चित्रपट कसा वाटला १२

Submitted by धनि on 4 August, 2025 - 10:36

२००० झाले पण Lol

मागचा धागा
https://www.maayboli.com/node/86233?page=66#new

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

The Map That Leads To You (Amazon Prime)

सहज ब्राऊझ करताना हा सिनेमा दिसला. सिनॉप्सिसवरून DDLJ टाइप वाटला. म्हणून बघितला.
DDLJ, ZNMD, KHNH सगळ्याचं मिश्रण आहे. टिपिकल बॉलिवुडी स्टोरी आहे. साम्यस्थळं शोधत बघण्यात वेळ गेला, अख्खा पाहिला गेला. नाहीतर हिरो-हिरॉइनमध्ये फारशी ऑनस्क्रीन केमिस्ट्री जाणवली नाही.
हिरोजवळ असलेल्या डायरीचा ट्रॅक चांगला आहे, पण तो नीट डेव्हलप केला नाहीये.
असे सिनेमे बनवण्यात हॉलिवूडला बॉलिवूडच्या क्लासची गरज आहे.

कुठल्याशा इंग्रजी कादंबरीवर आधारित आहे असं टायटल्समध्ये दिसलं.

आशा भोसले अभिनीत माई पाहिला. अल्झायमर आजाराची ओळख व्हावी म्हणुन याची निर्मिती केली गेलीय. बर्‍यापैकी वास्तव दाखवलेय. आशा भोसलेनी अगदी सहज काम केलेय. अजिबात नवखेपण जाणवत नाही. पद्मिनी कोल्हापुरे, राम कपुर, क्षिती जोग इत्यादींची कामेही छान आहेत.

सर्वात मोठा धक्का म्हणजे निरुपा रॉय वकील असणं आणि कोर्टात नवर्‍याविरुध्द खटला लढवून त्याला हरवणं Happy

नवीन Submitted by चीकू on 4 August, 2025 - 14:38
हा .... हा....... हा.... हा.................हा....

सर्वात मोठा धक्का म्हणजे निरुपा रॉय वकील असणं आणि कोर्टात नवर्‍याविरुध्द खटला लढवून त्याला हरवणं Happy

नवीन Submitted by चीकू on 4 August, 2025 - 14:38
हा .... हा....... हा.... हा.................हा....

Happy निकाल देताना जजने "ते बाकी सगळे ठीक आहे पण तुमची मुले ठीक आहेत ना? आणि सगळी तुमच्या घरीच आहेत ना? एकदा चेक करा" नक्की म्हंटले असेल.

पण तुमची मुले ठीक आहेत ना? आणि सगळी तुमच्या घरीच आहेत ना? >> Lol

घरी गेल्यावर शिलाई मशीन अजून चालवता का ?

हो ते ही Happy

करीब करीब सिंगल - नेफि (लौकर बघा. जात आहे तेथून)
अस्मिताने पूर्वीच रेको दिले होते. परवा ब्राउज करताना दिसला. लगेच लावला आणि प्रचंड आवडला. इतके दिवस कसा पाहिला नाही असे वाटले बघितल्यावर.

इरफानचे कॅरेक्टर इतके मजेदार व अतरंगी आहे! डेटिंग साइटवर हिरॉइन - "जया" ला भेटल्यावर तिला आपल्या तीन "एक्स" बद्दल सांगतो, व तिलाही बरोबर बोलावतो त्यांना भेटायला, ते ही तीन वेगळ्या शहरात (दिल्ली, जयपूर आणि गंगटोक बहुधा). तो त्यांचा प्रवास, त्यातले अनुभव, त्यातून एकमेकांची होणारी ओळख असे सगळे यात आहे. संवाद व सीन्स अफलातून आहेत. नीट लक्ष दिले नाही तर काही काही निसटून जातात. जया चे काम केलेली साउथची अ‍ॅक्ट्रेस आवडण्यासारखी आहे. पण इरफान ला तोड नाही. त्याची संवादफेक, मॅनरिजम नेहमीच आपल्याला लगेच एंगेज करतात पण इथे त्याची सुरूवात अगदी अंडरस्टेटेड आहे.

तो प्रथमदर्शनी अजागळ दिसतो. जयाचा आधीचा नवरा जिवंत नसतो. ती पुन्हा डेटिंग सुरू करताना यालाच पहिली भेटायला आलेली असते - एका कॅफे मधे. थोडा वेळ वाट पाहून बहुधा असे काही करायला नको म्हणून तेथून निघते. पण ती बाहेर पडताना हा नेमका समोर येतो - आणि तिला म्हणतो लोक माझा चेहरा पाहून मग रिजेक्ट करतात. तू तर आधीच करत आहेस! Happy

मग ओळख होताना आपला कवितासंग्रह प्रकाशित झाला आहे म्हणता म्हणता हळूच "सेल्फ पब्लिश्ड" हे एक त्यात अ‍ॅड करतो. आणि वर - कोणीही विकत घेतलेला नाही. मित्रांना दिले तर एकानेही वाचले नाही वगैरे पासून जी सुरूवात होते ती पुढे आणखी धमाल होते. तो पैसेवाला आहे. त्याच्या तीन एक्स गर्लफ्रेण्ड्स आहेत - त्यांच्याबद्दल तो एकसोएक कहाण्या सांगतो. प्रत्यक्षात त्या कशा उलगडतात ते ही मजेदार आहे.

टोटल केऑटिक कॅरेक्टर आहे. तो बोलतो मजेदार, जेथे जातो तेथे रमतो. जगन्मित्र टाइप. साधा टॅक्सीने जाताना वाटेत चालत चाललेले ५-६ लोक बरोबर घेतो. जयाबरोबर फेअरी क्वीन ने अल्वार ला जायला निघतो. पण त्या गाडीत जो काही खाण्याचा इंतजाम असतो त्यात पकोडे नाहीत म्हणून प्लॅटफॉर्मवर उतरून ते घेताना चुकून दुसरीच गाडी पकडतो. पण त्यातही तेथे त्या अर्ध्यापाउण तासांत पब्लिकशी मैत्री जमवतो - जास्त लिहीत नाही - ते प्रत्यक्षच पाहा.

एक दोन गाणी फार मस्त लिहीली आहेत - धमाल लिरीक्स. सगळी लक्षात नाहीत. बघा. फुल रेको. आणि अस्मितालाही टोटल धन्यवाद. फार मस्त पिक्चर सापडला. रिलीज झाला तेव्हा काही खास नाही असे काहीतरी वाचले होते त्यामुळे राहून गेला असता बघायचा.

करीब करीब सिंगल छान पोस्ट फा आणि संपूर्ण +७८६
फार अतरंगी चित्रपट आहे आणि तितकेच इरफानचे कॅरेक्टर.
मी सुद्धा फार उशिरा पाहिला आणि कुठे फार कौतुक न ऐकल्याने असे झाले. पण माझी सुद्धा पाहिली रियाक्शन अशीच होती की अरे हा तर मस्त आहे..
बहुधा आपल्याकडे फार लोकांना आवडत नसावेत असे चित्रपट की काय माहीत त्यामुळे अंडररेटेड राहिला असावा. पण निदान यातल्या इरफानच्या अभिनयाला तरी हाईप मिळायला हवी होती..
इथे विषय काढल्याबद्दल धन्यवाद. आता पुन्हा बघायला हवा.

“करीब करीब सिंगल” - छन लिहिलंयस फा. खूप पूर्वी पाहिला होता. तुझी पोस्ट वाचताना काहीच आठवत नव्हता, पण तो भजीचा सीन एकदम आठवला आणि लिंक लागली. मस्त आहे मूव्ही.

करीब करीब सिंगल झी-५ वर 'मल्याळम' भाषेत फ्री उपलब्ध आहे
हे लॉजिक काही झेपलं नाही Uhoh

मी हा थोडासा बघितलाय बहुतेक. ती हिरॉईन फोनवर पासवर्ड टाईप करत असते तेव्हा तो बोटांची हालचाल बघून पासवर्ड ओळखतो असा सीन आहे का याच्यातच? बघायला पाहिजे आता पूर्ण.

मी पाहिला आणि मला कंटाळा आला.

दोघेही डेटिंग किंवा एकमेकांबद्दल फारसे सिरियस नाहीत असे वाटत राहते. त्यामुळे इर्फानची जेलसी पटली नाही. आता द एंड करायचा म्हणुन ती अचानक दाखवली असे वाटले. मुळात जो स्वतःचे एक्सेस अजुनही माझ्या प्रेमात आहेत हे सिद्ध करायला बाहेर पडलाय त्याला दुसर्‍याच्या एक्सचा इतका राग का यावा. तिने आधी का सांगितले नाही असे त्याचे मत असेल तर ते मी पाहायचे विसरले असणार. तसे दाखवले असते तरीही मला पटले नसतेच. ते डेटिंग साईटवर भेटलेले असतात, मॅट्रिमोनी साईटवर नाही.

इरफानच्या कामाबद्दल काय बोलावे. काम तर तो उत्तमच करतो. हिरोईनही भुमिकेत फिट बसते, पस्तिशीची पुरंध्री वाटते.

कथाबीज जरा ढेपाळल्यासारखे वाटले म्हणुन आवडला नाही.

बाकी गाडीने जाताना वाटेतले अनोळखी पॅसेंजर पिकप करणार्‍या, डब्यात खायची सगळी व्यवस्था असतानाही पकोडे नाहीत म्हणुन रेल्वे स्टेशनावर पकोडे घ्यायल्या उतरल्यावर त्यात गुंगुन जाऊन आपली गाडी विसरणे वगैरे करणार्‍या नवर्‍यांकडे बायका किती प्रेमाने पाहतील हे सांगायला नकोच. Happy

करीब करीब सिंगल आवडला होता. इरफान तर मस्तच आहे पण पार्वतीचेही चांगले काम आहे.

स्पॉयलर अलर्ट सिंगल मैत्रिणींना बेबी सीटिंगला गृहीत धरणारा सीन जाम आवडला होता.

मस्तच लिहिलंय फा. दोनदा वाचला. मी तर भुनभुनच लावली होती तरीही औपचारिकता ठेवून - टोटली वेलकम. Happy उलट मला माझ्याइतकाच इतरांना आवडलेला बघून मजाच येते. २६ ऑगस्टला जातो आहे मित्रमैत्रिणींनो लवकर बघा.

इरफानचाच आहे तो सिनेमा. अर्थात त्या जया/ पार्वतीचे कामही सहज आणि उत्तम आहेच पण इरफानचे वियोगी नामक कॅरेक्टर एकदम वल्ली आहे. सुरवातीला उथळ, काहीसा clumsy, थोडा थापाड्या वाटतो पण हळूहळू प्रामाणिक, सौजन्यशील आणि एक वॉर्म्थ असणारा वाटायला लागतो. स्त्रियांच्या बाबतीत योग्य ती स्पेस देणारा आणि तरीही अघळपघळ आणि मोकळा दोन्ही आहे तो. दोन्ही एकत्र दुर्मिळ असतं.

तो प्रवास म्हणजे तिला पटत नसतानाही एकटेपणाला कंटाळून ती निघते, पुढे काहीही होत राहते असा आहे. पण ती तिच्या झोन मधून बाहेर येते. इंट्रोव्हर्ट आणि रिझर्व्ह्ड आहे ती, तिला त्याचं अति अघळपघळ असणं सोसवत नाही बरेचदा. तरीही एकदा रोलर कोस्टर निघाले की 'काही का होईना, एन्जॉय द राईड' असं तिच्यासाठी घडत जातं. त्याचं हे नेहमीचं आयुष्य असतं पण तिच्यासाठी बऱ्याच शक्यता घेऊन येतं.
दोघेही एकमेकांशी अजिबात खोटं वागत नाहीत किंवा impress करायचा प्रयत्नही करत नाहीत. जमलं तर बघू मोडमधेच शेवटपर्यंत असतात, त्यामुळे त्या नात्यावर कसलाच तणाव नाही, अपेक्षा नाहीत काहीही नाही. वेड्यांचा बाजार आहे. एकदम हलकाफुलका, सर्वांसोबत बघता येईल असा आणि एंगेजिंग आहे. Happy

एक्स गर्लफ्रेंड लग्न झाल्यावर 'फुंटफुंटके रोई' म्हणतो तर ती 'बिदाईला सगळ्याच मुली रडतात, तुला कसं कळलं' म्हणते, एक्सच्या बापाने लग्नात फुकट राबवून घेतले, नंतर 'मामाजी नहीं कहेना चाहिए था' वगैरे हहपुवा आहे. त्याचा गोंधळ तर काय वर्णावा - खडावा घालून चालणं काय, शायरी काय, बिर्याणी आणि रायता म्हणजे लैला मजनूची जोडी, आंबा कसा खावा, चटोरी मठरी, पकोडे.- काहीही बोलत असतात तरीही लिंक तुटत नाही, उथळ होतं नाही, सुसूत्रता राखली जाते.

रागाच्या भरात पकोडे खाताना मागे वाजणारे 'मैं तेरी जान लेंलू' हे धमाल आहे. अतिफ अस्लमचे 'जाने दे' तर माझं आवडतं रोमॅन्टिक गाणं आहे. ते एकच गाणं गाणं म्हणून वेगळं आहे. बाकी सगळी पार्श्वभूमीवर ऐकू येतात. त्यामुळे कथा थांबत नाही. चित्रपट प्रसन्न आहे. मी अनेक वेळा पाहिला आहे. ऋषिकेश, जयपूर आणि गंगटोकचे चित्रिकरण शिवाय फेअरी क्वीनचे चित्रिकरण सुद्धा visually appealing आणि रम्य आहे. संवाद तर गाभा आहे चित्रपटाचा. इरफानच्या चाहत्यांनी जरूर पाहावा असा. Happy

>>> इरफानच्या चाहत्यांनी जरूर पाहावा असा
अस्मिता आणि फाला आवडला म्हणजे बघू की नको असं वाटायला लागलंय मला. Proud

Happy आता तर पाहाच. नाही आवडला तर मीम मिळेल, गटं पडतील. शिवाय मनातल्या मनात दुसरीला अभिरुची वरून टिका करत वरून 'मनमोकळं' वगैरे हसू. Wink Proud

Happy थॅंक्यू ऋ, तुलाही तितकाच आवडलाय असं तुझी पोस्ट वाचून लक्षात आलं होतंच.

फारेण्डने रेको दिला म्हणून आणि ओटीटीवरून जातोय म्हणून बघायला सुरूवात केलीये. कसला धमाल आहे. इरफान खानचं कॅरेक्टर एकदम अनप्रेडिक्टेबल आहे. आवडतोय. Happy

बघते. Happy
मनातल्या मनात टीका? माझी टीपापा मेंबरशिप रद्द होईल, तो चान्स घेऊ शकत नाही. Proud

या पुढच्या पोस्ट्स वाचून छान वाटले. सहज आवडण्यासारखा पिक्चर आहे तो. कदाचित पूर्वी काहींनी आधीच्या चिकवा धाग्यांवर लिहीलेही असेल. पोस्ट आवडलेली कळवलेल्यांचे आभार.

सुरवातीला उथळ, काहीसा clumsy, थोडा थापाड्या वाटतो पण हळूहळू प्रामाणिक, सौजन्यशील आणि एक वॉर्म्थ असणारा वाटायला लागतो. स्त्रियांच्या बाबतीत योग्य ती स्पेस देणारा आणि तरीही अघळपघळ आणि मोकळा दोन्ही आहे तो. दोन्ही एकत्र दुर्मिळ असतं. >>> हे फार चपखल आहे. विशेषतः ती दुर्मिळ कॅटेगरी. मला त्याबद्दल लिहायचे होते पण अचूक शब्दांत पकडता आले नाही. तो एकदोनदा प्रायव्हसीचे नॉर्म्स ओलांडतो असे वाटले पण त्यात अघळपघळपणा जास्त आहे, हॅरॅसमेण्ट नाही. आणि ते दोघे ऑलरेडी डेटिंग करत आहेत. इव्हन अशा वेळी जर दोघेही जीडीपीआर, सीसीपीए लेव्हलच्या गाईडलाइन्स पाळत राहिले व कोणीच पाऊल उचलले नाही, तर ती रिलेशनशिप पुढे कशी जाणार Happy

रेल्वे स्टेशनावर पकोडे घ्यायल्या उतरल्यावर त्यात गुंगुन जाऊन आपली गाडी विसरणे >>> हे "गुंगुन जाउन" फार भारी आहे त्यातले - तेच त्याचे कॅरेक्टर आहे. तो जे काही करतो त्यात गुंगुन जातो. तेथेही त्या पकोडेवाल्याशी किमतीवरून हुज्जत घालतो पण प्रत्यक्षात पैसे जास्तच देऊन निघतो. "डेस्टिनेशन - जर्नी" वाले इन्स्पिरेशन कोट्स असतात, तसा आहे तो टोटल. वरती अस्मिताने एन्जॉय द राइड लिहीले आहे तसेच.

स्वाती - बघच. तुलाही आवडेल. ते ममव पिक्चर वेगळे Happy

येस, बघते. Happy

>>> रेल्वे स्टेशनावर पकोडे घ्यायल्या उतरल्यावर त्यात गुंगुन जाऊन आपली गाडी विसरणे
हे वाचून 'जब वी मेट'मधला पाण्याची बाटली विकत घेण्याचा सीन आठवला.

>>> सुरवातीला उथळ, काहीसा clumsy, थोडा थापाड्या वाटतो पण हळूहळू प्रामाणिक, सौजन्यशील आणि एक वॉर्म्थ असणारा वाटायला लागतो. स्त्रियांच्या बाबतीत योग्य ती स्पेस देणारा
त्याचा मेट्रोमधला रोलही असाच होता - आणि अर्थातच त्याने केलाही मस्त होता तोही.

स्वाती,
स्त्रियांच्या बाबतीत अभिनय म्हटला तरी इरफानला रिस्पेक्टफुल, मोकळे आणि स्वीट वागणं अगदी अचूक जमतं. मोकळं म्हणजे गळेपडू / उथळ किंवा रिस्पेक्ट म्हणजे 'चार हात दूर/ घाबरून' असा काही तरी आपल्याकडे समज आहे. त्याला छेद देणारे त्याचे कॅरेक्टर्स असतात.

मला वाटते तुला आणि इरफान फॅन्सना नक्की आवडेल. नक्की पहा. कुठं कुठं 'फिल्मी' किंवा काहीच महत्त्वाचे घडत नाहीये असं वाटेल पण ते त्या एकुण गोंधळात फिट बसेल. सगळं बिनमहत्त्वाचंच आहे त्यात, ती रिलेशनशिप तशीच बॉन्ड होत जाते. महत्त्वाच्या गोष्टींवरून किंवा कॉमन विसडमवरून कनेक्ट होणं नाहीच्चे, सेंट्रलाईझ्ड केऑसवरूनच कनेक्ट होणं आहे. त्यामुळे नेहमीपेक्षा वेगळा आहे. एखादी व्यक्ती जी बरीच एकाकी, आखीवरेखीव आवडणारी म्हणावी अशी आणि दुसरी गोंधळातच जगणारी. ते दोघे एकमेकांना कोणताही ताणविरहित पर्स्पेक्टिव्ह देतात. लग्नही ठरवत नाहीत पण feelings ॲक्नॉलेज करतात एवढंच आहे. In general, people having no agenda, or men having no agenda is magnetic for me. Purest form of human mind- ते मला इरफानमधे आढळते. Extremely rare phenomenon.

फा,
दोघेही जीडीपीआर, सीसीपीए लेव्हलच्या गाईडलाइन्स पाळत राहिले व कोणीच पाऊल उचलले नाही, >>> Lol

आठ वर्षांपूर्वीचा सिनेमा आहे आणि चार दिवसांत नेटफ्लिक्सवरून जातो आहे, आता तरी बघा. Happy

झाला संपला. Happy
एंगेजिंग आहे. वेगळी ट्रीटमेंट,चांगले अभिनय.
फ्लो बरोबर वाहत जाऊन एंजॉय करायचा सिनेमा आहे. तिचं कॅरेक्टर पण चांगलंच बिल्ड केलंय.
आसाम कि सिक्कीम च्या कॅफेमधे तिला गृहीत धरणार्‍या सर्वांना फोन करते ते फार छान होतं.
उगीचच मिस्टर अ‍ॅण्ड मिसेस अय्यरची आठवण आली. दोन्हीत प्रवासात घडणार्‍या घटना हे एकच कॉमन आहे.
अय्यर मधे सगळे कॅरेक्टर्स जिथल्या तिथे राहतात आणि प्रवास संपल्यावर दोघेही आपापल्या दुनियेत जातात.
इथे तसं होत नाही. दोन्हीतही कथा चार ओळींची पण स्क्रीप्ट कशी खुलवलीये तेच बघायचं.

अजून एक . इरफानच्या भूमिकेत सर्वांना इमॅजिन करून बघितलं. कुणीच फिट बसत नाही.
सध्याचा शाहरूख मॅच्युअर्ड आणि ऑलराउंडर आहे, पण तो आता पिकलेला पेरू वाटतो. मेथड अ‍ॅक्टींगवाल्या मंडळींपैकी नवाजुद्दीन त्याच्या क्रिमिनल रेकॉर्ड मुळे (फिल्मी ) या रोल साठी सूट नसता झाला. केलंही असतं त्याने. पंकज त्रिपाठी अंडरप्ले वाला आणि आता थोडा वयस्कर वाटणारा. शाहीद किंवा रणवीर कपूर चालला असता कदाचित ).

करीब करीब च्या सर्वच पोस्टी खूप छान आहेत. आवडल्या. त्यावर नंतर.
शुभरात्री. Happy

हे वाचून 'जब वी मेट'मधला पाण्याची बाटली विकत घेण्याचा सीन आठवला. >>> Happy हे मजेदार होईल. एक फॅन फिक्शन करायला पाहिजे. यातला इरफान आणि त्यातली करीना एकत्र आले तर काय कहर गोंधळ होईल Happy ते दोघेही एकाच स्टेशनवर गाडी चुकवतील एकमेकांना पत्ता नसताना आणि मग गाडीच्या मागे धावताना त्यांना कळेल की गाडी सुटली पण दोघेही तेथेच आहेत.

मी अजुनही जिस देश मे गंगा बहती है, मधुमती, बालिकाबधु व नवरंग मधे अडकले आहे. तसे सिनेमे आता होत नाहीत.

पाहिला. आवडला. रेकोसाठी धन्यवाद. Happy
कॅरेक्टर्स लिहिलीही चांगली आहेत आणि वठवलीही मस्त आहेत.
गोष्ट प्रवासाचीच आहे, प्रत्यक्षातल्या आणि त्यांच्या आतल्याही.

*** स्पॉइलर अलर्ट ***

जयाचा आतला प्रवास दिसतोच, कारण तिच्या हसण्यासारखंच तिच्यात एक चाइल्डलाइक नितळपण आहे. नवरा गेल्यावर तिने आयुष्य सावरलं आहे, काम करते आहे, हाताखाली माणसं काम करताना दिसतात, भावाला, मैत्रिणींना/शेजार्‍यापाजार्‍यांना धरून आहे. गोतावळ्यातले लोक तिचा थोडासा फायदाच घेतात हे तिला माहीत आहे - ते 'स्टेपनी आँट' ऐकून तिला वाईट अर्थातच वाटतं, पण फारसा धक्का बसलेला दिसत नाही. गोतावळा टिकवण्याच्या खेळातले नियम तिला माहीत आहेत, आणि या खेळातला हुकुमाचा एक्का आपल्या हातात आता नाही हे तिने मान्य केलं आहे. सिक्युअर्ड वातावरणात वाढलेली 'अच्छे घर की लडकी'. हॉटेल बुक करायला सांगितल्यावर आश्रमात खोल्या बुक करणारी.

डेटिंग साइटवर इरफानचा रिस्पेक्टफुल भाषेत आलेला मेसेज म्हणूनच तिला आवडतो. आणि इव्हेन्च्युअली त्याच्यामुळे ती तिच्या त्या कोषातून बाहेर पडते. इरफानवर चिडून का होईना, अगदी कम्फर्टेबली नुकतीच जुजबी ओळख झालेल्या फ्रेन्च सहप्रवाशाबरोबर वाइन घेताना दिसते तेव्हा सुरुवातीला क्यूबमध्ये एकटीने डबा खाणारी जया आठवून गंमत वाटते. हे इरफान 'करत' नाही, तो कॅटलिस्ट होतो. उजेड मिळावा आणि कोंब उगवून यावा तशी तिची जीवनेच्छा उमलत जाते.

इरफानचं कॅरेक्टर त्यामानाने गुंतागुंतीचं वाटलं मला. तो तिच्यासारखं 'ओपन बुक' नाही. तिच्यासाठीही नाही आणि प्रेक्षकांसाठीही नाही.
ती अनेकदा फोर्थ वॉल ब्रेक करताना दिसते (कॅमेराकडे बघत प्रेक्षकांशी बोलते) - त्याने स्वत:भोवती उभारलेली धुक्याची भिंत मात्र अभेद्य आहे.
तो काम काय करतो, पैसा कुठून आला (बहुतेक वडिलार्जित असं एका ठिकाणी म्हणतो), आईवडील्/फॅमिली, त्या आधीच्या तीन गर्लफ्रेन्ड्सबरोबर ब्रेक अप का झाला, तिलाही शेवटपर्यंत कळत नाही आणि आपल्यालाही.

त्याला बहुधा मेजर कमिटमेन्ट फोबिया आहे. कदाचित इन्सिक्युरिटीही. (पोएट्स!!!)

पहिल्या तीन गर्लफ्रेन्ड्समधली त्याची इन्व्हॉल्वमेन्ट बहुधा चढत्या भाजणीने वाढत गेली होती - धीर चेपत गेला असावा. तरीही कमिट करू शकला नाही तो नाहीच. पहिली तर बहुधा नुसताच क्रश असावा - ती अगदी बालमित्र म्हणून सहज भेटते त्याला. दुसरीची जवळीक जास्त, थोडीफार शारीरिकही असावी, ती जाताना गालावर पेक् देऊन जाते त्यावरून. तिसरीशी त्याहूनही डीपर - इमोशनल कनेक्शन झालं असावं - तिला भेटायची हिंमत होत नाही त्याची. शिवाय तिला भेटेपर्यंत जयावर मन जडत चाललं आहे आणि तिचाही एक्स बॉयफ्रेन्ड होता हे ऐकून 'दर्द' झालेला आहे.
असा दर्द आपण ज्यांना दिला त्यांच्याशी नजर कशी भिडवणार?!

बाकी ते लोक जमवणं, खाण्यापिण्याचा शौक, गमत्येपणा, चार्म, हे सगळे सगळे मुखवटे आहेत. तसा चार्म आणि गमत्येपणा वापरूनच त्या तीनही रिलेशन्समधून पाय काढून घेतला असावा कारण त्या मुली त्याच्यावर चिडलेल्या दिसत नाहीत.
त्याच्या त्या प्लेन आणि ट्रेन मिस् करण्यातही सबकॉन्शसली जवळीक टाळण्याचा प्रयत्न असावा अशी शंका येते. प्रेम हवंही आहे आणि टाळायचंही आहे.

थोडंसं 'जिंदगी मिलेगी ना दोबारा'मधल्या फरहानच्या कॅरेक्टरसारखं आहे हे. तोही खूप मजामजा करतो. पण मनातलं काय ते फक्त डायरीत लिहिलेल्या कवितांना माहीत असतं, तिथे इतर कोणालाच प्रवेश नाही.

जया बहुधा पहिलीच आहे जिने आपण होऊन त्या कविता शोधून वाचल्या आहेत, आणि पर्यायाने त्याला समजून घेतलं आहे. त्याला ते तिच्या लॅपटॉपवर जेव्हा दिसतं, तेव्हा तो फोबिया गळून पडतो. आता दोघांत भिंत राहिलेली नाही.

अस्मिता, स्वाती आंबोळे दोन वेगवेगळे रिव्ह्यू. दोन्हीही आवडले.

त्याचं पैसे कमावण्याचं साधन म्हणजे वेगवेगळ्या नवीन डिशेसची रेसिपी फूड चेन असलेल्या हॉटेल्सना विकून रॉयल्टी कमावणे. शेवटी हेसगळं खोटं असेल, त्याने राहतं घर विकून पैसे उडवले असा ट्विस्ट दाखवला नाही. आवर्जून पहायला सांगितल्याबद्दल फारेण्डचे आभार.

Pages