Submitted by ऋन्मेऽऽष on 13 May, 2025 - 13:06
आपल्या मराठी चित्रपटांवर चर्चा करायला हा मराठमोळा धागा
आधीचा धागा इथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/74623
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हे सगळं माहित असताना न्यूज
हे सगळं माहित असताना न्यूज चॅनल्स कशाला इंटर्व्ह्यु घ्यायला जाऊन फूटेज देतात?>>>>>
त्याने अजुन किती फेकलेय हे पाहायची उत्सुकता असते लोकांना. काही चांगला कंटेंट असेल तर तो नंतर निवांत बघु म्हणुन सेव करुन ठेवला जातो आणि मसालेदार कंटेंट लगेच पाहिला जातो. यात पैसा आहे तेच कारण.
ऋ,
इथे माबोवर भारंभार धागे काढणे आणि त्यावर जास्त कमेंट्स मिळण्यासाठी प्रयत्न करणे या तुझ्या छंदावर काही लोकांनी भरपुर टिका केलीय. पण तु बधलास का कधी? हल्ली प्रमाण जरा कमी आहे पण मध्यंतरी अगदी उच्छाद मांडलेलास असे कित्येकांचे मत झाले होते. तुझी त्यामागे काही कारणे असतील. अशी कारणे यु ट्युबर्सचीही असतील, सोबत आर्थिक प्राप्ती हे देखिल डोळ्यांना दिसणारे कारण असते.
इन्टरनेट सरकारच्या हातात नाही. त्यावरच्या कंटेंटवर सरकार सेन्सरशिप करु शकत नाही. तसेच कारण असेल तर ते देऊन बॅन आणु शकते जसे पाकी चॅनेल्सवर बॅन होता.
बाकी कायद्याचा धाक तर असतोच. तु दिलेस त्या उदाहरणातली महिला पोलिसात तक्रार घेऊन जाऊ शकते. ती गेली तरच पोलिस अॅक्शन घेणार.
अशा तक्रारी केल्या गेल्यात आणि त्यानंतर अॅक्शन्स पण घेतल्या गेल्यात. पण तसे केल्यावर ती चॅनेल्स जास्त फेमस झालेली दिसतात. बघु तरी काय एवढे आहे म्हणत लोक क्लिक करतात, चॅनेल्सचा रेवेन्यु वाढवतात.
येस ! जितकी व्युअरशिप तितकी
येस ! जितकी व्युअरशिप तितकी कमाई हेच सुत्र आहे त्यामुळे रिल मधेही लोक मुद्दाम चुका करतात की लोक निगेटिव्ह कॉमेन्ट करायाला सरसावतात..बास एनि पब्लिसिटी इज गुड पब्लिसिटी.
बाकी सचिन पिळगावकरानी ताळतत्रच सोडलय.
रोस्ट करावं कि करू नये,
रोस्ट करावं कि करू नये, खिल्ली उडवावी कि उडवू नये हे निराळं.
युट्यूब व्हिडीओला दर्जा असायला पाहीजे. अशा प्रकारचे व्हिडीओज बनवताना प्रेक्षकांना हसायला आलं पाहीजे. हा असला टपोरी , छपरी, गुंड टाईपच्या भाषेतला त्रागा काय बघवणार ? त्याला वाटतंय कि तो फार विनोदी आहे.
कोणाला काय विनोदी वाटेल ते
कोणाला काय विनोदी वाटेल ते सांगता येत नाही, भूल चूक माफ हा चित्रपट बऱ्याच जणांना अत्यंत रटाळ वाटला होता, पण काही जणांना तो अतिशय धमाल वाटला होता.....
भरत यांनी शेअर केलेला तो
भरत यांनी शेअर केलेला तो पॉडकास्ट मी पूर्ण बघितला नाही. तितकाही मला सचिन आणि त्याची फालतू बडबड ऐकवेना. जेवढा ऐकला त्यात त्याची भाषा खूप वाईट होती असं जाणवलं नाही. लोकांच्या कमेंट्सच वाईट भाषेत असतात.
साधना,
साधना,
आपण इथे कोणी सेलिब्रिटी नाही आहोत. त्यामुळे ते याबाबत नेमके कसा विचार करतात आणि त्यांची मनस्थिती कशी असते हे समजू शकत नाही.
कदाचित भुंकणाऱ्या प्रत्येक कुत्र्यावर दगड मारणे त्यांना प्रशस्त वाटत नसेल.
आपण मात्र आपल्या सोयीने त्यांनाही प्रसिद्धीच हवी असेल असा अर्थ काढून मोकळा होतो.
त्यामुळे तक्रार केली तरच कारवाई हा मुद्दा एखाद्या सामान्य महिलेच्या केसबाबत जसा लागू होतो तसा सेलिब्रिटीबाबत लागू होऊ शकत नाही.
जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे..
पण मुद्दा हा आहे की मुळात असे करावे अशी हिंमत कुठून येते. कायद्याचा धाक का वाटत नाही? तक्रार केली तर आपल्यावर मोठी कारवाई होईल आणि पोलिसांचे फटके पडतील ही भीती का वाटत नाही? जसे महिलेचा अश्लील व्हिडिओ अपलोड करणारे लपून-छपून ओळख लपवून करतात तसे इथे असे व्हिडिओ राजरोसपणे कसे केले जातात. अश्या प्रकारांना समाजमान्यता कशी मिळू लागली आहे..
बाकी माझा मुद्दा सभ्यतेचा आहे. एखादा पातळी सोडून असलेला व्हिडिओ कोणाला फार विनोदी वाटला तरी त्याचा विरोधच आहे. कोणीतरी कोणाची या लेव्हलला जाऊन इज्जत काढत आहे त्यावर माझ्याच्याने तरी हसले जात नाही. टवाळा आवडे विनोद असे म्हणतात त्यात या प्रकाराचा विनोद अपेक्षित असावा.
असो ज्याची त्याची आवड आणि ज्याचे त्याचे मत.
खटकले ते मांडले.
पण आपण तरी का कोणाला जज करावे.
त्यामुळे थांबतो!
>>>>पण आपण तरी का कोणाला जज
>>>>पण आपण तरी का कोणाला जज करावे.
जज करणे ही मेंटल फॅकल्टी आहे. उत्क्रांतीतही तिचे महत्व आहे. आपण जज करु शकलो नाही काय चांगले काय वाईट तर पेरिशच होउ. उद्या मेंढीला कळलेच नाही की लांडगा वाईट तर ती त्याच्या कळपात जाउन झोपा काढेल आणि मरेल.
तेव्हा जज करणे नेहमीच वाईट असे नसते. हां रिटॅलिएटरी, स्पाईटफुली जज करणे मला खटकते.
महाराष्ट्र शासनाचे
महाराष्ट्र शासनाचे चित्रपटांसाठीचे पुरस्कार जाहीर झाले. दोन वर्षांचे पुरस्कार एकदम जाहीर झाले किंवा दिले गेले.
एका वर्षी धर्मवीर - सर्वोत्कृष्ट चित्रपट, दिग्दर्शक आणि मुख्य अभिनेता.
दुसर्या वर्षी भेरा सर्वोत्कृष्ट चित्रपट
https://www.instagram.com/p/DNAyehzN5nj/?img_index=1
https://www.instagram.com/p/DNBDUpfNXP9/?img_index=1
यातल्या एकाही चित्रपटाबद्दल मायबोलीवर लिहिलं गेल्याचं आठवत नाही. भेरा हे तर नावही मी ऐकलं नव्हतं.
गुलकंद आवडला नाही. इशा डे ने
गुलकंद आवडला नाही. इशा डे ने शेवटचा फोनवरचा सीन चांगला केलाय पण बाकी पुर्ण सिनेमात कंटाळवाणं विनोदी काम केलंय. सिनेमातले विनोद जमले नाहीत. समीर चौघुले भारी माणुस आहे पण हास्यजत्रेत दाखवुन दाखवुन सर्व विनोद संपलेत त्यामुळे त्यानी कितीही प्रयत्न केला तरी हसु येत नाही. प्रसाद ओकचे पात्र , त्यांची ती पोरं .. सगळे थिल्लर दाखवलेत.
दाभाडे पण हल्लीच पाहिला. ठीक होता. चांदेकर शहरीच वाटतो. हिरॉईनची मैत्रीण पात्र फारच आगावु. त्या बाईने विनोदी करतोय हा आव आणलाय पण ते विनोदी न वाटता असभ्य वाटतं. अमेय वाघ आवडतो. क्षिती जोग रडकी दाखवली नाही हे बरं केलं. काहीकाही सीन आवडले.
आज इन्स्टावर एका रीळमध्ये
आज इन्स्टावर एका रीळमध्ये स्वप्नील जोशी खरा आहे तसा दिसला.. कसलातरी वेगळाच सुजलेला, केसांचं पण काहीतरी वेगळंच अगदी शिसारी यावं असं काहीतरी करून घेतलंय. मराठी चित्रपट निर्माते दिगदर्शकांनी त्याला मुख्य भूमिका देऊ नये इतपत वाईट दिसत होता. कुणाच्या दिसण्यावरून बोलू नये, पण अभिनय बरा नसला तरी दिसण्यात बरा होता तोवर ठीक होत. आता हे हि गेलं आणि तेही. म्हातारपणाच्या चारक्टर कि काय म्हणतात त्या भूमिका करायला घ्याव्या आता विग न लावता (व्हिडीओ : ajinkya.vocalflute बाकी ह्या मुलाने मस्त बासरी वाजवली आहे- बासरीशिवाय )
म्हणजे कोणी एखाद्या महिलेचे
म्हणजे कोणी एखाद्या महिलेचे तिच्या परवानगीशिवाय व्हिडिओ शूट केले आणि ते आंबटशौकीन लोकांसाठी अपलोड केले तर तो जसा गुन्हा ठरेल तसेच मला हे सुद्धा वाटते.
म्हणजे तुम्ही एखाद्यावर काही पातळी सोडून बोलाल आणि>>> पातळी सोडून बोलावेसे वाटले कि मायबोलीवर भारंभार काढून ठेवलेले डू आयडी पुढे आणता येतात. युट्युब वर monetization होणारे एकच अकाउंट असल्याने गॉड तिखट मसालेदार सगळं एकाच आयडीने करावं लागतं.
बाकी पिळगावकर पीळ आणतात हे खरे असले तरी व्यक्तिगत ट्रोलिंग त्यातल्या त्यात ज्याने हसू सुद्धा येत नाही असे ट्रोलिंग जास्त डोक्यात जाऊ शकते. पण यामागे जरा खोल विचार केला तर लक्षात येईल कि बहुतेक सोशल मीडिया मागणी तसा पुरवठा तत्वावर काम करतो. आपण प्रेफरेन्सस सगळे साफ केले, अगदी फ्रेश खाते काढले तरी आजकाल आंबट म्हणता येईल असा कन्टेन्ट समोर येतोच. म्हणजे बळेच अंगप्रदर्शन म्हणा (जे सुंदर, कामुक वगैरे न वाटता ओंगळ आणि बिभत्स वाटते), काहीतरी फालतू पाचकळ विनोद वगैरे. याच कारण भारतातल्या आपल्याच काही लोकांना तो कंटेंट आवडतो, त्याला त्यांनी मिलियन व्यू दिलेले असतात आणि फ्रेश अकाउंटला हा मिलियन प्रेक्षक असलेला कन्टेन्ट दाखवलाच पाहिजे असे इन्स्टा युट्युब वगैरेला वाटत असावे. एक प्रकारे चक्र आहे हे.. व्यूज आहेत म्हणून फालतू कन्टेन्ट आणि फालतू कन्टेन्ट आहे म्हणून व्यूज..
कुणाच्या दिसण्यावरून बोलू नये
कुणाच्या दिसण्यावरून बोलू नये, पण अभिनय बरा नसला तरी दिसण्यात बरा होता तोवर ठीक होत. आता हे हि गेलं आणि तेही.
>>>>>
सरप्राईजिंग!
जिलबी चित्रपट २०२५ चाच आहे आणि त्यात तो छान डॅशिंग दिसला आहे आणि अभिनय सुद्धा छान स्टायलिश केला आहे...
त्या बाईने विनोदी करतोय हा आव
त्या बाईने विनोदी करतोय हा आव आणलाय पण ते विनोदी न वाटता असभ्य वाटतं >>> मलाही तसेच वाटले होते.
एप्रिल मे ९९ बघितला काल आणि
एप्रिल मे ९९ बघितला काल आणि परवा मिळून. आवडला.
सगळ्या मुलांची आणि मोठ्यांची कामं छान झाली आहेत. श्रीवर्धन तसं माझंच गाव. गावाचं चित्रीकरणही सुरेख झालं आहे. गावातल्या माणसांची बोलण्याची पद्धत, हेल हे सगळं चांगलं जमलंय. अर्थात दिग्दर्शक मूळचे श्रीवर्धनचेच असल्यामुळे त्यांनी कटाक्षाने ते सांभाळलं असणार.
भटीण काकूचे संवाद काही काही वेळा कृत्रिम वाटले. एकंदरीत अजूनही काही वेळा इतरांचेही संवाद कृत्रिम वाटले. तसंच, गुढीपाडवा उन्हाळ्याच्या सुट्टीत इतक्या उशिरा येत नाही. त्याऐवजी अक्षय्यतृतीया किंवा शिवजयंती (त्या काळात तिथीनुसार वैशाख शुद्ध द्वितीयेला साजरी होत असणार) दाखवायला हवी होती. अजून एक म्हणजे, त्या काळातली पुण्यातली मुलगीसुद्धा 'पिरियड्स' सुरू झाल्याबद्दल समवयस्क मुलग्यांशी इतक्या सहजपणे बोलते हे मला तरी पटलं नाही.
साजिरी जोशी थेट तिच्या आईची झेरॉक्स कॉपी आहे! दिसणं, बोलणं, आवाजही.
बाकी आपल्या गावची ओळखीची ठिकाणं चित्रपटात बघायला मजा आली.
दशावतार चा ट्रेलर भन्नाट आहे,
दशावतार चा ट्रेलर भन्नाट आहे, एकदम कंटारा ची आठवण होते
स्टारकास्ट पण चांगली आहे, दिलीप प्रभावळकर वेगळ्याच रोल मध्ये
जर गाणी संगीत आणि कथा चांगली असेल तर मराठीतला एक सुपरहिट सिनेमा येऊ घातलाय असे म्हणायला हरकत नाही
अरे काय जबरी BGM आहे
अरे काय जबरी BGM आहे ट्रेलरची... मी तीन वेळा रिपीट पाहिले केवळ त्याचसाठी
कलाकार असे आहेत की त्यांना न्याय दिला असेल तर केवळ त्यांच्यासाठी पिक्चर बघायला जाईन..
(No subject)
जारण अर्धा पाहिला. आवडतोय.
जारण अर्धा पाहिला. आवडतोय.
वावे, छान बारीक निरिक्षणं.
वावे, छान बारीक निरिक्षणं.
सिनेमा बनवणार्यांना या गोष्टी का लक्षात येत नाहीत असं वाटतं.
सिनेमा बनवणार्यांना या
सिनेमा बनवणार्यांना या गोष्टी का लक्षात येत नाहीत असं वाटतं.
>>>>
मला वाटते सिनेमा बनवणाऱ्यांना या गोष्टी लक्षात येत असाव्यात पण त्यांना व्यावसायिक चित्रपट बनवायचा असतो, शालेय अभ्यासक्रमाचे पाठ्यपुस्तक नाही. सिनेमॅटिक लिबर्टी म्हणा किंवा या गोष्टी प्रत्येकाच्या लक्षात येणार नाही असा विचार करून म्हणा, किंवा याने चित्रपटाच्या रसग्रहणावर काही फरक पडणार नाही म्हणा अश्या कारणांनी ते चुकीचे संदर्भ आणि चुकीचे लॉजिक आपल्या सोयीनुसार वापरत असतील. कारण त्यात त्यांची कथा पुढे सरकत असते, चित्रपट मजेशीर होत असतो, किंवा वेळ आणि पैसे वाचत असतील, किंवा आणखी काही सोयीचे कारण असेल जे आपल्याला माहीत नसेल..
आणि प्रत्यक्षात देखील एखाद्याने अमुकतमुक चुका दाखविल्यावर आपण हो रे असे म्हणतो पण चित्रपट बघताना बहुतांश लोकांना काही फरक पडला नसतो. जे दिग्दर्शकाला पोहोचवायचे ते पोहोचले असते.
अर्थात हे सगळ्या चुकांना लागू नाही पण बहुतांश चुकांना लागू असते.
आपण पब्लिक आहोत. आपण नंतर त्या संदर्भ चुका आणि गंडलेले लॉजिक दाखवण्यात धन्यता मानतो हा आपला पॉइंट ऑफ view झाला. आपण आपल्या जागी बरोबर आहोत. कारण काही चुकीचे संदर्भ लोकांना ते तसे नाही हे समजले सुद्धा पाहिजे.
पण उद्या आपण आपले पैसे लावून चित्रपट काढायला गेलो तर आपण सुद्धा तसाच विचार करू..
ऋन्मेष, काही चुका इतक्या
ऋन्मेष, काही चुका इतक्या obvious असतात की त्या खटकल्याशिवाय रहात नाहीत. मी वर लिहिलंय खरं, की गुढीपाडवा उन्हाळ्याच्या सुट्टीत इतक्या उशिरा येत नाही. पण खरं तर मला गुढीपाडवा उन्हाळ्याच्या सुट्टीत आलेलाच आठवत नाही. तो आधीच होऊन जायचा. अक्षय्यतृतीया मात्र चांगलीच लक्षात आहे विविध कारणांमुळे. उन्हाळ्याची सुट्टी हे जिव्हाळ्याचं प्रकरण असतं
आणि बाकी बरेच डिटेल्स त्यांनी चांगले दाखवले आहेत. कपडे, गाड्या (सनी दाखवली आहे, activa वगैरे नाही) मोबाईलचा वापर दाखवलेला नाही. कुठे चुकून मोबाईल टॉवर दिसल्याचंही लक्षात आलं नाही. अशा चुका शक्यतो लक्षात येतात. उदा. थ्री ईडियट्स मला अतिशय आवडतो. पण १९७८ साली जन्मलेल्या मुलांच्या कॉलेजच्या काळात वेबकॅम आणि एकंदरीतच हाय स्पीड इंटरनेटचा वापर, जो शेवटच्या डिलिव्हरीच्या प्रसंगात आहे तो खटकतो. पण तो एकूण सगळाच मामला फार सीरियसली घेण्यासारखा नाही त्यामुळे आपण सोडून देतो.
एप्रिल मे ९९ हा चित्रपट नॉस्टॅल्जिक करणारा आहे. शिवाय श्रीवर्धनची पार्श्वभूमी माझ्यासाठी जवळची आहे. एकूण चांगला जमलेला आहे. अशा वेळी जे खटकलं ते लिहिलं. यात 'बसून चुका काढूया' असा दृष्टिकोन अजिबात नाही
यात 'बसून चुका काढूया' असा
यात 'बसून चुका काढूया' असा दृष्टिकोन अजिबात नाही Happy
>>>
हो, ते माहीत आहे वावे मला.
तुमच्या पोस्टला नसून ललिता यांनी म्हटले त्यावर इनजनरल लिहिले होते. आणि सगळ्या चुकांना लागू होत नाही असेही वर म्हटले आहे.
फक्त त्यांच्या बाजूने विचार करता सांगितले की बरेचदा अरे हे इतके सोपे त्यांच्या लक्षात कसे आले नाही असे नसून त्यांच्या लक्षात आले असूनही, ते कळत असूनही काही कारणांनी त्यांनी आपल्या सोयीने चित्रपट बनवला असतो.
जारण आवडला. उत्कृष्ट
जारण आवडला. उत्कृष्ट सायकोथ्रिलर आहे. मला शेवटाचा अंदाज आला नाही. शेवटच्या दहा मिनिटात धक्क्यांमागून धक्के मिळतात पण कुठेही आधी ठरवून गंडवल्याचा फील येत नाही. चलाखी आहे पण दाद द्यावी असे वाटणारी. शैतान बितान सारखे हिंदी कुठे आणि जारण कुठे. कदाचित भारतात असे सिनेमे बनतात हे पाश्चात्य जगाला सांगण्यासाठी बॉलीवूडला जारण कामाला येईल.
ही प्रिंट १२५ मिनिटांची आहे, म्हणजे थिएटर्स मधे रिलीज झालेला तेव्हढीच.
नंतर झी ५ वर पण पाहिपा, त्यात १ तास ५८ मिनिटांचा रनटाईम आहे. सात मिनिटे फरक आहे. यात काही दृश्ये कापली असावीत.
उत
जारण मला ही आवडला.
जारण मला ही आवडला.
कथा, पटकथा चांगली आहे. पहिल्या दॄष्यापासून नवरा आणि मुलगी मेलेली आहे हे अमृता सुभाषच्या भीषण अभिनयाने कळुन चुकलं. वाड्यात आल्यावर ती मुलगी दाराबाहेर, आणि नंतर अशीच आत येते तेव्हा तो धक्का बसता तर जास्त परिणामकारक ठरता. पण अमृताबाईं इतकं संयत काही करू शकणे अशक्यच.
राभु +१ एकही जंपस्केअर नाही आणि कुठेही हातचलाखी करुन फसवलेलं नाही तरीही सायकोथ्रिलर होऊ शकतो तो ही मराठीत बघुन छान वाटलं. वर कोणाला तरी अहिराणी बोलणारी जखिण खटकलेली वाचलं. कुणाला काय खटकेलं सांगता येत नाही हेच खरं.
मंदबुद्धी अभिनय केला तरी ती भूमिकेची गरज या अघळपघळ चादरीखाली लपल्यासारखं असल्याने अमृता सुभाष खपुन गेली. बाकी इतरांची कामं आवडली. सीमा देशमुख कित्येक प्रसंगात एकही शब्द न बोलता बरंच काही बोलुन जाते. हल्लीच्या मराठी शब्दबंबाळ पटकथेसाठी ते जवळजवळ शॉक सारखं वाटलं आणि दिसुन आलं. सायकोथेरपिस्ट आणि काउंसिलर बद्दलचं भाष्य, हायरार्की मुद्दाम ठसवायचं आहे असं मला वाटलं. मला त्यातील फार काही कळत नाही/ वाचलेलं नाही त्यामुळे त्याबद्दल काही मत नाही.
पण चित्रपट बघुन मजा आली.
सीमा देशमुख
सीमा देशमुख
>>>> जारण पाहिला नाही आणि सीमा देशमुखला अलिकडे फार कमी वेळा पाहिलंय. पण ती फार उत्तम काम करते. लीना भागवतही.
अमृता सुभाष आधी आवडायची पण देवराईपासून डोक्यात गेलीय. त्यातलं देविका दफ्तरदारचं काम छान होतं. पण मुळातच तो पिक्चर का? कॅटेगरीतला वाटला मला.
सीमा देशमुख कित्येक प्रसंगात
सीमा देशमुख कित्येक प्रसंगात एकही शब्द न बोलता बरंच काही बोलुन जाते. >> परफेक्ट अमितव . मुली आईवर असंच डाफरतात पण आया अशाच शांतपणे घेतात. अमृता सुभाषचं जे कॅरेक्टर आहे तसा स्वभाव पाहण्यात आहे. आईशी थोडं ओरडून बोलणं पण इतरांशी लगेच लाडात येऊन बोलणं वगैरे मस्त घेतलंय. फोनवर आईवर वैतागत असते आणि बाबांशी बोल म्हटल्याबरोबर तिला अनेक असह्य आवाज ऐकायला येतात. बाबांवर वैतागता येत नाही. तो स्वभाव तिने जिवंत केला आहे. मात्र बोलू नये पण कळकट वाटते खूप. मराठी पिक्चरमधे स्टार व्हॅल्यू बघत नाहीत हे खरं असलं तरी अगदीच मेक अप नसल्याने प्रेझेंटेबल पण नाही असं नको. शेवटी हा सिनेमा आहे.
सायकोथेरपिस्ट आणि काऊन्सलर मुळे शेवटी प्रेक्षकांना उलगडून सांगायची सोय झाली नाहीतर ते भाषण वाटलं असतं. अशा स्वभावाच्या व्यक्ती आपल्या काही काही गोष्टी शेअर करत नाहीत, आपल्या वर्तुळाबाहेर येत नाहीत. आपल्या वर्तुळात त्या वेगळ्या असतात. इथल्या गोष्टी शेअर करायच्या तर या वर्तुळात समजलं नाही पाहीजे म्हणून त्रयस्थ व्यक्ती तिने निवडली आहे. कारण किशोर कदम यांना तिचे सगळे डिटेल्स माहिती असल्याने तिने जे इमॅजिन केलं आहे त्याला ते टाचणी लावू शकतात याची तिला कल्पना आहे.
जारण : हा चित्रपट पाश्चात्य
जारण : हा चित्रपट पाश्चात्य लोकांना फारसा आवडणार नाही असा माझा कयास आहे.
कारण यात विच हंटिंग दाखवले आहे. जर गंगुटी ही खरोखरच विच आहे की नाही हे ambiguous ठेवले असते तर तर कदाचित त्या विच हंटिंग ला एक वेगळा अर्थ प्राप्त झाला असता. आणि परदेशी लोकांना रिलेट करता आले असते.
अजून एक गोष्ट जाणवली ती म्हणजे खरेतर गुप्ते यांना गंगुटी हे जखिण म्हणून पूर्ण इमॅजिनरी करता आले असते. मात्र प्रत्यक्ष आयुष्यात गंगुटी ही एक काळी जादू वगैरे करणारी म्हणून बदनाम असलेली एक गरीब बाई असली असती तर मग कथेला खूप मोठा साइंटिफिक आधार राहिला असता आणि त्यातले विच हंटिंग हे अमृताच्या इमॅजिनेशन मधे खरोखर विच हंटिंग मात्र प्रत्यक्षातले सध्याच्या काळा जादू अंतर्गत येणाऱ्या गुन्हा ठरणाऱ्या विच हंटिंग सारखे केवळ संशयावरून केलेले विच हंटिंग असले असते तर ते अनैतिक वाटले नसते. मात्र गंगुटी ही खूपच ईविल झालेली आहे.
====
एकदंरीत सुरुवातीला गंडवागंडवी नसली असती तरी पेस सांभाळायला पाहिजे होता. एखाद्या केरळी चित्रपटाइतका तगडा चित्रपट झाला असता.
>> मराठी पिक्चरमधे स्टार
>> मराठी पिक्चरमधे स्टार व्हॅल्यू बघत नाहीत हे खरं असलं तरी अगदीच मेक अप नसल्याने प्रेझेंटेबल पण नाही असं नको <<
ही जरा जास्तच अपेक्षा आहे. म्हणजे एरव्हीच्या मराठी चित्रपटात दाखवतात तसं कारकून असणाऱ्या नायक नायिकांची घरे मात्र मस्त इंटीरियर केलेली एकदम आलिशान असतात कुंड्या वगैरे ठेवलेली तसं?
विच वरून
विच वरून
द विच हा एक अफाट चित्रपट आठवला.
नशीब गुप्तेंनी मूळ कथेसारखी जखिण डायरी लिहिते वगैरे दाखवले नाही हा हा.
नेटिव, बारीक सारीक गोष्टी दाखवयाचा खूप चान्स होता पण वाडा, प्लँचेट, डायरी असले अतिशय कॉमन ट्रोप माझ्यातरी डोक्यात गेले. हे कल्पनादारिद्र्यच म्हणायला हवे खरेतर. ती अहिराणी बोलते ही काही 'विशेष' 'वा वा चान चान' म्हणण्याइतकी बाब आहे असे मला तरी वाटत नाही. पण काही दिड शहाण्यांना ते आवडू शकते.
रॉय तुमचं अक्षर ओळखलं! फार
रॉय तुमचं अक्षर ओळखलं!
फार दिवस मुखवटा टिकत नाही.
Pages