Submitted by ऋन्मेऽऽष on 13 May, 2025 - 13:06
आपल्या मराठी चित्रपटांवर चर्चा करायला हा मराठमोळा धागा
आधीचा धागा इथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/74623
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
दशावतार पाहून आले आत्ताच .
दशावतार पाहून आले आत्ताच . रूमाल टाकून ठेवते.
दिलीप प्रभावळकर हा बाप माणूस आहे. साष्टांग नमन.
----------------------------------------------------------------------------------------------------
आले परत .
---------------------------------------------------------------------------------------------------
थोडसं अवांतर -
बरेच दिवस धिएटरमध्ये सिनेमा पाहिला नव्हता म्हणून नवरा मागे लागला दशावतार बघूया . मी सुरुवातीला हॉरर वगैरे असेल म्हणून नाही म्हणत होते . मग माझ्या आई बाबांनाही विचारलं आणि चौघही निघालो शुक्रवार संध्याकाळचा शो बूक करून .
माझ्या आईबाबांच जन्म , लहानपण कोकणातलं, त्याना गावाबद्दल , चालीरीती याबद्दल फार आस्था, घरी मालवणी बोललं जातं . मला मालवणी समजत , तोडकं मोडकं बोलता येतं . नवरा पक्का मुंबईकर, गाव कधीच फारसं बघितलं नाही . दूसर्या जातीचा . माका-तुका , घो असे काही काही शब्द त्याला कळतात . त्यामुळे एकंदरीतच चित्रपट बघताना मजा येणार होती .
मध्यंतरामध्ये बाबा दशवताराचा खेळ , कलाकार , त्यांचा पेटारा , गणपतीचा मु़खवटा याबद्दल भरभरून बोलत होते . आम्ही तिघही नवर्याला तुला कळताय का सिनेमात काय बोलतायेत ते म्हणून चिडवत होते आणि तो खात्रीने चेडू , झील वगैरे शब्द आम्हाला ऐकवत होता
आता मुळ मुद्द्यावर -- दशावतार --
पहिला प्रश्न मनात येतो की दशावतार म्हणजे कोकणातला दशावतारचा खेळ की विष्णुचे अवतार आणि जसं जसां चित्रपट पुढे सरकतो तस तसा तुम्हाला नक्की संदर्भ कळतो.
ग्चित्रपटाचीसुरुवात होते घनदाट जंगलातल्यला रात्रीच्या अंधारात . मग आपली ओळख होते परंपरा , चालीरीती मानणार्या ,देवभोळ्या निसर्गावर निस्सीम प्रेम करणार्या दशावतारी कलाकार बाबुली मेस्त्री आणि आपल्या बापावर तितकेच प्रेम करणार्या माधव मेस्त्रीशी.
बाबुलीच वय झालयं पण दशावतार हेच त्याच आयुश्य आहे . गावकरी बाबुलीचा खेळ पाहायला गर्दी करतात , त्याला डोक्यावर घेतात , कलाकार बाबुलीला गावात आदर आणि प्रेम आहे . माधवला आपण चांगलं शिकवलं त्याने चांगली नोकरी करावी , गावात मिळत नाही तर मुंबईला जावं अशी बाबुलीची ईच्छा आहे . माधवला वडिलांना सोडून जायच नाहीये , तो खेळणी बनवायचा हौशी व्यवसाय करतोय . आता वडिलांच वय झाल झेपत नाही त्यानी दशावतारात काम करणं सोडून द्याव असं माधवला वाटतं . दशावतार हा माझा श्वास आहे आणि दशवतारामुळे घरात थोडे फार अन्न येत असं बाबुलीचं मत आहे. शेवटी दोघांमध्ये एक समजौता होतो आणि महाशिवरात्रीला शेवटचा खेळ करायचं बाबुली ठरवतो. पण पुढे काय होतं ते चित्रपटातच बघा. स्पॉयलरच्या भितीने यापेक्शा जास्त काही लिहिता येत नाही.
पात्ररचना/कलाकार - सिद्धार्थ मेनन ने फारच गोड माधव साकारला आहे . बापावर प्रेम करणारा ,प्पण त्यांच्या हट्टीपणामुळे वैतागणारा , आपल्या परिस्ठीची जाणीव असणारा , आपल्या मर्यादा ओळखून असणारा अगदी साधा सरंळ प्रामाणिक माधव फारच लोभस आहे . त्याच्या प्रेमिकेच्या भुमिकेत मात्र प्रियदर्शनीने खूप वैताग आणला . तिची वंदू फारच आगाऊ वाटते . एका चांगल्या चाललेल्या कथेत मध्येच खड्यासारखी येते ती . बाकी कलाकरांमध्ये गुरु ठाकुर , भरत जाधव हे सरप्राईज आहेत. महेश मांजरेकर ठीक . सुनील तावडेना मोठा रोल आहे , त्याच्या सोबतीला आरती धबडगावकरची सावंत बाई लक्शात राहते . अभिनय बेर्डे ला मी सुरुवातीला ओळखलच नाही.
गाणी - चित्रपटातले अर्धे संवाद मालवणीत आहेत आणि बर्यापैकी सफाईने बोलले आहेत सगळे . नेहमीच्या माणसाला व्याकरणाच्या द्रुष्टीने चुकीची वाक्य बरोबर पकडता येतील. 'माझ्या आवशीचो घो ' म्हणून एक बाप लेकाच मजेशीर गाणं आहे . नंतरच रोमांटीक गाणं चांगलं आहे पण चित्रपटाचा वेग कमी करतो . महाशिवरात्रिच्या दिवशीची (भैरवी ??? जी चित्रपटाच्या शेवटीपण येते) फार सुंदर आहे . बाबुलीची मन:स्थिती लक्षात घेउन आपल्यालाही गलबलतं. उत्तरार्धात येणारे छोटे छोटे तुकडे प्रभावी आहेत . हनुमान जयंतीच्या उत्सवातल ही गाणं चांगलं आहे पण एकंदरीत चित्रपटाच्या स्वभावात ते बसत नाही . दशावरातावरून एकदम समूहन्रुत्य अस्थायी वाटतं . पण ठीक आहे.
काय आवडलं -- कोकणातली पार्श्वभूमी , घरं , देवळं , मालवणी बोलणारी माणसं , घनदाट जंगल , खाडी , बाबुलीची वेशभूशा , केशभूषा , रंगभूशा . बाबुली गावात फिरताना शर्ट आणि अर्धी पँट घालून फिरतो , गावात आजोबा , शेजारपाजारचे काही काका असे बघितले आहेत .
काय खटकलं - माधवची प्रेयसी वंदू , छोट्याश्या गावात रहाणार्या मुलीच्या मानाने फारच बोल्ड आहे ती . पटत नाही . कोकणातल्या बायका मोगर्याच्या गजर्यापेक्शा अबोलीच्या वेण्या माळतील नटताना . काही गोष्टी जरा अविश्वसनीय वाटतात .
एकंदरीत विचारालं तर थिएटरमध्ये जाउन एकदा बघाचं , संपूर्ण चित्रपट एक वेगळा अनुभव आहे . पण एक उत्तम कलाक्रूती होता होता राहीली .
चित्रपटाचा वेग साभाळायला हवा होता . पहिला अर्धा पाउण तास बाप लेकाचं नात , प्रेमप्रकरण यामध्ये घालवला आहे . मध्यंतराच्या अगोदर २०-२५ मिनीटे घडामोडी होतात . परत मध्यंतरानंतर मध्ये मध्ये पकड ढीली पडते . शेवट ईतका प्रीची केला नसता तरी चाललं असतं .
खरतर मांजरेकर आल्यावर चित्रपट रंगतदार व्हायला हवा होता . पण संवाद ही एकदम फिके आहेत. जरा शाब्दीक चकमकी असत्या तर आवडलं असतं .
दिप्र चा हाफ मॅड बाबुली माईन्ड ब्लोविन्ग आहे . त्यांची देहबोली , भाषेचा लहेजा , एका कलाकाराची तडफड सगळं अफाट आहे. एका सीनमध्ये त्यानी टाहो फोडलाय , कुठलाही अतातायीपणा नाही , निव्वळ धक्कादायक दु:ख . देवाशप्पथ माझ्या डोळ्यातून घळाघळा पाणी वहायला लागले . मला बरेच लिहायच आहे त्यांच्या अभिनयाबद्दल पण खरच आता शब्द सुचत नाहीयेत. नंतर लिहेन . किन्वा कोणी लिहिल तर + १००० करेन
आताच रिव्ह्यूज ऐकले / वाचले.
आताच रिव्ह्यूज ऐकले / वाचले.
दशावतार पाहून आले आत्ताच .
दशावतार पाहून आले आत्ताच . रूमाल टाकून ठेवते.
दिलीप प्रभावळकर हा बाप माणूस आहे. साष्टांग नमन.
>>>>>>
अशाच एका पोस्टची वाट बघत होतो
आता मी सुद्धा बघतो जमते का या वीकेंडला
मी पण दशावतार चालू रिव्ह्यू
मी पण दशावतार चालू रिव्ह्यू आला असेल तर तो बघायला ह्या धाग्यावर आले होते
स्वस्ति , रिव्ह्यू खूप
स्वस्ति , रिव्ह्यू खूप सुंदर लिहीलेला आहे. आज जेव्हढे रिव्ह्यूज वाचले / ऐकले /पाहिले त्यातही शेवटी काही तरी धक्का असणार आहे याची कल्पना आली. विशेष म्हणजे कुणीही ते उघड केलेलं नाही. तुझ्या रिव्ह्यूचं पण कौतुक यासाठीच.
माझ्याकडे आता इतके रिव्ह्यूज पेंडींग झालेत आणि सिनेमे पाहण्याचा माझा मंद वेग बघता काळ - काम - वेगाचं हे गणित सुटणार का हाच प्रश्न आहे. कदाचित जाईन पुढच्या आठवड्यात. आता चित्रपटविषयक सर्व धाग्यांवर फेरी बंद करावी लागेल बहुतेक
स्वस्ति मस्त पोस्ट
स्वस्ति मस्त पोस्ट
मगाशी तुमची फुल पोस्ट यायच्या आधी त्याची टिझर वाचूनच उद्याचे शो बघून आलो. दोन बिल्डिंग सोडून मल्टीप्लेक्स आहे. ते सोयीचे पडते म्हणून तिथे कधीचे शो आहेत हे पहिले बघतो. उद्या रात्रीचा शो आताच हाऊसफुल आहे. गर्दी सोबत बघण्यातच मजा. हा पिक्चर आला तेव्हाच बघायचा म्हणून ठरवले होते. पण डोक्यातून निघून गेले होते. बरे झाले तुम्ही आल्या आल्या पोस्ट टाकली अन्यथा उद्या एक साउथ इंडियन हिंदी डब पिक्चरला जायचा प्लॅन होता.
रानभुली , एकदा चित्रपट बघायला
रानभुली , एकदा चित्रपट बघायला सुरुवात केल्यावर पुढे काय होणार याची कल्पना यायला लागते . पण कसं होणार यासाठी आपण बघत राहतो .
अगदी प्रामणिक मत म्हणजे , चित्रपट संपल्यावर वाटलं , यात नाविन्य काही नव्हतं , फार जास्त अपेक्शा होत्या कदाचित . पण बाबुलीपुढे सगळं फिकं हे अंतिम सत्य
स्वस्ति धन्यवाद!
स्वस्ति धन्यवाद!
दिलीप प्रभावळकरांसाठी विशेष करून पहायचा होता.
पुढच्या आठवड्यात दोन खेळ आहेत. आता जमवीन जायला
माझ्या संमिश्र भावना आहेत.
माझ्या संमिश्र भावना आहेत. तीनदा लिहून खोडून टाकल्या.
एक धाकधुक आहे . ती तशीच ठेवून चित्रपट पाहताना आनंद मिळणार नाही, आणि न पहावा तर गेले दोन महीने जी स्टोरी जुळवत आणलीय त्यातली एक कल्पना आणि यातली तशी एक कल्पना (ट्रेलरमुळं शक्यता वाटतेय) यात थोडं जरी साम्य असेल तर ती सोडून द्यावी लागेल याची भीती. त्यासाठी तर पहावाच लागेल.
>> दशावतार
>> दशावतार
एकंदरीत कोकणी कांतारा वगैरे करायला गेले आहेत पण बघणाऱ्याच्या आणि करणाऱ्याच्या पोटातला वरणभाततूप ढवळू न देता केल्यामुळे गंडला आहे असं दिसतय. मी हा चित्रपट पाहण्याची सुतराम शक्यता नाही त्यामुळे रिव्यु वरच भागवावे लागेल.
दिलीप प्रभावळकर हा अत्यंत सामान्य दर्जाचा ओव्हररेटेड नट आहे असं माझं स्पष्ट मत आहे. आताच्या भाषेत क्रिंज अभिनय.
बर्याच जणांचे रिव्ह्यूज +
बर्याच जणांचे रिव्ह्यूज + आहेत. काही अर्थात (-) आहेत. दशवतार सुपरहीट झाला आहे.
कमर्शियल सक्सेस राहू द्य बाजूला. जर सिनेमा खरंच जेव्हढी हवा झाली आहे तसा नसेल तर याचा फटका येणार्या साबर बोंडं ला बसेल. कोमल नाहटाने याची दखल घेतली आहे. आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेला सिनेमा आहे. बाहुबलीच्या राणा दुग्गुबत्तीने हा भारतभर रिलीज करण्याची जबाबदारी घेतली आहे. आल्टरनेट सिनेमाच आहे. पण जर दशावतार एव्हढा वाईट असेल तर लोक इतक्या लगेच दुसर्या मराठी सिनेमाला आश्रय देणार नाहीत.
अर्थात स्वस्तिच्या रिव्ह्यूवर विश्वास आहे. शेवटी व्यक्ती परत्वे आवड असणारच.
दशावतार – थोडे कौतुक थोडी
दशावतार – थोडे कौतुक थोडी निराशा!
https://www.maayboli.com/node/87260
मायबोली गणेशोत्सव मतदानाची
मायबोली गणेशोत्सव स्पर्धा मतदानाचा आज शेवटचा दिवस आहे.
तुमचे मत नोंदवलेत ना?
नसेल नोंदवले तर त्वरा करा, लगेच तुमचे मत नोंदवा.
मतदानाचे सगळ्या धाग्यांचे दुवे https://www.maayboli.com/node/87244 या धाग्यावर आहेत.
आत्मपॅपलेन्ट बघितला, चान्गला
आत्मपॅपलेन्ट बघितला, चान्गला आहे.
बेटर हाफ ची लव स्टोरी - अरे
बेटर हाफ ची लव स्टोरी - अरे काय भयाण प्रकार आहे! का? का बनवतात असले सिनेमे??? काय तर नवरा बायको चे पटत नाही, बायकोला नवर्याच्या अफेअर चा संशय , भांडणात बायको स्वतःच्याच डोक्यात बाटली मारून मरते. पण नवर्याला भूत बनून पछाडते.
म्हणजे अक्षरशः प्रत्येक फ्रेम ची टिंगल करावी असा प्रकार. कशाला तो सुभा हवा प्र त्ये क सिनेमात ? इथे बायको म्हणुन रिंकू राजगुरुसोबत! त्याची मुलगी वाटते ती. सैराट मधे इतके सहज काम करणारी हीच का असे वाटते, नुसते पुस्तक वाचल्यासारखे डायलॉग बोलते. प्रार्थना बेहरे अतोनात माठ दिसते. अनिकेत विश्वासराव आवडयचा मला पूर्वी. यात विदूषक केलाय त्याचा पार. देवदास मधे जॅकीचा रोल आहे ना मित्राचा तश्या छापाचा.
सुभाचे कपडे कुणीतरी मुद्दाम वाईट करायला सांगितले असावे की काय कळेना इतके विनोदी आहेत. पिवळी पँट वगैरे. रिंकू दिसते मात्र फार सुरेख. तिचे कपडेही छान आहेत. आणि , येस, गाण्यांचा उल्लेख केलाच पाहिजे. "तू माझ्यासाठी काय आहे, तू आली , तू गेली निघून " अशा घाण भाषेतली गाणी सतत आहेत!
अर्धा सिनेमा झाल्यावर भुताची एन्ट्री. नंतर सुभाचे भुताने पछाडल्याचे वेडगळ अॅक्टिंग सोसवेना. मग बंद केला.
@मैत्रेयी >>> कधी आला हा
@मैत्रेयी >>> कधी आला हा पिक्चर? टोटल येडा प्रकार दिसतो आहे.
मैत्रेयी वाक्यावाक्यातून
मैत्रेयी
वाक्यावाक्यातून वैताग पोचतोय!
मै
मै
सुभाची बायको रिंकू ?
सुभाची बायको रिंकू ?
मैत्रेयी पोस्ट भारी
मैत्रेयी पोस्ट भारी
म्हणजे अक्षरशः प्रत्येक फ्रेम
म्हणजे अक्षरशः प्रत्येक फ्रेम ची टिंगल करावी असा प्रकार.
कॉलिंग फा , पायस ,अस्मिता, श्रद्धा, रानभुली ,
मै
मै
नंतर सुभाचे भुताने पछाडल्याचे वेडगळ अॅक्टिंग सोसवेना >>> बाकी वर्णन वाचून असा प्रश्न पडला, की मुळात हे कोठे सुरू होते हेच कसे समजले?
मै
मै

की मुळात हे कोठे सुरू होते हेच कसे समजले? >>
सुभाचे कपडे कुणीतरी मुद्दाम
सुभाचे कपडे कुणीतरी मुद्दाम वाईट करायला सांगितले असावे की काय कळेना इतके विनोदी आहेत
>>
दहा एक वर्षांपूर्वी कुठल्याशा सीरियल मधे होता तो. तिथे हिरवे, मरून, केशरी वगैरे सॉलिड कलर चे शर्ट अन् पडद्याच्या कापडाचे वेस्ट कोट घातले होते त्याला.
मैत्रेयीची तडतड वाचुन ट्रेलर
मैत्रेयीची तडतड वाचुन ट्रेलर पाहिला.. हे राम.. काय चाललेय ते कळेना.
अनिकेत विश्वासरावला बघुन धक्का बसला. बराच बरा होता तो आधी. यात ओळखता आला नाही. सुजट डोळे नी काय काय…
पडद्याच्या कापडाचे वेस्ट कोट
पडद्याच्या कापडाचे वेस्ट कोट
एकदम 'कधी तू' गाणं आठवलं. त्यात स्वप्नील जोशीला बांधणीचे शर्ट दिले होते, शिवाय गोल्डन (वान्नाबी राजकारणी) शर्ट आणि व्हाईट लॉन्ग सूट, तसाच स्कार्फ. त्याची उंची किती? काय विचार कराल की नाही? तुम्ही त्याला पंजाबी मुंडा लुक देताय. त्यात बुडून जातो तो.
त्याहूनही वाईट म्हणजे मुक्ता/तिच्या डबलला काहीतरी विचित्र सेमी शीअर कापडाचा, पिवळा, तिला न शोभणाऱ्या रंगाचा ड्रेस. हा ड्रीमी रोमँटिक लुक? का करतात लोक असं?
पडद्याच्या कापडाचे वेस्ट कोट
पडद्याच्या कापडाचे वेस्ट कोट >>>
परदे मे रहने दो, परदा ना उठाओ गाणे पूर्वी फार दूरदर्शीपणाने लिहीले असावे.
त्यात स्वप्नील जोशीला बांधणीचे शर्ट दिले होते, शिवाय गोल्डन (वान्नाबी राजकारणी) शर्ट आणि व्हाईट लॉन्ग सूट, तसाच स्कार्फ >>> स्वजोला सुपरस्टार टाईप सादर करताना त्याचे कपडे मला कायमच विचित्र वाटत आले आहेत. वॉन्नाबी टॉलीवूड वाटतात ते पिक्चर व रोल्स. मुळात महाराष्ट्रात लोक कधी आउटडोअर्स मधे स्कार्फ वापरतात?
याच्याही ट्रेलर मधे प्राबे करता ठेवलेला ड्रेस सुभाने घातलाय असे वाटले एकदा. लुंगी कम नऊवारी. जिम कॅरेच्या "मी, मायसेल्फ अॅण्ड आयरीन" पिक्चरमधल्या सीन्ससारखेही काही सीन वाटले.
मुळात हे कोठे सुरू होते हेच
मुळात हे कोठे सुरू होते हेच कसे समजले? > त्या ह्या डब्यात नवा सिनेमा कोणता आलाय म्हणून हा दिसला तर बघू म्हटलं.
ही घ्या ट्रेलर ची लिन्क - यावरून अंदाज येईल . तिथे खाली कमेन्ट्स पण बघा
https://youtu.be/Rnr-OY0D_KY?si=8q26VZ5vHYU6qjY1
आता पाहिले - लेखक, छायाचित्रकार आणि दिग्दर्शक सबकुछ कोणी संजय अमर म्हणुन नाव आहे. गाणी पण त्यानेच लिहिलीत. आणि कोणी तरी "साजन पटेल" ने
मग बरोबर आहे 
प्राबे करता ठेवलेला ड्रेस
प्राबे करता ठेवलेला ड्रेस सुभाने घातलाय असे वाटले एकदा. लुंगी कम नऊवारी
>>>>
फा हारेम पॅन्ट म्हणतात त्या प्रकाराला. माझी मुलगी घरात वापरते. सुभा का वापरतोय या वयात?
रिंकु खरोखर मुलगी वाटते त्याची.
असा पिक्चर माहित नव्हता
असा पिक्चर माहित नव्हता
शोधतो आता .. पिक्चर नाही.. ट्रेलर
Pages