चित्रपट कसा वाटला १२

Submitted by धनि on 4 August, 2025 - 10:36

२००० झाले पण Lol

मागचा धागा
https://www.maayboli.com/node/86233?page=66#new

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दूर हटो मधुबाला वालो, आधी हे वाचा
Nalini Jaywant was an Indian actress who appeared in Hindi films in the 1940s and 1950s. Filmfare in their poll in the 1950s declared her the most beautiful woman in the movies.

तब्बू दार ठोठावत बसली तोवर यामी गौतम खिडकीतून आली सुद्धा >>> Lol नाही इव्हन यामीसुद्धा त्या लीगमधे नाही.

असामी - हे लुक्स बद्दल नाही. नक्की काय साम्य वाटले सांगू शकत नाही. फ्रेण्ड्स मधला माइक म्हणतो तसे I can't argue with you if you are going to get all rational about it.

माधुरीला मधुबाला इतका सेन्स ऑफ ह्यूमर नाही. नसेल. पण तरीही माधुरीला तोड नाही. जुही मस्त आहे. pretty close.

माधुरी बाकी ठीकठाक असली (आवडायची त्यांना आवडो बापडी Proud ), >>> Lol सध्या "बाकी ठीकठाक" वर समाधान मानतो. साधारण असे. बाय द वे स्वाती "पाँच रूपैय्या..." तर मी खूपदा पाहतो. तू तो धागा वाचला नसशील पण "आई कोठे काय करते" मधल्या एका सीनला मला यातला "दिलरूबा, सच कहा, साँच तेरा प्यार बाकी माया है" मधला किशोरने अचानक केलेला सर्वसंगपरित्याग आठवला होता.

सुविचार Lol

पण जुहीचे निखळ हसू सोडले, तर अस्मिताच्या बाकी पोस्टशी घोर असहमती. मला उलट नाच या प्रकारातच इंटरेस्ट नाही त्यामुळे तिचा डान्स मी कधी आवडीने पाहिलेला नाही. पिक्चरमधला तिचा जनरल वावर हा प्लेझंट असे. आताच्या एकाही अभिनेत्रीला तसा जमणार नाही. मी तिचे गेल्या १०-१२ वर्षातले काम फारसे पाहिलेले नाही. माझ्या डोक्यात लेट ८०ज - अर्ली ९०ज मधली माधुरी फ्रीज झालेली आहे.

अभिनय.
लोकांना मुघले आझम मधील मधुबाला पेक्षा अनारकली तील बीना रॉय चा अभिनय जास्त पसंत होता.

“ 'शी लूक्ड एक्सॅटली लाईक दुर्गा खोटे ऑर काननबाला'” Rofl

फा चं आणि माझं मत माधुरीच्या बाबतीत बराब्बर जमतां. ९०‘ज मधल्या विलेक्षणी त्याचे आणि माझे समदे घोडे विनमधी होते.

तिने फनी या सदरात केलेलं अ‍ॅक्टिंग बघवत नाही>>>> 100+++

मला त्यात तब्बूचे नाव वाचून 'शी लूक्ड एक्सॅटली लाईक दुर्गा खोटे ऑर काननबाला'
>>>> Lol

जुही चावलाला मिश्क्लि बोन होतं>>>, सुश्मिता सेनचा सेन्स ऑफ ह्युमर चांगला आहे. नीना आणि श्रीदेवीलाही जोरदार अनुमोदन…

चालबाज मधे सनी आणि रजनीकांत श्रीदेवी पुढे शाळकरी मुलं वाटतात. सब कुछ श्री आहे हा मूव्ही.
मिस्टर इंडियाचं नाव बदलून मिस इंडीया ठेवावं एव्हढी श्रीदेवीने धमाल केली आहे.

मधुबाला खेळकर, अवखळ , माधुरी डॉमिनेटिंग. श्रीदेवी ऑलराउंडर.
रेखा वेगळीच .

हम आपके है कौन मधे माधुरीने सुरुवातीचा लाईट, खेळकर भाग चांगला केलाय की. जुहीने तशी कामं जास्त प्रमाणात आणि जास्त चांगली केली आहेत हे मान्य. हम है राही प्यार के मधलं काम माधुरी जुहीइतकं चांगलं नसती करू शकली. दोघींच्या वेगवेगळ्या strengths होत्या. माधुरीने कामांमधे व्हरायटी आणली नाही. ती विविध प्रकारची कामं करू शकली नसतीच असं मला वाटत नाही. तिची अभिनयक्षमता चांगली असणार, कारण तिचे जे काही सिनेमे बघितलेत त्यात ती कुठे कमी पडते असं जाणवलं नाही. पण तिने वेगळ्या भूमिका एक्स्प्लोअर केल्या नसतील किंवा तिला मिळाल्या नसतील. तिचं व्यक्तिमत्त्व ग्रेसफुल होतं. सौंदर्याबद्दल वादच नाही.
मी या लोकांच्या मुलाखती वगैरे फारशा बघत नाही. पण तीन चार वर्षांपूर्वी 'माझा कट्टा' वर माधुरी दीक्षित आली होती ती मुलाखत बघितली होती. मस्त झाली होती. एकदम सहज बोलणं होतं तिचं. तिची 'फेम गेम' वेबसीरीज बघितली आहे. ठीक आहे. तिचा चेहराही आता कृत्रिम दिसतो.

वावे छान पोस्ट.
खेल सिनेमा बघितला नसेल तर अवश्य पहा, फुल TP आहे.

तिने फनी या सदरात केलेलं अ‍ॅक्टिंग बघवत नाही.
>>>
अपवाद 'खेल'. पण त्यात लेखन, मॅड स्टोरी आणि स्क्रिप्ट्ने मजा आणली आहे, हे खरं.

पहला पहला प्यार है - गाण्यात ती तो पिंक लेस वगैरेवाला फ्रॉक ड्रेस घालून किचनमध्ये काम करत असते.

मै प्या कि मधला कबूतर जा जा गाण्यातला भाग्यश्रीचा पांढरा ड्रेस विसरलात, लोकहो, बटबटीत फुलांचा वेल असलेला, नंतर मार्केटमध्ये तसल्या ड्रेसेसची लाट आली होती.

तशी लाट क.से.क.त. नंतर पांढरा लखनवी ड्रेस आणि लाल बांधणीची ओढणी या ड्रेसची आली होती. तो मात्र एव्हरग्रीन ड्रेस चॉइस आहे.

. नव्या धमाल आणि भूलभुलैया मधे तिला विनोद मुळीच जमलेला नाही. मला तर ती बरेचदा फक्त नृत्यांगना वाटते, अभिनेत्री नाही. हातचं राखून काम करते. फार क्वचित आवडलं आहे तिचं काम - आजा नचले वगैरे मधे>>>>>>

हाहा…. माधुरीने धमाल, भुलभुलैया किंवा आजा नचले मधुन स्टारडम गाठले नाहीय. तिची जादु ओसरल्यानंतरच्या काळातले तिचे चित्रपट पाहुन तिच्याबद्दल मत बनवणे योग्य नाही. हे सगळ्याच कलाकारांबद्दल आहे. ते ऐन भरात असतानाची जादु वेगळीच.

माधुरी जेव्हा ऐन भरात होती तेव्हा तिला लेडी अमिताभ म्हटले जाई इतकी किंमत तिला मिळत होती, एकटीने चित्रपट गाजवत होती आणि तेही सोबत अनिल कपुर वगैरे असताना. नाहीतर आज कंगनाही एकटीने एखादा चित्रपट गाजवते पण सोबत नाव नसलेला कुणी असतो. माधुरी तेव्हाच्या टॉपच्या नटांसोबत काम करत असतानाही स्वतःच्या नावावर लोकांना खेचत होती. same with Sridevi. दोघीनीही एकच काळ शेअर केलाय आणि दोघीही राण्या होत्या.

केकु, हे मीही वाचलेय. मी तिचे नंतरचे चित्रपट पाहिले, जसे काला बाजार. त्यात मला ती जाड, बेढब वगैरे वाटली. पण ४०-५० च्या दशकातले तिचे चित्रपट पाहण्याइतपत पेशन्स माझ्यात असता तर माझेही चांगले मत झाले असते.

बाराव्या शतकातली लोकनाट्य अभिनेत्री सुमकुंडरी देवीच्या नखाचीही सर आजच्या अभिनेत्रींना नाही .............
अशी पोस्ट चिकवावर येऊ शकते.

खेल सिनेमा बघितला नसेल तर अवश्य पहा, फुल TP आहे>>>>

हल्लीच याचा मुळ हॉलिवुड पाहिला dirty rotton scroundals. मस्तच.

खेल तितकासा चालला नाही असे वाटते. आठवत नाहीय नक्की.

जुहीच्या चेहर्‍यावर एक खेळकर हास्य आहे.

स्त्री कलाकारांना मध्यवर्ती घेऊन कुठे वेगवेगळ्या भावनांचे चित्रपट बनतात? सुडकथा बनल्यात फक्त. अंगुर कित्येकांचा आवडता आहे पण त्यात सन्जीव कुमार आणि देवेन वर्माने किती छान विनोदी काम केले असे सगळे म्हणतील. दिप्ती नवल, मौशमी, पद्मा चव्हाण यांना त्या कॉमेडीत कितपत स्कोप दिला गेला? मौशमीच्या वाट्याला दोनचार चमकदार संवाद आले तितकेच. त्यातही ‘मै तुमसे अभी कभी कुछ भी नही मांगुंगी, हार लाये?’ हा एकच लक्षात राहतो. मुळात शेक्सपियरनेही त्यात बायांना फारसा स्कोप ठेवला नाही तर आज काय नवे होणार?? परंपरा तेव्हापासुन सुरु आहे.

स्वर्ग नरक मधे मौशुमीला पूर्ण स्कोप आहे
( तो पिक्चर भारतीय नारीने कसं वागावं हे सांगणारा आहे याकडे डोळेझाक करून )

बाराव्या शतकातली लोकनाट्य अभिनेत्री सुमकुंडरी देवीच्या नखाचीही सर आजच्या अभिनेत्रींना नाही .......??? hello
मधुबाला आणि नलिनी जयवंत ह्या समकालीन होत्या. तेव्हा नलिनी जयवंतने बाजी मारली होती.
आणि सौंदर्य मग ते कुठल्याही बाबतीत असो कला, साहित्य किंवा संगीत हे कालातीत असते.

माधुरी जेव्हा ऐन भरात होती तेव्हा तिला लेडी अमिताभ म्हटले जाई इतकी किंमत तिला मिळत होती, एकटीने चित्रपट गाजवत होती>>> येस ! माधुरिच्या ड्रेसिन्ग सेन्स बद्दल नाव ठेवली तरी अभिनय, स्र्किन प्रेझेन्स, खुप प्लेझन्ट वावर आणी डान्स याबाबत तीच स्थान वादातित...एक काळ पुर्ण तिने व्यापुन टाकावा इतका गाजवलाय.
मधुबाला नतर माधुरीच यालाही अनुमोदन.

मधुबालाचा 'मुघले आझम' मधील अभिनय मला अजिबात आवडला नव्हता. शेवटी ती निर्विकार चेहर्‍याने निघून जाते ते अगदीच खटकलं होतं.
तिचे आणि सलीमचे संवाद खूपच नाटकी वाटले होते.
मधुबालाने सर्वात सुंदर काम 'गेटवे ऑफ इंडिया' मधे केले आहे हे माझे वैयक्तिक मत. ही एका रात्रीत घडणारी कथा आहे आणि पूर्ण फोकस मधुबालावर आहे. हा चित्रपट दुर्दैवाने फारसा चालला नाही. त्यातले 'दो घडी वो जो पास आ बैठे' हे गाणं गाजलं. भारतभूषण अगदी थोडा वेळच आहे चित्रपटात. मधुबालाच्या भूमिकेला विविध रंग आहेत आणि तिने खूप छान काम केलंय.

तशी लाट क.से.क.त. नंतर पांढरा लखनवी ड्रेस आणि लाल बांधणीची ओढणी या ड्रेसची आली होती. तो मात्र एव्हरग्रीन ड्रेस चॉइस आहे. >>>> १००+

भारतभूषण अगदी थोडा वेळच आहे चित्रपटात.
>>>> हा रेको समजायचा की वैधानिक इशारा?

Pages