काहीच्या काही फॉरवरर्ड्स - २

Submitted by मानव पृथ्वीकर on 2 April, 2025 - 05:31

कायप्पावर, फेसबुक किंवा इतरत्र अनेकदा काहीच्या काही वाटावे असे निनावी लिखाण फिरत असते.
त्यातील काही खास वाटले तर आणि निनावी असले तरच शेअर करण्यास हा धागा.

हा पहिल्या भागाचा दुवा.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला बुडताना कोणी 'तुमची मदत करू का?' असं विचारलं, तर मी कदाचित 'तुम ची नाही तुम्हा ला' म्हणा, असं बुडण्याआधी म्हणण्याची शक्यता आहे!!

मोरोबा..
Lol
खूपच मस्त.
( तुम्हीच तर नव्हतात ना ते बुडणारे?)

मला बुडताना कोणी 'तुमची मदत करू का?' असं विचारलं, तर मी कदाचित 'तुम ची नाही तुम्हा ला' म्हणा, असं बुडण्याआधी म्हणण्याची शक्यता आहे!! >>> नायतरकाय! Wink
#बुडेनपणवाकणारनाही

अनया, मानव आणि मोरोबा Lol Lol
मी बहुतेक आधी सुखरूप बाहेर येईन, मग आपापल्या घरी जाऊन ज्याने वाचवलेय त्याच्या शुलेच्या चुकांवर कोतबो काढून लगेचच त्याला लिंक पाठवेन. सेफ्टी फर्स्ट Proud

आधी सुखरूप बाहेर येईन, मग आपापल्या घरी जाऊन ज्याने वाचवलेय त्याच्या शुलेच्या चुकांवर कोतबो काढून लगेचच त्याला लिंक पाठवेन. >> तू अस्सल कनेडियन आहेस, काय करत्येस त्या आम्रविकेत! कायम पॅसिव्ह अ‍ॅग्रेसिव्ह. तिकडे फारतर फार डोक्यावरुन पाणी म्हणजे आयरोल देऊन कम्युनिटी फेसबुक ग्रुपवर वाभाडे काढणे हा आमचा जोडधंदा आहे. Wink

आधी सुखरूप बाहेर येईन, मग आपापल्या घरी जाऊन ज्याने वाचवलेय त्याच्या शुलेच्या चुकांवर कोतबो काढून लगेचच त्याला लिंक पाठवेन >>> Lol

अमित Lol
काय करत्येस त्या आम्रविकेत! >>> तुमच्यामुळेच आलेय Proud

पौराणिक काका फ़ॉरवर्डमधे एक मोठाच in-built प्रॉब्लम / contradiction आहे-असते :

एकीकडे आधी कसे सर्वत्र शुद्ध हवा, आयुर्वेदाच्या कृपेनी उदंड हेल्दी आयुष्य, रोजच्या नियमित श्रमामुळे पिळदार-घाटदार शरीरे, जगण्यात सुख - समाधान वगैर सर्वच आयडियल जीवनशैली होती आणि आता ती कशी नाही याचे गहिवर

आणि दुसरीकडे सर्वच अशी आयडियल जीवनशैली जगणारे लोक असतांना वंधत्वाच्या इतक्या जास्त केसेस कशा ? पौराणिक कथांमधे दर दुसरे जोडपे अपत्यहीन आणि त्यासाठी काय काय यज्ञ, जपतप आणि अचाट तपस्या वगैरे ? This just doesn’t add up, does it ?

आता हे मी आमच्या नातेवाईकांच्या ग्रुप मध्ये लिहिलं आणि लोक उखडले तर जबाबदार कोण? ऑ!!! Lol
कशाला लिहिलंत हे इथे! Lol Light 1

अनिंद्य, सही पकडे है! >>>> अगदी. Lol
कबीराचा एक अशा अर्थाचा दोहा आहे- "दशरथ न करते खटपट तो राम कैसे होते". ते डायरेक्ट बोलायचे. Happy

खटपट बिटपट पिढीजात आहे हे मला काकाफॉवरुन समजलंय.
नऊ सोन्याचे रथ खर्ची पाडले तेव्हा हा दश रथ जन्मला. त्याला पायस लागेलच ना!

त्यासाठी काय काय यज्ञ, जपतप आणि अचाट तपस्या वगैरे ?
<<
त्यासाठी यज्ञातला "प्रसाद", स्पेशल देवतेला मंत्र म्हणून "आवाहन" अन गेला बाजार "नियोग" होते.
जास्त पैसे असले तर द्रोणातले किंवा घृतपात्रातले टेस्ट ट्यूब बेबीज पण.

नुसत्या जप तपाने नाही होत असलं काही.

Reading mythology books is like reading erotica if you understand what exactly you are reading..

अनिंद्य, सही पकडे है! >>>१००+++

त्याला पायस लागेलच ना…>>> Lol

आमच्या नातेवाईकांच्या ग्रुप मध्ये लिहिलं तर मला जायदाद से बेदखल करतील
>>>> बेदखल करणारच ना…
या कथांतला सुप्त उद्देश वेगळाच असतो. रोमॅंटीक, हवीशी गोष्ट करून त्याचं फळ मुलाच्या रुपात जन्माला येण्यापेक्षा कायतरी अचाट जप तप, कर्मकांडं प्रमोट केलेली असतात.
कधी मुल न होणारा राजा त्याच्या राणीला घेऊन शिकारीला, सहलीला गेला बाजार उपवनात गेल्याची कथा आहे का? जर जावं लागलंच आणि कुठे चित्तवृत्ती उल्हसित होऊन पुढे काही होण्यासारखं वातावरण दिसलं तर एकतर राजाला शाप मिळायचा, तो मरायचा किंवा राणी नाहीशी व्हायची/मरायची.
म्हणजे काय की गृहस्थाश्रमात प्रवेश केला की ‘न अतिचरामि’च्या ऐवजी ‘न करोमि’वर भर.
याला ग्लोरीफाय करण्याऐवजी एक्स्पोज केलंत तर मग काय होणार?

Lol
मला वाटते...
एकीकडे आधी कसे सर्वत्र शुद्ध हवा, आयुर्वेदाच्या कृपेनी उदंड हेल्दी आयुष्य, रोजच्या नियमित श्रमामुळे पिळदार-घाटदार शरीरे, जगण्यात सुख - समाधान वगैर सर्वच आयडियल जीवनशैली होती आणि आता ती कशी नाही याचे गहिवर ..
हे जे वर्णन आहे ते फार फार तर विसाव्या शतकातले ..किंवा साधारण १८५० पासून १९७० पर्यंत चे असावे...
एकदम पौराणिक काळ नाही अभिप्रेत या आयडियल जीवनशैली ला (आणि तिच्या पुरस्कर्त्यांना!) Happy
आणि तेव्हा तर वंध्यत्वाची वगैरे फारशी समस्या नव्हतीच... जनरली उदंड मुले- लेकरे असत!

कुठे चित्तवृत्ती उल्हसित होऊन पुढे काही होण्यासारखं वातावरण दिसलं तर >>> अशी उदाहरणं आहेत की! फक्त तेव्हा necessarily त्यांची राणी बरोबर असेलच असं नाही. Proud

Pages