मी वाचलेले पुस्तक - ३

Submitted by Admin-team on 20 April, 2022 - 18:19

आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसादांची मर्यादा ओलांडल्यामुळे हा नवा धागा सुरू करत आहे.

इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

साहित्य, वाङ्मय यांना भौतिक उपयुक्ततेच्या तराजूत ठेवून मोजलेलं पाहून गंमत वाटली. हेच माझ्या कामाचं आहे असं म्हटलं असतं तर काही हरकत नव्हती. पण सरसकट कामाचं असं लिहिलंय.

srd, माझ्या गावात ब्रिटिश काळात सोल्जरांचे येणे जाणे होते. बेळगावचा मिलिटरी कँप हे कारण असावे. माझ्या आज्जीच्या व तिच्या वयाच्या इतर स्त्रियाण्च्या तोंडुन गोर्‍या सोजिरांच्या कथा ऐकायला मिळायच्या. Happy

श्री यशवंतराव गडाख यांनी त्यांच्या लहान व तरुणपणी आंबोली-चौकुळ परिसरात घालवलेल्या कालखंडाबद्दल एका दिवाळी अंकात लिहिले होते. ते वाचुन मला माझ्या गावाचा
५०-६० च्या दशकातला इतिहास समजला. तहसिलदाराच्या ऑफिसात जाऊन चिकाटीने उत्खनन केले तर २०० वर्षांपुर्वीपर्यंतचा इतिहास कळु शकतो. देवस्थानाचा वाद निर्माण झाला तेव्हा आंबोलीबाबत असा शोध घेतला गेला. त्यात असे निष्पन्न झाले की आंबोलीत आज राहात असलेले नागरिक
गेल्या १०० वर्षांत इतर गावांतुन स्थलांतर करुन तिथे आले, त्याआधी जे राहात होते त्यापैकी एकच घराणे आज शिल्लक आहे.

साधना ताई
अनमोल ठेवा आहे हा ऐतिहासिक दृष्टीने. एखादे गाव कसे वसले ही माहिती महत्त्वाची आहे.
कै. मुरली खैरनार यांनी शोध कादंबरी लिहिताना असं संशोधन केलं होतं.

इथे कसल्या भारी भारी लेखक/पुस्तकाबद्दल लिहिलं जातंय. Happy

ज्यांना मराठी डिटेक्टिव्ह कथा आवडतात त्यांच्यासाठी सौरभ वागळे ह्या तरुण लेखकाने अल्फा ह्या डिटेक्टिव्ह पात्राला घेऊन 5 पुस्तकं लिहिली आहेत. (मलातरी) वाचताना खिळवून ठेवलं हे नक्की.

भ्रमर
मी ऐसी अक्षरे वर दोन दिवसापूर्वीच ह्या पुस्तकांची लिंक दिली होती.

हो राभु… गावे कशी वसतात हे खुप इंटरेस्टिण्ग आहे.

आंबोलीचे जंगल त्या काळात भौगोलिकदृष्ट्या मानवी वस्तीसाठी अयोग्य होते. . त्यामुळे रामोशी व बेरड या गावचे मुळ रहिवाशी आहेत ही माहिती तहसिलदार ऑफिसाच्या उत्खननात मिळाली Happy

गडाखांच्या लेखाचे स्क्रिनशॉट्स घेऊन ठेवलेत मी. अधुन मधुन वाचते. बरे वाटते.

भाषा : हरवलेल्या . . . गवसलेल्या. . . बहरलेल्या. . .
अरुण नेरूरकर
यंदाच्या जानेवारीत विकत घेतलेले हे पुस्तक आतापर्यंत सहादा तरी वाचून झाले आहे, इतके त्याच्या प्रेमात पडलोय !

पुस्तकात 15 प्रकरणे असून प्रत्येकाचे शीर्षक ‘भाषा आणि ***” या प्रकारचे आहे.
त्या ‘आणि’ मध्ये गूढलिपी, इतिहास, समाज, अस्मिता, भाषांतर, वाङ्मयचौर्य आणि इतर काही पैलूंचा समावेश आहे.

भाषांतर आणि वाङ्मयचौर्यवरचे लेख अप्रतिम आहेत. इंग्रजी साहित्याला मध्यवर्ती ठेवून पुस्तकातले बहुतेक लेखन केलेले आहे. भाषा आणि भाषाभगिनी या लेखातली Tolstoy यांची Anna Karenina आणि सामंत यांची एम टी आयवा मारूची मानसशास्त्रीय तुलना अत्यंत वाचनीय आहे.

या पुस्तकातील प्रतिभावंतांचे काही किस्से आणि भाषाविषयक काही रोचक मुद्दे आतापर्यंत प्रतिभावंतांच्या तऱ्हा आणि शब्दवेध व शब्दरंग या दोन धाग्यांवर चर्चेच्या ओघात लिहून झालेत.

बेळगावचे बेरड हा विषय असलेली दोन पुस्तके( दोन भाग) मी वाचले आहेत. लेखक प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते आहेत. बेरड ही जमातच ब्रिटिशांनी चोर ठरवलेली. स्वातंत्र्यानंतरही त्यांना खूप त्रास होत गेलाच. ( पुस्तकाचं नाव विसरलो तरी नंतर लिहीनच.) हे लोक मराठी आणि कानडी दोन्ही भाषा बोलतात. शिवाय त्यांचे व्यवहार आणि समजूती पक्क्या असतात. भांडणे मुख्यच.

एका गावाचा इतिहास यामध्ये बदलापूर( अंबरनाथ जवळचे) याचा पहिला क्रमांक लागतो. पण ते पुस्तक अजून मला मिळालेले नाही. दुसरे एक जुने पुस्तक रेल्वेला वाहिलेले आहे - लोखंडी रस्त्यावरचे रथ. हेसुद्धा सापडले नाही.
मराठी साहित्यातील बारा रत्ने असं काही नावं असलेले पुस्तक ( लेखक भुस्कुटे?) वाचलं होतं त्यात गोडसेंचा प्रवास आणि ही दोन आहेत. पण पुन्हा नाही सापडले.

छान चर्चा.

'शोध' मधली काही वर्णनं, रेफ्रन्सेस छान आहेत. काही मला बोअर झाली. रिसर्च केलाय हे शब्दाशब्दातून दाखवून कशाला द्यायचं असं वाटलं.

पण इन जनरल, कोणत्याही पुस्तकातल्या अशा नोंदी महत्वाच्या, हे बरोबर.

https://www.maayboli.com/node/86930

ह्या गोनीदांच्या धाग्यावर स्मरणगाथा (मूळ धाग्यात) पवनाकाठचा धोंडी आणि मोगरा फुलला ह्या पुस्तकांविषयी लिहिले आहे.

एका मुंगीचे महाभारत , गंगाधर गाडगीळ.आता दुसरा भाग वाचला. पहिला अजून वाचायचा आहे. मला पूर्वी वाटायचं की हे मराठीचे प्राध्यापक आहेत. पण ते अर्थशास्त्र विषयाचे होते. कॉलेजचे प्राचार्य होते. कॉलेजची इमारत उभारणी त्यांनीच केली. नागपाड्याला मोठ्या जागेत राहात होते. तिकडून कॉलेजमध्ये राहायला आले. ही जागाही मोठी होती. पण नोकरीची दहा वर्षे उरली असता आपट्यांच्या कंपनीत अर्थ सल्लागार झाले. रोटरीचे अध्यक्षही झाले. त्यांचे बऱ्याच मोठ्या उद्योगपतींनी संबंध आले. नंतर बांद्र्याच्या कलानगराप्रमाणे साहित्य सहवास असावा अशी टूम निघाल्यावर यांना कार्यवाह करण्यात आले. ते पार पडले पण कटकटी ही खूप झाल्या. मग या साहित्य सहवासात राहिला गेले तेव्हा ती जागा खूपच लहान वाटू लागली. बरीच पुस्तके आणि कपाटे विकावी लागली. नोकरी चालू असतांनाच त्यांनी अर्थशास्त्राची बरीच पुस्तके लिहिली. अगोदर स्टॅनफोर्डची अभ्यासवृत्ती मिळवून एक वर्ष अभ्यास आणि लेखन केले. परदेशांत खूपच अनुभव मिळाले. त्यांनी साहित्यिकांच्या लेखनाचे परीक्षण करून एक पुस्तक लिहिले त्यावर खूप टीका झाली होती. बऱ्याच मराठी लेखकांशी संबंध आला होता त्यांचे स्वभावविशेषही दिले आहेत.
एका प्रकरणात स्वतः च्या घरच्या कुटुंबाचीही माहिती दिली आहे. एकूण आत्मकथन आवडले.

अंतॉन चेकॉव ची A Happy Ending ही लघु कथा वाचून झाली.

www dot ibiblio dot org वर खजिना हाती लागला आहे. यामुळं कॉपीराईटचा भंग होतो का हे माहिती नाही. पण मग या गोष्टी कधीच वाचून झाल्या नसत्या हे पण खरंय. अस्मिता, छंदिफंदी , टवणे सर आणि काही नियमित वाचकांमुळे या धाग्याची गोडी लागली. त्यामुळं वाचून होतंय. तुम्हा सर्वांना धन्यवाद.

ही कथा एरव्ही अजिबात आवडली नसती, पण मध्यंतरी एकसारख्या कंटेट मुळे काही आवडेनासं झालेलं, त्या पार्श्वभूमीवर या जुन्या काळातल्या कथा खूप आवडताहेत.

ही गोष्ट निकोलाय निकोलायविच "स्टीचकिन" या मध्यमवयीन रेल्वे गार्डची आहे. ज्याचं अद्याप लग्न झालेलं नाही. त्याच्या कडे लग्नाचा प्रस्ताव घेऊन ल्युबव्ह ग्रिगरयाना नावाची (LYUBOV GRIGORYEVNA) एक चाळीशीची लेडी मॅचमेकर येऊन बसलेली आहे. ती लग्नंही जुळवते आणि तिचे बरेच धंदे आहेत ज्याबद्दल सभ्य समाजात कुजबूज असते.

स्टिचकिन तिला आपली आर्थिक परिस्थिती जेमतेम आहे तरीही आपण कुटुंबाला व्यवस्थित सांभाळु शकतो इतका पगार आणि बँकबॅलन्स आहे असे सांगतोय.

ल्युबव्ह त्याला कशी मुलगी हवी हे विचारते.
त्यावार स्टिचकिन " नशिबात असेल तशी " असं उत्तर देतो.

ल्युबव त्याला तरूण मुली सुद्धा मी मिळवून देईन असं सांगते. पण त्याचे पन्नास रूबल्स पडतील हे बजावते.
पन्नास रूबल्स ऐकल्यावर स्टिचकिन हे जास्त नाहीत का असे विचारतो.
त्यावर ल्युबव आता कमी मिळतात, पण पूर्वी शंभर रूबल्स मिळायचे या कामी असे ती सांगते.
ती तिचा व्यवसाय पैशांसाठी करतेय आणि समोरच्या ग्राहकाला त्याप्रमाणे कन्विन्स करतेय.

हुंडा देऊ शकणारे स्थळ पण आहे. पण त्यासाठी एक्स्ट्रा चार्ज लागेल असं ती सांगते.
स्टिचकिन कडून नेमकी अपेक्षा येत नसल्याने ती बोलतं करण्यासाठी त्याला अनेक प्रश्न विचारत राहते.

सरते शेवटी स्टिचकिन सांगतो कि मी स्वतः अर्धे वय उलटून गेलेला असल्याने मला तरूण मुलगी नको.
सौंदर्य हा माझ्यासाठी निकष नाही. बाह्य सौंदर्य टिकणारं नसतं. त्या ऐवजी ती स्वभावाने कशी आहे, तिचे विचार कसे आहेत हे महत्वाचं आहे असं तो म्हणतो.
ती विद्याविभूषित असावी अशीही अपेक्षा नाही, कारण स्टिचकिन स्वतः तरी कुठे विद्वान किंवा प्रकांड पंडीत आहे ?

मुलगी अनेक भाषा , जसे फ्रेंच आणि जर्मन, जाणणारी असावी अशी अपेक्षा ठेवणं गैर नाही, पण बहुभाषिक बायको केली आणि तिला तुटलेलं बटण शिवता येत नसेल तर ?

स्टिचकिनच्या अपेक्षा अगदीच सामान्य पण वास्तववादी आहेत.
या अपेक्षा व्यक्त करता करता शेवटी तो ल्युबव्हला सांगतो कि या अपेक्षा तुझ्याकडून पूर्ण होऊ शकतात.
तिला धक्का बसतो पण तिच्याबद्दल बोलल्याने ती लाजते.

लग्नं जुळवता जुळवता ती स्वतःचं स्थळ विसरून गेलेली. आणि आता कदाचित आपलं लग्नाचं वय उलटून गेलंय हे स्विकारलेली.
समोरच्या मध्यमवयीन इसमाला बघूनही तिच्या डोक्यात हा विचार आलेला नाही.

त्याच्या दृढनिश्चयी स्वभावामुळे, खूपच वास्तववादी अपेक्षांमुळे आणि सच्चेपणामुळे ती त्याचा प्रस्ताव स्विकारते.
एव्हढीच कथा.

पण या कथेत (१८८६) त्या काळात हुंड्याची प्रथा रशियात देखील होती हे समजतं. कमावणार्‍या व्यक्तीचं वय न बघता त्याच्या साठी तरूण मुलींचं स्थळ येणं ही सामान्य गोष्ट असल्याचं समजतं. थोडक्यात या समस्या ग्लोबल होत्या. रशियन समाजाचं चित्रण या कथेत झालंय. एव्हढ्यासाठी आवडली कथा.

>>TRACES: The Memoir of a Forensic Scientist and Criminal Investigator (पॅट्रिशिया विल्टशायर) हे याच कॅटेगरीतलं पुस्तक आहे.

ललिता-प्रिती तुझा प्रतिसाद नजरेतून सुटला होता. आत्ता पाहिला. हे पुस्तक मिळतंय का बघते.

www dot ibiblio dot org यावर पुस्तक शोधायचं कसं? लेखकाचं नाव माहीत असेल तर?

किंडल डिव्हाईस भारतात अॅमेझान वर परत ऊपलब्ध आहे. 7th generation. 16999 किंमत आहे. माझे सध्याचे किंडल घेऊन 7-8 वर्ष झाली. आता त्याची बॅटरी पटकन ऊतरते आहे. कार्ट मधे टाकून ठेवलय. घरी चर्चा करून याच महिन्यात घ्यायच का ते ठरवते.
मधे हे अजिबात मिळत नव्हत तेव्हा नणंद US वरून येताना घेऊन येणार होती.
बरं अजून एक प्रश्न आहे. Kindle unlimited आणी prime reading यात वेगळी पुस्तक मिळतात का ? नाहितर मी prime reading चे पण पैसे भरेन आणी नंतर समजेल की दोन्हीकडे सेमच पुस्तकं मिळतायत

किंडल स्मार्टफोन वर वाचता येतं का ?
मलाही असा सर्च देऊन वाचायचा कंटाळा आहे. हक्काने पैसे भरून वाचायला आवडते.

Kindle मागे का पडलं असे लेख येऊन गेले आहेत.
१. चांगले स्मार्टफोन बाजारात आले. चांगली स्क्रीन वगैरे. एखादं पुस्तक pdf विकत किंवा इतर मार्गाने घेतलं तर ते आपण आपल्या कोणत्याही स्मार्टफोनमधून वाचू शकतो. मोबाईल किंडल ॲपमधून.
२. pdf file किंडलमध्ये उघडते पण डिक्शनरी मिळत नाही. त्यालाही उपाय आहेच. convertio.co या साईटने pdf to mobi file convert करून घ्यायची. ( किंवा epub to mobi) . यात डिक्शनरी येते. मराठीचे फाईल कन्वर्शन बरोबर होत नाही आणि त्याला डिक्शनरीचीही जरूरी नसते. रूट डिरेक्टरी>> android>> data >> Kindle app>> files इथे जाऊन ते पुस्तक तिकडे टाकले की काम झाले. पण ही सोय android 13 मधून गूगलने काढली होती.12, 14, 15 मध्ये आहे.करून पाहा. असं करण्याने वारंटी वगैरे ब्रेक होत नाही. रीतसर आहे.
३. बाकी डोळ्यांना त्रास न होणारी स्क्रीन वगैरे फार गैरसोय नाही कारण इतक्या अंधारात आपण मोबाईल पाहातच नाही.
४. फोनमध्ये वाचून दाखवणारी इ रीडर ॲप्स असतातच. ऐकण्याची सोय.
५. एखादा टॅबलेट असला ( realme, Xiaomi) तर त्यात गूगल प्ले स्टोरची सर्व ॲप्स मिळतातच. Realme मध्ये आहेतच. म्हणजे मोठा स्क्रीनही मिळतोच पुस्तके वाचायला. Pdf वाचणे फारच सोपं.

srd ह्यांच्या वरील पोस्ट शो सहमत.

एक मोबाईल केव्हढी तरी कामं करतो... मोठ्या स्क्रीन साठी लॅपटॉप असतोच.किंवा Tab multi purpose आहे म्हणून बेटर असे वाटते.

srd ह्यांची पोस्ट् बरोबर आहे पण फोनवरुन वाचताना अनेकदा लक्ष विचलीत होते, वॉ अ‍ॅ वगैरे बघितले जाते. त्यामुळे खंड न पडू देता वाचायचे असेल तर किंडल बेस्ट.

Kindle unlimited आणी prime reading यात वेगळी पुस्तक मिळतात का ,<>>>>>> हो, आणि प्राईम रिडींगचे वेगळे पैसे भरायचई गरज नाही. प्राईम अकाऊंट असेल तर त्यातुनच होते. अनलिमिटेडमध्ये मात्र फार पेशन्स ठेऊन पुस्तके शोधावी लागतात.

इंग्रजीतील स्पेलिंगच्या अनास्थेबाबत Does spelling matter? हे Simon Horobin यांनी लिहिलेले पुस्तक 2013मध्ये ऑक्सफर्डने प्रकाशित केलेले आहे. त्याचा जालावर उपलब्ध असलेला विस्तृत सारांश नजरेखालून घातला (https://www.google.co.in/books/edition/Does_Spelling_Matter/81GLV2XHjRYC...).

त्यातील प्रास्ताविक प्रकरण रोचक असून त्यात लेखकाने या विषयाचा चांगला उहापोह केलेला आहे. अचूक स्पेलिंग ही तर अत्यावश्यक बाब आणि निव्वळ स्पेलिंग येणे म्हणजे ज्ञानवर्धन नव्हे, अशा दोन्ही बाजूंवर पुस्तकात प्रकाश टाकलेला आहे. त्यातील काही महत्त्वाचे मुद्दे :
१ . स्पेलिंगची चूक जाहीररीत्या केल्यामुळे अमेरिकेचे माजी उपाध्यक्ष Dan Quayleआणि इंग्लंडचे माजी पंतप्रधान Tony Blair यांच्यावर माध्यमांनी बरीच आगपाखड केली. Quayle यांच्या बाबतीत तर potato या साध्या सोप्या शब्दाच्या स्पेलिंगमधील चुकीमुळे त्यांची राजकीय कारकीर्द देखील उतरणीला लागली. तर ब्लेअर यांनी आपल्या हातून tomorrow या शब्दाचे स्पेलिंग चुकल्याची जाहीर कबुली दिली.

२. ऑनलाइन व्यापाराच्या बाबतीत मात्र स्पेलिंग महत्त्वाचे आहेच. संकेतस्थळामध्ये केलेल्या स्पेलिंगच्या चुकांमुळे संबंधित संस्थळ बनावट असल्याचा संशय ग्राहकांमध्ये निर्माण होतो आणि त्यामुळे प्रत्यक्ष व्यापारावर परिणाम झाल्याची उदाहरणे आहेत.

३. ‘स्पेलिंग बी’ सारख्या प्रतिष्ठेच्या स्पर्धांमध्ये विचारले जाणारे काही शब्द तर अचाट व अतर्क्य असतात आणि त्यांचा पुढे व्यवहारात काडीचा उपयोग होत नसतो. ‘स्पेलिंग हे काही बुद्धिमत्तेचे निदर्शक नव्हे’, असा दृष्टिकोन बाळगणारे लोक या स्पर्धांच्या प्रसंगी जाहीर निदर्शने करतात.

४. इंग्रजी साहित्यिक मार्क ट्वेन यांनी, अचूक स्पेलिंग लक्षात राहणे ही देखील एक नैसर्गिक देणगी असल्याचे म्हटलेले आहे; त्यामुळे प्रत्येकालाच ते जमते असे नाही.

५. इंग्लिशच्या तुलनेत अन्य काही युरोपीय भाषांमध्ये स्पेलिंग आणि उच्चार यांचे गूळपीठ अधिक चांगल्या प्रकारे जमते. इंग्लिशमध्ये या संदर्भात असलेल्या नियमांना कितीतरी अपवाद असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचा घोळ होत राहतो. इंग्लिशच्या स्पेलिंगमध्ये आमूलाग्र बदल व्हावेत अशी मागणी कित्येक व्यासपीठांवरून अनेक वर्षांपासून होत आहे. बर्नार्ड Shaw तर ह्या बाबतीत खूप आग्रही होते आणि त्यांनी त्यासाठी निधी देखील ठेवलेला आहे.

६. परंतु वरील मुद्द्याची दुसरी बाजू लेखकाने पुस्तकात प्रकर्षाने मांडली आहे आणि त्याचे उत्तर इंग्रजी भाषेच्या इतिहासात आहे. इंग्रजीने जगातील अनेक भाषांतील भाषांमधून शब्द स्वीकारलेले असल्यामुळे मूळच्या भाषेशी इमान राखणे आवश्यक ठरले. म्हणून प्रत्येक वेळेस इंग्रजी उच्चार आणि स्पेलिंग यांचे तारतम्य असतेच असे नाही.

* Enough Is Enuf >>
वर मी उल्लेख केलेल्या पुस्तकात असं दिलय की, स्पेलिंगच्या काटेकोरपणा विरुद्ध निदर्शने करणाऱ्या लोकांनी खालील प्रकारचे फलक फडकवले होते :

  • Enough is enuf but enough is too much
  • I am thru with through &
  • I laff at laugh

पुस्तकनाद - जयप्रकाश सावंत
लेखकाने ललित मासिकात पुस्तक गजाली या सदराखाली जे लेख लिहिले होते त्यांचा हा संग्रह. इंग्लिश साहित्य व संबंधित लेखक आणि समीक्षक हा विषय आहे. लॅटिन अमेरिकी लेखकांबद्दल बऱ्यापैकी लिहिलय. त्यातले काहींचे किस्से चांगले आहेत.

1912 पासून अमेरिकेत निघत असलेल्या पोएट्री या मासिकाचा परिचय वेधक आहे. ‘लेखनाची कुजकट समीक्षा’ या विषयावर दोन लेख आहेत. यातून लक्षात येते की जागतिक पातळीवर गाजलेले शेक्सपियर, टॉल्सटॉय, डीकन्स, हेमिंगवे, Whitman आणि इतर अनेक लेखकांपैकी कोणीही यातून सुटलेले नाही.

राज नितीच्या हिंदोळ्यावर- हेमा देवरे
एक स्त्री विदेश सचिव होते तिच्या नजरेतून परराष्ट्र व्यवहार धोरण .. आपल्या देशाला फायदा व्हावा या साठी आखलेल्या योजनांना आकार देणे ; राजदूताचे धावपळीचे आणी ताणतणावाचे जीवन याचा चांगला धांडोळा घेतलाय.
वेगळ्या विषयावर लिहीलेले पुस्तक

The Naturalist (Andrew Mayne)

एका विज्ञान संशोधक विद्यार्थिनीचा जंगलात अभ्यासासाठी गेलेली असताना मृत्यू होतो. पोस्टमार्टेममध्ये दिसतं की हा अस्वलाने केलेला हल्ला आहे. पोलीस हादरतात. जोरदार शोधमोहिम सुरू करतात. आणि अखेर त्या अस्वलाला गाठून ठार मारतात.

आधी पोलिसांना ही खुनाची घटना वाटत असते. त्या संशोधक विद्यार्थिनीचा जुना विज्ञान प्रोफेसर हा पोलिसांचा प्राइम सस्पेक्ट असतो. पोलीस त्याला चौकशीसाठी धरतात. पण पुरेशा पुराव्याअभावी त्याला जाऊ देतात. त्यामुळे प्रोफेसरचा या प्रकरणातला इंटरेस्ट वाढतो. नाहीतर त्याचा त्या मुलीशी आता काहीही संपर्क उरलेला नसतो.

प्रोफेसरचं विज्ञान संशोधक डोकं त्याला स्वस्थ बसू देत नाही. तो इंटरनेटवर या केसशी संबंधित तपशील शोधतो. आपल्या परीने डॉट्स जोडायला लागतो. त्यासाठी लॉजिक, ए.आय., bio-informatics वगैरेची मदत घेतो. त्यातून काही शक्यता समोर येतात. त्या तो पोलिसांना सांगण्याचा प्रयत्न करतो. पण पोलिसांनी एव्हाना अस्वलाला पकडून मारलेलं असल्यामुळे ते याला भीक घालत नाहीत.

पण प्रोफेसर हळूहळू त्या केसमध्ये ओढला जातो. तो एकटा पोलिसांपासून लपूनछपून पण शिस्तीत तपास सुरू करतो. हा तपास पूर्णपणे सायन्सवर आधारित असतो. त्यातून त्याला काय काय सापडत जातं, कोण कोण भेटत जातं, त्यातून कोणती तथ्यं समोर येतात, त्याच्या हातून होणार्‍या खंडीभर चुका, त्यामुळे त्याच्या जीवावर बेतणं, हे सगळं म्हणजे हे पुस्तक.

यातला सायन्स-पार्ट भारी आहे. बर्‍यापैकी जेन्युइन वाटतो. निव्वळ फॉरेन्सिक सायन्स नव्हे तर त्यात इतरही बरंच काय काय आहे. लॉजिकचा वापर तर आहेच. अस्वलाचा नेमका कसा संबंध ते सुद्धा हळूहळू उलगडत जातं. ते सगळं वाचायला मजा येते.
त्या मानाने प्रोफेसरचा survival part काही काही ठिकाणी अति ताणलेला वाटतो. पण निदान दहा गुंडांना लोळवून अंगावर एक ओरखडाही न उठणे इतका अति नाहीये.

रहस्य शेवटपर्यंत टिकवून ठेवलं आहे. सायन्सचा धागाही शेवटपर्यंत आहेच. त्यामुळे मला वाचायला मजा आली.

ललिता-प्रीति धन्स. प्रथमच कुणीतरी चाकोरी बाहेरील अनवट पुस्तकाचा परिचय करून दिला आहे, ही चार पुस्तकांची सिरीज आहे. तुम्ही ज्याचा परिचय करून दिला आहे ते ह्यातले पहिले पुस्तक आहे. तुम्हाला अशा कथांमध्ये रुची असेल तर Greg Egan चे DIASPORA वाचू शकता. त्याने लिहिलेली अजूनही बरीच पुस्तके आहेत.

Pages