Submitted by कुमार१ on 12 June, 2025 - 23:20

भाग ४ इथे
मार्च 2021 पासून सलग चालू असलेल्या शब्दवेधच्या पाचव्या भागात आपणा सर्वांचे मनापासून स्वागत !
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पार्षद, किंकर
पार्षद, किंकर
= सेवक; चाकर
आणि
किंकर = देवबाभळीचे किंवा वेड्या बाभळीचे झाड,
हा अन्य अर्थ.
या बाभळीला ‘वेडी’ का म्हटले असावे?
वेडी बाभूळ ही मध्यम आकाराचे
वेडी बाभूळ हे मध्यम आकाराचे झुडूप असते. त्याच्या फांद्या कशाही वेड्यावाकड्या वाढतात म्हणून वेडी बाभूळ म्हणत असावेत.
अच्छा ! धन्यवाद
अच्छा ! धन्यवाद
फांद्या कशाही वेड्यावाकड्या
फांद्या कशाही वेड्यावाकड्या वाढतात म्हणून…
ओके 👍
वेड्या बाभळीचे सिक्रेट मलाही जाणून घ्यायचेच होते.
किंकर= सेवक हे माहिताय.
किंकर= सेवक हे माहिताय. रामकिंकर हे हनुमानाचे नाव आहे.
BTW, आपल्याकडे ज्यांना नगरसेवक त्यांनाच दिल्ली भागात “पार्षद” म्हणतात.
दोन्हींकडे ही लोकं जनतेच्या सेवकासारखी मात्र वागत नाहीत, मालक- राजासारखीच arrogant वागतात.
* मालक- राजासारखीच >>> खरंय
* मालक- राजासारखीच >>> खरंय
* आपल्याकडे ज्यांना नगरसेवक त्यांनाच दिल्ली भागात “पार्षद” >>> तसेच,
आमदार >>>>> विधायक
खासदार>>>>> सांसद
अशा दोन वरच्या पायऱ्या
वेडी बाभूळ इथे आहे.https:/
वेडी बाभूळ इथे आहे.
https://marathivishwakosh.org/55888/
अशा दोन वरच्या पायऱ्या…
अशा दोन वरच्या पायऱ्या…
हो.
Unfortunately, often accompanied by higher level of arrogance in their behaviour
खासदार म्हटले तर तिकडे त्यांना बोध होत नाही आणि सांसद आपल्याला पटकन लक्षात येत नाही.
आपल्याकडच्या नेत्यांचा-बातमीदारांचा “पंतप्रधान” आणि “प्रधानमंत्री” हा घोळ तर प्रसिद्धच आहे.
@ केशव,
@ केशव,
लिंक बघितली.
बहुवर्षायू सपुष्प वनस्पती … असे वाचून बाभूळ ही फार देखणी असावी असा भास होतो ना ? 🙂
आपली माय मराठी.
आपली माय मराठी.
हे दोन नवीन शब्द आज वाचले.
हे दोन नवीन शब्द आज वाचले.
‘बहुप्रसवी’ म्हणजे बरीच काही पुस्तके लिहिलेला लेखक उदा. बाबुराव अर्नाळकर,
‘बहुप्रसवी’ च्या विरुधदार्थी 'बिन्दुस्रावी.'
>>> बिन्दुस्रावी
>>> बिन्दुस्रावी
ईई! हे अगदी 'ठिबक सिंचन'सारखं वाटतंय!
लोक (जनता) चे अनेकवचन लोकं
प्रमाण भाषेत, आमच्या पुण्याच्या धरा हवं तर, लोक (जनता) चे अनेकवचन लोकं होते की लोक? अनेक लोक? की अनेक लोकं?
.
माझ्या मते भू लोक, सत्य लोक, भुवः लोक, जन , तप , मही (भू) मला वाटते या लोकांचे अनेकवचन लोक असे रहाते. नारद मुनी ३ लोक फिरुन आले. पण लोक(जनता) याचे अनेकवचन लोकं असे होते. ठाकरे यांच्या सभेला अनेक लोकं आली होती. अनेक लोक आले होते. मला तर दोन्ही बरोबर वाटते.
.
प्लीज कोणी तरी वन्स & फॉर ऑल या प्रश्नावरती प्रकाश टाका - लोक (जनता) चे अनेकवचन लोकं होते की लोक?
मुळात जनता हाच अनेक वचनी शब्द
मुळात जनता हाच अनेक वचनी शब्द आहे ना?
लोक असेच म्हणणे योग्य राहील.
छल्ला मूळात लोक हाच शब्द अनेक
छल्ला मूळात लोक हाच शब्द अनेक वचनी आहे तयाचे अजुन अनेकवचन होणार नाही बहुधा. तुमचे म्हणणे बरोबर वाटते. अनेक लोक जमले होते. पण मी हे ही ऐकलय - चिक्कार गर्दी झालेली किती लोकं जमली होती त्याला मर्यादाच नाही.
भू लोक, सत्य लोक, भुवः लोक>>
भू लोक, सत्य लोक, भुवः लोक>>
लोकचा दुसरा अर्थ भुवन असाही आहे, तो अर्थ इथे आहे.
<<मुळात जनता हाच अनेक वचनी शब्द आहे ना?
लोक असेच म्हणणे योग्य राहील.>> +१
लोक >> +१
लोक >> +१
. . .
पण,
केस व केसं ही दोन रुपे आहेत
(झिपरी; पुढील केसं. झुलूप; बट)
दाते श.
चिक्कार गर्दी झालेली किती
चिक्कार गर्दी झालेली किती लोकं जमली होती त्याला मर्यादाच नाही >> बोली भाषेत काहीही म्हणा. चालेल. लोकं, केसं, किरणं वगैरे. अधिकृत मजकूर लिहायचा झाल्यास ते लोक, ते केस, ते किरण.
धन्यवाद हपा.
धन्यवाद हपा.
केस व केसं ही दोन रुपे आहेत >
केस व केसं ही दोन रुपे आहेत >> अच्छा. हे माहीत नव्हतं.
>>>>>लोक असेच म्हणणे योग्य
>>>>>लोक असेच म्हणणे योग्य राहील.>> +१
धन्यवाद छल्ला, मानव.
Pages