Submitted by कुमार१ on 12 June, 2025 - 23:20

भाग ४ इथे
मार्च 2021 पासून सलग चालू असलेल्या शब्दवेधच्या पाचव्या भागात आपणा सर्वांचे मनापासून स्वागत !
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
*वॉटर लिलीच्या बिया >>>
*वॉटर लिलीच्या बिया >>> अच्छा ! धन्यवाद
धन्यवाद कुमार सर
धन्यवाद कुमार सर
Lotus and Water Lily are
Lotus and Water Lily are different.
होय. पण सरसकट “कमळीकरण” झाले आहे बापड्या फुलांचे 😀
कमळीकरण>>>>>>
कमळीकरण>>>>>>
कमळीकरण
कमळीकरण
काही इंग्लिश शब्दांना
काही इंग्लिश शब्दांना विदर्भातील ग्रामीण बोलीत कसे चपखल मराठी शब्द काढले आहेत आणि ते रुळले देखील आहेत याची दोन उदाहरणे महेश एलकुंचवारांनी दिली. ते दोन शब्द आहेत :
कानशा
आणि
दमकोंडी
हे कोणत्या इंग्रजी शब्दांचे प्रतिशब्द आहेत ते ओळखण्यासाठी काही तास देतो. पाहूया कोण उत्तर देतेय . . .
(इंग्रजी शब्द परिचित आहेत)
कमळीकरण>>>>
कमळीकरण>>>>
कानशा म्हणजे काय? मराठीत.
* कानशा म्हणजे काय
* कानशा म्हणजे काय
>>> ते सांगितलं तर उत्तर लगेच येईल !
जरा त्या शब्दाकडे नीट बघा
मूळ इंग्लिश शब्द इतका परिचित आहे की आपण त्याला जणू मराठी शब्दच समजू लागलो आहोत
कानशा - Earbuds? Headphones?
कानशा - Earbuds? Headphones?
दमकोंडी - suffocation?
कानशा >>> कानाशी संबंधित हे
कानशा >>> कानाशी संबंधित हे बरोबर पण ते उत्तर नाही.
दमकोंडी>>> कपड्याशी संबंधित आहे.!
दमकोंडी>>> कपड्याशी संबंधित
दमकोंडी>>> कपड्याशी संबंधित आहे.!
मास्क?
मफलर?
मफलर?
एलकुंचवार यांचं भाषण
एलकुंचवार यांचं भाषण ऐकल्यामुळे कानशा शब्द माहीत आहे. त्यांनी अशा आविर्भावात सांगितलं आहे की जणू संपूर्ण ग्रामीण विदर्भात हा शब्द वापरतात. असो. शब्द छान आहे.
छान प्रयत्न सर्वांचे!
छान प्रयत्न सर्वांचे!
कानशा= मोबाईल फोन
..
दमकोंडी = Jeans (ची पॅन्ट)
धन्यवाद.
धन्यवाद.
कालपासून उत्सुकता लागून राहिली होती.
मोबाईल एकदा मनात आलेलं. पण ग्रामीण वैदर्भीय शब्द त्यामुळे तो फार जुना असेल असं वाटलं.
कानशा !
कानशा !
खरे म्हणजे नजरशा किंवा आंखशा म्हणायला पाहिजे मोबाईलला!
कानाला लावून फार कमी वापरल्या जातो हल्ली...!!
बहुतेक फक्त छोटा नोकिया
बहुतेक फक्त छोटा नोकिया बाजारात असण्याच्या काळात तो प्रघात पडला असावा
तेव्हा तो लोकांच्या कानाला चिकटून असायचा !
नंतर त्या नोकियालाच बाकीच्या
नंतर त्या नोकियालाच बाकीच्या कंपन्यांनी नो किया.
+१ आणि त्यानंतर
+१ आणि त्यानंतर
एखाद्याचा नोकिया होणे हा वाक्प्रचार मराठीत आला !
अण्णू गोगट्याचा नोकिया झाला
अण्णू गोगट्याचा नोकिया झाला
छल्ला सारखंच मलाही वाटलं
छल्ला सारखंच मलाही वाटलं म्हणून मी कानापर्यंत जाऊन परत आले.
कमठ =
कमठ =
१. बांबू
२. कासव
* कमठ = बांबू >>>> तीरकमटा= धनुष्य (विशेषतः कळकाचे किंवा शिंगाचे).
समस्या, आपत्ती, कटकट, अडचण,
समस्या, आपत्ती, कटकट, अडचण, अडथळा अडचण, आक्षेप, दोष, विकार, अपाय आणि दुखापत
या सर्व शब्दांमध्ये एक समान सूत्र आहे आणि ते म्हणजे . . .
. .
. .
. .
. .
या सर्वांसाठी इंग्लिशमध्ये प्रॉब्लेम असे म्हणता येते!
हिमदुग्ध
प्रॉब्लेम म्हणता येते 👍
हिमदुग्ध
आज एका लेखात आईसक्रीमला “हिमदुग्ध” लिहिलेले वाचले. फारच ओढूनताणून केलेले वाटले. हसू आले.
खाण्यापिण्याच्या पदार्थां साठी असे ठोकून कोंबून घडवलेले शब्द रसभंग करतात, पूर्णत: निष्प्रयोज्य कृती.
* हिमदुग्ध” ओढूनताणून
* हिमदुग्ध” ओढूनताणून
>>> +१
तरी हे बरे ! याहून एक ऐकलेला भारी टिंगलखोर शब्द म्हणजे :
हिमदुग्धशर्करावगुंठीतगोलगट्टू !
( जसे रेल्वे सिग्नल संदर्भात अग्नीरथगमनागमनलोहताम्रपट्टीका हा एकेकाळी बनवला होता त्याप्रमाणे).
जा सिमरन जा जी ले अपनी जिंदगी
"जा सिमरन जा, जी ले अपनी जिंदगी" - या दृष्यात ट्रेनसंदर्भात जर हा संवाद 'जा सिमरन जा, नाहीतर अग्नीरथगमनागमनलोहताम्रपट्टीका सुटेल' असा असता तर तो म्हणेपर्यंत पिक्चर संपला असता.
हिमदुग्ध >> शी! आइस्क्रीम
हिमदुग्ध >> शी! आइस्क्रीम खाण्यातली सगळी मजाच जाईल हा शब्द वापरला तर. दुसरा तो लांबलचक शब्द म्हणेपर्यंत आइस्क्रीम वितळेल आणि "तीर्थरूप आईस" खावे लागेल.
तीर्थरूप आईस
तीर्थरूप आईस 😀
ह पा...तुम्ही फार टॅलेंटेड
ह पा...तुम्ही फार टॅलेंटेड आहात.
(No subject)
Pages