Submitted by ऋन्मेऽऽष on 27 December, 2025 - 13:13
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
फक्त आणि फक्त एक तोपासूफोटो
आणि तो कसा अपलोड करावा हे इथे बघू शकता.
https://www.maayboli.com/node/1556
क्रमवार पाककृती:
आधीची खाऊगल्ली इथे भरायची
https://www.maayboli.com/node/82415
तिची डबल हजारी भरली म्हणून हा नवीन धागा.
तो धागा ख्रिस्तमस्तच्या मस्त माहोल मध्ये संपला
इथे थर्टी फर्स्ट माहोलने सुरुवात करूया 
आहार:
पाककृती प्रकार:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वा तिरंगी मेन्यू मस्तच पहिला
वा तिरंगी मेन्यू मस्तच पहिला गाजरहलवा आहे ना.
वा तिरंगी मेन्यू मस्तच, पहिला
वा तिरंगी मेन्यू मस्तच, पहिला गाजरहलवा आहे ना.
हा आमचा Republic Day Special
हा आमचा Republic Day Special मेन्यू
फाफडा जिलेबी
सिमरन, हो गाजर हलवा , जीरा
सिमरन, हो गाजर हलवा , जीरा राईस, मटार उसळ
ऋन्मेष , मेनू मस्तच , मला जिलबी च आणायची होती पण संपली होती.
15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी
15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी आमच्या इथे पण नेहमी जिलेबी फाफडा असतो पण यावेळी गावी असल्याने सातारी कंदी पेढे खाऊन प्रजासत्ताक दिन साजरा केला.

आप्पे
आप्पे
कुठे लिहावे हे न समजल्याने
कुठे लिहावे हे न समजल्याने इथे लिहितो आहे. (अधिक योग्य धागा सुचवल्यास स्वागत)
जमवा चालो जी !! पारसी भोणूं जुवे छे वाट …
The Poona Zarthosti Seva Mandal तर्फे दरवर्षी नेमाने साजरा होत असलेला “पूना पारसी फूड फेस्टिवल” उद्या शनिवार दिनांक ३१ जानेवारी २०२६ ला जमशेद जिजीभॉय अग्यारी मैदान, कँप पुणे येथे होतो आहे.
Authentic/ पारंपरिक पारसी फूड आता मुंबईतही धड मिळेना झालंय. मात्र या फेस्टिवल मधे सर्वच फूडस्टॉल्स फक्त पारशी बावा लोकांचेच आहेत, त्यांच्या खास रेसिपीज showcase करायला. आमच्यासारख्या लोकांच्या आग्रहामुळे व्हेज ऑप्शन्स सुद्धा असतील. फेस्टचे हे ६ वे वर्ष आहे.
तारीख़: Saturday, January 31, 2026
स्थळ: J.J. Agiary Grounds, Camp, Pune
वेळ : संध्याकाळी ५ ते रात्रौ १० / 5 PM to 10 PM
Entry coupons priced at ₹50.
What to expect :
Authentic Parsi cuisine, stalls with antique items, live music, and games.
पुण्यातल्या पारसी फूडच्या चाहत्यांनी जमल्यास अवश्य भेट द्या, खा-प्या, फोटो काढा आणि इथे डकवा.
simran kandi pedhe mazya
simran kandi pedhe mazya avdiche... pathvun dya
पारसी फूड मध्ये काय काय असते
पारसी फूड मध्ये काय काय असते मुख्यत्वे?
आजचा नाश्ता.. कांदा, टोमॅटो,
आजचा नाश्ता.. कांदा, टोमॅटो, गाजर, बीट टाकलेला हेल्दी उत्तपम..

डोसा पेक्षा हेच जास्त आवडतात मला...
एकेकाळी फाफडा आणि जिलेबी आमचा
एकेकाळी फाफडा आणि जिलेबी आमचा जिम करुन झाल्यावरचा नश्ता असायचा. कारण थकलो असायचो जिम केल्यावर.

गेले ते दिवस. इतका मस्त वाटायचा तो गरम फाफडा, पपईची चटणी आणि गरम जिलेबी.
मला बारीक, जराशीच पाकात भिजलेली कुरकुरीत गरम नुकतीच काढलेली जिलेबी मस्त वाटते. गरम दूधात बुडवून खायची. आणि झोपायचं.
लिबलिबीत जलेबी किंवा नरम मान टाकलेला फाफडा टोटल नो नो.
परत २० व्या वयाचो व्हायला जन्म घ्यावा लागेल.
ऋ, चटणी नाही तर मजा नथी.
.. पारसी फूड मध्ये काय असते…
.. पारसी फूड मध्ये काय असते…
@ मानव, या विषयावर माझा एक लेख ड्यू आहे. पूर्ण केला तर मायबोलीवरही डकवीन.
इंशागोविंदा, लवकरच.
Anindya, आता सारखे सारखे इथे
Anindya, आता सारखे सारखे इथे डोकावणे आले..
लवकर पोस्ट करा लेख.
अरेरे! मी येतेय पुण्यात उद्या
अरेरे! मी येतेय पुण्यात उद्या. पण कॅम्पपर्यंत येणे होणार नाही. नाहीतर पारसी फूड आवडीचा प्रकार आहे. जिमी बॉय बंद झाल्यापासून तर मिस करतेय.
पारसी फूड मध्ये काय असते -
बेरी पुलाव, कॅरॅमल कस्टर्ड, मटन कटलेट, लगन नू कस्टर्ड, पात्रा मच्छी, धनसाक, गाजर मेवा नू अचार ,अकुरी
कुणी जाणार असेल या गोष्टी जरूर ट्राय करा. आणि माझ्या नावाचा एक घास बाजूला काढून ठेवा बरं न विसरता.
त्या निमित्ताने मी केलेल्या बेरी पुलावची रिक्षा फिरवते
ओके धन्यवाद, मी खाल्ले नाही
ओके धन्यवाद, मी खाल्ले नाही कधी पारसी फूड मग.
अनिंद्य धाग्याच्या प्रतीक्षेत.
विकेंड high Tea
झंपी या .. जिलेबी बारीक गरम कुरकुरीत आहे.
आणि तो पपई किस सोबत तळलेली मिरची माझ्या सुद्धा आवडीची.. पापडी आणि भावनगरी गाठी खाताना सोबत अध्येमध्ये मिरची चावावी ही वडिलांची शिकवण आहे
@ पारसी फूड बद्दल जास्त माहीत नाही पण केक पुडींग कस्टर्ड हे पारसी लोकच बेस्ट बनवतात आणि त्यांच्याकडूनच घ्यावे ही सुद्धा एक वडिलांची शिकवण होती
मुंबईत आमच्या भागात त्या काळी बरेच बेकरी होत्या त्यांच्या..
असो, या.. विकेंड high Tea
जुई उचला बॉक्सच
जुई उचला बॉक्सच
आप्पे उत्तपा पण मस्त.
रुन्मेष मस्त ताट, पदार्थ अगदी उठून दिसताहेत तोपासू 😋
अनिंद्य, खरच पारसी ऑथेनटीक फुड बद्दल काहीच माहीत नाही एकदा फक्त कुठल्यातरी चॅनेल वर एका पारसी सेलिब्रिटींने धनशाक (धनसाक) दाखवला होता. ते नॉनव्हेज होतं .बाकी व्हेज बद्दल तर काहीच माहिती नाही . तुम्ही नक्क्की लिहा तुमच्या बंगभोज सारखा पारसी जेवणाचा धागा माबोचा ठेवा बनून राहील.
घाटी मालवणी चिकन थाळी
घाटी मालवणी चिकन थाळी
.
क्रॅब लॉलीपॉप, कोंबडी वडे,
क्रॅब लॉलीपॉप, कोंबडी वडे, स्प्रिंग रोल
.
.
सर्वाना संकष्ट चतुर्थीच्या
सर्वाना संकष्ट चतुर्थीच्या शुभेच्छा

गणगण गणात बोते
गणगण गणात बोते


वाह उकडीचे आणि तळलेले दोन्ही
वाह उकडीचे आणि तळलेले दोन्ही मोदक आले.. आवडेल ते घ्या.. मी दोन्ही घेतो
हो रुन्मेष तुमच्या लक्षात आलं
हो रुन्मेष तुमच्या लक्षात आलं की नाही माहीत नाही 11 मोदक गणपतीसाठी केले होते तो बारावा मोदक खास तुमच्यासाठीच आहे .धागाकर्त्याला टोल म्हणून .
जुई मस्त ताट, ते चॉकलेटी काय आहे ताटात ?
अरे हो खरेच बारा आहेत..
अरे हो खरेच बारा आहेत.. धन्यवाद
समोसे जिलेबी मोदक सगळंच मस्त.
समोसे जिलेबी मोदक सगळंच मस्त...
सिमरन कोणत्या ताटाबद्दल बोलताय तुम्ही? मी टाकलेले फोटो मागे गेले आहेत त्यामुळे समजलं नाही
घरी बनवलेली पाणीपुरी
घरी बनवलेली पाणीपुरी

अरे हो ते स्वस्ति यांचं ताट
अरे हो ते स्वस्ति यांचं ताट होत सॉरी.पण तुमची पाणीपुरी तोपासू दिसतेय.
स्वस्ति यांच्या ताटात झूम करून पाहिलं गुळाचा शिरा दिसतोय.
गुळाचा शिरा दिसतोय. >> कणकेचा
गुळाचा शिरा दिसतोय. >> कणकेचा शिरा . कडाह. यावेळी गुळ-साखर 50-50.
बाकी आज महाराजांच्या प्रगटदिनानिमीत्त पिठलं भाकरी
आजचा बेत . व्हिडीओ.https:/
.
रविवारचा दिवस म्हणजे तसा
रविवारचा दिवस म्हणजे तसा आळसावलेलाच, पण नेमाप्रमाणे अहोंनी घराची आवरावरी करायला घेतलेली.
"जुना पसारा काढून टाकला तरच नवीन वस्तू घरात येतात" या वचनाला जागून, आवराआवरी करताना काढून टाकून द्यायच्या वस्तूंचा डोंगर वाढत चाललेला होता. त्यातच हे एक भांडं दिसलं. केव्हातरी कुणीतरी असंच भेट म्हणून दिलेलं पण अजून न वापरलेलं.
तेच भांडं पुन्हा कुणाला तरी भेट द्यायचं म्हणून परत ठेवून द्यावं की इतर काही वस्तूंसोबत कामवालीला देऊन टाकावं अशी चर्चा सुरू असताना, "मस्त दिसतंय, थोडे दिवस वापरून मग टाकून देऊ" असं ठरलं.
मग आता हे वापरायला काढलंच आहे तर त्यात काय ठेवता येईल असा विचार सुरू झाला. "अहो, तुम्ही आवरावरी करा, दुपारचा स्वयंपाक मी करतो" असं म्हणून मी ते भांडं घेऊन किचनमध्ये गेलो.
"सरड्याची धाव कुंपणापर्यंत" म्हणतात तसं अस्मादिक करून करून काय करणार? फार झालं तर भात वरण करणार, दुसरं काय?
भातावरणाचं कुकर लावलं आणि फ्रीज उघडलं. फ्रिजमध्ये फारशा काही फळभाज्या नव्हत्या म्हणून तेलुगु पद्धतीचं सांबर करायचा बेत रद्द केला त्याऐवजी टोमॅटोचं वरण आणि साधं वरण असं ठरवलं. तरीही या भांड्याचं काय उपयोग करायचं हे काही निश्चित होत नव्हतं.
मग फ्रीज मधल्या उरल्या-सुरल्या भाज्यांपैकी चतकोर कोबी, एक काकडी, एक गाजर गाजर, एक कॅरेट गाजर हे किसून व एक कांदा, दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून असं सर्व घेतलं.
.
त्यावर मीठ, मोहरी पूड, लिंबू रस, तिळाची फोडणी असं घातलं व सगळं एकत्र केलं.
दुसरीकडे तूप-जिरे फोडणीचं साधं वरण, कांदा, टोमॅटो, लसूण, हिंग, जिरे, मोहरी, सांबर मसाला, चिंच असं टोमॅटो वरण व पांढरा भात असं केलं.
अहोंची आवरावर होईपर्यंत स्वयंपाक तयार झाला.
टोमॅटो वरण, साधं वरण, दही आणि हे वरचं कोशिंबीरसदृश्य मिश्रण असं वाफाळत्या भातासोबत वाढलं. तोंडी लावायला ओल्या लाल मिरच्यांचा चटकदार ठेचा वाढला. ताजे मक्याचे दाणे, मटार दाणे, भिजवलेली चणाडाळ, मोड आलेली मसूर असे पदार्थ घरी असतातच, तेही थोडे वाढले. पापडं भाजून घेतले.
मायबोली.कॉमला वर्चुअल नैवेद्य दाखवून जेवायला बसलो.
Pages