चित्रपट कसा वाटला १२

Submitted by धनि on 4 August, 2025 - 10:36

२००० झाले पण Lol

मागचा धागा
https://www.maayboli.com/node/86233?page=66#new

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

'सिंगल सलमा' मला अजिबातच आवडला नाही. लेम आणि डेटेड आहे. पंधरा रूपयांसाठी जाणारा नवाब नाही तो, आढ्यता असते ती आपण कुणीतरी मोठे आहोत हे दाखवायची. प्रत्यक्षात हवेली गहाण, पोरगी संसार ओढतेय. तुम्हाला पोसतेय आणि तिने सुद्धा तुमचं ऐकायचं, तुम्हाला मान द्यायचा. मुलासाठी चार मुली जन्माला घातल्या, मोठ्या मुलीच्या गळ्यात हे लोढणे घालून स्वतः नवाब म्हणून मिरवायचे. असे उत्पन्न नाही तरीही अहंकारी नवाब आणि संस्थानिक- वतनदार असतात. शेत विकून रोज साजूक तुपाचा शिरा खाणारे वतनदार मी पाहिलेले आहेत. आळशी आणि ऐतखाऊ. बरोबर कॅरेक्टर आहे. तरीही पिक्चर विशेष जमला नाही, लंडनला गेल्यावर सगळे कंटाळवाणे झाले. सन्नी सिंग म्हणून जो दुसरा हिरो आहे, त्याला लंडनलाच राहू द्या. अतिशय लो एनर्जी आणि निर्बुद्ध झाक आहे चेहऱ्यावर.

-----
कथेची तशी गरज असेल तरच, धार्मिक
प्रश्न मांडायचे असतील तरच मुस्लिम व्यक्तीरेखा येते. ह्या चित्रपटात म्हणुनच मुस्लिम दाखवले हे आवडले.

>>>>> +१ साधना, मला तर तेच पहायचं होतं.

सनी सिंग (नाव आजच कळले) फारच मर्यादित क्षमतेचा अँक्टर आहे. चेहऱ्यावर कुठलेच भाव उमटत नाहीत.
त्याला सोनू के टीटू की स्विटी मध्ये पाहिले होते. तो चित्रपट आवडला होता. पण त्याचे कारण कार्तिक आर्यन होता. त्याने एकहाती दोघांना सांभाळून घेतले होते.

याच धाटणीचा मुस्लिम कुटुंब दाखवलेला एक आवडलेला चित्रपट म्हणजे सिक्रेट सुपरस्टार!
ती कथा मुस्लिम कुटुंबात घडताना आमिरने दाखवले हे त्याहून जास्त आवडले होते.

आमीर खान प्रोडक्शनचा एकदम भंपक पिक्चर. आमीर खानच्या चॉईस वर शंका उत्पन्न होईल असा आहे.
नाव पण घ्यावंसं वाटत नाही. केवळ तो निर्माता आहे म्हणून आठ जण आलेले त्यात तीन आमचे. Proud
जर हा पिक्चर कुणी मेणबत्तीच्या प्रकाशात जरी आवडला असं म्हटलं तो मुझे मोमबत्तीयोंसे नफरत हो जाएगी

ऊळ्ळोळ्ळुक (Ullozhukku - undercurrent) नावाचा मल्याळम चित्रपट नेटफ्लिक्सवर आला आहे. स्पॉयलर्स आहेत. अतिशय उत्तम कामं आहेत. दुःखद कथा आहे पण दर्जेदार कथानक आहे. मला एका मैत्रिणीने रेको दिला होता. सासू आणि सुनेच्या नात्यावर आहे पण अजिबात नॉर्मल नाही. केरळी ख्रिश्चन कुटुंब आहे, खेड्यात राहते. सतत पाऊस आणि पूर येणाऱ्या जागी. तो पाऊस म्हणजे दोघींच्या नात्यातील तणाव आणि मळभ दाखवतो. सुनेचे आधी प्रेमप्रकरण असते पण तेथे तो हिंदू असल्याने आईवडील लग्न होऊ देत नाहीत आणि बेकार असल्याने तिला पळून जाता येत नाही. लग्न होऊ शकत नाही, व या बाईच्या मुलाशी होते ज्याला आधी ट्यूमर होऊन तो बरा झाला असतो. पण ही गोष्ट ते लपवून ठेवतात, मुलीच्या आईलाही तिला उजवायचं पडलेलं असतं. त्यामुळे आई आणि सासू दोघीही तितक्याच जबाबदार असतात. त्यात त्याला नंतर लगेच पुन्हा ट्यूमर होऊन त्याची सेवा शुश्रुषा करावी लागते व ती पुन्हा प्रियकराकडे ओढली जाते. अगदी समर्पित भावनेने नवऱ्याची थुंकी सुद्धा झेलत असते, त्यामुळे सासूचा तिच्यावर जीव असतो. त्या मरत्या जीवासोबत यांचं आयुष्य कुठेतरी जोडलं जातं, जे सासूसुनेपेक्षा आईमुलीसारखं होतं. सासूला दुसरं विश्वच नसतं, ती सुनेत अडकलेली असते. त्यामुळे सुनेचं प्रियकरापासून गर्भार राहणं सुद्धा आधी मान्य करत नाही. आपलेच नातवंडं समजून ती तिची काळजी घेते.

हिचं नवऱ्यावर मुळीच प्रेम नसतं, त्यानेही तिच्याशी फक्त शारीरिक सुखापुरतीच जवळीक केलेली असते. तिला त्या नात्याची घृणा असते पण सेवाभाव मात्र प्रामाणिक असतो. ते फार, फार सुंदर आहे. दोन वेगवेगळ्या भावना, एकाच व्यक्तीसाठी. नवरा खंगून- खंगून मरतो. तेव्हाही दोघीच बोटीत घालून घेऊन जातात. दोघींना एकमेकांशिवाय कुणीच नाही. पण दोघीही एकमेकींशी खोटं बोलल्या आहेत, त्याबद्दल खंत आहे. स्वार्थ आहे, पर्याय नाही. ह्या सगळ्यात त्या दोघींचा एकमेकींवर जीव आहे. मधे तो मुलगा जिवंत नाही, तरी हे नाते नेहमीच स्वतंत्र होते व तसेच वाढत होते.

नवऱ्याच्या फ्युनरलच्या दिवशी तिला प्रियकरासोबत निघून जायचे आहे व आपापला संसार थाटायचा आहे हे लक्षात येऊन सासू फ्युनरल पुढे ढकलते. त्यामुळे तरी तिचा विचार बदलेल व बाळासहित ती माझ्या घरी राहील या विचाराने. मग आपण ते बाळ आपल्या मुलाचेच आहे असे सांगू आणि आपल्या कुटुंबाची नाचक्की होणार नाही या हिशेबाने. पण हे असले सगळे स्वार्थ गळून पडत जातात, निर्व्याज नातं तयार होतं. प्रियकर मला लूजरच वाटत होता, शेवटी एकदम "दुसऱ्यासोबत झोपून येऊनही मी तुला पुन्हा स्विकारलेच की नाही" असं म्हणाला आणि ते नाते तेथेच संपले. सासू जसं तिला आपली लेक समजते, तसं कुणीही नाही असे तिच्या लक्षात येते. अतिशय सुंदर, साधी पण भावभावनांचे सूक्ष्म कंगोरे मांडणारी कथा आहे. पूर्ण वेळ तिच्या नवऱ्याचे प्रेत घरात असणं आणि केरलीयन फ्युनरल, गाणी, पद्धत एवढी तपशीलवार याआधी पाहिली नव्हती. अंत्यसंस्कार झाल्यावरच दुरावा संपून सत्य स्विकारून आयुष्य खऱ्या अर्थाने पुढे जाते. खूपच वेगळा चित्रपट आहे. सहन होत असेल तर पाहा.

ऋ आणि ए ले दहा वेळा कॉपी पेस्ट न करता 'ऊळ्ळोळ्ळुक' लिहून दाखवा बरं. Happy तोवर मी 'हक' वर लिहिते, खूप दिवसांनी आले की मला राक्षसासारखे होते.

हुमा कुरेशी आवडते मला, सिंगल सलमा मध्ये तिला वयाला साजेशी भूमिका आहे. पहिला अर्धा तास आवडलाही, पण मग लंडन मध्ये कैच्याकै सूरू झाले. हेच कथाबीज वेगळ्या वळणाने नेता आले असते.

अय्यया करू मैं क्या ऊळ्ळोळ्ळुकू
कवितेत म्हटले की सोपे पडते.. पण राहू दे..
शुभ रात्री

हक - यामी आणि इमरान हाश्मी. खूप आवडला. माझ्या अपेक्षेपेक्षा खूपच चांगला, एंगेजिंग आणि सुस्पष्ट वाटला. दोघांची कामेही उत्तम आहेत. पण यामीचे खूप आवडले. फक्त यामीपेक्षा सुंदर म्हणून जी दुसरी बायको आणली आहे ती सर्वसाधारण आहे. पण नवऱ्याचे आधीपासूनच तिच्यावर प्रेम असतं असं आलं आहे.

मला काही शाहबानो केसची सखोल माहिती नव्हती व करूनही घेण्यात इंटरेस्ट नव्हता पण प्रत्यक्षात शाझीया बानो मला फार, फार आवडली. खूप साधी, स्वतः कुराण वाचणारी, अल्लाहला मानणारी, तरीही चिवट, तत्वनिष्ठ व स्वतःचा विवेक असणारी एक स्त्री, मुलगी व आई आहे. नवऱ्याच्या प्रेमापोटी ती त्याचं दुसरं लग्न सहन करते, बेगम असून हळूहळू मिळणारी दुय्यम वागणूक सुद्धा सहन करते. पण पोटगी हा आपला हक्क आहे हे तिला व्यवस्थित कळतं. अपमानित होण्यापेक्षा ती सातत्याने दुसरे पर्याय शोधते. नेमक्या आणि योग्य कायदेशीर पद्धतीने हक्क मिळावा यासाठी लढते. शरियत हा कायदा आणि इंडियन लॉ दोन्ही मधला फरक - जो नेमका मुस्लिम स्त्रियांना हक्कापासून वंचित ठेवतो त्याला कुराण मधे अजिबातच आधार नाही. इंडियन सुप्रीम कोर्टात कुराणला सर्वश्रेष्ठ मानत असतात, पण ते सिद्ध व स्पष्ट, त्याबद्दल जागरूकता निर्माण करायला आयुष्य खर्ची पडते.
घटस्फोटानंतर वडीलांनी मुलांची जबाबदारी उचलणे किती साहजिक गोष्ट आहे. तिच्या मुलांचा हक्क खरेतर पण यात किती वर्षे जातात, समाजातून बहिष्कृत केले जाते, अपमान होतो, दंगली माजतात तरीही ती मागे हटली नाही. म्हणून मला ती फार आवडली. शूर वाटली! आयुष्यभर फरफट झाली तरी तिने धीर सोडला नाही व विवेकही, मला हल्ली अशाच स्त्रिया आदर्श वाटतात. सत्यघटनेवर आधारित किंवा प्रेरित असेल पण मी फार शहानिशा न करता चित्रपट पाहिला, आवडला व हे लिहिले.

Lol

इमरान हाश्मीला "वाया" घालवलेले सिनेमे काय बघायचे ?
भिंतीवर पहिल्या अंकात बंदूक असली कि तिसर्‍या अंकात ठ्ठो झालाच पाहीजे या संस्कारात वाढलेल्यांना सिनेमात इम्रान हाश्मी आहे म्हटल्यावर..

सिंगल सलमा मधे ती सगळ्या घराचा भार उचलते असाच एक जुना कुठला तरी पिक्चर आहे. लहान असताना टिव्हीवर आला होता. त्यामुळं नीट आठवत नाही. ती बहीणींची , भावांची लग्नं करते आणि त्यात आयुष्य निघून जातं. शेवटी ती एकटीच राहते. तपस्या नाव होतं का ? ऐश्वर्या रायचा पण असा एक पिक्चर आहे बहुतेक. त्यात जॉनी लिव्हर आहे.

इम्रान हाश्मीला "वाया" - किती वेळा त्याने "किसावे" म्हणून कधीतरी त्याला कुटावे - हा बदल चांगला आहे. तो "सिरियल किसर" आहे पण त्याचे किस इंटीमेट न वाटता डायनासोर माणसाला खाताना जसा दिसतो तसे वाटतात.

त्याचे किस इंटीमेट न वाटता डायनासोर माणसाला खाताना जसा दिसतो तसे वाटतात. >>> Lol

ऊळ्ळोळ्ळुक (कॉपी पेस्ट केले आहे नाव) बद्दल - खूपच सॅड पिक्चर वाटतोय. तू लिहीलेले वर्णन आवडले. "तिला त्या नात्याची घृणा असते पण सेवाभाव मात्र प्रामाणिक असतो. ते फार, फार सुंदर आहे" अशी सूक्ष्म निरीक्षणे तुझ्या लेखनात हमखास असतात, ती ही आवडतात.

'हक' मी पाहायला सुरूवात केली होती पण मला एंगेजिंग वाटला नाही. शाहबानो केसबद्दल खूप वाचले आहे, तरीही अगदी पूर्ण बघावा असे काही वाटले नाही. पण उत्तरार्धात जास्त ग्रिपिंग होत जातो असेही ऐकले.

फक्त यामीपेक्षा सुंदर म्हणून जी दुसरी बायको आणली आहे ती सर्वसाधारण आहे >>> Duh! Wink

रॉय, ऊळ्ळोळ्ळुक पाहून पहा. मला येऊन सांगा आणि खटकले तर नावंही ठेवा म्हणजे मला वेगळा पर्स्पेक्टिव्ह मिळेल. Happy You are a hard to please audience, which is fun to read!

फा, यामीसाठी तरी पूर्ण कर. क्रशला वाऱ्यावर सोडून दिले की पाप लागते असे कुठेही वाचले नाही, सरळ लिहिलेच. Wink

उत्कृष्ट वगैरे नाही 'हक'. नेटफ्लिक्सवरचा आहे शेवटी. पण अशा बॅडॲस बायकांच्या गोष्टी आवडतात, नाही तर मला कसे कळाले असते. प्रत्येक रंगाच्या, धर्माच्या, जातीच्या, रंगाच्या स्त्रीचा संघर्ष वेगळा असतो तो मला कळावा म्हणून मी तो 'सॉंग्स ऑफ पॅराडाईज' सुद्धा आवर्जून पाहिला. अशा किती unsung हिरकण्या होऊन गेल्यात हे सतत शोधणं माझा छंद आहे. त्यामुळे सिनेमा सखोल नसला तरी मला शाझिया मुळे आवडला.

हक आवडला ! कुठेही आक्रस्ताळेपणा दाखवलेला नाही, ...खरतर कॉन्ट्रोव्हर्सी झालेला विषय असुन अगदी निट हाताळला आहे.
फक्त यामीपेक्षा सुंदर म्हणून जी दुसरी बायको आणली आहे ती सर्वसाधारण आहे >>> +१

त्याचे किस इंटीमेट न वाटता डायनासोर माणसाला खाताना जसा दिसतो तसे वाटतात. >>>> त्या वेळच्या प्रेक्षकांना इमरान हाश्मीच्या पिक्चरमधे "किस" आहे हे जेव्हढं थ्रिलिंग वाटतं तेव्हढं आजच्या "सर्वार्थाने पुढे" गेलेल्या प्रेक्षकाला अजिबात वाटणार नाही. तो प्रेक्षक अजून तिथंच आहे. Lol

हक मी सुरू केला होता, पण बायकोने तो पूर्ण पाहिला आणि नवरा जातीला नावंही ठेवली. दुसर्‍या रूममधे बसून पण " मी काय केलं ?" हा प्रश्न सतत पडत राहिला. असा गिल्ट देणारा पिक्चर बघण्यापेक्षा मग इम्रान हाश्मीचीच तस्करी पाहिली. बरेच इन्पुट्स मिळाले. हा धंदा सुरू करता येईल एव्हढा कॉन्फिडन्स आला. उगीच "दिल का हिरा" बघून धाडस केलं असतं तर पकडला गेलो असतो.

अशी ही बनवा बनवी पाहिला.
चांगली कामं झाली आहेत सर्वांची
पुण्यात अजिबात ट्रॅफिक नाहीये
रिक्षा वाला लगेच पाषाण रोड वर घेऊन जातो हे जरा वेगळं वाटलं
पार्वती वर चित्रित झालेले कुणीतरी येणार येणार गं गाणं छान आहे नक्की पहा
.
तू नळी वर उपलब्ध आहे.
अगदीच फ्रेश वाटला चित्रपट
खासकरून कलाकार कथा आणि संवाद आवडले

अशी ही बनवा बनवी पाहिला.
>>>>
आधी वाटले हा नवीन आला आहे का कुठला?
पण नंतर समजले तू तर जुनाच आजवर पाहिला नव्हता Happy

निवेदिता जोशी सराफ ( हे गाडगीळ सराफ प्रमाणे नाही ) यांनी लोकमत सखीला दिलेली मुलाखत ऐकली. (तीच ती लाडात येणारी मुलाखतकार). त्यांनी सांगितले कि अशोक सराफला प्रश्न विचारला होता कि "तुमची सर्वात आवडती अभिनेत्री कोण ?" या प्रश्नावर त्यांनी उत्तर दिले होते "सचिन पिळगावकर".

खरं तर अशोक सराफने धूर्तपणे कुठल्याही फिमेल अ‍ॅक्ट्रेसचे नाव टाळले हे त्यांच्या लक्षात आले नाही. नवरा असा बेरकी असला तरच संसार सुखाचा होतो.

पण नंतर समजले तू तर जुनाच आजवर पाहिला नव्हता>> हे प्रॅक्टिकळी शक्य तरी आहे का Lol
मी तसे लिहिले कारण नवीन चित्रपट अशात पाहिला नाही कुठला
तेच परत परत बघते जुने.
.

इथे ज्या पिक्चरची चर्चा होते ते पडलेले आणि बोरिंग पिक्चर असतात. गाजलेल्या चित्रपटांसाठी रुणम्या वेगळा धागा काढतो आणि त्यांची चर्चा त्या त्या धाग्यावर होते.

(Ullozhukku - undercurrent) .....मी खूप आधी पहिला होता हा मुव्ही पार्वती साठी...ताकदीची ऍक्ट्रेस आहे ती...छान आहे मुव्ही...सतत पाऊस आणि पूर आहे मुव्ही मधे.

@अस्मिता ऊळ्ळोळ्ळुक बद्दल छान लिहिलंय एखादी कादंबरी वाचावी अशी कथा डोळ्या समोर आली .मला असे पिच्चर आवडतात. मी पण बघेन.
बरेच साऊथ इंडियन चित्रपट पाहिलेत, पण लिहायचं कुठे... मृणाल यांचा एक धागा आहे साऊथ च्या पिच्चरांचा जो माझा फेवरेट आहे. आणखी एक रुन्मेष यांचा सेम धागा आहे, डब साऊथ पिच्चरांचा , तिथे, की इथेच लिहायचं??

गॉड्स क्रुकेड लाईन्स हा स्पॅनिश चित्रपट पाहिला. (नेफ्लि)

एकदम एंगेजिंग् आहे. मधला पार्ट नंतर परत आला तेव्हा कळेनाच की आधीचाच भाग परत चुकुन दाखवताहेत की भुतकाळातले प्रसंग परत वर्तमानात तसेच घडताहेत. Happy

कॉरोनर जेव्हा मी बदली म्हणुन आले म्हणते तेव्हा हिंदी चित्रपट नियमाप्रमाणे डोक्यात घंटी वाजली पण त्याचे पुढे काही दाखवले नाही तेव्हा आश्चर्य वाटलेही. अर्थात पुढे कळतेच काय ते.

एकदा पाहण्यासारखा आहे. पण लहान मुले आजुबाजुला वावरत असताना बघणे योग्य होणार नाही असे मला वाटले. मुलांचा हिंसा वगैरे पाहण्याचा बार किती खाली आलाय याबद्दल कल्पना नाही म्हणुन आगाऊ सुचना Happy

चित्रपट संपल्यावर मला जो शेवट वाटला तो तसाच आहे का हे नेटवर चेक केले. तसाच आहे वाचल्यावर थोडे आश्चर्य वाटले.

स्पॉइलर………
गुन्हा करायला उद्युक्त होईल अशीच परिस्थिती असताना नायिका गुन्हा करते. तो मानसिक आजार मानुन तिला ठार वेड्यांच्याच हॉस्पिटलात ठेवतात. त्यासाठी जे करावे लागते ते पैसे दाबुन केले जाते हा संबंधितांचा स्वार्थीपणा. कारण उघड झाल्यावर तिला मानसिक रुग्ण का ठरवले कळले नाही. हुशार, विचारी असलेली नायिका परिस्थिती व लोक ओळखुन त्याचा स्वहितासाठी वापर करण्याची चलाखी दाखवते, त्यासाठी सफाईदार खोटे बोलते त्याला मानसिक विकार कसे ठरवता येईल हा प्रश्न मनात आला. उद्या खोटे बोलणारे, गॉसिप करणारे, स्वतःबद्दल जरा जास्त चढवुन सांगण्याची सवय असणारेही मानसिक रुग्ण ठरतील. कदाचित मानसिक रोगाच्या स्पेक्ट्रमवर त्यांची गणना सुरवातीलाच कुठेतरी होईलही. पण भयंकर वेड्यांच्या इस्पितळात भरती करावे लागतील इतक्या टोकाच्या स्पेक्ट्रमवर तर अशांना बसवता येत नाही ना.

एनी वेज, कोणाला रस व वेळ असेल तर पाहा व सांगा तुम्हाला काय वाटले.

Happy धन्यवाद सिमरन. येथेच लिही माझ्यासारखे, खरेतर मृ चा धागा आहे पण माझ्या लक्षात आले नाही. मला इथेच बरं वाटतं कारण जास्त लोकांपर्यंत पोचतं.

अश्विनी - हो, तुंबाड व दिठी नंतर एवढा संततधार पाऊस यातच पाहिला. पावसाचा मोठा रोल आहे सिनेमात. अगदी त्यातल्या सारखाच. पार्वतीसाठी अनुमोदन!

Pages