Submitted by मानव पृथ्वीकर on 2 April, 2025 - 05:31
कायप्पावर, फेसबुक किंवा इतरत्र अनेकदा काहीच्या काही वाटावे असे निनावी लिखाण फिरत असते.
त्यातील काही खास वाटले तर आणि निनावी असले तरच शेअर करण्यास हा धागा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कामात व्यस्त झाले... ला अजून
कामात व्यस्त झाले... ला अजून एक अर्थ आहे.
खूप लोडेड वाक्य आहे हेही !
असे असताना १९८० येतेच कुठून ?
असे असताना १९८० येतेच कुठून ?
<<<<<< मी लग्गेच गुगल केले तर पहा काय मिळाले...
Cusp of the Millennial Generation:
The year 1980 marks the transition between Gen X and Millennials, leading to a unique set of experiences for those born around this time.
काकाफॉला इतकेही काकाफॉ समजू नका, शास्त्रीय अप्रोच आहे त्यांचा.
Btw 'अजनबी' सिनेमामध्ये बॉबी देओल 'स्वयंपाकघर कुटुंब घडविते' (अनेक अर्थांनी) या उक्तीचे मनापासून पालन करताना दाखविला आहे. तो करीनाला स्वयंपाकघरात कणीक मळायला शिकवतो.
आई - वडील कामात व्यस्त झाले >> हे 'They got busy'चे भाषांतर दिसते.
स्वयंपाकघर कुटुंब घडविते >>
स्वयंपाकघर कुटुंब घडविते >> स्वयंपाकघर आणि कुटुंब दोन्ही प्रथमा विभक्तीत असल्याने नक्की कोण कोणास घडवते ते कळलं नाही. स्वयंपाकघर कुटुंबाला घडविते की स्वयंपाकघराला कुटुंब घडविते? की स्वयंपाकघर घडविते आणि कुटुंब बी घडविते
… नक्की कोण कोणास घडवते…
… नक्की कोण कोणास घडवते… 😀
पण त्या काकाफॉ चा मुद्दा “बि”घडवण्याबद्दल आहे ना ?
पक्षी म्हणतात – आमच्याकडून
पक्षी म्हणतात – आमच्याकडून काहीतरी शिकण्यासारखं आहे, हे मानव…!
१. आम्ही रात्री काही खात नाही.
२. आम्ही रात्री कुठेही फिरत नाही.
३. आम्ही आमच्या पिल्लांना स्वतःच प्रशिक्षण देतो, त्यांना शिकवण्यासाठी कुणाकडेही पाठवत नाही.
४. आम्ही कधीही पोटभरून खाणं करत नाही. तुम्ही कितीही दाणे टाकले तरी थोडंसं खाऊन उडून जाऊ. शिवाय एकही दाणा सोबत नेत नाही.
५. संध्याकाळीच झोपी जातो, सकाळी लवकर उठतो — तेही गात गात.
६. काहीही झालं तरी आमचं खाणं बदलत नाही.
७. आमचं शरीर उपयोगात घेऊन भरपूर काम करतो. रात्री सोडून इतर वेळी आराम करत नाही.
८. आजारी पडलो तर खाणं बंद करतो. जेव्हा शरीर बरे वाटते, मन शांत होते तेव्हाच पुन्हा खाणं सुरू करतो.
९. आम्ही आमच्या पिल्लांवर खूप प्रेम करतो. त्यांचं संगोपन मनापासून करतो.
१०. आमच्यात आतून वाद होत नाहीत, मिळून मिसळून राहणं अधिक असतं.
११. निसर्गाचे सर्व नियम आम्ही काटेकोरपणे पाळतो.
१२. आमचं घरसुद्धा निसर्गपूरकच असतं. गरज जितकी तितकंच बांधतो.
हे मानव, जर तू आमचं अर्धं जरी वागणं शिकलंस ना, तरी लोक तुला सन्मानाने पाहतील…!
आपल्याला नाही सांगितलं. हे
आपल्याला नाही सांगितलं. हे मानव पृथ्वीकर.
असं अवश्य जगा, फक्त सकाळी
असं अवश्य जगा, फक्त अर्धं निवडताना सकाळी लवकर गात गात उठणे निवडू नका म्हणजे झालं.
१३. आम्ही स्मार्टफोन, संगणक
१३. आम्ही स्मार्टफोन, संगणक वापरत नाही आणि फॉरवर्ड्स प्रसवत नाही, हे मानव!
हे हे मानव
हे हे मानव
राजु श्रीवास्तवचा एक जोक
राजु श्रीवास्तवचा एक जोक आठवला , पक्ष्यांवरुन
हे फॉरवर्ड लिहिणाऱ्याला ४
हे फॉरवर्ड लिहिणाऱ्याला ४ दिवस कबुतरखान्याजवळ बसवा.
ते फक्त मानव यांना उद्देशून
ते फक्त मानव यांना उद्देशून लिहिलंय म्हणून वाचलं नाही
अगदीच काहीच्या काही नाही हे
अगदीच काहीच्या काही नाही हे

अमित
अगदीच काहीच्या काही नाही हे>>
अगदीच काहीच्या काही नाही हे>> बर्याचदा काकाफॉत तिळा एव्हढ चांगलं काहीतरी असतं (असण्याची शक्यता असतेच) फक्त तो तीळ शोधताना जे हाताला अनावश्यक चिकटतं ते असं इथे सांडतं
फक्त अर्धं निवडताना सकाळी
फक्त अर्धं निवडताना सकाळी लवकर गात गात उठणे निवडू नका म्हणजे झालं.>> ते ही परवडलं पण मानव ज्यामुळे "शुभशकून झाला नवीन कपडे मिळणार" असे म्हणतो तो गूण घेऊ नका
असं अवश्य जगा, फक्त अर्धं
असं अवश्य जगा, फक्त अर्धं निवडताना सकाळी लवकर गात गात उठणे निवडू नका म्हणजे झालं. >>>
निसर्गाचे सर्व नियम आम्ही काटेकोरपणे पाळतो. >>> गाड्यांच्या विण्डशील्डवर जरा जास्तच पाळतात असे अॅनेक्डोटली दिसते
कविन फारएण्ड
कविन फारएण्ड

आरारा!
आरारा!
या पक्ष्यांमध्ये कबुतरांचा
या पक्ष्यांमध्ये कबुतरांचा अंतर्भाव नाही वाटतं?

*दृष्टिकोन किती महत्वाचा पहा.
*दृष्टिकोन किती महत्वाचा पहा..*
गणित तर समजून घ्या..
एक मजेशीर गणित" पहा..
सोडवा..
किंवा
सोडून द्या..
पण आनंद जरूर घ्या..
आपण असे मानू या की..
A, B, C, D, E, F, G, H, I, J, K, L, M, N, O, P, Q, R, S, T, U, V, W, X, Y, Z
अनुक्रमे
1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26.
म्हणजेच..
A=1, B=2, C=3..
असे मानले तर माणसाच्या कोणत्या गुणाला पूर्ण शंभर गुण मिळतात हे पाहू या..
आपण असे म्हणतो की, आयुष्यात *"कठोर मेहनत/ HARDWORK"* केले तरच आयुष्य यशस्वी होते..
आपण *"HARDWORK* चे गुण पाहु या.. H+A+R+D+W+O+R+K =
8+1+18+4+23+15+18+11 = *98%* आहेत पण पूर्ण नाहीत..
दुसरा महत्त्वाचा गुण म्हणजे *"ज्ञान" किंवा 'Knowledge'.*
याचे मार्क्स पाहु या
K+N+O+W+L+E+D+G+E =
11+14+15+23+12+5+4+7+5= *96%*
काही लोक म्हणतात *"नशिब"/ LUCK* हेच आवश्यक. तर लक चे गुण पाहु या.
L+U+C+K = 12+21+3+11 = *47%*,"नशिब" तर एकदमच काठावर पास..
काहींना चांगले आयुष्य जगण्या साठी *"पैसा/MONEY"* सर्व श्रेष्ठ वाटतो. तर आता "M+O+N+E+Y=किती मार्क्स?
13+15+14+5+25= *72%,* पैसा ही पूर्णपणे यश देत नाही..
बराच मोठा समुदाय असे मानतो की, *"नेतृत्वगुण/ LEADERSHIP"* करणारा यशस्वी आयुष्य जगतो. नेतृत्वाचे मार्क्स =
12+5+1+4+5+18+19+8+9+16= *97%* बघा लीडर ही शंभर टक्के सुखी, समाधानी नाहीत, आनंदी तर अजिबात नाहीत..
मग आता आणखी काय गुण आहे, जो माणसाला *१००%* सुखी, समाधानी आणि आनंदी ठेऊ शकतो..?
काही कल्पना करू शकता..?
नाही जमत ...!!
तो गुण आहे..
आयुष्याकडे पाहण्याचा
*"दृष्टिकोन/ATTITUDE"*
A+T+T+I+T+U+D+E = 1+20+20+9+20+21+4+5= *100%.* पहा आयुष्यातील सर्व समस्यांचे निराकरण करून सुखी, समाधानी आणि आनंदी आयुष्य जगण्याचा स्वस्त फंडा आहे, *'आपला आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन'*. तो जर सकारात्मक असेल तर आयुष्य *१००%* यशस्वी होईल आणि आनंदी ही होईल..
*"दृष्टिकोन बदला आयुष्य बदलेल"*
हे फॉरवर्ड आम्ही लहान होतो
हे फॉरवर्ड आम्ही लहान होतो तेव्हा पासून अगदी इमेल वरून अशा गोष्टी यायच्या त्या काळापासून चालू आहे.
अजूनही यात लोकांना गंमत वाटते याची गंमत वाटते.
मला आठवतंय की timepass की
मला आठवतंय की timepass की तत्सम कुठल्यातरी शब्दाचा स्कोअर पण १०० होतो हे ह्याच धाग्यावर टाकलं होतं मी
या का च्या का फॉरवर्ड तयार
या का च्या का फॉरवर्ड तयार करणाऱ्या लोकांकडे किती रिकामा वेळ आहे !!!!
हे अ = १, ब = २ प्रकारचे
हे अ = १, ब = २ प्रकारचे प्रश्न चौथीच्या स्कॉलरशिप परीक्षेला बुद्धिमत्ता चाचणीत यायचे. अजून काही लोक मानसिकदृष्ट्या ४थ्या यत्तेतून बाहेर आले नाहीत असं वाटतंय.
अजून काही लोक मानसिकदृष्ट्या
अजून काही लोक मानसिकदृष्ट्या ४थ्या यत्तेतून बाहेर आले नाहीत असं वाटतंय.>>>>
छान!!!! दिल को बच्चा रखो जी वाचुन तनाने नाही तर मनाने बच्चा राहायला जावे तर हे ऐकुन घ्यावे लागते..
हे काय बरे नाय ब्वा!!!
>>>>मनाने बच्चा राहायला जावे
>>>>मनाने बच्चा राहायला जावे तर हे ऐकुन घ्यावे लागते..
प्रौढत्वी निज शैशवास जपणे बाणा कवीचा असे
काकाफॉ लेखक त्यांचे जपलेले शैशव अतिच गांभिर्याने घेतात. इतके की आपले हात त्यांच्या श्रीमुखात भडकविण्याकरता शैशवु आपलं शिवशिवु लागतात.
सामो
सामो

सामो
सामो

सामो
सामो
इतके की आपले हात त्यांच्या
इतके की आपले हात त्यांच्या श्रीमुखात भडकविण्याकरता शैशवु आपलं शिवशिवु लागतात>>>>
आगागा…बच्चे को मार ही डालोगे क्या??
Pages