चित्रपट कसा वाटला १२

Submitted by धनि on 4 August, 2025 - 10:36

२००० झाले पण Lol

मागचा धागा
https://www.maayboli.com/node/86233?page=66#new

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@अनया थॅंक्यू

@अस्मिता तुझा वैताग पोहोचला. मी या पिक्चरचा ट्रेलर रेझांग ला वरच्या पिक्चरमध्ये पाहिला होता तेव्हाच काय चाल्लंय असं झालेलं. त्यामुळे धनुष असून मी वाटेला पण गेले नाही.

इथे घासून डिग्र्या मिळवून, एनसीसीत दिल्लीत परेड करून, स्पोर्टसमधे अव्वल असून SSB च्या मेन किंवा इंटरव्ह्यूमध्ये उडाल्यामुळे निराश झालेली पोरं पाहिलेत. याच्यासारख्या छपरीला आर्म्ड फोर्सेस हिंग लावून विचारणार नाहीत. हिंदूस्थानका नं १ पायलट म्हणे.

तुझा गरीब, गुंड मुली आणि सुंदर मुली याबद्दलचा प्रतिसाद आवडला.
प्रिटी प्रिव्हिलेज मुली किंवा मुलं दोघांनाही मिळतोच. मुलींचा हायलाईट केला जातो.

प्रेग्नंट कृती जे काही करतेय असं तू लिहिलं आहेस ते पाहून तर दिग्दर्शक व पटकथालेखकाच्या मुस्काटीत द्याव्याश्या वाटताहेत.

दारू पिऊन पटकथा लिहिली आहे
सच्चा प्यार गरिबोंका वगैरे
Lol
फाचं बच्चनप्रेम लपत नाही.

रांझना मला आवडला. त्याचा शेवट सोडल्यास सामान्य, ऑल्सो रॅन कॅटेगरीतल्या मुलाने त्याला अप्राप्य वाटणाऱ्या मुलीवर केलेलं प्रेम आणि त्याची परिणिती या बाबतीत तो परफेक्ट पिक्चर आहे. धनुषचा चेहरामोहरा, अंगकाठी वगैरेचा फार खुबीने वापर केलाय त्यात. वर लिहीलंय तसा ऑल्सो रॅन मुलाचा पॉईंट ऑफ व्ह्यू मांडला आहे. धनुष जरी प्रभावी वाचला तरी मला त्यात ग्लोरिफिकेशन नाही वाटलं. उलट सोनमच्या जागी अभिनेत्री असती तर तो पिक्चर अजून इफेक्टीव्ह झाला असता असं वाटलं.

>> स्त्रियासंबंधीच्या बातम्या फेसबुकवर असतात, त्याच्या खाली असलेल्या कमेण्ट्स पाहिल्या तर एव्हढी जनता स्त्रियांचा द्वेष करते का असं वाटतं. <<

सुंदर स्त्रियांचा द्वेष करण्यात स्त्रियांचा देखील प्रचंड सहभाग असतो मात्र त्या विझिबली शिवराळ नसतात म्हणून त्यांची असुया फेसबुक कॉमेंट्स मध्ये दिसत नाही. फेसबुक कमेंट मध्ये काय दिसतं की बहुतेकांना स्वतंत्र स्त्रिया आजूबाजूला असलेल्या समाजाचा अनुभव अजिबातच नसतो ती कल्पनाच त्यांना कुठेतरी अजिबात सहन होत नाही. स्त्रिया मोकळ्या असण्यास समाज प्रगत असायला लागतो. आणि ही गोष्ट सुबत्ता असल्याशिवाय होत नाही. थोडक्यात स्त्रियांचा मोकळेपणा ही एक श्रीमंती गोष्ट आहे असे बहुतेकांचे न्यूनगंड असतात आणि जरासं खरवडलं तर त्यामागे केवळ स्त्रीद्वेष नसून स्वतः गरीब भिकारी असण्याची खदखद असते असे दिसते. दुसरी गोष्ट सुंदर स्त्रियांवर विशेष संस्कारी राहण्याचा जो सतत दबाव तयार झालेला असतो तो केवळ पुरुषांकडून सुद्धा नाही तर आजूबाजूच्या सगळ्या स्त्रियांकडून सुद्धा होत असतो. कारण त्या निमित्ताने देखील सौंदर्यावर आपला मालकी हक्क सिद्ध करत राहणे हा एक प्रकारचा पॉवर स्ट्रगल घडत असतो.

पुरुषांबाबतही कमी अधिक प्रमाणात हेच आहे. मात्र पुरुषांना जोखण्याच्या च्या अनेक क्रायटेरिया असतात त्यात सौंदर्याचा क्रम खूप वरचा नसतो.

बरेचदा खूप चांगलं लिहिणारे स्त्री-पुरुष कुरूप असतात. बुद्धिमानतेला नको तितके महत्त्व देणाऱ्या आपल्या समाजात असे कुरूप लोक स्वतःची सत्ता स्थापित करायचा प्रयत्न करतात मग ते अध्यात्म असो किंवा इतर क्षेत्रे असोत.

मृनाल ठाकूर चा फॅमीली स्टार म्हणुन असाच १ तद्दन बिंडोक चित्रपट आहे, १ मोठ्या कंपनीची CEO कायतरी प्रोजेक्ट करायला हीऱो च्या घरी येते जो म्हणे फॅमिली मॅन असतो आणि त्याची कुटुंब स्टोरी चव्हाट्यावर (म्हणजे) कॉलेज च्या प्रोजेक्ट वर सादर करते तर तो चिडतो.
नोकरी जॉइन करतो ते तिच्याच हापिसात Wink किती योगायोग. मग फॉरेन ट्रीप ला हि सीइओ डायरेक्ट ह्या नवशिक्या सोबत जाते.. वगैरे खूप फालतू टाईम पास आहे. कोणी पाहिलाय का?

रानभुली, मयसभा बद्दल खूप सखोल आणि उमदं लिहिले आहे. सहसा चित्रपट जास्त बघत नाही. हा बघावासा वाटतोय. नाही आवडला तर दोष देणार नाही. पण कुठेही जवळपास उपलब्ध आहे असं दिसत नाही. अर्थात शोधणे हे माझे काम आहे.

जुगनुमा बद्दल अजून सविस्तर वाचायला आवडेल. दोन्ही साठी आभारी आहे. अशा प्रकारचे सिनेमे बघण्यात आले तर नक्की लिहा. नाटक असेल तरीही कळवा.

कोणी पाहिलाय का?
>>>
मी पाहिलाय फॅमिली स्टार. मला आवडलेला. लॉजिकशिवाय करमत नाही हा हट्ट सोडला तर मनोरंजक आहे. यात बराच मोठा वाटा दोन्ही कलाकार लूक आणि स्टाईल या निकषात माझ्या आवडीचे आहेत याचाही आहे. स्वतःला त्या हिरोच्या जागी ठेवून आपल्याशी अशी फिल्मी फॅन्टसी घडली आणि अशी एखादी सुंदर मुलगी आपल्या आयुष्यात आली तर असा विचार करून जे चित्रपट छान वाटतात त्या कॅटेगरीमधील आहे. मला आवडतात असे चित्रपट Happy

तो वेळ आता पिक्चर बघण्यासाठी देता येतो. रोज किमान एक तरी चित्रपट किंवा वेब सिरिजचे दोन-तिन एपिसोड्स बघितल्याशिवाय दिवसाची अखेर होत नाही माझ्या >> संजय भावे एकच तर आयुष्य आहे. ते असं चित्रपट आणि वेब सिरीज बघण्यात वाया घालवणार ? बाहेर पडा. सुंदर सुंदर ........ फुलं, पानं , झाडं बघा. लोणावळ्याला जा, स्वित्झर्लंडला जा.

नाहीतर सिनेमे बघता ना ? मग त्यातल्या संदेश अंमलात आणा. समाजकार्य करा. येता जाता जेव्हढ्या लोकांना होईल तेव्हढी मदत करा. सिनेमातच सांगितले आहे. https://www.youtube.com/watch?v=2eJjHaSmgZ8&list=RD2eJjHaSmgZ8&start_rad...

>>>"बाहेर पडा. सुंदर सुंदर ........ फुलं, पानं , झाडं बघा. लोणावळ्याला जा, स्वित्झर्लंडला जा."

होय सर! आता तुम्ही म्हणताय तसेच आयुष्य जगायचा प्रयत्न करतो 😂

असे रोज रात्री जेवण झाल्यावर चित्रपट न बघता लोणावळा किंवा स्वित्झर्लंडला जाणे सोपे नाही.

त्यापेक्षा घरच लोणावळा किंवा स्वित्झर्लंडला घेतले तर कुठे जायची गरज पडणार नाही. घरीच बसून रोज चित्रपट बघता येईल. दोन्ही उद्दिष्टे एकाच वेळी साध्य आणि आयुष्य डबल सुंदर होईल.

आवेशम (Aavesham) – २०२४
मल्याळम - हिंदी डब
जियो हॉट स्टार
जॉनर – ऍक्शन कॉमेडी

एका शब्दात वर्णन करायचे तर फाडू चित्रपट आहे.

एवढे दिवस समोर दिसत असूनही पाहिला नव्हता. पण काल योग आला.

फहाद फासिल काय जबरदस्त ऍक्टर आहे. काय खतरनाक swag दाखवला आहे. त्याच्या एकट्यासाठी सुद्धा बघू शकता. जबरदस्त लहरीपणा दाखवला आहे आणि थेटर मध्ये एन्जॉय करावेत असे त्याचे फाईट सीन आहेत.

स्टोरी लाईन – तीन जुनियर कॉलेजची फ्रेशर मुले. रॅगिंगचा वाईट अनुभव येतो. विरोध करायला गेले तर मार पडतो. म्हणून बदला घ्यायला एखाद्या लोकल गुंड्याशी मैत्री करता येईल का याचा शोध घेतात. त्यात त्यांना हा रंगा भाई भेटतो. त्याच्या जीवावर हे सुद्धा कॉलेजचे भाई बनतात. पण त्या नादात स्वतःच्या करिअरची वाट लावतात आणि त्याच्या गँगमध्ये जाऊन फसतात. नंतर यांना जाणवते की हा सायको आहे आणि उद्या आपल्याला सुद्धा मारू शकतो तसे हे घाबरून त्याच्यापासून सुटकेचे प्रयत्न करू लागतात. पण ते देखील सोपे नाही हे जाणवते. स्टोरी एवढीच आहे. पण चित्रपट धमाल बनवला आहे. हिंसाचार क्रूर किळसवाणा नाही तर स्टायलिश आहे आणि ओव्हरऑल चित्रपटाला एक कॉमिक टच आहे. त्या तीन मुलांचा अभिनय देखील तोडीस तोड आहे. रंगाभाईचा एवढा जबरदस्त रोल असून सुद्धा ते आपले नाणे खणखणीत वाजवतात. त्यामुळेच पिक्चर जमून आला आहे कारण तो आपण स्वतःला त्यांच्या जागी ठेवूनच बघतो.

वैधानिक इशारा – एवढे राडे दंगे लफडे होऊन सुद्धा पोलीस कायदा प्रशासन कुठेच दिसत नाही म्हणून नाके मुरडणार असाल तर मात्र दूरच राहा Happy

राज जी, तुमचे खूप आभार. खूप छान वाटलं तुमचा प्रतिसाद वाचून.
तुमचा व्यासंग पाहता दडपण सुद्धा आलं. मला एव्हढं काही समजत नाही चित्रपटातल. खरंचच.
मयसभा चं परीक्षण माझं नाही. माझ्या काकाचं आहे. मी पोस्टमनचं काम केलं फक्त.
जुगनुमा बद्दल खूप घाईत लिहिले आहे. कारण नंतर वेळ मिळेल न मिळेल. आताही मोबाईल वरून डोकावले आणि तुमची पोस्ट दिसली. मला आवडलेला चित्रपट अनेकांना आवडत नाही. त्यामुळे विचार करून बघा. पण तुम्ही पाहू शकाल असे वाटते. Happy

[ह्या प्रतिसादात बरेचसे विषयांतर होणार आहे पण त्यासाठी 'धाग्याचे धनी' (ज्यांचा आयडी पण 'धनी' आहे, किती हा योगायोग 😀) मला माफ करतील अशी अपेक्षा आहे!]

>>>"त्यापेक्षा घरच लोणावळा किंवा स्वित्झर्लंडला घेतले तर कुठे जायची गरज पडणार नाही. घरीच बसून रोज चित्रपट बघता येईल. दोन्ही उद्दिष्टे एकाच वेळी साध्य आणि आयुष्य डबल सुंदर होईल.">>>
ऋन्मेऽऽष तुमची सूचना छानच आहे. त्याप्रमाणे एखाद्या 'निसर्गरम्य परिसरात घर नाही पण गेला बाजार 'एखादे 'विकएंड होम' घेतलेले कधीही चांगले! निसर्गाच्या सानिध्यात तिथे बसून चित्रपट आणि वेबसिरीज बघण्यातली मजा खरोखर काही औरच असते राव.

>>>"लेखक तुम्ही का सल्ले देताय..ज्याला जे हवे ते करेल..">>>
aashu29 🙂 😀 😂
पण त्यांचे,
>>>"बाहेर पडा. सुंदर सुंदर ........ फुलं, पानं , झाडं बघा. लोणावळ्याला जा, स्वित्झर्लंडला जा.">>>
आणि
>>>"सिनेमे बघता ना ? मग त्यातल्या संदेश अंमलात आणा. समाजकार्य करा. येता जाता जेव्हढ्या लोकांना होईल तेव्हढी मदत करा.">>>
असे 'बहुमूल्य' सल्ले वाचल्यावर माझ्या डोक्यात खाडकन प्रकाश पडून "साला आपली जिंदगी अगदीच 'झंड' वगैरे असल्याचे लक्षात आले" आणि आता तडक बाहेर पडावे आणि पैले छुट 'इजिप्त' मग 'काश्मीर', 'दुबई', 'कोकण-तळ कोकण-गोवा', 'नेपाळ', वगैरे करत आठेक वर्षांपूर्वी कोणीतरी मोटिव्हेट केल्यामुळे का असेना पण 'आपणही लिहू शकतो' असा दिव्य साक्षात्कार व्हायच्या आधी उगाचच बघून झालेले 'मॉरीशस', 'थायलंड', 'सिंगापोर', 'मलेशिया', 'चीन', 'स्कॉटलंड', 'श्रीलंका', 'इंडोनेशिया', 'भूतान', 'कॅनडा', 'स्वित्झर्लंड' वगैरे पुन्हा बघत 'पूर्व ते पश्चिम' आणि 'उत्तर ते दक्षिण' असा सगळा भारत पुन्हा हिंडत, फोटो काढत, व्हिडीओ रेकॉर्ड करत, त्याविषयी ऑर्कुट, फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप आणि मिपा-मायबोलीवरच्या प्रतिसादांत त्रोटक स्वरूपात लिहिलेले किस्से, आठवणी वगैरे गोळा करून त्यावरही वाचक 'बेजार' होतील अशा दीर्घ लेखमालिका लिहिण्याचा सपाटा लावावा.
गेला बाजार पूरग्रस्तांसाठी मदतकार्य म्हणुन महाडची 'गांधारपाले लेणीही' बघून यावी... असे जीवनाचे नवीन ध्येय मला गवसले आहे 😀
एवढं सगळं करुनही मिळणार्‍या फावल्या वेळात चित्रपट-वेब सिरीज बघण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा ही खरंच कितीतरी 'मज्जा नी लाईफ' होईल 😂

(ह्यातले काही मागे पासवर्डचा प्रॉब्लेम झाल्यामुळे माबोवर लिहिता आले नव्हते, पण एक प्रकारे ते बरेच झाले... कारण आमचे माबोवरचे 'क्लास टीचर' ऋतुराज सर लैच कडक स्वभावाचे असल्याने ते माझ्या लेखनात माझ्या काही ''चांगल्या छंदां विषयीचे' उल्लेख आले की लगेच डोळे वटारतात, मला त्यांच्याविषयी खूप भीतीयुक्त आदर असल्याने तसले उल्लेख असलेले लेखन इथे करणे शक्यतो टाळतोच बुवा 😀)

>>>"एका शब्दात वर्णन करायचे तर फाडू चित्रपट आहे.">>>
आज कार्ती, कृती शेट्टी अणि सत्यराजचा 'वा वाट्टीयार' बघायचा विचार होता, पण इतका चांगला आहे म्हणताय तर आवेशम बघायला घेतो आता. अभिनय कारकिर्दीतली पदार्पणाची पहिली इनिंग अपयशी ठरल्यानंतर अभिनयाचे रीतसर शिक्षण घेऊन पुनरागमनात यशस्वी ठरलेल्या फहाद फासिलबद्दल त्याच्यासोबत काम केलेल्या मित्राकडून मागे बरंच काही चांगलं ऐकल्यापासून त्याच्याविषयी आदर निर्माण झाला आहे, पुष्पा १ -२ आणि वेट्टाय्यान असे त्याचे इनमीन तीनच चित्रपट मी पाहिले आहेत आणि त्याच्या भूमिकाही आवडल्या आहेत.
हा कसा वाटला ते बघुन सांगतो.

आवेशम चांगला आहे पूर्णतः फहाद फसिल चा सिनेमा आहे धमाल कॅरेक्टर आहे त्याने निभावलेलं.
स्टोरी अशी काही नाहीये एक डॉन आणि त्याच्या शी प्रभावित झाले चार मित्र नंतर कसे त्याच्यात अडकतात ही स्टोरीलाइन.मुलांना जास्त आवडतोय हा सिनेमा ,माझा भाऊ सतत रिपीट वर बघत असतो हा चित्रपट .त्याच्या मुळे मीच चारपाच वेळा पाहिलाय हा पिच्चर विशेषतः बार वाल्या सीन नंतर . एकूण फहाद फासिल फॅन असाल तर मस्ट वॉच.

मला आवडला जुगनुमा. हा द फेबल य नावाने २०२५ मधे येऊन गेला आहे हे आठवलं.
बेस्ट मूव्ही.

सिमरन +७८६
त्याचा अभिनय तर भारी आहेच. पण सोबत तो माहोल क्रिएट करायचे काम दिग्दर्शक आणि त्याची एकूणच तांत्रिक टीम यांनी सुद्धा भारी केले आहे. त्याने तो इम्पॅक्ट क्रिएट झाला आहे.

जुगनुमा हा चित्रपट पाहिल्यावर असं वाटलं की, हा काही नेहमीचा एंडींग वाला ड्रामा नाही. हा बंडखोर मूव्ही आहे. हा सवयीच्या झालेल्या कथेचा चित्रपट नाही. तर हा निव्वळ सिनेमा आहे. शुद्ध सिनेमा. एक प्रकारचा जादुई स्वप्नासारखा अनुभव आहे. राम रेड्डीने हिमालयाच्या कुशीत एक छोटंसं जग उभं केलंय. १९८९ सालचा माहौल , देव नावाचा माणूस, त्याची बायको नंदिनी, दोन लहान मुले, आणि त्यांच्या आजूबाजूला पसरलेल्या हजारो एकरांच्या फळबागा. सफरचंद, जर्दाळू, आडू ( हेच आहे का ?) . सगळं हिरवं, शांत.

पण देव रोज सकाळी एक काम करतो. स्वतः बनवलेले मोठे पंख लावतो, उंच कड्यावर जाऊन पक्ष्यासारखा उडतो. वरून आपली सगळी जमीन, बागा, लोक बघतो. हे उडणं म्हणजे फक्त छंद नाही. तो स्वतःला सगळ्यांपेक्षा वर समजतोय, सगळं नियंत्रणात आहे असं वाटतंय त्याला. पण खरं तर तो निसर्गापासून, लोकांपासून दूरच राहिलाय. कदाचित हा त्याचा अहंकार आहे. किंवा त्याचं स्वप्नं. शेवट पाहिल्यानंतर जर या छंदाचा विचार केला तर वेगळे अर्थ समोर येतात. ही गंमत आहे.

मग एक दिवस बागेत एक झाड जळतं. मग दुसरं. मग आणखी. देवला वाटतं, हे कामगारांनी केलं असेल, किंवा भटक्या लोकांनी. किंवा गावात कुणीतरी त्याला काही तरी इशारा देतंय. तो रागावतो, चौकशी करतो, दमदाटी करतो. पण आग थांबत नाही. हळूहळू सगळं उलगडत जातं.

जमीन कशी मिळाली, आजोबांनी काय केलं, स्थानिक लोकांना कसं दडपलं गेलं, कीटकनाशकं कशी बागा मारतायत, आणि सर्वांत मोठं – देवच्या मनातली अपराधी भावना.
चित्रपटात काजवे (जुगनू ) खूप येतात. रात्री अंधारात चमकतात. पण ते क्षणिक असतात. सत्य असंच असतं. चमकणारं, पण क्षणिक लगेच हरवून जातं.

आणि जळणारी झाडं? ती फक्त आग नाहीत. ती देवच्या अंतर्मनातली आग दाखवतायत. त्याच्या अहंकाराची, लोभाची, अन्यायाची. ती आग म्हणजे देवच्या मनातली जळती भावना आहे. या बागा म्हणजे त्याचं सर्वस्व आहे. त्याचं हृदय आहे. प्रतिकात्मक अर्थाने त्याच्या काळीज आतून जळतंय. त्याला काहीतरी खातंय. त्यापासून पळण्यासाठी त्याने उडण्याचा छंद लावून घेतलाय का ?

हा चित्रपट स्लो बर्निंग आहे. संथ चालतो. कंटाळा येईल.
पण जरा संयम ठेवला तर प्रत्येक दृश्य मनात भिनत जातं. हिमालयाची शांतता, धूसर प्रकाश, रात्रीचे सावलीचे खेळ, मनोज बाजपेयीचे डोळे... सगळं कसं बोलकं ! मनोज बाजपेयी तर आउटस्टँडींग आहे. शांत राहूनही सगळं सांगतो.

तुंबाडशी खूप साम्य वाटतं. दोन्हीतही जादू आणि वास्तव एकत्र येतं. लोभ आणि अपराधी भावना, वारसा आणि शाप आहे. पण जुगनुमा जास्त शांत आहे, जास्त मन लावून बघावा लागतो. पर्यावरण, निसर्गाशी दुरावा, विशेषाधिकार. हे सगळं हळूहळू समजतं.

हे की पॉईण्टस आहेत का ? इथे सगळं लिहीलंय का ? त्यामुळे चित्रपट बघायची मजा निघून जाईल का ? तर तसं वाटत नाही.

टीप : चित्रपटाचं शूटींग मोबाईलच्या कॅमेर्याने नाही तर १६ एम एम वर केलं आहे. १९८९ चा फील येण्यासाठी ते मदत करतं. त्या वेळच्या चित्रपटाचा असायचा तसा लुक आहे. हे विचारपूर्वक केलं आहे.

Pan's Labyrinth नावाचा चित्रपट मिळवून बघा. मग हा बघा. त्यातही मॅजिकल रिअलिझम आहे. पहेली मी पाहिलेला नाही. पण तो ही असाच आहे असं ऐकलं आहे. याच सिनेमाच्या दिग्दर्शकाचा म्हणजे रामी रेड्डीचा तिथी सुद्धा असाच आहे. यातली सर्वच दृश्ये डोळ्याचं पारणं फेडणारी आहेत. पण काही दृश्ये लाजवाब ! जर आणखी काही दिवसांनी लिहिले असते तर आणखी मुद्दे आले असते. निसटलेले.

चष्मा हरवल्याने स्पेलिंगच्या चुका असतील तर क्षमा करा.

धागा बंद पडला वाटत.
बऱ्याच विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर काढलेलं दिसतंय.
नुसते सर्व सिनेमे आणि वेबसिरीज चा सपाटा लावला तर बॉस म्हणेल हे काम कधी करतात?

सामाजिक कार्य एव्हढे थोर कि अमूक तमूक बघू नका हे सांगण्यासाठी हलाहल पिऊन नीळकंठ बनलेत.

कडावर छान आहे. जियो हॉटस्टार वर उपलब्ध आहे.
धन्यवाद विजय देशमुख Happy

सस्पेन्स थ्रिलर आवडणाऱ्यांनी डोके भंजाळून टाकणाऱ्या अपेक्षा घेऊन बघायला जाऊ नये. भावनिक फॅक्टर आणि मांडणी जास्त इफेक्टीव वाटली. त्यामुळे एकेक सस्पेन्स क्लिअर होत गेले तशी रंगत वाढली. शेवटी अर्धा तास शिल्लक असताना सारे क्लिअर होऊन सुद्धा ते काय कसे झाले ही स्टोरी बघायला चांगली वाटली. मेन लीड हिरोईन शवविच्छेदन करणारी डॉक्टर असल्याने त्या अनुषंगाने बरेच इंटरेस्टिंग गोष्टी आल्या. तिला बघून सारखी दीपिका पदुकोण आठवत होती.

"जुगनुमा" पाहिला. कंटाळवाणा झाला. विशेष आवडला नाही. ही एक लोककथा आहे. मला त्यात फिलॉसॉफीकल वगैरे काही वाटलं नाही. मनोज वाजपेयी, दीपक डोब्रियाल सोडून बाकी सगळे लोक माहितीपटासारखे खरेखुरे वाटतात. ईशान्येकडील लोक आहेत बहुतेक. तिलोत्तमा शोम छोट्याशा रोलमधे आहे. चित्रपट मेडिटेटिव्ह आहे, फिलॉसॉफीकल नाही. शेवटी जे काही दाखवलं आहे ते ज्या उंचीवर जायला हवे तितका पुरेसा बिल्ड अप आधी दिसला नाही. हा मेनस्ट्रीम सिनेमा नाही. कामं चांगलीच आहेत, पण पंधरा मिनिटांत सांगून होणारे कथानक आहे. १६ mm मधे केल्यासारखे वाटले, जुनं कथानक जुन्या काळात घडल्यासारखं वाटावं अशी प्रकाशयोजना आहे. बऱ्यापैकी अंधारी आणि पिवळसर वाटते. गूढ वाटत नाही, डिस्टंट वाटत राहते. कर्णोपकर्णी बहुश्रुत झालेल्या पण कुणीही विश्वास ठेवणार नाही अशा परिकथांसारखा शेवट आहे.

रेकोसाठी मात्र धन्यवाद. Happy काही तरी वेगळे पहायला आवडतेच.

ओके अस्मिता. तुझी आवड स्वतंत्र असल्याने रिस्पेक्ट आहे. तो कंटाळवाणा आहेच. भीत भीतच त्याच्या बद्दल इथे लिहीलं होतं. तुझं आकलन पुरेसं प्रगल्भ आहे.

अशा प्रकारचे सिनेमे बघण्याची सवय डेव्हलप करावी लागते. ग्रेसची कविता दुर्बोध आहे हे मान्यच. पण ती समजून घेण्याचा प्रयत्न हे पण एक प्रकारचे मनोरंजन आहे. जुगनुमा सारखे सिनेमे समजून घ्यायला मला आवडतं. ते प्रत्येकाला आवडावं हे बरोबर नाही.

राज, तुमचा वेगळा अँगल समजला आणि पटला आवडला सुद्धा. माझ्या मते हे शोभायंत्रासारखं आहे. जसं पाहू तसं दिसेल. माझ्याकडून बागांची मालकी कशी मिळाली हे मिस झालं का ? कि प्राईमवर तो भाग नाहीये ? कदाचित नीट ऐकू आले नसेल.

'आवेषम' बघितला परवा... मस्त टाईमपास पिक्चर आहे!
फहाद फासीलने 'रंगा भाई' कसला जबरदस्त साकारला आहे 👍

त्याचे गँग मेम्बर्स पण भारी वाटले... अम्मन हा त्याचा उजवा हात, नांजप्पा हा म्हातारा फाईटर आणि ती भोजपुरी बोलणारी दोन मार्शल आर्टिस्ट मुले भारीच आहेत!

होळीच्या दिवशीचा कॉलेजमधला, मॉल मधला आणि शेवटचा रंगा भाईचा 'वन मॅन शो' राडा थेटरमध्ये बाघायला खरंच मजा येईल. उगाच एक फाईट किंवा लाथ मारली तर समोरच्याने 50-100 फूट उंच/लांब जावून पडल्याचे फालतू प्रकार नाहीत त्यामुळे त्या फाईट्स 'क्लासी' वाटल्या.

रंगा भाईचे 'बर्थ डे सेलिब्रेशन' तर एपिक आहे. ते आणि त्या नंतरचा तो गृहशांतीवाला प्रसंग मी पुन्हा मागे जात तीन-चार वेळा तरी बघितला असेल 😀
कॉलेजला जाताना उघड्या बीबी आणि अज्जूला आपले कपडे घालून पाठवत स्वतः उघडा आणि त्या गृहशांतीच्या ठिकाणी जेवायला बसलेल्या लोकांच्या टेबलवरचा टेबलेक्लॉथ पांघरून गेट समोर उभे राहिलेला रंगाभाई तर खल्लास एकदम 😂 😂 😂

ऋन्मेष आणि सिमरन तुम्हाला हा चित्रपट आवडला आहे मग शिवकार्तिकेयनचा 'Don' पण बघाच... शाळा आणि विशेषतः इंजिनिअरिंग कॉलेज मधली धमाल तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि ह्या सिंगल पसली ऍक्टर चा हा चित्रपट आवडला तर त्याचाच 'डॉक्टर' पण बघा तो पण मस्त टाईमपास आहे. तीच जोडी (शिवकार्तिकेयन आणि प्रियांका मोहन) आहे.
आणि हे दोन जर आवडले तर त्याचे बाकीचेही चित्रपट शोधून पहाल ह्याची खात्री आहे, कॉमेडी असतात 😀

(प्रवासात असल्याने अत्ता त्यांच्या लिंक्स देत नाही, नाही सापडले तर सांगा... संध्याकाळी घरी पोचल्यावर देतो, मोबाईलवरून हे उद्योग करण्यात मी अगदीच कच्चा लिंबू आहे 😂)

वरच्या प्रतिसादातल्या आवेषम शी अजिबात संबंध नसल्याने हा स्वतंत्र प्रतिसादप्रपंच...

'गांधी टॉक्स' कोणी पाहिला आहे का?
चित्रपटसृष्टीत 'काळ्याचे पांढरे' झालेल्या एका मित्राने 30 जानेवारी 2026 ला प्रदर्शित झालेला हा चित्रपट बघण्याची शिफारस केली आहे. विजय सेतूपती, अरविंद स्वामी, महेश मांजरेकर, सिद्धार्थ जाधव, रोहिणी हट्टंगड, उषा नाडकर्णी अशी स्टारकास्ट आणि 'सायलेंट मुव्ही' असल्याने कोणतीही भाषिक अडचण येणार नाही असे वाटत असल्याने बघावा असे वाटल्याने विकएंडला बघु असा विचार करून बुक माय शो वर गेलो तर फार कमी ठिकाणी शो असलेला हा चित्रपट दुसरा आठवडा थेटर मध्ये राहणार नसल्याचे लक्षात आले आहे. त्यामुळे त्याविषयी अजुन काही माहिती मिळते का ते शोधल्यावर मिळालेली माहिती रोचक वाटली आहे, बहुतेक ह्याच महिन्यात ott वर येईल अशी आशा आहे, तेव्हा बघेन.

मर्दानी-३ बघितला.
पूर्ण करू शकलो नाही इतका भंगार आणि बकवास आहे. तरी मोटिव्ह काय म्हणून शेवट बघितला तर लेम आणि बोर आहे. अजिबात बघू नका.

चार पाचच लोक लिहीतात इथे >>> असं काही नाही. इथे एखाद्या आकाच्या किंवा तत्सम पिक्चरबद्दल लिहून पहा. समस्त माबोकरांच्या प्रतिभेला एकदम धुमारे फुटतात.

Pages