खाऊगल्ली - आजचा मेनू - (७)

Submitted by ऋन्मेऽऽष on 27 December, 2025 - 13:13
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

फक्त आणि फक्त एक तोपासूफोटो
आणि तो कसा अपलोड करावा हे इथे बघू शकता.
https://www.maayboli.com/node/1556

क्रमवार पाककृती: 

आधीची खाऊगल्ली इथे भरायची
https://www.maayboli.com/node/82415
तिची डबल हजारी भरली म्हणून हा नवीन धागा.

तो धागा ख्रिस्तमस्तच्या मस्त माहोल मध्ये संपला
इथे थर्टी फर्स्ट माहोलने सुरुवात करूया Happy

पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धनश्री - मायबोली वरील या रेसीपी ne मी नेहमीच आंब्याचा रवा केक करते. - https://www.maayboli.com/node/2663
नेहमीच छान होतो.
याच्याच variation ne मी साधा रवा केक, pineapple cake ही करते.

मस्त दिसतय ताट जुई.. आमची भोगी आम्ही रविवारीच केली. सण कायम शनिवार रविवारी साजरे करतो. असो.
संक्रांतीसाठी तिळाच्या वड्या.
20260112_215044~2_0.jpg

अरे वाह वड्या आणि भोगी मस्त!
आमच्याकडे सुद्धा दरवर्षी प्रमाणे सासूबाईंकडून भाजी भाकरी आणि गुळाचा खडा आला आहे. आज तेच जेवण असेल.

जुई कसला भारी तोपासू फोटो आलाय, जितका सुंदर पदार्थ आहे तितका सुंदर आणि क्लिअर फोटो काढलाय मस्तच .फोटोतूनच उचलावीशी वाटते वडी.
बाकी सगळ्यांच्या तिळाच्या वड्या पण मस्त.
किल्लीचा शिरा पण मस्त अगदी कडाह प्रशाद सारखा दिसतोय.

किल्लीचा शिरा कडाह प्रशाद सारखा दिसतोय….. ✔

त्याला अनानसाचा शेप कसा दिला ? पेस्ट्री/ केक मोल्ड ?

सुरळीच्या वड्या = 👌

एक बोल आहे घरी प्लास्टिक चा
कप सेट मध्ये आलेला
त्याचा अननसाचा आकार आहे
तिळगुळ, सुरळी वड्या छान सर्वांचे पदार्थ yummy असतात इकडे
माझा आवडता धागा आहे

संक्रांतीचा मराठमोळा तिळगूळ खाऊन झाल्यावर लंच मात्र थमिल थलैवा स्टाइल.

0004ae6e-7760-47fd-9712-c8b7b4c85df4.jpeg

तमिळजनांचा पोंगल असल्याने उसाचे कांडे, आल्याचे पन्हे, केळीचे वेफर्स, अडै वडे,, लापशी, पायस, दहीभात, तंजावुर स्टाइल सांबर, रसम रैस असा जामानिमा.

मलबारी पराठा ऑन स्पेशल रिक्वेस्ट.

इनिया पोंगल नलवाळथुक्कला (चूभूदेघे 😀 )

वॉव मस्त.
दक्षिणेकडची थाळी मला नेहमीच छान वाटते. कम्फर्ट फूडच्या जवळ जाते.

या तोंड गोड करा
आमचा उमेदवार जिंकला>>> वा वा! रसमलई कुठेय??smiley2.gif

पुरणपोळी ऑटाफे

दक्षिणेकडची थाळी आवडते….कम्फर्ट फूड..

आणि मला ती नाविन्यामुळे आवडते कारण यातले पदार्थ माझ्याकडे फार rarely होतात.

थाळीतल्या १५-१६ पैकी फक्त २ पदार्थात खोबरे होते हे सर्वात मोठे blessing 😀

La Soupe Parisienne - सिझनल भाज्या व कंद घालून बनवलेले एक पौष्टिक फ्रेंच सूप Happy

वाह मस्त दिसतेय >>> थॅंक्स
फ्रेंच सूप बिप काही नाही रे, साधं मालवणी खतखतं आहे ते, पण 'खतखते' नाव ऐकून लोक नाक मुरडतात.
(साला मराठी पदार्थांची खतखते, फदफदे, भुजणे, असली नावं बदलून जरा बरी नावं ठेवली पाहिजेत)

Pages