Submitted by Admin-team on 20 April, 2022 - 18:19
आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसादांची मर्यादा ओलांडल्यामुळे हा नवा धागा सुरू करत आहे.
इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
जी ए कधी वाचल नाही .. पण
जी ए कधी वाचल नाही .. पण त्याच्या दुर्बोधते विषयी बरची ऐकून आहे. आता कधीतरी प्रयत्न करून बघेन जमेल तसं .
**
गोविंदांच्या स्मरणगाथा विषयी.
https://www.maayboli.com/node/86930
कालच "कोवळे दिवस" - व्यंकटेश
कालच "कोवळे दिवस" - व्यंकटेश माडगूळकर यांचं स्वतःच्या जीवनावर बेतलेले ( आत्मचरित्रपर) पुस्तक (कादंबरी)हा स्टोरीटेल वर कालच ऐकुन संपवलं. आवडलं.
स्वातंत्र्यापूर्वीचा, १९४० नंतरचा काळ. साधारण १६-१८ वर्षांचा तरुण युवक स्वातंत्र्याच्या चळवळीत भाग घेण्यासाठी बाहेर पडतो. इथे त्यांची कामाची पद्धत जरा निराळी आहे. ते दरोडे घालून संपत्ती मिळवून ती स्वातंत्र्य चळवळीसाठी उपलब्ध करून देतात. अर्थात हे कडेकडेने येत राहतं.
कथा सुरु होते तीच अशाच एका दरोड्यानंतर..
मूळ कथानक - त्यावेळी हे स्वातंत्र्य सैनिक किंवा कार्यकर्ते ब्रिटिश सरकार पासून कसे लपून रहात, त्यानिमित्ताने दिसणार गावातील जीवन त्यावेळेस समाज जीवन, प्रतिसरकारे , त्यांच्या मर्यादा, संस्थाने, संस्थानिक, त्यांची स्वायत्तता, स्वातंत्र्यसैनिक तुरुंगात गेल्यानंतर मागे त्यांचा संसारगाडा समर्थपणे सांभाळणारी त्यांची जोडीदारीण्, आपले व्यवहार सांभाळतानाच लपून छपून किंवा मागीलदाराने या चळवळीच्या लोकांना मदत करणारे सामान्यजन ( क्वचित कधी पोलिसही), आणि तरुणाईचे भावविश्व , त्यातील प्रलोभनं - अशा अनेक गोष्टी उलगडत जात राहतं.
शेवट ते चित्रकार न बनता लेखक झाले, आणि लेखक म्हणून त्रयस्थपणे स्वतःच्या पुस्तकांकडे /प्रवासाकडे बघतानाचे स्वगत, पाहिलं प्रेम( की क्रश ??) कधीच विसरू म्हणता विसरता येत नाही असं म्हणतात, प्रत्येक अद्भुत, तरल अनुभूती घेताना त्यांना आकस्मित होणारे तिचे स्मरण या काही गोष्टी विशेष भावल्या.
साधी सरळ सोपी भाषा, गोष्टीवेल्हळता, शब्दचित्रे उभी करण्याची ताकद ही काही अजून जाणवलेली वैशिष्ट्ये.
संदीप खरेंनी वाचनही छान केलंय.
हारुकी मुराकामी यांची एक लघु
हारुकी मुराकामी यांची एक लघु कथा वाचली. कथेचं इंग्रजी नाव On Seeing the 100% Perfect Girl One Beautiful April Morning असं आहे.
किती साधी कथा. अगदी छोटासा जीव असलेली साधारण दीड दोन पानाची कथा. अनुवादित कथेत तरी अलंकारिक भाषा नाही. कधी कधी वाईट वाटतं भाषा न शिकण्याचं. कदाचित मूळ भाषेत अनेक सौंदर्यस्थळं असतील.
नरेशनची शैली विलक्षण आहे. कथा प्रथमपुरूषी आहे.
फक्त नायक / निवेदक एका रस्त्यावरून एका मुलीच्या समोरून जातो आणि त्याला असं वाटतं कि ही मुलगी आपल्यासाठी सर्वात योग्य जोडीदार आहे.
तो आपल्याशी गप्पा मारतो, तसाच मित्राशीही गप्पा मारतो.
ती सुंदर आहे का ? तर नाही.
चारचौघीत उठून दिसतेय का ? नाही.
तिचे कपडे अद्वितीय आहेत का ? नाही.
उलट ती झोपेतून उठून आल्यासारखे तिचे केस आहेत.
तिचं नाक कसं आहे हे ही नायकाला लक्षात नाही.
खरं तर ती कशी दिसते हेच त्याच्या लेखी महत्वाचं नाही, तरीही त्याला ती योग्य वाटली.
ती तरूणही नाही. मुळात तिला मुलगी म्हणता येईल असंही नाही.
ती तिशीची आहे.
अशी प्रस्तावन झाल्यावर लेखक नायकाच्या मनातली घालमेल मांडतो.
तिच्याशी बोलायचं काय निमित्त काढावं ?
" एक्स्क्युज मी, माझ्याशी बोलण्यासाठी अर्धा तास वेळ काढू शकशील ?"
पण हे त्याला विमा एजंटसारखं वाटतंय. त्याला अनेक बहाणे सुचतात, पण ते बहाणे त्याचे त्यालाच पटत नाही.
शेवटी असं वाटतं कि सरळ मला तू आवडली आहेस हे सांगून टाकावं का ?
पन तिला नाही आवडलं तर ?
ही उलघाल चालू असताना त्याला एक गोष्ट आठवते.
ही गोष्ट मी इथे सांगत नाही. पण त्याने ती गोष्ट सांगू नये असं वाटतं.
कारण या गोष्टीतल्या गोष्टीने या कथेला उलटं पालटं करून टाकलं आहे.
एखाद्याची निवेदनाची शैली किती अद्भुत असावी ?
कथेची शैली, घाट किती विलक्षण असावा...
नसू देत सौंदर्यस्थळं, नसू देत अलंकारिक भाषा....
कथा सांगण्याची ही पद्धत मंत्रमुग्ध करून गेली.
असेना का लहानशी , छोटुकली कथा.
मिळवून वाचाच... !!
या एकाच कथेवर जर निरनिराळ्या दिग्दर्शकांनी सिनेमे, शॉर्ट फिल्म्स बनवल्या तर कशा असतील हे इमॅजलं.
सत्यजित रे, कुंदन शहा- अजिज मिर्जा -सईद मिर्जा आणि एक पॉप्युलर फिल्ममेकर जसा करन जोहर.
मका ह्या कथेची आठवण झाली.
मका ह्या कथेची आठवण झाली.
White Nights by Fyodor Dostoevsky
भंसालीचा पिक्चर होता.
माझ्याकडे जि एंची काही
माझ्याकडे जि एंची काही पुस्तके आहेत. त्यांचे वर्णनकौशल्य व भाषाकौशल्य निर्विवाद आहेच पण पात्रांच्या नशिबी किती ते दु:ख घालावे. function at() {
[native code]
}इशय निराशावादी लेखन आहे.
एक कथा वाचली. लोकांना पुज्य नवर्याने आयुष्यभर
बायकोला जळत ठेवले आणि तो गेल्यावर हिला कळते की त्याने हिच्या बहिणीला, मुलाला, दिराला हिच्याबद्दल वाईट सांगुन तोडले व त्यातही स्वतःचा उदोउदो करुन घेतला. कथेची मांडणी मनाला भिडते पण वाचताना इतकी विषण्णता येते की पुढे दुसरे काही वाचताच येत नाही. असो. अधुनमधुन त्यांचे साहित्य मी वाचते.
वाचन करायची खुप ईच्छा आहे पण
वाचन करायची खुप ईच्छा आहे पण विकत घेतलेले सर्व वाचुन झालेय. नविन विकत घ्यायची ईच्छा नाही, तितकी इन्वेस्टमेंट करायला मन आता धजत नाही. गावात एकमेव शासकिय ग्रेड ब ग्रन्थसंग्रहालय आहे. त्यात १०,००० च्या वर पुस्तके आहेत. ती आणुन नेटाने वाचतेय. त्यातुन इतकेच कळतेय की कसलीही आकर्षक किंवा ओरिजिनल कथा नसलेल्या कथा/कादंबर्यांची २००-२५० पाने लिहु शकणारे ढिगानी लेखक महाराष्ट्रात आहेत आणि मुद्रितशोधक हे पदच ज्यांच्या ऑफिसात नाही असे ढिगानी प्रकाशकही आहेत. मायबाप महाराष्ट्र सरकार आहे ज्याने गावोगावी अशी ग्रंथसंग्रहालये उघडुन लेखक-प्रकाशक व प्रत्येक संग्रही तिन चार कर्मचारी यांच्या पोटापाण्याची सोय केलेली आहे. बाकी गावात वाचन करणारी तीच ती चारपाच नावे तिथल्या वहित रोज लिहिली जातात. माझ्यासारखे अजुन चारपाच रिकामटेकडे गावात आहेत. बाकी गावाला वाचायला वेळ नाही
एक सुंदर पुस्तक तिथे मिळाले.
एक सुंदर पुस्तक तिथे मिळाले. लोकगंगा - महाराष्ट्राच्या लोककला आणि लोकनृत्ये हे सदानंद राणे लिखित डिम्पल् पब्लिकेशनचे रु १००० चे पुस्तक आहे. आत रंगीत फोटो असल्याने किंमत वाढलेली आहे. लेखक कथक मास्टर आहेत आणि गेली ३५ वर्षे नृत्यासंबंधीत विविध कार्यक्रम व कार्यशाळा करत आहेत.
या पुस्तकात महाराष्त्रातील विविध लोककला, लोकनृत्ये व आदिवासी कला यांची फोटोसहीत माहिती आहे. या विषयात रस असणार्यांनी संग्रही ठेवावे असे हे ३१३ पानी पुस्तक आहे.
मराठीतले नवीन लेखक मालिका
मराठीतले नवीन लेखक मालिका लिहिण्यात गुंतलेले आहेत. तिकडे पैसे मिळतात. श्रेय यादीत त्यांचे नाव आले नाही तरी त्यांना काही फरक पडत नाही.पूर्वी जे काही लेखक चांगल्या नोकऱ्या धरून होते त्यांनी सावकाश चांगले साहित्यिक लेखन केले होते. टीवी माध्यम यायचे होते त्यामुळे वाचकांचा भर पुस्तके वाचण्यावरच होता.
मध्यंतरी सॉमरसेट मॉम यांची
मध्यंतरी सॉमरसेट मॉम यांची दोन पुस्तके आंतरजालावर पीडीएफ स्वरूपात वाचली :
<
पहिले पुस्तक हे एक प्रकारे लेखकाची खरडवही आहे. दैनंदिन जीवनातील असंख्य गोष्टींच्या नोंदवहीत केलेल्या टिपणांना पुढे पुस्तकस्वरूप दिले आहे. त्यातली अनेक वाक्ये अवतरणासमान आहेत आणि त्यातल्या काहींची जंत्री खरडवहीतील ‘भेळ’ ! या धाग्यावरील प्रतिसादात पूर्वी केलेली आहे.
दुसरे पुस्तक हे लेखकाचे आत्मकथन आहे. अर्थात रूढ अर्थाने ते आत्मचरित्र नव्हे, परंतु स्वतःच्या प्रदीर्घ लेखन-आयुष्याचा आलेख वाचकांसमोर मांडलेला आहे. मॉम हे बहुआयामी लेखक होते. त्यांनी आपल्या साठ वर्षांच्या लेखन कारकिर्दीत अनेक साहित्य प्रकार हाताळले. त्यामध्ये कादंबरी, लघुकथा, नाटके व नाट्यशास्त्र, निबंध, समीक्षा, चित्रपटलेखन आणि टीव्हीवरील गुप्तहेर कथा अशा अनेकविध प्रकारांचा समावेश आहे.
पुस्तकात या सर्व लेखन प्रवासाबरोबरच सखोल असे आत्मचिंतन देखील आहे. त्यांनी स्वतः इंग्लिश, फ्रेंच व इतरही काही भाषातील साहित्य वाचलंय. स्वतःच्या लेखनाच्या बळावरच दिगंत कीर्ती आणि अलोट संपत्ती मिळवल्यानंतर या लेखकाला काही मूलभूत प्रश्न पडलेत, जे त्याने मनमोकळेपणाने वाचकांसमोर मांडलेत. जसे की,
“खरंच आपण का लिहितो? जगात एवढे दैन्य दुःख आणि असंख्य समस्या लोकांना ग्रासत असताना त्यासाठी आपण प्रत्यक्ष काही करतो का? आपण जे लिहितोय त्याचे महत्त्व स्वतःखेरीज अन्य कुणाला तरी असते का??”
त्यांनी त्यांच्या परीने ईश्वराचा शोध घेण्याचा देखील बराच प्रयत्न केला होता परंतु त्यांना काही तसे पुरावे मिळू शकले नाहीत. म्हणून आयुष्याच्या अखेरीस ते स्वतःला अज्ञेयवादी म्हणून घेतात. हे लेखक मुळात वैद्यकीय डॉक्टर. वैद्यकीय शिक्षण घेताना गुरुजनांकडून ज्या काही मूलभूत सूचना मिळाल्या त्या वैद्यकालाच नव्हे तर आपल्या आयुष्याला देखील लागू होतात हे देखील त्यांनी लेखनाच्या ओघात नमूद केलेले आहे.
ही दोन्ही पुस्तके लेखकांसाठी मार्गदर्शक ठरावीत.
या तिन्ही पुस्तकांचे मराठी
या तिन्ही पुस्तकांचे मराठी अनुवाद झाले आहेत.
>>>
तीनही अनुवाद समकालीन प्रकाशनाचे आहेत. पूर्वी वेगळ्या प्रकाशनाने हे अनुवाद प्रकाशित केले होते. पण आमच्याकडे त्यावर कॉपी एडिटिंगचं पुन्हा बरंच काम केलं गेलं.
बाकी, आज या धाग्यावर चिकवाहून
बाकी, आज या धाग्यावर चिकवाहून जास्त नव्या पोस्टी आल्याचं दिसलं.
या धाग्यामुळं पुन्हा एकदा
या धाग्यामुळं पुन्हा एकदा थांबलेलं वाचन सुरू झालं.
एकाग्रतेची समस्या अजूनही आहे. पण कदाचित नेटाने ठरवलं तर दूर होईल.
वाचन करायची खुप ईच्छा आहे पण
वाचन करायची खुप ईच्छा आहे पण विकत घेतलेले सर्व वाचुन झालेय...>> कदाचित तुम्हाला आधीच माहिती असेल. स्टोरीटेल अँप वरती तुम्हाला पुस्तके वाचायला नाही तरी ऐकायला मिळू शकतात.
त्यांनी त्यांच्या परीने
त्यांनी त्यांच्या परीने ईश्वराचा शोध घेण्याचा देखील बराच प्रयत्न केला होता..>>>
The Razor's edge या पुस्तकात त्यांनी बऱ्यापैकी ह्या गोष्टींचा आढावा घेतलाय. ते काही काळासाठी भारतात जाऊन राहिले होते. आणि तिथे त्यांनी भारतीय महर्षींच्या मार्गदर्शनाखाली(?) त्याचा अभ्यास/ शोध घेतला.
Amitav , मी दिलेले पुस्तक
Amitav , मी दिलेले पुस्तक वाचले की नाही अजून?
*त्यांनी भारतीय महर्षींच्या
@ छफ,
*त्यांनी भारतीय महर्षींच्या मार्गदर्शनाखाली >>> होय, ते रमण महर्षी.
यासंबंधी पूर्वी अन्यत्र वाचले होते. 'द समिंग अप'मध्ये सुद्धा भारतासंबंधी ७-८ पानी विस्तृत मजकूर आहे. त्यात काही सुरस आणि चमत्कारिक गोष्टींचा देखील उल्लेख आहे.
यासंबंधी पूर्वी अन्यत्र वाचले
यासंबंधी पूर्वी अन्यत्र वाचले होते. 'द समिंग अप'मध्ये सुद्धा भारतासंबंधी ७-८ पानी विस्तृत मजकूर>> ओके . Thank you
मिळाल्या PDF.
https://archive.org/details/in.ernet.dli.2015.135179
Writers notebook
https://archive.org/details/in.ernet.dli.2015.460936
The summing up
Writers notebook, आणि The
Writers notebook, आणि The summing up दोन्ही लिंक्स उघडून पाहिल्या. Scanned pdf नसून editable pdf आहेत. छान. पहिलीच प्रिंट फारच स्वच्छ आहे. बघू वाचेन नंतर. शब्दार्थ पाहायला सोपे पडते.
सोमरसेट सारखे लेखक भाषा सोपी साधी लिहितात आणि चांगलं समजावतात.
* साधी लिहितात आणि चांगलं
* साधी लिहितात आणि चांगलं समजावतात. >> +११
इथे उल्लेख आल्यामुळे उत्सुकता
इथे उल्लेख आल्यामुळे उत्सुकता वाटल्याने मी Working Stiff: Two Years, 262 Bodies, and the Making of a Medical Examiner हे पुस्तक आणून वाचले. न्यूयॉर्क सिटीमध्ये ९/११च्या आधी दोन महिने फोरेन्सिक पॅथॉलॉजिस्ट म्हणून रुजू झालेल्या डॉ. Judy Melinek आणि त्यांचे पती T. J. Mitchell यांनी हे पुस्तक लिहिले आहे. आत्महत्येपासून ते खून/हत्याकांड, चित्रविचित्र अपघातांमुळे मरण पावलेल्या अडीचशेच्या वर बॉडीज च्या ऑटोप्सी त्यांनी केल्या. डॉ. ज्यूडी यांच्या डॉक्टर वडीलांनी आत्महत्या केली होती. त्यामुळे आत्महत्या केलेल्यांच्या बॉडीजच्या ऑटोप्सीबद्दल लिहिलेले जास्त भिडते. The body never lies - डॉ. ज्यूडी म्हणतात. विशेषतः खुनांच्या बाबतीत प्रेतावर दिसलेले, नजरेतून सुटलेले डीटेल्स कसे खर्या खुन्यापर्यंत पोचवतात याच्या काही इंटरेस्टींग केसेस आहेत. याव्यतिरिक्त ९/११चे भयाकारी अनुभव आहेतच.
पुस्तकात मेडीकल क्षेत्रातले शब्द खूप प्रमाणात वापरले आहेत त्यामुळे मधे मधे कंटाळा येतो. समजून घेण्यासाठी पुनःपुन्हा ते भाग वाचावे लागले. तसंच रक्ताळलेली, किळसवाणी वर्णनेही आहेत. पण एकंदरीत संपूर्णपणे अपरिचित अशा या कामाबद्दल वाचायला मिळाले.
>>>>>माझ्याकडे जि एंची काही
>>>>>माझ्याकडे जि एंची काही पुस्तके आहेत. त्यांचे वर्णनकौशल्य व भाषाकौशल्य निर्विवाद आहेच पण पात्रांच्या नशिबी किती ते दु:ख घालावे. function at() {
[native code]
}इशय निराशावादी लेखन आहे.
खरे आहे त्यांचा तो यु एस पी च आहे. दैववाद. नियतीवाद.
*The body never lies ->>> +११
*The body never lies ->>> +११
"Dead men tell tales ! "
सामो, वर्षा, कुमार सर.
सामो, वर्षा, कुमार सर.
छान पोस्टस. काही पुस्तकांचे रेको घेतले आहेत.
जी एं चं एक कुठलं तरी पुस्तक वाचायचा खूप प्रयत्न केला होता. पण खूप वेळा वाचूनही त्यातल्या कथेतला जिस्ट चिमटीत पकडता आला नाही. आता पुस्तकाचे नाव लक्षात नाही. कुणी जर जी एं बद्दल लिहीलं तर माझ्यासारख्यांना एक दालन खुलं झाल्याचा आनंद होईल.
सध्या साध्या सोप्या कथा वाचायला सुरूवात केली आहे. सोप्पं लिहीणं किती अवघड अस्सं झालंय.
हा धागा पुन्हा वाहता झालेला
हा धागा पुन्हा वाहता झालेला दिसल्याने खूप आनंद झाला. वरती पारवाचा उल्लेख झाल्याने पुन्हा पारवा वाचले.
माझ्यासाठी जी ए एक पुस्तकांच्या बरोबर केलेल्या प्रवासातला न विसरता येण्यासारखा पडाव आहे. आता जीएंच्या कथांमधले स्टिरीओटाइप्स खटकतात. कधी कधी काही वर्णने बोअर होतात. पण एकूणात त्यांच्या कथा या खोल कुठेतरी रुतलेल्या आहेत. तीच गत नेमाड्यांच्या कादंबर्यांची. त्या पुन्हा वाचताना अनेक ठिकाणी बोचल्या. पण त्यांची साथ कधी सुटणार नाही. यात साहित्यिक मुल्ये वगैरेच्या पलिकडे जाऊन बहुतेक सिगरेट/दारुच्या व्यसनाप्रमाणे काहितरी इरॅशनल आहे.
नेमाडे, जीए, पेंडसे मला माझ्या आता नसलेल्या वडिलांबरोबर पुन्हा भेटवतात. ते 'अमूल्य' आहे.
जीएं वरचे नवीन मायबोलीवरचे काही धागे:
https://www.maayboli.com/node/83099
https://www.maayboli.com/node/48150
वर्षा, परिचय आवडला.
वर्षा, परिचय आवडला.
TRACES: The Memoir of a Forensic Scientist and Criminal Investigator (पॅट्रिशिया विल्टशायर) हे याच कॅटेगरीतलं पुस्तक आहे. ऑटोप्सीजची थेट वर्णनं नाहीत, पण जंगलात वगैरे (आऊटडोअर्स) डेड बॉडीज सापडतात तेव्हा कशी शोधाशोध केली जाते, खुन्याचा माग कसा काढतात ते सांगितलं आहे. त्यामागचं एका विशिष्ट कॅटेगरीचं सूक्ष्मविज्ञान (पोलनशी संबंधित) तपासकामासाठी वापरण्याची सुरुवात या लेखिकेने केली.
छंदीफंदी धन्यवाद… मला वाचायला
छंदीफंदी धन्यवाद… मला वाचायला आवडते, ऐकायला कितपत आवडेल कल्पना नाही. तरी प्रयत्न करते, एका महिन्याची वर्गणी भरुन बघते. ऐकण्यात फायदा हा की येताजाता, कामे करता
ऐकता येते.
काही लेखक कादंबऱ्यांतून त्या
काही लेखक कादंबऱ्यांतून त्या वेळच्या समाजाचे चित्रण करून ठेवतात. हेच कामाचं आहे. साहित्यिक मूल्ये किंवा वैशिष्ट्ये, शैली नसली तरी काही बिघडत नाही असे वाटते. आपण एखाद्या गावात, शहरात दहा पंधरा वर्षे घालवतो. तिथे काही प्रथा असतात, समाज ठराविक प्रकारे विचार करतो ते आपण पाहतो आणि अनुभवतो पण हे नेहमीचेच म्हणून दुर्लक्ष करतो. तरीही कुणी नोंदवतो व पुढच्या पन्नास वर्षांत तो इतिहास ठरतो.
१९७०-९० काळांत मी कित्येक
१९७०-९० काळांत मी कित्येक वयस्कर लोकांना " तुमच्या तरुणपणात कुणी ब्रिटिश पाहिले होते का? ते काय करत असत? आपली सामान्य प्रजा काय करत होती? वगैरे विचारत असे. परंतू काहीच कळले नाही. नंतर काही पुस्तके वाचताना या गोष्टी समजू लागल्या. मालगुडी डेज हे त्यातले एक.
* सोप्पं लिहीणं किती अवघड >>
* सोप्पं लिहीणं किती अवघड >> +१
. .
* काही लेखक कादंबऱ्यांतून त्या वेळच्या समाजाचे चित्रण करून ठेवतात. हेच कामाचं आहे. >> +१
The summing up मध्ये मॉमनी ब्रिटिश व अमेरिकी लोकांची केलेली तुलना रोचक आहे.
युरोपातील भिन्न प्रदेशांमधून स्थलांतर होऊन अमेरिकेची निर्मिती झाली. त्यानंतर त्यांच्या संकरातून निर्माण झालेल्या पुढील पिढ्यांमध्ये त्या सर्वांचे गुण एकत्रित झाले. मॉमना असे लोक हे 'शुद्ध' ब्रिटिशांपेक्षा अधिक चांगले वाटले होते !
… मला वाचायला आवडते, >> खरं
… मला वाचायला आवडते, >> खरं तर मलासुध्दा तेही सध्या पुस्तक रूपात. पण उपलब्धता हा मुख्य मुद्दा आड येतो.
ऐकण्यात फायदा हा की येताजाता, कामे करता
ऐकता येते.>>> तो एक फायदा आहेच.
Pages