Submitted by ऋन्मेऽऽष on 27 December, 2025 - 13:13
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
फक्त आणि फक्त एक तोपासूफोटो
आणि तो कसा अपलोड करावा हे इथे बघू शकता.
https://www.maayboli.com/node/1556
क्रमवार पाककृती:
आधीची खाऊगल्ली इथे भरायची
https://www.maayboli.com/node/82415
तिची डबल हजारी भरली म्हणून हा नवीन धागा.
तो धागा ख्रिस्तमस्तच्या मस्त माहोल मध्ये संपला
इथे थर्टी फर्स्ट माहोलने सुरुवात करूया 
आहार:
पाककृती प्रकार:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मुली पालक का साग, बथूआ (चंदन
मुली पालक का साग, बथूआ (चंदन बटवा) के पराठे आणि छर्रा आलुची भाजी

अरे वा. अजून एक हिवाळी बेत
अरे वा. अजून एक हिवाळी बेत 👍
मूली / सरसों का साग, बथुआ का रायता हा मेन्यू आमच्या उत्तर भारतीय गोतावळ्यात असतोच थंडीच्या दिवसात.
छर्रा भाजी , पराठे सरसो का
छर्रा भाजी , पराठे सरसो का साग फारच भारी! छर्रा भाजी पहिल्यांदाच ऐकली. रेसिपी प्लीज
छर्रा आलू म्हणजे छर्र्यासारखे
छर्रा आलू म्हणजे छर्र्यासारखे छोटे बटाटे.
फोडणीसाठी कढई मध्ये मोहरीचे तेल चांगले तापल्यानंतर आच कमी करावी. त्यात जिरे, धणे, सुकी लाल मिरची, मेथीदाणे जरासे भरडून घालावेत. थोडेसे परतल्यानंतर साधं मीठ, गुलाबी मिठ, हिंग, हळद आणि किसलेले आलं घालावं. मग त्यात ६०-७० टक्के उकडलेले छर्रा आलू सालासहित परतून घ्यावेत. Finally कसुरी मेथी आणि आमचूर पावडर add करावी.
वामीका मस्त ताट स्पेशली
वामीका मस्त ताट स्पेशली माझ्यासाठी जी बिलकुल पालेभाज्या खात नाही तेव्हा मदतीला हे असे पराठेच धावून येतात.
छर्रा आलू रेसिपी पण मस्त मी पण करून बघेन.
@अनिंद्य, हो मागच्या पानावरची तीळ लावलेली बाजरीची भाकरीच आणि भोगीची हरभरे, गाजर ,घेवडा ,शेंगदाणे आणि ओला पावटा घातलेली भोगीची भाजी आहे.
बथुआ का रायता कसे करतात?
बथुआ का रायता कसे करतात?
मूली / सरसों का साग, बथुआ का
मूली / सरसों का साग, बथुआ का रायता हा मेन्यू आमच्या उत्तर भारतीय गोतावळ्यात असतोच थंडीच्या दिवसात. >>>>

अनिंद्य, तुम्ही भूने आलू आणि साथ में मुली के पत्तों की चटनी विसरलात का? हे घ्या गरमागरम फरुखाबादी भूने आलू.
वामिका, जय हो !
वामिका, जय हो !
मनकवड्या आहात तुम्ही.
असेच भूनी शकरकंदी सुद्धा असते या दिवसात. वरून मीठ, जीरा पावडर + मीर पूड फक्त 😋
… बथुआ का रायता कसे करतात?…
… बथुआ का रायता कसे करतात?…
नैमालूम मेरे कू.
हिरव्या/पालेभाज्यांशी सख्य नाही ना . 😀
@ सिमरन,
तुम्हाला बाजरीच्या भाकरीचा झब्बू देतो, जरा थांबा.
माझ्या हिवाळी एन्ट्रीज्.
माझ्या हिवाळी एन्ट्रीज्.
Tomato Pumpkin = टोमेटो + लाल भोपळा स्मोकी सूप. For those interested: दोन्ही घटक आधी थोडेसे(च) बटर लाऊन डायरेक्ट फ्लेमवर भाजले, मग मीठ, मीर पूड + आलं टाकून सूप. Super easy.
सरत्या हिवाळ्यात शेवभाजी + बाजरीच्या भाकरीचा बेत जमवलाच.
सांजच्याला पुलाव + रायता. 👇
वि. सू : नावड/ वजन वाढण्याची वगैरे चिंता असणाऱ्यांनी फोटोंकडे दुर्लक्ष करावे.
माझ्या हिवाळी एन्ट्रीज्.
दु. प्र.
हिवाळी एन्ट्रीज् एकदम
हिवाळी एन्ट्रीज् एकदम tempting. शेवभाजी आणि टोमॅटो soup तर weak point. सूप तुमच्या पद्धतीने करुन बघेन. भारी लागेल नक्कीच.
असेच भूनी शकरकंदी सुद्धा असते या दिवसात. >>> येस्स!! घरापुढे अंगणात अलाव/ अंगीठी पेटवून त्यात भुने आलू आणि शकरकंदी म्हणजे स्वर्गसुखच !!
पूर्वोत्तर भागात गोटी बटाटे
पूर्वोत्तर भागात गोटी बटाटे मिळतात. ते असेच तेलावर परतून खूप छान लागतात ह्या मोसमात मिळतात.
… अंगणात अलाव/ अंगीठी पेटवून
… अंगणात अलाव/ अंगीठी पेटवून त्यात भुने आलू आणि शकरकंदी ….
यस, देसी बार्बेक्यू ❤
यावर्षी हुरडा राहिला माझा.
ही घ्या माझी विंटर स्पेशल मटर
ही घ्या माझी विंटर स्पेशल मटर कचोरी..

आठवडाभर घरी एकटे असल्याने
आठवडाभर घरी एकटे असल्याने साधारण असा मेनू होता.
बरेचसे बाहेरचे पण अध्येमध्ये घरचा जुगाड
माझेमन
माझेमन
विंटर स्पेशल मटर कचोरी.. जबरी.
प्लेट, प्लेटिंग आणि कचोरी...superb
आठवडी मेन्यू भारीच आहेत
मी शिरा व टीळगूळाचे लाडू
मी शिरा व तीळगूळाचे लाडू घेतले ऋन्मेष.
दोन्ही प्रकार मी रिपीट मोडवर
दोन्ही प्रकार मी रिपीट मोडवर खाल्लेले घेतले तुम्ही
मटार कचोरी एकच नंबर दिसतेय.
मटार कचोरी एकच नंबर दिसतेय.
ऋन्मेष आठवड्याचे मेन्यू मस्त
ज्वारीची उकडपेंडी आणि ओली हळद
ऋन्मेष, कडकडून भूक लागली
ऋन्मेष, कडकडून भूक लागली तुमचे मेन्यू बघून.
विंटर स्पेशल मटर कचोरी.. जबरी
विंटर स्पेशल मटर कचोरी.. जबरी. >> +१००
उकडपेंडी तोंपासू!
उकरपेंडी मस्तच दिसतेय.
उकरपेंडी मस्तच दिसतेय.

अजून केल्या नव्हत्या आता रथसप्तमी ही आली जवळ म्हणून आज केल्या गुळाच्या पोळ्या. गुळात तिळ सुकं खोबर भाजून वाटून घातलं आणि तेलावर भाजलेलं बेसन, वासासाठी वेलची पूड.
दोन कणकेच्या लाट्यांमध्ये गुळाची लाटी ठेवून केल्या, हल्ली पू पो सारख्या करतात तश्या नाही केल्या.
सगळ्यांचेच मेन्यू मस्त!
सगळ्यांचेच मेन्यू मस्त!
तांदूळाची भाकरी, मटर बटाटा
तांदूळाची भाकरी, मटर बटाटा,शिरा आणि केळी बटाटा कापं
किट्टू मस्त मेन्यू शिरा
किट्टू मस्त मेन्यू ,शिरा लापशीचा दिसतोय.
ममो गुळाच्या पोळ्या मस्तच .
शेवभाजी पण मस्त अनिंद्य.
रुन्मेष तुमची पदार्धांची लडी भारी.
उकड जास्त खायला होत नाही गरम असतानाची थोडीफार खाऊ शकते पण आवळ्याचा तक्कू पाहून तोंडाला पाणी सुटले.
कोल्हापूरला गेलोय आणि तांबडा पांढरा खाल्ला नाही असं कसं होईल .


ही चिकन थाळी ,
ही मटण ,
अहाहा
अहाहा
सकाळी सकाळी तांबडा पांढरा.
लय भारी
वाह तांबडा पांढरा.. बदाम बदाम
वाह तांबडा पांढरा.. बदाम बदाम बदाम
वामिका , अनिंद्य हिवाळी मेनू
वामिका , अनिंद्य हिवाळी मेनू मस्तच !!
ममो, गुळाच्या पोळ्या एकदम खुटखुटीत दिसत आहेत. तुमची रेसिपी सिंधुताई साठे यांच्या स्वयंपाक पुस्तकाप्रमाणे आहे. छान होतात त्यांच्या रेसीपी ने !
कोल्हापूर विशेष दोन्ही थाळ्या मस्तच पण माझा पास ....
आजचा प्रजासत्ताक दिवसाचा तिरंगी मेनू ...
Pages