मी वाचलेले पुस्तक - ३

Submitted by Admin-team on 20 April, 2022 - 18:19

आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसादांची मर्यादा ओलांडल्यामुळे हा नवा धागा सुरू करत आहे.

इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

>> अभिनिवेश पाहिजे असेल तर लेक्चर ऐकायची तयारी ठेवा. <<

मी जरा गांभीर्याने लिहितो. अभिनिवेश म्हणजे आव नव्हे. आव आणून लिहिणारे लोक फसतात. लेखकाने स्व:तचे काहीतरी स्वतंत्र पकडलं पाहिजे. त्याने त्याला जो अधिकार मिळतो त्या अंतर्गत त्याने लेक्चर दिले तरी ते ऐकायला तयार आहे. नेमाडे आव आणून लिहितात, म्हणून मला ते तुकड्या तुकड्यातच आवडतात. मी त्यांचा फॅन होऊ शकत नाही. मात्र विलास सारंग पाहा.

(मानवेंद्रनाथ!) रॉय,

त्याच्या प्रतिसादांवर तिरकस प्रतिसाद द्यावेत का असेही मला अधून मधून वाटते >>
देत चला.! हम इक उम्र से वाकिफ़ हैं, के लुत्फ़ क्या है मेरे मेहरबाँ, सितम क्या है ।

कारण त्याला उचकवता आले तर अजून लिहील तरी असे वाटते.>> हा हा!
गए थे नमाज़ छुड़ाने, रोज़े गले पड़ गए..!

बाई द वे, वरचे प्रतिसाद बघता एक अधिकचं स्पष्टीकरण देणं गरजेचं आहे असं वाटतं. कळीकाळ बाकी काहीही असेल, काफ्काएस्क अजिबातच नाहीये. यात ॲबसर्डीजम नाही किंवा अस्तित्वजन्य प्रश्नांनी विकल झालेलंही कुणी नाही.
मुख्य पात्रासहीत इतर पात्रंही उलट मिळून-मिसळून वावरत राहताना दिसतात सगळीकडे. ह्युमरही जागोजागी आहे, आणि कुजकट नसून स्वच्छ मनमोकळा आहे.
तर ते जे 'एकटं वाटण्याचं' म्हटलेलं ते केवळ अशासाठी की वाचत असतानाचा सलग वेळ नजरेसमोरून काहीतरी इंटरेस्टिंग घटना/जीवनपट सरकत होता, आणि आता तो संपून गेला. आता काय करायचं?? वाचत असताना जो अस्तित्वाचा बोजा थोडा मागं हटलेला होता, तो वाचून संपल्याच्या क्षणी पुन्हा जोरकसपणे प्रकट झाला.‌ एवढंच.

आणि ते पुस्तकाचा अक्षरनामा वरील अंश वाचून पूर्ण पुस्तकाबद्दल निर्णय करणं घाईचं ठरेल. 'खादिल्याची गोडी देखिले नाही', हे ही खरं ठरण्याची (एक बारीकशी का होईना) शक्यता गृहीत धरायला हरकत नाही या केसमध्ये. Happy

बाकी, अस्मिता यांच्या प्रतिसादांबद्दल आपण जे बोललात त्यास अनुमोदन.

नेमाडेंना शिव्या घालायच्या पण एकदम स्वामी-मृत्युंजय लेव्हल नाही अश्यांची रंगनाथ पठारे, विलास सारंग, किरण नगरकर अशी एक 'वेगळी' टेस्ट आहे Happy

अभिनिवेश म्हणजे आव नव्हे. आव आणून लिहिणारे लोक फसतात. लेखकाने स्व:तचे काहीतरी स्वतंत्र पकडलं पाहिजे. त्याने त्याला जो अधिकार मिळतो त्या अंतर्गत त्याने लेक्चर दिले तरी ते ऐकायला तयार आहे. >>>> ह्याला अगदी अनुमोदन !!

धन्यवाद रॉय आणि संप्रति, माझ्या पोस्टींसाठी कुणी माबोवर येतं वाचून एकदम समाधान वाटलं. Happy

काहीतरी ड्राईव्ह हवा, स्वतंत्र पकड हवी याला शेकडो अनुमोदन. तो ड्राईव्ह, ती ऑथेंटिसिटी अंतराग्नीने धगधगती असायला हवी. थंड- तटस्थ नकोच, काहीतरी ऊर्मी, ऊर्जा हवी. त्यानेच लेखनाला धार येते.

केकू, मला तुमची पोस्ट कालबाह्य आणि ऊर्मी दाबून ठेवण्याकडे कल असणारी वाटली. ते नम्रबिम्र वाटत नाही, कसलेही डेप्थ नसलेले लेखन 'प्रांजळ' म्हणायची पद्धत आहे आपल्याकडे, पण ती शुद्ध पळवाट आहे. The polite culture वर तर माझा विश्वासच नाही, एक नंबरचे दांभिक (आणि इमोशनली सप्रेस्ड) कल्चर आहे आपले. निसर्गाचा आवेग असतो हा आणि निसर्गालाच आपल्यातून व्यक्त व्हायचं असतं. त्याला ठरवू द्यावे. सगळे एकसारखे व्यक्त होऊच शकत नाहीत, प्रत्येक जण फक्त 'आपापले' असे रंग दाखवणारच आणि तेच वास्तवाला धरून आहे. कुठल्यातरी 'फेक' पोलाईट कल्चरसाठी स्वत्वाला गमावू नये.

माझं म्हणाल तर - I would rather be rude than inauthentic ! Happy तसेच लिहिणारे मला आवडतात, ते पटायला हवं असं अजिबात नाही पण ते त्या माणसाच्या मुशीतून आलेलं सत्य हवं. नंतर ते सत्य बदलले तरी चालेल पण त्या क्षणापुरतं ते १००% आरस्पानी आणि लखलखणारं हवं.

मला काय म्हणायचे आहे ते मी सांगण्याच्या ऐवजी मी काही पुस्तके रेको करतो ती सावकास्शीने वाचा.
The trial by Franz Kafka
Nineteen Eighty-Four George Orwell
The Plague by Albert Camus
everything written by hemingway. His Iceberg style of writing.
केकू, मला तुमची पोस्ट कालबाह्य आणि ऊर्मी दाबून ठेवण्याकडे कल असणारी वाटली>>> ठीक आहे पण मी रेको केलेली ही पुस्तके कालबाह्य झालेली नाहीत. तुम्ही तर रामायण महाभारत Shakespeare dickens Hugo ला ही कालबाह्य कराल.
तुम्हा लोकांसाठी विवेक अग्निहोत्री चे सिनेमेच ठीक. भरपूर अभिनिवेशाने भरलेले. तुम्ही वर्णन केलेल्या सगळ्या क्वालिटी वर सही सही उतरणारे. परखड निर्भीड काहीतरी ड्राईव्ह असलेले , स्वतंत्र पकड असणारे . तो ड्राईव्ह, ती ऑथेंटिसिटी अंतराग्नीने धगधगती असणारी. अगदी अगदी. मी वर रेको केलेल्या पुस्तकात हे असे काहीही नाहीये हो. So sad!
Enjoy.

>> नेमाडेंना शिव्या घालायच्या पण एकदम स्वामी-मृत्युंजय लेव्हल नाही अश्यांची रंगनाथ पठारे, विलास सारंग, किरण नगरकर अशी एक 'वेगळी' टेस्ट आहे <<

टवणेजी सर,
मला फक्त विलास सारंग आवडतात. पठारेंचा अतिशय सूक्ष्म असा सरंजामी फ्लेवर असतो. म्हणजे अगदी सातपाटील मधे ९६ कुळ्यांची बरीचशी मिजास जरी त्यांनी जिरवली असली तरीही त्यातही एक अत्यंत बारीक असा सरंजामी अभिमान आहे. तो लेखकाकडंन आलेला आहे. विलास सारंगानी सगळीच पोल खोल केली आहे. आणि मला ते आवडण्याचे कारण म्हणजे हा माणूस भटका आहे. कुठेतरी तिकडे मध्यपूर्वेत नोकरी करत होता, अमेरिकेत शिकला त्यामुळे साचेबंद असे काहीच नव्हते. अर्थात त्यांचे लेखन कधी कधी उगाच एक्सपेरिमेंटल होते पण त्याचाही वैयर्थ त्यांना नंतर कळत होता. त्यांनी नॉन फिक्शन सुद्धा खूप चांगले लिहिले. एकंदरीत odd man out.

बाकी किरण नगरकर आपल्याला कधी आवडले नाहीत आणि आवडू शकणार नाहीत. एक्चुअली प्रशांत बागडांनी लोकसत्तेत नगरकर कसे चलाख आहेत हे दाखवून दिले आहे. मला तर ते १०० टक्के पटले. ते ककल्ड तर पाश्चात्य नजरेतला भारतीय इंग्रजी साहित्यातला गारुडी छाप (स्नेक चार्मर) प्रकार आहे. म्हणजे त्या लोकांना इकडच्या नागांचे आणि गारुड्यांचे एक स्टीरियोटेपिकल फॅसिनेशन असते बघा. तसे काहीसे नगरकरांनी आपल्यातल्या उच्च मध्यमवर्गीय, शरीराने भारतीय पण मनाने पाश्चात्य असल्याचा आव असणाऱ्या लोकांना आवडेल असे लिहिले आहे. अरविंद अडिगा किंवा तसल्या इंग्रजी लेखकांचे पप्पा.

मी काय म्हणतो आहे ते हे
Show, don't tell
"Show, don't tell" is a narrative technique used in various kinds of texts to allow the reader to experience the story through actions, words, subtext, thoughts, senses, and feelings rather than through the author's exposition, summarization, and description. It avoids adjectives describing the author's analysis and instead describes the scene in such a way that readers can draw their own conclusions.

मराठीत माझे आवडते म्हणजे "वासूनाका." समीरबापू गायकवाड ह्यांनी त्याचे भन्नाट परिक्षण केले आहे.

केकू, आता खरे सांगू का काफका एवढा स्टीरियोटिपिकल झाला आहे की विचारू नका. साहित्यातला van goph. नेमकं काय भारी आहे हे कळत नाही वळत नाही तरीही उच्च अभिरुचींच्या फोमो मधे काफ्का आवडून घ्यायचे असे चाललेले असते लोकांचे. कुठेतरी कॉफी शॉपलाच नाव दे वगैरे करतात काफका चे आजकाल. उद्या अस्तित्ववादी खर्रा /मावा घ्या म्हणून काफका पानपट्टी सुद्धा काढणार बघा लोक कराड किंवा सांगलीत. कुणी काफका घ्या कुणी कामू घ्या अशी गाणी उद्या लोक बारशाला देखील म्हणतील.

केकू, आता खरे सांगू का काफका एवढा स्टीरियोटिपिकल झाला आहे की विचारू नका. साहित्यातला van goph>>> अरेरे अरेरे एका वाक्यात दोघांचीही @@लीत. वाशिंटनची कुऱ्हाड. कुठेही चालवा.
वर तेच तर मी लिहिले आहे. कालबाह्य इत्यादि.
पटलं तर घ्या. नाहीतर फाट्यावर मारा. पर्वा इल्ले.

रॉय साहेब
तुम्ही प्रेमाने दिलेले चॉकलेट पोहोचले.
थॅंक्यू!

सारंगांचे दुर्दैवाने कादंबरी-कथा लिखाण फार मर्यादित आहे (किमान मला तरी सोलेदाद, एंकीच्या राज्यात आणि आतंक सोडून काही आठवत नाही). आणि त्यात मला ते गगन्भेदी वगैरे वाटले नाहीत. तेव्हड्या जीवावर मी त्यांना एकदम सुपरस्टार म्हणणार नाही. ते आवडते आहेत हे नक्की.
म्हणजे किती कादंब्र्या लिहिल्या आहेत याने दर्जा ठरत नाही हे मान्य. पण मग एकच एकदम जोरदार असते तसेही नाही.
सातपाटील चा आवाका आणि प्रयत्न कौतुकास्पद आहे, ती वाचकाला पकडूनही ठेवते.

केकू- १९८४, आउटसाइडर, कॅचर इन द राय वगैरे मी बरेचदा पुनःपुन्हा वाचतो. त्या इतरांना तितक्याच आवडतील वा आवडाव्यात असे काही आता वाटत नाही. कित्येकांना व पु काळेंची पार्टनर वगैरे अंतराग्नीच्या धगधगीतून आलेली वाटते. ते आधी हास्यास्पद वाटायचे. आता ती त्यांची रिअ‍ॅलिटी आहे हे समजते. तुमची आवड समजते, ती इतरांना पटवायची खुमखुमी पण भावते, पण ते होणार नाही हे ही समजते.

स्वतःलाच प्रचंड आवडलेल्या कादंब्र्या आता खुपतात. श्री ना पेंडसेंचे संवाद आता शब्दबंबाळ वाटतात. त्यातल्या खास पात्रांना (बापू, आजी, नरसू खोत) दुसर्‍यांचे डावपेच कसे आधीच समजतात व त्याची ते मनातच वाच्यता करतात ते थोडे बालीश वाटते. जीएंच्या काही कथा तितक्याश्या आवडत नाहीत तर काही अजूनही तितक्याच ताकदीने भिडतात (वीज, लक्श्मी, गुंतवळ, तुती, कैरी). स्वतःची साहित्यिक समज्/उंची कितपत आहे आणि किती भिडायचे हे वयाच्या अर्ध्यावर आता समजू लागले आहे. खूप झगडायला लावून पराभूत करणारे साहित्य वाचण्याची उर्मी नाही. पण बेचव गिळगिळीत चोथा वाक्ये पेरणारी (किंवा ती नर्मविनोदी ख्याख्याख्या) पुस्तके अजूनही वाचवत नाहीत हे ही खरेच.

चर्चा मजेदार चालली आहे. वरचे बरेच लेखक आणि पुस्तके वाचली आहेत. आवडली आहेत पण त्यावर बरेच वेळा कुठे कुठे चर्चा झाल्याने लिहिले नाही.
अमिताभ घोष आणि शोभा डे यांचीही पुस्तकं आवडतात.

छान चर्चा.
मी यातला एकही लेखक वाचलेला नाही!

मीही नाही!
पण ' एकेकाळी आवडलेले लेखक (त्यांची पुस्तकं) नंतर आवडेनासे होऊ शकतात' याच्याशी सहमत. त्यामुळे आत्ता आपल्याला जे आवडत नाहीये/ फालतू वाटतं त्याबद्दल किंवा ते आवडणाऱ्या लोकांबद्दल आपण आत्ता (आणि कधीच) जजमेंटल असू नये असं मला वाटतं. आपली आवड आणि नावड, आपले दृष्टिकोन हे किती काही म्हटलं तरी आपले, वैयक्तिक असतात.

ककल्ड तर पाश्चात्य नजरेतला भारतीय इंग्रजी साहित्यातला गारुडी छाप (स्नेक चार्मर) प्रकार आहे
>>>>
चला. अजून कुणाला तरी असं वाटतं हे वाचून बरं वाटलं.

काफ्का, कामु उच्च दर्जाचे फिलॉसॉफर असतील. पण ते मला वाचनीय नाही वाटत. मेटामॉर्फॉसिस वाचण्याचा प्रयत्न करून सोडून दिला कित्येक वेळा. ऑरवेल मात्र कधीही वाचू शकते.

भारत सासणे, राजन खान नाही का आवडत कुणाला?

बाकी विलास सारंगांचे काही वाचले नाही. पाठारेंचं सातपाटील कुलवृत्तांत वाचायच्या लिस्टीत आहे.

धारदार मतप्रदर्शन असल्याने चर्चा वाचायला मजा आली. तटस्थ, गिळगिळीत, तु किती छान आणि मी किती छान टाइप पोस्टी वाचून झाल्या की कंटाळा आणतात.

फार इंटरेस्टिंग चर्चा सुरू आहे. सकाळपासून एकदोनदा वाचली.

काफ्का वाचलेला नाही. मला साहित्यातील काफ्कापेक्षा सॉफ्टवेअर मधला काफ्का जास्त माहीत आहे. आणि कामू तर पुणे बीबीवर स्लर्टी ने लिहीलेल्या एका कवितेतील टवणे सरांवरच्याच कडव्यातील एका विशिष्ठ ओळीमुळे लक्षात आहे Wink लिंक सापडली तर देतो.

नेमाड्यांची "कोसला" कॉलेजमधे असताना वाचली होती आणि आवडली होती. पण नंतर काही वर्षांनी जरीला की बिढार पैकी एक वाचायचा प्रयत्न केला, पण ८-१० पानांपुढे गेलो नाही. बोअर झाली. घरी "हिंदू..." आणली आहे आणि सातपाटील सुद्धा. पण दोन्ही अजून वाचायच्या बाकी आहेत. विलास सारंग वगैरे वाचल्याचे आठवत नाही. "या टाइपच्या" पुस्तकांपैकी "रावण आणि एडी" मधे वाचले. ते ही पुढे पुढे बोअर झाले. १९८४ मधल्या बिग ब्रदर कल्पनेबद्दल ऐकले आहे. ते पुस्तक वाचलेले नाही. अ‍ॅनिमल फार्म मात्र चांगले माहीत आहे - आणि राजकीय दुनियेत त्याची वेळोवेळी दिसलेली उदाहरणेही लक्षात आहेत.

पंकज भोसले, हृषिकेश गुप्ते, प्रणव सखदेव - यांचेही किमान एक पुस्तक वाचले/चाळले आहे. पण पूर्ण एंगेज झालो नाही. मात्र "क्षुधा शांती भवन" आवडले. त्यामुळे त्याच लेखकाचे "बाळूच्या अवस्थांतराची डायरी" वाचायची उत्सुकता आहे. पण परिचय वाचून हौसेने आणलेली पण न संपवलेली बरीच आहेत.

"The Hanging Stranger" by Philip K. Dick
सद्य परिस्थितीही यथा योग्य कथा .
भीतीदायक गूढ आणि म्हटलं तर विज्ञान कथा. नेट वर कुठेही लिंक मिळेल.
वाचायची नसेल तर इथे Audio book आहे.
https://www.youtube.com/watch?v=R1j6aHlTuOM
The Hanging Stranger: A Short Animatic
https://www.youtube.com/watch?v=waFbQBol-38

राजन खान नाही का आवडत कुणाला?>>
राजन खान माझे आवडते लेखक आहेत. त्यांचे ' शरियत' , ' चिमूटभर रुढीबाज आभाळ' आणि काही कथासंग्रह ( नावं आठवत नाही आता) वाचलेत. त्यांच्या बऱ्याच कथा समाजातल्या जाचक रूढींवर वार करणाऱ्या आहेत.

शोभा डे यांची लेखनशैली सुंदर आहे. वाचकाला गुंगवून ठेवते. त्यांचे आत्मचरित्र आधी वाचलंय. नुकतेच त्यांचे ' spouse' हे मराठीत अनुवादित पुस्तक वाचले.

मराठीतले वाचक = लिहिणारे किंवा न लिहिणारे/लिहू न शकणारे लेखक

मराठीत वाचक नावाचा फोर्स नाही. मराठीतला जो पिवर वाचक आहे तो थेरडा आहे. आणि त्याला 'वैदिक पद्धतीच्या कमोड चे ३०० फायदे' किंवा राशिभविष्य अशा कंटेंट मधे जास्त रस असतो.

संप्रति, सुनील तांबे यांचे पुस्तक 'मान्सून: जन गण मन' घेऊन वाचणार आहेस ना? लवकरात लवकर तुझा रिव्यु टाक.

फेसबुक वर त्यांना सर म्हणणाऱ्या लोकांना तुसडी उत्तरे देतात आणि वरती माझे पुस्तक का खपत नाहीये म्हणून रडत बसतात. कारण तेच लोक यांची पुस्तके वाचणार असतात हे त्याना कळत नाही का? असं कसं चालेल तांबे काका?

काफ्का, कामू, ऑर्वेल किंवा तत्सम लोक यांचे प्रॉक्सी रीडिंग करतात. म्हणजे एनिमल फार्म बद्दल वाचणाऱ्या लोकांना तरी किमान ठाऊक असते साधारणत: काय आहे ती कादंबरी वगैरे. तसेच काफ्का चे आहे. मी तर सबंध assimov प्रॉक्सीने वाचला आहे. म्हणजे विकी किंवा फॅन विकी वरती जाऊन सबंध प्लॉट वाचायचा आणि रेडिट वर लोकांशी हुज्जत घालत बसायचे. असे वाचन ही वाचन म्हणूनच गृहीत धरावे लागेल कारण एक्चुअल पुस्तके वाचण्यापेक्षा जास्त काळ प्रॉक्सी रीडिंग आणि त्यासंबंधीचे उपद्व्याप करायला लागतो लोल.

भारत सासणे, राजन खान यांची पुस्तकं वाचनालयात चाळली आणि नाही घेतली.

>>>मराठीत वाचक नावाचा फोर्स नाही. मराठीतला जो पिवर वाचक आहे तो थेरडा आहे. आणि त्याला 'वैदिक पद्धतीच्या कमोड चे ३०० फायदे' किंवा राशिभविष्य अशा कंटेंट मधे जास्त रस असतो.>>>
- सणसणीत मत आहे. ( आता वाचनालयात अशी काही पुस्तकं आहेत का बघतो.)

आरोग्यावर चालणारे दोन दिवाळी अंक होते ते दणकून खपायचे पण त्यांची जागा दुपारच्या टिवीवरच्या कार्यक्रमांनी घेतली. त्यात हटकून काही नामवंतांचे प्रश्न असायचे. सतत याच प्रेक्षकांचे फोन घेतले जायचे रोग कुठलाही असो म्हणून नामवंत.

मागे एकदा आनंदीबाई रघूनाथ पुस्तकाचा उल्लेख केला होता. लेखिका सिद्धहस्त वगैरे नसली तरी प्रकाशक आणि इतर मान्यवरांचे सल्ले ऐकून छान पुस्तक लिहिलं. विषयाला सोडून न जाता लिहिलं. असेही काही असतात.

आम्ही पोस्टातील माणसं लिहिणारे लेखक( सीताराम मेणजोगे) पोस्टातूनच निवृत्त झाले होते आणि नोकरीतील अनुभवांवर चांगलं पुस्तक लिहिलं होतं. ते गाजलं आणि कोणी पुस्तकं लिहा हा आग्रह केला म्हणून एकदम सौदी अरेबियावर पुस्तक लिहिलं ते नाही आवडलं.

द गुड अर्थ लिहिणाऱ्या पर्ल बकने आणखी एक दोन पुस्तकं लिहिली पण तिची लेखनावरची पकड सुटली होती. ( तिची मुलगी आणि तिचे काही मानसिक रोग यामुळे ती बेजार झालेली ) तो विषय आला लेखनात पण नाही जमलं.

डोंगरयात्रा( सह्याद्री भटकंती)लिहिणाऱ्या आनंद पाळंदे यांनी आणखी दोन पुस्तकं लिहिली. एक सह्याद्रीवरच आणि दुसरे हिमालय भटकंतीवर. पण नाही जमली. ट्रेक सह्याद्री (हरीश कपाडिया )पुस्तकाची मागणीही कमी झाली याचं कारण मला वाटतं काळानुरूप भटके बदलले. स्वतःच साहसी अनोळखी भटकंतीत रमणारे जाऊन आयोजित भटकंतीत जाणारे वाढले.

मी आता तीन लेखन काळ धरले आहेत. इंग्रजी आणि मराठी लेखक - वाचकांचे.
१९७०, २०००, आणि २०२५. आवडनिवड फार बदलली आहे. लिंगबदल आणि वैविध्य असलेली पात्रे आणि विषय मराठी लेखनात तसेच मालिकेतही डोकावत आहेत. जणू काही रेल्वे / बस अशा सार्वजनिक वाहन प्रवासांत रोज हटकून अशी एकतरी व्यक्ती दिसते असं वातावरण आणते आहेत. मला तरी एकही दिसली नाही. ( हिजडे किंवा छक्के काय ते म्हणा हे मात्र मुंबईत दिसणे सत्तर वर्षे अगदी सामान्य बाब आहे. ती सोडून)

आम्ही अजून थेरडे आणि वैदिक पद्धतीच्या कमोडचे ३०० फायदे आवडणाऱ्या कॅटेगरीत मोडत नाही त्यामुळे नाविलाजाने पिवर वाचक कॅटेगरीत जावे लागेल. पण त्या आधी पिव्वर वाचक म्हणजे काय ते सांगा बुआ.

प्युअर वाचक म्हणजे ज्याला लिहायची खाज नसते. वाचनाने तो समाधानी पावतो. आपल्याकडे वाचणारे लोक लिहू बघणारे असतात. किमान माझ्या माहितीत तरी कुणी एखादे पुस्तक नित्यनेमाने आवर्जून विकत घेतो तेही वाचनाच्या आनंदासाठी पण त्याविषयी लिहू शकत नाही किंवा त्याची तशी इच्छाच नसते किंवा त्याला स्वतः ला काहीही लिहिण्याची खुमखुमी नसते असा वाचक नाही. म्हणजे प्रासंगिक कधीतरी महत्त्वाकांक्षारहित लिहावे लागले असेल ग्रीटिंग कार्ड किंवा स्लॅम बुक किंवा अभिप्राय तेवढेच. असे वाचक नाहीतच. फॅन तर नाहीच नाहीत.

माझे एक काका होते ते डिटेक्टिव नॉव्हेल्स खूप वाचायचे. तिथून त्यांनी थेट आता सद्गुरूचा महिमा वगैरेलाच ऊडी मारली आहे.

फेसबुक वर त्यांना सर म्हणणाऱ्या लोकांना तुसडी उत्तरे देतात आणि वरती माझे पुस्तक का खपत नाहीये म्हणून रडत बसतात.
>>>>
मुळात जिकडे तिकडे सर म्हणण्याची प्रथा मोडून काढली पाहिजे. पण तुसडे असणे आणि पुस्तक न खपणे याचा अर्थाअर्थी काही संबंध वाटत नाही. कलाकृतीत दम असेल तर खपेल.
का पुस्तकाच्या प्रमोशनमध्येच तुसडेपणाने वागले? असं असेल तर प्रकाशक नारळ देईल.
किशोरकुमार त्याला न आवडणाऱ्या लोकांशी प्रचंड तुसडा वागायचा असं ऐकलं आहे. पण त्याची गाणी अफाट गाजलीच की.

किशोर कुमारची गाणी पूर्ण देश ऐकायचा. म्हणजे आयुष्यात किशोरकुमारचे तोंडही ना पाहिलेले कोट्यवधी लोक त्याचे गाणे ऐकत ना. तसे तांबे काकांचे नाही. तांबे काकाना ओळखणारे, त्यांच्याशी इंटरैक्ट करू पाहणारे लोकच त्याचे पुस्तक विकत घेऊन वाचणार आहेत. एवढूसा वाचक वर्ग आधीच.

Pages