खाऊगल्ली - आजचा मेनू - (७)

Submitted by ऋन्मेऽऽष on 27 December, 2025 - 13:13
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

फक्त आणि फक्त एक तोपासूफोटो
आणि तो कसा अपलोड करावा हे इथे बघू शकता.
https://www.maayboli.com/node/1556

क्रमवार पाककृती: 

आधीची खाऊगल्ली इथे भरायची
https://www.maayboli.com/node/82415
तिची डबल हजारी भरली म्हणून हा नवीन धागा.

तो धागा ख्रिस्तमस्तच्या मस्त माहोल मध्ये संपला
इथे थर्टी फर्स्ट माहोलने सुरुवात करूया Happy

पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>>>>>बिनसालाचे मूग
अरे रामा! त्या इवल्या इवल्या मूगांची साल कोण काढत बसणार Happy हां पाण्यात घातले की बरीच सालं वरती तरंगतात व काढून टाकता येता हे माहीत आहे पण फायबर कशाला टाकायचे म्हणुन मी उसळ पूर्ण सालासकट करते.

. होम मेड पाव चमचम शायनी झालेत, बलक/ अंडीयुक्त केलेत काय ?>> नाही गरम असताना वरुन बटर स्टीक फिरवली.
वामिकाच्या आलु खस्ता घरी केल्यात? मला वाटल विकतच्या आहेत...मस्त खुसखुशित दिसतायत.

वरुन बटर स्टीक फिरवली.…. 👍

… इवल्या इवल्या मूगांची साल कोण काढत बसणार …

त्याची गरज नसते. मुगाची डाळ सालासकट आणि बिनसालाची अशी दोन्ही मिळते विकत. पैकी बिनसालीच्या डाळीला हिंदीत/ उत्तर भारतात “मूंगमोगर” किंवा “मोगर” * म्हणतात आणि कचोरीच्या सारणात वापरतात. 🙂

* मराठीत काही specific नाव असावे, पण मला ते माहिती नाही.

हा धागा फारच आवडता आहे. सगळे फोटो मस्तच असतात.

ही अळीवाची खीर. मध्यंतरी लाडू केले होते त्यातले उरले होते थोडे , त्याची केली. अळीव निवडून अगदी थोड्या पाण्यात भिजत घातले अर्धा एक तास नंतर त्यात दूध घालून शिजवले मंद गॅसवर. छान फुगले की झाली तयार खीर. गार झाल्यावर गुळ घातला किसून कारण गरम मध्ये गुळ घातला तर दूध फाटू शकते. आणि साखर एवढी छान नाही लागत ह्यात. स्वादासाठी जायफळ आणि वर बदामाचे काप अशी शाही केली आहे.
20260110_121226.jpg

ह्या खीरीच जरी बाळंतिणीशी घनिष्ठ नातं असलं तरी पूर्वी खूप वेळा होत असे हिवाळ्यात. हल्ली जास्त नाही केली जात.

छान दिसतेय खीर
अळीव नाव मला माहीत होते का कल्पना नाही पण पदार्थ ओळखीचा वाटत आहे.

सगळेच पदार्थ एक से बढकर एक आहेत.

ममो, अळीवची खीर एक नंबर दिसत्येयं..!
मी हिवाळ्यात नेहमी सकाळच्या नाश्त्याला अळीव, रवा, मेथी अशी खीर करते. मला खूप आवडते हि पौष्टीक खीर..!
तुमच्या पद्धतीने फक्त अळीवची खीर बनवून बघते एक दोन - दिवसातच..! अळीवला हालीम सुद्धा म्हणतात.

येस हलीम.
मला हाच शब्द परिचित होता.

अनिंद्य अच्छा मी आख्क्या मूगाबद्दल बोलत होते. तुम्ही डाळीबद्दल.

बाळंतपणात अळीवाची खीर खाल्लीय ममो.

Spinach Omelette-
Special Ingredient - लसणाची पात

bc07377c-6467-4db1-a644-592ad06c9b97_0.jpeg

हा आईने पॅनमधे बनवलेला रवा केक. मध्ये जरा जास्तच खरपूस झालाय पण तेवढा वरचा पात्तळ लेअर काढून टाकला की झालं.

f096f7b9-c479-4e77-b4c9-219260615709.jpeg

खीर आवडली धन्यवाद सर्वांना.
कोथिंबीर वड्या आणि ऑमलेट छान दिसतय.
रव्याचा केक छान दिसतोय माझे मन. रव्याचा केक फार म्हणजे फार आवडतो. किंवा फक्त रव्याचाच आवडतो असं ही म्हणू शकतो. पूर्वी खूप करायचे बजाज चा गोल इलेक्ट्रिक ओव्हन होता त्यात. हल्ली नाही करत.


.
माझेमन तुझे पाहून आज मी कुकरमध्ये, रव्याचा केक केला. छान लागला पण शिर्‍यासारखाच वाटला मला. कदाचित रोस्टेड रवा नको होता का घ्यायला? मी तर केशरही टाकलेले. त्याची चव आली पण खूपच शिर्‍यासारखा लागला.
>>>>>> रव्याचा केक फार म्हणजे फार आवडतो. किंवा फक्त रव्याचाच आवडतो असं ही म्हणू शकतो.
हे वाचून तर माझ्या अपेक्षा (चवीच्या) फार उत्तुंग होउन बसलेल्या. माकाचु? Sad

धनश्री मस्त कलर आलाय केकला .मला शिर्यासारखी चवही आवडते. Happy पुढच्या वेळेस न भाजलेला रवा घे आणि व्हॅनिला इसेन्स टाकून बघ त्यानेच केकसारखी चव येते.
रवा केक खूप आवडतो एकदा कुकरमध्ये एकदा ट्राय करायचाय ओव्हन घेईपर्यंत.

आई साधा ( न भाजलेला रवा घेते) तिचं प्रमाण दीड कप रवा, १ कप दूध, १ कप दही, २ टीस्पून तूप किंवा unsalted बटर. हे मिक्स करून ती ५-६ तास मुरवत ठेवते. केक शिजवायला घेण्याच्या आधी १ टीस्पून खायचा सोडा घालून मिक्स करते. ती कुठलाही इसेन्स/फ्लेवर मिक्स करत नाही. नेहमी लाईट चॉकलेटी लेयर येतो.यावेळी नॉनस्टिक वापरले नाही तर रंग जरा पुढे गेलाय पण चवीत बदल नाही.

मला वाटत केशराच्या ऐवजी व्हॅनिला इसेन्स वापरला तर बरं.

माझे मन, माझं ही हेच प्रमाण आहे . फक्त साखर राहिली आहे.
आतला केक कोणत्याही क्वालिटी चा वरून फक्त अफाट क्रीम चोपडलेला केक एक घास ही खाऊ शकत नाही. हा रव्याचा फारच भारी लागतो.

हा रव्याचा फारच भारी लागतो. >> हो. आणि पटापट संपतो देखील.

आई साखर १ कप घेते. पण इथे आपापल्या चवीने थोडी कमीजास्त केली तरी चालेल.

मी पण दीड कप रव्याला एक कपच साखर. आणि रवा मात्र मी नेहमी बारीक घेत असे केक करताना.
मुलांच्या परीक्षा ज्या दिवशी संपतील त्या दिवशी शाळेतून आल्यावर खायला हा केक हे अनेक वर्ष फिक्स होतं.

>>>> ( न भाजलेला रवा घेते)
हां हे चुकले.
व्हॅनिला ऐवजी केशर चुकले
व मी फार वेळ नाही भिजवला - ते चुकले.

मुलांच्या परीक्षा ज्या दिवशी संपतील त्या दिवशी शाळेतून आल्यावर खायला हा केक हे अनेक वर्ष फिक्स होतं. > मस्त , केकची रेसिपी सांगाल का ???

<<< मुलांच्या परीक्षा ज्या दिवशी संपतील त्या दिवशी शाळेतून आल्यावर खायला हा केक
>>>>
पूर्वी हे भारी असायचे.
म्हणजे बरेच मध्यमवर्गीय घरात ओकेजननुसार काही पार्टी पदार्थ फिक्स असायचे. ज्यात बरेचदा पगार हेच एक ओकेजन असायचे Happy

@ रवा केक आमच्याकडे कधी घरी केला नाही. पण अय्यंगारचा बरेचदा आणला जातो.

>>>> ज्यात बरेचदा पगार हेच एक ओकेजन असायचे Happy
Happy
पगाराचा दिवस का?
.
खुष है जमाना, आज पेहेली तारीख है,
खुष है जमाना, आज पेहेली तारीख है
बीवी कहे घर जरा जल्दीसे आना,
शामको पियाजी हमे सिनेमा दिखाना
करो ना बहाना ... बहाना
खुष है जमाना, आज पेहेली तारीख है
खुष है जमाना, आज पेहेली तारीख है

सामी, थँक्यु.. वर माझेमन ने दिली आहे तीच रेसिपी .त्यात फक्त आवडीप्रमाणे साखर ऍड करायची आहे.
बेकिंग म्हणशील तर आमच्याकडे बजाजचा एक गोल बेसिक इलेक्ट्रिक ओव्हन होता त्यात बेक करत असे. पण आता तो ओव्हन च कालबाह्य झाल्याने त्याबद्दल लिहून काही उपयोग नाही. त्यात आम्ही रताळी, बटाटे वगैरे भाजून मुलांना स्नॅक्स म्हणून देत होतो. बाकी विशेष उपयोग काही करत नव्हतो.

अय्यंगार चा रवा केक सूनबाईंचा फेवरेट आहे , मला एवढा आवडत नाही, खूप तेलकट वाटतो म्हणून.

रवा केक मस्त. इथ येण मी टाळते. खूप छान छान पदार्थ पाहून खाव स वाटते. वरती पण एका पेक्षा एक पदार्थ आलेत.

रुnमेश ची अय्यंगार ची आठवण काढली त्यामुळे लिहावं वाटलं.

मी पण स्वतः रवा केक बनवला शनिवारी. (नवऱ्याने , त्याचा पहिला ओव्हन मध्ये पाहिला प्रयोगात रवा केक चा शिरा झालेला असल्याने , ४-५ YouTube channel वरून थोड्या थोड्या सूचना आणि रेसीपी एकत्र करून प्रमाण नक्की केल आहे ) त्यामुळे त्यात केक मध्ये जे जे घटक असू शकतात ते सर्व पदार्थ आहेत. नेहेमी तेच प्रमाण वापरून करतो. मी पहिल्यांदा केला.
२.५ कप रव्याच केला . त्यात दही, साखर, तेल, दूध, vanilla beans ची पावडर ( इसेन्स पण चालतो), बेकिंग पावडर, बेकिंग सोडा आणि कंडेन्स्ड मिल्क आहे. बारीकच रवा वापरावा व तो चांगला भिजवला तर केक अधिक चांगल होतो असा अनुभव. अगदी एक कण मीठ घातले तर बरा लागतो. चव आणि रंगरूप अय्यंगार या जवळ जाणारी आहे. फोटो नाही देता येत.

Pages