खाऊगल्ली - आजचा मेनू - (७)

Submitted by ऋन्मेऽऽष on 27 December, 2025 - 13:13
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

फक्त आणि फक्त एक तोपासूफोटो
आणि तो कसा अपलोड करावा हे इथे बघू शकता.
https://www.maayboli.com/node/1556

क्रमवार पाककृती: 

आधीची खाऊगल्ली इथे भरायची
https://www.maayboli.com/node/82415
तिची डबल हजारी भरली म्हणून हा नवीन धागा.

तो धागा ख्रिस्तमस्तच्या मस्त माहोल मध्ये संपला
इथे थर्टी फर्स्ट माहोलने सुरुवात करूया Happy

पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो मीच
आमच्याकडे आईच्या हातचे चॉकलेट
पिझ्झा बर्गर डोसा धिरडे वगैरे प्रसिद्ध आहेत.
.
एकदा शिस्तीत भाकरी, शिरा वगैरे करत होते तेव्हा तुला हे येतं?
असं विचारलं गेलं होतं

परीचे खूप खूप कौतुक. किती मस्त फुगल्या आहेत पुऱ्या.

आजचे बेकिंग -सावर्डो सँडविच ब्रेड. पहिली ऑर्डर आहे. याआधी घरच्यासाठी, मित्र मैत्रिणींना भेट द्यायला बरेचका बनवून झालेत वेगवेगळे सावर्डो ब्रेड. पण ऑर्डर नव्हती कधी घेतली. कॉलनीतल्या एका शेजारणीने ऑर्डर दिली होती. तिच्यासाठी बनवला आहे.
IMG-20260106-WA0004.jpg

परी पुरी कौतुकाबद्दल धन्यवाद Happy
सर्वच पुऱ्या फुगल्या नव्हत्या. फोटोला फुगलेल्या घेतल्या. पण ज्या कडक झाल्या होत्या त्या खायला जास्त मजा आली. त्यांना जास्त डिमांड होती. कारण आम्ही नुसतेच पुऱ्या खात होतो.

परीने केलेल्या पुऱ्या छान.
किल्ली, चॉकलेट मस्तच.
सिमरन, फालुदा मस्तच. तुमच्याकडे फालुदा वरचेवर होतो असे दिसतेय.

ऋतुराज , हो होतो खरा पण काल चुलत बहिणीचा बड्डे होता म्हणून केला होता. तसंही" फालुदा तो बहाना है हमको आईस्क्रीम खाना है". Happy माझं ऑफ शुगर बाकी कशा पेक्षा नाही तर आईस्क्रीम मुळेच जास्त मोडतं.

@ ऋन्मेष,

Bruschetta @ Pizza by the Bay ? वा !

मरीन ड्राइवचे Pizza By the Bay माझेही फेव. दक्षिण मुंबई, समुद्राचा व्ह्यू, हिप क्राउड, fresh food, decent-unhurried service सर्वच पॉइंट्सवर पसंती. तिथले chickpea किंवा edamame फलाफल अप्पुन की जान है. 🤤

Funnily, त्या बिल्डिंगचे नाव “सूना महल” आहे पण तिथे नेहेमी भरपूर गर्दी असते 😀

आमच्या Courtship days पासून आम्हां पतिपत्नीचे आवडते रेस्तरां आता पुढच्या पिढीलाही तेव्हढेच आवडते हे विशेष.

@ अल्पना - सावर्डो ब्रेड झकास 👍

@ किल्ली - घरी चॉकलेटस् ? लय भारी. 👌

@ सिमरन - मोदक/ फालूद्याशी सख्य नाही. हमको आईस्क्रीम खाना है… हे मात्र तंतोतंत. तुफान थंडी असली, बाहेर बर्फ पडत असला तरी आईसक्रीम खातो मी. 😀

बाहेर बर्फ पडत असला तरी आईसक्रीम खातो मी. 😀 >>मी पण , उलट थंडी बर्फातच आईस्क्रीम खायचं असतं लवकर वितळत नाही आणि जास्त मजा येते. 😀

>>>>> उलट थंडी बर्फातच आईस्क्रीम खायचं असतं लवकर वितळत नाही
व्हॉट्ट??? आईस क्रीम मी किंचित मावे करते म्हणजे एका विशिष्ठ कन्सिस्टन्सीचे होते व कम्फर्ट फुड सारखे गपागप जाते.

धनश्री,गपागप खाल्लं की वजनही गपागप वाढतं माझं ,म्हणजे जास्त खाल्लं जातं आईस्क्रीम,त्यापेक्षा बर्फात बरं एका स्कुप मध्ये भागतं आणि जास्त वेळ मजा.
हे असं मावेमध्ये गरम करून कम्फर्ट खाल्लं मी तर फॅमिली पॅकही सहज गट्टम होतो

@ अनिंद्य, त्या रेस्टॉरंटचा स्पॉटच डेंजर आहे. त्यात पावसाळी संध्याकाळ असेल तर रूप अजून खुलते. तिथे आत जाऊन बसावे आणि तिथून बाहेर बघावे असा मोह होत पावले आपोआप तिथे वळतात Happy

>>>>>>हे असं मावेमध्ये गरम करून कम्फर्ट खाल्लं मी तर फॅमिली पॅकही सहज गट्टम होतो
Wink तोच तर हेतू आहे. मग नव्या वर्षाच्या धाग्यावर येउन, वजन कमी करयचा संकल्प करता येतो Happy

मोरोबा लिहीतत कमी पण जेव्हा लिहीतात ...
काळरात्र होता होता उषःकाल झाला ... तुमचच होतं ना मोरोबा. तेव्हापासून मी लक्षात ठेवलय Happy

… मी सगळेच उचलले …

😀

असे होम मेड छोटे बटाटावडे फेव. फक्त शिळी बटाटा भाजी संपवण्यासाठी केलेले नको.

अर्र्रर्र !!! वडे फस्त झाले का? मी होममेड पाव आणले होते..
सुट्टित लेकिने हेब्बारची रेसिपी दुप्पट प्रमाणात करुन २४ पाव केले घरी(एकाच ट्रेचा फोटो आहे हा)...मग पाव भाजी, वडा पाव, दाबेली सगळ केल.
4efa82ae-568b-4bac-81f2-e90ca3087456.jpeg

मॅन्गो मुस केक...एका मिनि माबो/मैत्रीण मैफिल साठी एका माबोकर मैत्रीणीने आणला होता...इथे पोर्टोज म्हणून फार प्रसिद्ध बेकरी तिथल सगळच छान असत पण हा केक स्पेशालिटी आहे ..एकदम मेल्ट इन माउथ असतो.
6dfd09af-f409-49e5-ae4e-77db4174d5e4.jpeg

वाह!! केक फोटोतच मेल्ट होईल असे वाटत आहे. मला ते पाव जास्त मेल्टिंग आय मीन टेम्पटिंग वाटले. याची दाबेली सुद्धा किती छान लागली असेल. नाहीतर साधारण पाव खूप अन्याय करतात त्या पदार्थावर..

अनिंद्य @ शिळी बटाटा भाजी वडे +७८६ Proud मलाही जर समजले की भाजी संपवायचे वडे आहेत तर खायची इच्छाच जाते. त्यामुळे आमच्याकडेही आता भाजी संपवायला त्याचे पराठे केले जातात पण बटाटेवडे त्याच्या स्पेशल भाजीनेच.

वामिका, पुढच्यावेळी तुम्हाला दोन वडे विपु करतो गपचूप Happy पण तुमच्या आलू खस्ता ने आता मला ते खावेसे वाटू लागले त्याचे काय Happy जमल्यास या वीकेंडला मी त्याला झब्बू द्यायचा प्रयत्न करतो

आलू खस्ता (विथ अमचूर+सुंठ चटणी?) looks tempting. वामिका, तुमची शॉर्ट रेसिपी टंका प्लीज.

प्राजक्ता, दोन्ही फोटो झकास. होम मेड पाव चमचम शायनी झालेत, बलक/ अंडीयुक्त केलेत काय ?

मँगो मूस केक = 👌

व्हॉट इस आलू खस्ता? >> आशू, ॲक्च्युअली इट्स आलू खस्ता कचोरी. खस्ता म्हणजे कुरकुरीत. खस्ता मठरी, खस्ता कचोरी.. उत्तरेत नुसती कचोरी ही नेहमी सॉफ्ट असते.

अमचूर+सुंठ चटणी? >> येस्स अनिंद्य Happy
गव्हाच्या पिठात ओवा, मीठ, आणि बऱ्यापैकी मोहन घालून मिडीयम सॉफ्ट कणीक मळून सेट करायला ठेवायची. आणि सारण (उकडलेले बटाटे, हिरवी मिरची, आले, धणेजिरेपूड, लाल तिखट, आमचूर, गरम मसाला, हिंग, मीठ, कोथिंबीर) परतून घ्यायचं. पारी थोडीशी जाड ठेवायची. सारण भरून पारी बंद केली की हाताने हलकीशी चपटी करायची. मंद आचेवर बराच वेळ तळून घ्याव्यात.

वामिका, तुमच्या शॉर्ट रेसिपीसाठी थँक्यू.

… मंद आचेवर बराच वेळ तळून … खस्ता चे मर्म सांगितलेत ! 🙏

सारण बदलून भरपूर व्हरायटी करता येते यात.

~ आलू
~ आलू + प्याज
~ मोगर ( बिनसालाची मूग डाळ)
~ भाजके बेसन + हिरव्या मिरच्या - शेगाव स्टाइल
~ हिरवे मटार
~ कॉर्न

Possibilities are endless …

आता कुणी तरी बंगाली स्टाइल कोराईशुतीर कोचुरी करून फोटो दाखवा, मग सुडोमी.

Pages