क्रिकेट - ९

Submitted by ऋन्मेऽऽष on 3 January, 2025 - 02:37

२०००+ पोस्ट झाल्या म्हणून नवीन धागा

बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा निर्णायक धुमाकूळ इथे घालूया Happy

क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/83589

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कप घेतला / मिळाला नाही तरी आशिया कप विजेते म्हणून भारत याची रेकॉर्ड बुक मध्ये नोंद राहील ना?
नियम काय बोलतो?

म्हणजे बेल्स पडल्याशिवाय आऊट नाही तसे कप घेतल्याशिवाय चॅम्पियन नाही असा काही नियम नाही ना..

पण एशिया कप घेतला नाही ! >> Lol

त्या सगळ्या गदारोळात तिलक ने चौथा पाचवा हा नंबर आपला केला हे राहिलेच.

*आता आयसीसीकडे तक्रार केली आहे की.* हा सर्व प्रकार खूप खुबीने व आपली प्रतिष्ठा वाढवून हाताळता आला असता, असं मला तीव्रतेने वाटतं !

“ हा सर्व प्रकार खूप खुबीने व आपली प्रतिष्ठा वाढवून हाताळता आला असता, असं मला तीव्रतेने वाटतं !” - खेळायचं किंवा नाही हा निर्णय भारताच्या हातात होता. पण एकदा खेळायचं असं ठरवल्यावर खेळाबाहेरच्या गोष्टी (हँडशेक पासून, राजकीय टिप्पणी ते अ‍ॅवॉर्ड सेरेमनीपर्यंत) आणायची आवश्यकता नव्हती असं माझं मत आहे.

भारतीय महिला संघाचा पहिल्या सामन्यात लंकेवर सहज विजय!
>>>>

आपली स्थिती अवघड होती पहिल्या इनिंगच्या मध्यावर.
आणि त्यांची स्थिती चांगली होती त्यांच्या फलंदाजीच्या सुरुवातीला.
दोन्ही इनिंगला नंतर दाखवलेला फॉर्म कायम रहावा अशीच इच्छा..

*म्हणजे नक्की कसा?* - फार प्रेम व उत्साह न दाखवता पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलनासारखे स्पर्धेचे सामान्य शिष्टाचार केवळ औपचारिकपणे पाळून.

“ हा सर्व प्रकार खूप खुबीने व आपली प्रतिष्ठा वाढवून हाताळता आला असता, असं मला तीव्रतेने वाटतं !” - >> +१ हस्तांदोलन न करणे मलाही पटलेय पण नॉड वगैरे करून अ‍ॅकनॉलेज करण्याइतका शिष्टाचार पाळायला हरकत नव्हती. नकवी ची एकंदर पोझिशन बघता त्याला मात्र इग्नोर केले ते पटलेय. एकूण नेक्स्ट पाकीस्तानी जनरेशन पण मस्तीखोर वाटते. साहिबजादाची रीअ‍ॅक्शन शेक हँड न केल्यामूळे होती असे वाटले ह्याउलट हॅरीस ची मात्र पूर्ण अन्कॉल्ड वाटलेली. दॅट ब्रोक कॅमल्स बॅक. आपण जिंकतोय तोवर हे सगळे कौतुकास्पद वाटते आहे. आपल्या जनतेचा एकंदर पेशन्स पाहता पाकिस्तान विरुद्ध हरलो तर काय करतील ह्याचा भरवसा वाटत नाही. हा खेळ आहे ह्याचा ह्याचा सारासार विचार करणारे किती उरले आहेत देवच जाणे !

अन् सुरुवातीलाही यावा >> तीच तर मजा होती ना पण रे Happy

वेस्ट इंडिज विरुद्ध कुलदीप असेल का ? असावा अशी इच्छा आहे. तीन प्रॉपर पेसर असायला हवेत असे वाटते (रेड्डी हा पेसर नाही) जुरेल च्या बॅटींग चा मला भरवसा वाटत नाही . राहुल, जैस्वाल, सुंदर, गिल, जुरेल, पड्डिकल्/ साई, जाडेजा, कुलदिप, प्रसिद्ध, बुमरा, सिराज.

सिराज 4 विकेट्स

राहुल शतक
गिल अर्धशतक
ज्युरेल शतक
जडेजा शतकाकडे...

विंडीज गोलंदाजीचा अक्षरशः घाम काढला भारतीय फलंदाजांनी.
३ शतके एक अर्धशतक.
जाडेजा १०० करून नाबाद आहे. ३०० ते ३५० ची आघाडी घेऊन खेळायला देतील असे वाटतेय.

३०० ते ३५० ची आघाडी घेऊन खेळायला देतील असे वाटतेय.
>>
मला वाटतं की 400+ न्यायाला बघतील
दुसऱ्यांदा बॅटिंग करायलाच नको या हिशोबानी

बाकी जर्सी वर अपोलो टायर्स चा जांभळा लोगो मला फार इंप्रेसिव नाही वाटला

अर्थात एमपीएल अन् बायजूज कॉम्बो पेक्षा बरं आहे हे...

आपल्या जनतेचा एकंदर पेशन्स पाहता पाकिस्तान विरुद्ध हरलो तर काय करतील ह्याचा भरवसा वाटत नाही. हा खेळ आहे ह्याचा ह्याचा सारासार विचार करणारे किती उरले आहेत देवच जाणे ! >> Bulls eye. ( किंवा अर्जुनाच्या माशाचा डोळा म्हणा)

फेरफटका व भाऊंशी सहमत. एखाद्याने उघड काही वक्तव्य केले असेल तर स्पेसिफिकली त्याला लांब ठेवणे बरोबर आहे (असामीने लिहीले तसे नक्वीशी) पण मैदानावर सरसकट ते आणायची गरज नव्हती. पहलगाम इतके महत्त्वाचे होते तर खेळायचेच नव्हते- पुढची काही वर्षे एकही कप मिळाला नाही तरी ते त्यापेक्षा महत्त्वाचे नाही. आणि इतकी पॉवर असेल तर दक्षिण आफ्रिकेला वर्षानुवर्षे बाहेर ठेवले तसे पाकला बाहेर काढा टेररिस्ट देश म्हणून.

नाहीतर तुम्ही त्यांना बोलिंग करून किंवा त्यांच्या बोलिंगवर बॅटिंग करून, त्यांच्याबरोबर टॉस करून ऑलरेडी "सिव्हिल एंगेजमेण्ट" करत आहात. मग हस्तांदोलन न करून साध्य काहीच होत नाही. फक्त क्रिकेट "क्रास" होते. तुम्ही मैदानावर उगाच दुश्मनी दाखवता. मग बाउण्ड्री वर फिल्डिंग करणार्‍या खेळाडूला बाजूचे प्रेक्षक काहीतरी बोलणार, तो त्यावर काहीतरी खाणाखुणा करणार. त्यावरचा आउटरेज. चॅनेल्सवरच्या बातम्या जशा "चीप" झाल्या आहेत तसे झाले हे.

. मग बाउण्ड्री वर फिल्डिंग करणार्‍या खेळाडूला बाजूचे प्रेक्षक काहीतरी बोलणार, तो त्यावर काहीतरी खाणाखुणा करणार. >> हस्तांदोलन बाजूला ठेवून हॅरीस च्या गेष्चरला बघूया. माझ्या आठवणीप्रमाणे त्याला पहिल्यांदा कोहली नि शाश्त्रीने डाऊन अंडर प्रॅक्टीस मॅचेस किंवा सरावाला वापरले होते. त्याच्या बॉलिंग वर ईम्प्रेस्स होऊन त्याचे बरेच कौतुक केले होते. तो नंतर पाकिस्तान संघामधे आला त्यात ह्या प्रकाराचा हातभार होता. नंतर वर्ल्ड कप मधे कोहलीनेच त्याला चोपले होते. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर प्रेक्षकांनी त्याची कोहली कोहली अशी टर उडवणे अगदी ओघाने आले ( मी अशा टर उडवण्याचे समर्थन करत नाहिये. ). हॅरीस ने त्यावर इतर काही उत्तर दिले असते तर नजरेआड करता आले असते पण हस्तांदोलन न केल्याचा परीणाम म्हणून त्याने केलेले गेश्चर खटकले. त्याचा क्रिकेट शी संबंध नव्हता. हस्तांदोलन करणे न करणे हा फक्त शिष्टाचाराचा भाग आहे तसे नियम नाहित. ह्याउलट हॅरीस ने प्रेक्षकांशी एंगेज होणे माझ्या माहितीप्रमाणे आय सि सी रूल्स ह्या विरुद्ध होते. ही गॉट कॅरीड अवे अँड पेड प्राईस.

चॅनेल्सवरच्या बातम्या जशा "चीप" झाल्या आहेत तसे झाले हे. >> हे एकदमच पटलय. उत आलाय. माईक आर्थरटन म्हणतो तसे आय सि सी इंडॉ पाक मॅचे येते १-२ वर्षे ठेवूच नयेत.

ऋन्मेष, अनुमोदन.
<<पहलगाम इतके महत्त्वाचे होते तर खेळायचेच नव्हते- पुढची काही वर्षे एकही कप मिळाला नाही तरी ते त्यापेक्षा महत्त्वाचे नाही. आणि इतकी पॉवर असेल तर दक्षिण आफ्रिकेला वर्षानुवर्षे बाहेर ठेवले तसे पाकला बाहेर काढा टेररिस्ट देश म्हणून.>>
फारएण्ड, अनुमोदन.

कालच्याच स्कोअर वर डाव संपवून आज विंडीजला 98/8 वर आणलं
चहा पर्यंत संपेल मॅच

पहिल्या मॅच मधे ऑसी A चा कचरा केल्यावर दुसऱ्यात त्यांनी आपल्याला फोडलं

शुभमन गिल नवीन कर्णधार

India ODI squad for Australia tour: Shubman Gill (Captain), Rohit Sharma, Virat Kohli, Shreyas Iyer (VC), Axar Patel, KL Rahul (WK), Nitish Kumar Reddy, Washington Sundar, Kuldeep Yadav, Harshit Rana, Mohammed Siraj, Arshdeep Singh, Prasidh Krishna, Dhruv Jurel (WK), Yashasvi Jaiswal.

ते पण अमेरिकेच्या रस्त्यावर बसून..
>>>
माझी काही अकाउंट अमेरिकेतून चालतात Happy
जोक्स द अपार्ट, बॅकग्राऊंड AI आहे. बॉडी ओरिजनल..

पण सध्या महत्वाचा विषय हा आहे की वनडे कर्णधार बदल म्हणजे रोहीत शर्मा २०२७ वर्ल्ड कप खेळत नाही

आगरकर म्हणाला आहे की कोहली अन् रोहित नी 2027 बद्दल कमिटमेंट दिली नाहीये. या सिच्युएशन मधे आत्ताच कॅप्टन बदलून नव्या कॅप्टन ला स्थिरावायला थोडा तरी वेळ मिळेल हे पाहिलं असावं. टेस्ट मधे मिळालेल्या संधीत कॅप्टन्सी चा परफॉर्मन्स वर परिणाम होऊ न देणं हे गिलच्या बाजूनी गेलं असावं. मला स्वतः ला श्रेयस अय्यर ला व्हाईट बॉल कॅप्टन म्हणून बघायला आवडलं असतं.

गिल कॅप्टन झाल्याने बॅटिंग ऑर्डर मधे इम्पॅक्ट होणार. अन् तो मॅनेज करायला कोहली किंवा रोहित पैकी एकालाच खेळवतील असं वाटतं. म्हणजे, रोहित खेळत असेल तर जयस्वाल सोबत ओपन करेल अन् गिल 3 वर येईल. अन् कोहली खेळत असेल तर गिल ओपन करेल अन् कोहली 3 वर येईल.
या दोघांना एकत्र खेळवायचं ठरवलं तर मात्र जयस्वाल चा बळी जाईल...

रोहित जर संघात खेळायला योग्य ठरतं असेल तर त्याला कर्णधार म्हणूनच खेळवणं अधिक योग्य. आंतरराष्ट्रीय स्पर्धा नवीन कर्णधार तयार करण्यासाठी वापरणं हे त्या स्पर्धेचं अवमूल्यन करणं ठरतं. रोहित अनुभवी व कसबी कर्णधार म्हणून संघात उपलब्ध असेल तर त्यालाच कर्णधार करणं योग्य. गिल उपकर्णधार किंवा संघातील खेळाडू म्हणूनही रोहितकडून खूप कांहीं शिकू शकतो. हे आपलं माझं प्रामाणिक मत.

Pages