क्रिकेट - ९

Submitted by ऋन्मेऽऽष on 3 January, 2025 - 02:37

२०००+ पोस्ट झाल्या म्हणून नवीन धागा

बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा निर्णायक धुमाकूळ इथे घालूया Happy

क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/83589

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रोहीतची विकेट जाणार लवकरच. अजून दोन वर्षे सातत्याने फॉर्म राहणे अवघड आहे. ज्या मालिकेत तो घसरला तिथे तो संघाबाहेर पडणार. कारण आता संघ निवडीत त्याची कप्तानी काउंट होणार नाही. जी खरे तर व्हायला हवी होती. म्हणजे रोहीत संघात असताना तोच सर्वोत्तम कर्णधार होता.

नवीन कर्णधार बदलायची हिच योग्य वेळ आहे या मुद्द्याला देखील नाकारता येत नाही. त्यामुळे निवड समितीला ब्लेम वगैरे करायचा नाहीये. पण त्यांच्या वागण्यात पारदर्शकता कमी भासते. जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे असेही असेलच म्हणा..

*कारण आता संघ निवडीत त्याची कप्तानी काउंट होणार नाही. * मान्य. पण तो जर फलंदाज म्हणून निवडला गेला, तर मात्र त्याची कप्तानी देखील वादातीत ठरते, असं माझं म्हणणं.

हो ते आहेच. संघात असल्यास कर्णधार म्हणून सर्वोत्तम पर्याय तोच होता.
जर मधल्या काळात तो वयानुसार फलंदाज म्हणून मागे पडला तर कर्णधार असल्याने त्याने जागा अडवू नये किंवा त्याला संघाबाहेर काढणे अवघड जाऊ नये म्हणून निवडसमितीने आताच हा डाव खेळला आहे.
जर रोहीत २०२७ पर्यंत तग धरू शकला नाही तर हा निर्णय योग्य ठरेल. जर खेळला तर तो संघात असून कर्णधार नसणे हे थोडे तोट्याचे पडेल.

अर्थात गिल काही वाईट कर्णधार आहे किंवा ठरेल असे नाही. फक्त रोहितने बार उंचावला होता. कर्णधार म्हणून नुसते डावपेच नाही तर त्याच्या काळात संघातले जे वातावरण होते ते कायम ठेवणे हे आता आपल्यासमोरचे सर्वात मोठे आव्हान आहे.

Pages