Submitted by ऋन्मेऽऽष on 13 May, 2025 - 13:06        
      
    आपल्या मराठी चित्रपटांवर चर्चा करायला हा मराठमोळा धागा
आधीचा धागा इथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/74623
विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users
शेअर करा
 
मी बघितले आहे हास्यजत्रा, पण
हो, हा हास्यजत्रेचा मुद्दा बरोबर आहे.
मी बघितले आहे हास्यजत्रा, पण कंटाळा येईल इतपत नाही. फेसबुक व्हिडिओ स्क्रोल करताना कधी दिसले आणि तेव्हा बघायचा मूड असेल तरच.. पण त्यावरून हे सांगू शकतो की, हास्यजत्रेचा कंटाळा आला असेल तर गुलकंदमध्ये कदाचित फार वेगळे काही सापडू नये.. पण ज्यांनी हास्यजत्रा तोलून मापून बघितले आहे आणि अजून ते बघायची आवड टिकून आहे त्यांना आवडायची शक्यता जास्त आहे. कारण चित्रपटातील कॅरेक्टर्स जमून आले आहेत.
अवांतर - या जगात अवीट फक्त ####_## आहे
गुलकंद बघितला.पण मलाही फारसा
गुलकंद बघितला.पण मलाही फारसा काही आवडला नाही. ईशा डे ला भोळसट दाखवायच्या नादात वेडसर वागते. क्लबमधे जातात तो प्रकार तर अचाटच. नसता पाहिला तरी चालला असता.
लाईक सबस्क्राईब पण ओकेच. मी तर २-३ वेळा अर्धवट बघून सोडून दिला. अमृता खानविलकर आल्यावर तर अजूनच महाबोअर झाला.
माझ्याकडे प्राईम नाही याचा
माझ्याकडे प्राईम नाही याचा आनंद मानून घ्यावा की काय असं वाटायला लागलंय वरचे रिव्ह्यूज वाचून
कोणी जारण पाहिला तर प्लीज सांगा कसा आहे. खूप उत्सुकता आहे मला.
मी प्राईम परवाच घेतले
मी प्राईम परवाच घेतले महिन्याभरासाठी..
आणि नुकताच मितवा पाहिला. इथे कोणीतरी स्टोरी लिहीली होती ती इंटरेस्टिंग वाटली म्हणून बघायचा डोक्यात होते. अन्यथा गाणी बघून फार सपक चित्रपट असेल असेच वाटायचे. पण फिल्मी आहे, ऐनगेजिंग आहे. स्वप्नील जोशीला सुपररिच प्लेबॉय भूमिकेत बघून अभिमान वाटला. चित्रपटभर छान रुबाबदार दिसला आणि कॅरेक्टरला दाखवलेला माज त्याला शोभला.
त्याची हेलिकॉप्टर एन्ट्री कभी खुशी कभी गम मधील शाहरुखसारखी ग्रँड करायचा प्रयत्न केला असावा. पण तशी काही जमली नाही. तरी मराठी चित्रपटात असे यापूर्वी झाले नसावे.
मी उद्या मितवा बघून इथे
मी उद्या मितवा बघून इथे लिहीते.
विषय निघालाच (काढलाच) आहे आणि
विषय निघालाच (काढलाच) आहे आणि चित्रपटाबद्दलच असल्याने मराठीलाही लागू होत असल्याने,
ओटीटी आणि टीव्ही आल्यापासून तोंडाला गोडाची मिठी बसते तसं पिक्चरच्या बाबतीत झालंय. मराठीत किमान विषयांचं वैविध्य असतं, पण अॅक्टर्सचं ओव्हरएक्स्पोजर असल्याने त्यांना पाहून पिक्चरला ( हॉलमधे) जावंसं वाटत नाही. मालिकेत, वेबसिरीज मधे, नाटकात सर्वत्र तेच चेहरे. आता तर दहीहंडी, गणपती, हळदीकुंकू (function at() { [native code] }इशयोक्ती नाही) अशा कार्यक्रमात सुद्धा हे कलाकार हजेरी लावतात. परिणाम - त्यांची फेसव्हॅल्यू घसरते.
काल्पनिक कथानकं इतकी प्रेडीक्टेबल झालीत कि लेखक दिग्दर्शक कथा कशा प्रकारे घरंगळवणार आहे हे तोंडपाठ झालेलं असतं. निव्वळ डो़यांना सुखद म्हणून किंवा नेत्रदीपक इफेक्ट्स बघायला जावं असं वाटत नाही. टायगर, पठाण सारख्या पिक्चरमधे हिरोची अचाट साहसं बघण्यासाठी तकलादू कथानक बघण्याची तयारी नसते.
अपवाद - ज्युरासिक पार्क, बाहुबली अशा कथांमधे क्लेमच काल्पनिक असल्याने इथे कथा कशीही वळवलेली चालू शकते. शिवाय तांत्रिक बाजूवर घेतलेली मेहनत हा त्याचा युएसपी ठरतो. ज्युपा आणि बाहुबलीची तुलना होऊ शकत नाही कारण ज्युपा ला सायन्सची बेमालूम फोडणी दिलीय तर बाहुबली चांदोबा टाईप कथा लार्ज स्केल वर नेऊन मायथॉलॉजिकल टच दिला आहे. इथे दिग्दर्शकाचे स्वातंत्र्य मान्य होऊ शकते. तेच ट्रिपल आर पटत नाही कारण ब्रिटीशकाल म्हणजे इतिहास. शिवाय यातले हिरो प्रत्यक्षात होऊन गेलेले असल्याने तिथे सिनेमॅटीक लिबर्टी पटत नाही. याच कारणाने एम आय , बॉण्ड पट बघत नाही. त्यापेक्षा जॅकीचॅनचे जुने पोलीस स्टोरी सारखे अॅक्शन कॉमेडी पट आवडतात.
बाकी घिसीपिटी कथानकं ओटीटी मुळे इतक्या मोठ्या संख्येने उपलब्ध आहेत कि नको वाटतं.
चिकवावर पिसं काढलेली म्हणूनच पटतात.
मनिषा कोईरालाचा आलेला तालिबान खरंच चांगला होता पण त्या वेळी त्याचं मार्केटिंग धड नव्हत किंवा असे सिनेमे बघायची पब्लीकची तेव्हां तयारी नसावी. बायोपिक सुरूवातीला बरे वाटले, आता त्याचं अॅबरप्ट एण्डिंग आणि उगीच घुसडलेलं नाट्य किंवा नको ते प्रसंग हायलाईट केलेले नकोसे वाटतात. एकाच वेळी एक तर बायोपिक किंवा ऐतिहासिक अशा लाटा आल्या तरी मग कंटाळा येतो. मराठी म्हटलं कि विनोदी हे पण नकोसे झालेले आहे. अपवाद पोस्टाची सिरीज किंवा टिपरे सारख्या प्रसन्न मालिका. त्यांचे सिनेमे आले तर बघणार.
अजीर्ण होईपर्यंत ताणू नये एव्हढी अपेक्षा पूर्ण करता येत नाही यांना. जुने गाजलेले सिनेमे त्या त्या काळाचा महिमा लक्षात घेऊन पाहिले तर वेळ चांगला जातो, काल जुना अंदाज अर्धा पाहिला. छान वाटला. अधून मधून मायबोली टाईप मनोरंजन पण होतं.
युट्यूबवर जर कंटेट मॅनेज केलं तर चांगला वेळ जातो यापेक्षा.
ज्युपा आणि बाहुबलीची तुलना
ज्युपा आणि बाहुबलीची तुलना होऊ शकत नाही कारण ज्युपा ला सायन्सची बेमालूम फोडणी दिलीय तर बाहुबली चांदोबा टाईप कथा लार्ज स्केल वर नेऊन मायथॉलॉजिकल टच दिला आहे. इथे दिग्दर्शकाचे स्वातंत्र्य मान्य होऊ शकते. तेच ट्रिपल आर पटत नाही कारण ब्रिटीशकाल म्हणजे इतिहास. >>> सहमत आहे.
जॅकी चॅनचे ते पिक्चर्स बघायला हवेत परत. पोलिस स्टोरी, रम्बल इन द ब्राँक्स, रश अवर (१ आणि २), हू अॅम आय वगैरे
 इतके अतरंगी स्टंट्स करूनही स्वतःला फार सिरीयसली न घेणे हे जॅकी चॅनकडून शिकावे. एकतर प्रत्येक पिक्चर मधे त्याची कोणीतरी एकदा धुलाई करतात. बर्याच वेळा मार्शल आर्ट्स वाली एखादी हिरॉइनच. आणि मारामारीनंतर आपले अवयव दुखू शकतात हे हिंदी व इंग्रजी दोन्ही पिक्चर वाल्यांनी आपल्यापासून लपवलेले सत्य त्याने पुढे आणले 
 असे काहीतरी असते त्याच्या पिक्चर मधे. माझा एक अगदी आवडता सीन - कोणता पिक्चर लक्षात नाही. बहुधा रश अवर-२. तो व एक व्हिलन एकमेकांच्या नडग्यांवर नडग्या आपटत बराच वेळ एकमेकांना लाथा घालताना दाखवलेत. मात्र नंतर दोघेही पाय धरून कळवळतानाही दाखवलेत 
मात्र नंतर दोघेही पाय धरून
मात्र नंतर दोघेही पाय धरून कळवळतानाही दाखवलेत >>
हो. हे नेहमी असतं त्याच्या पिक्चर मधे, ब्रुसलीपटांपेक्षा हे वेगळेपण आहे त्याच्याकडे.
ज्युपा आणि बाहुबलीची तुलना
ज्युपा आणि बाहुबलीची तुलना होऊ शकत नाही कारण ज्युपा ला सायन्सची बेमालूम फोडणी दिलीय तर बाहुबली चांदोबा टाईप कथा लार्ज स्केल वर नेऊन मायथॉलॉजिकल टच दिला आहे. इथे दिग्दर्शकाचे स्वातंत्र्य मान्य होऊ शकते.
>>>>> १०००++
>>नाही आवडला तर मी पूर्ण
>>नाही आवडला तर मी पूर्ण इंग्लंड दौरा क्रिकेट धाग्यावर काही लिहीणार नाही.
ऋन्मेष,
तू इंग्लंड दौरा क्रिकेट धाग्यावर लिहू शकतोस!!
बाकी सविस्तर अभिप्राय त्या चित्रपटाच्या धाग्यावर लिहतो!!
(No subject)
स्माईल प्लीज - प्राईम
स्माईल प्लीज - प्राईम
 
छान होता. फार आवडला
मुक्ता बर्वे आणि प्रसाद ओके डिव्होर्स झालेले कपल. मुक्ता फोटोग्राफर तर प्रसाद ओक दिग्दर्शक. मुलगी बापाजवळ राहते आणि आईला क्वचित भेटते. तिचा राग राग करते. आणि मग एके दिवशी कळते की मुक्ताला डिमणेशिया झाला आहे. सगळे काही वेगाने आणि कायमचे विसरण्याचा आजार..
म्हटले उगाच बघायला घेतला. रडगाणे बघायला हल्ली नकोसे वाटते.
पण अश्यावेळी ललित प्रभाकरची एंट्री झाली आणि पिक्चरच बदलून गेला. आजारात सुद्धा ती आपली फोटोग्राफर म्हणून ओळख कायम ठेवते. या दरम्यान मुलगी सुद्धा बापापासून दूर आणि आईच्या जवळ येते. पण आईच्या आजारामुळे सहानुभूती पोटी नाही तर तिला स्वतःला काय चूक काय बरोबर याची अक्कल आल्यामुळे. शेवट देखील पॉझिटिव्ह नोट वरच केला आहे. बघितला नसल्यास जरूर बघा.
हा ललित प्रभाकर आधी फार आवडायचा नाही, पण हल्ली काही चित्रपटांपासून आवडू लागला आहे. यात त्याचे कॅरेक्टर छान दाखवले आहे. आपण ही असेच वागावे आणि जगावे असे वाटणारे..
मी सुद्धा डिमेन्शिआ वाचून या
मी सुद्धा डिमेन्शिआ वाचून या सिनेमाचा नाद सोडलेला. आज युट्युबवर पुनश्च अशी ही बन वाबनवी पाहीला.
मी सुद्धा डिमेन्शिआ वाचून या
मी सुद्धा डिमेन्शिआ वाचून या सिनेमाचा नाद सोडलेला.
>>>>
मग जमल्यास प्रयत्न करा. फील गुड आहे
स्माईल प्लीज - प्राईम चांगला
स्माईल प्लीज - प्राईम चांगला वाटलेला. आवडला होता.
स्माईल प्लीज आवडला होता. ललित
स्माईल प्लीज आवडला होता. ललित आवडतोच. यात त्याचं काम सुरेख आहे.
सुशीला सुजित पाहू नका
सुशीला सुजित पाहू नका .पहिल्या मिनिटात बोर व्हायला होतं .आणि आपल्या लक्षात येतं हे फालतू आहे.तरीही पाहात बसलात तर थोड्या वेळाने जाणवायला लागतं यांनी हा पिच्चर का काढला असेल आणि आपण का बघतोय इतका टुकार पणा. तरीही नेटाने बघितला तर फक्त एक दारूच्या सीन मधलं थोडंफार संभाषण सोडलं तर काही नाही, तेही रटाळ नेहमीचंच ही संसारात सुखी नाही.. याची गर्लफ्रेंड दुसर्याशी लग्न करून गेलीय.. पण हा अजूनही तिच्यावरच प्रेम करतोय.
स्वप्नील काहीही पिच्चर करतोय पण सोनाली, तिला असला रोल .फारच वाईट दिसलीय.अभिनयही मुद्दाम वाईट केल्यासारखा.एव्हडं सगळं पाहूनही अजून अत्याचार पाहायचा असेल तर शेवटचं गाणं पाहा गश्मीर महाजनी आणि अमृता खानविलकर चं चिऊ ताई चिऊ ताई दार उघड .पैसे वाया (पिच्चर काढणाऱयांचे) वेळ वाया.
'जारण' पाहिला. भयपट आहे.
'जारण' पाहिला. भयपट आहे. वेगळा आहे. आवडला.
अमृता सुभाष दिवसेंदिवस तिचा स्वतःचाच परफॉर्मन्स बेंचमार्क उंचावत निघालेली आहे. शिवाय यात अनिता दातेनी जो 'गंगुटी' नावाच्या जाखिणीचा रोल केला आहे, तो 'डेंजरस' आहे. या गंगुटीचे एकदोन सीन्स बघताना टरकलो होतो, हे कबूल केलं पाहिजे.
मला वाटायचे सुशीला सुजित मधे
मला वाटायचे सुशीला सुजित मधे "शीलाजीत" वर काहीतरी शाब्दिक कोटी व पिक्चरमधे त्याचा संदर्भ असेल. पण तसे काही दिसत नाही.
आहे, आहे. नावातच सुशीला सुजीत
आहे, आहे. नावातच
सुशीलासुजीत असं लिहिलं आहे. पण मराठी चित्रपट म्हणजे 'शीलाजीत' दाखवून च्यवनप्राश दिलं असेल.पण मराठी चित्रपट म्हणजे
पण मराठी चित्रपट म्हणजे 'शीलाजीत' दाखवून च्यवनप्राश दिलं असेल. >>>
सुशीला सुजित पाहू नका
सुशीला सुजित पाहू नका .पहिल्या मिनिटात बोर व्हायला होतं .आणि आपल्या लक्षात येतं हे फालतू आहे.
>>>
आता लोकं आवर्जून बघतील काय ते फालतू हुडकायला
बाई दवे, माझा आज रात्री बघायचा विचार आहे जर झोप नाही आली तर..
जेवायच्या आधी सुरुवातीलाच येणारे पाच मिनिटांचे गाणे ऐकले. मराठीत रॅप साँग ऐकून माझ्या तर अपेक्षा वाढल्या होत्या. आणि राजकुमार राव यांच्या ट्रॅप चित्रपटासारखे काही असावे असेही वाटले होते. पण तुम्ही लिहिले तसे संसाराचे रडगाणे असेल तर अवघड आहे. पण स्वप्निल जोशी आहे त्यामुळे बघणार हे नक्की. काल की परवाच त्याचा मितवा मधील धनाढ्य प्ले बॉय रोल पाहिला आणि आज अचानक दाढी वाढलेला पंबलर.. चतुरस्र कलाकारांचे वैविध्य म्हणतात ते हेच असावे.
<<<दाढी वाढलेला पंबलर..
<<<दाढी वाढलेला पंबलर.. चतुरस्र कलाकारांचे वैविध्य म्हणतात ते हेच असावे. >>


<<आता लोकं आवर्जून बघतील काय ते फालतू हुडकायला >>>जातात जातात
पोस्ट चित्रपट लोकांनी पाहू नये म्हणूनच लिहिली होती पण कोणाला हौस च असेल पाहायची आणि माझ्यासारखी सहनशीलता वाढवायची , तर आपण का बुआ अडवा .हे राहिलंच, चित्रपट अमेजॉन प्राईम वर आहे .
पाहिला मी सुशीला सुजित. मला
पाहिला मी सुशीला सुजित. मला बरा वाटला. एखादी मोठी शॉर्ट फिल्म बघितल्यासारखा. चित्रपटाकडून ठेवतो तश्या अपेक्षा ठेवू नये हे सुरुवातीलाच समजले.
बोअर झालेले शॉट म्हणजे तिच्या नवऱ्याला आपल्या बायकोच्या लफड्याचे आणि परपुरुषासोबत रोमान्सचे होणारे भास. अशी दृश्ये लहान मुले आसपास असताना ढकलली जातात. मी रात्री तीन चार वाजता एकट्याने चित्रपट बघत असूनही ढकलत होतों. स्वतःच्या चारित्र्याचा अभिमान वाटला.
प्रत्यक्ष आयुष्यात दारू पिऊन माणसे डोक्याला वीट येईल इतके बरळतात. पण चित्रपटात मात्र ऐकावी आणि अनुसरावी अशी छान फिलॉसॉफी झाडतात. तेव्हाचे दोनचार संवाद आवडले किंवा रिलेट झाले म्हणा. जसे की प्रेम करायला सुद्धा वेळ असावा लागतो. ज्या संदर्भाने बोलला ते भिडले अगदी. तसेच दुसऱ्याला सल्ले देताना माणसांना फार अक्कल येते पण स्वतःच्या वेळी ते वापरायची वेळ आली तर गहाण पडते हे वाक्य देखील चित्रपटाच्या संदर्भाने आवडले.
शिलाजीतचा संदर्भ बराच आहे. शेवटच्या शॉट मध्ये दोन्ही जोड्यांच्या कथा शिलाजीतवरच संपतात.
बाई दवे, हे शिलाजीत म्हणजेच व्हायग्रा का? हे एकमेकांच्या घराण्यातले आहेत का? इथे सांगण्यासारखे नसेल तर नका सांगू कोणी..
गुलकंद अगदीच काहीतरी आहे. हसू
गुलकंद अगदीच काहीतरी आहे. हसू सोडा, मला कंटाळा आला. बोर आहे. अजून एक तास उरलाय. मरुदे!
दिवसा ढवळ्या पब मध्ये साडी नेसून शाल डोक्यावर घेऊन जायचं यात काय मजेदार आहे? आणि सरबत समजून टकीला पिणे आणि ओकारी काढून डिकी मध्ये बसणे.... आणि डिकी मधून फोन करून भूक लागली सांगणे, आणि बाहेर पडल्यावर कुत्रा ओरडलेला ऐकून भलत्या माणसाला मिठी मारणे, आणि ते सीसी टीव्हीत कॅप्चर होणे!!! आवरा! काय अत्याचार लावलाय!
'बघू नका' सांगितलेलं न ऐकता बघितला की दुसरं काय होणार! भोआकफ!
गुलकंद, शिलाजीत... मराठी
गुलकंद, शिलाजीत... मराठी सिनेमे आहेत की आयुर्वेदिक औषधालय?
खरंचच च्यवनप्राशने काय घोडं मारलंय? तो पण सिनेमा येऊद्या.
गुलकंद, शिलाजीत... मराठी
गुलकंद, शिलाजीत... मराठी सिनेमे आहेत की आयुर्वेदिक औषधालय?
>>>
गुलकंद, शिलाजीत... मराठी
गुलकंद, शिलाजीत... मराठी सिनेमे आहेत की आयुर्वेदिक औषधालय? >>>मोरावळा पण येईल लवकरच
अमितव, बरं झालं बघितला नाही
अमितव, बरं झालं बघितला नाही ते. असले ओढूनताणून फालतू जोक्स झेपत नाहीत.
बघू नका' सांगितलेलं न ऐकता
बघू नका' सांगितलेलं न ऐकता बघितला की दुसरं काय होणार! भोआकफ!
 ऐकायचंच नाही, स्वतःचंच खरं करायचं. आता त्या चिकवावर 'भूल चूक माफ' पाहू नका सांगितले आहे. 
>>> तसंच पाहिजे.
मोरावळा>>> मुरांबा येऊन गेला एक तसाच हाही येणार आहे का ?
आयुर्वेदिक औषधालय
Pages