मराठी चित्रपट कसा वाटला - २

Submitted by ऋन्मेऽऽष on 13 May, 2025 - 13:06

आपल्या मराठी चित्रपटांवर चर्चा करायला हा मराठमोळा धागा

आधीचा धागा इथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/74623

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुरांबा अमेय वाघ आणि मिथिला पालकर ना? तो कुठे ओटीटी वर आहे कोणाला काही आयड्या आहे का? त्याबद्दल चांगले ऐकलेले. कलाकार आवडीचे होते. पण सापडतच नाही कुठे...

'जारण' वरची पोस्ट वाचली संप्रति. कशावर आहे, कुठे पाहिला, कधी आला काहीही माहिती नव्हते. थोडं अजून सविस्तर लिहाल का ? Happy इंटरेस्टिंग वाटतो आहे, बघेन.

जारण बद्दलच एकीकडे वाचून इथे लिहायला आलो होतो. तो ओटीटी नाही तर नुकताच थेटरला आला आहे. मी अशा जॉनरचे चित्रपट सहसा बघत नाही अन्यथा एव्हाना पाहिला असता.

पण हा बघायचा विचार करत आहे कारण एका मैत्रीणीने त्यात छोटीशी भूमिका केली आहे. गेले काही दिवसात तीन मराठी चित्रपट थिएटर मध्ये जाऊन बघितले आणि तिचाच नाही बघणार हे आमच्यातील नात्याचा अंत करेल या धास्तीने आता बघायचा विचार चालू आहे.

अरे हो, याचे सुद्धा रिव्ह्यू चांगले येत आहेत. माझे जे ठरेल ते पण ज्यांना असे चित्रपट आवडतात त्यांनी जरूर बघायला जा.

गुलकंद, शिलाजीत... मराठी सिनेमे आहेत की आयुर्वेदिक औषधालय? >>> Lol

गुलकंद मला आवडेल अशी भीती वाटत आहे Proud मी हास्यजत्रा अधूनमधून पाहतो. काहीकाही विनोद व प्रसंग जमलेले असतात. पण फोकसने पिक्चर बघण्याइतके चांगले विनोद जमतील का अशीही शंका आहे.

>>> गुलकंद मला आवडेल अशी भीती वाटत आहे
मला तर खात्रीच वाटते आहे. Proud
तुझ्या अकाउंटवर नोंदवूनच ठेवते. Proud

अस्मिता, 'जारण'च्या ट्रेलरच्या लिंकसाठी धन्यवाद. तो पाहिल्यावर ही चर्चाही सजेस्ट केली यूट्यूबने आणि आवडली.

मला पण हाच व्हिडीओ आलेला मटाचा. Lol

ही कथा पूर्वी कधी तरी पाहिल्यासारखी वाटतेय. बहुतेक दूरदर्शनचं युट्यूब चॅनेल आहे त्यावर.
सिनेमा बघितला तर कळेल.

फा, तुला 'गुलकंद' आवडण्याची शक्यता फार, फार कमी आहे तरीही आवडला तर समविचारी गॅन्गमधून 'फायर' करेन. हाकानाका. कारण हा असा अधलामधलाही नाही की 'तुमच्या मताचा आदर/ वादे वादे जायते ई' फेक -रूटीन पाळावे. Proud Wink
सारांश - घाबरत राहा. शिवाय अमितने माझे ऐकले नाही, त्याचे काय झाले बघ.

मला तर खात्रीच वाटते आहे >>> Lol

तरी थिएटरमधे जाउन बघत नाहीये. थिएटरमधे असे पिक्चर बघितले की आवडायचे चान्सेस वाढतात. बाईपण भारी देवा मी एन्जॉय केला होता. सुधीर फडके तर भारावून पाहिला. पण अलीबाबा आणि चाळीशीतले चोर व मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी हे दोन्ही थिएटरमधेही पकाऊ वाटले होते.

तुझ्या अकाउंटवर नोंदवूनच ठेवते.
>>>> मी हल्लीच चित्रगुप्त जसा पापपुण्याचा हिशेब ठेवतो तशी 'चित्रपटगुप्त' होऊन रेकोंच्या पापपुण्याचा हिशेब ठेवतेय. तूच तुझ्या रेकोंचा चित्रपटगुप्त. Proud

स्वाती - तुझी लिंक बघेन. Happy

फा पिक्चर आवडला तरी इथे सांगायचा नाही >> नाही, उलट आवर्जुन सांगेल. त्या उसुलांचा पक्का आहे फा. Proud

Lol हो आवडला तर आवडला म्हणून सांगेन. कन्फर्मिटीकरता दुसरेच काही सांगणार नाही. धन्यवाद अमित. तसे नसते तर ही वरची इमेज तयारच झाली नसती Happy

कारण हा असा अधलामधलाही नाही की 'तुमच्या मताचा आदर/ वादे वादे जायते ई' फेक -रूटीन पाळावे >>> अधलामधला म्हणजे "अमलताश" लेव्हल का? Happy

समीर चौगुलेची कॉमेडी लक्ष्मीकांत बेर्डेच्या अंगाने जातेय असं वाटायला लागलं आहे हल्ली. म हा जमध्ये त्याचे काही स्कीट्स आवडतात पण काही काही अगदीच बघवत नाहीत.

>>म हा जमध्ये त्याचे काही स्कीट्स आवडतात पण काही काही अगदीच बघवत नाहीत.

++१
फक्त समीर चौगुले असलेले बघितले जातात माझ्याकडून. विशाखा सुभेदार होती तेव्हा फारच मजा यायची. पण तरीही त्या दोघांचेही अगदी निवडक स्क्टीट्सच जमून गेले आहेत.
बाकी बहुतेक स्कीट्समध्ये उच्चारांवर आधारीत शाब्दीक विनोद असतात ते वैताग आणतात. ते आवली लवली प्रकरण तर मी अजिबात बघू शकत नाही.

समीर चौघुले - विशाखाचं एक स्किट होतं त्यात ती उर्दू गायिका असते जयपूरची आणि तो तिची मुलाखत घेत असतो. ते मस्त जमून आलं होतं Happy

तरी थिएटरमधे जाउन बघत नाहीये. थिएटरमधे असे पिक्चर बघितले की आवडायचे चान्सेस वाढतात. >> अनुमोदन. खर्च केलेला असतो, सांगायची सोय नसते त्यामुळं आवडून घेतलेले बरेच आहेत असे. पण काही वेळा थिएटरच्या वातावरणात आवडून जातो पिक्चर. बनवणार्‍याने ते लक्षात घेऊनच बनवलेला असतो.

समीर चौघुले - विशाखाचं एक स्किट होतं त्यात ती उर्दू गायिका असते >> भारीच. दोघांची स्किटस पुन्हा पहायला पण मजा येते.
नम्रताचा लॉली अवतार अजिबात आवडत नाही. किती विचित्र केशरचना. एक साऊथचा पिक्चर आहे टीव्हीवर. त्यात हिरॉईनची वेणी धनुष्याच्या आकारासारखी आहे. तसा प्रकार वाटतो. मोरे गँग पण बोअर करते.

नम्रताची लॉली, आवली लवली वगैरे स्किट्स भयंकर बालिश आणि इरिटेटींग आहेत. मी नशिबाने युट्युबवर बघते त्यामुळे फॉर्वर्ड करणं, बंद करणं माझ्या हातात आहे.
मला सुरुवातीला त्याची आणि विशाखाची काही स्किट्स आवडली होती. नंतर त्यातल्या तोच तोचपणाचा कंटाळा आला आणि आचरटपणा झेपेनासा झाला. ती त्यातून बाहेर पडली ह्याचा मला भयंकर आनंद झाला आहे. त्यानिमित्ताने वेगवेगळी कॅरेक्टर्स आणि कॉम्बिनेशन्स ट्राय करायला लागले. नाहीतर समीर विशाखा आणि प्रसाद नम्रता जोडीचं अवास्तव कौतुक करायचे.

Pages