क्रेझी रिच एशियन बघितला, अनेकवेळा रिपिट झालेली घिसीपिटीच स्टोरी...सुपर रिच फॅमिलितला ग्रुम पण एकदम डाउन टु अर्थ, त्याची हुशार पण गरिब सिन्गल मॉमने वाढवलेली गर्लफ्रेन्ड !! तो तिला मित्राच्या लग्नासाठी नेवुन फॅमिलिला भेटवतो ...बा़की सगळच तुकड्यात तुकड्यात कुठुन ना कुठुन उचलल्यासारखच आहे...थोडफार सिन्गापुर दिसत एवढच!!
मुव्हितल्या अनेक कॅरेक्टरला बघुन ठायी ठायी बॉलीवुडची आठवण येते.
Submitted by प्राजक्ता on 5 November, 2025 - 22:57
ने फ्लि वर सत्यजित रे यांच्या कथांवर आधारीत ३-४ छोट्या ४५-५० मिनिटाअम्च्या फिल्म आहेत. रे याच नावाने. पहिल्या दोन डार्क वाटल्या. छान आहेत. पहिली शेवटाला एकदम वेगळेच वळण घेते. दुसरी वाचल्याचे आठवतेय पण अर्थात आता बदल केलेत. तिसरी मनोज बाजपेयी-गजसिंगची मस्त आहे. चौथी त्यातलीच का माहित नाही पण इतका फकफकाट सुरु झाला की कंटाळा आला. हॉलिवुड चित्रपटात प्रत्येक पाच शब्दांच्य वाक्यात दोनदा तरी फक्/फकिंग हवे हा नियम माहित आहे पण इथेही तोच नियम लागु होतोय हे आता हळुहळू कळतेय.
एक चतुर नार : नेफ्लि
ही चतुर नार मम्ता, तिची सासू आणि मुलगा झोपडपट्टीत रहात आहेत. म्हणजे रहात तर आहेत पण समोरच्या दाराला कुलुप लावून चोरीछुपे रहात आहेत. तिने कोणा ठाकुरला २० लाखांचा गंडा घातला आहे, तो पैसे वसुल करायला आला की हे तिघे 'प्ले गायब' .. आपण घरात नाही असं दाखवत आहेत. मुहल्ल्याला माहित आहे पण मम्ता काही ना काही करुन सगळ्यांना गप्प बसवते आहे. दिव्या खोसला, छाया कदम आणि तो पोट्टा,त्यांच्यातले संवाद आणि इतकी कथा समजल्यावर मजा येऊ लागलेली. ती कायकाय गोंधळ करते इ. मजेदार होतं. पण हाय रे कर्मा! पुढे सगळा इतका पसरट आणि नेव्हर एंडिंग झाला... मी तासाभराने बंद केला. सगळा मसाला, आयड्या, क्लुप्त्या एकाच चित्रपटात वापरुन टाकायच्या असा चंग बांधल्यागत एकेके प्रसंग घडू लागले.
दुसरं काहीच नाही सापडलं तर करेन पूर्ण.
दिव्या खोसला, नील नितिन मुकेश, छाया कदम, हेली दारुवाला, रोझी सरदाना, सुशांत सिंग सगळ्यांनी कामं चांगली केली आहेत. क्रिस्प काही करते तर कथा छान होती.
काल पुनश्च 'लापता लेडिज' पाहीला. फार धमाल सिनेमा आहे. आमीरचे प्रॉडक्शन आहे पण त्यात एक मुस्लिम (बुरखाधारी) महिला दाखवलेली आहे व असा डायलॉग आहे की - चेहरा छुपाना याने अपनी पेहेचान खो देना.
ललित प्रभाकर प्रॉमिसिंग वाटतो. ऋता/हृता दुर्गुळे ट्रेलरमध्ये चांगली वाटली. म्हणून हा बघितला.
एकेक सीन स्वतंत्रपणे बघितला तर चांगला लिहिलाय, अॅक्ट केलाय, कॅमेरा वर्क उत्तम, इतर तांत्रिक बाबीही चांगल्या,
पण सगळ्या सीन्सची एकत्र गोधडी फसली आहे.
'भांडू तरी नांदू' ही थीम आहे.
पण त्यांच्यातली केमिस्ट्री, शिक्षण-आवडीनिवडी इ.तला फरक, त्यामुळे होणारे मतभेद, भांडणं, तरी उत्कट प्रेम, - हे सगळं नीट्सं पोचत नाही. आवडीनिवडीतल्या फरकामुळे दोघांत तिसरा येतो, तात्पुरता, पण त्याचं येणंही कन्व्हिंसिंग वाटत नाही. दिग्दर्शकाला वाटतं म्हणून तो येतो, नंतर अचानक पटकथेतून गायब होतो.
त्यांचं मूव्ह-ऑन होणंही त्रास देत नाही.
फसलेल्या गोधडीमुळे प्रेमाची इन्टेन्सिटी पोचत नाही, त्यामुळे शेवटचं किस वाया गेलंय.
Submitted by ललिता-प्रीति on 13 November, 2025 - 23:50
अनिंद्य, पहिल्या दोन डार्क कथांनंतर ही शेवटची ‘हंगामा क्यु है बरपा’ एकदम मस्तच वाटली. त्या गजलेचा वापर मस्त करुन घेतलाय.. शेवटी परत परत आळवुन गायलेल्या ‘चोरी तो नही की है.. डाका तो नही डाला…..’ ओळी अगदी अर्थपुर्ण वाटायला लागतात. दोघांचीही कामे झकास झालीत.. गुलाम अलीच्या आंगठीचा उल्लेख आधी आलेला असतो असे वाटले पण नेमके आठवले नाही. परत पाहायला हवीच.
शेवटची दिदीवाली पाहिली का?? खुपच कंटाळा आला म्हणुन सोडुन दिली.
आरपार बद्दल ललिता-प्रीतिला सहमत. विशेष मजा नाही आली एकुण.
Nuremberg मस्त आहे. गंभीर आहे अर्थातच. हिटलर व युद्ध संपल्यावर त्याच्या अधिकार्यांवरचा खटला व त्यांचा मानसिक रिपोर्ट करणारा डग्लस यावर. Russell Crowe, Rami Malek बद्दल बोलायचं कामच नाही. दोन्ही महारथींनी मस्त काम केलंय, खास करुन Russell Crowe चे कोर्टमधला शेवटचा प्रश्नोत्तराच्या सीनमधे चेहर्यावरचे भाव जबरदस्त! फार गुंतागुंत नाही पण आवडला. एका सीनमधे footage of the Holocaust (खरेच तेच असेल तर) दाखवले आहे. ते पाहुन काटा येतो.
लोका आणि दशावतार पाहिला..
लोकाह टाईमपास म्हणून बघायला घेतलेला पण खूप आवडला...
दशावतार कधीपासून बघायचा होता म्हणून zee५ subscription घेतलं.. वन टाइम वॉच आहे...
अनिंद्य, काल हंगामा… परत बघायला घेतला पण पुर्ण करता आला नाही. गुलाम अलीच्या अंगठीबद्दल मी वर लिहिले, ती मुसाफिर अली ट्रेनमध्ये जुंगा पैलवानाला दाखवतो आणि दुसर्या दिवशी दुकानात पाहतो त्या दोघांचे उर्दु शब्दांबद्दलचे संवाद फारच मजेशीर आहेत.
रच्याकने, परवाच एक श्रीवास्तव आडनावाच्या लखनवी लेखकाची विविधभारतीवर मुलाखत ऐकली. लेखक अगदी शुद्ध उर्दुत बोलत होते. आईबद्दलचा उल्लेख वालदा-वालदन असा सुरवातीला ऐकला तेव्हा बोलणार्याचे नाव माहित नव्हते, त्यामुळे कोणी मुस्लिम लेखक आहे असे वाटले होते. नाव नंतर कळले. त्यानेही त्याच्या भाषेबद्दल , ती उर्दु असण्याबद्दल काहीतरी उल्लेख केले, आता नेमके आठवत नाही. धनश्रीने ऐकली असावी ही मुलाखत.
ड्रीमगर्ल १ पूर्ण पाहून होत नाही. तोच ड्रीमगर्ल २ पण आला.
हा पहायचा प्रयत्न केला, पण मुस्लीम कुटुंबातल्या मोठ्या मुलाच्या थेरपी पर्यंत पाहिला. पुढे खूप प्रेडीक्टेबल आणि घिसापिटा फार्स असेल म्हणून थांबवला. आहे का पुढे पाहण्यासारखा ? गाणं तर एक धड नाही. आयुष्यमान खुराणा थोडा वेळ स्त्रीवेषात छान वाटतो. पण संपूर्ण पिक्चरभर सहन होत नाही. त्याचा सरदारजी मित्र छान आहे. बर्याच चित्रपटात असतो.
जॉली एल एल बी पहिला भाग खूप छान जमला होता. दुसरा ठीक ठाक जमला होता.
तिसर्या भागात दोन्ही नायकांना एकत्र आणून गिमिक्स प्ले केलं का असं वाटलं होतं. एक दोन किरकोळ स्टंटस पण नको असे बघताना वाटले.
पण मध्यंतरानंतर सिनेमा हा चित्रपट न राहता अनेक बेसिक गोष्टींवर आसूड ओढत राहतो. जे चालू आहे ते दोन अडीच तासात इतक्या प्रभावीपणे मांडलं आहे.
चित्रपटांनी हे नाही करायचं तर मग कुणी ? या माध्यमाचा असा वापर पाहून निर्माता दिग्दर्शकाला थँक्स म्हणावंसं वाटलं. विचार आवडला. वेगळा विचार करणार्यांना पण चित्रपट आवडेल का ? शंका आहे. बंदे मे है दम हा मनोज वाजपेयीचा सिनेमा पण असाच आवडला होता.
आफ्रिकेतल्या Malawi (मालावी ?) देशातल्या एका गरीब शेतकर्याचा मुलगा (विल्यम) हा फक्त १३ वर्षांचा आहे. घरात आई-वडील, मोठी बहीण आणि धाकटे बाळ अशी माणसे. विल्यमला शिकायची आवड असते आणि आईवडीलांचाही शिकायला पाठींबा असतो. पुढे दुष्काळ पडतो. पावसाचा पत्ताच नाही! त्यात भर म्हणून गावातल्या विहिरीतले पाणी (जे काय तळाशी असेल) उपसणारा पंपही बंद पडतो. शेती करणे दूरच पण दोन वेळच्या जेवणाचीही भ्रांत पडते. सायन्सची आवड असलेला विल्यम, त्या प्रतिकूल परिस्थितीतही स्वतःच्या हुशारीने गावात चक्क पवनचक्की उभारतो ज्यामुळे विहिरीतले पाणी खेचता येते आणि शेती होऊ शकते.
अर्थात पवनचक्की अशी सहजपणे तो उभारु शकत नाही, ती उभारण्यासाठी विल्यमला वेगवेगळे लढे द्यावे लागतात. गरीबीमुळे फी भरु शकत नसल्याने शाळा त्याला काढून टाकते, पण तो वेगवेगळ्या मार्गांनी शिक्षण कसे मिळवता येईल ते बघतो. त्यात त्याच्या मोठ्या बहिणीचे त्याच्याच सायन्स शिक्षकाबरोबर प्रेम जुळलेले असते तर त्या गोष्टीवरुन एक प्रकारे त्यांना ब्लॅकमेल करुन, निदान सायन्सच्या तासांना हजर राहणे, पवनचक्की संबंधित पुस्तके वाचण्यासाठी लायब्ररीत प्रवेश मिळवणे इ. खटपटी करतो. (घरातल्यांवर सर्वांवर प्रेम असणारी ती बहीण पुढे 'निदान घरातले खायचे एक तोंड कमी होईल' असा विचार करुन त्या शिक्षकाबरोबर पळून जाते तेव्हा वाईट वाटते)
भंगारातले सामान वापरुन विल्यम पवनचक्कीचा एक छोटा प्रोटोटाईप यशस्वीरित्या तयार करतो. आता हाच मोठ्या आकारात केला की पाण्याचा प्रश्न - केवळ त्याच्या कुटुंबासाठीच नाही तर अख्ख्या गावासाठीही सुटेल, असा आत्मविश्वास त्याला असतो. आत तो वडीलांकडे मदत मागायला जातो, कसली तर त्याच्या वडीलांकडे शिल्लक असलेला एकुलता एक अॅसेट - त्यांची सायकल! त्या सायकलीचे काही सुटे भाग पवनचक्की बांधण्यासाठी विल्यमला हवे असतात.
वडीलांचा अर्थातच सुरुवातीस विरोध असतो, पण नंतर आईचेही मत ऐकून ते शेवटी राजी होतात. उंच झाडे कापून पवनचक्कीचा सांगाडा उभारला जातो, आवश्यक ते पार्ट्स लावून पवनचक्की पूर्ण होते. वारा येतो, पाती गरगर फिरतात आणि शेवटी पाटांतून पाणी वाहू लागते!
विल्यमचे काम केलेल्या मुलाचे काम सुरेखच, पण वडील, आई, बहीण यांचीही व्यक्तिमत्वे हृद्य आहेत.
याच नावाचे पुस्तक असलेल्या सत्यकथेवर हा सिनेमा आधारीत आहे. नक्की बघण्यासारखा. या विल्यमने पुढे जोहान्सबर्ग आणि अमेरिकेत उच्च शिक्षण घेतले.
जॉली एलएलबी ३ बद्दल फार चांगले रिव्ह्यू वाचले नव्हते. उथळ आहे वगैरे वाचले होते. पण तसा बिलकुल नाही वाटला. एक दोन प्रसंग तसे वाटले तरी त्याने काही चित्रपटाचा मूड स्पॉइल होत नाही. उगाच तेवढे पकडून रिव्ह्यूमध्ये त्याला नावे ठेवली गेली असे वाटले.
कोर्ट सीन, युक्तीवाद, तपास, डावपेच वगैरे अजून चालले असते जे तिघांच्या स्पीच पुरते राहिले. पण ते तिन्ही स्पीच छान जमले. ज्यात एक प्रतिस्पर्धी पक्षाचा वकिलाचा सुद्धा होता. आशय आणि विषय बरोबर पोहोचले.
अक्षय कुमार आणि अर्शद वारसी या दोघांनी आपापल्या शैलीत काम केले. या दोघात अर्शदला फुटेज कमी मिळणार अशी शक्यता होतीच. पण तरीही लास्ट सीन त्याला मिळाला त्याने हे कव्हर झाले.
डोळे रोखलेली बकरीवाली बाई लक्षात राहते. तिचे कॅरेक्टर छान घेतले आहे.
ओवरऑल मला छान वाटला. घरच्यांनाही सुचवला आहे.
Submitted by ऋन्मेऽऽष on 17 November, 2025 - 04:05
One Battle After Another -
One Battle After Another - Leonardo DiCaprio, Sean Penn, Benicio del Toro.. आयमॅक्समधे अजुनही एक शो चालु असेल. पटकन पाहुन घ्या.
आयमॅक्स मधेच पहपवा असा आहे का
आयमॅक्स मधेच पहावा असा आहे का??
खरंतर नाही. पण आवाज व भव्य
खरंतर नाही. पण आवाज व भव्य स्क्रीनवर छान वाटले. थेटरचा नेहमीचा पडदा चालेल.
खरंतर नाही. पण आवाज व भव्य
खरंतर नाही. पण आवाज व भव्य स्क्रीनवर छान वाटले. >>> हो पण शेवटचे काही सीन्स मोठ्या पडद्यावर भारी वाटतात
क्रेझी रिच एशियन बघितला,
क्रेझी रिच एशियन बघितला, अनेकवेळा रिपिट झालेली घिसीपिटीच स्टोरी...सुपर रिच फॅमिलितला ग्रुम पण एकदम डाउन टु अर्थ, त्याची हुशार पण गरिब सिन्गल मॉमने वाढवलेली गर्लफ्रेन्ड !! तो तिला मित्राच्या लग्नासाठी नेवुन फॅमिलिला भेटवतो ...बा़की सगळच तुकड्यात तुकड्यात कुठुन ना कुठुन उचलल्यासारखच आहे...थोडफार सिन्गापुर दिसत एवढच!!
मुव्हितल्या अनेक कॅरेक्टरला बघुन ठायी ठायी बॉलीवुडची आठवण येते.
ने फ्लि वर सत्यजित रे यांच्या
ने फ्लि वर सत्यजित रे यांच्या कथांवर आधारीत ३-४ छोट्या ४५-५० मिनिटाअम्च्या फिल्म आहेत. रे याच नावाने. पहिल्या दोन डार्क वाटल्या. छान आहेत. पहिली शेवटाला एकदम वेगळेच वळण घेते. दुसरी वाचल्याचे आठवतेय पण अर्थात आता बदल केलेत. तिसरी मनोज बाजपेयी-गजसिंगची मस्त आहे. चौथी त्यातलीच का माहित नाही पण इतका फकफकाट सुरु झाला की कंटाळा आला. हॉलिवुड चित्रपटात प्रत्येक पाच शब्दांच्य वाक्यात दोनदा तरी फक्/फकिंग हवे हा नियम माहित आहे पण इथेही तोच नियम लागु होतोय हे आता हळुहळू कळतेय.
एक चतुर नार : नेफ्लि
एक चतुर नार : नेफ्लि
ही चतुर नार मम्ता, तिची सासू आणि मुलगा झोपडपट्टीत रहात आहेत. म्हणजे रहात तर आहेत पण समोरच्या दाराला कुलुप लावून चोरीछुपे रहात आहेत. तिने कोणा ठाकुरला २० लाखांचा गंडा घातला आहे, तो पैसे वसुल करायला आला की हे तिघे 'प्ले गायब' .. आपण घरात नाही असं दाखवत आहेत. मुहल्ल्याला माहित आहे पण मम्ता काही ना काही करुन सगळ्यांना गप्प बसवते आहे. दिव्या खोसला, छाया कदम आणि तो पोट्टा,त्यांच्यातले संवाद आणि इतकी कथा समजल्यावर मजा येऊ लागलेली. ती कायकाय गोंधळ करते इ. मजेदार होतं. पण हाय रे कर्मा! पुढे सगळा इतका पसरट आणि नेव्हर एंडिंग झाला... मी तासाभराने बंद केला. सगळा मसाला, आयड्या, क्लुप्त्या एकाच चित्रपटात वापरुन टाकायच्या असा चंग बांधल्यागत एकेके प्रसंग घडू लागले.
दुसरं काहीच नाही सापडलं तर करेन पूर्ण.
दिव्या खोसला, नील नितिन मुकेश, छाया कदम, हेली दारुवाला, रोझी सरदाना, सुशांत सिंग सगळ्यांनी कामं चांगली केली आहेत. क्रिस्प काही करते तर कथा छान होती.
बारोट हाऊस. प्रेडिक्टेबल आणि
बारोट हाऊस. प्रेडिक्टेबल आणि बंडल.
हि चतुर नार जरा वेळ
हि चतुर नार जरा वेळ प्रॉमिसिंग वाटला होता! नंतर सगळेच हिच्याच बाजूचे, हिच्याच प्लान चा भाग असे एकेक निघायला लागल्यावर बोर झालं.
अमित +१
अमित +१
@ साधना,
@ साधना,
त्यातली “हंगामा क्यों है बरपा” बघितली का? धमाल आहे. सगळेच कलाकार धमाल आहेत पण मनोज बाजपाई फार आवडला यात.
छोटे छोटे प्रसंग काय खुलवलेत. ग़ज़ल गायक, पैलवान, ट्रेन चा प्रवास आणि त्यात खास ईरान-अफ़ग़ान से मंगाई हुई चाय नीम बसरा, खुषबख्त .. रे कमाल.
अन्य कथाही छान आहेत, सत्यजीत रॉय यांच्या जुन्या पण काळापुढच्या कथा.
काल पुनश्च 'लापता लेडिज'
काल पुनश्च 'लापता लेडिज' पाहीला. फार धमाल सिनेमा आहे. आमीरचे प्रॉडक्शन आहे पण त्यात एक मुस्लिम (बुरखाधारी) महिला दाखवलेली आहे व असा डायलॉग आहे की - चेहरा छुपाना याने अपनी पेहेचान खो देना.
Predator: Badlands >>> माझी
Predator: Badlands >>> माझी आवडती अॅक्शन सिनेमा सिरीज असल्याने दुसर्या सेकंदापासुन खिळवुन ठेवलं ते शेवटच्या सेकंदापर्यंत. आयमॅक्समधेच पहावा.
आरपार (मराठी, प्राइम)
आरपार (मराठी, प्राइम)
ललित प्रभाकर प्रॉमिसिंग वाटतो. ऋता/हृता दुर्गुळे ट्रेलरमध्ये चांगली वाटली. म्हणून हा बघितला.
एकेक सीन स्वतंत्रपणे बघितला तर चांगला लिहिलाय, अॅक्ट केलाय, कॅमेरा वर्क उत्तम, इतर तांत्रिक बाबीही चांगल्या,
पण सगळ्या सीन्सची एकत्र गोधडी फसली आहे.
'भांडू तरी नांदू' ही थीम आहे.
पण त्यांच्यातली केमिस्ट्री, शिक्षण-आवडीनिवडी इ.तला फरक, त्यामुळे होणारे मतभेद, भांडणं, तरी उत्कट प्रेम, - हे सगळं नीट्सं पोचत नाही. आवडीनिवडीतल्या फरकामुळे दोघांत तिसरा येतो, तात्पुरता, पण त्याचं येणंही कन्व्हिंसिंग वाटत नाही. दिग्दर्शकाला वाटतं म्हणून तो येतो, नंतर अचानक पटकथेतून गायब होतो.
त्यांचं मूव्ह-ऑन होणंही त्रास देत नाही.
फसलेल्या गोधडीमुळे प्रेमाची इन्टेन्सिटी पोचत नाही, त्यामुळे शेवटचं किस वाया गेलंय.
अनिंद्य, पहिल्या दोन डार्क
अनिंद्य, पहिल्या दोन डार्क कथांनंतर ही शेवटची ‘हंगामा क्यु है बरपा’ एकदम मस्तच वाटली. त्या गजलेचा वापर मस्त करुन घेतलाय.. शेवटी परत परत आळवुन गायलेल्या ‘चोरी तो नही की है.. डाका तो नही डाला…..’ ओळी अगदी अर्थपुर्ण वाटायला लागतात. दोघांचीही कामे झकास झालीत.. गुलाम अलीच्या आंगठीचा उल्लेख आधी आलेला असतो असे वाटले पण नेमके आठवले नाही. परत पाहायला हवीच.
शेवटची दिदीवाली पाहिली का?? खुपच कंटाळा आला म्हणुन सोडुन दिली.
शेवटी परत परत आळवुन गायलेल्या
शेवटी परत परत आळवुन गायलेल्या ‘चोरी तो नही की है.,,, 😂
शेवटची दिदीवाली ... मला झोप आली बघताना
आरपार बद्दल ललिता-प्रीतिला
आरपार बद्दल ललिता-प्रीतिला सहमत. विशेष मजा नाही आली एकुण.
Nuremberg मस्त आहे. गंभीर आहे अर्थातच. हिटलर व युद्ध संपल्यावर त्याच्या अधिकार्यांवरचा खटला व त्यांचा मानसिक रिपोर्ट करणारा डग्लस यावर. Russell Crowe, Rami Malek बद्दल बोलायचं कामच नाही. दोन्ही महारथींनी मस्त काम केलंय, खास करुन Russell Crowe चे कोर्टमधला शेवटचा प्रश्नोत्तराच्या सीनमधे चेहर्यावरचे भाव जबरदस्त! फार गुंतागुंत नाही पण आवडला. एका सीनमधे footage of the Holocaust (खरेच तेच असेल तर) दाखवले आहे. ते पाहुन काटा येतो.
Predator : Killers of Killer
Predator : Killers of Killer bagha khupach mast animation aahe. Kathanak vegvan aahe majja yete
मुंबई पुणे मुंबई चा पुढचा भाग
मुंबई पुणे मुंबई चा पुढचा भाग येतोय
लोका(ह) ,चॅप्टर वन आवडला.
लोका(ह) ,चॅप्टर वन आवडला.
फिमेल सुपरहिरो + दंतकथा काँबो.
लोका आणि दशावतार पाहिला..
लोका आणि दशावतार पाहिला..
लोकाह टाईमपास म्हणून बघायला घेतलेला पण खूप आवडला...
दशावतार कधीपासून बघायचा होता म्हणून zee५ subscription घेतलं.. वन टाइम वॉच आहे...
अनिंद्य, काल हंगामा… परत
अनिंद्य, काल हंगामा… परत बघायला घेतला पण पुर्ण करता आला नाही. गुलाम अलीच्या अंगठीबद्दल मी वर लिहिले, ती मुसाफिर अली ट्रेनमध्ये जुंगा पैलवानाला दाखवतो आणि दुसर्या दिवशी दुकानात पाहतो
त्या दोघांचे उर्दु शब्दांबद्दलचे संवाद फारच मजेशीर आहेत.
रच्याकने, परवाच एक श्रीवास्तव आडनावाच्या लखनवी लेखकाची विविधभारतीवर मुलाखत ऐकली. लेखक अगदी शुद्ध उर्दुत बोलत होते. आईबद्दलचा उल्लेख वालदा-वालदन असा सुरवातीला ऐकला तेव्हा बोलणार्याचे नाव माहित नव्हते, त्यामुळे कोणी मुस्लिम लेखक आहे असे वाटले होते. नाव नंतर कळले. त्यानेही त्याच्या भाषेबद्दल , ती उर्दु असण्याबद्दल काहीतरी उल्लेख केले, आता नेमके आठवत नाही. धनश्रीने ऐकली असावी ही मुलाखत.
ड्रीमगर्ल १ पूर्ण पाहून होत
ड्रीमगर्ल १ पूर्ण पाहून होत नाही. तोच ड्रीमगर्ल २ पण आला.
हा पहायचा प्रयत्न केला, पण मुस्लीम कुटुंबातल्या मोठ्या मुलाच्या थेरपी पर्यंत पाहिला. पुढे खूप प्रेडीक्टेबल आणि घिसापिटा फार्स असेल म्हणून थांबवला. आहे का पुढे पाहण्यासारखा ? गाणं तर एक धड नाही. आयुष्यमान खुराणा थोडा वेळ स्त्रीवेषात छान वाटतो. पण संपूर्ण पिक्चरभर सहन होत नाही. त्याचा सरदारजी मित्र छान आहे. बर्याच चित्रपटात असतो.
जॉली एल एल बी पहिला भाग खूप
जॉली एल एल बी पहिला भाग खूप छान जमला होता. दुसरा ठीक ठाक जमला होता.
तिसर्या भागात दोन्ही नायकांना एकत्र आणून गिमिक्स प्ले केलं का असं वाटलं होतं. एक दोन किरकोळ स्टंटस पण नको असे बघताना वाटले.
पण मध्यंतरानंतर सिनेमा हा चित्रपट न राहता अनेक बेसिक गोष्टींवर आसूड ओढत राहतो. जे चालू आहे ते दोन अडीच तासात इतक्या प्रभावीपणे मांडलं आहे.
चित्रपटांनी हे नाही करायचं तर मग कुणी ? या माध्यमाचा असा वापर पाहून निर्माता दिग्दर्शकाला थँक्स म्हणावंसं वाटलं. विचार आवडला. वेगळा विचार करणार्यांना पण चित्रपट आवडेल का ? शंका आहे. बंदे मे है दम हा मनोज वाजपेयीचा सिनेमा पण असाच आवडला होता.
The Boy Who Harnessed the
The Boy Who Harnessed the Wind - नेटफ्लिक्स
आफ्रिकेतल्या Malawi (मालावी ?) देशातल्या एका गरीब शेतकर्याचा मुलगा (विल्यम) हा फक्त १३ वर्षांचा आहे. घरात आई-वडील, मोठी बहीण आणि धाकटे बाळ अशी माणसे. विल्यमला शिकायची आवड असते आणि आईवडीलांचाही शिकायला पाठींबा असतो. पुढे दुष्काळ पडतो. पावसाचा पत्ताच नाही! त्यात भर म्हणून गावातल्या विहिरीतले पाणी (जे काय तळाशी असेल) उपसणारा पंपही बंद पडतो. शेती करणे दूरच पण दोन वेळच्या जेवणाचीही भ्रांत पडते. सायन्सची आवड असलेला विल्यम, त्या प्रतिकूल परिस्थितीतही स्वतःच्या हुशारीने गावात चक्क पवनचक्की उभारतो ज्यामुळे विहिरीतले पाणी खेचता येते आणि शेती होऊ शकते.
अर्थात पवनचक्की अशी सहजपणे तो उभारु शकत नाही, ती उभारण्यासाठी विल्यमला वेगवेगळे लढे द्यावे लागतात. गरीबीमुळे फी भरु शकत नसल्याने शाळा त्याला काढून टाकते, पण तो वेगवेगळ्या मार्गांनी शिक्षण कसे मिळवता येईल ते बघतो. त्यात त्याच्या मोठ्या बहिणीचे त्याच्याच सायन्स शिक्षकाबरोबर प्रेम जुळलेले असते तर त्या गोष्टीवरुन एक प्रकारे त्यांना ब्लॅकमेल करुन, निदान सायन्सच्या तासांना हजर राहणे, पवनचक्की संबंधित पुस्तके वाचण्यासाठी लायब्ररीत प्रवेश मिळवणे इ. खटपटी करतो. (घरातल्यांवर सर्वांवर प्रेम असणारी ती बहीण पुढे 'निदान घरातले खायचे एक तोंड कमी होईल' असा विचार करुन त्या शिक्षकाबरोबर पळून जाते तेव्हा वाईट वाटते)
भंगारातले सामान वापरुन विल्यम पवनचक्कीचा एक छोटा प्रोटोटाईप यशस्वीरित्या तयार करतो. आता हाच मोठ्या आकारात केला की पाण्याचा प्रश्न - केवळ त्याच्या कुटुंबासाठीच नाही तर अख्ख्या गावासाठीही सुटेल, असा आत्मविश्वास त्याला असतो. आत तो वडीलांकडे मदत मागायला जातो, कसली तर त्याच्या वडीलांकडे शिल्लक असलेला एकुलता एक अॅसेट - त्यांची सायकल! त्या सायकलीचे काही सुटे भाग पवनचक्की बांधण्यासाठी विल्यमला हवे असतात.
वडीलांचा अर्थातच सुरुवातीस विरोध असतो, पण नंतर आईचेही मत ऐकून ते शेवटी राजी होतात. उंच झाडे कापून पवनचक्कीचा सांगाडा उभारला जातो, आवश्यक ते पार्ट्स लावून पवनचक्की पूर्ण होते. वारा येतो, पाती गरगर फिरतात आणि शेवटी पाटांतून पाणी वाहू लागते!
विल्यमचे काम केलेल्या मुलाचे काम सुरेखच, पण वडील, आई, बहीण यांचीही व्यक्तिमत्वे हृद्य आहेत.
याच नावाचे पुस्तक असलेल्या सत्यकथेवर हा सिनेमा आधारीत आहे. नक्की बघण्यासारखा. या विल्यमने पुढे जोहान्सबर्ग आणि अमेरिकेत उच्च शिक्षण घेतले.
खूपच प्रेरणादायी!!
खूपच प्रेरणादायी!!
प्राईमवर ‘ड्रॉप’ आलेला दिसला.
प्राईमवर ‘ड्रॉप’ आलेला दिसला. चांगला थ्रिलर वाटला होता थेटरमधे पाहिला तेव्हा (प्रसिद्ध कलाकार नसताना).
जॉली एलएलबी ३ बद्दल फार
जॉली एलएलबी ३ बद्दल फार चांगले रिव्ह्यू वाचले नव्हते. उथळ आहे वगैरे वाचले होते. पण तसा बिलकुल नाही वाटला. एक दोन प्रसंग तसे वाटले तरी त्याने काही चित्रपटाचा मूड स्पॉइल होत नाही. उगाच तेवढे पकडून रिव्ह्यूमध्ये त्याला नावे ठेवली गेली असे वाटले.
कोर्ट सीन, युक्तीवाद, तपास, डावपेच वगैरे अजून चालले असते जे तिघांच्या स्पीच पुरते राहिले. पण ते तिन्ही स्पीच छान जमले. ज्यात एक प्रतिस्पर्धी पक्षाचा वकिलाचा सुद्धा होता. आशय आणि विषय बरोबर पोहोचले.
अक्षय कुमार आणि अर्शद वारसी या दोघांनी आपापल्या शैलीत काम केले. या दोघात अर्शदला फुटेज कमी मिळणार अशी शक्यता होतीच. पण तरीही लास्ट सीन त्याला मिळाला त्याने हे कव्हर झाले.
डोळे रोखलेली बकरीवाली बाई लक्षात राहते. तिचे कॅरेक्टर छान घेतले आहे.
ओवरऑल मला छान वाटला. घरच्यांनाही सुचवला आहे.
अमेरिकेत उच्च शिक्षण घेतले.
अमेरिकेत उच्च शिक्षण घेतले.
Submitted by वर्षा on 17 November, 2025 - 06:45 >>> रेको साठी आभार. बघेन हा.
>>>>>>The Boy Who Harnessed
>>>>>>The Boy Who Harnessed the Wind - नेटफ्लिक्स
बघते.
Pages