Submitted by ऋन्मेऽऽष on 6 May, 2025 - 20:14
आज मध्यरात्रीच्या सुमारास भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी ठिकाणांवर हल्ला केला आहे..
ग्रेट..!
हिच पहिली उत्स्फूर्त प्रतिक्रिया आली.
ऑपरेशन सिंदूर हे नाव सुद्धा अगदी समर्पक वाटले.
केंद्रीय गृहखात्याने सर्व राज्यांना आज (7 मे) मॉक ड्रील घेण्याचे आदेश दिलेत. हवाई हल्ल्याची सूचना देणारे सायरन वाजवले जातील, तसंच अशावेळी ब्लॅक आऊट कसा करावा, सुरक्षित ठिकाणी कसं जावं, इमारतींखाली कसं जमा व्हावं याचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे. हे अचानक इतके घाईगडबडीत, पण तेव्हाच खरे तर शंका आली होती. यावेळी काहीतरी घडणार आहे. घडणे गरजेचे आहे.
भारत-पाक युद्ध घडामोडी जाणून घ्यायला आणि वैयक्तिक हेवेदावे तसेच राजकीय मतभेद बाजूला ठेवून साधकबाधक चर्चा, माहितीची देवाणघेवाण करायला हा धागा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
निवडणूक प्रचारांत तसेच
निवडणूक प्रचारांत तसेच संसदेतही POK परत आणायच्या गर्जना अनेकदा झाल्या आहेत.
POK भारतामधे सामिल करु, किंवा सिंध - बलुचिस्तान पाकपासून वेगळे करु अशा वल्गना करणे आणि थेट कृती करुन दाखविणे यात फार मोठा फरक आहे.
वेगळे करणे केवळ इंदिरा गांधीच करु शकल्या होत्या. त्या वेळी पण अमेरिकेने मोठा दबाव आणला होता. पण समोर इंदिरा गांधी यांचे कणखर नेतृत्व होते म्हणून अमेरिकन डाळ शिजली नाही.
अनेक दशकांपासून पाककडे अण्वस्त्र आहे आणि हे सर्व जगाला माहित आहे. अण्वस्त्रांना भारत घाबरत नाही म्हणून तर ऑपरेशन सिंदूर सुरु केले होते.
युद्धविराम जाहिर झाला त्यावेळी पहलगाम हत्याकांड घडविणारे सर्व अपराधी मोकळेच होते. मग फोन काय येतो आणि एकही उद्देश सफल न होता माघार काय घेतली जाते, सगळाच बेबनाव आहे.
पाक गुडघे टेकून, नाक घासून शरणागत झाला होता तर पाकव्याप्त काश्मीर सोडा निदान कुलभूषण जाधवां सारख्या काही निरपराध भारतीयांची पाकच्या तुरुंगातून सुटका तर करायची होती. असे काहीच झालेले नाही. मग युद्धविराम घोषणा ट्रम्पच्या धमकी मुळे झाली होती का?
भारत पाक संघर्ष झाला तर चीन
भारत पाक संघर्ष झाला तर चीन काय करणार होता ? त्यांना संधी मिळाली, त्यांनी शस्त्रास्त्रांचे प्रात्यक्षिक दाखवून राफेलच्या मर्यादा दाखविल्या. हे कसे साधले?
चीनने पाकला या युद्धात मदत केली मग भारत आता चीन विरुद्ध काय कारवाई करणार आहे ? आता तर मोदी स्वत : चीनला भेट देणार आहेत. अहमदाबाद येथे झूला डिप्लोमसी झाली होती तसे आता नव्याने काही करतील.
त्याचा परिणाम म्हणजे सैनिक,
त्याचा परिणाम म्हणजे सैनिक, नागरिक, शाळा, रुग्णालये इत्यादींवर बॉम्ब पडून मोठी हानी झाली असती.>>> आम्ही देशासाठी आणि धर्मासाठी प्राण वेचणारे! आम्ही तयार होतो. तुम्हीच कच खाल्ली.
युद्ध केलं तर नुकसान होणार
युद्ध केलं तर नुकसान होणार हेच कविता गाडगीळ सांगत होत्या, तेव्हा इथल्या व्हॉट्स अॅप अंकल आणि आंटीजनी त्यांना ट्रोल का केलं मग?
बाकीच्या गोष्टी लिहून झाल्यात. परत लिहायलाच हवं पालथा घडा क्लबसाठी.
पण या दोन नवीन गोष्टी
ऑपरेशन सिंदूरसाठी मोदींना हारबिर घातले तर पहलगामला जे भारतीय मारले गेले त्यासाठी मोदींना जबाबदार का धरत नाही?
ऑपरेशन सिंदूरला तीन महिने झाल्यावर आम्ही पाकिस्तानची विमाने पाडली हे आता मोजून सांगायचं. स्थलसेनाप्रमुखांनी दुसर्या सेनाधिकार्याच्या आधीच्या वक्तव्याच्या विरोधात बोलायचं हे काय चाललंय? ट्रंप टॅरिफ आणि व्होट चोरी वरून लक्ष हटवण्यासाठीच ना?
नेहरुनी उडवलेली कबुतरं पण आता
नेहरुनी उडवलेली कबुतरं पण आता वापरुन घेताहेत
बिहार मध्ये जाऊन कादरखानी
बिहार मध्ये जाऊन कादरखानी ड्यायलॉग का मारले ?
Dr. Brahma Chellaney
Dr. Brahma Chellaney
@Chellaney
Speaking on American soil — with Washington conspicuously silent — Pakistan’s army chief issued a chilling threat: “We are a nuclear nation, and if we think we are going down, we’ll take half the world down with us.”
The U.S. and China midwifed Pakistan’s nuclear bomb to counterbalance India. Ever since, Washington has tolerated Pakistan’s nuclear blackmail — a menace that now imperils not just the Indian subcontinent, but the world.
मैत्रिणींनो, सांगू नका नाव घ्यायला.
South Asian Threat? Local
South Asian Threat? Local Nuclear War = Global Suffering
हा लेख आत्ताचा बाही, १ जानेवारी २०१० चा आहे. सायंटिफिक अमेरीकन मधला.
हा लेख वाचल्यावर युद्ध थांबले आणि सगके जग वाचले असे तुम्हाला वाटेल.
https://www.scientificamerican.com/article/local-nuclear-war/
केबीसी या कमर्शियल टीव्ही
केबीसी या कमर्शियल टीव्ही कार्यक्रमात ऑपरेशन सिंदूरसाठी पत्रकार परिषद घेतलेल्या दोघी जणी आणि तिसर्या दलातली आणखी एक महिला अधिकारी गणवेश घालून भाग घेणार आहेत.
केबीसी मध्ये जाणे कुणालाही
केबीसी मध्ये जाणे कुणालाही cringe वाटत नाही का ? तरी नशीब बिग बॉस मध्ये नाही पाठवले. !
त्या तिघींना स्वतः हून जायचं
त्या तिघींना स्वतः हून जायचं असेल तर ठीक आहे, सुरक्षा दलाचा कायदा कांय आहे ते माहिती नाही.
पण गणवेश घालून भाग घेणार आहेत म्हणजे जास्तच झालं. उद्या प्रचारसाठी पण बोलावतील. असं गणवेश घालून खासगी कार्यक्रमात परवानगी न घेता जाता येत नसावं बहुतेक.
तिथे जाऊन त्या ऑपरेशन
तिथे जाऊन त्या ऑपरेशन सिंदूरबद्दल बोलणार नाहीत का?
प्रोमो मधे तर त्या बोलताना
प्रोमो मधे तर त्या बोलताना दाखवल्या आहेत
सिंदूर पेक्षा लोकांना अजून पहलगाम प्रसंगात सरकारचा नाकर्तेपणा लक्षात आहे, त्याला विसरायला लावण्यासाठी हे प्रकार सुरू आहेत
अंकित अवस्थी यांचं नाव
अंकित अवस्थी यांचं नाव पहिल्यांदा मायबोलीवरच वाचलं. नंतर कुठे एखादी कथा लिहीण्यासाठी झाला उपयोग तर झाला म्हणून त्यांना फीड मधे येउ दिलं. ज्या व्हिडीओची लिंक खाली दिली आहे त्याच्या सत्यतेबद्दल खात्री नाही, ना व्हिडीओच्या क्रिएटर ने तसा दावा केला आहे. हा एक तर्क आहे आणि तो तर्क देताना जी मांडणी केली आहे ती खूपच प्रभावी वाटली. यात कुठेच कुठल्या पक्षाच्या भक्तीचा किंवा द्वेषाचा अँगल नाही असं वाटतं.
सीझफायर का झालं याबद्दल लेटेस्ट घटनांचा आधार घेऊन एक थिअरी बिल्ड केली आहे. पटलं तर घ्या नाहीतर सोडून द्या. मात्र जो एअरपोर्ट आपण मे महीन्यात उद्ध्वस्त केला त्याच्या डागडुजीचं काम सुरू झालं आणि दुसर्याच दिवशी सी ७ ग्लोबमास्टर हे अमेरिकन विमान पूरग्रस्तांसाठी मदत म्हणून नूरखान वर उतरलं. नूरखानची लोकेशन आणि पूरग्रस्त भागाची लोकेशन जर जवळची नसेल तर मग नक्कीच हे संशयास्पद आहे. पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांना ट्रंपने रेड कार्पेट वेलकम करणे आणि नूरखान एअरपोर्टचा ताबा अमेरिकेकडेच असल्याचा दावा पाकिस्तानच्या पत्रकराने करणे हे सगळं या व्हिडीओत नीट जोडलं आहे. या सर्व घटना खर्या आहेत किंवा नाहीत याची पुष्टी झाली तर हा दावा सत्य आहे किंवा नाही हे समजून येईल.
https://www.youtube.com/watch?v=nYIO4RONLTI
Pages