Submitted by कुमार१ on 12 June, 2025 - 23:20

भाग ४ इथे
मार्च 2021 पासून सलग चालू असलेल्या शब्दवेधच्या पाचव्या भागात आपणा सर्वांचे मनापासून स्वागत !
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सर्वांचे आभार! स्वाती, इतके
सर्वांचे आभार! स्वाती, इतके सुरेख रसग्रहण - मनापासून धन्यवाद
चंद्रमाधवीचे प्रदेश या कविता संग्रहातली ही कविता आहे. कॉलेजच्या दिवसात या कविता वाचल्या होत्या. आता पुन्हा वाचताना खूप सारे अर्थांचे पदर नव्याने उलगडत आहेत!
कुठलाही शब्द अडला की बाबांना
कुठलाही शब्द अडला की बाबांना विचारणे आणि त्यांचा मूड नसला/ त्यांनासुद्धा अडला की मराठी शब्दकोषात शोधणे असा प्रोटोकॉल पाळतो.
आज अडलेला शब्द = बालातप
आधी कुण्या बालयोगीचे तप वगैरे असा अर्थ वाटला होता, पण “बाला”तप असल्याने शब्दकोष बघावा लागला.
शब्दकोषात दिलेला अर्थ = सकाळचे कोवळे ऊन !
आ हा हा ! सुरेख
आ हा हा ! सुरेख
अगदी कोवळी उन्हे अंगावर पडल्यासारखे प्रसन्न वाटले
ओह, हा माहीत नव्हता शब्द.
ओह, हा माहीत नव्हता शब्द. छान आहे.
हिंदीत 'कच्ची धूप' म्हणतात तेही आवडतं मला.
छान अर्थ आहे. बाल + आतप.
छान अर्थ आहे. बाल + आतप. कोवळे ऊन.
अरे वा! आतपि हे सूर्याचे एक
अरे वा! आतपि हे सूर्याचे एक नाव असल्याचे स्मरते.
आतपि मंडली मृत्यु .... जनार्दन - अश्या काहीतरी ओळी आहेत.
राजेशाही, हुकुमशाही व
राजेशाही, हुकुमशाही व एकाधिकारशाही हे सगळे परिचित शब्द.
परंतु हा काहीसा अपरिचित असतो :
सामंतशाही
<<<<< सामंत= मांडलिक राजा; संस्थानिक, जहागीरदार
( = A feudatory prince)
“पोर्तुगाल आणि स्पेन या देशांनी त्यांच्या पद्धतीने सामंतशाही स्वरूपाची साम्राज्यशाही वसवण्याचा प्रयत्न केला”.
सरंजामशाही हा सामंतशाहीचा समानार्थी असावा.
(feudal = सरंजामशाही)
मी शाळेत असताना इतिहास हिंदीत
मी शाळेत असताना इतिहास हिंदीत शिकलो. त्यात सामंतशाही असाच शब्द होता. मराठी पुस्तकात सरंजामशाही असे.
एक शंका :
एक शंका :
ब्रिटिशांनी आपल्यावर राज्य केलं ती राजेशाही (?) , तर वरच्या उदाहरणात दिलेली पोर्तुगाल व स्पेन यांची सामंतशाही यात फरक आहे का ?
राजेशाहीत किंग असतो तर वरती सामंतशाहीचा इंग्रजी अर्थ देताना त्यांनी प्रिन्स शब्द वापरला आहे.
feudatory prince >> इथे ते
feudatory prince >> इथे ते मांडलिक राजा या अर्थाने असावं. सर्वच सरंजाम हे काही राजे नसावेत, पण जणू काही त्या त्या भूमीचे राज्यकर्तेच होते, त्यामुळे ते समानार्थी वापरलं असावं.
आपल्याकडे ब्रिटिश साम्राज्याने इतर राज्यं मांडलिक बनवली तरी अंमल हा ब्रिटिश राजसत्तेचाच होता. कायदे कानून, पोलिस, संरक्षण वगैरे सर्व व्यवस्था एकाच वरच्या राजसत्तेच्या हातात होती. मांडलिक संस्थानं ही केवळ नावापुरती राज्यकर्ती होती. त्यांना सरंजामांप्रमाणे कितपत अधिकार होते माहीत नाही.
अच्छा ! धन्यवाद
अच्छा ! धन्यवाद
हर्पा+१ मी मराठीतूनच इतिहास
हर्पा+१ मी मराठीतूनच इतिहास शिकलेय. सरंजामशाही आठवी- नववीत भरपूर वेळा वाचलेय.
सामंती शासन जास्त वाचलेय,
सामंती शासन जास्त वाचलेय, सरंजामशाही तेव्हढेसे नाही.
@ feudatory prince / मांडलिक राजा या अर्थाने असावं. सर्वच सरंजाम हे काही राजे नसावेत….
“सामंती शासन“ किंवा सरंजामी राजवट याला जोडून हमखास येणारा शब्द म्हणजे क्षत्रप ! Regional chieftains
आतप -
आतप -
"छायामन्यस्य कुर्वन्ति तिष्ठन्ति स्वयमातपे। फलान्यपि परार्थाय वृक्षाः सत्पुरुषा इव।" - झाडे
सरंजाम चा सरळ अर्थ फारसी मध्ये शेवट, निकाल, conclusion किंवा दैव / नशीब असा येतो. ओंजाम (अंजाम) - do/ done अशा अर्थी. मराठीत येताना त्याचा अर्थ कसा बदलला हे समजत नाहीये.
सरंजाम
सरंजाम
फारशीतून हिंदीत येतानाच अर्थबदल झालेला दिसतो : प्रबंध, व्यवस्था, इंतजाम, आपेक्षिक अंतर, एक स्थान पर रहना, स्थिरता
https://www.hindwi.org/hindi-dictionary/meaning-of-saranjaam
. .
दातेंनी सरंजामचे तीन प्रकार दिले असून ते रोचक वाटले :
चौथसरंजाम,
जातसरंजाम व
फौजसरंजाम
फारसी दरबार भाषा असल्याने
फारसी दरबार भाषा असल्याने बरेचवेळा शब्द फार्सीतून मराठी मध्ये आले आहेत. फारसी -हिंदी - मराठी असा प्रवास नाहीये.
चौथ बहुदा tax संबंधी असावे.
तिष्ठन्ति स्वयमातपे ❤
तिष्ठन्ति स्वयमातपे ❤
वृक्षांचे प्राक्तन.
शेयरल्याबद्दल आभार @ लंपन.
हे सुभाषित आठवलं लंपन, पाठ
हे सुभाषित आठवलं लंपन, पाठ होतं. वाचून मजा आली.
अंजाम - फार इंटरेस्टिंग आहे.
इथे kulu यांच्या एका लेखात 'कुरकुरीत उन्हाचा तुकडा' वाचलं होतं, ते 'कच्ची धूप' इतकंच आवडलं होतं. बालातप आणि हे दोन्ही 'मार्तंड जे तापहीन' - असणारं वर्णन वाटतं.
हे सुभाषित आठवलं लंपन, पाठ
हे सुभाषित आठवलं लंपन, पाठ होतं >> +१. टिमवी
स्वाती धन्यवाद ग. खूप छान
स्वाती धन्यवाद ग. खूप छान रसग्रहण __/|\__
सामंतशाही = सरंजामशाही.
सामंतशाही = सरंजामशाही.
पूर्वी पूर्ण देश राजाचा असे. प्रशासन चालवण्यासाठी / संरक्षणासाठी / सैन्याचा खर्च चालवण्यासाठी राजा काही भूभाग त्याच्या मंत्र्यांना देत असे = सरंजाम देत असे. म्हणून ते सरंजामदार.
कालांतराने राजे कमकुवत झाले. आणि हे सरंजामदार आपापल्या छोट्या प्रदेसापुरते सर्वेसर्व्हा झाले. जरी राजा वेगळा असला तरी त्याची ताकद फारच कमी असे. एका अर्थाने सरंजामदारच छोट्या प्रदेशातले राजे झाले. राजे राहिले पण त्यांना महत्व, अधिकार राहिले नाहीत.
हाच तो मध्ययुगाचा काळ मानला जातो.
वर डॉ कुमारांनी पोर्तुगील अन स्पेन बद्दल लिहिलेलं वाक्य मात्र समजत नाही. संदर्भ कळला तर समजू शकेल.
अनिंद्य बरोबर, फ्युडॅलिझम ला
अनिंद्य बरोबर, फ्युडॅलिझम ला मराठी प्रतिशब्द सरंजामशाही वापरला जातो
त्यांच्याकडे गेलो तर ,चहा
त्यांच्याकडे गेलो तर ,चहा नाश्त्याचा मोठाच सरंजाम मांडलेला होता... असेही ऐकले आहे.
एक शंका
एक शंका
मराठीत व्यस्त हा शब्द "व्यस्त प्रमाण" हा गणिती शब्दप्रयोग सोडल्यास (आणि व्यग्र ह्या अर्थाने चुकीचा व्यस्त ह्या शब्दाचा वापर सोडल्यास) अन्यत्र कुठे वापरतात?
शब्दांतर्गत अस्ताव्यस्त हे एक उदाहरण सहज आठवलं. पण सुटा व्यस्त बाकी कुठे आठवत नाहीये.
महाराष्ट्र शब्दकोशात
महाराष्ट्र शब्दकोशात
व्यस्त
वि. १ वेगळा ; पृथक ; भिन्न . २ उलटया , विपरीत क्रमाचा . कालक्रीडित हे बघून रडला , हे व्यस्त कांही नसे । - केक ५३ . ३ गोंधळलेला ; बावरलेला ; अस्वस्थ . ४ सर्वत्र पसरलेला ; वाटलेला ; पृथकभूत असलेला . व्यष्टि पहा . ५ ( गणित ) दोन परिमेयांचा परस्पराशी असा संबंध की एक वाढताना दुसरे कमी होत जावयाचे ; विपरीत . [ सं . ]
०प्रमाण न. ( गणित ) एक कमी झाले असतां दुसरे वाढणारे प्रमाण . व्यस्ताव्यस्त - वि . १ अस्ताव्यस्त पहा . २ वेडेवांकडे . व्यस्ताव्यस्त गातां बोलतां सुशब्दें सन्मानिती । - सप्र १९ . ११ . व्यस्ती - वि . उफराटी ; व्यस्त . बहु असत्किया व्यस्ती । या नांव बध्द । - दा ५ . ७ . ३५ .
अवल, चांगली माहिती.
अवल, चांगली माहिती.
ते वाक्य साप्ताहिक साधनातील एका लेखातले आहे.
त्याची वाखुसा नाही जवळ. तो परत शोधावा लागेल . . .
पेन, टोपण आणि विविध ‘नावे’ !
पेन, टोपण आणि विविध ‘नावे’ !
एखाद्या लेखकाने (किंवा कलाकाराने) जर आपले खरे नाव न वापरता अन्य पर्यायी नावाने लेखन केले तर मराठीत आपण त्याला सर्रास टोपणनाव म्हणतो. परंतु या २ शब्दांच्या अर्थांमध्ये आणि हेतूमध्ये काही फरक आहे तो पाहू.
लेखननाव (pen name)
लेखक आपली खरी ओळख लपवून ज्या नावाने तो लेखन करतो ते नाव. हे लेखक स्वतःच ठरवतो. याचे विविध हेतू असतात : स्त्री अथवा पुरुष ही ओळख लपवणे, सामान्य व्यवहार आणि आपले लेखन यांची फारकत करणे, या नावातून आपल्या जिवलगाबद्दल प्रेम व्यक्त करणे किंवा वादग्रस्त लेखनाच्या बाबतीत वाचकांचा रोष वा पूर्वग्रह टाळणे. (केशवसुत आणि ठणठणपाळ यांमधील भिन्न हेतू लक्षात येतील).
टोपणनाव ( pet name)
मित्र किंवा कुटुंबांतील मंडळी एखाद्यास ज्या नावाने हाक मारतात ते नाव. (दाते शब्दकोश). यात प्रेमभावना असते. हे नाव इतरांनी त्या व्यक्तीला दिलेले असते. ( ‘भाई’, ‘तात्या’ ही याची उदाहरणे).
मोल्सवर्थनुसार टोपणनाव म्हणजे इंग्लिशमधील ‘निकनेम’ नव्हे; त्यात काहीसा फरक दाखवला आहे. एखाद्याला टोपणनाव देताना त्यातून त्याच्याबद्दलची जवळीक किंवा प्रेम दर्शवले जाते तर निकनेममध्ये काही वेळेस तिरस्कार किंवा टिंगलीची भावना असू शकते.
पेन - नाव आणि टोपण - नाव अशी
पेन - नाव आणि टोपण - नाव अशी वेगवेगळी होतात तर! एकाच वस्तूचे दोन भाग.
Family name >> हे मी आतापर्यंत "आडनाव" किंवा last name या अर्थानेच वाचले आहे. First name - middle name - family/last name अशी नावं भरायला लागतात रकान्यात.
* Family name >>>
.
A pet name is a term of
A pet name is a term of endearment used to show love and affection
Pages