ऑपरेशन सिंदूर आणि भारत-पाक युद्ध घडामोडी

Submitted by ऋन्मेऽऽष on 6 May, 2025 - 20:14

आज मध्यरात्रीच्या सुमारास भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी ठिकाणांवर हल्ला केला आहे..

ग्रेट..!
हिच पहिली उत्स्फूर्त प्रतिक्रिया आली.
ऑपरेशन सिंदूर हे नाव सुद्धा अगदी समर्पक वाटले.

केंद्रीय गृहखात्याने सर्व राज्यांना आज (7 मे) मॉक ड्रील घेण्याचे आदेश दिलेत. हवाई हल्ल्याची सूचना देणारे सायरन वाजवले जातील, तसंच अशावेळी ब्लॅक आऊट कसा करावा, सुरक्षित ठिकाणी कसं जावं, इमारतींखाली कसं जमा व्हावं याचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे. हे अचानक इतके घाईगडबडीत, पण तेव्हाच खरे तर शंका आली होती. यावेळी काहीतरी घडणार आहे. घडणे गरजेचे आहे.

भारत-पाक युद्ध घडामोडी जाणून घ्यायला आणि वैयक्तिक हेवेदावे तसेच राजकीय मतभेद बाजूला ठेवून साधकबाधक चर्चा, माहितीची देवाणघेवाण करायला हा धागा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पाकिस्तान एव्हढे गुढगे टेकून आपल्याला शरण आलो होते तर आपल्याला दोन गोष्टी करता आल्या असत्या.
१ जाधव ह्यांची सुटका,
२ POK जिंकता आले असते.
जसे इंदिराजींनी पूर्व पाकिस्तान ला केले तसे.

इंदिरा गांधी पुन्हा होणार नाही कुणी. त्यांच्या वारसांनाही लोक कंटाळले. पण ते मूठ सोडायला तयार नाहीत. तर आता उखाळ्या पाखाळ्या काढण्यातच मश्गूल. असंच चालू राहणार. मतदारही कुणाला खो देत खेळ चालू ठेवणार. तर काही नेते परदेशांत जाऊन त्यांना सांगत फिरणार भारत सरकार किती वाईट्ट आहे. सत्तर वर्षांच्या राजकारणाचा भुसा इकडे पाडला जातोय. जनता कंटाळली आहे. आणखी पाच वर्षे पाडत राहा भुसा.

स्पेशल ऑप्स बघून मी raw ही गुप्तहेर संघटना जॉइन करणार आहे आणि सगळ्या अतिरेक्याना न्यूट्रलाइझ करणार आहे.

ऑपरेशन सिंदूरदरम्यान पत्रकार परिषदेत दोहे म्हटल्यामुळे ज्यांना वाईट वाटलं होतं, त्यांच्यासाठी आणखी "वाईट" बातमी अशी की, भारतीय सैन्याने आता आणखी ‘रुद्र’ ब्रिगेड आणि ‘भैरव’ बटालियन यांची अधिकृत घोषणा केली आहे — आणि दोन्ही नावं हिंदू परंपरेतली आहेत.

कालपरवा पर्यंत "पाहलगाम हल्ल्यातले दहशतवादी कुठे आहेत?" असा प्रश्न विचारणारा पाकिस्तान आता नेहमीप्रमाणे संशय घेऊ लागला आहे.
तरी बरं, पहिल्या दिवशी आपण केलेल्या हल्ल्याचं चित्रीकरण आपण केलं आणि शेवटच्या दिवसाचं सॅटेलाईट इमेजेससह ठोस पुरावे सादर केले गेले.
नाहीतर मागच्यावेळेसारखं, "कुत्रं मारलं का?" अशी चावचाव करत बसले असते.

स्पेशल ऑप्स बघून मी raw ही गुप्तहेर संघटना जॉइन करणार आहे आणि सगळ्या अतिरेक्याना न्यूट्रलाइझ करणार आहे.>>> बोकलत मी तुमच्या कोवट ऑप्स ना फंडच रिलीज नाही करणार.... Rofl

पहलगाम दहशतवाद्यांची रितसर ओळख पटविण्यात आली असे गृहमंत्री शहा संसदेत सांगतात.

दहशतवाद्यांना जेवण पोहोचविणार्‍या चार लोकांना ताब्यात घेतले होते आणि या लोकांच्या मदतीने मृत लोकांची ओळख पटविण्यात आली. जेल मधे सडत पडण्यापेक्षा समोर जे मृतदेह आणले आहेत तेच पहलगामचे दहशतवादी होते असे सांगून त्यांनी ( "जेवण पोहोचविणार्‍यांनी" ) अटकेतून स्वत: ची सुटका करवून घेतली असेल का?

पाकिस्तानी चॉकलेट होती, किंवा वोटर लिस्ट नंबर हे पुरावे झाले का? हे असले तरी त्यांनीच हत्याकांड केले आहे हे कुठे सिद्ध होते ?
डोबालच्या माणसांकडे अख्ख्या पाकिस्तानची वोटर लिस्ट आहे मग वोटर लिस्ट नंबर असणे ( तो खरा आहे असे मानले तरी ) याने फार तर ते पाकिस्तानी नागरिक होते हे सिद्ध होणार. पहलगाम घडविले कुणी हा प्रश्न अनुत्तरितच आहे.

न्यायवैद्यक विश्लेषण ( Forensic Analysis ) - यासाठी काही दिवस - महिने (आणि क्लिष्ट प्रकरणांत वर्ष ) लागतात हे काही तासांत उरकणारे काम नाही. पण अतिरेक्यांना मारल्यानंतर प्लेन तय्यारच ठेवले होते. सोमवार-मंगळवारी रात्री काही तासांतच खात्री झाली, अमित शहा यांना पहाटे ४:४६ वाजता कॉल आला.
https://timesofindia.indiatimes.com/india/forensics-of-rifles-bullets-le...

एव्हढ्या विक्रमी वेळांत Forensic Analysis चा रिपोर्ट येतो आणि तो खराच आहे असे मानायला भक्ताचा मेंदू लागतो. अरे पण रिपोर्ट येण्या अगोदरच कनफर्मेशन्ही झाले होते ते कशाच्या आधारावर?

पहलगांम मधे ज्या २६ पर्यट कांची हत्या झाली त्यांच्या ( तिथे हजर असलेल्या) परिवार सदस्यांना का नाही बोलाविले ओळख परेडसाठी?

जेवण पुरविणारी निरपराधी लोक असतील , त्यांना काय माहित ते कुणाला जेवण देत आहेत. हत्याकांड घडत असतांना हे लोक तिथे हजर नसावीत ( असा अंदाज आहे ). हजर नसतील तर ओळख पटविण्यासाठी ज्यांच्या डोळ्यांसमोर हत्या झाल्या त्यांना बोलवायचे. मृताच्या प्रत्येक नातेवाईकाला "खर्‍या" हल्लेखोरांना शिक्षा मिळावी असेच वाटणार आणि ते कुणाच्याही दबावांत येण्याची शक्यता नाही.

पाकिस्तानची चॉकलेट ३ महिने अतिरेक्यांनी पुरावा म्हणून जपून ठेवली होती. वोटर आयडी घेऊन कशाला आले असतील?

Pakistan's Voter ID : This is a national identity card which is used for everything in Pakistan from voting to healthcare.

आपल्या माणसांसोबत त्यांचा व्होटर आयडी ( तो ही पाकिस्तानी !) पाठवण्याइतके ISI बावळट आहे का ? बावळट असेल तर मग इतकी कडक सुरक्षा भेदून हल्ला कसा केला असेल ?

पाकिस्तानची चॉकलेट ३ महिने अतिरेक्यांनी पुरावा म्हणून जपून ठेवली होती. वोटर आयडी घेऊन कशाला आले असतील?>>>>>

वोट जिहाद करण्यासाठी Happy

आपल्या माणसांसोबत त्यांचा व्होटर आयडी ( तो ही पाकिस्तानी !) पाठवण्याइतके ISI बावळट आहे का ? बावळट असेल तर मग इतकी कडक सुरक्षा भेदून हल्ला कसा केला असेल ?>>>

परत गेल्यानंतर ओळख पटवावी लागत असेल. नाहीतर तिकडे भारतीय आहेत म्हणून छळ झाला असता. म्हणून standard practice आहे ही. तसही voter id सगळ्या गोष्टी साठी लागत पाकिस्तानात, terrorism पण त्यात सामील करा. Happy

परत गेल्यानंतर ओळख पटवावी लागत असेल. नाहीतर तिकडे भारतीय आहेत म्हणून छळ झाला असता. म्हणून standard practice आहे ही.
खरं की काय? जे सरकार प्रशिक्षणापासून उच्च लहरींचे वायरलेस तंत्रज्ञान पुरवते , ते सरकार हातांचे ठसे व इतर बायोमेट्रिक नक्कीच ठेवत असेल. त्यासाठी वोटर आयडी बाळगण्याचा मूर्खपणा कशाला करतील?

काही दिवसांनी एक वेळ पाकिस्तान मान्य करेल की हे अतिरेकी त्यांच्याच देशातून आले होते. आत्ताही त्यांनी हे मान्य केलं आहे, पण 'हे निरपराधी नागरिक होते' असं सांगून स्वतःची पाठ वाचवण्याचा प्रयत्न केला आहे. पण आपल्याकडील विरोधक मात्र हे कधीच मान्य करणार नाहीत. कारण त्यांची भूमिका अधीच ठरलेली आहे — भाजपाला विरोध करायचा, काहीही झालं तरी!असा पायावर दगड मारून घ्यायचा आणि एकदा निवडणुकीचा निकाल लागला की परत दोष 'EVM ला द्यायचा.

खरं की काय? जे सरकार प्रशिक्षणापासून उच्च लहरींचे वायरलेस तंत्रज्ञान पुरवते , ते सरकार हातांचे ठसे व इतर बायोमेट्रिक नक्कीच ठेवत असेल. त्यासाठी वोटर आयडी बाळगण्याचा मूर्खपणा कशाला करतील?>>
हो खरच की, त्यांनी शाह जेव्हा एन्काऊंटर करेल त्यावेळेस पाकिस्तानी आहोत हे कळण्यासाठी ठेवले असेल voter id. तसेच त्याचसाठी १२० दिवस पुरतील इतकी चॉकलेट्स आणली असतील. Happy

एकदा निवडणुकीचा निकाल लागला की परत दोष 'EVM ला द्यायचा.>> नाहीतर काय, जनता मुद्दामहून छिछोरा पंतप्रधान आणि तडीपार गृहमंत्री निवडून देतात.

छिछोरा शब्दावर आक्षेप घेऊ नये, संसदीय शब्द आहे तो.

विरोधकांनी उपस्थित केलेल्या मूळ मुद्द्याला सरकार का बगल देतेय?

बैसरन पठारावर सुरक्षा व्यवस्था का नव्हती?
22 मिनिटांत युद्ध का थांबवले?
पाकिस्तानचा निषेध करायला कोणताही देश का भारतासमावेत उभा राहिला नाही? त्याला नाणेनिधीने कर्ज का दिले? मुनीरला मेजवानीसाठी कसे काय बोलवण्यात आले?
ट्रम्पचे नाव (हवं तर उखण्यात घेऊन) मोदी का सांगत नाही की बाबा रे , तू बोलतोस ते खोटं आहे?

मोदी शाह आणि इतरांनी नेहरू आणि काँग्रेसला दोष देण्यात धन्यता मानली. कुठल्याही मुद्द्याचे स्पष्टीकरण दिलेले नाहीये

राहुलनेच संसदेत पाकिस्तानचे नाव खणखणीत घेतले. जनरल मुनीरचे घेतले. मोदीशहा नेहरू नेहरू करत होते.

India says it has killed three militants behind Kashmir tourist massacre अशा इंटरनॅशनल मीडियाच्या हेडलाइन्स आहेत.

<< ट्रम्पचे नाव (हवं तर उखण्यात घेऊन) मोदी का सांगत नाही की बाबा रे , तू बोलतोस ते खोटं आहे? >>

------ आतापर्यंत २५ वेळा ट्रम्प म्हणाला आहे. एकवेळा तरी मोदी यांनी समाचार घ्यायला हवा होता. या विषयावर भयाण शांत आहेत.

"त्या सर्व चॉकलेट्सच्या आवरणांवर " made in pakistan " असे लिहीले होते.
Food Safety and Standards Authority of India FSSAI ने सखोल परिक्षण केले, अनेक तास चाचण्या घेतल्या आणि चॉकलेट मधे आढळलेले साखर आणि मीठ यांचे स्त्रोत पाकीस्तानी होते. सर्वात महत्वाचा पुरावा हा दुधातील प्रथिनांच्या चाचणी मधे (ratio of A1 to A2 bea-casein ) दिसला - यावरुन चॉकलेटमधे वापरलेले दूध हे पाकीस्तानी गायीचे होते हे सिद्ध केले आहे. चॉकलेटची बनावट पाकीस्तानी आहे याची खात्री पटल्यावर, Food Safety Commissioner ने स्वत: अमित शहांना पहाटे ३:५४ ला फोन करुन सांगितले. अमित शहा फोनची वाट बघत जागेच होते. "

अजून किती सज्जड पुरावे हवे आहेत? Happy

पाकचे वोटर आयडी होते ( पण भारतात येतांना कशासाठी आणतील? ) यापेक्षा भारताचा बनावट पासपोर्ट होता अशी तर थाप मारायची. चालली असती.

आपल्याकडे साडी चोळी देऊन/ हातावर दही साखर देऊन पाठवणी करतात तशी त्यांच्याकडे खिशात id अन हातात चॉकलेट देऊन पाठवणी करत असतील.

खासदार प्रणिती शिंदें यांनी पाकिस्तानातील हल्ल्याला "तमाशा" संबोधून सरकारचा, तीन्ही सैन्यदलांचा कचरा केला. कांग्रेसचे सरकार आल्यावर आणखी काय अपेक्षा ठेवणार?

https://x.com/INCIndia/status/1949849042705400094

ऑपरेशन सिंदूर नाम सुनने में देशभक्ती का लगता है. लेकिन असल में ये सिर्फ मीडिया पर किया गया सरकार का एक तमाशा था

काय चुकीचं बोलल्या त्या?

अपमान उन सिपाहियों का जिनको सीझ फायर की ऑर्डर अपने प्रधानमंत्री से नहीं बल्किक एक विदेशी से मिली - हेही म्हणाल्यात त्या.

७ मिनिटांचं भाषण ऐका. आणि त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या.

यांनी सरदार पटेलांचा पुतळा उभारला आणि ते पंतप्रधान झाले नाही म्हणून गळा काढतात. यांचा गृहमंत्री १९६० मध्ये सरदार पटे लांना जिवंत करतो आणि वर सांगतो मी इतिहासाचा विद्यार्थी आहे.

एन डी ए ची एक खासदार म्हणते २००१ मध्ये संसदेवर दहशतवादी हल्ला झाला आणि हे लोक गप्प बसले.

खोटा इतिहास लिहायची सवय लागली. वर्तमान तरी खरं कशावरून लिहीत असतील?

प्रणिती शिंदेंनी तो शब्द वापरायला नको होता हे वादासाठी मान्य करूयात, पण त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना उत्तरे देण्या ऐवजी ती एकदोन सेकंदांची क्लिप व्हायरल करून काय मिळणार आहे ? राजकारणासाठी व निवडणूकीसाठी सैन्यदलांचा वापर करणे हे खरे तर त्या शब्दा पेक्षा जास्त आक्षेपार्ह आहे.

ते एन्काउंटर खोटे आहे हे स्पष्ट अहे, पण एकाही भारतीय मेडियाला त्यावर प्रश्न उपस्थित करायचे धाडस झाले नाही हे जास्त उद्बोधक आहे. पाकिस्तानी मेडिया जास्त पोक्त आहे हे मी नमूद करतो ते याच साठी. ( असे एन्काउंटर होईल, मग प्रेताशेजारी बंदूका ठेवून फोटो घेतले जातील हे भाकित डॉन वृत्तपत्रात आधीच आले होते)

Pages