ऑपरेशन सिंदूर आणि भारत-पाक युद्ध घडामोडी

Submitted by ऋन्मेऽऽष on 6 May, 2025 - 20:14

आज मध्यरात्रीच्या सुमारास भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी ठिकाणांवर हल्ला केला आहे..

ग्रेट..!
हिच पहिली उत्स्फूर्त प्रतिक्रिया आली.
ऑपरेशन सिंदूर हे नाव सुद्धा अगदी समर्पक वाटले.

केंद्रीय गृहखात्याने सर्व राज्यांना आज (7 मे) मॉक ड्रील घेण्याचे आदेश दिलेत. हवाई हल्ल्याची सूचना देणारे सायरन वाजवले जातील, तसंच अशावेळी ब्लॅक आऊट कसा करावा, सुरक्षित ठिकाणी कसं जावं, इमारतींखाली कसं जमा व्हावं याचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे. हे अचानक इतके घाईगडबडीत, पण तेव्हाच खरे तर शंका आली होती. यावेळी काहीतरी घडणार आहे. घडणे गरजेचे आहे.

भारत-पाक युद्ध घडामोडी जाणून घ्यायला आणि वैयक्तिक हेवेदावे तसेच राजकीय मतभेद बाजूला ठेवून साधकबाधक चर्चा, माहितीची देवाणघेवाण करायला हा धागा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पटेल पंतप्रधान झाले असते तर संघ कधीच नामशेष झाला असता आणि मग नाली की गॅस पर चाय बेचने के अलावा काय झालं नसतं

कोणी पटेल पंतप्रधान झाले नाहीत म्हणून गळा काढतात, कोणी मोदी पंतप्रधान झाले म्हणून गळा काढतात ... सब चंगा है जी! सबकी दुकान चलनी चाहिये.

पहलगाम हल्ल्यानंतर " जेट विमाने काय लिंबू मिरची लावून ठेवायची आहेत का?" असा ओरडा झाला. पाकवर हल्ला केला तर"तमाशा" झाला. आणि कारवाई थांबवली तर "मध्यस्थीला घाबरले". म्हणजे नक्की काय केले असते कांग्रेसचे सरकार असते तर हेही सांगावे त्यांनी. उगाच खरडपट्टी सुरू आहे.

पाकवर नाही हो, पाकिस्तानमध ल्या दहशतवादी तळांवर. दोन्हीत फरक आहे, असं तुमच्याच जयशंकर, सिंह, शहा आणि मोदी यांनी इतके वेळा सांगून तुम्हांला कळेना?

मीडियाला हाताशी धरून तमाशा चालू नव्हता का? याच मीडियाचे अश्विनी वैष्णव यांनी आभार मानले.

दोन देशांतल्या युद्धविरामाची घोषणा तिसर्‍याच माणसाने करणं यात काही वावगं वाटत नसेल तर बर्‍याच गोष्टी तपासून बघायची गरज आहे.

असू द्या हो, चिकार रिकामा वेळ असेल तर करणार तरी काय सामान्य लोकं? असं सोमिवर वगैर आवेशात लिहिलं की रात्री झोप चांगली लागत असेल. आपल्या पोस्टींमुळे आपण भारतीय इतिहासाला वळण दिलंय, भल्याभल्यांना दिसत नाही ते सत्य समोर आणत आहोत वगैरे काहीबाही वाटत असेल. कोणाचं काही भलं होत असेल तर कशाला उगाच मोडता घालायचा?

गेले अकरा वर्ष बहुसंख्य लोकं वाळूत तोंड खुपसून बसले असतील? का काहीच मनासारख घडत नाही म्हणून ते तोंड खुपसून बसले असतील अशी स्वतः ची समजूत करून घायची.

मामी,

इतकी लाज काढू नका सगळ्यांची

निवडून येता येत नाही अन निवडून देता येत नाही या प्रकारचे पब्लिक आहे हे Rofl

निवडून येता येत नाही अन निवडून देता येत नाही या प्रकारचे पब्लिक आहे हे >> Biggrin

frustration चं नेमकं कारण सांगितलंत.

द्या हो, चिकार रिकामा वेळ असेल तर करणार तरी काय सामान्य लोकं? असं सोमिवर वगैर आवेशात लिहिलं की रात्री झोप चांगली लागत असेल. >>> ही पोस्ट केल्यामुळे आज मस्त गाढ झोप लागली असेल.

झोपेत असताना मोदी मृतप्राय अर्थव्यवस्थे ला CPR देउन पुनर्जीवित करत आहेत असं स्वप्न पडलं तर दचकून उठू नका कारण मोदी, अमित, राजनाथ, वैष्णवी यांनी अर्थव्यवस्थेची तिरडी स्मशानात पोहोचवली आहे. निर्मलाताई मडके धरून सगळ्यांच्या पुढे होत्या.

एकूण काय तर पाकचं नाक ठेचलं आणि वाइट वाटलं अशांसाठी जोरदार विरोध आणि आरडाओरड केली नाहीतर त्यांचे मतदार चिडतील ते तरी सुखावले.
पहलगाम प्रकरणाला कांग्रेसने कशा पद्धतीने उत्तर दिलं असतं तेसुद्धा सदनात सांगायला हवं होतं. ( उगाच इंदिरा गांधी असत्या तर वगैरे नको).

ओ हो हो! आपणच निवडलेल्या दोन नगांची - दिल्लीत नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र - कामगिरी बघून सहन होत नाही आणि सांगताही येत नाही , अशी अवस्था झाली, त्याचं फ्रस्ट्रेशन निघतंय होय!
--
पाकचं नाक ठेचलेलं काही दिसलं नाही. उलट ट्रंप पाकचा गालगुच्चा घेताना आणि मोदींचं नाक दाबून काम पिळताना रोज दिसतो आहे.
--

रात्रीचे चांदणे, तुमच्या शहामृगी प्रश्नाचं उत्तर भाजपवाल्या धाग्यावर देतो.

पहलगाम प्रकरणाला कांग्रेसने कशा पद्धतीने उत्तर दिलं असतं तेसुद्धा सदनात सांगायला हवं होतं. ( उगाच इंदिरा गांधी असत्या तर वगैरे नको).
सरकारला वर्तमानात येऊन विरोधकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यायला सांगा. नेहरू, इंदिरा कोण काढतेय ते बघा. विरोधकांनी काहीही उपाय सांगितला तरी सरकार मान्य करणार का? युद्धबंदी करण्यापूर्वी Pok जाऊ द्या, निदान पाकिस्तानच्या ताब्यातील कुलभूषण जाधवची सुटका करून घ्यायची होती सरकारने.

आग्या , भरत
Dead Silence!!!!
फक्त झुडपाभोवती लाठ्या फिरवणे चालू आहे.

ट्रंपिफिकेशन झाल्यामुळे व्यक्ती 'रागा'वली की लॉजिक बोंबलतं>>>
आजही मस्त गाढ झोप येणार एका व्यक्तीला

गेली अकरा वर्ष बहुसंख्य लोकं अशा वाळूत तोंड खूपसून बसले आहेत ज्या वाळूत एक भ्रामक जग त्यांना सदोदीत खूणावत असतं. सुरवातीला आपल्या मित्रांकरवी उपलब्ध करुन देउन, स्वस्तातल्या इंटरनेटची चटक लावून या आधुनीक शहामृगांच्या आणि त्यांची पुढची पिढी म्हणजेच बेबी शहामृगांच्या माना सदोदीत त्याच आभासी प्रोपगंडारचीत वाळूतच सब चंगासी पढवत खूपसलेल्या कशा रहातील याची पुरेपूर दक्षता गेल्या ११ वर्षांत घेतली गेली आहे. जंगलातला शहामृग असता तर मिटल्या डोळ्या समोरच्या अंधाराला कावून कदाचीत माना बाहेर आल्याही असत्या. पण आता या बहूसंख्येने असलेल्या आधुनिक शहामृगांच्या माना आणि मेंदू त्या वाळूतल्याच भ्रामक दुनियेत मग्न झाल्यावर स्वतःच्या विवेकबुद्धी ने विचार तो कधी होणार? आणि मग या वाळूत दिसणारे जग म्हणजेच या शहामृगांच्या शहामृगी दुनियेतले वास्तव ठरु पहात असल्यास नवल ते काय?

Le BJP :

hum-aapko-chiya-nahi-bana-rahe-chiya-aap-hai_0.jpg

निवडून येता येत नाही अन निवडून देता येत नाही या प्रकारचे पब्लिक आहे हे >>>

निवडून येणारे काय दिवे लावत आहेत ते बघा. हे निवडून आलेत म्हणजे भारताचा विकास झाला अस नाही. खरतर सगळ्याच आघाडीवर भारताची पिछेहाट होतेय.

तसही निवडणुका दिखावा असावा अशी शंका येतेय. निवडणूक आयोगाची वागणूक शंकास्पद आहे.

निवडून येणारे काय दिवे लावत आहेत ते बघा. >>> त्याचं काय आहे ना कंसराज, काहीं जण "जो न देखे रवी, वो देखे कवी" हीच उक्ती सर्वकालीक Face value आहे असा स्वतः च्या मनाचा समज करुन घेऊन, आपला रथ जमीनीच्या वर दोन बोटे चालत असल्याच्या भ्रमात असतात पण त्याचवेळी बेफिकीरीत "तुका म्हणे येथे पाहीजे जातीचे | येरा गबाळ्याचे नाही काम ||"
हा तुकोबारायांनी दिलेला * मार्क असलेला डिस्क्लेमर त्यांच्याकडून दुर्लक्षीत रहातो. तेव्हा हे असं व्हायचचं.

निवडून येता येत नाही- हे समजलं, स्पष्टच आहे.

निवडून देता येत नाही - ही काय भानगड आहे? हा उपरोध नव्हे, खरंच कळलं नाही..

https://x.com/ians_india/status/1952588847671579074
Delhi: All NDA MPs welcomed and congratulated Prime Minister Narendra Modi on Operation Sindoor

पण म्हणजे ऑपरेशन सिंदूर पूर्ण झालं का?

मला कौतुक करणारं एकही रिप्लाय दिसलं नाही. अल्गोरिदम का कमाल?

रिप्लायीज वाचणे मनोरंजक आहे !
ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाले का हे एकवेळ बाजूला ठेवू, पण सर्वांनी मोदीजींचे (बोर्डात आलेल्या मुलाप्रमाणे) हसतमुखाने स्वागत करणे, हार घालणे, 'हर हर महादेव' ओरडणे वगैरे खरेच किळसवाणे आहे. माझे 'ते' विधान अजूनही लोकांना खोटे वाटते ?

<< निवडून देता येत नाही - ही काय भानगड आहे? हा उपरोध नव्हे, खरंच कळलं नाही.. >>

------ या साठी विरोधी पक्ष नेत्याचे अभ्यास करुन बनविलेले प्रेझेंटेशन बघा.

भारत पाक युद्ध ट्रम्पच्या धमक्यांनी पुढाकाराने थांबविण्यात आले असले तरी भारत ते मान्य करत नाही. भारत ट्रम्पला क्रेडिट देत नाही म्हणून भारतावर ५० % टेरिफ लादले गेले आहेत ( असे भक्त गण आता म्हणजे टेरिफ जाहिर झाल्यावर म्हणत आहेत ).

भारताच्या समोर नरम झालेल्या पाकचा युद्धविराम संबंधात प्रस्ताव आलेला होता आणि म्हणून भारताने पाकची विनंती केली. यावेळी पाकने संपूर्ण शरणागती पत्कारली होती. असे होते तर ,
(अ) पाक व्याप्त काश्मीर भारताच्या ताब्यात घ्यायची संधी का घालविली?
(ब) पाक पासून सिंध , बलुचिस्तान वेगळे का केले नाही?
हे दोन्ही अशक्य होते तर पाक तुरुंगांत अडकलेल्या निरपराध भारतीय नागरिकांची सुटका तर करायची. युद्ध विराम करुन भारताला काय मिळाले? त्यावेळ पर्यंत तर पहलगाम हत्याकांड घडविणारे अतिरेकी पण मोकाटच होते.

ज्यासाठी ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवण्यात आले होते, ते उद्दिष्ट तर पहिल्याच दिवशी साध्य झाले होते. मात्र, पाकिस्तानने ड्रोन हल्ले थांबवले नाहीत, तेव्हा आपणही पाकिस्तानच्या नऊ एअरबेसवर अण्वस्त्रवाहक ब्रह्मोस क्षेपणास्त्रांनी प्रत्युत्तरात्मक हल्ले केले.
एका अण्वस्त्रधारी देशावर दुसऱ्या अण्वस्त्रधारी देशाने अशा क्षेपणास्त्रांनी हल्ला करणे—जी अण्वस्त्र वॉरहेड वाहून नेऊ शकतात—हा इतिहासातील पहिला प्रसंग ठरला असेल. चीनच्या मदतीनंतरही पाकिस्तानला निभावणे अवघड होते आणि भारत अण्वस्त्रांच्या धमक्यांनाही घाबरत नाही हे स्पष्ट झाल्यावर, पाकसाठी भारतावर ड्रोन हल्ले चालू ठेवणे योग्य नाही ही जाणीव पकड्याना झाली.

मुळात आपण सुरुवातीपासूनच पाकिस्तानच्या हल्ल्यांना प्रतिउत्तर देत होतो. त्यामुळे पाकिस्तानच्या DGMO ने युद्धविरामाची विनंती केली आणि आपण ती मान्य केली.
समजा आपण ती विनंती नाकारून हल्ले चालूच ठेवले असते, तर काय झाले असते?

कोणत्याही देशाच्या संरक्षण क्षमतेची एक मर्यादा असते. एकही पाकिस्तानी ड्रोन किंवा क्षेपणास्त्र लक्ष्यावर पोहोचू न देता हवेतच नष्ट करण्यात आपण यशस्वी झालो असलो, तरी एका टप्प्यानंतर काही हल्ले रोखणे शक्य झाले नसते. त्याचा परिणाम म्हणजे सैनिक, नागरिक, शाळा, रुग्णालये इत्यादींवर बॉम्ब पडून मोठी हानी झाली असती.
इस्रायल-इराण युद्धाचे उदाहरण घ्या—इस्रायलची संरक्षण क्षमता आपल्या पेक्षा अधिक असूनही आणि इराण-इस्रायल यांच्यात हजार किलोमीटरपेक्षा जास्त अंतर असूनही, इस्रायलला इराणी क्षेपणास्त्रांपासून पूर्ण बचाव करता आला नाही.

म्हणूनच, जेव्हा आपले ऑपरेशन सिंदूरचे मूळ उद्दिष्ट साध्य झाले होते, तेव्हा युद्ध चालू ठेवून देशाला काही दशक मागे नेण्यात काहीच शहाणपणा नव्हता. पाकिस्तानकडे गमावण्यासारखे काहीच नाही, पण आवडो न आवडो आपण जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहोत तर येत्या दोन वर्षात तिसऱ्या क्रमांकाची बनणार आहोत.

पाकव्याप्त काश्मीर भारताने ताब्यात घेऊ नये. तो काही व्यावहारिक पर्याय नाही. आधीच काश्मीरमधील मुस्लिम लोकसंख्येमुळे आपले नुकसान होत आहे, त्यात अजून काही लाखांची भर—तेही गेली सत्तर वर्षे पाकिस्तानच्या प्रभावाखाली राहिलेले जिहादी विचारांचे लोक—आपल्यात घेणे म्हणजे पायावर धोंडा मारून घेणे होय.

दुसरे म्हणजे, पाकिस्तान हा अण्वस्त्रधारी देश आहे. अशा देशाचे तुकडे करणे म्हणजे अण्वस्त्रहल्ला सहन करण्याची तयारी ठेवावी लागेल. “पाकचे तुकडे करू, POK ताब्यात घेऊ” हे भाषणांपुरते आणि दबाव निर्माण करण्यापुरते ठीक आहे, पण व्यवहारिक दृष्टिकोनातून ते शक्य नाही

Pages