शब्दवेध व शब्दरंग (५)

Submitted by कुमार१ on 12 June, 2025 - 23:20

भाग ४ इथे

मार्च 2021 पासून सलग चालू असलेल्या शब्दवेधच्या पाचव्या भागात आपणा सर्वांचे मनापासून स्वागत !

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

“कर्नाटक कलह” मिटवायला प्रणयकलह >> हे फारच झालं Lol

अस्मिता, मराठी माणसांना मृदुभाषी म्हटल्याबद्दल (आले का चार "म") महिलेचा सत्कार करायला हवा.

म - मा- मृ-म्ह - म ?

मानलं ! 😀

असेच ते “क्रमानेच येती चारही य जयात; म्हणावे तयाला भुजंगप्रयात” असे माझे बाबा सांगतात. त्यांना काव्य वृत्त शिकवतांना त्यांच्या मराठीच्या शिक्षकांनी लक्षात ठेवायला तशी trick सांगितली होती. असेच काहितरी शार्दूलविक्रिडित वृत्तासाठीही आहे.

… कलह प्रकार सुंदोपसुंदी…

तिलोत्तमा आणि सुंद व उपसुंद स्टोरी माहित होती पण सुंदोपसुंदी त्यावरून आलाय हे नव्हते माहित.

काय असेल ते असेल सुंदोपसुंदी “माजली” असेच वाचलेय नेहेमी, झाली किंवा सुंदोपसुंदी घडली असे कधीच नाही. किती माज करतो हा शब्द !

BTW, या तिलोत्तमेची मम्मी “अरिष्टा” - problem तर येणारच. 😜

मकार वरून १० म कार चंचल असतात ते सुभाषित आठवलं.
मा मनो मधुपो मेघो मद्यपो मर्कटो मरूत्।
मक्षिका मत्कुणो मत्स्यो मकारा दश चञ्चला:।।

मस्त चर्चा ! Happy

तिलोत्तमा आणि सुंद व उपसुंद स्टोरी माहित होती पण सुंदोपसुंदी त्यावरून आलाय हे नव्हते माहित. >>> +१

नावे काही सांगून जातात.
तुमच्या चिरंजिवांनी आमच्या खिडकीची काच फोडली. पुराणातले आणि शेजाऱ्यांचे आदरणीय.
......
झुंपा लाहिरी या लेखिकेचे ठेवलेले नाव तिलंजना.( = बंगाली तिलोत्तमा?). पण शाळेतल्या बाईंना एकदा समजले की घरी तिला लाडाने झुंपा म्हणतात. मग बाईंनीही तिला झुंपाच बोलायला सुरुवात केली आणि तेच नाव चिकटले. तिनेही कायम ठेवले.

थोडी शब्दगंमत. . .

कोकम
हे पेय सगळ्यांनाच माहिती आहे. परंतु,
बेळगावच्या भाषिक संस्कृतीचे वर्णन करताना हा शब्द खालील अर्थाने वापरला जातो :
कोकम = कोकणी + न्नड + राठी !

( २८/९ च्या मटा संवादमधील लेखातून साभार)

भैरप्पांवरच्या एका लेखात दैत्यप्रतिभा असा शब्द आहे. कन्नड - श्रेष्ठ प्रतिभा.. दैत्य giant या अर्थाने असेल का?

आपला वडील हा शब्द उर्दू फारसीतल्या वालिद वरून आलाय असंही नुकतंच वाचलं.

वडील [ सं. वृद्धृ ; प्रा. वड्डिअ; देप्रा. वड्डिल, वड्ड
] बाप; वयाने मोठे.वडीलकी, वडीलधार
अशी एक क्युत्पत्ती वाचली आहे.

दैत्यप्रतिभा = नवीन शब्द.

दैत्य giant या अर्थाने बरोबर वाटतोय.

जनरली दैत्य खूप ताकदवान- लढावू- मजबूत दाखवलेले असतात पुराणकथांमधे.

लंपन,
मलाही याबद्दल उत्सुकता आहे. नुकताच लोकसत्तात आलेल्या मेहेंदळे सरांवरील, "शिवचरित्र आणि मेहेंदळे सर" या लेखात असा उल्लेख आहे.
https://www.loksatta.com/sampadkiya/features/kedar-phalke-pays-tribute-t...
Shared by Loksatta android app
click here to download
https://loksatta.page.link/LS_app

या लेखात, बरेच नवनवीन शब्द आले आहेत.
‘कटुबाण’, ‘महालानिहाये’, ‘बदअमल’ आणि ‘महासिद्धी’

यातील खाली नमूद केलेले वाक्य वाचून त्या दोन शब्दाबाबत अतीव कुतूहल निर्माण झाले आहे

छत्रपती शिवाजी महाराजांच्या दोन वेगवेगळ्या पत्रांत येणाऱ्या ‘तोरतरंग’ आणि ‘वडऊपर’ या दोन शब्दांचा अर्थ अजूनही लागलेला नाही.

@ महालानिहाये

महाल निहाय असा अर्थ लागतोय. आज्ञापत्रातून “सरदारांकडे ३ महाल दिले” असे उल्लेख असतात तेव्हां palace नसून प्रदेश.

महाल = अंमलाखाली असलेल्या प्रदेशाचे एकक, such as district, group villages etc.

@ बदअमल = अंमल बसवला चे उलटे. बदअंमल केल्यास शिक्षा होईल अशी पत्रे वाचली आहेत. तसे असावे. जाणकार लोक सांगतीलच.

बाकी शब्द नवीन आहेत, पूर्वी कधी वाचले नाहीत.

लेखही वाचला नाही म्हणून संदर्भ चुकलेला असल्यास माफी.

ते ओपन नाही रे होत ऋतुराज. वाचायला पैसे भरा असे सांगत आहेत Happy
अमल/ अमाल (फारसी)म्हणजे करणे to do. जो आपण मराठीत त्याच अर्थी वापरतो. अमलात आणले. बद वाईट. बद अमाल म्हणजे दुष्कृत्य.
नाहीयेss (फारसी)म्हणजे जिल्हा किंवा प्रांत. निहाय त्या अर्थी मराठीत आला असावा. सीमा दर्शक.
कुटुबाण नाही माहीत. टू आहे की तु? दिले / दान अर्थी आलाय का तो शब्द लेखात?
बाकी पास.
मागे सकाळ मध्ये data सकट आले होते सप्तरंग पुरवणीत की राजांनी दरबारी भाषेत बरेच मराठी प्रतिशब्द आणले फारसी चा प्रभाव कमी व्हावा म्हणून.

बदअमल हा फारसी/ अरबी शब्द आहे. त्याचा अर्थ दिला आहे दुष्कर्मी, दुष्कृत्य करता. जीसाला अमल अच्छा न हो. म्हणजे वाईट कारभार.
बाबा
मला वाटतय की हा शब्द कन्नड, कुमायून, तेलगु बाबू वरून मराठीत आला असावा.
आणि बाबू हा शब्द मूळ संस्कृत वप्तृ(= वडील) आदरदर्शक संबोधन.
दुसरे शब्द मिळाले तर बघतो.

बाबू हा शब्द मूळ संस्कृत वप्तृ >> खरंच का? निदान एका शब्दाकडून दुसऱ्या शब्दाकडे कसा अपभ्रंश होत गेला याचा मधल्या प्राकृत वगैरे भाषांत पुरावा असेल तर उलगडा होऊ शकेल.

अनिंद्य, लंपन, केशवकूल धन्यवाद.
लंपन,
माझ्याकडे उघडत आहे लिंक.
शिवचरित्र आणि मेहेंदळे सर + लोकसत्ता असे टाकून गुगलून बघा.

‘कटुबाण grant, or a tenure in perpetuity, for a fixed sum, of barren or fallow lands: also such lands.
TransLiteral वरून
महासिद्धी
माला वाटतंय अष्टसिद्धी ज्याला प्राप्त झाल्या आहेत तो महासिध्द

वाचते आहे, इन्टरेस्टिंग माहिती. Happy

बदअमल हे disobedience या अर्थी म्हणतात. एखादी आज्ञा अमलात न आणणे.

श्मश्रू म्हणजे काय?
दाढी करणे?
बिरबलाच्या गोष्टींत हा शब्द वाचलेला आहे...पण बादशहा तेव्हा श्मश्रू करत होते... असे वाचल्यावर अकबर बादशहा कशी काय दाढी करणार? असा प्रश्न पडे.
Happy

जोधा अकबर सिनेमात हृतिक आणि अकबर बिरबल मालिकेत विक्रम गोखले यांना दाढी नव्हती. रोजच्या रोज श्मश्रू करत असावेत.

अकबराच्या चित्रांत त्याला दाढी दाखवलेली नाही. ही चित्र त्याला प्रत्यक्ष पाहिलेल्या लोकांनी नोंदवलेल्या वर्णनावर आधारित असावीत.

Pages