Submitted by Admin-team on 20 April, 2022 - 18:19
आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसादांची मर्यादा ओलांडल्यामुळे हा नवा धागा सुरू करत आहे.
इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
The Seven Basic Plots
The Seven Basic Plots
बाही मी हे पुस्तक अजून वाचले नाहीये पण ह्या पुस्तकाची ओळख करून गेणारे हे विकी चे पान वाचले आहे.
https://en.wikipedia.org/wiki/The_Seven_Basic_Plots
पुस्तकाचा लेखक Christopher Booker
लेखकाच्या मते कुठल्याही कथा सात पैकी कुठल्यातरी एका कथानकावर आधारित असतात/ आहेत.
ही सात कथानक आहेत Overcoming the Monster , Rags to Riches, The Quest, Voyage and Return,
Comedy, Tragedy आणि Rebirth.
लेखाक्काने प्रत्येक प्रकारात बसणारी वैश्विक साहित्यातील उदाहरणेही दिली आहेत.
आता मिळवून वाचणार आहे.
वाचल्यावर सविस्तर लिहीन.
केकू,
केकू,
विकी लिंक बघितली. इंटरेस्टिंग आहे. 'शोले' त्यांतल्या सर्व निकषांत बसतो.
अशाच प्रकारे सिनेमा (स्क्रिप्ट) लेखनाचेही टप्पे असतात त्याबद्दलची थेअरी मागे वाचल्याची आठवतेय.
सात प्रकारची कथानकं याबद्दल
सात प्रकारची कथानकं याबद्दल ऐकले, वाचलेले आहे. या समजावर काही तरी लिहायचा प्रयत्न केला होता.
पण पसारा लांबायला लागल्यावर सोडून दिला.
वडलांनी सात गोष्टींची एक गोष्ट रचून सांगितली होती, ती थोडी हॉरर होती. आता लक्षात नाही.
कोलाज नावाचे लेखांचे संग्रह
कोलाज नावाचे लेखांचे संग्रह असलेले तीनशे पन्नास पानांचे पुस्तक उषा मेहतांनी काढले आहे. (मजेस्टीक, जानेवारी २०२४). बापट,करंदिकर,पाडगावकर यांचे दोन दोन लेख आहेत. यशवंत देव(मुलाखत), शांताबाई, शिरीष पै, दंडवते पती पत्नी, आणि काही नवे लेखक कवींवर लेख आहेत. साहित्यिकांच्या आठवणी वाचायला आवडत असेल तर वाचा.( बऱ्याच जणांवर अगोदर लेख वाचलेले असतात.)
उषाताईंनी एकदा त्यांचेकडे लेख भांडार उपसले आणि ते एका ओळखीच्यांना वाचायला दिले. त्यांच्या आणि आणखी इतरांच्या पुढाकाराने लेख निवडून संकलित केले. काही लेखांत थोडी भर घातली, काही अप्रकाशित नवीनच आहेत.
प्रवासात वाचायला चांगले पुस्तक.
जाईची नवलकहाणी - अॅलिस इन
जाईची नवलकहाणी - अॅलिस इन वंडरलँड - कॉमेडी प्रकारात बसत असेल का?
रत्नाकर मतकरीन्ची पन्गत
रत्नाकर मतकरीन्ची पन्गत नावाची कथा आहे का कोणकडे? मला माझ्याकडच्या पुस्तकात सापडत नाहिये. मला उद्या एका कार्यक्रमात वाचायची आहे.
सर्व जण जेवायला पंगतीत बसले
सर्व जण जेवायला पंगतीत बसले आहेत आणि अन्न येण्याची वाट पाहात आहेत आतुरतेने असे वर्णन असलेली एक भयकथा वाचल्याचं आठवतंय. पण ती कुणाची ते आठवत नाही. सर्व भुकेले नंतर त्याच्यावरच तुटून पडतात असा शेवट आहे.
हो तीच कथा हवी आहे. माझ्या
हो तीच कथा हवी आहे. माझ्या आठवणीनुसार ती मतकरीण्ची आहे
टवणे सर, त्या कथेचं नाव
टवणे सर, त्या कथेचं नाव 'जेवणावळ' आहे. रत्नाकर मतकरी यांच्या श्रेष्ठ कथा - भाग 2 या संग्रहात ती कथा आहे असं ऑनलाइन दिसलं.
खानावळ असेही दिसते आहे.
खानावळ असेही दिसते आहे.
यू ट्यूब वर कुणी तरी वाचन केले आहे.
https://www.youtube.com/watch?v=Y-SQOk1zs7c
मतकरींच्या वेबसाईटवर
मतकरींच्या वेबसाईटवर फॅण्टास्टिक आणि अजून एका कथासंग्रहात जेवणावळ नावाने ही कथा आहे असं दिसतंय.
मी पण पंगत या नावानेच वाचल्याचं आठवतंय. त्या कथासंग्रहाचं नाव वेगळंच होतं पण. कन्फ्युज्ड.
रत्नाकर मतकरीन्ची पन्गत
रत्नाकर मतकरीन्ची पन्गत नावाची कथा आहे का कोणकडे? मला माझ्याकडच्या पुस्तकात सापडत नाहिये. मला उद्या एका कार्यक्रमात वाचायची आहे. >> विपु बघ
मला "निजधाम" ह्या कथासंग्रहात "जेवणावळ" ह्या नावाने सापडली.
पुस्तक परिचय : गोठण्यातल्या
पुस्तक परिचय : गोठण्यातल्या गोष्टी (हृषिकेश गुप्ते)
मायबोली रॉक्स! अनुदोन,
मायबोली रॉक्स! अनुदोन, मनःपूर्वक आभार तातडीने कथा सुपूर्त केल्याबद्दल.
कथासंग्रह भराभर वाचले जातात
कथासंग्रह भराभर वाचले जातात आणि त्यात दहा बारा गोष्टी असतात. नावं काही लक्षात राहात नाहीत पण थोडं सूत दिलं गुंडा सापडतो. गोष्टींचा कथाभाग दोन चार वाक्यांत आठवतो. मतकरींनी तशा रहस्यमय गोष्टी रंगवून सांगितल्या आहेत. पण गोष्टींचा गाभा अगोदरच माहीत झाला की मजा जाते. गोष्ट भुताची आहे हे अगोदर न सांगितल्यास आणखी रंगते.
@टवणेसर, अभिवाचन करणार आहात?
हो आज रात्री कॅम्पिंगला जाणार
हो आज रात्री कॅम्पिंगला जाणार आहे तिथे वाचणार आहे.
माबोवर चांगल्या भयकथा आहेत का कुणाच्या?
कौतुक शिरोडकरांची झुला किंवा
कौतुक शिरोडकरांची झुला किंवा झोका नावाची एक भारी कथा आहे.
मी William Dalrymple चे The
मी William Dalrymple चे The Golden Road he पुस्तक वाचतोय. जगाच्या इतिहासावर झालेला
भारतीय प्रभाव असा विषय आहे. वैचारिक, भाषा, संस्कृती, गणित, खगोलशास्त्र इत्यादी. पूर्वी सिल्क रोड असे काही नव्हतेच. सर्व व्यापार भारतीय केंद्रित होता.
Interesting.
William Dalrymple ची चार पाच
William Dalrymple ची चार पाच पुस्तकं वाचून झाली आहेत. कोह इ नूर( उजेडाचा पर्वत) हे पुस्तक त्या वेळच्या इतिहासावर उजेड टाकतं. भरपूर संदर्भ देतो तो. हा हिरा कोणाकडे जातो त्यांचं भलं होत नाही ही अंधश्रद्धा नंतर श्रद्धा बनू लागते. शेवटी तो हीरा इंग्लंडची राणी ठेवून घेते. हिऱ्याचे अगोदरचे मालक राजे कायम अंगावर वापरत असत. एका कापडात गुंडाळून दंडावर बांधत. पण राणीने मात्र तो हीरा खजिन्यातच ठेवला.
पैलू पाडलेला हीरा ही आपली कल्पना असली तरी मोघलांना तसं वाटत नव्हतं. तो खाणीत मिळालेला मोठा दगडी रत्न म्हणून बाळगायचे. इतर रत्ने - होती, पोवळे, माणिक, नीळ इत्यादी मात्र सोन्यात जडावून दागिने केले जात होते. या हिऱ्यापेक्षाही आणखी दोन मोठे हीरे- दगड त्यांचेकडे होते पण कोहिनूरला एक विशेष प्रतिष्ठा लाभली. ज्याचेकडे कोहिनूर तो महान राजा.
असो.
वेळोवेळी युद्धे होऊन हिऱ्याची मालकी मोगलांकडून रणजितसिंहाकडे, मग ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीकडे आणि शेवटी ब्रिटिश महाराणीकडे कशी गेली हे वाचायला मजा येते.
शाळेत असताना अशी काही पुस्तकं वाचायला मिळाली असती तर...
The Death of Ivan Ilyich ( इं
The Death of Ivan Ilyich ( इं. अनु.)
लिओ टॉलस्टॉय
गेल्या दोन वर्षात अन्य काही वाचनातून लिओ टॉलस्टॉय यांच्या दोन पुस्तकांचे संदर्भ आले होते. त्यापैकी Anna Karenina या महाकादंबरीचे पहिले वाक्य अजरामर असल्याचे समजले आणि ते खूप आवडले देखील (All happy families are alike; each unhappy family is unhappy in its own way). दुसरे पुस्तक म्हणजे वरील कादंबरीका, जी माझ्या वाचन आवाक्यातील असल्यामुळे त्याची पीडीएफ वाचून काढली.
उच्च न्यायालयातील न्यायाधीश इव्हानच्या सरधोपट जीवनाची ही कहाणी.
व्यावसायिक यश . . संसार व मुलेबाळे . . बायकोबरोबरचे दुरावलेले संबंध आणि एकंदरीत सामान्य मुर्दाड जगणे…. प्रेम आणि नातेसंबंधांतील भ्रामकता. .. या सगळ्यानंतर इव्हानला एक दुर्धर आजार होतो व त्याचे निदान होत नाही आणि इव्हान वेदनेत गुरफटलेलाच राहतो . त्या दरम्यान तो आपल्या आयुष्याकडे तटस्थपणे पहात आतुरतेने मृत्यूची वाट पाहू लागतो.
आता ही कहाणी आध्यात्मिक पातळीवर जाते आणि इव्हानचा त्याच्या आत्म्याशी संवाद सुरू होतो. त्यातून लेखकाचे तत्त्वज्ञान समोर येते. “मानवी जीवन हे मिथ्या आहे, माणसे आत्मा हरवल्याप्रमाणे अर्थहीन जगत राहतात, वगैरे. या उलट मृत्यू हीच एकमेव सत्य गोष्ट आहे. आत्मा हरवलेले माणसाचं जगणं म्हणजे एक प्रकारे मृत्यूच असतो. परंतु मृत्यूनंतर मात्र आत्मा परमात्म्याशी विलीन होतो आणि त्यानंतरच एक प्रकाशमान ‘आयुष्य’ (Life with a capital L) सुरू होते”.
असो. या विषयावर अधिक काही लिहिण्याची माझी पात्रता नाही.
या निमित्ताने टॉलस्टॉय यांच्या लेखनाची झलक प्रथमच अनुभवली.
>>> मानवी जीवन हे मिथ्या आहे,
>>> मानवी जीवन हे मिथ्या आहे, माणसे आत्मा हरवल्याप्रमाणे अर्थहीन जगत राहतात, वगैरे. या उलट मृत्यू हीच एकमेव सत्य गोष्ट आहे. >>
ही स्थिती राज्य पद्धती कोणतीही असो - राजेशाही, समाजवादी, साम्यवादी, हुकुमशाही, किंवा अगदी लोकशाही असो काही लोक अनुभवत असतात.
Happy families सोडून इतरांना { स्वतः च्या} मृत्यूची वाट पाहण्याशिवाय गत्यंतर नसते. तर ते कसे हे लेखक मांडतात.
२० व्यांदा 'दी शॅक' नावाचे
२० व्यांदा 'दी शॅक' नावाचे पुस्तक ऑडीओ रुपात यु ट्युबवरती ऐकले. हे पुस्तक व्हरमॉन्ट मध्ये माझ्या एका मैत्रिणीने सुचविलेले. तिचा विषय होता थिऑसॉफी आणि अर्थातच ख्रिस्टिअॅनिटीमध्ये स्पेशलायझेशन. तिथे मी हार्ड कॉपी वाचली. नंतर १० वेळा सिनेमा पाहीला. अनेकदा ऑडिओ बुकचे पारायण केले.
.
या कथेचा जो नायक आहे त्याचा ईश्वरावरचा विश्वास जवळजवळ, उडालेला आहे. तो गोंधळलेला आहे, दु:खी आहे का ते तुम्हीच वाचा आणि एके दिवशी त्याला पत्र येते की मला या वीकेन्डला भेट. साइन्ड बाय 'पापा'. पापा हे त्याच्या पत्नीचे ईश्वराकरता असलेले संबोधन. आणि मॅक ईश्वरास भेटण्यास जातो. तो भेटतो का? त्याचय मनातील संभ्रम दूर होतो का?
तुम्हीच वाचा.
Roald Dahl ह्या लेखकाला मी
Roald Dahl ह्या लेखकाला मी बाल कथाकार म्हणून ओळखत होतो. त्याची बरीचशी पुस्तके विकत घेऊन वाचली आहेत. टीप = मी YA पुस्तके आवडीने वाचतो. Charlie and the Chocolate Factory, हा त्याच्या कथेवर आधारित सिनेमाही पाहिला होता. ठीक होता.
पन हल्ली मी त्याच्या ज्या काही कथा वाचल्या त्यानंतर माझे मत बदलले. सटल horror, विअर्ड, फुल ऑफ वेन्जंस अश्या ह्या कथा आहेत. लेखकाच्या व्यक्तिगत जीवनात घडलेल्या काही दुःखद घटनांचे पडिसाद असावेत. उदाहरणार्थ ही कथा. मी "ब्रेन इन जार" साठी काही वाचन करत असताना ही कथा माझ्या वाचनात आली.
विल्यम आणि मेरी ह्या दाम्पत्याची कथा आहे. त्यांचे संबंध काही खास प्रेमाचे नसतात. विल्यम डॉमिनेटिंग पती आहे. एकदा तिला तो सिगारेट पीत असताना पकडतो आणि शिक्षा म्हणून तिची पॉकेट मनी काही काळ बंद करतो.
विल्यम मरणासन्न अवस्थेत असताना त्याचा डॉक्टर त्याला "ब्रेन इन जार" ची कल्पना देतो. हो ना करताना अखेर विल्यम स्वतःचा मेंदू जार मध्ये ठेवायला राजी होतो. त्याच्या मृत्युनंतर मेरी त्याच्या मेंदूला भेटायला जाते. विल्यम म्हणजे त्याच्या मेंदूला सर्व काही दिसत असते, ऐकू येत असते पण तो बोलू शकत नाही. या भेटीत काय होते ते तुम्हीच वाचा. मी लिंक देतो आहे.
William and Mary
https://thetafiction.com/story/william-and-mary/
वाचनालयात एक पुस्तक दिसलं -
वाचनालयात एक पुस्तक दिसलं - ढग, लेखक गुप्ते. घेणारच नव्हतो. गुप्तेंची पुस्तकं वाचलीत, आणखी नको. पण नाव ऋषिकेश नाही, विश्राम आहे. नवीन लेखक दिसतोय. चार पाच पानं चाळली आणि शेवटच्या मलपृष्टावर "चेटुक,ऊन आणि ढग या त्रिधारेतील कादंबरी.आत्मशोधक जाणिवांचा प्रवास. काळीजप्रश्न मनात घुमत राहतात." एवढंच. म्हणजे मालिकेतलं तिसरं पुस्तक हाताला लागलंय. बघू पहिले दुसरे भाग नंतर.
लेखकाचं आत्मकथन वाटतंय. दीड वर्षाचा असताना पहिली आई बाबाला आणि त्याला सोडून गेली हे पाच सात वर्षांचा झाल्यावर कळतंय. चिडचिड होतेय. पण त्याच्या दोन वर्षांनी मोठ्या भावाला काही त्रास होताना दिसत नाहीये. त्याने सावरलंय, स्विकारलंय नवीन आईला. पुढे शाळा, कॉलेज, नोकरीत खूप धरसोड.नागपुरातलं एकत्र कुटुंब थोड्या वर्षांनी वेगळं होतंय. पंधराव्या वर्षी त्याला दुरून आईचा ठावठिकाणा कळतो आणि तिला गुपचूप पत्र लिहून इंदुरहून बोलावून घेतो. पहिली आई येणार म्हटल्यावर हा खूप उत्सुक पण बाबा, नवीन आई, काका, काक्या सगळे यावर चिडतात. पण प्रत्यक्षात आई यांचे स्वागत करतच नाही, प्रकाशशीच बोलते आणि याला संभाळ म्हणते. सगळा अपेक्षाभंग, चिडचिड आणि भांडणं होतात. यांच्या हातून काहीच पूर्ण होत नाही. सीए होत नाही, इंग्रजीत बीए एम ए करतो, वकीली शिकतो, गोव्यात वकीली चालत नाही , कम्युनिस्ट वारे शिरतं, झोपडपट्टीत समाजसेवा यातून काम करताना एका डॉक्टरणीशी ओळख होऊन लग्न होतंय. ती याला समजून घेते. भांडतोही तिच्याशी. तिच्या नोकरीमुळे गोव्यात जातो. तिथून सौदी अरेबियात तिला नोकरी मिळते, तिच्याबरोबर जातो. तिकडे काही काम करत नाही. तिकडेही भांडणं आणि वाद. एका मानसोपचारतज्ज्ञाकडे जाऊन उपचार घेतोय. परत आल्यावर कॉलेजात नोकरी मिळते पण याला कोणतंच सपाट काम फार दिवस झेपत नाही. नोकऱ्या सोडतो. पुन्हा एकदा पहिल्या आईच्या भाचीच्या लग्नात आईची भेट होते पण ती अजिबात स्वारस्य दाखवत नाही उलट सल्लेच देते. निराशा पुन्हा. कादंबरीची भाषा सोपी पण तत्वज्ञानाचे डोस हळूहळू दिलेत. छोट्या छोट्या प्रकरणांतून लेखक आपल्या मनातले विचार सांगत जातो. बांधणी पक्की आहे.
मी आतापर्यंत माहितीपर पुस्तकेच अधिक वाचली आहेत तरी हे अशा प्रकारचे वेगळे फिलॉसफिकल पुस्तक वाचायला आवडले. तीन भागातले हे शेवटचे मी अगोदर वाचले, पहिले दोन नंतर वाचून काढेन. एक प्रश्न पडला की हे लेखकाचे आत्मकथन आहे का आपल्या आयुष्यावरच आधारित आहे. विकी पान शोधून माहिती वाचली तर नागपूर गोवा आणि सौदी अरेबियाचा उल्लेख आहे. म्हणजे या सर्व अनुभवांवरच कादंबरी लिहिली आहे. काल्पनिक नाही.
विश्राम गुप्ते नावाच्या
विश्राम गुप्ते नावाच्या लेखकाची मी सगळी पुस्तके अक्षरश: रद्दीत घातली आहेत.
अशक्य बोअरिंग प्रकार आहे.
एक पुस्तक मला भेट मिळाले होते मराठी लेखकासाठी सर्वाइवल गाईड वगैरे. ते मी परत केले भेट देणाऱ्याला.
ढग पुस्तकाच्या शेवटच्या
ढग पुस्तकाच्या शेवटच्या पानावर कुणी वाचकाने शेरा लिहिला होता - Third class book.
मला लेखकाची लेखन पद्धत आणि सिद्धता आवडली. हेच पुस्तक इंग्रजीत असते तर धडाधड आपले असते. मराठी वाचकांना अपेक्षित लेखन नाही. पण हे मालिकेसाठी चालेल.
आम्हीही जगभरातली पुस्तकं
आम्हीही जगभरातली पुस्तकं वाचली आहेत. मी अवरेज मराठी वाचक म्हणून विश्राम गुप्ते आवडत नाहीत असे सांगत नाही. मी अव्हरेज वाचक नाही (तरीही) ते आवडले नाहीत असे सांगत आहे. ते एक आणि अवधूत डोंगरे नामक एक लेखक. हे लोक स्वतःलाच खूप सिरियस घेत असतात आणि फिक्शन लिहत असतात. का कुणास ठाऊक. अर्थात त्यांनी काय करावं त्यांचा प्रश्न. पण थोडेबहुत वाचन असलेला आणि पैसे देऊन पुस्तक विकत घेणारा एक नॉन एवरेज वाचक म्हणून मला त्यांची पुस्तके कमालीची कृतक वाटतात. (अनुवादित नव्हे).
परंतु एखाद्याला ते आवडत असतीलच. ते ओळखीचे असले असते तरीदेखील मी पाठखाजवणीसाठी सुद्धा कौतुक केले नसते.
‘आय ॲम दॅट’ / ‘सुखसंवाद’--
‘आय ॲम दॅट’ / ‘सुखसंवाद’-- पुस्तक अभिप्राय
असंच एकदा ‘आय ॲम दॅट’ या इंग्रजी पुस्तकातील काही इंग्रजी वाक्यं एका विदेशी यूट्यूब चॅनेलवरील व्हिडिओतून ऐकण्यात आली. कुतुहल वाटलं की कोण हे एवढं भारी बोलत आहे? दिसलं की निसर्गदत्त महाराज म्हणून कुणीतरी आहेत, त्यांचे हे विचार आहेत. म्हटलं की असतील कुणीतरी महाराज, असे खूप असतात.
रजनीश, कृष्णमूर्ती, युजीनी, एकहार्ट टॉल, मूजी, थिच नॅथ हन्ह, सत्यनारायण गोयंका, शुनरू सुझूकी, मायकेल सिंगर, ॲलन वॅट्स अशांसारख्या अनेक देशी-विदेशी महाराजांचे विचार ऐकून वाचून माहिती झाले आहेत. सतत नवनवीन स्पिरीच्युअल खाद्य शोधण्याचा मनाला चाळा लागलेला आहे. इलाज नाही. (बाकी, मजल ऐकण्या-वाचण्यापुरतीच. त्या क्षेत्रातला वैयक्तिक अनुभव झिरो आहे, हे मी जे लिहितोय त्यावरून लक्षात येतच असेल.)
अशा पार्श्वभूमीवर या निसर्गदत्त महाराजांचे विचार आणखी काही दिवस आणखी ऐकत राहिल्यानंतर कुतूहलाची तीव्रता वाढली. मग अजून थोडी शोधाशोध केली की कोण आहेत हे? नाव तर अगदीच देशी ('ग्राम्य'!) वाटतंय. कुठल्या राज्यातले असावेत? आणि मूलतः ते कुठल्या भाषेत बोलले असावेत? त्यांची आणखी काही पुस्तकं आहेत काय ?
तर समजलं की त्यांचं मूळ नाव- मारूती शिवरामपंत कांबळी.! म्हणजे चक्क मराठी निघाले ! आश्चर्याचा धक्का.! Goosebumps की काय म्हणतात तसलं काहीतरी.
म्हटलं, अशी कशी उलटी गंगा वाहायला लागली. असा असा एक बुद्धपुरूष आपल्या भाषिक अवकाशात होऊन गेला, आणि आजवर आपल्याला पत्ताच नव्हता. त्यांचं नाव पहिल्यांदा माहिती झालं तेही इंग्रजी भाषेच्या माध्यमातून, हा किती करंटेपणा.!
तर निसर्गदत्त महाराज. एनलाईटन्ड मनुष्य. साधंसुधं शांत निर्मळ जीवन. कुठे कसला आश्रम नाही, बुवाबाजीचा हव्यास नाही, विद्वत्ता पाजळणं नाही, प्रवचनांचा सोस नाही, शिष्य-शिष्यिणींचा बाजार वगैरे असलं काही नाही. धर्म, धर्मग्रंथांचे दाखले, कर्मकांड यांना पूर्ण फाटा.!
तथाकथित व्यावहारिक अर्थानं त्यांचं शिक्षण बेताचंच. उदरनिर्वाहासाठी एक छोटंसं दुकान होतं. तर त्यांच्याकडे लोक यायचे. चिंता, समस्यांबद्दल बोलायचे. महाराज उत्तरं द्यायचे. किंवा उत्तरं त्यांच्या आतून उमटायची. लोकांशी त्यांचा हा प्रश्नोत्तररूपी संवाद घरगुती मराठीतूनच चाललेला असायचा.
मॉरिस फ्रिडमन म्हणून एक पोलंडचे मनुष्य होते. अध्यात्मिक शोधयात्रेदरम्यान ते भारतात आलेले असताना त्यांना महाराजांबद्दल समजलं. आणि ते त्यांना वारंवार भेटत राहिले. महाराज मराठीत काय बोलताहेत, हे तिथे उपस्थित असलेले कुणीतरी फ्रीडमनना इंग्रजीत अनुवाद करून सांगे. फ्रीडमननी या संवादांची महत्ता जाणली. आणि या संवादांचं संकलन/टेप रेकॉर्डिंग करून ते ‘आय ॲम दॅट’ या पुस्तकाच्या रूपानं प्रकाशात आणलं, १९७३ साली. नंतर पुढे या पुस्तकाचा जगभरातील पस्तीसेक भाषांमध्ये अनुवाद झाला.
महाराज मराठीत बोलतानाचे आणि लोक त्यांचा अनुवाद करून सांगतानाचे त्याकाळचे काही व्हिडीओ यूट्यूबवर उपलब्ध आहेत. शोधून शोधून पाहिले. एक थोर तत्ववेत्ता मराठीत बोलतोय आणि त्यांचे ते असाधारण शब्द समजून घेऊन ते भांडार जगापुढे आणण्यासाठी कुणीतरी विदेशी माणूस जीवाचा आटापिटा करतोय, हे दृश्य एक मराठी भाषिक म्हणून अतीव सुखाचं वाटतं. (ईगो सुखावतो म्हटलं तरी हरकत नाही.!)
खाली दोन पुस्तकांचा एकत्रित फोटो टाकलेला आहे. ‘I am that’ हे त्यांचं गाजलेलं इंग्रजी पुस्तक. आणि शेजारी त्याच पुस्तकाचा मराठी अनुवाद म्हणजे- ’सुखसंवाद’!
‘I am that’ हे पुस्तक प्रिंटेड/ पीडीएफ/ ऑडिओ स्वरूपात सहज उपलब्ध होण्यासारखं आहे. पण हे जे मराठी ‘सुखसंवाद’ पुस्तक आहे, त्याचा तपास लावण्यासाठी पुण्यातली एकूण एक छोटी-मोठी दुकानं पालथी घालून झाली. मिळालं नाही. म्हटलं की जुन्या काळी कधीतरी प्रकाशित झालं असेल आणि नंतर आवृत्त्या निघाल्या नसतील. आता मिळणार नाही, म्हणून नाद सोडून दिला. पण नंतर एकदा असाच दगडूशेठ गणपतीच्या समोरच्या इमारतीत एक चांगला टी स्टॉल आहे, तिथे चहा प्यायला निघालेलो. जाताजाता सहज ‘नेर्लेकर बुक डेपो’ नावाच्या एका धार्मिक साहित्य विकणाऱ्या पुस्तकाच्या दुकानात सहज नजर टाकली तर थेट समोरच शेल्फवर ‘सुखसंवाद’ दिसलं. छातीच्या डाव्या भागात रक्ताची छोटीशी उसळी वगैरे. लगेच घेऊन टाकलं. एखादं पुस्तक बघून एखादा ग्राहक एवढा कसा एक्साईट होऊ शकतो, हे त्या दुकानदाराला कळलं नसल्यास तो त्याचा दोष म्हणता येणार नाही.
तर ‘सुखसंवाद’. ६६४ पानांचं पुस्तक. आता कुणाला वाटेल की भावनेच्या भरात वाहवत जाऊन ‘मी नुकतंच कित्ती कित्ती भारी पुस्तक वाचलं’ याची दवंडी पिटायला आलो आहे. तर तसं काही नाही. या पुस्तकाबद्दल खरंतर मला काही बोलायचंच नाही आहे. त्याबद्दल एक शब्दही बोलण्याचा माझा आवाका नाही. अधिकारही नाही. आणि हे खरंच आहे म्हणजे.
जवळपास तीन-साडेतीन महिन्यांपासून मी ते वाचतो आहे. जरूर पडल्यास असावं म्हणून ते नेहमी जवळपास असेल याची काळजी घेतो आहे. आयुष्य आपापलं भलंबुरं चाललेलंच असतं. इतरही काय काय चाललेलं असतं. त्यातून अधूनमधून हे पुस्तक उचलतो. कुठलंही एखादं पान उघडून आत शिरतो. दोन-चार पानं वाचून झाली की विरघळतो. आणि वेगळाच कुणीतरी होऊन बाहेर पडतो. एखाद्या व्यक्तीच्या आतून कुठल्याही प्रश्नासाठी एवढ्या खोलवरची उत्तरं उमटू शकतात.! जगाकडे एवढ्या वेगळ्या पद्धतीनं पाहता येऊ शकतं.! आश्चर्य आहे !
अध्यात्मिक विषयावर इतकं विलक्षण, इतकं स्पष्ट, इतक्या अधिकारवाणीनं तरीही इतक्या विनम्रपणे क्वचितच कुणी बोललं असेल, असं वाटतं. आता उगाच सतत अधिकाधिक वाचत राहण्याचं कंपल्शन, वाचनाची वसवस करत राहण्याची काही गरज नाही, असं वाटतं. आयुष्यभर वाचत-घोळवत रहायचं म्हटलं तरी हे एकच पुस्तक पुरून उरण्यासारखं आहे. वाचावं, पुरवून पुरवून रवंथ करावा, संपलं की पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करावी !
अध्यात्म वाचून ते पटण्याच्या
अध्यात्म वाचून ते पटण्याच्या पलीकडे असल्याने वाचत नाही. म्हणजे मला पटत नाही समजत नाही. सांगणाऱ्याला पटलेलं असतं, त्याला अनुभव येतात. मला नाही. शब्दांचा गुंतवळा वाटतो.
Srd पूर्ण सहमती. अध्यात्म
Srd पूर्ण सहमती. अध्यात्म आणि मी ३६
Pages