चित्रपट कसा वाटला १२

Submitted by धनि on 4 August, 2025 - 10:36

२००० झाले पण Lol

मागचा धागा
https://www.maayboli.com/node/86233?page=66#new

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अवांतर :

>> चांगल्या गाण्यांचे अतर्क्य चित्रीकरण <<

या वरून साक्षात ग्रेस यांच्या कवितेची ठासून काढणारे आणि अभिनयाचा (नायकाच्या) आणि दिग्दर्शकांच्या अत्यंत प्रामाणिक मूर्खपणाचा

क्रिंजमाधवीच्या प्रदेशातला शिरोमणी विडिओ

तुला पाहिले मी : https://youtu.be/e_-9GiAMInY?si=JbaXDgOr0_7T1dSY

>> Amrum <<

Tschick ही वुल्फगांग हेर्नडॉर्फची कादंबरी जर्मनीत शाळांमध्ये वाचायला लावली जाते. दोन १४ वर्षांची मुलं - माईक आणि चीक - उन्हाळ्याच्या सुट्टीत कार घेऊन बाहेर पडतात, असा साधा रोड-ट्रिपचा किस्सा आहे. भाषा सोपी आहे, मुलांच्या नजरेतून कथा आहे, आणि मैत्री-एकटेपणा-घरातली गुंतागुंत अशा गोष्टी त्यामुळे शिक्षकांना ही कादंबरी अभ्यासासाठी “योग्य” वाटते. २०१६ मध्ये फातिह अकीनने यावर चित्रपट केला, तोही अनेक वर्गांत दाखवतात. कादंबरी तुफान खपलेली आहे.

पण आजचे बरेच जर्मन विद्यार्थी या कादंबरीवर अजिबात खुश नसतात. त्यांना वाटतं की ही कथा त्यांच्या वयापेक्षा “लहान” आहे, किंवा तिच्यात अजिबात काही फार काही मोठं घडत नाही. सगळं हळू आणि लहान लहान प्रसंगांवर कथा आहे त्यात विशेष काही घडत नाही आणि त्यांना आजकाल जी maturity हवी असते तीही त्यांना या कादंबरीत सापडत नाही. आजकाल मुलं वेगवान, जास्त थरारक, जास्त “मॅच्युअर” कंटेंट पाहतात. त्यामुळे Tschick त्यांना खूप क्लिशे वाटतो. परंतु अनेक मुलांना कादंबरी आवडते आणि चित्रपट मात्र बंडल वाटतो.

एकूण आजकालच्या जर्मन मुलांच्यात सांस्कृतिक मॅच्युरिटी खूप जास्त आहे असे जाणवले. म्हणजे शाळेत असताना तर ती अनेक पुस्तकं वाचतातच मात्र आजकाल त्यांना त्या पुस्तकांतून आणि सिनेमांतून जास्त मॅच्युरिटी हवी असते. शिवाय कोणतीही गोष्ट फोर्स केलेली त्यांना खपत नाही. काही मुलांनी तर कादंबरीवर सेक्सुअलिटी सारखे विषय अजून गांभीर्याने हाताळले नाहीत म्हणून देखील टीका केली आहे. सर्वसाधारण भारतीय अडल्ट माणसाच्या मेंदूच्या अर्ध्या सेंटीमीटर मधेही न शिरणाऱ्या या गोष्टींबाबत ही मुलं सजग आहेत हे पाहून त्यांचे कौतुक आणि हेवा वाटतो..

https://youtu.be/TA1TXaMUUE4?si=Smxy_jv2uP5qbzef

>> जफर पनाही बद्दल ऐकून आहे. <<

या थोर माणसाने घर कैदेत असताना अक्षरश: केक मधून कॅमेरा वगिरे स्मगल करून चित्रपट केलेला आहे.

This Is Not a Film (2011) हा चित्रपट तो घरात अडकवून ठेवलेला असताना, म्हणजेच बाहेर जाण्यावर बंदी असताना, मुख्यतः त्याच्याच घरात शूट केला गेला. त्याला “चित्रपट बनवण्यास” परवानगी नव्हती, म्हणून हा चित्रपटच एक प्रकारचा निषेध ठरलेला आहे. तो कॅमेऱ्यासमोर बसून बोलतो, आपली पटकथा वाचतो, जमिनीवर टेप लावून प्रसंग कसे मांडले असते ते दाखवतो, आणि “मी हा चित्रपट बनवला असता तर तो असा दिसला असता” हे प्रेक्षकांना समजावतो. असा हा मेटा चित्रपट आणि तोही घरकैदेत असताना आणि तो ही त्याच्या सरकारला मधलं बोट दाखवून.

या माणसाचा प्रत्येक सीन आणि सीन पाहायला पाहिजे. हा अत्यंत थोर दर्जाचा दिग्दर्शक आहे.

>> Kontinental 25 <<

ज्यांना पूर्व युरोपियन लोकांची अत्यंत खास तिरकस विनोद बुद्धी अनुभवायची आहे त्यांनी Radu Jude चे सगळे चित्रपट पाहावेत.

मागच्या वर्षी मी ड्रॅक्युला पाहिला होता त्याचा अशक्य कहर चित्रपट आहे. https://youtu.be/qoLmJZ9suAk?si=5-fIMCcCWuD0HPRh

त्याच्या चित्रपटात पुस्तकांचे संदर्भ येत राहतात. वरच्या ट्रेलर मधे एक फ्रेम आहे exactly १:०० मिनिटावर. only fans साठी. त्यावरून याच्या डोक्यात काय काय येत अस्तं याची कल्पना येईल.

त्याचा सर्वात आवडलेला चित्रपट म्हणजे Bad Luck Banging or Loony Porn.

https://youtu.be/TZMAAYy7GQY?si=oJycC1Wcsk88I_Iq

कोणत्याही प्रकारे प्रचारकी संदेश वगैरे न देता अतिशय खेळकर पण इंटेन्स (अजिबात पातळ पांचट न करता त्याच्या डोक्यातला राग न मोडता) अशी कॉमेडी Radu रचतो. तिला black humor म्हणावेसे वाटत नाही पण त्यातून एक त्याचा खास तिरकस कटाक्ष सर्व समाजावर पडलेला असतो.

मला Amrum बद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. आवडेल असे वाटते आहे. सगळ्या चित्रपटांच्या ट्रेलर्सच्या लिंक्स खाली चिकटवल्याबद्दल थॅंक्यू रॉय Happy

संप्रति, तुम्ही वेगळा धागा काढायचा असता, तो निवडक मधे टाकून जसे, जेथे सापडतील तसे पहाता येते. वाचणार आहे. वरवर चाळलेय. थॅंक्यू. Happy

'It was just an accident >> नोट केला आहे. इराणचे काही सिनेमे इकडे दिसत नाहीत. हा दिसेल का ?
सध्या इराणबद्दलच वाचतेय. डॉक्युमेण्टरीज वाचल्या आहेत.

क्रिंजमाधवीच्या प्रदेशातला शिरोमणी विडिओ
>>>

मृत आईला उद्देशून लिहिलेल्या आर्त कवितेला रोमॅंटीक गाण्याचं रूप देण्यासाठी लागणारा ठार मूर्खपणा व तेवढाच कॉन्फिडन्स येतो कुठून?

त्यात नदीचा किनारा म्हणून स्टुडीओमधील ओढ्याचा काठ, बावळट हसू म्हणजे अभिनयाची कमाल असं समजणारा नट व नेक्स्ट लिरीक्स गर्ल आपणच अशा थाटात वावरणारी नटी आणि तू साबणाची, मॉईस्चरायझरची किंवा जग्वारच्या टबची जाहिरात करतेस असा क्यू देणारा दिग्दर्शक हे दूर्भाग्य याच कवितेच्या नशिबी यावं? कुठल्या जन्माची पापं असावीत ही?
त्रिफळा चूर्णाचा काढा करून डोळे धुतले तर तो भयाण गुलाबी रंगाचा टावेलसदृश अंगरखा जाईल का डोळ्यासमोरून?

माझे मन,

शिवाय या सुंदर दृश्यप्रतिमा सुरू असताना पूर्वीच्या किंचित टकल्या सुरेश वाडकरांचा फोटो वाटरमार्क म्हणून स्मज होऊन येतो.. माझी क्रिंजब्रह्मानंदी टाळीच लागते थेट.

मृत आईला उद्देशून लिहिलेल्या आर्त कवितेला रोमॅंटीक गाण्याचं रूप देण्यासाठी लागणारा ठार मूर्खपणा व तेवढाच कॉन्फिडन्स येतो कुठून?>>

कवीची चूक आहे. त्याने अशा दुर्बोध कविता लिहिल्यावर प्रत्येकजण त्याच्या कुवतीप्रमाणे अर्थ काढणार.

रच्याकने तो रोमँटिक अ‍ॅन्गलही फेलच गेलाय.. तेही धड जमले नाही. असो.

>> रच्याकने तो रोमँटिक अ‍ॅन्गलही फेलच गेलाय.. तेही धड जमले नाही. <<

please don't ruin the joke by stating the obvious. it's called "too bad that it's good."

कविता लिहून झाली की ती कवीची राहत नाही. जो तिला हात लावेल त्याची होते. त्याला जो अर्थ हवा तो लावायला मोकळा.

बाळासाहेबांनीच ना ?- तरुण आहे रात्र अजुनी हे गाणं मृत सैनिकाची बायको म्हणते आहे असं म्हटलं?
एखादा डॉक्टर ते गाणं ऐकेल तर त्याला आणखी एक वेगळी शंका येईल.

बॉर्डर 2 कसा आहे ? कोणी बघितला का ?
मी बघितला, चांगला आहे. आम्ही दहा बारा लोकं बघायला गेलेलो. सगळ्यांना आवडला. वरून धवन ट्रेलर वरून ट्रोल झालेला पण त्यानं खरंच चांगल काम केलं आहे. दिलजीत ने पण चांगल काम केलंय.
सनी देओल तर नेहमी प्रमाणे आहेच.

बोर्डरमध्ये या लोकांनी अजेंडा प्रपगंडा कॉन्ट्रोवर्सी टाइपचे काही केलेले दिसत नाहीये. जी काही चर्चा माझ्यापर्यंत आली ती वरून धवन ट्रॉलचीच आली.

जुना बॉर्डर मी क्लास बुडवून चाळीतील मोठ्या पोरांसोबत फर्स्ट डे फर्स्ट शो मेट्रो टॉकीजला पाहिला होता. इतकी हवा होती त्याची..

किष्किंधा कांडम बघितला जबरदस्त चित्रपट तुम्हाला रोलर कोस्टर राईड वर घेऊन जातो... ... डोक्याला खुराक आहे

कि का व एको च्या मालिकेत पहिला केरळ क्राईम फाइल सिजन २ आहे. तो परवा पाहिला. तोही असाच मस्त आहे. एक गुन्हा घडतो त्यातुन बाहेर पडण्यासाठी दुसरा गुन्हा घडतो. तो घडतो म्हणुन तिसरा गुन्हा घडतो. याचे वैशिष्ट्य म्हणजे जे घडले त्याचा पोलिस अंदाज बांधतात. ते नक्की कसे घडले हे त्यांनाही कळत नाही कारण गुन्हेगार तोंड उघडत नाही. आपणही पोलिसांच्या बोटीत Happy

के क्रा फा सिजन १ पण पाहिला. दोन्ही सिजन पोलिसी बाजुने लिहिलेत. ते कसे तपास करतात, व्यक्तिगत आयुष्यावर
अनियमित कामाच्या वेळांचा कसा परिणाम होतो, काम करुनही वरिष्ठांच्या कशा थपडा खाव्या लागतात वगैरे उत्तमरित्या दाखवलेय.

Arijit Singh, one of Bollywood’s most recognisable and enduring voices of the past decade, has announced his retirement from playback singing, bringing the curtain down on a career that redefined the sound of modern Hindi film music.

The 38-year-old singer confirmed the decision on January 27 through a post on his private X account and a Facebook message, clarifying that while he will no longer take up new film assignments, he is not stepping away from music altogether.

a career that redefined the sound of modern Hindi film music>>>>

अख्खं आयुष्य हिंदी पिक्चरची गाणी ऐकण्यात गेलं तरी हे कधी झालं समजलंच नाही. त्याची कायम रडक्या आवाजातली गाणीच कानावर पडलीत. त्याची बरी गाणीही असतील पण असुदे.

सोनु निगमपर्यंत हिंदी गाणी गुणगुणता येत होती. नंतरच्या काळातल्या गाण्यांनी ती सोय ठेवली नाही. जाउदे, मी लताआशारफीकिशोर च्या जुन्या काळातच अडकलेय. तिथुन बाहेर काढेल इतपत रमणीय/श्रवणीय नवे काही निर्माण झाले नाही. त्यामुळे अरिजित राहिला काय आणि गेला काय.. सारखेच!!

मला अरिजितची काही गाणी आवडतात, काही नाही. पण आयुष्यभर एवढी मेहनत करून, आवाज तासून, दहा दहा तास सलग गाऊन आता यश मिळाले आहे आणि हा एवढा मोठा निर्णय. भयंकर वाटली बातमी. काही तरी तितकेच मोठं कारण असेल. पूर्वी जगजित सिंह आणि चित्रा सिंह एकत्र गायचे. मुलगा गेल्यावर तिने गाणं सोडलं. मला फार, फार वाईट वाटलं होतं. गाणं ज्यांच्यासाठी सर्वस्व आहे, त्यांना ते सोडावं लागणं! अर्थात ती हताशा आणि ते वैराग्य सुद्धा त्या पॅशन इतकेच दुर्दम्य असेल. त्यामुळे अरिजितने असं काही करू नये असं मनापासून वाटतं. मला तो आवडतो, नाही आवडत पेक्षा त्याला गाणं आवडतं म्हणून!

अरिजितचं बाजीराव मस्तानी मधलं आयत आवडतं. हस्की आवाज लावून गायलेलं एखाद दुसरं गाणं आवडू शकतं. सगळीच गाणी अशा आवाजात नाहीत ऐकवत. पूर्वीच्या काळी तलत महमूदच्या कंप असलेल्या आवाजात काही गाणी आवडतात. पण रफी नसते तर हीच गाणी ऐकणं ही शिक्षा झाली असती.

अरिजीत सिंग सर्वात कमी मानधनावर काम करायचा. त्यामुळे बेरोजगार झालेल्यांच्यात सोनू निगम सुद्धा आहे. त्यामुळे त्याला अचानक एव्हढी गाणी मिळू लागली. खूप काम करूनही त्याचं उत्पन्न कमीच होतं. त्या वेळीच त्याचा एक इंटरव्ह्यू रेडीओ वर ऐकला होता. त्यात तो काही वर्षे काम करून रिटायर होणार असे म्हणाला होता. गायकांना जास्त पैसे कॉन्सर्ट मधून , रिअ‍ॅलिटी शो मधून मिळतात. हल्ली अरिजीतचे कॉन्सर्ट्स खूप व्हायला लागले आहेत. त्याने प्ले बॅक मधून ब्रेक घेतला आहे. गायनातून नाही. म्हणजे बहुतेक कॉन्सर्टस करत राहील.

एले, गाणं सोडत नाही ही चांगली गोष्ट आहे (धन्यवाद , तुमची पोस्ट वाचून मी पुन्हा नीट वाचले) तरीही मला हे drastic वाटले. प्लेबॅकच्या जीवावरच कंसर्ट पोसत असतात. सगळ्यात मोठे मार्केट आहे. सगळा अट्टाहास हाच मुख्य प्रवाहात राहून प्लेबॅक करण्यासाठीच केलेला असतो.

मी मागेच वाचले होते की आता प्रत्येक गाणे चारपाच लोकांकडुन गाऊन घेतात, त्यातले कुठले चित्रपटात येईल हे गायकालाही माहित नसते. सोनु शान वगैरे आता संपवलेत या सिस्टिमने. अरिजितला हे बोलायचे नसेल त्यामुळे त्याने इतर कारणे दिलीत. मागे काहीतरी बोलुन सलमान खानचा राग ओढवुन घेतला होता आणि शेवटी माफी मागुन सुटका मिळवली होती. बॉलिवुड इन्डस्त्री राजकारणाच्या बाबतीत भयाण आहे हे मत झालेय. तिकडे रहमान पण रडतोय आणि इकडे हा, सोनु, शानही. Happy

He explained that he wishes to focus on learning, exploring music independently, and working as a “small little artist” without the pressures of commercial playback singing. After years of lending his voice to films, Singh appears keen to step back from the industry’s demands and reconnect with music on his own terms.

लोकसत्तातील बातमीनुसार अरिजीत आता Concert वर फोकस करणार आहे. दोन तासाच्या एका काॅन्सर्टचे त्याला १४ कोटी मानधन मिळते.

https://www.loksatta.com/manoranjan/bollywood/arijit-singh-announces-ret...

Pages