काहीच्या काही फॉरवरर्ड्स - २

Submitted by मानव पृथ्वीकर on 2 April, 2025 - 05:31

कायप्पावर, फेसबुक किंवा इतरत्र अनेकदा काहीच्या काही वाटावे असे निनावी लिखाण फिरत असते.
त्यातील काही खास वाटले तर आणि निनावी असले तरच शेअर करण्यास हा धागा.

हा पहिल्या भागाचा दुवा.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आईचा पदर !!! आई ग ! 😁

… जीन्स घालणाऱ्या "Mom" पदर कुठून आणतील….

हे body shaming सारखे attire shaming फार बोकाळले आहे या अंकल लोकांच्या मेसेजेस मधे

बरं, ते स्वत: रोज बर्मुडा- टी घालतात, दुटांगी धोतर नाही नेसत.

कोणी अनोळखी पाहुणा घरी आला,
तर मुलं आईच्या पदरामागे लपायची. >> नशीब! क्षणभर एरॉटिका करतात का काय वाटलं होतं.

आम्ही जेवण झाल्यावर आईच्या पदराला हात पुसायला गेलो असतो, तर फटके पडले असते‌. तिकडे खिळ्याला टॉवेल आहे, त्याला हात-तोंड पुसा, असं अगोड शब्दात सांगितलं असतं.

आई साड्याच नेसते. तिच्या पदराला हात तोंड पुसायला जायची हिम्मत अजून झालेली नाही.असं काही केलं तर (रुमालाने) अश्रु पुसायची वेळ येईल.

नवीन लावणी ऐकू आली

पदरावरती बरबटलेला हात खरकटा हवा
टॉवेलला पुसून ये गाढवा

आईच्या पदरात झोपण्याच्या आनंदाला लहान मुले पारखी होत चाललीत. आईच्या जीन्स्, सलवार, नाईटीच्या जमान्यात पदर आता हरवत चालला आहे.

पुढेमागे कदाचित चाईल्ड सायकॉलॉजी मध्ये पदर थेरपी येईल आणि त्यासाठी जीन्स, सलवार, नाईटी वर घालण्यासाठी खास मुलांसाठी सुती, मऊ कापडाचा रेडी-टू-वेअर पदर देखील मिळायला लागेल, हु नोज?

पदराय तस्मै नम:

हपा Lol

हर्पा Lol
पदरचं बरच घुसडलय या काकाफॉत
>>> Lol

हरपा Lol
तुमची क्षमा मागून...

पदरावरती बरबटलेला हात खरकटा हवा
कामामधुनी वेळ काढूनि रट्टा घालते तुला.

होम मिनिस्टर....

होम मिनिस्टर.... >>>> Lol

होम मिनिस्टरच्या मूळ गाण्यात यमक जुळले आहे का? तसे असेल तर हे ही यमकीफाय करा कोणीतरी. ते ही कोनाड्यात उभी व्हिंदमाता लेव्हलचे असेल तर मग असू दे Happy

तिथे हवा आणी नवा असे यमक जुळले आहे.

पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा
संसारातील समथिंग .. खेळ खेळूया नवा.

BTW काल आकाशवाणी पुणे केंद्रावर हेच्च गाणं लागलेल

वशीकरणाचा जो निनावी काकाफॉ फिरत होता त्यावर थोडा रीसर्च केला तर हे रत्न सापडलं.
काकाफॉचं सगळं मटेरिअल तर आहेच, पण आता ऑथेंटिक झालंय. ( मूळ काकाफॉ आता सापडत नाही)
https://www.youtube.com/shorts/3KMVfYHvh0Q

वशीकरणाचा जो निनावी काकाफॉ फिरत होता त्यावर थोडा रीसर्च केला तर हे रत्न सापडलं.>>हे रत्न आयुर्वेदाचे म्हणजेच बी ए एम एस चे डॉक्टर आहेत. आणि यांच्याच एका दुसऱ्या विडिओ मध्ये सांगितल्या प्रमाणे ते कॉलेजात असताना शिक्षणात ओढी न वाटल्याने ते हॉस्टेलहुन गायब होऊन एकटेच यत्र तत्र निळावंती ग्रंथाच्या शोधात हिंडायचे. Biggrin

Pages