मराठी चित्रपट कसा वाटला - २

Submitted by ऋन्मेऽऽष on 13 May, 2025 - 13:06

आपल्या मराठी चित्रपटांवर चर्चा करायला हा मराठमोळा धागा

आधीचा धागा इथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/74623

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गुलाबी नावाचं एक भयंकर प्रकरण बघायचा प्रयत्न केला. >>> Lol

मी जिलबी शोधताना प्राइमवर चुकून गुलाबी टाइप केले होते ते आठवले.

सुशिला सुजित(का??) पाहिला, युट्युबवर होता...अत्यत बालिश आणी भयाण मुव्हि, फक्त चुकुन दार लागुन दोघ एका रुममधे अडकतात एवढ्या बारिक स्तोरिलाइनवर आक्खा मुव्हि काढलाय..स्वप्निल कळकट,कन्टाळलेला दिसतो आणी सोकुच्या डोक्यावर परिणाम झालाय अस वाटत

कॅनव्हास नावाचा मराठी मूवी लावलाय. आधी पाहिलाय पण अजिबात आठवत नाही.
खून पडत असतात. स ध पोलीस अधिकारी आहे. खून झालेल्या व्यक्तीची बायको त्याची ओळख पटवायला येते तेव्हां दोन सेकंद पॉज. बरं पॉज घेतल्यावर अभिनयाचं उत्तुंग दर्शन होईल अशी कल्पना होते. पण ती जे रडते ते बघून हसायलाच आलं.
पार्क मधे एक फाटका माणूस टाईम्स ऑफ इंडीयात खूनाची बातमी वाचत असतो, तर दुसर्‍या खूनाची बातमी पेपरवाल्याकडून लक्झरी कारमधला माणूस सामना विकत घेऊन वाचतो. यातून दिग्दर्शकालाकाही तरी मेसेज द्यायचा असेल.

पोलीस खूनाच्या तपासासंबंधी एकमेकांशी चर्चा करतानाचे संवाद आणि अभिनय भारी आहे. अभिनय नैसर्गिक वाटावा याची "काळजी" घेऊन एक्स्प्रेशन्स दिलेत. स ध हा मुळचाच नामानऊ ( नाकावरची माशी न उडणारा) असल्याने अशा प्रसंगात त्याचाच अभिनय नैसर्गिक वाटतो.

हो ना.. अतिशय रटाळ कथा सुशीला. ची .
गुलाबी.. मृणाल पेक्षा अश्विनी फारच graceful आणि छान आहे. पिक्चर बघू नाही शकले..ट्रेलर बघून च नको वाटलं.

जारण फारच उत्तम सिनेमा जमलाय.. थिएटर मध्ये बघण्यासारखाच आहे.
अमृता सुभाष ला इन्स्टाग्रामवर DM करून सांगितलं मी Happy
अतिशय भारी झाला आहे पिक्चर.

गुलकंद मला पण आवडला, सई प्रसाद चे सीन फारच छान जमून आलेत, जपून ठेवलेले फोटो, लॉकेट तिच्याकडे नसणे, शेवटचा building वरचा सीन फारच छान. फक्त ईशा डे ch पात्र भयानक बावळट आणि कैच्या काय आहे.. आणि नंतर त्या कविता करण्याशी वगैरे मॅच नाही होत.. बघवत नाही थोडे वेळाने. समीर ने चांगली केली आहे अक्टिंग.. साधा सरळ वडील आणि माणूस वाटतो तो.. भोळसट एकदम.

महागुरू... Lol सही देताना डियर हरिभाई.. असं लिहिल... संजीव कुमार नक्कीच मोठे असतील न..आणि पिळगावकर किती लहान..तरी नुसतं हरिभाई... काय बोलाव कळत नाही अशा मुलाखती बघून.. असेल सुद्धा झालेलं ..त्याचं त्यांना माहित..

नक्की मिळाला असेल तुला >>> Happy हो असेलही. लक्षात नाही.

बरं पॉज घेतल्यावर अभिनयाचं उत्तुंग दर्शन होईल अशी कल्पना होते. पण ती जे रडते ते बघून हसायलाच आलं. >>> Lol

वेलकम होम मी सुद्धा नुकताच पाहिला.
अस्मिताच्या सगळ्या पोस्टला मम.
तगडी स्टारकास्ट.
विषय नीट मांडला आहे आणि प्रत्येक पिढीतील स्त्रीची तिच्या आपल्या घराबद्दलची ओढ आणि त्याचा हक्क याबद्दलचे कंगोरे छान उलगडून दाखवले आहेत. मोहन आगाशे आणि उत्तरा बावकर तर कुठेही अभिनय करत आहेत असं वाटतच नाही. वाल सोलणे, अंथरूण घालणं यासारख्या घरातील रोजच्या गोष्टी सुद्धा चित्रीकरणाच्या फ्लो मधे मस्त दाखवल्या आहेत.
सुमित राघवन, सुबोध भावे, दीपा श्रीराम, इरावती हर्षे यांच्या छोट्या भूमिका आहेत पण त्या खूप मस्त रंगवल्या आहेत.
"प्रत्येकाच्या आयुष्यातील दुःख वेगवेगळी पण त्यातही सारखेपणा असतोच, तो ज्याला कळला तो आपला, बाकी सारे परके" हे वाक्य आवडले.

कॅनव्हास पिसं काढण्यासारखा बनवला आहे. माझ्यासारख्या विनोदाचे अंग कमी असलेल्यांनी या सिनेमावर लिहीले तर त्या सिनेमा बनवण्याचा उद्देश वाया जाईल.
दिग्दर्शकाने आपण एखादी मानवी इतिहासातील एकमेवाद्वितीय कलाकृती बनवत असल्याचा आव आणला आहे. सुरूवातीच्या श्रेयनामावली मधे शास्त्रीय राग ऐकवल्याने एका उच्च दर्जेदार कलाकृतीला आपण सामोरे जात आहोत असा मेसेज मिळतो. त्यानंतर प्रत्येक दृष्यात अनावश्यक डिटेलिंग आणि कमीत कमी संवाद. अशा संवादहीन दृश्यात अभिनय बोलतो या समजुतीला देखील फाटा दिल्याने दिग्दर्शकाला वेगळं काही तरी करायचंय हे समजतं.
पार्श्वसंगीत भयंकर विअर्ड आहे. नको तिथे ते वाजतं. हवं तिथे सायलेन्ट असतं. खून्याची मानसिक स्थिती दाखवताना शास्त्रीय वादनाचा function at() { [native code] }इरेक झालाय.
पोलीस तपास हा उच्च कोटीचा आहे.
खूनी मयताच्य जवळ एक चित्र ठेवून जात असतो . ते चित्र स ध इतक्या बारकाईने बघतो कि असं वाटतं याने पोलीस तपासाची डिग्री जे जे मधून घेतली असेल. आता हा काही तरी भन्नाट सांगणार असं वाटत असताना तो म्हणतो " वुई नीड अ‍ॅन एक्सपर्ट "
मग ते सगळे एका एक्सपर्ट कडे जातात. हा एक्सपर्ट नेमका सायकॉलॉजी विषयातला आहे कि आर्ट मधला हे कळत नाही. पण त्याचं ऑफीस कमिशनरच्या चेंबरपेक्षा मोठं असतं. चित्र बघून तो सांगतो कि खूनी तीस वयाच्या पुढचा नसावा. कारण याचे स्ट्रोस डेफिनेट आहेत. मग एकाच कलाकाराने वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर काढलेले एक चित्र दाखवून तो फरक समजावतो. असे कलाकार असतात जे प्रेक्षकांना स्ट्रोक्स वरून वय कसं शोधावं हे समजावं म्हणून वायाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर एकच चित्र काढतात ही नवीन माहिती समजली.
मग दोन इंगर्जी वाक्यं हा एक्सपर्ट एका दमात पाठ करून आल्यासारखा बोलतो. त्याची इंग्रजी संवादफेक ही १०० मीटरची रेस पळताना धाप लागल्यासारखी आहे.
स ध च्या टीम मधे एक सहकारी वेडेवाकडे केस कापलेला, किरकोळ शरीरयष्टीचा आणि समांतर चित्रपटात अभिनय करण्यासाठी जन्माला आलेला असावा असा आहे. तो तपास कराताना भयंकर इमोशनल होतो, फाईली आपटतो, दोन्ही हातांनी १८० चा कोन करून आरडाओरड करून तपास करतो. या क्लिप्स मधे एकही संवाद नाही आणि त्या दृश्यात त्याने हात धुवून अभिनय करण्याचा प्रयत्न केल्याने त्या इरीटेटिंग विनोदी झाल्या आहेत.

कमिशनर कि डीआयजी स ध ला फोन करतो तेव्हां तो बाथरूममधे असतो. त्याची बायको मधुर वेलणकर फोन घेते. "मी छान" या वरून डीआयजी साहेबांनी तू कशी आहेस असा प्रश्न विचारला असावा, म्हणजे घरगुती संबंध आहेत स ध चे असा कयास बांधता येतो. "डी आय जी साहेबांचा फोन आहे, काय सांगू ?" हे फोन बंद न करताच ती विचारते. स ध म्हणतो आलो म्हणून सांग, आणि कोरडाच बाहेर येतो.

एव्हढा फोन केलाय म्हणजे काही तरी भारी असणार.
तर डीआयजी झालेले गृहस्थ केसाचा विचित्र टोप लावून पाठ केलेली वाक्ये बोलतात. त्यातही त्यांची दमछाक होते.
"आय नीड अ‍ॅन एक्स्प्लेनेशन. ही केस आता मीडीयात हाईप झालेली आहे. आम्हालाही वर उत्तर द्यायचं असतं. मी फक्त चार दिवसांची मुदत देऊ शकतो" ही ठरलेली वाक्ये ऐकवण्यासाठी घरी फोन करून बोलावून का घेतलं असेल ?
खर तर तार विभागात बातमी कळवण्यासाठी पूर्वी कोड होते. तसे कमिशनर / डीआयजींच्या अशा संवांदांना कोड दिले तर अशा बड्या अधिकार्‍यांचा वेळ वाचेल. म्हणजे आम्हालाही वर उत्तर द्यायचं असतं साठी ९. अमूक दिवसांची मुदत साठी ३.
मुदत किती दिवसांची याचा फॉर्म्युला काय असतो हे कळत नाही.

काही तरी वेगळं करायचं या ध्यासाने निर्माता, दिग्दर्शक, लेखक एकत्र आले असावेत. त्यातल्या त्यात ग्लॅमरस चेहरे म्हणून स ध , म वे ही जोडी घेतली. शिवाजी साटम हे मधुरा वेलणकरचे सासरे असल्याने त्यांना घेतलं तर कॉन्फ्लिक्ट ऑफ इंट रेस्ट निर्माण होईल म्हणून स ध पोलीस झालाय. तर म वे चा खरा पती अभिजीत साटम हा वेगळ्या भूमिकेत.
कसलाही विचार न करता मुंबईवरून पुण्याला सायकलवरून निघावं आणि घाट आल्यवर दमछाक व्हावी, " अरे , घाटाचा विचारच केला नव्हता" असा विचार करून मग घाट सायकल हातात घेऊन चढावा. त्यात पाच तास गेले तरी राईड पूर्ण केल्याचं समाधान मिळावं तसा पिक्चर पूर्ण झाला आहे.

लेखकाला तर मध्यवर्ती कल्पना सुचली असावी. पण ती पूर्ण करताना अनेक प्रसंगांत गाडी अडली. अशा प्रसंगांची कल्पनाच केली नसावी, लोक एकमेकांशी कसे बोलतात हे संवाद लेखकाला माहिती नसावं, आणि इन्कम टॅक्स रिटर्न भरायचेत भरायचेत म्हणत शेवटच्या दिवशी घाई करताना अनेक गोष्टी क्लेम करायच्या राहून जाव्यात तसं शेवटच्या क्षणी कथा पूर्ण केली आहे असं वाटतं.
इथे पूर्णविराम.

संवादहीन दृश्यात अभिनय बोलतो या समजुतीला देखील फाटा दिल्याने दिग्दर्शकाला वेगळं काही तरी करायचंय हे समजतं.

ते चित्र स ध इतक्या बारकाईने बघतो कि असं वाटतं याने पोलीस तपासाची डिग्री जे जे मधून घेतली असेल.

असे कलाकार असतात जे प्रेक्षकांना स्ट्रोक्स वरून वय कसं शोधावं हे समजावं म्हणून वायाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर एकच चित्र काढतात ही नवीन माहिती समजली.

"डी आय जी साहेबांचा फोन आहे, काय सांगू ?" हे फोन बंद न करताच ती विचारते. स ध म्हणतो आलो म्हणून सांग, आणि कोरडाच बाहेर येतो.
>>>> Rofl

“ संजीव कुमार नक्कीच मोठे असतील न..आणि पिळगावकर किती लहान” - “हा माझा मार्ग एकला“ रिलीजच्या वेळी (१९६३), सचिन (१९५७) सहा वर्षाचा होता आणि संजीवकुमार (१९३८) २५ वर्षाचा. आता ज्याला ज्यावर विश्वास ठेवायचा तो ठेवावा Happy

गुलकंद सिनेमातला विनोदी पार्ट मलाही नंतर नंतर बोअर झाला.
ते कारच्या डिकीतून बाहेर येऊन घाबरून मिठी मारणं तर फारच ओतावि.

मी हास्यजत्रा पाहिलेलं नाही. पण काही काही ठिकाणी खरंच तसे स्किट्स एकापुढे एक केल्यासारखं वाटतं.
हीच गोष्ट 'चिकी चिकी बुबुम बुम'ची. कास्ट पाहून बघायला सुरुवात केली. पण अर्धा तासही बघू शकले नाही. तिथेही तेच - टीव्हीवरच्या विनोदी स्किट्सची माळ Uhoh

सही देताना डियर हरिभाई.. असं लिहिल... >>>पाच सहा वर्षाच्या मुलाला एवढे लिहिता आले याबद्दल फार कौतुक वाटले. त्यावेळी शाळेत ५ -६ वर्षाचा असताना टाकायचे ना ?

रानभुली Rofl कॅनव्हासच्या छानच चिंध्या केल्या आहेत.

पोलीस तपासाची डिग्री जे जे मधून
कमिशनर / डीआयजींच्या अशा संवांदांना कोड
>>> Lol

श्रेयनामावली मधे शास्त्रीय राग >>> हे कदाचित तुम्ही पिक्चर बघितल्यावर कुठल्या भावावस्थेत पोहोचाल हे सांगण्याकरता केलं असावं Proud

https://www.youtube.com/shorts/UqrkQF3rXIg महागुरू - ये नहीं देखा तो क्या देखा?

ती डिअर हरिभाई क्लिप फेसबुकच्या कृपेने दिसली. तेव्हा महागुरू १४ वर्षांचे होते असं ते म्हणताहेत. हा माझा मार्ग एकला हिंदीत बनवायचा एका निर्मात्याचा विचार सुरू होता.

येरे येरे पावसा या नावाच्या पिक्चरचा ३ रा भाग आलाय. पहिले दोन कधी आले होते ?
कि एकदम तिसरा भाग रिलीज केला कि पहिले दोन भाग चालल्याशिवाय तिसरा आलाय का म्हणून प्रेक्षक उत्सुकतेने येतील असा विचार केला असेल ?

माझे मन, रमड खूप खूप आभार Happy

देशाची सुरक्षितता कशी असावी ?
कुणीही ऐरा गैरा देशात आला तर सजग नागरिकांनी त्याची चौकशी केली पाहीजे. कोणत्या देशातून आला, याच देशाचं तिकीट कसं घेतलं ? कुणी दिलं ही चौकशी केली पाहीजे हे खूप वर्षांपूर्वी एका मराठी चित्रपटाने शिकवलं होतंं. ही चौकशी कशी करावी याचं ड्रील. फक्त तीन मिनिटे लागतील.

https://www.youtube.com/watch?v=HVhnxGnI68E&list=RDHVhnxGnI68E&start_rad...

नाळ २ या चित्रपटाला मुलांसाठीच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला.
ज्यांनी नाळ आणि नाळ २ बघितले नसतील त्यांनी आवर्जून बघा. सुंदर चित्रपट आहेत दोन्ही. मुलांसाठी असं नाही, मोठ्यांनाही आवडतील असे आहेत.

अरे वाह खूप छान.
नाळ—१ मी पाहिला नाही. झी घ्यावे लागेल.
दुसरा आवडलेला. छान आहे. पहिला न बघता ही दुसरा बघू शकतो.
मुलांसाठीचा पुरस्कार हे सुद्धा योग्यच. लेकीला फार आवडलेला.

Firstclass दाभाडे पाहिला. चांगला घेतला आहे. पात्र एकदम अस्सल वाटतात. बोलण्याचा लहेजा, त्यांची वाक्ये एकदम मातीतली आहेत. संवाद एकदम सहज आहेत. ओढून ताणून आणलेला उत्तम शेवट असे पण नाहीये. सगळ्यांचा अभिनय चांगला

गावगुंड ज्या पद्धतीनं येणार्‍या जाणार्‍यांवर कमेण्ट्स पास करत असतात त्या पद्धतीचं रोस्ट आहे.
ना कुठला पंच, ना श्लेष, ना सार्कजम ना कोट्या... उग्रट पॉडकास्ट आहे. उगीच पाहिलं.

काहीतरी फालतू आहे. एक मिनिट तरी का बघितले असे झाले. एखाद्या कलाकाराबद्दल असे सोशल मीडियावर वाह्यात लेव्हलचे बोलण्याचा हक्क कोण देतो आणि कुठून येतो समजत नाही. यातून त्या व्हिडिओ बनवणाऱ्यांचीच लायकी कळते.

जर संपादनाची वेळ शिल्लक असेल तर उडवा हे प्लीज इथून...

एखाद्या कलाकाराबद्दल असे सोशल मीडियावर वाह्यात लेव्हलचे बोलण्याचा हक्क कोण देतो आणि कुठून येतो समजत नाही. यातून त्या व्हिडिओ बनवणाऱ्यांचीच लायकी कळते.>>>>>

ट्रोल्लिंग सगळेजण करतात. मी इथे भारत भुषण, विश्वजीत वगैरे माठ होते असे म्हणते तेही ट्रोलिंगच ना? माझी जितकी लेव्हल तितक्या प्रमाणात मी व्यक्त होते. इथे लिहुन पैसे मिळत नाहीत, त्यामुळे माबोपेज उघडणार्‍या प्रत्येकाने माझे लिखाण वाचावे ही धडपड मी करत नाही.

यु ट्युबवर दुकान उघडुन बसले की जितके व्युज व लाइक्स तितके पैसे. तिथे लोक त्यांच्या दर्जाप्रमाणे वागतात. समजा चित्रपट परिक्षणाचे दोन चॅनेल्स आहेत. सुसंकृत,ज्ञानी व्यक्ती चालवत असलेले चॅनेल चित्रपटाचा सर्वांगिण परिचय करुन द्यायची धडपड करेल. त्याची व्युवरशीप कदाचित हळुहळु वाढेल. केवळ पैसे मिळवणे ह्या उद्देशाने सुरु झालेले चॅनेल भडक मथळे देऊन आणि मसाल्याने भरलेली भाषा वापरुन परिक्षण करेल.

वाह्यात कंटेंट देणारे पैश्यांसाठी करताहेत. माणुस पैष्यांसाठी कुठल्याही थराला जाऊ शकतो.

सचिन पिळगावकर काय वाट्टेल ते बडबड करुन लोकांना पकवत असतात. स्वतःचा मोठेपणा सांगण्याच्या धडपडीत स्वतःच‘ हसंच करुन घेतात. नावाप्रमाणेच पिळ आहेत. हे सगळं माहित असताना न्यूज चॅनल्स कशाला इंटर्व्ह्यु घ्यायला जाऊन फूटेज देतात?

साधना, आपण मित्रांच्या कट्ट्यांवर जी भाषा वापरतो तीच आपण कुठल्या पब्लिक फोरमवर वापरत नाही.
मित्रांमध्ये कोणी एखाद्या सेलिब्रिटीला चार शिव्या हासडल्या तरी आपण त्याला संस्कार शिकवायला जात नाही. याचे कारण ते आपले मित्र असतात म्हणून नाही तर ती आपल्या ग्रुपची खाजगी स्पेस असते.

एकवेळ मायबोलीला देखील मित्रांचा कट्टा किंवा खाजगी जागा बोलू शकतो. पण युट्युबवर व्हिडिओ अपलोड करत असाल आणि त्यातून कमाई सुद्धा करत असाल तर त्यावर काही कायदे कानून नियम हवे असे वाटते.

म्हणजे कोणी एखाद्या महिलेचे तिच्या परवानगीशिवाय व्हिडिओ शूट केले आणि ते आंबटशौकीन लोकांसाठी अपलोड केले तर तो जसा गुन्हा ठरेल तसेच मला हे सुद्धा वाटते.
म्हणजे तुम्ही एखाद्यावर काही पातळी सोडून बोलाल आणि असे व्हिडिओ ज्या लोकांना आवडतात त्यांच्यासाठी अपलोड करून त्यातून कमाई कराल तर ते चुकीचे आहे. त्यावर कायद्याचा धाक निर्बंध हवा असे मला वाटते.

Pages