Submitted by ऋन्मेऽऽष on 13 May, 2025 - 13:06
आपल्या मराठी चित्रपटांवर चर्चा करायला हा मराठमोळा धागा
आधीचा धागा इथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/74623
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छन्दिफन्दि,
छन्दिफन्दि,
ओह, तुमचा प्रतिसाद शोधायला गेलो तर समजले मुळात ती पोस्टच तुमची होती. माझा छान बदाम लाईक वगैरे आहे त्या पोस्टवर पण फेसबुक आयडी आपलाच याची कल्पना नव्हती
बाकी प्रतिसाद पटला तिथला..
तसे केले असते तर सकारात्मक
तसे केले असते तर सकारात्मक संदेश गेला असता आणि आवडला असता.>>> मे बी प्रेशरमुळे तेव्हा ती तसं करू शकली नसेल (बर्याचदा मुलींचं असं होतं मनात काहीतरी वेगळं असतं खरं पण फॅमिली/सोशल प्रेशरमुळे तोंड उघडू शकत नाही स्पेशली तिची बॅकग्राऊंड बघता) पण अगदी जेव्हा बॉयलिंग पॉईंट येतो तेव्हा मग... शेवट! पटणेबल!
बॉयलिंग पॉईंट येतो तेव्हा मग.
बॉयलिंग पॉईंट येतो तेव्हा मग..>>> अगदी
प्रेमाची गोष्ट २ चित्रपट कोणी
प्रेमाची गोष्ट २ चित्रपट कोणी पाहिला का किंवा बघणार आहे का वीकेंडला? कसा आहे जरूर कळवा..
मनाच्या श्लोकांचं पुढे काय
मनाच्या श्लोकांचं पुढे काय झालं? काय नाव बदलून आला? कसा आहे?
"तु बोल ना "
"तु बोल ना "
काही रिस्पॉन्स नव्हता अस फेसबुक सान्गतय..कॉन्ट्रोव्ह्रर्सीचा काहि उपयोग झाला नसावा.
बुक माय शो वर कुठे जवळपास फार
बुक माय शो वर कुठे जवळपास फार दिसला नाही.
कुठे परीक्षण वगैरे वाचण्यात आले नाही.
कंट्रोवरसी सुद्धा फार पेटली नाही. सामान्य लोकं शहाणी झाली आहेत. फक्त भावना दुखाव गट आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्य गट कुठेतरी कोपऱ्यात आपसात भिडले..
. फक्त भावना दुखाव गट आणि
. फक्त भावना दुखाव गट आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्य गट कुठेतरी कोपऱ्यात आपसात भिडले.>>
मनाचे श्लोक हे नाव
मनाचे श्लोक हे नाव कॉन्ट्रोव्ह्रर्सी निर्माण करण्यासाठी दिले होते ही नवी माहिती मिळाली. आता कॉन्ट्रोव्ह्रर्सी करायला जे पुढे आलेत, ते स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवून घेतात. तशा घोषणाही त्यांनी दिल्या. त्यांचा ड्रेस कोडही तसाच आहे. म्हणजे हिंदुत्ववादी लोक कॉन्ट्रोव्ह्रर्सी निर्माण करायची सुपारी घेतात असा अर्थ निघतो.
कुठे नेऊन ठेवलाय हिंदू धर्म माझा?
या आणि दुसर्या धाग्यावरचे त्याबद्दलचे प्रतिसाद वाचून झुंडशाहीत काही वावगे नाही - ती सर्वमान्य झाली हे कळले. राजमान्य तर झालीच आहे.
पुन्हा तीच चर्चा सुरू होणार
पुन्हा तीच चर्चा सुरू होणार असेल तर आपण तो धागा वापरुया लोकहो..
बिन लग्नाची गोष्ट >> फार
बिन लग्नाची गोष्ट >> फार क्लिशे आणि बोर आहे.
अमलताश पाहिला.
अमलताश पाहिला.
फार सुंदर आणि हळूवार होता.
चित्रपट बघतोय असे वाटलेच नाही. अगदी घडतेय आपल्या आसपास असेच वाटत होते.
गाणी, बॅकग्राऊंड म्युजिक जे काही होते ते सुद्धा छान लयबद्ध होते.
अमलताश वर आल्यावर आता मला परत
अमलताश वर आल्यावर आता मला परत दाण्याचे लाडू खावे वाटू लागतं.
असंभव
असंभव
एका बांधकाम प्रोजेक्टच्या कंपनीत कामासाठी आलेली मुक्ता बर्वे आणि बॉस सचित पाटील यांच्यात एक वेगळा बंध तयार होतो असं वाटत असतानाच, ती त्याला पहिल्यांदा लग्नाला नाही म्हणते. पण ती वैयक्तिक बाब आपल्या व्यावसायिक गोष्टीत न आणण्या एव्हढी ती दोघं समंजस असतात.
नैनितालला गेल्यावर त्याला तिच्या नकार मागचं कारण कळतं. तिला पडणाऱ्या विचित्र स्वप्नांचा छडा लावायला तो आपल्या एका (मानसशास्त्रज्ञ (?)) मित्राला बोलावून घेतो.
तिकडूनच मग हळू हळू एकेक रहस्य त्यां दोघांना (/ आणि प्रेक्षकांना ) उलगडायला लागतं. एकंदरीत ते सर्व असंभव वाटणारे असते.
तरीही शेवटपर्यंत सिनेमा प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. ह्यात त्याचे यश आहे.
मराठीमध्ये अनेक वेगवेगळी कथानके आजकाल हाताळली जातायत, असंभव ही त्यातीलच एक म्हणता येईल. खरं तर आता दरवेळी हे म्हणायची गरजच नाही खर तर.
चित्रपट आवडला.
सगळ्यांची कामे छान झालीयेत. कथा वेगळी आहे.
मला व्यक्तिशः पुनर्जन्म, त्याचा शास्त्राशी संबंध जुळवण हे सगळं खर तर न पटणार वाटलं. चित्रपटाचा अख्खा डोलारा त्यावरच उभा केलाय. अर्थात ह्या सारखे चित्रपट पूर्वी अनेक येऊन गेलेत. तो मुद्दा बाजूला ठेवून कथानक आहे तसे स्वीकारले तर मग चित्रपट आवडू शकतो.
बराचसा चित्रपट नैनिताल मधील असल्यामुळे नयनरम्य दृश्ये. मराठीत बहुदा पहिलाच चित्रपट असावा उत्तराखंड/ हिमालयाच्या कुशीत चित्रित केलेला.
एकंदर एकदा बघायला चांगला आहे.
असंभव च्या रेकोबद्दल आभार
असंभव च्या रेकोबद्दल आभार छन्दिफन्दी.
सध्या औषधांमुळे प्रचंड झोप लागत असल्याने सिनेमे बघून होत नाहीत.
असंभव बद्दल चांगले रिव्ह्युज
असंभव बद्दल चांगले रिव्ह्युज वाचले.
असंभव: अगदीच बिचारा गरीब
असंभव: अगदीच बिचारा गरीब बकवास चित्रपट आहे.
मी अर्धा तास सहन केला. त्यावर अत्याचार सहन करणे अशक्य झाले. अभिनय, कथा, पटकथा, संवाद, काहीच पकड घेत नाही. याउपर जास्त लिहुन वेळ घालवणे ही क्रिमिनल वाटावे इतका टाकाऊ आहे. आपापल्या जबाबदारी वर बघा.
असंभव केनेथ ब्रॅनाच्या 'डेड
असंभव केनेथ ब्रॅनाच्या 'डेड अगेन' नावाच्या चित्रपटाची बावळट्ट कॉपी आहे. श्रेयोल्लेख करायची पद्धत मराठी चित्रपटांत नाहीच!
कथा नैनितालमध्ये नेऊन का घातली आहे ते निर्मातेच जाणोत! आधी हिमालयाच्या कुशीत न्या, मग त्यात 'अय्या मी माहेरची मराठीच आहे' कॅरेक्टर कोंबा, आणि ब्रॅनाची यूज्ड टीबॅग उकळून कोमट फुळकवणी चहा वा वा करत प्या! नाही ते उद्योग!
आणि तो कोण टिनपॉट हीरो आहे त्याच्या चेहर्यावरचा इंचभर मेकअप खरवडला तरी चमचाभरसुद्धा अॅक्टिंग हाती लागत नाही! याला कोणी घेतला सिनेमात असं वाटलं आधी, मग तोच दिग्दर्शक आहे हे पाहिलं! :कपाळबडवती:
असंभव असा असणार हे त्याच्या
असंभव असा असणार हे त्याच्या जाहिराती, टीजर्स आणि मूर्ख क्रिएटिव्ह्ज मधूनच कळलं होतं. एखादा सिनेमा एखादी मराठी मालिका समजून कसा प्रमोट करू नये याचं उत्तम उदाहरण.
युके प्रमाणे नैनितालला टॅक्स
युके प्रमाणे नैनितालला टॅक्स ब्रेक असेल बहुतेक.
प्रिया माहेरची बापट आहे हे चारवेळा सांगितल्यावर एकतर माझी हिंदी समजायची लायकी नाही, किंवा प्रिया (- लग्नापूर्वीच्या बापट)ला हिंदी बोलता येणार नाही यातलं काही तरी एक नक्की आहे.
मला व्यक्तिशः पुनर्जन्म,
मला व्यक्तिशः पुनर्जन्म, त्याचा शास्त्राशी संबंध जुळवण हे सगळं खर तर न पटणार वाटलं.
>>>>>
अर्र.. हा स्पॉयलर झाला
आणि मी त्याला कोट करून अजून हायलाईट केला
माझाही या पुनर्जन्म फंड्यावर विश्वास नाही. पण चित्रपटात सगळे चालते. हॅरी पॉटर मध्ये सुद्धा जादू वगैरे काही नसते हे सर्वांना माहीत असते. पण तरी कित्येकांना तो आवडतोच. भूतखेते तर आपण चित्रपटातच बघतो. प्रत्यक्षात आयुष्यात एक दिसेल तर शप्पथ. सगळे बालपण पाली आणि झुरळांना घाबरण्यात गेले.
असो,
असंभवबाबत सुद्धा अमलताश सारखे मराठी प्रेक्षकांचे दोन गट तयार झाले आहेत. आवडलेला आणि नावडलेला. तूर्तास कोणाचे पारडे जड होते ते बघणे उत्तम.
चेहर्यावरचा इंचभर मेकअप
चेहर्यावरचा इंचभर मेकअप खरवडला तरी चमचाभरसुद्धा अॅक्टिंग हाती लागत नाही!
>> प्लस वन मुक्तासाठी
असंभव यंदा इफ्फीच्या भारतीय
असंभव यंदा इफ्फीच्या भारतीय पॅनोरमाचा उद्घाटनाचा चित्रपट होता. सध्याच्या स्थितीबद्दल या पलीकडे काही बोलण्यासारखं नाही.
उत्तर
उत्तर
अगदी आताच्या काळातील, उपनगरीय मराठी मध्यम वर्गातील गोष्ट.
रेणुका शहाणे आकाशवाणीवरील लोकप्रिय निवेदिका, एकल पालकत्वचा जबादारी समर्थपणे पेलत आपल्या एकुलत्या एका मुलाला - अभिनय बेर्डे - चांगले शिक्षण देऊन वाढवते आहे.
साहजिकच आईच विश्व पूर्ण मुलाभोवती फिरणारं पण मुलाला तिचं ते अतिप्रेम जाचक वाटणारं असा एक तिढा आहे. त्यातच न कळत्या वयात आईविषयी झालेले ग्रह पुढे मोठा झाल्यावरही मध्ये मध्ये डोकं वर काढून त्या तिढ्यात भर टाकत असतात.
पण एका प्रोजेक्टसाठी मुलगा स्वतःच्या आईचचं AI मॉडेल बनवायचं ठरवतो. त्यानिमित्ताने काही दिवस का होईना पण तो बऱ्याच मोठ्या विलंबानंतर दिवसाचे बरेच तास- नाश्ता, जेवण, खाणे, फिरणे, गप्पा मारणे - आईबरोबर घालवतो.
मॉडेल तर परफेक्ट तयार होतं, पण मग आईचं काय? त्यांच्यातल्या तिढ्याचं काय? ही सगळी उत्तरं चित्रपट बघितल्यावर मिळतील.
आई चांगली ठणठणीत असताना मधेच जीवरच दुखणं किंवा १८ वर्षाचा (ऍडल्ट ) झाल्यावरही मुलाशी नाजूक पण महत्वाच्या विषयावर आईने न बोलणं किंवा त्याच्या मनातील तेढ समजून न घेणं, त्याचं निराकरण न करणं, हे त्या उपनगरीय आधुनिक/ सुशिक्षित घरात थोडं न पटण्यासारखं वाटलं. पण तीच चित्रपटाच्या कथानकाची आवश्यक बाब आहे.
रेणुका शहाणे ही तर कसलेली अभिनेत्री आहेच परंतु मला विशेष उल्लेखनीय काम वाटलं ते अभिनय बेर्डेचं. ‘ती सध्या काय करते?’ नंतर बघितलेलं त्याच हे पहिलच काम. वेगवेगळ्या छटा असलेलं हे काम त्याने चांगलं केलंय.
ते AI मॉडेलवाला रोबो खूपच बेसिक वाटला पण ठीक आहे. कुठेही लांबण न लावता किंवा अतिरडका (मेलोड्रामा ) न करता चांगला संयतपणे हाताळलाय. बाकी ऋता दुर्गुळे आणि निर्मिती सावंत यांची कामेही चोख वाटली.
सध्या येत असलेल्या निरनिराळे विषय हाताळणाऱ्या मराठी चित्रपटांच्या पंगतीत बसणारा ‘उत्तर’ ही वाटला.
बापजन्म पाहिला...छान आहे..
बापजन्म पाहिला...छान आहे..
छान परिक्षण , छंदीफंदी.. !
छान परिक्षण , छंदीफंदी.. !
फेसबुकवर ' सविता दामोदर परांजपे' ह्या सुबोध भावेंच्या नवीन चित्रपटाचे काही सीन पाहिल्यावर कुतुहलाने युट्युबवर शोधला चित्रपट तर रिमा लागूंचा ह्याच नावाचा जुना चित्रपट समोर आला. तोच पाहिला मग... सेम नावाचे त्यांचे नाटकही होते असं वाचलं.
चित्रपटाची मांडणी आणि आशय आवडला.
छन्दिफन्दि, तुम्ही थेटरात
छन्दिफन्दि, तुम्ही थेटरात जाऊन मराठी पिक्चर पाहिला याबद्दल तुमचे कौतुक. हा खरा प्रेक्षक. माझ्यासारखे लोक काळजी तर करतात, पण आधीच हा ओटीटी वर बघायचा पिक्चर असा शेरा मारून टाकतात.
१८ वर्षाचा (ऍडल्ट ) झाल्यावरही मुलाशी नाजूक पण महत्वाच्या विषयावर आईने न बोलणं किंवा त्याच्या मनातील तेढ समजून न घेणं, त्याचं निराकरण न करणं, हे त्या उपनगरीय आधुनिक/ सुशिक्षित घरात >>>> उपनगरीय आधुनिक . सुशिक्षित म्हणजे नेमका कुठला प्रेक्षक अभिप्रेत आहे ? कारण आजही या विषयावर आई मुलांशी बोलत नाही, वडील तर खूपच लांबची गोष्ट आहे. हे सर्व सुशिक्षित, उपनगरीय असतातच.
उत्तर पाहिला .अभिनय चा अभिनय
उत्तर पाहिला .अभिनय चा अभिनय आवडला .स्टोरी चा जीव फार लहान आहे ,तो बर्डन वाला सीन चांगला जमलाय, अगदी आजच्या मुलांच्या प्रतिनिधीत्व आणि भावविश्वात डोकावणारा संवाद. बाकी चित्रपट जेव्हढा प्रोमोत आहे तेव्हढाच .आणि पटकन संपतो. Ai चं मॉडेल मराठी चित्रपटाला झेपेल इतपतच आहे त्यात अजून गोष्टी दाखवता आल्या असत्या ,असो पण दिग्दर्शक क्षितिज पटवर्धन चं कौतुक करायला हवं हा विषय निवडल्याबद्दल आणि उत्तम कथा लिहुन मांडल्याबद्दल ,चित्रपटाचा शेवट अंतर्मुख करणारा आहे त्याच इमोशनल भारावलेल्या स्तिथीतून बाहेर पडल्यावर आयनॉक्स वाल्यांनी फ्री बिस्कीट बार देऊन गोड सरप्राईज दिलं . त्याची खरच गरज होती. मला चित्रपट आवडला.
कारण आजही या विषयावर आई
कारण आजही या विषयावर आई मुलांशी बोलत नाही,>>>>+1 हेच मी दाभाढे च्या वेळेसही म्हटलं होतं अजूनही तेव्हढा मोकळेपणा पालक मुलांत नसला तरी मुलांना पुस्तकं पॉडकास्ट इत्यादी मार्गाने माहिती पुरवून संवादाची सुरुवात झाली आहे.मुलांशी बोलता येत नसेल तरी त्यांना योग्य ती माहिती इतर पर्यायांनी पुरवली तरी बरेच प्रश्न सुटतील. विशेषतः या मोबाईल च्या युगात जिथे चुकीची माहिती मिळण्याची शक्यता अधिक असताना.
थोड्या लोकांत जाणीवपूर्वक
थोड्या लोकांत जाणीवपूर्वक संवाद सुरू करतात. पण बहुतेक कुटुंबात मुलांशी या विषयावर कसं बोलावं हा प्रश्न असतो. आणि मुलांनाही इकडून तिकडून माहीती मिळत असली तरीही आपल्या आईवडलांनी या विषयावर बोलावं हे ऑकवर्डच असतं. मायबोलीवर सर्वत्र जे चालतं त्याची कल्पना नसते असंच दिसतंय. मायबोलीवर मराठी मालिका फ्लॉप असल्या तरी प्रत्यक्षात त्या सुपरहीट असतात.
Pages