' ह्या गाण्यात 'प्रीती'ला पहिल्यांदा पाहिली होती तेव्हाच ती आणि कदाचित तिच्यामुळे ते गाणेही खूप आवडले होते. छान दिसायची पण फार काही पुढे आली नाही. असो... तिच्या आणि मोहोब्बते बद्दलच्या पोस्ट्स धमाल आहेत 😀
Submitted by संजय भावे on 29 January, 2026 - 01:42
मोहोब्बते आधी शाहरुखचा पिक्चर होता. त्याचा एक ट्रॅक अमिताभ सोबत होता तर एक ऐश्वर्या आणि नवीन पोरांसोबत.
जसे कभी खुशी कभी गम मध्ये देखील त्याचे अनुक्रमे अमिताभ, काजोल, आणि उत्तरार्धात हृतिक यांच्यासोबत वेगवेगळे ट्रॅक होते.
वीर झारा मध्ये सुद्धा अमिताभ शाहरुख एकत्र होते. तिथेही असेच होते. पण तिथे अमिताभचा रोल छोटाच होता. आता आठवत सुद्धा नाही. लहानपणी पाहिलेला.
सांगायचा मुद्दा, मोहोब्बते मध्ये अँग्री ओल्ड मॅन अमिताभ + रोमान्सचा बादशाह शाहरुख अशी जुगलबंदी वाटत असली तरी प्रत्यक्षात ते चित्रपट शाहरुखचे होते. अमिताभचे रोल अमरीशपुरी कॅटेगरीच होते. फक्त अमिताभच्या स्टारडमने तेवढी नारायण शंकरला हाइप मिळाली.
हा धागा मस्त आहे. काकाच्या मेव्हण्याच्या भावजयीच्या पुतणीच्या सासूच्या आतेभावाच्या मुलाच्या मुलीला बाळ झालं. त्याचं बारसं १४ तारखेला आहे. या प्रसंगी "सूनबाईंच्या आत्येबाई गंगूबाई" हा सिनेमा दा़खवण्यात येईल ही अनाऊन्स मेंट सुद्धा इथे केली तर सर्वांना समजेल.
टीप : सिनेमा बारशाच्या ठिकाणी आणि यजमानांकडूनच दाखवण्यात येईल असा उल्लेख वरच्या अनाऊन्समेण्ट मधे का नाही असे विचारणारा पक्का मायबोलीकर समजावा.
वसईचा किल्ला सुरूवातीला दिसतो. पाठीमागून एक आवाज येतो. इंग्रजांच्या जुलमाबद्दल सांगतो. त्यासोबत दृश्य दिसतं कि ब्रिटीशांचे सैनिक म्हणून काही भारतीय किल्ल्यातून मोठ मोठ्या सोन्याच्या मूर्त्या खांद्यावर घेऊन बाहेर पडत आहेत. एक रबरी टायर असलेलं रणगाडासदृश्य वाहन आहे, ज्याला तोफ लावली आहे. एखाद्या जीपला पुठ्ठ्याचं डेकोरेशन करावं असं ते वाहन आहे. या मूर्त्या ते ट्रकमधे ठेवत आहेत. एक ट्रक भरून सोन्याच्या मूर्त्या वसईच्या किल्ल्यात कुणी ठेवल्या असतील ? ब्रिटीश म्हणून राज कपूरचा घार्या डोळ्याचा चुलतभाऊ कमल कपूर बोबडं हिंदी बोलतोय. पण मधेच ते शुद्ध येतं. एकूण तीनच ब्रिटीश आहेत. कपूरचं नाव जनरल डायर आहे. दुसरा ब्रिटीश भारतीय आहे त्याचं नाव कर्झन आहे आणि बॉब क्रेस्तोचं नाव सायमन आहे. मनमोहन देसाई यांनी पाचवी सातवी ते दहावीची इतिहासाची पुस्तकं एका दमात वाचून काढल्यावर जी तीन नावं लक्षात राहिली ती त्यांनी वापरली. त्यांचा कालखंड कोणता, जनरल मोठा कि कर्नल या भानगडीत ते पडत नाहीत. ड्युक हे सुद्धा नावच असावं म्हणून ते सायमनच्या हाताखाली ड्युक ऑफ वसई पण दाखवू शकले असते.
एकंदर ब्रिटीश अधिकार्यांना सोनं लुटणे हे एकमेव काम असावे. भारतात जिथे जातील तिथे त्यांनी खजिने शोधून लुटले असावेत. जनरल ला लॉर्ड कर्झन हुकूम देतो कि "राजासाहब का खजिना लुटोगे तो वो आपको छोडेंगे नही" म्हणणार्या जनतेला शहीद करा. जनता पण असे डायलॉग का मारत असते ?
राजासाहब एका महालात येरझरा घालत आहेत. येरझराचं अनेकवचन पण येरझराच होतं हे त्यांना कुणी तरी सांगितलं पाहीजे. त्यांच्या अंगरख्याचं आणि जाकीटाचं व्यस्त प्रमाण जेव्हढं लक्ष वेधून घेणार नाही तेव्हढे डोईवरचे कुरळे जावळ लक्ष वेधून घेते. शक्यतो असे केस जग्गा डाकू वगैरेंचे असतात. मेहमूदच्या कुंवारा बाप मधे व्हिलनचे असे केस होते. एक स्त्री बहुतेक त्यांची पत्नी असावी, अवघडलेली आहे. ते येरझरा घालत होते त्या हॉलला लागूनच खोली आहे आणि तिची खिडकी हॉलमधे सताड उघडी आहे म्हणूनच तिला बेडरूम म्हणता येत नाही. अचानक बाळाचा आवाज येतो आणि ती स्त्री चेहरा खिडकी कडे वळवते.
तर दचकायची पाळी आपली. ती साक्षात निरुपा राय ! ज्याच्याशी हिचं लग्न होतं त्याचे वाईट दिवस सुरू होत असतात. दीवार मधे सत्येन कप्पूवर चोरीचा आळ आला, तो परागंदा झाला आणि कुटुंब देशोधडीला लागलं. कुठल्याही नवर्याला तिने सुख लाभू दिलं नाही. अगदी मुलांना सुद्धा नाही. अमर अकबर अॅंथनी मधे प्राणला नको नको केलं होतं. आता राजासाहब म्हणजे दारासिंगच्या वाटेला काय येतंय ?
अस्मिता, स्वाती, विकु >>>> ह्ये वागणं बरं नव्हं. तुम्ही प्रोटेक्शन, प्रोटेक्शन करताय मग शेट्टीपुत्राच्या करिअरचं काय? त्याला दुसरी भूमिका कोण देणाराय? आधीच एक तर जगात एवढी बेरोजगारी वाढलीय.
मला आवडलेला बा पहिला बॉर्डर (जरी सुहागरात उरका कॅटेगरी वाटली तरीही.) ते गाणंच मला फारसं आवडत नाही. नुसतं ऐकायलासुद्धा. संदेसे आते हैं आणि हमें जब से ही दोन आवडतात.
अक्षय खन्ना is ♥ पण राखी आणि पूजा भट्ट दोघींनीही पीळ मारला होता. 'लाहौर के गंदी नाली दे कीडे'सकट सनी देओल पण.
माझेमन बरोबर आहे तुझं. "संदेसे आते है" गाणं तेव्हा चांगले वाटले होते पण पुन्हा आवर्जून ऐकावं असं काही नाही त्यात. दूरदर्शन मुळे ते पाठ झाले इतकेच. काल थोडा वेळ पाहिला बॉर्डर, पूजा भटला मी विसरले होते. खरेच दोघींनी पिळले आहे, नुसत्या दिसल्या तरी पिळल्यासारखे वाटत होते. काल कुठल्यातरी चॅनल वर मुद्दाम दाखवत असावेत, नव्याचे प्रमोशन करण्यासाठी. त्या हिरोचे किंवा त्या सिनेमाच्या प्रिक्वेलचा अचानक मारा व्हायला सुरू होतो. सगळीकडे त्यांच्याशी संलग्न चर्चा, व्हिडिओ दिसायला लागतात. मार्केटिंगचा भाग आहे.
फा म्हंटला आहे त्याला अगदी, अगदी. त्यात सनी why are you vomiting म्हणतो अक्षयला, पहले कभी खून देखा नहीं है क्या वगैरे वगैरे होऊन एकदम गोरिलाच्या बॉडी लँग्वेज मधे रागावतो. तेव्हा मलाही रहेमान डकैत आठवला.
अजून एक कुंकू पुसून आनंदी झाल्याला तसेच काही तरी आठवले. रा- वन मधे करीना नवरा मरून गेल्यावर भारतात येते आणि लाल साडीत पदर कमरेला गुंडाळून 'छम्मकछल्लो' करते. तिच्या अंगात रावनची बाधा झालेली असते तरीही हे माईलस्टोन आहे. तुम्हाला एक सीन आठवला तर आम्ही त्यापेक्षा उथळ आठवून दाखवू.
छुईमुईसी तुम- संभा- हो, तेव्हा आणि तेवढीच लक्षात आहे ती. त्या गाण्यातल्या बारक्या टेडी बेअरची फॅशन आली होती तेव्हा. आर्चिजच्या दुकानात जाऊन पोरंपोरी ते घेऊन यायचे.
श्रद्धा - शेफाली शहाच्या तोंडी सात वर्षे ऐकल्या सारखे वाटत होते, पण पुन्हा मोहब्बते पाहण्यापेक्षा तुझ्यावर विश्वास ठेवते. ते वयाचं गणित मात्र गंडलेलं आहे. पण सगळा पिक्चरच गंडलेला आहे त्यापुढे प्रीतीच्या वयाचे काय.
बारक्या टेडी बेअरची फॅशन आली होती तेव्हा
>>> हो हो.
रात्री ते दूध पिणार नसाल तर >>> मग काय? एकतर भल्या मोठ्या काचेच्या ग्लासात आणतात. यांच्याकडे स्टीलचं फुलपात्र किंवा चहा कॉफीच्या मगातून पित नाहीत का दूध? का प्रेक्षकांना समजावं दूधच आहे म्हणून? नाहीतर काय ब्लॅक कॉफी समजणार आहोत का आम्ही?
बरं आणतात आणि साईड टेबलवर ठेवतात. सांडलं तर बेडशीट, गादी आणि जमिनी कोण साफ करणार मध्यरात्री?
मोहोब्बते आधी शाहरुखचा पिक्चर होता. >> आधी म्हणजे ? मी पाहिला त्यात शाहरूख खान होता. पूर्ण नाही पाहिला. नॉशिया आलेला.
वीर झारा - आधी नव्हता आवडला. अलिकडे आवडला.
मर्द आठवत नाही राव आता. परत बघतो आता ही पोस्ट वाचून.
निरूपा रायचे डोळे जातात तो अमर अकबर अँथनी. यात पण काही तरी जातं . दारासिंग दोर टाकून विमान थांबवतो.
नायतर काय! यांच्या आया यांच्या कानीकपाळी कधी ओरडल्याच नसतील का? स्वयंपाकघरात, टेबलवर बसुन (खरंतर खुर्चीवर, पण कानीकपाळी मध्ये टेबलवरच म्हणत) दूध पी, ते दूध घेऊन धांदरटपणा करू नको!
बाकी जस्ट झोपायच्या आधी इतकं लिक्विड पोटात गेलं तर रात्री पायधुवायला उठायला लागेल त्याचं काय? 'तेरा जिस्म ओढ लू', आणि 'आज जाने की जिद ना करो' करायचं असेल तर ब्लॅडर कोणी फुल करायला सांगितलं आहे!
श्रद्धा - शेफाली शहाच्या तोंडी सात वर्षे ऐकल्या सारखे वाटत होते, पण पुन्हा मोहब्बते पाहण्यापेक्षा तुझ्यावर विश्वास ठेवते
<<<<< बाबौ! मला एकदम जिम्मेदारी का एहसास झाला हे वाक्य वाचून. इडलीचं पीठ वाटत होते ते बाजूला टाकून आधी धावत नेटफ्लिक्स गाठलं. शेफाली शाहचा डायलॉग कान देऊन ऐकला.
हुश्श! 'दोन वर्षे' आहे तो काळ... मी आपल्या विश्वासास पात्र ठरू शकले याबद्दल मला आनंद आहे. इडलीच्या पिठाकडे वळते आता.
मी पण बघते तुम्ही पण बघा.. मर्द !<<<<<
'जलजला'मधलं सोनं नंतर वसईच्या किल्ल्यात आणून ठेवलं असेल.
मर्द तांगेवाला >>> त्याचा अचूक उच्चार मरिद तांगेवाला आहे.
मी पण बघते तुम्ही पण बघा.. मर्द ! >>>
बरीच वर्षे झाली मर्द बघून. ढोबळ लक्षात आहे पण फार नाही.
एक रबरी टायर असलेलं रणगाडासदृश्य वाहन आहे, ज्याला तोफ लावली आहे. एखाद्या जीपला पुठ्ठ्याचं डेकोरेशन करावं असं ते वाहन आहे >>>
पाचवी ते सातवी इतिहासाची पुस्तके अगदी परफेक्ट आहे. नशीब इंग्रजांसंबंधितच भाग वाचले. नाहीतर यात इंग्रज अधिकार्यांची नावे फ्रेंच व डच सुद्धा दिसली असती.
एकंदर ब्रिटीश अधिकार्यांना सोनं लुटणे हे एकमेव काम असावे. भारतात जिथे जातील तिथे त्यांनी खजिने शोधून लुटले असावेत. >>> टोटली. आणि भारतातू संपत्ती लुटली म्हणजे लिटरली गुहांमधे वगैरे रॅण्डमली ठेवलेले सोने तेथून पळवायचे. मराठी सिरीज मधे ऑफिसमधल्या पैशाची अफरातफर म्हणजे लिटरली बॉसच्या ड्रॉवर मधून लाखो रूपये कॅश पळवतात तसे.
रा- वन मधे करीना नवरा मरून गेल्यावर भारतात येते आणि लाल साडीत पदर कमरेला गुंडाळून 'छम्मकछल्लो' करते. तिच्या अंगात रावनची बाधा झालेली असते तरीही हे माईलस्टोन आहे. >>> तो पिक्चरच पाहिलेला नाही. त्यामुळे ही माहिती नव्हती.
'जलजला'मधलं सोनं नंतर वसईच्या किल्ल्यात आणून ठेवलं असेल. >>>
शेफाली शाहचा डायलॉग कान देऊन ऐकला.
हुश्श! 'दोन वर्षे' आहे तो काळ >>>
पण पुन्हा मोहब्बते पाहण्यापेक्षा तुझ्यावर विश्वास ठेवते >>>
वीरझारा व वरच्या मर्द वरून - राजे महाराजे जेव्हा येरझारा घालतात त्याला वीरझारा म्हणत असावेत. हे मी शोलेच्या टाकी सीन च्या संवादात वाचले लिहीताना. "अरे भाई ये वीरझारा क्या होता है? अंग्रेज लोग जब येरझारा घालते है...."
रतातू संपत्ती लुटली म्हणजे लिटरली गुहांमधे वगैरे रॅण्डमली ठेवलेले सोने तेथून पळवायचे. मराठी सिरीज मधे ऑफिसमधल्या पैशाची अफरातफर म्हणजे लिटरली बॉसच्या ड्रॉवर मधून लाखो रूपये कॅश पळवतात तसे. >> याचा स्पूफ केला पाहिजे. सोनं लुटायचा अजेंडा मिटिंग मध्ये येतो. ईष्ट इंड्या कंपनीचा पीएम गोल्ड माईन, फर्नेस वगैरे बोलणे चालू करतो. तिकडे डुगना लगान देना पडेगा करत टॉम ऑल्टर गुहेतून सोन्याच्या विटा घेऊन झूम वर येतो.
बरं आणतात आणि साईड टेबलवर ठेवतात. सांडलं तर बेडशीट, गादी आणि जमिनी कोण साफ करणार मध्यरात्री?>>> अगदी अगदी, ..त्या रामलिला मधे सुद्धा दिपिका धुप घेवुन जीमनॅस्टीक करत फिरवत असते..पाढरी चादर,पान्ढरे कपडे..राख सान्डली तर बसा बोम्बलत!!
Submitted by प्राजक्ता on 29 January, 2026 - 20:00
रामलिला मधे सुद्धा दिपिका धुप घेवुन जीमनॅस्टीक करत फिरवत असते>>>
हो नं. तिला कुणीतरी सांगा भन्साळीचाच असला तरी हा देवदासमध्ये नाहीये आणि तुला इन्टेन्स गाणं सादर करायचं आहे, बसल्याजागी धुनुचि डान्स नाही करायचाय.
सगळ्यात महत्वाचं म्हणजे हनीमुनला आल्यावर माणसाने शांतपणे महत्वाचा कार्यभाग उरकून घ्यावा. (बॉर्डरमधल्या सुनील शेट्टीचा आदर्श डोळ्यापुढे बाळगावा म्हटलं असतं पण अस्मिता लगेच आक्षेप घेईल. ) नंतर आयुष्यभर मच्छरदाण्या नी धुपाच्या कांड्या आहेतच.
सगळ्यात महत्वाचं म्हणजे हनीमुनला आल्यावर माणसाने शांतपणे महत्वाचा कार्यभाग उरकून घ्यावा>>>
यावरुन आठवले. शशी राजेश मुमताजचा प्रेम कहानी की तत्सम चित्रपटात बाहेरुन उत्तुंग दिसणार्या वाड्याचा दरवाजा उघडुन जखमी राजेश आत पाऊल टाकतो तो थेट सुहाग रात रुममध्ये. कोणा गाढवाने हे घर डिजाईन केले असावे जिथे मेन दरवाजा उघडताच बेडरुम येते??
आत शशी मुम्ताज हनिमुन सुरु करायच्या तयारीत असतात. ( दरवाजा आतुन बम्द न करताच). याने ते बघुन यु टर्न मारावा, तर मेला थेट जाऊन पडतो मुमताजच्या मांडीवर.. अरे नालायका, तु मित्राचे घर बघुन आश्रयाला आलास आणि त्याच्या बायकोच्या मांडीवर डोके ठेवतोस? मित्र दिसला नाही तुला डोके ठेवायला??
दुपारी लग्न लस्गलेल्या शशीचे भव्य घर संध्याकाळी पुर्ण रिकामे. त्याने राजेशची सोय एका वेगळ्या रुममध्ये करावी. तर येडा ह्याला स्वतःच्या रुममध्ये ठेवतो आणि हा बरा होईपर्यंत हनिमुन पोस्टपोन करतो. काय संबंध??? आणि वर मुमताजला ह्याची काळजी घ्यायला सांगतो. म्हणजे ते दोघे दिवसभर बेडरुममध्ये आणि हा बाहेर. देवा…. कसे होणार रे बाबा..
कोणा गाढवाने हे घर डिजाईन केले असावे जिथे मेन दरवाजा उघडताच बेडरुम येते?? >>> मुंबईचा सिव्हिल इंजिनीअर असणार. त्यांना बिल्डरने दिलेल्या ग्रँड ५०० फुटात सगळं बसवायची सवय झालेली असते. दार उघडताच किचन येऊ शकतं तर बेडरूम का नाही?
किंवा मग त्याचा मोटो काम से काम रखो असणार. उगीच प्रशस्त लिविंग रूम ठेवा, तिच्यात फॉल्स सिलिंग आणि चित्रविचित्र प्रकाशयोजना करा, अपहोल्स्टरी निवडा. उरलेल्या जागेत बेडरूम आणि किचन कोंबा. हवीय कशाला भानगड? जिथे महत्वाचं काम होतं त्याला प्रायोरिटी द्या.
हॉवर्ड रोआकनंतर तोच. पण आपल्याकडे अश्या आऊट ऑफ द बॉक्स थिंकिंगला किंमत नसते. म्हणून मागे पडतो देश.
दुपारी लग्न लस्गलेल्या शशीचे भव्य घर संध्याकाळी पुर्ण रिकामे >> अस्से नवीन जोडप्याला वेळ देणारे नातेवाईक पाहिजेत. आपल्याकडे नुसता घोळ घालतात. हळद काय उतरवा, पूजा काय घाला, कुलदैवताला काय जाऊन या. म्हणून मग जोडप्यांना आजकाल हॉलमधून थेट हॉटेलमध्ये जावेसे वाटते.
साधना ताई
कोणा गाढवाने हे घर डिजाईन केले असावे जिथे मेन दरवाजा उघडताच बेडरुम येते?? >>
त्या हॉलला लागूनच खोली आहे आणि तिची खिडकी हॉलमधे सताड उघडी आहे म्हणूनच तिला बेडरूम म्हणता येत नाही. >>>
पल भर के लिए कोई हमें प्यार कर ले गाण्यातलं हेमामालिनीचं घर आठवा. दारं आणि खिडक्यांच्या मधे मधे जागा मिळेल तिथे भिंती बांधलेल्या आहेत. हेमामालिनी सगळ्या खिडक्या बंद करून शेवटी कपडे बदलायला येते तिथे लुवर्स मधून देव आनंद पुढचं कडवं म्हणतो.
जौ द्या. तुम्हा नव्या मुला मुलींना देवादिकांच्या काळातली गाणी कुठून ठाऊक असणार ?
पहिला बॉर्डर बघताना थिएटर मधे
पहिला बॉर्डर बघताना थिएटर मधे खूप आवडला होता हे लक्षात आहे. त्यातला सनी एकदम भारी होता. त्यातले थेट पाक-बॅशिंग लाहौर दे गंदी नालविच कीडे वगैरे (पंजाबी चुभूद्याघ्या). त्यातला तेव्हाचा अक्षय खन्ना आता रहमान डकैत च्या पार्श्वभूमीवर वेगळाच वाटेल पुन्हा पाहताना. 'संदेसे आते है' मात्र नेहमीच आवडते.
मात्र आता हाईण्डसाइटमधे बॉर्डर आणि गदर मधे डोक्यात मिक्स अप होते अनेकदा
पण ते लाहौर दे गंदी नालविच वगैरे बॉर्डरमधलेच असावे.
नाही, नाही... प्रीती सात
नाही, नाही... प्रीती सात वर्षे वगैरे थांबत नाही. (तरीही लग्नाच्या वेळी अंडरएज आहे ती. सोळा की सतरा काहीतरी वय असते तिचे) तिची भाभी, ती स्वतः, तो लहानगा पुतण्या एवढेच काय समस्त गावकरी यांना केव्हाच कळलेले असते की दुसरा सुटेबल हिरो आलेला असल्याने हिंदी चित्रपट नियमांनुसार आधीचा नवरा परत येणे अशक्य आहे. अमरीश पुरीच जरा ऐकत नसतो. मग बाकीच्या जोड्यांची पैरोंमे बंधने तुटली असल्याने व चार जोड्या जमवून सिनेमा संपवायचा असल्याने तो वीसेक सेकंदांत स्वतःचे मनपरिवर्तन करून तिचे आधीचे कुंकू पुसतो आणि ती लगेच तयार होऊन गाणे पूर्ण करायला निघून जाते.
दुसरा सुटेबल हिरो आलेला
दुसरा सुटेबल हिरो आलेला असल्याने हिंदी चित्रपट नियमांनुसार आधीचा नवरा परत येणे अशक्य आहे >>>
पाहून बरेच दिवस झाले आता पण अमरिश पुरीला इतका दुय्यम तिय्यम रोल क्वचितच मिळाला असेल. आधी तीन मोठे लीड, त्यानंतर तीन लाँच केलेले हीरो. त्यांच्यापैकी त्यातल्या त्यात भावखाऊ रोल उदय चोप्राचा. त्यानंतर जे दोघे उरतात त्यातील एकाच्या हिरॉइनचा सासरा!
याउलट त्याच्या करीयरच्या सुरूवातीला सुद्धा तो बहुधा अमजद, प्राण वगैरेंच्या "वरचा" व्हिलन होता. अमिताभच्या नसीब मधे.
अमजद खान शोले मधे जसा होता
अमजद खान शोले मधे जसा होता तसा तो खूंखार वाटायचा. अपघातानंतर तो फुगत गेल्यानंतर त्याला थेट वडलांचे रोल मिळाले. खुंखार ऐवजी लडीवाळच जास्त वाटू लागला. पुढे त्याला तसे रोलही मिळत गेले. अमरीश पुरींनी मात्र दोन्ही प्रकारच्या भूमिका सुंदर केल्या.
घातक मधला रोल कोण विसरेल ?
हो ऑफ कोर्स! मी फक्त या
हो ऑफ कोर्स! मी फक्त या पिक्चरमधे म्हणत होतो. वाचलेल्या माहितीनुसार अमिताभची कारकीर्द सावरायला त्याला मोहब्बतें मधे रोल यश चोप्राने दिला. हे झाले नसते तर कदाचित म्हातार्या प्रिन्सिपॉलचा रोल अमरिश पुरीकडेच आला असता. त्याने साधारण तसा रोल डीडीलजे मधे केला होताच.
मोहब्बते हा इतका वाईट होता कि
मोहब्बते हा इतका वाईट होता कि अमिताभ बच्चनची उरली सुरली क्रेझ त्याने संपवली.
अमरीश पुरीने ती भूमिका जास्त छान केली असती, पण सिनेमा चांगला झाला असता असं नाही.
९० च्या दशकात मिलिंद
९० च्या दशकात मिलिंद इंगळेच्या 'छुई मुई सी तुम लगती हो' ह्या गाण्यात 'प्रीती'ला पहिल्यांदा पाहिली होती तेव्हाच ती आणि कदाचित तिच्यामुळे ते गाणेही खूप आवडले होते. छान दिसायची पण फार काही पुढे आली नाही. असो... तिच्या आणि मोहोब्बते बद्दलच्या पोस्ट्स धमाल आहेत 😀
मोहोब्बते आधी शाहरुखचा पिक्चर
मोहोब्बते आधी शाहरुखचा पिक्चर होता. त्याचा एक ट्रॅक अमिताभ सोबत होता तर एक ऐश्वर्या आणि नवीन पोरांसोबत.
जसे कभी खुशी कभी गम मध्ये देखील त्याचे अनुक्रमे अमिताभ, काजोल, आणि उत्तरार्धात हृतिक यांच्यासोबत वेगवेगळे ट्रॅक होते.
वीर झारा मध्ये सुद्धा अमिताभ शाहरुख एकत्र होते. तिथेही असेच होते. पण तिथे अमिताभचा रोल छोटाच होता. आता आठवत सुद्धा नाही. लहानपणी पाहिलेला.
सांगायचा मुद्दा, मोहोब्बते मध्ये अँग्री ओल्ड मॅन अमिताभ + रोमान्सचा बादशाह शाहरुख अशी जुगलबंदी वाटत असली तरी प्रत्यक्षात ते चित्रपट शाहरुखचे होते. अमिताभचे रोल अमरीशपुरी कॅटेगरीच होते. फक्त अमिताभच्या स्टारडमने तेवढी नारायण शंकरला हाइप मिळाली.
हा धागा मस्त आहे. काकाच्या
हा धागा मस्त आहे. काकाच्या मेव्हण्याच्या भावजयीच्या पुतणीच्या सासूच्या आतेभावाच्या मुलाच्या मुलीला बाळ झालं. त्याचं बारसं १४ तारखेला आहे. या प्रसंगी "सूनबाईंच्या आत्येबाई गंगूबाई" हा सिनेमा दा़खवण्यात येईल ही अनाऊन्स मेंट सुद्धा इथे केली तर सर्वांना समजेल.
टीप : सिनेमा बारशाच्या ठिकाणी आणि यजमानांकडूनच दाखवण्यात येईल असा उल्लेख वरच्या अनाऊन्समेण्ट मधे का नाही असे विचारणारा पक्का मायबोलीकर समजावा.
मर्द
मर्द
वसईचा किल्ला सुरूवातीला दिसतो. पाठीमागून एक आवाज येतो. इंग्रजांच्या जुलमाबद्दल सांगतो. त्यासोबत दृश्य दिसतं कि ब्रिटीशांचे सैनिक म्हणून काही भारतीय किल्ल्यातून मोठ मोठ्या सोन्याच्या मूर्त्या खांद्यावर घेऊन बाहेर पडत आहेत. एक रबरी टायर असलेलं रणगाडासदृश्य वाहन आहे, ज्याला तोफ लावली आहे. एखाद्या जीपला पुठ्ठ्याचं डेकोरेशन करावं असं ते वाहन आहे. या मूर्त्या ते ट्रकमधे ठेवत आहेत. एक ट्रक भरून सोन्याच्या मूर्त्या वसईच्या किल्ल्यात कुणी ठेवल्या असतील ? ब्रिटीश म्हणून राज कपूरचा घार्या डोळ्याचा चुलतभाऊ कमल कपूर बोबडं हिंदी बोलतोय. पण मधेच ते शुद्ध येतं. एकूण तीनच ब्रिटीश आहेत. कपूरचं नाव जनरल डायर आहे. दुसरा ब्रिटीश भारतीय आहे त्याचं नाव कर्झन आहे आणि बॉब क्रेस्तोचं नाव सायमन आहे. मनमोहन देसाई यांनी पाचवी सातवी ते दहावीची इतिहासाची पुस्तकं एका दमात वाचून काढल्यावर जी तीन नावं लक्षात राहिली ती त्यांनी वापरली. त्यांचा कालखंड कोणता, जनरल मोठा कि कर्नल या भानगडीत ते पडत नाहीत. ड्युक हे सुद्धा नावच असावं म्हणून ते सायमनच्या हाताखाली ड्युक ऑफ वसई पण दाखवू शकले असते.
एकंदर ब्रिटीश अधिकार्यांना सोनं लुटणे हे एकमेव काम असावे. भारतात जिथे जातील तिथे त्यांनी खजिने शोधून लुटले असावेत. जनरल ला लॉर्ड कर्झन हुकूम देतो कि "राजासाहब का खजिना लुटोगे तो वो आपको छोडेंगे नही" म्हणणार्या जनतेला शहीद करा. जनता पण असे डायलॉग का मारत असते ?
राजासाहब एका महालात येरझरा घालत आहेत. येरझराचं अनेकवचन पण येरझराच होतं हे त्यांना कुणी तरी सांगितलं पाहीजे. त्यांच्या अंगरख्याचं आणि जाकीटाचं व्यस्त प्रमाण जेव्हढं लक्ष वेधून घेणार नाही तेव्हढे डोईवरचे कुरळे जावळ लक्ष वेधून घेते. शक्यतो असे केस जग्गा डाकू वगैरेंचे असतात. मेहमूदच्या कुंवारा बाप मधे व्हिलनचे असे केस होते. एक स्त्री बहुतेक त्यांची पत्नी असावी, अवघडलेली आहे. ते येरझरा घालत होते त्या हॉलला लागूनच खोली आहे आणि तिची खिडकी हॉलमधे सताड उघडी आहे म्हणूनच तिला बेडरूम म्हणता येत नाही. अचानक बाळाचा आवाज येतो आणि ती स्त्री चेहरा खिडकी कडे वळवते.
तर दचकायची पाळी आपली. ती साक्षात निरुपा राय ! ज्याच्याशी हिचं लग्न होतं त्याचे वाईट दिवस सुरू होत असतात. दीवार मधे सत्येन कप्पूवर चोरीचा आळ आला, तो परागंदा झाला आणि कुटुंब देशोधडीला लागलं. कुठल्याही नवर्याला तिने सुख लाभू दिलं नाही. अगदी मुलांना सुद्धा नाही. अमर अकबर अॅंथनी मधे प्राणला नको नको केलं होतं. आता राजासाहब म्हणजे दारासिंगच्या वाटेला काय येतंय ?
मी पण बघते तुम्ही पण बघा.. मर्द !
अस्मिता, स्वाती, विकु >>>>
अस्मिता, स्वाती, विकु >>>> ह्ये वागणं बरं नव्हं. तुम्ही प्रोटेक्शन, प्रोटेक्शन करताय मग शेट्टीपुत्राच्या करिअरचं काय? त्याला दुसरी भूमिका कोण देणाराय? आधीच एक तर जगात एवढी बेरोजगारी वाढलीय.
मला आवडलेला बा पहिला बॉर्डर (जरी सुहागरात उरका कॅटेगरी वाटली तरीही.) ते गाणंच मला फारसं आवडत नाही. नुसतं ऐकायलासुद्धा. संदेसे आते हैं आणि हमें जब से ही दोन आवडतात.
अक्षय खन्ना is ♥ पण राखी आणि पूजा भट्ट दोघींनीही पीळ मारला होता. 'लाहौर के गंदी नाली दे कीडे'सकट सनी देओल पण.
अस्मिता, स्वाती, विकु >>>>
..
माझेमन बरोबर आहे तुझं.
माझेमन
बरोबर आहे तुझं. "संदेसे आते है" गाणं तेव्हा चांगले वाटले होते पण पुन्हा आवर्जून ऐकावं असं काही नाही त्यात. दूरदर्शन मुळे ते पाठ झाले इतकेच. काल थोडा वेळ पाहिला बॉर्डर, पूजा भटला मी विसरले होते. खरेच दोघींनी पिळले आहे, नुसत्या दिसल्या तरी पिळल्यासारखे वाटत होते. काल कुठल्यातरी चॅनल वर मुद्दाम दाखवत असावेत, नव्याचे प्रमोशन करण्यासाठी. त्या हिरोचे किंवा त्या सिनेमाच्या प्रिक्वेलचा अचानक मारा व्हायला सुरू होतो. सगळीकडे त्यांच्याशी संलग्न चर्चा, व्हिडिओ दिसायला लागतात. मार्केटिंगचा भाग आहे.
फा म्हंटला आहे त्याला अगदी, अगदी. त्यात सनी why are you vomiting म्हणतो अक्षयला, पहले कभी खून देखा नहीं है क्या वगैरे वगैरे होऊन एकदम गोरिलाच्या बॉडी लँग्वेज मधे रागावतो. तेव्हा मलाही रहेमान डकैत आठवला.
अजून एक कुंकू पुसून आनंदी झाल्याला तसेच काही तरी आठवले. रा- वन मधे करीना नवरा मरून गेल्यावर भारतात येते आणि लाल साडीत पदर कमरेला गुंडाळून 'छम्मकछल्लो' करते. तिच्या अंगात रावनची बाधा झालेली असते तरीही हे माईलस्टोन आहे. तुम्हाला एक सीन आठवला तर आम्ही त्यापेक्षा उथळ आठवून दाखवू.
छुईमुईसी तुम- संभा- हो, तेव्हा आणि तेवढीच लक्षात आहे ती. त्या गाण्यातल्या बारक्या टेडी बेअरची फॅशन आली होती तेव्हा. आर्चिजच्या दुकानात जाऊन पोरंपोरी ते घेऊन यायचे.
श्रद्धा - शेफाली शहाच्या तोंडी सात वर्षे ऐकल्या सारखे वाटत होते, पण पुन्हा मोहब्बते पाहण्यापेक्षा तुझ्यावर विश्वास ठेवते.
ते वयाचं गणित मात्र गंडलेलं आहे. पण सगळा पिक्चरच गंडलेला आहे त्यापुढे प्रीतीच्या वयाचे काय.
बारक्या टेडी बेअरची फॅशन आली
बारक्या टेडी बेअरची फॅशन आली होती तेव्हा
>>> हो हो.
रात्री ते दूध पिणार नसाल तर >>> मग काय? एकतर भल्या मोठ्या काचेच्या ग्लासात आणतात. यांच्याकडे स्टीलचं फुलपात्र किंवा चहा कॉफीच्या मगातून पित नाहीत का दूध? का प्रेक्षकांना समजावं दूधच आहे म्हणून? नाहीतर काय ब्लॅक कॉफी समजणार आहोत का आम्ही?
बरं आणतात आणि साईड टेबलवर ठेवतात. सांडलं तर बेडशीट, गादी आणि जमिनी कोण साफ करणार मध्यरात्री?
मोहोब्बते आधी शाहरुखचा पिक्चर
मोहोब्बते आधी शाहरुखचा पिक्चर होता. >> आधी म्हणजे ? मी पाहिला त्यात शाहरूख खान होता. पूर्ण नाही पाहिला. नॉशिया आलेला.
वीर झारा - आधी नव्हता आवडला. अलिकडे आवडला.
मर्द आठवत नाही राव आता. परत बघतो आता ही पोस्ट वाचून.
निरूपा रायचे डोळे जातात तो अमर अकबर अँथनी. यात पण काही तरी जातं . दारासिंग दोर टाकून विमान थांबवतो.
नायतर काय! यांच्या आया
नायतर काय! यांच्या आया यांच्या कानीकपाळी कधी ओरडल्याच नसतील का? स्वयंपाकघरात, टेबलवर बसुन (खरंतर खुर्चीवर, पण कानीकपाळी मध्ये टेबलवरच म्हणत) दूध पी, ते दूध घेऊन धांदरटपणा करू नको!
बाकी जस्ट झोपायच्या आधी इतकं लिक्विड पोटात गेलं तर रात्री पायधुवायला उठायला लागेल त्याचं काय? 'तेरा जिस्म ओढ लू', आणि 'आज जाने की जिद ना करो' करायचं असेल तर ब्लॅडर कोणी फुल करायला सांगितलं आहे!
श्रद्धा - शेफाली शहाच्या
श्रद्धा - शेफाली शहाच्या तोंडी सात वर्षे ऐकल्या सारखे वाटत होते, पण पुन्हा मोहब्बते पाहण्यापेक्षा तुझ्यावर विश्वास ठेवते
<<<<< बाबौ! मला एकदम जिम्मेदारी का एहसास झाला हे वाक्य वाचून. इडलीचं पीठ वाटत होते ते बाजूला टाकून आधी धावत नेटफ्लिक्स गाठलं. शेफाली शाहचा डायलॉग कान देऊन ऐकला.
हुश्श! 'दोन वर्षे' आहे तो काळ... मी आपल्या विश्वासास पात्र ठरू शकले याबद्दल मला आनंद आहे. इडलीच्या पिठाकडे वळते आता.
मी पण बघते तुम्ही पण बघा.. मर्द !<<<<<
'जलजला'मधलं सोनं नंतर वसईच्या किल्ल्यात आणून ठेवलं असेल.
थॅंक्यू. माम आणि अमित
माम आणि अमित
मर्द, मीही हल्लीच पाहिला आहे. वाचते. कुत्र्यासाठी आणि घोड्यासाठी पाहिला होता.
कोणी कुंकू पुसल्यावर लगेच
कोणी कुंकू पुसल्यावर लगेच आनंदाने नाचायला गेलेली हिंदी चित्रपट इतिहासातील एकमेव हिरॉइन असेल ती. >>>> याच्यावर हसायचं राहून गेलं होतं.
तो आवाजाच्या रेंजचा पण काय अब्यास केलाय. एवढं लक्ष दिलं नव्हतं कधी. (कारण अर्थात जिमी शेरगील)
मर्द > मर्द तांगेवाला असं काही गाणं आहे का यात? लहानपणी ऐकलं होतं. मर्द, जवाँमर्द विशेषण इतरांनी आपल्याला लावायची असतात हा समज तेव्हाच खोडला गेला.
मर्द तांगेवाला >>> त्याचा
मर्द तांगेवाला >>> त्याचा अचूक उच्चार मरिद तांगेवाला आहे.
मी पण बघते तुम्ही पण बघा.. मर्द ! >>>
बरीच वर्षे झाली मर्द बघून. ढोबळ लक्षात आहे पण फार नाही.
एक रबरी टायर असलेलं रणगाडासदृश्य वाहन आहे, ज्याला तोफ लावली आहे. एखाद्या जीपला पुठ्ठ्याचं डेकोरेशन करावं असं ते वाहन आहे >>>
पाचवी ते सातवी इतिहासाची पुस्तके अगदी परफेक्ट आहे. नशीब इंग्रजांसंबंधितच भाग वाचले. नाहीतर यात इंग्रज अधिकार्यांची नावे फ्रेंच व डच सुद्धा दिसली असती.
एकंदर ब्रिटीश अधिकार्यांना सोनं लुटणे हे एकमेव काम असावे. भारतात जिथे जातील तिथे त्यांनी खजिने शोधून लुटले असावेत. >>>
टोटली. आणि भारतातू संपत्ती लुटली म्हणजे लिटरली गुहांमधे वगैरे रॅण्डमली ठेवलेले सोने तेथून पळवायचे. मराठी सिरीज मधे ऑफिसमधल्या पैशाची अफरातफर म्हणजे लिटरली बॉसच्या ड्रॉवर मधून लाखो रूपये कॅश पळवतात तसे.
मला RRR पाहताना तो ग्लोरिफाइड मर्दच वाटला.
रा- वन मधे करीना नवरा मरून
रा- वन मधे करीना नवरा मरून गेल्यावर भारतात येते आणि लाल साडीत पदर कमरेला गुंडाळून 'छम्मकछल्लो' करते. तिच्या अंगात रावनची बाधा झालेली असते तरीही हे माईलस्टोन आहे. >>>
तो पिक्चरच पाहिलेला नाही. त्यामुळे ही माहिती नव्हती.
'जलजला'मधलं सोनं नंतर वसईच्या किल्ल्यात आणून ठेवलं असेल. >>>
शेफाली शाहचा डायलॉग कान देऊन ऐकला.
हुश्श! 'दोन वर्षे' आहे तो काळ >>>
पण पुन्हा मोहब्बते पाहण्यापेक्षा तुझ्यावर विश्वास ठेवते >>>
वीरझारा व वरच्या मर्द वरून - राजे महाराजे जेव्हा येरझारा घालतात त्याला वीरझारा म्हणत असावेत. हे मी शोलेच्या टाकी सीन च्या संवादात वाचले लिहीताना. "अरे भाई ये वीरझारा क्या होता है? अंग्रेज लोग जब येरझारा घालते है...."
रतातू संपत्ती लुटली म्हणजे
रतातू संपत्ती लुटली म्हणजे लिटरली गुहांमधे वगैरे रॅण्डमली ठेवलेले सोने तेथून पळवायचे. मराठी सिरीज मधे ऑफिसमधल्या पैशाची अफरातफर म्हणजे लिटरली बॉसच्या ड्रॉवर मधून लाखो रूपये कॅश पळवतात तसे. >>
याचा स्पूफ केला पाहिजे. सोनं लुटायचा अजेंडा मिटिंग मध्ये येतो. ईष्ट इंड्या कंपनीचा पीएम गोल्ड माईन, फर्नेस वगैरे बोलणे चालू करतो. तिकडे डुगना लगान देना पडेगा करत टॉम ऑल्टर गुहेतून सोन्याच्या विटा घेऊन झूम वर येतो.
सगळेच
सगळेच
बरं आणतात आणि साईड टेबलवर
बरं आणतात आणि साईड टेबलवर ठेवतात. सांडलं तर बेडशीट, गादी आणि जमिनी कोण साफ करणार मध्यरात्री?>>> अगदी अगदी, ..त्या रामलिला मधे सुद्धा दिपिका धुप घेवुन जीमनॅस्टीक करत फिरवत असते..पाढरी चादर,पान्ढरे कपडे..राख सान्डली तर बसा बोम्बलत!!
रामलिला मधे सुद्धा दिपिका धुप
रामलिला मधे सुद्धा दिपिका धुप घेवुन जीमनॅस्टीक करत फिरवत असते>>>
हो नं. तिला कुणीतरी सांगा भन्साळीचाच असला तरी हा देवदासमध्ये नाहीये आणि तुला इन्टेन्स गाणं सादर करायचं आहे, बसल्याजागी धुनुचि डान्स नाही करायचाय.
सगळ्यात महत्वाचं म्हणजे हनीमुनला आल्यावर माणसाने शांतपणे महत्वाचा कार्यभाग उरकून घ्यावा. (बॉर्डरमधल्या सुनील शेट्टीचा आदर्श डोळ्यापुढे बाळगावा म्हटलं असतं पण अस्मिता लगेच आक्षेप घेईल. ) नंतर आयुष्यभर मच्छरदाण्या नी धुपाच्या कांड्या आहेतच.
राभु, श्रद्धा, फारएण्ड, अमितव
राभु, श्रद्धा, फारएण्ड, अमितव >>
मर्दवर सेपरेट धागा आलाच पाहिजे.
>>>"राभु, श्रद्धा, फारएण्ड,
>>>"राभु, श्रद्धा, फारएण्ड, अमितव >> Rofl मर्दवर सेपरेट धागा आलाच पाहिजे.">>>
दणकून अनुमोदन 👍
सगळ्यात महत्वाचं म्हणजे
सगळ्यात महत्वाचं म्हणजे हनीमुनला आल्यावर माणसाने शांतपणे महत्वाचा कार्यभाग उरकून घ्यावा>>>
यावरुन आठवले. शशी राजेश मुमताजचा प्रेम कहानी की तत्सम चित्रपटात बाहेरुन उत्तुंग दिसणार्या वाड्याचा दरवाजा उघडुन जखमी राजेश आत पाऊल टाकतो तो थेट सुहाग रात रुममध्ये. कोणा गाढवाने हे घर डिजाईन केले असावे जिथे मेन दरवाजा उघडताच बेडरुम येते??
आत शशी मुम्ताज हनिमुन सुरु करायच्या तयारीत असतात. ( दरवाजा आतुन बम्द न करताच). याने ते बघुन यु टर्न मारावा, तर मेला थेट जाऊन पडतो मुमताजच्या मांडीवर.. अरे नालायका, तु मित्राचे घर बघुन आश्रयाला आलास आणि त्याच्या बायकोच्या मांडीवर डोके ठेवतोस? मित्र दिसला नाही तुला डोके ठेवायला??
दुपारी लग्न लस्गलेल्या शशीचे भव्य घर संध्याकाळी पुर्ण रिकामे. त्याने राजेशची सोय एका वेगळ्या रुममध्ये करावी. तर येडा ह्याला स्वतःच्या रुममध्ये ठेवतो आणि हा बरा होईपर्यंत हनिमुन पोस्टपोन करतो. काय संबंध??? आणि वर मुमताजला ह्याची काळजी घ्यायला सांगतो. म्हणजे ते दोघे दिवसभर बेडरुममध्ये आणि हा बाहेर. देवा…. कसे होणार रे बाबा..
साधना

Pages