Submitted by ऋन्मेऽऽष on 6 May, 2025 - 20:14
आज मध्यरात्रीच्या सुमारास भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी ठिकाणांवर हल्ला केला आहे..
ग्रेट..!
हिच पहिली उत्स्फूर्त प्रतिक्रिया आली.
ऑपरेशन सिंदूर हे नाव सुद्धा अगदी समर्पक वाटले.
केंद्रीय गृहखात्याने सर्व राज्यांना आज (7 मे) मॉक ड्रील घेण्याचे आदेश दिलेत. हवाई हल्ल्याची सूचना देणारे सायरन वाजवले जातील, तसंच अशावेळी ब्लॅक आऊट कसा करावा, सुरक्षित ठिकाणी कसं जावं, इमारतींखाली कसं जमा व्हावं याचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे. हे अचानक इतके घाईगडबडीत, पण तेव्हाच खरे तर शंका आली होती. यावेळी काहीतरी घडणार आहे. घडणे गरजेचे आहे.
भारत-पाक युद्ध घडामोडी जाणून घ्यायला आणि वैयक्तिक हेवेदावे तसेच राजकीय मतभेद बाजूला ठेवून साधकबाधक चर्चा, माहितीची देवाणघेवाण करायला हा धागा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
चिनार कोअरने ऑपरेशन महादेव
चिनार कोअरने ऑपरेशन महादेव अंतर्गत आज दचिगाम जंगलात ३ अतिरेक्यांना कंठस्नान घातले. ३ अतिरेक्यांपैकी पाकिस्तानी हाशिम मुसाची ओळख पटलेली असून पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यात मुसा सामील होता.
अरे वा! चांगला मुहूर्त
अरे वा! चांगला मुहूर्त निवडला. श्र्रावणी सोमवार आणि त्याच वेळी संसदेत यावर चर्चा.
भरत, अगदी हेच मनात आलं होतं.
भरत, अगदी हेच मनात आलं होतं. आणि मुख्य म्हणजे बाबुराव संसदेत नाहीत. आता भाषण ठोकायला मोकळे
पाकिस्तानी अतिरेकी पकडले जाणं
पाकिस्तानी अतिरेकी पकडले जाणं किंवा मारले जाणं हे अत्यंत महत्त्वाचं होतं. त्यामुळे जे काही घडलं, ते चांगलंच घडलं. पाकिस्तान म्हणत आहे की आधीच अटक करण्यात आलेले निरपराध पाकिस्तानी होते — म्हणजे मारले गेलेले खरेच पाकिस्तानीच होते, हे सिद्ध झालं.
‘मुहूर्ता’चं म्हणायचं झालं, तर पुढच्या महिन्यात हे मारले गेले असते, तर महाराष्ट्र महानगरपालिका निवडणुकीचा आरोप झाला असता. आणखी दोन महिन्यांनी झाले असते, तर बिहार निवडणुकीचं कारण दिलं गेलं असतं. आणि जर २०२६ मध्ये घडलं असतं, तर बंगाल, केरळ, आसाम अशा मोठ्या निवडणुकांची यादीच लागली असती.
<पाकिस्तान म्हणत आहे की आधीच
<पाकिस्तान म्हणत आहे की आधीच अटक करण्यात आलेले निरपराध पाकिस्तानी होते — म्हणजे मारले गेलेले खरेच पाकिस्तानीच होते, हे सिद्ध झालं.> बॉरं.
मग आता आशिया कप मध्ये भारत पाकिस्तानशी खेळणार की नाही?
ऑपरेशन सिंदूर दरम्यान चीनने पाकिस्तानला मदत केली China gave Pak live inputs on our vectors during Op Sindoor असं जनरल् राहुल सिंग म्हणालेत. पण चीन सोबत तर आपण गप्पा टप्पा करतोय.
इथेही Transactional diplomacy वाटतं
चांगला मुहूर्त निवडला.
चांगला मुहूर्त निवडला. श्र्रावणी सोमवार आणि त्याच वेळी संसदेत यावर चर्चा.
>>>
बघा तरी ..भारतात अघोषित आणीबाणी आहे म्हणून एवढे आरोप होतात. पण पाकिस्तानी अतिरेक्यांचाही भारतातील लोकशाहीवर विश्वास आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा मुहूर्त साधून त्यांनी सॅट फोन स्विच ऑन केला.
अतिरेकी जत्रेत फिरायला यावे
अतिरेकी जत्रेत फिरायला यावे तसे पाच पाच चेकपोस्ट ओलांडून येतात, जत्रेत फुगे फोडावे तसे माणसे मारून निघून जातात, त्यांचे फोटो रिलीज केले जातात जे खोटे होते हे नंतर सांगितले जाते, नंतर संसदेत विरोधक जाब विचारू लागले तर लगेच अतिरेकी मारलेही जातात आणि ज्यांचा फोटो सुद्धा उपलब्ध नव्हते त्यांची नावे जाहीर होऊन हेच पहेलगाम मध्ये होते असे विना कोर्ट सुनवाई/ चौकशी घोषीतही केले जाते, सगळच अतर्क्य!
अहमदाबाद विमान अपघातामधे मरण
अहमदाबाद विमान अपघातामधे मरण पावलेल्या प्रवाशांचे सर्व डिटेल्स ( यामधे शेकडो फोटो, नाव, गाव पत्ता, जन्म तारिख, कुटुंबातील सदस्यांचे DNA... ) सहजपणे मिळविता येण्यासारखी परिस्थिती असतांनाही मृत व्यक्तींच्या अदलाबदलीचे अनेक प्रकार उघडकीला आले आहेत. मृताची ओळख पटविणे हे सोपे काम नाही.
कंठस्नान घातल्यानंतर अवघ्या काही तासांतच अतिरेक्याची ओळख पटली आणि मारला गेलेला पहलगाम हत्याकांडाचा ' मास्टर माईंड ' होता या प्रचारामधे मधे मोठी लबाडी वाटते. सर्व प्रकरण शांत झाल्यावर पुढे कधी तरी, ' कंठस्नान घालून मारला गेलेल्या व्यक्तीचा पहलगाम हत्याकांडाशी संबंध नव्हता ' वाचायला मिळाले तरी आष्चर्य वाटायला नको.
साहेबांना आज संसदेत छाती
साहेबांना आज संसदेत छाती ठोकायला मिळावी म्हणून केलेली नौटंकी वाटतेय.
तो ट्रम्प तिकडे येडा झालाय
तो ट्रम्प तिकडे येडा झालाय मोदीजी फोन उचलत नाही म्हणून. वेड्याच्या हॉस्पिटलला भरती करणार आहेत. तीन महिने झाले रोज कॉल करतोय वेगवेगळ्या नंबरने. मोदीजींकडे ट्रू कॉलर आहे त्यामुळे मोदीजीना आधीच समजतं हा दुसरा तिसरा कोणी नसून डोलांड आहे.
ट्रम्प आकाशवाणी करतो, फोनच्या
ट्रम्प आकाशवाणी करतो, फोनच्या भानगडीत पडत नाही.
From Indian Express
From Indian Express
3 militants killed in J & K, security agencies check for Pahalgam link
The identification of neutralised terrorists is being done! Please await further details - the Kashmir zone police posted at 8:16 pm.
अघोषित आणीबाणी आहे की नाही, ते जगदीप धनकर (की धनकड ?) सांगू शकतील का?
ऑपरेशन सिंदूर , ऑपरेशन
ऑपरेशन सिंदूर , ऑपरेशन महादेव, सैन्यदल प्रमुखांनी प्रेस कॉन्फरन्स मध्ये हिंदू पोथ्यांमधले दोहे इ. सांगणे यावरून सैन्याचे भगवेकरण आणि देशाची हिंदू राष्ट्राकडे वाटचाल वेगाने होते आहे.
चांगले आहे. Loving it.
चांगले आहे. Loving it. माझ्या सनातन हिंदु धर्मावर माझे प्रेम आहे. माझ्या धर्माने मला काहीही करायची पुर्ण मोकळीक दिलेली आहे पण त्याचबरोबर काय चुक आणि काय बरोबर हे ओळखायची दृष्टीही दिली आहे. धर्मावरुन माणसाची पारख व वागणुक करायला न शिकवणारा आजचा हा एकमेव धर्म आहे.
भारत हा कायम हिंदु राष्ट्रच होता, आता तो परत हिंदुराष्ट्र होत असेल तर मला आनंदच आहे.
आता हिंदु म्हणजे भगवे अतिरेकी, हिंदुतल्या जातीपाती, त्यावरुन झालेले छळ वगैरे पोस्टी येऊद्यात. सगळ्यांना टाईमपास हवाच असतो.
गोरक्षणाच्या नावाखाली हत्या
कर्नल सोफिया कुरेशी च्या धर्मावरून तिला दहशतवाद्यांची बहीण म्हणणारा विजय शहा कोणत्या धर्माचा आहे?
गोरक्षणाच्या नावाखाली हत्या करायला शिकवणारा वेगळा धर्म असावा.
जातीपातीवरून
झालेलाअजूनही होत असलेला छळ हा टाइमपास वाटतो, यात बरंच काही आलं.पाकिस्तान धर्माधारित राष्ट्र आहे. त्याचं काय झालं आहे ते दिसतंच आहे.
<धर्मावरुन माणसाची पारख व वागणुक करायला न शिकवणारा आजचा हा एकमेव धर्म आहे.> हे स्वतःला तरी खरं वाटतं का? की वाळूत नुसती मानच खुपसून ठेवली नाहीए , तर आत शीर्षासनावस्थेत पुरून घेतलं आहे? उत्तर भारतात आणि विशेषतः कावड यात्रेच्या मार्गात फळ , भाज्या
, अन्नपदार्थ विक णार्यांनी आपली नावे उघड करावीत म्हणजे त्यांचा धर्म कळेल आणि हिंदूंना त्यांच्याकडून सामान घ्यायचे की नाही असले प्रकार हिंदुत्ववादी पक्षाचे नेते आणि सरकारं करत आहेत. आणि या म्हणणार माझा धर्म धर्मावरून माणसाची पारख व वागणूक शिकवत नाही . हसूही येत नाही.
झारखंडमध्ये तबरेज अन्सारीला एका खांबाला बांधून रामनाम म्हणायला लावून मारहाण करून त्याचा जीव घेतला गेला. त्यावरची तुमची अमानुष प्रतिक्रिया माझ्या अजून लक्षात आहे. तुम्हांला त्यात तेव्हाही काही वावगं वाटलं नव्हतं.
इतर धर्माच्या लोकांना डिह्युमनाइज करणारा हिंदू धर्म माझा नाही. हा तुमचा सनातन धर्म असावा.
वर्षभर उत्सवांसाठी मनमानीपणे
वर्षभर उत्सवांसाठी मनमानीपणे वर्गणी गोळा करणारे कुठल्या वर्गात बसवायचे?
पाच हजार वर्षे एका वर्गाला
पाच हजार वर्षे एका वर्गाला अस्पृश्य ठरवून ह्याच धर्माने जी वागणूक दिली त्याला मानवी इतिहासात तोड नाही.
बराच काही लिहिण्यासारखे आहे.
न स्त्री स्वातंत्र्यं अर्हति हे अजून चालू आहेच.
यांना लवकरच आंबेडकरांनी
यांना लवकरच आंबेडकरांनी लिहिलेली घटना मोडीत काढून मनुस्मृती ने चालणार्या देशात राहायचे भाग्य मिळो या शुभेच्छा!
यांना लवकरच आंबेडकरांनी
यांना लवकरच आंबेडकरांनी लिहिलेली घटना मोडीत काढून मनुस्मृती ने चालणार्या देशात राहायचे भाग्य मिळो या शुभेच्छा!>>>>
स्वतःच ठरवायचं… मस्त.
छान पोस्टी आहेत. अजुन येऊद्यात. तसे नवीन काहीच नाहीये या पोस्टींमध्ये. मायबोलीवर या विषयाशी संबंधीत धाग्यांवर हीच उदाहरणे दिलेली असतात. टायपायचा कंटाळा आला असेल तर कॉपी पेस्ट केले तरी कुण्णाला काहीही कळायचे नाही, नक्की कुठल्या धाग्यावर काय वाचले ते.
सुरवात तुम्हीच केलीत, आता पोस्टींचा पाऊसही तुम्हीच पाडा.
पालथ्या घागरी़वर पाणी ओतायची
पालथ्या घागरी़वर पाणी ओतायची हौस नाही.
(No subject)
ऑपरेशन सिंदूर हे नाव का दिले
ऑपरेशन सिंदूर हे नाव का दिले गेले हे सगळ्यांना माहित आहे.
ऑपरेशन महादेव हे नाव हे ऑपरेशन महादेव शिखराच्या पर्वतरांगेमध्ये झाल्याने दिले गेले आहे. पहलगामच्या आसपास महागुणास (गणपतीवरून आलेले नाव व त्याचा apabhransh) नावाचे देखिल शिखर आहे.
काल मारले गेलेले दहशतवादी
काल मारले गेलेले दहशतवादी पहलगाम दहशतवादी हल्ल्यात सामील होते याचे पुरावे आहेत - अमित शहा आज संसदेत.
उत्तम!
खरं तर त्या अतिरेक्यांनी
खरं तर त्या अतिरेक्यांनी महादेव पर्वताचा आसरा घेऊन तेच खरे धर्मनिरपेक्ष असल्याचे प्रूव्ह केलंय. पण आता त्यांना मारल्यामुळे ते ऑपरेशन भगवे झाले असेल तर पूर्वलक्ष्यी प्रभावाने पर्वताचे नाव बदलता येईल का पाहिले पाहिजे.
पहलगाम चा मास्टरमाइंड मारला
पहलगाम चा मास्टरमाइंड मारला गेला? कसा विश्वास ठेवायचा आता?! लगेच आज अमित शहांच्या गर्जना, आमच्याकडे पुरावे आहेत वगैरे. (हे सर्व नेहरूंमुळे झाले हेही आहेच. ) एकूण सगळी स्टन्टबाजी वाटते आहे.
पालथ्या घागरी़वर पाणी ओतायची
पालथ्या घागरी़वर पाणी ओतायची हौस नाही.>>>>
१० पोस्टी टाकुनही अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यावर पश्चातबुद्धी झाली का?? असुदे. तुमचे चालु द्या. नेफ्लि जास्त इन्टरेस्टिंग आहे.
पुरावे आहेत >>> अमित शहांनी
पुरावे आहेत >>> अमित शहांनी संसदेत गन्स आणि एम्प्टी बुलेट्सचे फॉरेन्सिक ऍनालिसिस, पहलगामनंतर ज्या लोकांनी अतिरेक्यांना खाणे दिले त्यांच्याकडून शवाचे कन्फर्मेशन, त्यांच्याकडील पाकिस्तानी चॉकोलेट्स, २ अतिरेक्यांचा पाकिस्तानी व्होटर लिस्ट नंबर, अतिरेक्यांना ट्रॅक करताना वापरलेली सिगिन्ट आणि ह्यूमिन्टचा उल्लेख केला आहे
एकूण सगळी स्टन्टबाजी वाटते
एकूण सगळी स्टन्टबाजी वाटते आहे.
आहेच मुळी. छत्तिसिंगपुरा घटना, त्यानंतर झालेले पथ्रिबाल एनकाउंटर, त्यानंतर झालीली डीएन ए ची अदलाबदल व नंतर सर्व अधिकार्यांची झालेली मुक्तता जरूर वाचा ! ऐन लोकसभा अधिवेशनाच्या काळात उघड्या तोंडात जांभूळ पडावे तसे अतिरेकी अलगद एन्काउंटर मध्ये सापडतात !
https://en.wikipedia.org/wiki/Chattisinghpora,_Pathribal,_and_Barakpora_...
जनतेचे व मेडियाचे मागणेही फार नसते, असे काही रॅंडम लोक पकडून एन्काउंटर केले, ते पाकिस्तानी होते असे जाहीर केले की लोक वा! वा ! असे म्हणून move on होतात.
पण संसदेतल्या चर्चेत "ओपरेशन
पण संसदेतल्या चर्चेत "ओपरेशन सिंदूर एक तमाशा" असं म्हणणे - खासदार प्रणिती शिंदे. बरोबर आहे का?
कुठलाच पुरावा न देता स्वतःचेच
कुठलाच पुरावा न देता स्वतःचेच मत हे सार्वकालिक सत्य आहे हे ठासून सांगण्याचा कॉन्फिडन्स आवडला मला.
Pages