मराठी चित्रपट कसा वाटला - २

Submitted by ऋन्मेऽऽष on 13 May, 2025 - 13:06

आपल्या मराठी चित्रपटांवर चर्चा करायला हा मराठमोळा धागा

आधीचा धागा इथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/74623

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अस्मिता +१.
सायकल चित्रपट मस्त आहे.

तो तर मस्तच होता… दुकानात सेल लावतात आणि तेव्हाच मुळ मालक दुकानात येतात तो प्रसंग तर कधीही विसरणे शक्य नाही Happy

कुलकर्णी चौकातला देशपांडे बघायला सुरुवात केली.
अर्ध्या तासात कंटाळा आला. पुढे काय घडू शकतं त्याचा थोडा थोडा अंदाज आला. मग बंद करून टाकला.
ती दोन लहान मुलं आणि त्यांचे सीन्स, संवाद फार बोअर झालं.

सायकल
A truly classic movie.
खूप दिवसानंतर एक मूवी विसरणार नाही असा.

'सायकल' मला पण खूप आवडला होता..नंतर मुलींना दाखवायचा म्हणून शोधला you tube वर पण rent वर होता...आता पुन्हा टाकलाय बहुतेक...link साठी धन्यवाद केकू..पुन्हा पाहीन आता लेकींसोबत...

अरे व्वा, 'सायकल' बहुतेकांनी पाहिलेला व त्यांना आवडलेला दिसतोय Happy

पण मला मुळात चकचकीत (घरं) लालचुटुक (माती), पांढरेशुभ्र (कपडे) वगैरे असलेलं कोकण (माती वगळता इतर गोष्टींसाठी कुठलाही ग्रामीण भाग) बघायला आवडत नाही, कारण ते कृत्रिम वाटतं. याबाबतीत घो मला असला हवा, वास्तुपुरुष, नाळ, थ्री ऑफ अस वगैरे भारी आहेत. >>>>> वावे Happy , हे सगळे मलाही आवडले होते पण 'वास्तुपुरूष' सोडल्यास हा जास्त सरस आहे असं वाटलं होतं.

पात्रांमधल्या अकृत्रिम निरागसतेला तोड नाही, त्यापुढे मला घरं, माती, कपडे अशा भौतिक गोष्टींतले काहीही खटकले नाही. रादर लक्षच गेले नाही म्हटलं तरी चालेल. खूप दिवसांनी काही तरी नितळ पाहिल्यासारखं वाटलं. मी आधीही येथे लिहिले होते पण जातोय म्हणून परवा आवर्जून लिहिले. आपल्या मराठी भाषेत एवढी छान कलाकृती आहे, कधीकधी माहितीच नाही असेही होते. ह्यातला भाबडेपणा आणि विवेक दोन्ही खरा वाटतो. भाऊ कदम मुलांचा फेवरेट आहे, त्यामुळे त्यांनीही पाहिला व त्यांनाही आवडला होता. कोकणातले चित्रिकरण, नदी, गाव, घरं सगळीच प्रकाशयोजना व सिनेमॅटोग्राफी अतिशय आवडली.

केकु, अब आया ऊँट 'सायकल'के नीचे Happy

सायकल सिनेमा मस्त आहे एकदम. बरेच दिवस झाले बघून. नेटफ्लिक्सवरून जात असेल तर परत बघू एकदा.
त्याच काळात 'आनंदाचं झाड' असा एक सिनेमा बघितला होता. तो पण असाच मस्त होता.

रच्याकने, पुरूषोत्तममध्ये अमेय वाघ, निपूण धर्माधिकारी ह्यांनी 'सायकल' नावाची एकांकिका सादर केली होती. तिला करंडक मिळाला होता. दोन्हीची कथा वेगळी आहे पण सायकल हा मूळ फोकस. ती एकांकिका युट्यूब वर होती पूर्वी. अजून असेल तर नक्की बघा, मस्त आहे एकदम.

अस्मिता
उंट मान वर करून जे वाघाला दिसत नाही ते पुढचे दूरवरचे बघत असतो.
असो. लागे हात Bicycle Thieves 1948 Full Movie With English Subtitles
https://www.youtube.com/watch?v=uQkDYXzsHJE
बघून टाका.
Vittorio De Sica चा आहे.

पाहिला सायकल
छान होता!
फिल गुड पिक्चर.. शेवटपर्यंत!

मालगुडी डेज वाईब आले थोडेफार..
मध्यंतरी तो अरविंद स्वामीच मेयझागन पिक्चर आलेला त्याचेही वाईब आले थोडेफार..
एखाद्याचा चांगुलपणा बघून आपल्या आतील चांगुलपणा जागा होणे टाईप..

काही दृश्यातले कॅमेरा अँगल फार आवडले. किंबहुना प्रत्येक दृश्यात ते काम विचारपूर्वक केल्याचे जाणवत होते.

सर्वांचा अभिनय अस्सल वाटला.
ऋषिकेश जोशी यांच्या पत्नीचे काम करणाऱ्या हिरोईनीचे डोळे आवडले.
भाऊ कदम यांच्या भावनिक दृश्यांचा आणि बावळट कॅरेक्टर अभिनयाचा भडीमार केला नाही हे सुद्धा आवडले.
प्रियदर्शन जाधवचा कॉमिक टायमिंग आवडला.

मी प्राईम वर वेलकम होम नावाचा सिनेमा पाहिला . मृणाल कुलकर्णी , सुमित राघवन , डॉ . आगाशे .
नवरा बायकोच्या नात्यात दुरावा आल्याने तिला नेमकं आपलं घर कोणतं ? असा प्रश्न असतो . लेकीला घेऊन माहेरी येते आणि पुढचा सगळा फक्त मानसिक आंदोलनांचा सिनेमा आहे . सुबोध भावे पण आहे . एकदा बघावा असा नक्कीच आहे , मला आवडला .

ललिता प्रीती - कुलकर्णी चौकातला देशपांडे भंगार म्हणजे महाभंगार सिनेमा आहे .
तिचं कॅरेक्टर इतकं सेल्फ डिपेन्डन्ट असूनही मुळात ती निखिल रत्नपारखी सारख्या स्वभावाच्या माणसाशी लग्नच कसं करते ? हा मोठा प्रश्न पडतो . मी पूर्ण बघितलाय , मला शाबासकी पाहिजे . इतकं करून ती राजेश शृंगारपुरे बरोबर सुद्धा लग्न करत नाहीच . Lol

>> सायकल <<

रटाळ सिनेमा आहे. अतिशय कृत्रिम संवाद, 'ह्या बगा आता मी तुमका कोकण कसा दाखवता' छापाची सिनेमॅटोग्राफी, स्टॉक संगीत, सायकलवाल्याचा बनियान पण नुकताच फॅक्टरी मधून काढून आलेला, वनलायनर स्टोरी भोवती गुंफलेला कथानकाचा विसविशीत डोलारा ज्यात किमान प्रसंगांचे तरी वैविध्य पाहिजे तेही नाही.

हे 'ए'कारान्त आडनावाच्या लोकांच्या नजरेतून, बोलीतून कोकण पाहणे अति झालय. कधी हे चित्रपटसृष्टीला लागलेले ग्रहण सुटेल कुणास ठाऊक.

तिकडे ते कॉकस्पर्श वाले आणि इकडे हे 'कुलकर्णी चौकातला देशपांडे' वाले. वैताग आला आहे.

थॅंक्यू केकू, नोटेड. Happy

ऋ, भाऊ कदम प्रमाणेच मला प्रियदर्शन जाधव एकदम गुणी कलाकार वाटतो, त्याला अजून आव्हानात्मक काम मिळायला हवं. 'गोदावरी' चित्रपटातील त्याचे कामही पूर्ण वेगळ्या धाटणीचे आणि सुरेख होते.

वेलकम होम मलाही आवडला होता, येथे लिहिले होते.

ऋ, भाऊ कदम प्रमाणेच मला प्रियदर्शन जाधव एकदम गुणी कलाकार वाटतो, त्याला अजून आव्हानात्मक काम मिळायला हवं.
>>>>>
+७८६ अस्मिता
प्रियदर्शन जाधव बद्दल अगदी याच आशयाचे आणि जवळपास याच शब्दांचे वाक्य काल वरचा प्रतिसाद लिहिताना माझ्या डोक्यात आले होते. फक्त रात्रीचे तीन चार वाजल्याने मोठा प्रतिसाद लिहायचा आळस केला Happy
प्रत्येक भेटणारी व्यक्ती जेव्हा ओळख दाखवायची तेव्हा त्या दोघांची रिएक्शन मस्त असायची. त्यामुळे आता यांना कोण भेटते आणि हे कसे रिऍक्ट करतात ही उत्सुकता चित्रपट कुठे चालला आहे हे माहीत असूनही टिकून होती.

दक्षिणा, वेलकम होमच्या रेको साठी आभार.
प्राईम च्या मेंबरशिपचा घोटाळा झालाय माझ्याकडे. पाहीन निस्तरल्यावर.

Pages