खाऊगल्ली - आजचा मेनू - (७)

Submitted by ऋन्मेऽऽष on 27 December, 2025 - 13:13
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

फक्त आणि फक्त एक तोपासूफोटो
आणि तो कसा अपलोड करावा हे इथे बघू शकता.
https://www.maayboli.com/node/1556

क्रमवार पाककृती: 

आधीची खाऊगल्ली इथे भरायची
https://www.maayboli.com/node/82415
तिची डबल हजारी भरली म्हणून हा नवीन धागा.

तो धागा ख्रिस्तमस्तच्या मस्त माहोल मध्ये संपला
इथे थर्टी फर्स्ट माहोलने सुरुवात करूया Happy

पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@ जुई ते तिरुपती फेम लाडू घरच्या घरी ! जय हो.

मलाही फार आवडायचे. पण मग ते animal fat युक्त / adulterated तूप वापरल्याचे प्रकरण झाले आणि इच्छा मेली. (Nothing against animal fat पण देवाचा प्रसाद म्हणून जो विश्वास, जी शुचिता अपेक्षित असते तिला तडे गेले)

@ सिमरन, तुम्ही मागच्या खाऊगल्ली धाग्यात चैन्नैच्या कृष्णा स्वीट्स मधून आणलेल्या मिठाईचे फोटो डकवले होते. त्यांच्याकडे तिरुपती फेम लाडू आकार, रंगरूप, चव हुबेहूब असलेले मिळतात. चैन्ने विमानतळावर दोन दोन काउंटर आहेत कृष्णाचे, दोन्ही गर्दीने ओसंडून वाहत असतात नेहेमी. चांस गावला तर सोडू नका. 😀

चैन्ने ला जाण्याचा चान्स मिळाला तर सोडणार नाहीच पण आत्ता चेक केलं तर ऑनलाइन ही मिळत आहेत सेम तिरुपती सारखे कापूर घातलेले लाडू .थँक्स अनिंद्य 😀
हे ते लाडू साईटवरून मागवू शकता कोणाला हवे असल्यास.
IMG_20260102_221315.jpghttps://srikrishnasweets.com/search?q=laddu

वा सिमरन, झटपट Action ! 👍

रच्याकने, हे कृष्णावाले लै भारी फ्यामिली.

त्यांचे मूळ प्रवर्तक महादेव अय्यर. त्यांना कोयंबतूर+ चैन्नैकरांनी स्वयंस्फूर्तीनी “अमुधासेम्मई” अशी पदवी दिली आहे. Amudha Semmai म्हणजे अमृतदाता / उत्तम प्रतिचे अमृतघट पाशी असलेला / अश्विनीकुमार.

ह्यांचे पिताश्री कोयंबतूरच्या एका देवालयात दैनंदिन+ उत्सवाचा नैवेद्य तयार करत, मुलाने पाककलेचा गुण उचलला, commercialise केला आणि आधी स्वत:च्या शहरात आणि पुढे scale up करत चैन्नैत मोठमोठी मिठाईची दुकाने थाटली. First man to establish swanky air conditioned mithai parlours in /across Tamil Nadu.

महादेवअन्नांच्या मुलाला भेटलोय मी एकदा, वासुदेवन की गोविंदन अय्यर नाव होते त्यांचे. तेही बल्लवाचार्यच आहेत.

जुई आणि सिमरन, तुमच्या पोस्टस् मुळे काय काय आठवले. 🙈

अनिंद्य धन्यवाद
सिमरन मी कधी तिरुपती ला गेले नाहीये अजून पण मित्रमंडळी गेली की आवर्जून प्रसादाचा लाडू आणायला सांगायची.. घरी बनवून पहायचं खूप दिवसापासून मनात होतं..
वेबसाईट वरून कधी मागवलेत तर सेमच चव लागते का सांगा Happy

इथे तिरुपती लाडवांची चर्चा आणि आज लेकीच्या मैत्रीणीच्या आईने गणपतीपुळे लाडू दिले प्रसादाचे. खाताना इथलीच चर्चा आठवली.
दादरला शाळा कॉलेज असताना मी सिद्धीविनायकला फक्त लाडू खायला जायचो Happy

होम मेड क्रीम चीझ ब्रुशेटा म्हणून साज यांनी जो फोटो टाकलाय तो सुंदर, टेम्टिंग आहे पण…..

पण,… Bruschetta म्हणून मी आजवर खाल्लेल्या जिन्नसाशी काही match होत नाही आहे.

Am I missing something here?

वेबसाईट वरून कधी मागवलेत तर सेमच चव लागते का सांगा Happy>>हो नक्की .
अनिंद्य ,महादेव अय्यर यांची स्टोरी inspairing आहे.

ब्रुशेटा मस्त दिसतंय, टेम्टिंग ,खालची प्लेट पण छान आहे.मी कधी खाल्लं नाहीये ब्रुशेटा पण हे ब्रेड बरोबर खायचं का असंच,आणि ते लाल चेरी टोमॅटो आहेत ना ?

उचला पटापट ,नाम बतानेकीं जरूरत नहीं फोटोही काफी है. Happy 😋
IMG_20260103_215034.jpg

पण,… Bruschetta म्हणून मी आजवर खाल्लेल्या जिन्नसाशी काही mach होत नाही आहे.
>>>>
मला देखील अगदी असेच झाले. पण माझे या बाबतीत एकूणच ज्ञान तोकडे असल्याने बॉल इतर प्रतिसादकर्त्यांच्या कोर्टात पास केला Happy

नाम बतानेकीं जरूरत नहीं फोटोही काफी है. Happy
>>>
अफलातून Happy
मागे मी एकदा गल्लीत फोटो टाकलेला याचा तेव्हा बरीच चर्चा झाल्याचे आठवतेय.. आवडीची मिठाई Happy

गार्लीक ब्रेड चा फोटो नाही टाकला… फक्त क्रीम चीज चा टाकला फोटो… ते क्रीम त्यावर लावून खातात….
@ सिमरन , हो चेरी टोमॅटोज आहेत.

थँक्स साज, चीज वालं काहीही भारीच लागतं ..चीज अत्यंत आवडतं Happy
बरीच चर्चा झाल्याचे आठवतेय.. आवडीची मिठाई Happy>>म्हणूनच म्हटलं फोटोहि काफी है.माझ्याही आवडीची मिठाई आहे Happy

वीमिका, कटलेट छान दिसत आहेत.

बारीक नूडल्सच्या कोटिंग मुळे टेक्स्चर + रेग्युलर ketchup ऐवजी लालेलाल चटणी (शेजवान चिली? ) मुळे चव- रंगत अजून वाढली असेल.

🤤

surprisingly, कढ़ी पकोडा मात्र एकदम सात्विक दिसत आहेत.

हो, शेजवान चटणी आणि नूडल्समुळे चव छानच आली.

surprisingly, कढ़ी पकोडा मात्र एकदम सात्विक दिसत आहेत. >> आम्ही नेहमी यात कांद्याची भजी/पकोडे टाकतो. यावेळी साधे ओवा घातलेले सॉफ्ट पकोडे टाकले. भारीच लागले.

वाह
देव मला पुढचे सात जन्म कोकणात देवो

मी डाळ बाटी फॅन नाहीये, चीज गार्लिक ब्रेड मस्त तो घेते.
IMG_20260105_000021.jpg

आज टॅरो नावाचे मूळ उकडुन, किंचित तूपावर मीठ-मिरी टाकुन रोस्ट केले (परतले). काय मस्त लागते. पिष्टमय पदार्थ असल्याने, बटाट्यासारखे पिठुळ आहे. पण डेन्स इन न्युट्रिशन. खूप क्षार, उत्तम पिष्टमयता (गुड कार्ब्स) व भरपूर तंतू/चोथा (फायबर) आहे.
.

.
यालाच आपण अरबी म्हणतो का?

…. हो, शेजवान चटणी..
… साधे ओवा घातलेले सॉफ्ट पकोडे टाकले…

Perfect. Both my guesses were bang on ❗

उत्तरेत देवधर्माचा - गावजेवणाचा -भंडारा वगैरेचा स्वयंपाक असेल तर डिट्टो असेच ओवा घातलेले पकोडे टाकून कढी करतात. सात्विक, नो कांदा-लसूण

@ धनश्री,

तुमचे टॅरो अरवी / अरबी सारखेच दिसत आहेत. साल काढतांना चिकट / किंचित खाजरे होते का ?

उत्तरेत देवधर्माचा - गावजेवणाचा -भंडारा वगैरेचा स्वयंपाक असेल तर डिट्टो असेच ओवा घातलेले पकोडे टाकून कढी करतात. सात्विक, नो कांदा-लसूण >> हो, सणावाराला बऱ्याचदा अशीच कढी असते.

पुरी made by परी Happy
पीठ मळण्यापासून तेलात तळण्यापर्यंत सर्व काही..
आणि टेस्ट अशी की फडशा पडला Happy

IMG-20260103-WA0004.jpg

Pages