Tourist Family; श्रीलंकेतून एक कुटुंब illegally तामिळनाडूच्या किनार्यावर उतरून चेन्नईला. मध्यमवर्गीय कॉलनीत रहायला येते. जसे "घर iसुधार मोहीम" चे सिनेमा असतात तसा हा " कॉलनी सुधार मोहीम" वर + त्या कुटुंबाची जगण्याची आणि त्यांच्या नात्याची धडपड छान दाखवली आहे. थोडा विनोदी अंगाने जाणारा चित्रपट ekada नक्की बघण्यासारखा आहे
The Road: trisha menon चा हा तमिळ Thriller आहे. Overall एकदा बघण्यासारखा आहे. तिचा नवरा आणि मुलगा ट्रिपला जात असताना त्यांचा accident होतो. ते दोघेही त्यात दगावतात. हे का झाले ह्याचा शोध घेत असताना एक भयानक गुन्हेगारीचे रॅकेट पुढे येते.
Eko चित्रपट ज्याचा होता त्याचाच हा देखील म्हणून बघितला. तश्याच धाटणीचा आहे. जंगलाचे सीन इथेही फार सुरेख घेतले आहेत.
एक रिटायर्ड सनकी आर्मी अधिकारी ज्याची स्मरणशक्ती हरवत आहे.
त्याच्याकडची बंदूक हरवली आहे.
आणि त्याच्या घरचा एक लहान मुलगा सुद्धा गेले कित्येक वर्षे हरवला आहे.
जसे Eko मध्ये कुत्रे होते तसे इथे माकडे आहेत.
ते घरातल्या वस्तू चोरून पळतात.
अगदी बंदूक सुद्धा पळवतात.
कधी माकडाच्या हातात बंदूक दिसते तर कधी माकडाचीच गोळी मारून हत्या झालेली आढळते.
अश्यात नवीन सून घरात येते जी करमचंद आहे. ती म्हाताऱ्याचे संशयास्पद वागणे बघून खोदकाम करायला सुरुवात करते. स्वतःही गोंधळते आणि आपल्यालाही गोंधळवून टाकते.
शेवटी जे काही उलगडते ते प्रचंड धक्कादायक वाटले / संताप झाला / मनात करुणा दाटून आली / अस्वस्थ वाटले /खुदकन हसायला आले वगैरे वगैरे अशी कुठलीही हिंट देण्यात मजा नाही. ती बघण्यात आहे.
चित्रपट बराच स्लो पेस आहे. अगदी झोप येण्याची सुद्धा शक्यता आहे. शेवटी काहीतरी फुसके निघाले तर पोपट होईल अशी भिती पहिले तासभर वाटते. त्यामुळे पूर्ण झाल्यावर आणि सगळे संदर्भ जुळल्यावर समाधान मिळेल या विश्वासावर बघावा लागतो. मी तेच केले.
फार स्पून फिडींग होणार नाही. दृश्यांचे अर्थ आपणच उलगडावे लागतील. एखाद्या स्थितीत माणूस कसा वागू शकतो याचा विचार करावा लागेल. ज्यांच्या टेस्टबडस अश्या चित्रपटांचा आस्वाद घ्यायला तयार आहेत त्यांनीच बघावा.
@ सिमरन
<<<< डब साऊथ पिच्चरांचा , तिथे, की इथेच लिहायचं??
>>>>
दोन्हीकडे टाकू शकता पोस्ट. त्याचे extra पैसे नाही पडत
इथे बरीच अवांतर चर्चा होते त्यात पोस्ट वाहून जातात. नंतर रेको शोधायचे म्हटले तर सापडत नाहीत. म्हणून स्वतंत्र धाग्यात पोस्ट सेव्ह असलेल्या बरे.
हल्ली डबिंग क्वालिटी छान असते. त्यामुळे सध्या मी साऊथ डब खूप बघतो. एक नवे दालन उघडले आहे असे वाटते. नवीन कलाकार नवीन संस्कृतीची ओळख होऊ लागलीय.
हल्ली डबिंग क्वालिटी छान असते. त्यामुळे सध्या मी साऊथ डब खूप बघतो. एक नवे दालन उघडले आहे असे वाटते. >>> खरे आहे, अजून काही वर्षांनी हेच काम AI ने एका झटक्यात करता येईल.
Submitted by माबो वाचक on 20 January, 2026 - 22:29
सन्नी सिंग म्हणून जो दुसरा हिरो आहे, त्याला लंडनलाच राहू द्या. अतिशय लो एनर्जी आणि निर्बुद्ध झाक आहे चेहऱ्यावर.>>>> +१०००० आस्मिता.
माठ आहे तो. एक तर स्टार किड्स ना असे बिंडोक आधीच सहन करतो..त्यात नॉन स्टार किड पण असे..
यंदाच्या महोत्सवात, १५ ते २२ जानेवारी, २०२६ दरम्यान काही चांगले सिनेमे पाहिले. काही फारच आवडले. त्याबद्दल थोडक्यात अभिप्राय नोंदवून ठेवतो आहे. हे सिनेमे मागच्या (२०२५) वर्षभरात रिलीज झालेले, जगभरात वेगवेगळ्या फिल्म फेस्टिव्हल्समध्ये निवडले गेलेले किंवा वेगवेगळ्या पुरस्कारांनी गौरविण्यात आलेले आहेत. जमेल तेव्हा नक्की पहावेत असे आहेत.
१. 'Sirat'. (सिरात). स्पेन, मोरोक्को.
सुरूवात अशी एक बाप आणि लहान मुलगा एका डोंगराळ भागात चाललेल्या रेव्ह पार्टीत येऊन पोचतात. त्या माणसाची मोठी मुलगी घर सोडून गेलेली असते, तिच्या शोधात ते निघालेले आहेत. सुदूर वाळवंटात एका ठिकाणी रेव्ह पार्टी होणार आहे, तिथं मुलगी सापडण्याची शक्यता वाटते म्हणून एका हिप्पी ग्रुपसोबत ह्या दोघांचा प्रवास सुरू होतो. हा सिनेमा म्हणजे एकसलग प्रवास आणि या प्रवासात नियतीनं त्यांच्याशी खेळलेला थरारक खेळ आहे.
पहिल्यांदा हा हिप्पी ग्रुप ड्रगॲडिक्ट वाटतो, पण नंतर त्यांच्या स्वभावांचे कंगोरे दिसू लागतात. देशात युद्धपरिस्थिती, आणीबाणी लागलेली असल्याने केलेल्या सैन्य भरतीच्या आवाहनाला हे म्हणतात, 'आम्ही काय पृथ्वीवर माणसं मारण्यासाठी आलेलो नाही.'
या सिनेमाचा दिग्दर्शक आयुष्यासारखाच अनप्रेडिक्टेबल आहे. कल्पनेच्या बाहेरचा अनप्रेडिक्टेबल.! पायाखालची जमीनच काढून घेतो डायरेक्ट. एवढा अनप्रेडिक्टेबल की आतला श्वास आत आणि बाहेरचा बाहेर.! म्हणजे सगळं नीट चाललेलं असतंय तेवढ्यात सगळं उलटंपालटं! पोटात पडलेला खड्डा भरून यायला पाच-दहा मिनिटं गेलेली असतात, त्यातून आपण सावरतो तोवर पुढे आणखी ४२० व्होल्टचे झटके वाट बघत असतात. डोकं पार भंजाळून जातंय. शेवटी शेवटी तर गपकन् डोळे मिटूनच बसलो. हा बाबा कधी काय दाखवेल ते सांगता येत नाही.
हा सिनेमा थिएटरमध्ये लोकांसोबत बघायचा सिनेमा आहे; एकट्याने मोबाईलवर किंवा लॅपटॉप वर नाही.
यात खुल्या वाळवंटात डॉल्बीची भिंत उभी करून रेव्ह पार्टीज् होतात, तेव्हाचं जे म्युझिक आहे ते फक्त डान्स करण्यासाठीच आहे, ऐकण्यासाठी नाही. असलं भन्नाट म्युझिक कधीच एकलेलं नव्हतं. नजर जाईल तिथवर मोकळी रखरखीत जमीन. खाली धरतीचा अफाट विस्तार. आणि वरती स्वच्छ राखाडी आकाशाची पोकळी. कसले कसले अद्भुत लॅंडफॉर्म्स आहेत पृथ्वीवर. या अशा लॅंडफॉर्म्स मुळे संगीताच्या बीट्सना कसलाच अडथळा होत नाही. निर्बंध नाही. मुक्त बेबंद म्युझिकचे आभाळ तडकवणारे बीट्स.
एक लक्षात राहिलेलं दृश्य. घाटातून धीम्या गतीने सरकत जाणाऱ्या दोन वाहनांच्या हेडलाईट्सचे ठिपके दिसतात. हळूहळू कॅमेरा वाहनांच्या जवळ येतो तेव्हा त्यांच्या खऱ्या गतीचा अंदाज येतो. म्हणजे गती सुद्धा आपण किती अंतरावरून पाहतोय यावर अवलंबून असते तर! एकूण हा फारच आवडला.
२. 'It was just an accident'. इराण.
जफर पनाही म्हणून इराणी दिग्दर्शक आहेत, त्यांचा अलीकडे खूपच बोलबाला आहे.
सत्तेच्या विरोधात आवाज उठवणाऱ्यांना देशद्रोही ठरवून कैदेत सडवण्याची पद्धत तिकडेही आहे. असाच छळ सोसून सुटलेला एक कैदी आहे वाहिद म्हणून. इंटरोगेशन दरम्यान त्याला टॉर्चर करणारा अधिकारी त्याला त्याच्या शहरात अचानक दिसतो. तो त्या अधिकाऱ्याला किडनॅप करतो. पण त्याला मारायच्या आधी नक्की हाच तो अधिकारी आहे का, याबद्दल संभ्रम निर्माण होतो. त्यामुळे ओळख पटवायला वाहिद त्या अधिकाऱ्याला आणखी काही पूर्वाश्रमीच्या कैद्यांकडे घेऊन जातो. त्यातून आणखी काही घटनांची साखळी निर्माण होते, गुंतागुंत वाढत जाते आणि सूत्रं त्याच्या हातातून निसटत जातात. सिनेमाचं वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत तणावपूर्ण प्रसंगांमध्येही आपल्याला हसू येत राहतं. ही अभिनेत्यांची आणि दिग्दर्शकाची कमाल.
'वाईटाला वाईटानं उत्तर द्यायचं की माणुसकीनं? आपणही त्यांच्यासारखीच हिंसा करायची का? मग त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक उरला?' अशा प्रश्नांची चर्चा या सिनेमाच्या कथानकाद्वारे केलेली आहे. सिनेमा एक नंबर आहे. आणि ॲक्टिंग उच्च दर्जाची. आवडला.
(जफर पनाही यांनी स्वतःही तुरूंगवास, हद्दपारी, इंटरोगेशन, सगळं भोगलेलं आहे.)
३. 'Lost Land'.
रोहिंग्या कम्युनिटीचं निर्वसन, ह्या अलीकडे घडलेल्या भीषण मानवी त्रासदीवर हा सिनेमा बेतलेला आहे. अकीओ फुजिमोटो म्हणून जपानी दिग्दर्शक आहेत.
म्यानमारमधील अराकान प्रांतातून हुसकावून लावलेले काही रोहिंग्या, बांग्लादेशात निर्वासित छावणीत डांबून ठेवलेले आहेत. तिथून पळून जीवावर उदार होऊन ते एका छोट्या बोटीतनं समुद्रातनं धोकादायक प्रवास करत मलेशियाच्या दिशेनं निघालेले असतात. शफी नावाच्या चार वर्षांच्या निरागस मुलाच्या नजरेतून हा सिनेमा दाखवला आहे. या प्रवासात त्याची कुटुंबापासून ताटातूट होते. मलेशियाच्या ऐवजी थायलंडच्या कुठल्याशा किनाऱ्यावर. तिथून जंगलातून लपतछपत प्रवास. हे एवढं निरागस लहानपण आहे की त्याला कळतच नाही आपल्यावर नक्की काय संकट कोसळलं आहे. अराकानमधल्या त्याच्या घरापुढे आंब्याचं मोठ्ठं झाड होतं, एवढंच त्याला आठवत असतं. आता या जगात त्याचं कुणीच नाही. संपूर्ण पोरकेपण.
देशातल्या मेजॉरिटी कम्युनिटीनं तुम्हाला हुसकावून लावलं गेलं की तुमचे हालच. कुठंच तुम्हाला थारा मिळत नाही. जो भेटेल तो तुम्हाला लुबाडतो, कोस्ट-गार्ड सरळ गोळ्या घालतात. गुन्हेगारी टोळ्यांचे एजंट्स छोट्या लाकडी पिंजऱ्यात जनावरांसारखं डांबून ठेवतात. पैसे नसतील तर मारून टाकतात. कारण त्यांना माहितीय की याचा जाब कुणीही विचारणार नाहीये. यांच्या बाजूनं बोलणारं कुणीही नाहीये.
अशात या दुर्दैवी पोराची जबाबदारी कोण घेणार? पण माणसाचा स्वतःचाच जीव थाऱ्यावर नाही, अशा परिस्थितीतही मानवी चांगुलपणा, करूणा यांचं आश्चर्यकारक दर्शन.!
ही होरपळ बघताना भडभडून यायला लागलं, ते थांबेचना. ज्या दिवशी बघितला त्या दिवशी जेवण गेलं नाही.
४. 'At work'. फ्रेंच.
हा एका लेखकाच्या आयुष्यावरचा सिनेमा आहे. लेखकाच्या भूमिकेतला अभिनेता जबरदस्त आहे. हा लेखक लिहिण्यासाठी वयाच्या बेचाळीसाव्या वर्षी स्वतःचा चांगला जॉब सोडून देतो. आणि मग पोटासाठी Gig worker म्हणून कामं करायला लागतो. सगळी शारीरिक कष्टाची कामं. मिळेल ती कामं. बागेची छाटणी, ड्रायव्हर, सामानांचं शिफ्टींग, कुरिअर डिलिव्हरी. यातही स्पर्धा प्रचंड, म्हणून स्वतःच्या श्रमांची किंमत हळूहळू कमी कमी करत जातो.
या निम्न आर्थिक स्तरातलं आयुष्य जगल्यामुळे लिहिण्यासाठी एक परस्पेक्टीव मिळतो, जो आधीच्या आयुष्यात कधीच मिळाला नसता. गिग वर्कर म्हणून काम करताना तो लोकांचं निरीक्षण करत राहतो. Gig workers कडे पाहण्याचा समाजाचा अलिप्त दृष्टिकोन, यात फार प्रकर्षाने जाणवतो, अंतर्मुख करतो. आता त्याला स्वतःला समोरच्याच्या जागी ठेवून बघता यायला लागतं. लिखाणात ते झिरपतं. आता तो समकाल टिपतो, आता त्याचं लिखाण आधीसारखं आत्मचरित्रात्मक राहत नाही. जगून बघितल्याशिवाय तुम्हाला तो काय प्रकार आहे हे कळत नाही.
या लेखकाची एक लोभस गोष्ट म्हणजे कोणाहीबद्दल कटुता बाळगत नाही. ठरवून घेतलेला निर्णय शंभर टक्के निभावून नेताना दिसतो. 'जीवनाचं काय करायचं? काय जरूरीचं आहे?' हे याला पक्कं कळलेलं दिसतं. एरव्ही कोण कशाला सुखातला जीव दुःखात टाकेल? लेखक असणं ही काय चीज असते, याची झलक बघण्यासाठी हा सिनेमा जरूर पहावा.
यातलं एक आवडलेलं उद्धृत. ''लिहिलं तर कुणी छापेल असं नाही. छापलं तर कुणी वाचेल असं नाही. वाचलं तर ते आवडेलच असं नाही. आवडलं तरीही ते चांगलं असेलच असं नाही.''
हा सिनेमा याच नावाच्या मूळ फ्रेंच कादंबरीवर आधारित आहे. ती कादंबरी वाचायला मिळाली पाहिजे. बघूया.
५. 'President's cake'. इराक.
हा काळ १९९१ च्या आसपासचा. इराक युद्धग्रस्त. आर्थिक नाकेबंदीमुळे महागाई आकाशाला भिडलेली, असा काळ.
सद्दाम हुसेनचं एक फॅड. त्याच्या बड्डेनिमित्त देशभरात सेलिब्रेशनचं आयोजन. त्यासाठी सरकारी फतवे. एका छोट्या खेड्यातल्या शाळेतही सद्दामच्या बड्डेचं सेलिब्रेशन करायचंय. त्यासाठी केक बनवून आणायची जबाबदारी एका शाळकरी मुलीवर टाकण्यात आलेली आहे. तिचे आईवडील युद्धात मारले गेले आहेत. तिची आज्जी आणि ती जवळच्या शहरात जातात केकसाठीचं सामान आणायला. हे सामान मिळवण्यासाठी करावी लागलेली यातायात संपूर्ण सिनेमाभर.
अर्थव्यवस्था पूर्णपणे कोसळलेली. चलनाला काही किंमतच राह्यलेली नाही. उदाहरणार्थ पाच अंड्यांची किंमत अडीच हजार दिनार! कशाचा कशाला अर्थ नाही. समाज बार्टर सिस्टमकडे वळलेला आहे. घड्याळ द्या, पीठ घ्या. पोती उचलायला मदत करा, साखर घ्या. रेडिओ द्या, स्कूल युनिफॉर्म घ्या. चोरांचा सगळीकडे सुळसुळाट.
भयाण दारिद्र्य. त्यात कसंबसं आयुष्य ओढणारे इराकी लोक. लोकांना खायचे फाके पडलेले आहेत आणि हा हरामखोर बड्डे सेलिब्रेट करतोय. लोकांनाही जबरदस्तीने सेलिब्रेट करायला लावतोय. बघेल तिकडं याचेच फोटो आणि जुलमाचा जयजयकार. वाईट.!
६. 'Amrum'. जर्मन.
हिटलरचा पाडाव झाल्यानंतरच्या दिवसातलं एक जर्मन खेडं. Amrum नावाचं हे एक छोटंसं बेट. तिथला एक लहाना जर्मन मुलगा. त्याची आई हिटलरची भक्त. ह्या पोराच्या नजरेतून सिनेमा. पोराची जगाकडे बघण्याची दृष्टी नितळ, आणि आतलं मूळचं चांगुलपण. एक हेल्दी वर्ल्ड व्ह्यू बहाल करतो सिनेमा.!
हा पोरगा संपूर्ण सिनेमाभर एकदाही हसत नाही, पण शेवटी जो गोड हसतो, ते एकदम कलेजा खलास करून टाकतो. प्रेम हीच एक मौल्यवान आणि शाश्वत गोष्ट आहे बॉस्स.! बाकी काही खऱ्याचं नाही.
७. 'Sad and beautiful world'. लेबॅनॉन.
लेबॅनॉनकडून यावर्षीच्या ऑस्करसाठी या सिनेमाची ऑफिशियल एंट्री आहे. कदाचित मिळेलही. सिनेमा भयंकरच आवडला. रोमॅंटिक आहे. रखरखीत वास्तव आणि रोमान्स समांतरपणे चाललेलं आहे. हार्श रिॲलिटी आणि मनातलं एक सुंदर ड्रीमलॅंड, अशी आळीपाळीने चाललेली रोलर-कोस्टर राईड.
शाळेपासूनची दोघांची लवस्टोरी असते. नंतर तारूण्यात अचानक भेट. पुढं लग्न. युद्धस्थिती. लेबॅनॉनची कोसळती अर्थव्यवस्था. मायग्रेशनसाठीच्या रांगा.
रोमान्स मात्र फार फार विलक्षण. अभिनेत्री बॅंकर असते. अभिनेता एक रेस्टॉरंट चालवत असतोय. कसलं तुटून प्रेम करतो यार हा !
८. 'ला ग्राझिया'. इटालियन सिनेमा.
एका राष्ट्राध्यक्षाचं आयुष्य, त्याच्या कार्यकाळाचे शेवटचे सहा महिने यात दाखवले आहेत. हा स्वतः देशातला मोठा आदरणीय कायदेपंडित असतो. त्याच्यापुढे सहीसाठी तीन विषय आलेले असतात. दोन वेगवेगळ्या केसेसमधील व्यक्तींच्या दयेचे अर्ज आणि इच्छामरणाच्या कायद्याचा मसुदा. ह्या कागदपत्रांवर सह्या करायच्या की नाही, हे विषय तो कसे हाताळतो, अभ्यासतो हे ह्यात दाखवले आहे. आवडला.
९. 'Kontinental 25'. रोमानिया, हंगेरी.
सुरुवातीलाच प्लॅस्टिकच्या बाटल्या, कचरा गोळा करत शहरभर भटकणाऱ्या एका बेघर भिकारी माणसाचं रोजचं आयुष्य दिसतं. त्याला त्याच्या राहती जागाही रिकामी करायला भाग पाडण्यासाठी कोर्टाची नोटीस घेऊन बेलिफ येते. ही यातली मुख्य अभिनेत्री. तो बेघर माणूस नंतर सुसाईड करतो. त्यामुळे ती अपराधभावनेनं ग्रासून जाते. ह्या गिल्ट मधून बाहेर पाडण्यासाठी ती काय काय करते, त्यापायी वेगवेगळ्या संस्थांना देणग्या देते, रात्र रात्र बेहोष होऊन बघते, चर्चमध्ये फादरपाशी जाऊन काऊन्सेलिंग, कुणाकुणाशी बोलून बघते, असं बरंच काही काही यात आहे. बाकी मग हंगेरी-रोमानिया वाद, इतिहास चिवडत बसलेली भंपक राष्ट्रवादी माणसं, असा पण एक पॉलिटिकल लॅंडस्केप आहे.
यातले इमारती, रस्ते निव्वळ सुंदर आहेत. कॅमेरा स्थिर एकटक लावून संपूर्ण इमारतींचं आर्किटेक्चर डोळ्यांपुढे उभे करणारे देखणे सीन्स आहेत. यात काही झेनकथांचा संदर्भ येतो तसेच, 'Unlucky criminals' म्हणून एका पुस्तकाचा उल्लेख आलाय, ते बघावं लागेल कधीतरी. असो.
अस्मिता, तुझ्या आग्रहावरून उल्लोळक पाहिला, आणि... नाही आवडला!
*** स्पॉइलर्स ***
म्हणजे नातेसंबंधांतले ताणेबाणे/पीळ/अंत:स्थ प्रवाह, तो वाच्यार्थाने आणि लाक्षणिक अर्थानेही 'मुक्तीदिनाची वाट पाहात अडकलेला जीव' वगैरे ठीक, पण मुळात ही शिकलीसवरलेली मुलगी तिच्या सिच्युएशनमध्ये अनप्रोटेक्टेड शरीरसंबंध ठेवून या घोळात स्वतःला का पाडते हे मला नाहीच कळलं/पटलं.
त्यामुळे मुदलातला कॉन्फ्लिक्टच ओढूनताणून आणलेला वाटला. (अमोलताशला त्यावरूनच नावं ठेवली ना आपण?!)
बरं, लग्नाआधीचं डायग्नोसिस सासूने - आणि आईनेही - लपवलं, पण लग्नानंतरचं रीलॅप्स आणि ट्रीटमेन्ट यांची माहिती ती कशी करून घेत नाही? सासू डॉक्टरशी बोलताना हिला दुसरीकडे धाडते आणि ही बिनबोभाट जाते? प्रत्येक वेळी? (सिनेमात एकच प्रसंग दाखवला आहे, पण आजारपण / ट्रीटमेन्ट काही काळ सुरू असते, त्यात एकदाही हिची डॉक्टरांशी बोलायची वेळ येत नाही?)
कळून परिस्थितीत बदल झाला नसता, पण माहिती करून घ्यावीशी वाटत नाही, नुसती सेवेसाठी सेवा करत राहायचं हे अनाकलनीय आहे.
तो बॉयफ्रेन्ड आणखीनच अचाट नमुना आहे! तो हिंदू असता-नसता तरी लूजर/नाकर्ता आहे ही फॅक्ट बदलत नाही. आईवडील शहाणे होते म्हणायचे मग त्या बाबतीत!
बाकी नवरा बेडरिडन झाल्यावर घर कसं चालतं? उपचारांचा खर्च कसा भागतो? ही किंवा सासू काही अर्थार्जन करताना दिसत तरी नाहीत.
ही काही उद्योग (म्हणजे नसते उद्योग सोडून) का करत नसते एरवीही?
सासूने माळ्यावरून बॅसिनेट काढल्यावर 'म्हणजे यांच्या घरात पाळणा 'हलणार' नव्हताच' असा एक पीजे तेवढा सुचला मला.
केरळमधला निसर्ग, संततधार, दाराशी सायकल असावी तशी ती बोट वगैरे बघायला छान वाटलं, पण सिनेमा काही त्यासाठी बघत नाही आपण.
Submitted by स्वाती_आंबोळे on 23 January, 2026 - 12:36
जाऊ दे, सहन केल्याबद्दल धन्यवाद !
मला खरेतर strong performances मुळे आवडला. सगळ्यांच्याच चुका होतात, सगळेच खोटं बोलतात हेही नॉर्मल वाटले. दोघींचे नाते ज्या व्यक्तीमुळे असते, ती राहत नाही तरी ते कुठेतरी चांगल्या पद्धतीने पुढे जाऊन वेगळा जिव्हाळा दाखवते. ती मूर्ख न वाटता ( मलाही तो एक्स लूजरच वाटला होता) ती अडकलेली असल्याने पुन्हा चूक करून बघते, विवेक गमावते कारण सुटका हवी आहे. कशीही करून. अशा वेळी समोरचा नालायक असला तरी मुली लव्ह बॉम्बिंगने चूक करून बसतात, तरीही नंतर ती त्यातून स्वतंत्र होते. सासूचा नवराही धड नसतो, पोरगं ते तसं असतं. खऱ्या अर्थाने कुठल्याही पुरुषांशिवाय दोघीही स्वतंत्र होतात. ते श्रीमंत असतात म्हणे, आणि नव्या नवलाईतच सगळा बेबनाव होऊन तो गेला आहे. अजून काही वर्षांत झाले असते गरीब पण तुला दम धरवत नाही दुसरं काय!
अमलताश का आठवला , तो तर महामूर्ख आहे.
तुला लवकरच भरपाई म्हणून चांगला, सखोल सिनेमा देते. मग आपण सगळ्यांना पिव्हळवून सोडू. किती दिवस झाले पिव्हळवून!
बाय द वे, मला 'हक'ही खास आवडला नाही. एकतर इमरान हाश्मी दगड आहे. त्यात ते 'अगंबाई, हा कुकर मोडला तर बदलत नाही, फक्त आणखी एक नवीन घेतो' हे संत्र स्क्रिप्टरायटरने सोलून, गर चावून प्रेक्षकांना भरवल्यावर एकदम वैतागच आला मला.
एका बाजूने वकिलीण बाईंची 'एन्ट्री' जितपत बालिश 'सुखद धक्का' आहे, तितपतच ते शेजार्याबरोबरचे खटके प्रकरण चेकलिस्ट मार्क केल्यागत आहे.
खुद्द यामी सतत इतकी गुळगुळीत गुलगुलीत मेकअप वगैरे केलेली वावरते! (सॉरी, फा!)
खस्ता खाते आहे, उपासमार सोसते आहे, मुलं वाढवते आहे, पण ती ओढगस्त तिच्या पेहराव/आविर्भावात कुठेही दिसत नाही! सगळं खोटं बेगडी वाटत राहातं - भिडत नाही.
तिची ती सवत कुठेतरी पाहिली आहे असं वाटत राहिलं. ती 'छावा'मधली झेबुन्निसाचं काम केलेली अॅक्ट्रेस नव्हे ना?
शहाबानोची केस, युनिफॉर्म सिव्हिल कोड वगैरे खूप मोठे विषय आहेत, ही पोस्ट अर्थातच फक्त चित्रपटापुरतीच मर्यादित आहे.
Submitted by स्वाती_आंबोळे on 23 January, 2026 - 12:33
ही खालच्या पोस्टची मूळ पोस्ट आहे. डपो म्हणून वाया घालवावी असे न वाटल्याने हा प्रपंच. (नाहीतर हकनाक सर्वरवर ताण येऊन पेज नॉट फाऊण्ड एरर येईल ).
धागा चित्रपटांचा आहे, जवानी दिवानी हा ही चित्रपट आहे. तो ही हिंदी. त्यामुळे त्यातल्या गाण्याबद्दल इथे बोलता येईल. https://www.youtube.com/watch?v=f18qN5GTNAE&list=RDf18qN5GTNAE&start_rad...
अगर साज छेडा तराना बनेंगे. गायक, संगीतकार हे सगळं ठीक आहे. जया भागदौडी अगदी भावली दिसते, रणधीर कपूर कपूरांच्या डायनिंग टेबलवरून सगळं ताट खिशात भरून खात खात शुटींग करत आलाय हे जाणवतं. पण हे ही ठीकच.
टाईमलाईनवर ०.०४ बघा. काय दिसलं ?
पाठीमागे उभ्या लाईन्सचा शर्ट घातलेल्याने हात स्टाईलमधे कंबरेवर ठेवलाय ( सिंहकटी लिहीलं असतं पण ती कुठे असते हे विचारलं तर पंचाईत ). बाजूचा ठिपकेशर्ट वाला सोडा, पण व्हिटीच्या फूटपाथवरचं जाकीट अर्धवट ल्यायलेला एक आणि त्याच्या बाजूचा एक हे आपले लक्ष्य देण्याचे विषय आहेत. संपूर्ण गाण्यात यांच्या अॅक्शन्स बघा.
०.०८ तराने बनेंगे म्हणत रणधीर कपूर खाली बसतो तिथे कॅमेरा गुड्डी गुडियावर जाताना दोघींवरून वेगात जातो. त्यातली सर्वात डावीकडची हेअरस्टाईलच्या जिवावर मोठी हिरॉईन बनायला घरातून पळून आलेली वाटते. तिच्या शेजारची घार्या डोळ्यांची असल्याने मैत्रिणींनी तिला तू राखीसारखी दिसते हे डोक्यात भरवलेलं असणार. तिच्या चेहर्यावरचे भाव पाहून तिला हा रामसे बंधूंचा सिनेमा आहे असं कुणी सांगितलंय कि काय हे समजत नाही. गॉयटर झाल्यासारखे डोळे सताड उघडे आहेत. एखाद्या मूर्तीच्या मिटलेल्या डोळ्यांच्या वर पांढरा रंग मारून त्यात बुब्बुळं काढावीत तसं. सर्वात उजवीकडची साडी नेसलेली नेमकी कशासाठी चित्रपटसृष्टीच्या दिशेने कूच करून आली असावी हे समजत नाही. ती लेडी माणिक इराणी दिसते. कदाचित दुष्काळि गावची नूतन असावी.
२:५६ पसाने बनेंगे म्हणत गुडीया डोकं हलवते आणि या सगळ्या "चलो अपना पर डे ले लो" घोषणा झाल्याच्या खुषीत उड्या मारत येतात.
१:१३ हिरो हिरॉईन एकमेकांच्या डोळ्यात हरवले आहेत. आळीपाळीने मधे मधे येऊन दोघांकडे टेनिसमॅच दरम्याने इकडे तिकडे बघण्याचा कार्यक्रम कसला जबरदस्त आहे. यातच ती हेअरस्टाईलिस्ट. केशरचनेवर जर कुणी हिरवीन बनू शकली असती तर हीच. थोडा चेहरा झाकायचा होता.
एकंदरीत वेशभूषा बघता हे कॉलेजचे विद्यार्थी आहेत कि डीएड झाल्यानंतर प्रायव्हेट कॉलेजच्या इंटरव्हू साठी आलेले लोक आहेत ? या पेक्षा भयानक कपडे फक्त मराठी चित्रपटाच असू शकतात. बघा बघा. शेवटपर्यंत बघा.
०:३५ पेंटलच्या मागे असलेला मिशीवाला जर खलनायकाच्या रोलमधे असता तर त्या काळचा पंकज त्रिपाठी बनला असता. पण ध्येय न सापडल्याने भरकटला. पुढच्यास शॉट मधे पत्र पास होतं आणि रणधीर कपूर वाचत असताना मागचा निळा टी शर्ट घालून त्यावर फडकं गुंडाळलेला ते पत्र वाचतो आणि दोन्ही हात प्रश्नार्थक हलवतो. हा अभिनय सुवर्णकमळ साठी का विचारात घेतला नसेल ?
पिवळा शर्ट वाला कंबरेवर अंगठा अडकवून अवघडलेल्या स्थितीत उभा आहे. मिठुन सारखी (गनमास्टर) हेअरस्टाईल चुकल्याने डावा डोळा झाकला आहे. मिठुनला संधी मिळू शकते तर याला का नाही ? हे सगळे लोक सिनेमात का आले असावेत ? कदाचित युनूस परवेज यांच्याकडे कामाला असावेत.
हसून झालं आता वाईटही वाटतं. मोठ्यांचं निधन होतं, छोटे मेले असं म्हटलं जातं. बिचार्यांचा चॉईस चुकला हे आयुष्य हातातून गेल्यावर लक्षात आलं तर काहीच करता येत नाही.
अरे ओ सांबा या हाळीने फेमस झालेला मॅकमोहन झोपडपट्टीत राहत होता. हलाखीचं आयुष्य जगला. त्याची मुलगी खूप सुंदर आहे पण तिने ही लाईन पकडली नाही....
हा कुकर मोडला तर बदलत नाही, फक्त आणखी एक नवीन घेतो' हे संत्र स्क्रिप्टरायटरने सोलून, गर चावून प्रेक्षकांना भरवल्यावर एकदम वैतागच आला मला. >>>
खुद्द यामी सतत इतकी गुळगुळीत गुलगुलीत मेकअप वगैरे केलेली वावरते! (सॉरी, फा!) >>> ओके ओके
तुला दम धरवत नाही दुसरं काय! >>>
अगं हो, मी तर ठरवलं होतं कुणालाही अनप्रोटेक्टेड सेक्स करू द्यायचा नाही. घात झाला >>>
शहाबानोची केस, युनिफॉर्म सिव्हिल कोड वगैरे खूप मोठे विषय आहेत, ही पोस्ट अर्थातच फक्त चित्रपटापुरतीच मर्यादित आहे. >>> बाय द वे मला पिक्चर खूप एंगेजिंग वाटला नाही म्हणून पूर्ण पाहिलेला नाही पण वाचले आहे त्यावरून हा पिक्चर युनिफॉर्म सिव्हिल कोडपर्यंत पोहोचला का मुळात, की शरियतचे इंटरप्रिटेशन तिच्या बाजूने होते या आर्ग्युमेण्टवर निकाल लागलेला दाखवला? म्हणजे ते झाले नसते तर इतकेही झाले नसते.
एले - रूमाल टाकून ठेवतो. पुन्हा गाणे बघून पोस्ट वाचेन बाय द वे चांगल्या गाण्यांचे अतर्क्य चित्रीकरण असा काहीतरी धागाही होता. इथे असू दे हे, त्याबद्दल काही नाही.
अस्मिता, तुला त्या वेळी आवडला ना ? मग बास तर. नंतर दोन दिवसांनी आवडला नाही असं म्हणू नकोस.
एखाद्याला आवडतो एखाद्याला नाही. रेको बघून नाही आवडला तरी आवड आपली आपली म्हणायचं.
अगर साज छेडा माझं आवडतं गाणं आहे. पोस्टमार्टेम करू नका. त्या वेळची जया भादुरी आवडते
हल्ली अमिताभ रेखा आणि जया भादुरी बच्चनचे ए आय रील्स येतात. डोकं उठवलंय. प्रत्येक वेळी अमिताभ जया बच्चनला ढकलून देतो किंवा तिला सोडून दोघे पळून जातात मग जया रेखाच्या डोक्यावर पाणी टाकते
हे पहिलंच त्रिकूट असं आहे ज्यात लोकांचा पाठिंबा रेखाला असतो.
मयसभा - खूप वर्षांनी मुद्दामून थेटर मधे जाऊन बघायला हवा अस वाटतंय. बघणार.
बॉर्डर २ - बॉर्डर खूप छान बनवला होता. अर्थात प्रत्येकाची बॅक स्टोरी, प्रेमप्रकरणं वैताग आणणारं होतं. सनीच्या जोरदार कामगिरीमुळे आणि शेवटच्या मेसेज मुळे बॉर्डर इतर युद्धपटांपेक्षा उजवा होता. आता एक तर जे पी दत्ता दिग्दर्शक नाहीत. त्यात सनी सोडला तर इतर कलाकारांबाबतीत अजिबात आकर्षण वाटत नाही. आणि पूर्वीसारखा संदेश असण्याची शक्यता कमीच आहे. मनोरंजन होईल यात शंका नाही, पण का कुणास ठाऊक पहिल्या भागाची उंची गाठणार नाही असं वाटतंय. ओटीटीवर बघेन.
हे पहिलंच त्रिकूट असं आहे ज्यात लोकांचा पाठिंबा रेखाला असतो. >>> हाहाहा. माझा जयाला. हल्ली काही वर्षाच्या जयाला बघून पूर्ण जया जज करतात लोकं. आधी इतकी वर्ष तिने अमिताभसाठी काय केलं विसरतात. तिने स्वत:च्या उत्तम करियरचा त्याग करून चांगला संसार केला. अमिताभ मध्ये टॅलेंट होतंच पण द अमिताभ होण्यात तिचा मोठा वाटा आहे. त्याच्या आजारपणात खंबीरपणे पाठीशी उभी राहिली ती. त्याच्या downfall मध्ये पाठीशी होती ती. असो.
जबरदस्त स्टोरीटेलिंग… दिग्दर्शक खरेच कमाल आहे. त्याचा इको आवडलेलाच, हा त्याहीपेक्षा जास्त आवडला. सगळ्यांचा अभिनय उत्तम झालाय विषेशतः बाप व मुलगा या दोघांचा. मुलाने जबरदस्त काम केलेय.
घडणार्या घटनांचे विस्मरण होणे किंवा स्मरणशक्तीचा -हास होत जाणे हा आज कोणालाही ग्रासु शकणारा विकार आहे. आजवर या विषयावर आलेल्या चित्रपटांमध्ये या विकाराचे इतरांवर होणारे परिणाम दाखवले गेलेत. या चित्रपटात त्या व्यक्तीवर याचे काय परिणाम होत असतील यावर फोकस आहे. आपल्याला विस्मरण होतेय हे कळतेय, हे लोकांना कळु नये याची धड्पड करत राहायचे, त्यासाठी आपण काय विसरलोय याची आठवण ठेवत राहायचे याचा जबरदस्त ताण विकारग्रस्त व्यक्तीवर येत असणार. आपण जे विसरलोय त्यात काहीतरी महत्वाचे तर नाही ना ह्या विचाराने स्वतःला कुडतरत राहणे हे कित्येकांसाठी रिअॅलिटीही असु शकते जे ते कोणाला सांगु शकत नसतील. शेवटची १५ मिनिटे जबरदस्त आहेत.
या चित्रपटाचे नाव किष्किंधा कांडम का असावे असा प्रश्न नाव ऐकले तेव्हा पडला होता. यात सुरवातीला वाक्य आहे की वाली व सुग्रिव सोडुन इतर सगळी माकडांची फौज इथे राहते. तेव्हा आठवले वालीच्या नगरीचे नाव किष्किंधा होते.
जबरदस्त स्टोरीटेलिंग… दिग्दर्शक खरेच कमाल आहे. त्याचा इको आवडलेलाच, हा त्याहीपेक्षा जास्त आवडला.
>>>
+786
दोन्हीत दिग्दर्शकाची विशिष्ट छाप जाणवते. शेवटी सगळे संदर्भ जुळल्यावर एक वेगळेच समाधान मिळत असले तरी सुरुवातीला काय चालू आहे हे कळू नये अशी स्थिती निर्माण न होता उत्सुकता कायम राहावी हे कमाल आहे.
नावाप्रमाणेच mad जॉनरचा चित्रपट. कॉलेज आणि हॉस्टेल लाईफ मधील वेडेपणा अनुभवायचा असेल तर आवर्जून बघा. थोडेफार छीचोरे चित्रपटाचे Vibes येतील. पण हा वेगळा आहे. स्टोरी अशी ठोस नसल्याने काही सांगण्यात मजा नाही. पण हर एक दोस्त कमीना होता है टॅगलाईन सूट व्हावी असा चित्रपट आहे.
यात एक DD नाव असलेला कलाकार फार अवली वाटला. त्याचे अजून चित्रपट शोधायला गुगल केले तर याचाच दुसरा भाग सापडला MAD -2
यात कॉलेजमधून बाहेर पडल्यावरची स्टोरी आहे. पण जॉनर तोच. तसाच वेडेपणा. आधी पाऊणेक तास ठोस स्टोरीअभावी फसला की काय असे वाटतानाच हळूहळू रंग पकडू लागतो आणि पहिला आवडला असल्यास हा सुद्धा आवडून जातो. हर एक दोस्त कमीना होता है टॅगलाईन इथे सुद्धा कायम राहते.
Tschick ही वुल्फगांग हेर्नडॉर्फची कादंबरी जर्मनीत शाळांमध्ये वाचायला लावली जाते. दोन १४ वर्षांची मुलं - माईक आणि चीक - उन्हाळ्याच्या सुट्टीत कार घेऊन बाहेर पडतात, असा साधा रोड-ट्रिपचा किस्सा आहे. भाषा सोपी आहे, मुलांच्या नजरेतून कथा आहे, आणि मैत्री-एकटेपणा-घरातली गुंतागुंत अशा गोष्टी त्यामुळे शिक्षकांना ही कादंबरी अभ्यासासाठी “योग्य” वाटते. २०१६ मध्ये फातिह अकीनने यावर चित्रपट केला, तोही अनेक वर्गांत दाखवतात. कादंबरी तुफान खपलेली आहे.
पण आजचे बरेच जर्मन विद्यार्थी या कादंबरीवर अजिबात खुश नसतात. त्यांना वाटतं की ही कथा त्यांच्या वयापेक्षा “लहान” आहे, किंवा तिच्यात अजिबात काही फार काही मोठं घडत नाही. सगळं हळू आणि लहान लहान प्रसंगांवर कथा आहे त्यात विशेष काही घडत नाही आणि त्यांना आजकाल जी maturity हवी असते तीही त्यांना या कादंबरीत सापडत नाही. आजकाल मुलं वेगवान, जास्त थरारक, जास्त “मॅच्युअर” कंटेंट पाहतात. त्यामुळे Tschick त्यांना खूप क्लिशे वाटतो. परंतु अनेक मुलांना कादंबरी आवडते आणि चित्रपट मात्र बंडल वाटतो.
एकूण आजकालच्या जर्मन मुलांच्यात सांस्कृतिक मॅच्युरिटी खूप जास्त आहे असे जाणवले. म्हणजे शाळेत असताना तर ती अनेक पुस्तकं वाचतातच मात्र आजकाल त्यांना त्या पुस्तकांतून आणि सिनेमांतून जास्त मॅच्युरिटी हवी असते. शिवाय कोणतीही गोष्ट फोर्स केलेली त्यांना खपत नाही. काही मुलांनी तर कादंबरीवर सेक्सुअलिटी सारखे विषय अजून गांभीर्याने हाताळले नाहीत म्हणून देखील टीका केली आहे. सर्वसाधारण भारतीय अडल्ट माणसाच्या मेंदूच्या अर्ध्या सेंटीमीटर मधेही न शिरणाऱ्या या गोष्टींबाबत ही मुलं सजग आहेत हे पाहून त्यांचे कौतुक आणि हेवा वाटतो..
Tourist Family; श्रीलंकेतून
Tourist Family; श्रीलंकेतून एक कुटुंब illegally तामिळनाडूच्या किनार्यावर उतरून चेन्नईला. मध्यमवर्गीय कॉलनीत रहायला येते. जसे "घर iसुधार मोहीम" चे सिनेमा असतात तसा हा " कॉलनी सुधार मोहीम" वर + त्या कुटुंबाची जगण्याची आणि त्यांच्या नात्याची धडपड छान दाखवली आहे. थोडा विनोदी अंगाने जाणारा चित्रपट ekada नक्की बघण्यासारखा आहे
The Road: trisha menon चा हा तमिळ Thriller आहे. Overall एकदा बघण्यासारखा आहे. तिचा नवरा आणि मुलगा ट्रिपला जात असताना त्यांचा accident होतो. ते दोघेही त्यात दगावतात. हे का झाले ह्याचा शोध घेत असताना एक भयानक गुन्हेगारीचे रॅकेट पुढे येते.
किष्किंधा कांडम – जियो
किष्किंधा कांडम – जियो हॉटस्टार
Eko चित्रपट ज्याचा होता त्याचाच हा देखील म्हणून बघितला. तश्याच धाटणीचा आहे. जंगलाचे सीन इथेही फार सुरेख घेतले आहेत.
एक रिटायर्ड सनकी आर्मी अधिकारी ज्याची स्मरणशक्ती हरवत आहे.
त्याच्याकडची बंदूक हरवली आहे.
आणि त्याच्या घरचा एक लहान मुलगा सुद्धा गेले कित्येक वर्षे हरवला आहे.
जसे Eko मध्ये कुत्रे होते तसे इथे माकडे आहेत.
ते घरातल्या वस्तू चोरून पळतात.
अगदी बंदूक सुद्धा पळवतात.
कधी माकडाच्या हातात बंदूक दिसते तर कधी माकडाचीच गोळी मारून हत्या झालेली आढळते.
अश्यात नवीन सून घरात येते जी करमचंद आहे. ती म्हाताऱ्याचे संशयास्पद वागणे बघून खोदकाम करायला सुरुवात करते. स्वतःही गोंधळते आणि आपल्यालाही गोंधळवून टाकते.
शेवटी जे काही उलगडते ते प्रचंड धक्कादायक वाटले / संताप झाला / मनात करुणा दाटून आली / अस्वस्थ वाटले /खुदकन हसायला आले वगैरे वगैरे अशी कुठलीही हिंट देण्यात मजा नाही. ती बघण्यात आहे.
चित्रपट बराच स्लो पेस आहे. अगदी झोप येण्याची सुद्धा शक्यता आहे. शेवटी काहीतरी फुसके निघाले तर पोपट होईल अशी भिती पहिले तासभर वाटते. त्यामुळे पूर्ण झाल्यावर आणि सगळे संदर्भ जुळल्यावर समाधान मिळेल या विश्वासावर बघावा लागतो. मी तेच केले.
फार स्पून फिडींग होणार नाही. दृश्यांचे अर्थ आपणच उलगडावे लागतील. एखाद्या स्थितीत माणूस कसा वागू शकतो याचा विचार करावा लागेल. ज्यांच्या टेस्टबडस अश्या चित्रपटांचा आस्वाद घ्यायला तयार आहेत त्यांनीच बघावा.
डब साऊथ पिच्चरांचा , तिथे, की
@ सिमरन
<<<< डब साऊथ पिच्चरांचा , तिथे, की इथेच लिहायचं??
>>>>
दोन्हीकडे टाकू शकता पोस्ट. त्याचे extra पैसे नाही पडत
इथे बरीच अवांतर चर्चा होते त्यात पोस्ट वाहून जातात. नंतर रेको शोधायचे म्हटले तर सापडत नाहीत. म्हणून स्वतंत्र धाग्यात पोस्ट सेव्ह असलेल्या बरे.
हल्ली डबिंग क्वालिटी छान असते. त्यामुळे सध्या मी साऊथ डब खूप बघतो. एक नवे दालन उघडले आहे असे वाटते. नवीन कलाकार नवीन संस्कृतीची ओळख होऊ लागलीय.
हल्ली डबिंग क्वालिटी छान असते
हल्ली डबिंग क्वालिटी छान असते. त्यामुळे सध्या मी साऊथ डब खूप बघतो. एक नवे दालन उघडले आहे असे वाटते. >>> खरे आहे, अजून काही वर्षांनी हेच काम AI ने एका झटक्यात करता येईल.
सन्नी सिंग म्हणून जो दुसरा
सन्नी सिंग म्हणून जो दुसरा हिरो आहे, त्याला लंडनलाच राहू द्या. अतिशय लो एनर्जी आणि निर्बुद्ध झाक आहे चेहऱ्यावर.>>>> +१०००० आस्मिता.
माठ आहे तो. एक तर स्टार किड्स ना असे बिंडोक आधीच सहन करतो..त्यात नॉन स्टार किड पण असे..
'पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट
'पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव- २०२६'
यंदाच्या महोत्सवात, १५ ते २२ जानेवारी, २०२६ दरम्यान काही चांगले सिनेमे पाहिले. काही फारच आवडले. त्याबद्दल थोडक्यात अभिप्राय नोंदवून ठेवतो आहे. हे सिनेमे मागच्या (२०२५) वर्षभरात रिलीज झालेले, जगभरात वेगवेगळ्या फिल्म फेस्टिव्हल्समध्ये निवडले गेलेले किंवा वेगवेगळ्या पुरस्कारांनी गौरविण्यात आलेले आहेत. जमेल तेव्हा नक्की पहावेत असे आहेत.
१. 'Sirat'. (सिरात). स्पेन, मोरोक्को.
सुरूवात अशी एक बाप आणि लहान मुलगा एका डोंगराळ भागात चाललेल्या रेव्ह पार्टीत येऊन पोचतात. त्या माणसाची मोठी मुलगी घर सोडून गेलेली असते, तिच्या शोधात ते निघालेले आहेत. सुदूर वाळवंटात एका ठिकाणी रेव्ह पार्टी होणार आहे, तिथं मुलगी सापडण्याची शक्यता वाटते म्हणून एका हिप्पी ग्रुपसोबत ह्या दोघांचा प्रवास सुरू होतो. हा सिनेमा म्हणजे एकसलग प्रवास आणि या प्रवासात नियतीनं त्यांच्याशी खेळलेला थरारक खेळ आहे.
पहिल्यांदा हा हिप्पी ग्रुप ड्रगॲडिक्ट वाटतो, पण नंतर त्यांच्या स्वभावांचे कंगोरे दिसू लागतात. देशात युद्धपरिस्थिती, आणीबाणी लागलेली असल्याने केलेल्या सैन्य भरतीच्या आवाहनाला हे म्हणतात, 'आम्ही काय पृथ्वीवर माणसं मारण्यासाठी आलेलो नाही.'
या सिनेमाचा दिग्दर्शक आयुष्यासारखाच अनप्रेडिक्टेबल आहे. कल्पनेच्या बाहेरचा अनप्रेडिक्टेबल.! पायाखालची जमीनच काढून घेतो डायरेक्ट. एवढा अनप्रेडिक्टेबल की आतला श्वास आत आणि बाहेरचा बाहेर.! म्हणजे सगळं नीट चाललेलं असतंय तेवढ्यात सगळं उलटंपालटं! पोटात पडलेला खड्डा भरून यायला पाच-दहा मिनिटं गेलेली असतात, त्यातून आपण सावरतो तोवर पुढे आणखी ४२० व्होल्टचे झटके वाट बघत असतात. डोकं पार भंजाळून जातंय. शेवटी शेवटी तर गपकन् डोळे मिटूनच बसलो. हा बाबा कधी काय दाखवेल ते सांगता येत नाही.
हा सिनेमा थिएटरमध्ये लोकांसोबत बघायचा सिनेमा आहे; एकट्याने मोबाईलवर किंवा लॅपटॉप वर नाही.
यात खुल्या वाळवंटात डॉल्बीची भिंत उभी करून रेव्ह पार्टीज् होतात, तेव्हाचं जे म्युझिक आहे ते फक्त डान्स करण्यासाठीच आहे, ऐकण्यासाठी नाही. असलं भन्नाट म्युझिक कधीच एकलेलं नव्हतं. नजर जाईल तिथवर मोकळी रखरखीत जमीन. खाली धरतीचा अफाट विस्तार. आणि वरती स्वच्छ राखाडी आकाशाची पोकळी. कसले कसले अद्भुत लॅंडफॉर्म्स आहेत पृथ्वीवर. या अशा लॅंडफॉर्म्स मुळे संगीताच्या बीट्सना कसलाच अडथळा होत नाही. निर्बंध नाही. मुक्त बेबंद म्युझिकचे आभाळ तडकवणारे बीट्स.
एक लक्षात राहिलेलं दृश्य. घाटातून धीम्या गतीने सरकत जाणाऱ्या दोन वाहनांच्या हेडलाईट्सचे ठिपके दिसतात. हळूहळू कॅमेरा वाहनांच्या जवळ येतो तेव्हा त्यांच्या खऱ्या गतीचा अंदाज येतो. म्हणजे गती सुद्धा आपण किती अंतरावरून पाहतोय यावर अवलंबून असते तर! एकूण हा फारच आवडला.
२. 'It was just an accident'. इराण.
जफर पनाही म्हणून इराणी दिग्दर्शक आहेत, त्यांचा अलीकडे खूपच बोलबाला आहे.
सत्तेच्या विरोधात आवाज उठवणाऱ्यांना देशद्रोही ठरवून कैदेत सडवण्याची पद्धत तिकडेही आहे. असाच छळ सोसून सुटलेला एक कैदी आहे वाहिद म्हणून. इंटरोगेशन दरम्यान त्याला टॉर्चर करणारा अधिकारी त्याला त्याच्या शहरात अचानक दिसतो. तो त्या अधिकाऱ्याला किडनॅप करतो. पण त्याला मारायच्या आधी नक्की हाच तो अधिकारी आहे का, याबद्दल संभ्रम निर्माण होतो. त्यामुळे ओळख पटवायला वाहिद त्या अधिकाऱ्याला आणखी काही पूर्वाश्रमीच्या कैद्यांकडे घेऊन जातो. त्यातून आणखी काही घटनांची साखळी निर्माण होते, गुंतागुंत वाढत जाते आणि सूत्रं त्याच्या हातातून निसटत जातात. सिनेमाचं वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत तणावपूर्ण प्रसंगांमध्येही आपल्याला हसू येत राहतं. ही अभिनेत्यांची आणि दिग्दर्शकाची कमाल.
'वाईटाला वाईटानं उत्तर द्यायचं की माणुसकीनं? आपणही त्यांच्यासारखीच हिंसा करायची का? मग त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक उरला?' अशा प्रश्नांची चर्चा या सिनेमाच्या कथानकाद्वारे केलेली आहे. सिनेमा एक नंबर आहे. आणि ॲक्टिंग उच्च दर्जाची. आवडला.
(जफर पनाही यांनी स्वतःही तुरूंगवास, हद्दपारी, इंटरोगेशन, सगळं भोगलेलं आहे.)
३. 'Lost Land'.
रोहिंग्या कम्युनिटीचं निर्वसन, ह्या अलीकडे घडलेल्या भीषण मानवी त्रासदीवर हा सिनेमा बेतलेला आहे. अकीओ फुजिमोटो म्हणून जपानी दिग्दर्शक आहेत.
म्यानमारमधील अराकान प्रांतातून हुसकावून लावलेले काही रोहिंग्या, बांग्लादेशात निर्वासित छावणीत डांबून ठेवलेले आहेत. तिथून पळून जीवावर उदार होऊन ते एका छोट्या बोटीतनं समुद्रातनं धोकादायक प्रवास करत मलेशियाच्या दिशेनं निघालेले असतात. शफी नावाच्या चार वर्षांच्या निरागस मुलाच्या नजरेतून हा सिनेमा दाखवला आहे. या प्रवासात त्याची कुटुंबापासून ताटातूट होते. मलेशियाच्या ऐवजी थायलंडच्या कुठल्याशा किनाऱ्यावर. तिथून जंगलातून लपतछपत प्रवास. हे एवढं निरागस लहानपण आहे की त्याला कळतच नाही आपल्यावर नक्की काय संकट कोसळलं आहे. अराकानमधल्या त्याच्या घरापुढे आंब्याचं मोठ्ठं झाड होतं, एवढंच त्याला आठवत असतं. आता या जगात त्याचं कुणीच नाही. संपूर्ण पोरकेपण.
देशातल्या मेजॉरिटी कम्युनिटीनं तुम्हाला हुसकावून लावलं गेलं की तुमचे हालच. कुठंच तुम्हाला थारा मिळत नाही. जो भेटेल तो तुम्हाला लुबाडतो, कोस्ट-गार्ड सरळ गोळ्या घालतात. गुन्हेगारी टोळ्यांचे एजंट्स छोट्या लाकडी पिंजऱ्यात जनावरांसारखं डांबून ठेवतात. पैसे नसतील तर मारून टाकतात. कारण त्यांना माहितीय की याचा जाब कुणीही विचारणार नाहीये. यांच्या बाजूनं बोलणारं कुणीही नाहीये.
अशात या दुर्दैवी पोराची जबाबदारी कोण घेणार? पण माणसाचा स्वतःचाच जीव थाऱ्यावर नाही, अशा परिस्थितीतही मानवी चांगुलपणा, करूणा यांचं आश्चर्यकारक दर्शन.!
ही होरपळ बघताना भडभडून यायला लागलं, ते थांबेचना. ज्या दिवशी बघितला त्या दिवशी जेवण गेलं नाही.
४. 'At work'. फ्रेंच.
हा एका लेखकाच्या आयुष्यावरचा सिनेमा आहे. लेखकाच्या भूमिकेतला अभिनेता जबरदस्त आहे. हा लेखक लिहिण्यासाठी वयाच्या बेचाळीसाव्या वर्षी स्वतःचा चांगला जॉब सोडून देतो. आणि मग पोटासाठी Gig worker म्हणून कामं करायला लागतो. सगळी शारीरिक कष्टाची कामं. मिळेल ती कामं. बागेची छाटणी, ड्रायव्हर, सामानांचं शिफ्टींग, कुरिअर डिलिव्हरी. यातही स्पर्धा प्रचंड, म्हणून स्वतःच्या श्रमांची किंमत हळूहळू कमी कमी करत जातो.
या निम्न आर्थिक स्तरातलं आयुष्य जगल्यामुळे लिहिण्यासाठी एक परस्पेक्टीव मिळतो, जो आधीच्या आयुष्यात कधीच मिळाला नसता. गिग वर्कर म्हणून काम करताना तो लोकांचं निरीक्षण करत राहतो. Gig workers कडे पाहण्याचा समाजाचा अलिप्त दृष्टिकोन, यात फार प्रकर्षाने जाणवतो, अंतर्मुख करतो. आता त्याला स्वतःला समोरच्याच्या जागी ठेवून बघता यायला लागतं. लिखाणात ते झिरपतं. आता तो समकाल टिपतो, आता त्याचं लिखाण आधीसारखं आत्मचरित्रात्मक राहत नाही. जगून बघितल्याशिवाय तुम्हाला तो काय प्रकार आहे हे कळत नाही.
या लेखकाची एक लोभस गोष्ट म्हणजे कोणाहीबद्दल कटुता बाळगत नाही. ठरवून घेतलेला निर्णय शंभर टक्के निभावून नेताना दिसतो. 'जीवनाचं काय करायचं? काय जरूरीचं आहे?' हे याला पक्कं कळलेलं दिसतं. एरव्ही कोण कशाला सुखातला जीव दुःखात टाकेल? लेखक असणं ही काय चीज असते, याची झलक बघण्यासाठी हा सिनेमा जरूर पहावा.
यातलं एक आवडलेलं उद्धृत. ''लिहिलं तर कुणी छापेल असं नाही. छापलं तर कुणी वाचेल असं नाही. वाचलं तर ते आवडेलच असं नाही. आवडलं तरीही ते चांगलं असेलच असं नाही.''
हा सिनेमा याच नावाच्या मूळ फ्रेंच कादंबरीवर आधारित आहे. ती कादंबरी वाचायला मिळाली पाहिजे. बघूया.
५. 'President's cake'. इराक.
हा काळ १९९१ च्या आसपासचा. इराक युद्धग्रस्त. आर्थिक नाकेबंदीमुळे महागाई आकाशाला भिडलेली, असा काळ.
सद्दाम हुसेनचं एक फॅड. त्याच्या बड्डेनिमित्त देशभरात सेलिब्रेशनचं आयोजन. त्यासाठी सरकारी फतवे. एका छोट्या खेड्यातल्या शाळेतही सद्दामच्या बड्डेचं सेलिब्रेशन करायचंय. त्यासाठी केक बनवून आणायची जबाबदारी एका शाळकरी मुलीवर टाकण्यात आलेली आहे. तिचे आईवडील युद्धात मारले गेले आहेत. तिची आज्जी आणि ती जवळच्या शहरात जातात केकसाठीचं सामान आणायला. हे सामान मिळवण्यासाठी करावी लागलेली यातायात संपूर्ण सिनेमाभर.
अर्थव्यवस्था पूर्णपणे कोसळलेली. चलनाला काही किंमतच राह्यलेली नाही. उदाहरणार्थ पाच अंड्यांची किंमत अडीच हजार दिनार! कशाचा कशाला अर्थ नाही. समाज बार्टर सिस्टमकडे वळलेला आहे. घड्याळ द्या, पीठ घ्या. पोती उचलायला मदत करा, साखर घ्या. रेडिओ द्या, स्कूल युनिफॉर्म घ्या. चोरांचा सगळीकडे सुळसुळाट.
भयाण दारिद्र्य. त्यात कसंबसं आयुष्य ओढणारे इराकी लोक. लोकांना खायचे फाके पडलेले आहेत आणि हा हरामखोर बड्डे सेलिब्रेट करतोय. लोकांनाही जबरदस्तीने सेलिब्रेट करायला लावतोय. बघेल तिकडं याचेच फोटो आणि जुलमाचा जयजयकार. वाईट.!
६. 'Amrum'. जर्मन.
हिटलरचा पाडाव झाल्यानंतरच्या दिवसातलं एक जर्मन खेडं. Amrum नावाचं हे एक छोटंसं बेट. तिथला एक लहाना जर्मन मुलगा. त्याची आई हिटलरची भक्त. ह्या पोराच्या नजरेतून सिनेमा. पोराची जगाकडे बघण्याची दृष्टी नितळ, आणि आतलं मूळचं चांगुलपण. एक हेल्दी वर्ल्ड व्ह्यू बहाल करतो सिनेमा.!
हा पोरगा संपूर्ण सिनेमाभर एकदाही हसत नाही, पण शेवटी जो गोड हसतो, ते एकदम कलेजा खलास करून टाकतो. प्रेम हीच एक मौल्यवान आणि शाश्वत गोष्ट आहे बॉस्स.! बाकी काही खऱ्याचं नाही.
७. 'Sad and beautiful world'. लेबॅनॉन.
लेबॅनॉनकडून यावर्षीच्या ऑस्करसाठी या सिनेमाची ऑफिशियल एंट्री आहे. कदाचित मिळेलही. सिनेमा भयंकरच आवडला. रोमॅंटिक आहे. रखरखीत वास्तव आणि रोमान्स समांतरपणे चाललेलं आहे. हार्श रिॲलिटी आणि मनातलं एक सुंदर ड्रीमलॅंड, अशी आळीपाळीने चाललेली रोलर-कोस्टर राईड.
शाळेपासूनची दोघांची लवस्टोरी असते. नंतर तारूण्यात अचानक भेट. पुढं लग्न. युद्धस्थिती. लेबॅनॉनची कोसळती अर्थव्यवस्था. मायग्रेशनसाठीच्या रांगा.
रोमान्स मात्र फार फार विलक्षण. अभिनेत्री बॅंकर असते. अभिनेता एक रेस्टॉरंट चालवत असतोय. कसलं तुटून प्रेम करतो यार हा !
८. 'ला ग्राझिया'. इटालियन सिनेमा.
एका राष्ट्राध्यक्षाचं आयुष्य, त्याच्या कार्यकाळाचे शेवटचे सहा महिने यात दाखवले आहेत. हा स्वतः देशातला मोठा आदरणीय कायदेपंडित असतो. त्याच्यापुढे सहीसाठी तीन विषय आलेले असतात. दोन वेगवेगळ्या केसेसमधील व्यक्तींच्या दयेचे अर्ज आणि इच्छामरणाच्या कायद्याचा मसुदा. ह्या कागदपत्रांवर सह्या करायच्या की नाही, हे विषय तो कसे हाताळतो, अभ्यासतो हे ह्यात दाखवले आहे. आवडला.
९. 'Kontinental 25'. रोमानिया, हंगेरी.
सुरुवातीलाच प्लॅस्टिकच्या बाटल्या, कचरा गोळा करत शहरभर भटकणाऱ्या एका बेघर भिकारी माणसाचं रोजचं आयुष्य दिसतं. त्याला त्याच्या राहती जागाही रिकामी करायला भाग पाडण्यासाठी कोर्टाची नोटीस घेऊन बेलिफ येते. ही यातली मुख्य अभिनेत्री. तो बेघर माणूस नंतर सुसाईड करतो. त्यामुळे ती अपराधभावनेनं ग्रासून जाते. ह्या गिल्ट मधून बाहेर पाडण्यासाठी ती काय काय करते, त्यापायी वेगवेगळ्या संस्थांना देणग्या देते, रात्र रात्र बेहोष होऊन बघते, चर्चमध्ये फादरपाशी जाऊन काऊन्सेलिंग, कुणाकुणाशी बोलून बघते, असं बरंच काही काही यात आहे. बाकी मग हंगेरी-रोमानिया वाद, इतिहास चिवडत बसलेली भंपक राष्ट्रवादी माणसं, असा पण एक पॉलिटिकल लॅंडस्केप आहे.
यातले इमारती, रस्ते निव्वळ सुंदर आहेत. कॅमेरा स्थिर एकटक लावून संपूर्ण इमारतींचं आर्किटेक्चर डोळ्यांपुढे उभे करणारे देखणे सीन्स आहेत. यात काही झेनकथांचा संदर्भ येतो तसेच, 'Unlucky criminals' म्हणून एका पुस्तकाचा उल्लेख आलाय, ते बघावं लागेल कधीतरी. असो.
संप्रति१
संप्रति१
रेकोज् साठी आभार. जफर पनाही बद्दल ऐकून आहे.
राही अनिल बर्वे चा मयसभा 30
राही अनिल बर्वे चा मयसभा 30 जानेवारीला रिलीज होत आहे. ट्रेलर जबरदस्त आहे. बॉर्डर २ नंतर लगेच रिलीज करणे रिस्की आहे.
अस्मिता ऊळ्ळोळ्ळुक ची पोस्ट
अस्मिता ऊळ्ळोळ्ळुक ची पोस्ट थोड्या वेळाने वाचेन. पोस्ट आवडली कि सांगायला येईनच.
पिक्चर बघायला वेळ झाला तर ते ही सांगायला येईन..
बॉर्डर २ चं काय झालं ? प्रिंटसच पोहोचल्या नव्हत्या म्हणे. असं कसं होऊ शकतं ?
अस्मिता, तुझ्या आग्रहावरून
अस्मिता, तुझ्या आग्रहावरून उल्लोळक पाहिला, आणि... नाही आवडला!
*** स्पॉइलर्स ***
म्हणजे नातेसंबंधांतले ताणेबाणे/पीळ/अंत:स्थ प्रवाह, तो वाच्यार्थाने आणि लाक्षणिक अर्थानेही 'मुक्तीदिनाची वाट पाहात अडकलेला जीव' वगैरे ठीक, पण मुळात ही शिकलीसवरलेली मुलगी तिच्या सिच्युएशनमध्ये अनप्रोटेक्टेड शरीरसंबंध ठेवून या घोळात स्वतःला का पाडते हे मला नाहीच कळलं/पटलं.
त्यामुळे मुदलातला कॉन्फ्लिक्टच ओढूनताणून आणलेला वाटला. (अमोलताशला त्यावरूनच नावं ठेवली ना आपण?!)
बरं, लग्नाआधीचं डायग्नोसिस सासूने - आणि आईनेही - लपवलं, पण लग्नानंतरचं रीलॅप्स आणि ट्रीटमेन्ट यांची माहिती ती कशी करून घेत नाही? सासू डॉक्टरशी बोलताना हिला दुसरीकडे धाडते आणि ही बिनबोभाट जाते? प्रत्येक वेळी? (सिनेमात एकच प्रसंग दाखवला आहे, पण आजारपण / ट्रीटमेन्ट काही काळ सुरू असते, त्यात एकदाही हिची डॉक्टरांशी बोलायची वेळ येत नाही?)
कळून परिस्थितीत बदल झाला नसता, पण माहिती करून घ्यावीशी वाटत नाही, नुसती सेवेसाठी सेवा करत राहायचं हे अनाकलनीय आहे.
तो बॉयफ्रेन्ड आणखीनच अचाट नमुना आहे! तो हिंदू असता-नसता तरी लूजर/नाकर्ता आहे ही फॅक्ट बदलत नाही. आईवडील शहाणे होते म्हणायचे मग त्या बाबतीत!
बाकी नवरा बेडरिडन झाल्यावर घर कसं चालतं? उपचारांचा खर्च कसा भागतो? ही किंवा सासू काही अर्थार्जन करताना दिसत तरी नाहीत.
ही काही उद्योग (म्हणजे नसते उद्योग सोडून) का करत नसते एरवीही?
सासूने माळ्यावरून बॅसिनेट काढल्यावर 'म्हणजे यांच्या घरात पाळणा 'हलणार' नव्हताच' असा एक पीजे तेवढा सुचला मला.
केरळमधला निसर्ग, संततधार, दाराशी सायकल असावी तशी ती बोट वगैरे बघायला छान वाटलं, पण सिनेमा काही त्यासाठी बघत नाही आपण.
राभु, विचार करून पाहा
राभु - विचार करून पाहा, बघ स्वातीचं कसं झालं

जाऊ दे, सहन केल्याबद्दल धन्यवाद !
पण तुला दम धरवत नाही दुसरं काय!
मला खरेतर strong performances मुळे आवडला. सगळ्यांच्याच चुका होतात, सगळेच खोटं बोलतात हेही नॉर्मल वाटले. दोघींचे नाते ज्या व्यक्तीमुळे असते, ती राहत नाही तरी ते कुठेतरी चांगल्या पद्धतीने पुढे जाऊन वेगळा जिव्हाळा दाखवते. ती मूर्ख न वाटता ( मलाही तो एक्स लूजरच वाटला होता) ती अडकलेली असल्याने पुन्हा चूक करून बघते, विवेक गमावते कारण सुटका हवी आहे. कशीही करून. अशा वेळी समोरचा नालायक असला तरी मुली लव्ह बॉम्बिंगने चूक करून बसतात, तरीही नंतर ती त्यातून स्वतंत्र होते. सासूचा नवराही धड नसतो, पोरगं ते तसं असतं. खऱ्या अर्थाने कुठल्याही पुरुषांशिवाय दोघीही स्वतंत्र होतात. ते श्रीमंत असतात म्हणे, आणि नव्या नवलाईतच सगळा बेबनाव होऊन तो गेला आहे. अजून काही वर्षांत झाले असते गरीब
अमलताश का आठवला , तो तर महामूर्ख आहे.
तुला लवकरच भरपाई म्हणून चांगला, सखोल सिनेमा देते. मग आपण सगळ्यांना पिव्हळवून सोडू. किती दिवस झाले पिव्हळवून!
बाय द वे, मला 'हक'ही खास
बाय द वे, मला 'हक'ही खास आवडला नाही. एकतर इमरान हाश्मी दगड आहे. त्यात ते 'अगंबाई, हा कुकर मोडला तर बदलत नाही, फक्त आणखी एक नवीन घेतो' हे संत्र स्क्रिप्टरायटरने सोलून, गर चावून प्रेक्षकांना भरवल्यावर एकदम वैतागच आला मला.
एका बाजूने वकिलीण बाईंची 'एन्ट्री' जितपत बालिश 'सुखद धक्का' आहे, तितपतच ते शेजार्याबरोबरचे खटके प्रकरण चेकलिस्ट मार्क केल्यागत आहे.
खुद्द यामी सतत इतकी गुळगुळीत गुलगुलीत मेकअप वगैरे केलेली वावरते! (सॉरी, फा!)
खस्ता खाते आहे, उपासमार सोसते आहे, मुलं वाढवते आहे, पण ती ओढगस्त तिच्या पेहराव/आविर्भावात कुठेही दिसत नाही! सगळं खोटं बेगडी वाटत राहातं - भिडत नाही.
तिची ती सवत कुठेतरी पाहिली आहे असं वाटत राहिलं. ती 'छावा'मधली झेबुन्निसाचं काम केलेली अॅक्ट्रेस नव्हे ना?
शहाबानोची केस, युनिफॉर्म सिव्हिल कोड वगैरे खूप मोठे विषय आहेत, ही पोस्ट अर्थातच फक्त चित्रपटापुरतीच मर्यादित आहे.
ळ्ळ ळ्ळ वरून लग्नकल्लोळ
ही खालच्या पोस्टची मूळ पोस्ट आहे. डपो म्हणून वाया घालवावी असे न वाटल्याने हा प्रपंच. (नाहीतर हकनाक सर्वरवर ताण येऊन पेज नॉट फाऊण्ड एरर येईल ).
धागा चित्रपटांचा आहे, जवानी दिवानी हा ही चित्रपट आहे. तो ही हिंदी. त्यामुळे त्यातल्या गाण्याबद्दल इथे बोलता येईल.
https://www.youtube.com/watch?v=f18qN5GTNAE&list=RDf18qN5GTNAE&start_rad...
अगर साज छेडा तराना बनेंगे. गायक, संगीतकार हे सगळं ठीक आहे. जया भागदौडी अगदी भावली दिसते, रणधीर कपूर कपूरांच्या डायनिंग टेबलवरून सगळं ताट खिशात भरून खात खात शुटींग करत आलाय हे जाणवतं. पण हे ही ठीकच.
टाईमलाईनवर ०.०४ बघा. काय दिसलं ?
पाठीमागे उभ्या लाईन्सचा शर्ट घातलेल्याने हात स्टाईलमधे कंबरेवर ठेवलाय ( सिंहकटी लिहीलं असतं पण ती कुठे असते हे विचारलं तर पंचाईत ). बाजूचा ठिपकेशर्ट वाला सोडा, पण व्हिटीच्या फूटपाथवरचं जाकीट अर्धवट ल्यायलेला एक आणि त्याच्या बाजूचा एक हे आपले लक्ष्य देण्याचे विषय आहेत. संपूर्ण गाण्यात यांच्या अॅक्शन्स बघा.
०.०८ तराने बनेंगे म्हणत रणधीर कपूर खाली बसतो तिथे कॅमेरा गुड्डी गुडियावर जाताना दोघींवरून वेगात जातो. त्यातली सर्वात डावीकडची हेअरस्टाईलच्या जिवावर मोठी हिरॉईन बनायला घरातून पळून आलेली वाटते. तिच्या शेजारची घार्या डोळ्यांची असल्याने मैत्रिणींनी तिला तू राखीसारखी दिसते हे डोक्यात भरवलेलं असणार. तिच्या चेहर्यावरचे भाव पाहून तिला हा रामसे बंधूंचा सिनेमा आहे असं कुणी सांगितलंय कि काय हे समजत नाही. गॉयटर झाल्यासारखे डोळे सताड उघडे आहेत. एखाद्या मूर्तीच्या मिटलेल्या डोळ्यांच्या वर पांढरा रंग मारून त्यात बुब्बुळं काढावीत तसं. सर्वात उजवीकडची साडी नेसलेली नेमकी कशासाठी चित्रपटसृष्टीच्या दिशेने कूच करून आली असावी हे समजत नाही. ती लेडी माणिक इराणी दिसते. कदाचित दुष्काळि गावची नूतन असावी.
२:५६ पसाने बनेंगे म्हणत गुडीया डोकं हलवते आणि या सगळ्या "चलो अपना पर डे ले लो" घोषणा झाल्याच्या खुषीत उड्या मारत येतात.
१:१३ हिरो हिरॉईन एकमेकांच्या डोळ्यात हरवले आहेत. आळीपाळीने मधे मधे येऊन दोघांकडे टेनिसमॅच दरम्याने इकडे तिकडे बघण्याचा कार्यक्रम कसला जबरदस्त आहे. यातच ती हेअरस्टाईलिस्ट. केशरचनेवर जर कुणी हिरवीन बनू शकली असती तर हीच. थोडा चेहरा झाकायचा होता.
एकंदरीत वेशभूषा बघता हे कॉलेजचे विद्यार्थी आहेत कि डीएड झाल्यानंतर प्रायव्हेट कॉलेजच्या इंटरव्हू साठी आलेले लोक आहेत ? या पेक्षा भयानक कपडे फक्त मराठी चित्रपटाच असू शकतात. बघा बघा. शेवटपर्यंत बघा.
०:३५ पेंटलच्या मागे असलेला मिशीवाला जर खलनायकाच्या रोलमधे असता तर त्या काळचा पंकज त्रिपाठी बनला असता. पण ध्येय न सापडल्याने भरकटला. पुढच्यास शॉट मधे पत्र पास होतं आणि रणधीर कपूर वाचत असताना मागचा निळा टी शर्ट घालून त्यावर फडकं गुंडाळलेला ते पत्र वाचतो आणि दोन्ही हात प्रश्नार्थक हलवतो. हा अभिनय सुवर्णकमळ साठी का विचारात घेतला नसेल ?
पिवळा शर्ट वाला कंबरेवर अंगठा अडकवून अवघडलेल्या स्थितीत उभा आहे. मिठुन सारखी (गनमास्टर) हेअरस्टाईल चुकल्याने डावा डोळा झाकला आहे. मिठुनला संधी मिळू शकते तर याला का नाही ? हे सगळे लोक सिनेमात का आले असावेत ? कदाचित युनूस परवेज यांच्याकडे कामाला असावेत.
हसून झालं आता वाईटही वाटतं. मोठ्यांचं निधन होतं, छोटे मेले असं म्हटलं जातं. बिचार्यांचा चॉईस चुकला हे आयुष्य हातातून गेल्यावर लक्षात आलं तर काहीच करता येत नाही.
अरे ओ सांबा या हाळीने फेमस झालेला मॅकमोहन झोपडपट्टीत राहत होता. हलाखीचं आयुष्य जगला. त्याची मुलगी खूप सुंदर आहे पण तिने ही लाईन पकडली नाही....
ळ्ळ ळ्ळ वरून लग्नकल्लोळ
ळ्ळ ळ्ळ वरून लग्नकल्लोळ आठवला. (त्याचं पोस्टरवरचं नाव लव्ह लग्न लोच्या आहे). पण मराठी असल्याने मचिकवा वर.
>>> तुला दम धरवत नाही दुसरं
>>> तुला दम धरवत नाही दुसरं काय!

>>> अमलताश का आठवला , तो तर महामूर्ख आहे.
अनप्रोटेक्टेड शरीरसंबंधांवरून.
देशी चित्रपटांना सेक्स एज्युकेशनची आवश्यकता आहे एकूण.
>>> तुला लवकरच भरपाई म्हणून चांगला, सखोल सिनेमा देते. मग आपण सगळ्यांना पिव्हळवून सोडू.
येस येस!
अगं हो, मी तर ठरवलं होतं
अगं हो, मी तर ठरवलं होतं कुणालाही अनप्रोटेक्टेड सेक्स करू द्यायचा नाही. घात झाला.
त्यामुळे त्यातल्या
त्यामुळे त्यातल्या गाण्याबद्दल इथे बोलता येईल.
>>> काय अब्यास! काय अब्यास...
हा कुकर मोडला तर बदलत नाही,
हा कुकर मोडला तर बदलत नाही, फक्त आणखी एक नवीन घेतो' हे संत्र स्क्रिप्टरायटरने सोलून, गर चावून प्रेक्षकांना भरवल्यावर एकदम वैतागच आला मला. >>>
खुद्द यामी सतत इतकी गुळगुळीत गुलगुलीत मेकअप वगैरे केलेली वावरते! (सॉरी, फा!) >>> ओके ओके
तुला दम धरवत नाही दुसरं काय! >>>
अगं हो, मी तर ठरवलं होतं कुणालाही अनप्रोटेक्टेड सेक्स करू द्यायचा नाही. घात झाला >>>
शहाबानोची केस, युनिफॉर्म सिव्हिल कोड वगैरे खूप मोठे विषय आहेत, ही पोस्ट अर्थातच फक्त चित्रपटापुरतीच मर्यादित आहे. >>> बाय द वे मला पिक्चर खूप एंगेजिंग वाटला नाही म्हणून पूर्ण पाहिलेला नाही पण वाचले आहे त्यावरून हा पिक्चर युनिफॉर्म सिव्हिल कोडपर्यंत पोहोचला का मुळात, की शरियतचे इंटरप्रिटेशन तिच्या बाजूने होते या आर्ग्युमेण्टवर निकाल लागलेला दाखवला? म्हणजे ते झाले नसते तर इतकेही झाले नसते.
एले - रूमाल टाकून ठेवतो. पुन्हा गाणे बघून पोस्ट वाचेन
बाय द वे चांगल्या गाण्यांचे अतर्क्य चित्रीकरण असा काहीतरी धागाही होता. इथे असू दे हे, त्याबद्दल काही नाही.
एले , गाढा अभ्यास आहे.
एले , गाढा अभ्यास आहे.
हळदीकुंकवाची अस्टरची फुले का वापरली असावीत ?
गेला बाजार जरबेरा तरी हवा होता.
अस्मिता, तुला त्या वेळी आवडला
अस्मिता, तुला त्या वेळी आवडला ना ? मग बास तर. नंतर दोन दिवसांनी आवडला नाही असं म्हणू नकोस.

एखाद्याला आवडतो एखाद्याला नाही. रेको बघून नाही आवडला तरी आवड आपली आपली म्हणायचं.
अगर साज छेडा माझं आवडतं गाणं आहे. पोस्टमार्टेम करू नका. त्या वेळची जया भादुरी आवडते
हल्ली अमिताभ रेखा आणि जया भादुरी बच्चनचे ए आय रील्स येतात. डोकं उठवलंय. प्रत्येक वेळी अमिताभ जया बच्चनला ढकलून देतो किंवा तिला सोडून दोघे पळून जातात मग जया रेखाच्या डोक्यावर पाणी टाकते
हे पहिलंच त्रिकूट असं आहे ज्यात लोकांचा पाठिंबा रेखाला असतो.
मयसभा - खूप वर्षांनी
मयसभा - खूप वर्षांनी मुद्दामून थेटर मधे जाऊन बघायला हवा अस वाटतंय. बघणार.
बॉर्डर २ - बॉर्डर खूप छान बनवला होता. अर्थात प्रत्येकाची बॅक स्टोरी, प्रेमप्रकरणं वैताग आणणारं होतं. सनीच्या जोरदार कामगिरीमुळे आणि शेवटच्या मेसेज मुळे बॉर्डर इतर युद्धपटांपेक्षा उजवा होता. आता एक तर जे पी दत्ता दिग्दर्शक नाहीत. त्यात सनी सोडला तर इतर कलाकारांबाबतीत अजिबात आकर्षण वाटत नाही. आणि पूर्वीसारखा संदेश असण्याची शक्यता कमीच आहे. मनोरंजन होईल यात शंका नाही, पण का कुणास ठाऊक पहिल्या भागाची उंची गाठणार नाही असं वाटतंय. ओटीटीवर बघेन.
बॉर्डर २ पण येथे (अबुधाबी)
बॉर्डर २ पण येथे (अबुधाबी) मधे बॅन केलाय.
हे पहिलंच त्रिकूट असं आहे
हे पहिलंच त्रिकूट असं आहे ज्यात लोकांचा पाठिंबा रेखाला असतो. >>> हाहाहा. माझा जयाला. हल्ली काही वर्षाच्या जयाला बघून पूर्ण जया जज करतात लोकं. आधी इतकी वर्ष तिने अमिताभसाठी काय केलं विसरतात. तिने स्वत:च्या उत्तम करियरचा त्याग करून चांगला संसार केला. अमिताभ मध्ये टॅलेंट होतंच पण द अमिताभ होण्यात तिचा मोठा वाटा आहे. त्याच्या आजारपणात खंबीरपणे पाठीशी उभी राहिली ती. त्याच्या downfall मध्ये पाठीशी होती ती. असो.
बॉर्डर २ आजच बघितला, चांगला
बॉर्डर २ आजच बघितला, चांगला आहे. सुनील शेट्टीच्या पोराला जास्त काही जमलं नाही पण बाकीनी चांगल काम केलं आहे.
सनी देओल नेहमी प्रमाणेच आहे.
किष्किंधा कांडम… पाहिला (जिओ
किष्किंधा कांडम… पाहिला (जिओ हॉट्स्टार).
जबरदस्त स्टोरीटेलिंग… दिग्दर्शक खरेच कमाल आहे. त्याचा इको आवडलेलाच, हा त्याहीपेक्षा जास्त आवडला. सगळ्यांचा अभिनय उत्तम झालाय विषेशतः बाप व मुलगा या दोघांचा. मुलाने जबरदस्त काम केलेय.
घडणार्या घटनांचे विस्मरण होणे किंवा स्मरणशक्तीचा -हास होत जाणे हा आज कोणालाही ग्रासु शकणारा विकार आहे. आजवर या विषयावर आलेल्या चित्रपटांमध्ये या विकाराचे इतरांवर होणारे परिणाम दाखवले गेलेत. या चित्रपटात त्या व्यक्तीवर याचे काय परिणाम होत असतील यावर फोकस आहे. आपल्याला विस्मरण होतेय हे कळतेय, हे लोकांना कळु नये याची धड्पड करत राहायचे, त्यासाठी आपण काय विसरलोय याची आठवण ठेवत राहायचे याचा जबरदस्त ताण विकारग्रस्त व्यक्तीवर येत असणार. आपण जे विसरलोय त्यात काहीतरी महत्वाचे तर नाही ना ह्या विचाराने स्वतःला कुडतरत राहणे हे कित्येकांसाठी रिअॅलिटीही असु शकते जे ते कोणाला सांगु शकत नसतील. शेवटची १५ मिनिटे जबरदस्त आहेत.
या चित्रपटाचे नाव किष्किंधा कांडम का असावे असा प्रश्न नाव ऐकले तेव्हा पडला होता. यात सुरवातीला वाक्य आहे की वाली व सुग्रिव सोडुन इतर सगळी माकडांची फौज इथे राहते. तेव्हा आठवले वालीच्या नगरीचे नाव किष्किंधा होते.
जबरदस्त स्टोरीटेलिंग…
जबरदस्त स्टोरीटेलिंग… दिग्दर्शक खरेच कमाल आहे. त्याचा इको आवडलेलाच, हा त्याहीपेक्षा जास्त आवडला.
>>>
+786
दोन्हीत दिग्दर्शकाची विशिष्ट छाप जाणवते. शेवटी सगळे संदर्भ जुळल्यावर एक वेगळेच समाधान मिळत असले तरी सुरुवातीला काय चालू आहे हे कळू नये अशी स्थिती निर्माण न होता उत्सुकता कायम राहावी हे कमाल आहे.
MAD आणि MAD 2 (Mad Square)
MAD आणि MAD 2 (Mad Square)
Netflix - Hindi Dubbed - Orginal Telugu
नावाप्रमाणेच mad जॉनरचा चित्रपट. कॉलेज आणि हॉस्टेल लाईफ मधील वेडेपणा अनुभवायचा असेल तर आवर्जून बघा. थोडेफार छीचोरे चित्रपटाचे Vibes येतील. पण हा वेगळा आहे. स्टोरी अशी ठोस नसल्याने काही सांगण्यात मजा नाही. पण हर एक दोस्त कमीना होता है टॅगलाईन सूट व्हावी असा चित्रपट आहे.
यात एक DD नाव असलेला कलाकार फार अवली वाटला. त्याचे अजून चित्रपट शोधायला गुगल केले तर याचाच दुसरा भाग सापडला MAD -2
यात कॉलेजमधून बाहेर पडल्यावरची स्टोरी आहे. पण जॉनर तोच. तसाच वेडेपणा. आधी पाऊणेक तास ठोस स्टोरीअभावी फसला की काय असे वाटतानाच हळूहळू रंग पकडू लागतो आणि पहिला आवडला असल्यास हा सुद्धा आवडून जातो. हर एक दोस्त कमीना होता है टॅगलाईन इथे सुद्धा कायम राहते.
माझे मन, स्वस्ति, फार एण्ड
माझे मन, स्वस्ति, फार एण्ड आणि अगर साज छेडा पोस्ट वाचलेल्या सर्वांचे आभार
अवांतर :
अवांतर :
>> चांगल्या गाण्यांचे अतर्क्य चित्रीकरण <<
या वरून साक्षात ग्रेस यांच्या कवितेची ठासून काढणारे आणि अभिनयाचा (नायकाच्या) आणि दिग्दर्शकांच्या अत्यंत प्रामाणिक मूर्खपणाचा
क्रिंजमाधवीच्या प्रदेशातला शिरोमणी विडिओ
तुला पाहिले मी : https://youtu.be/e_-9GiAMInY?si=JbaXDgOr0_7T1dSY
>> Amrum <<
>> Amrum <<
Tschick ही वुल्फगांग हेर्नडॉर्फची कादंबरी जर्मनीत शाळांमध्ये वाचायला लावली जाते. दोन १४ वर्षांची मुलं - माईक आणि चीक - उन्हाळ्याच्या सुट्टीत कार घेऊन बाहेर पडतात, असा साधा रोड-ट्रिपचा किस्सा आहे. भाषा सोपी आहे, मुलांच्या नजरेतून कथा आहे, आणि मैत्री-एकटेपणा-घरातली गुंतागुंत अशा गोष्टी त्यामुळे शिक्षकांना ही कादंबरी अभ्यासासाठी “योग्य” वाटते. २०१६ मध्ये फातिह अकीनने यावर चित्रपट केला, तोही अनेक वर्गांत दाखवतात. कादंबरी तुफान खपलेली आहे.
पण आजचे बरेच जर्मन विद्यार्थी या कादंबरीवर अजिबात खुश नसतात. त्यांना वाटतं की ही कथा त्यांच्या वयापेक्षा “लहान” आहे, किंवा तिच्यात अजिबात काही फार काही मोठं घडत नाही. सगळं हळू आणि लहान लहान प्रसंगांवर कथा आहे त्यात विशेष काही घडत नाही आणि त्यांना आजकाल जी maturity हवी असते तीही त्यांना या कादंबरीत सापडत नाही. आजकाल मुलं वेगवान, जास्त थरारक, जास्त “मॅच्युअर” कंटेंट पाहतात. त्यामुळे Tschick त्यांना खूप क्लिशे वाटतो. परंतु अनेक मुलांना कादंबरी आवडते आणि चित्रपट मात्र बंडल वाटतो.
एकूण आजकालच्या जर्मन मुलांच्यात सांस्कृतिक मॅच्युरिटी खूप जास्त आहे असे जाणवले. म्हणजे शाळेत असताना तर ती अनेक पुस्तकं वाचतातच मात्र आजकाल त्यांना त्या पुस्तकांतून आणि सिनेमांतून जास्त मॅच्युरिटी हवी असते. शिवाय कोणतीही गोष्ट फोर्स केलेली त्यांना खपत नाही. काही मुलांनी तर कादंबरीवर सेक्सुअलिटी सारखे विषय अजून गांभीर्याने हाताळले नाहीत म्हणून देखील टीका केली आहे. सर्वसाधारण भारतीय अडल्ट माणसाच्या मेंदूच्या अर्ध्या सेंटीमीटर मधेही न शिरणाऱ्या या गोष्टींबाबत ही मुलं सजग आहेत हे पाहून त्यांचे कौतुक आणि हेवा वाटतो..
https://youtu.be/TA1TXaMUUE4?si=Smxy_jv2uP5qbzef
Pages