मी वाचलेले पुस्तक - ३

Submitted by Admin-team on 20 April, 2022 - 18:19

आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसादांची मर्यादा ओलांडल्यामुळे हा नवा धागा सुरू करत आहे.

इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

आत्मचरित्र म्हणजे आत्मकथन हो कल्पित. जसे आपण शाळेत लिहित होतो ना पतंगाचं, सायकलीचं , भातुकलीच्या भावलीचं आत्मकथन तसं.
_________________________________________

पेशवे कालखंडावर काही पुस्तके अगोदर वाचली होती. पण हे आनंदी रघुनाथराव (उर्फ राघोबावर) लिहिलेले २०२४चे पुस्तक दिसले म्हणून घेतले. ध चा मा करून नारायणरावास मारण्यास कारण म्हणून कुप्रसिध्द झालेली आनंदी
खरोखरच कारण होती का यावर उजेड पाडला आहे. राघुनाथाचेही चरित्र यात येणार हे उघडच आहे.
लेखिकेने ( सौ नीला नातू यांनी)भरपूर वाचन करून इतिहास जाणून त्यात वर्णन जोडून कादंबरीचं रूप दिलं आहे. छान जमली आहे कादंबरी. आवडली.
संदर्भात आनंदीबाई - म.श्री.दीक्षित यांचेही पुस्तकाचा उल्लेख आहे. शिवाय पेशवे दप्तर आणि गो.स. सरदेसाई यांची रियासत. त्या काळी असलेल्या पेशवे कुटुंबातील व्यक्ती तसेच दरबारातील इतर व्यक्तींचीही जंत्री आहे. वाचनीय पुस्तक.

ए काम (शांत) ब्रेन - गायत्री देवी
फार मस्त पुस्तक आहे. हाऊ टु अनलर्न डिस्ट्रक्टिव्ह पॅटर्न्स. आपला मेंदू शांत असेल तर शरीर आपोआप शांत होते बरोबर? अं हं जर शरीर शांत केले तर मेंदू शांत होतो. थोडे बसा, लोळा, पक्षी बघा, झाडे-पाने-फुले पहा. गाणी ऐका, 'जस्ट हम' (सूदिंग गुणगुणा)....... आपल्या भारतियांकडे तर इतकी शांतवणारी, बहारदार गाणी आहेत. गुणगुणा ना. आपोआप मेंदू स्थिर होइल, शांत होइल.
.
सिम्पॅथेटिक सिस्टिम आणि पॅरॅसिम्पॅथेटिक सिस्टिम. वेगस नर्व या बद्दल खूप माहीती मिळाली. पुस्तक फार आवडले. लेखिका हुषार, अनुभवी, बुद्धीमान, न्युरॉलॉजिस्ट आहेत. अजुन काय हवे. क्वालिटी टाइम मिळाला. फार मस्त वाटले.

मी Klara and the Sun हे पुस्तक वाचत आहे. वाचून झाल्यावर सविस्तर लिहीन.
तो पर्यंत पुस्तकाचा परिचय करून देणारा हा ट्रेलर.
https://www.youtube.com/watch?v=CFeVJTQpdag

दुर्गाबाई हे रसायन काही अलौकिकच होतं.
किती विविध टा आहेत. धीरगंभीर अभ्यास, संस्कृत अन काव्याची जाण, समाजभान, राजकारणाची जाण, आतून असणारा अत्यंत हृद्य हळवा - स्निग्ध-ओलावा, सहसंवेदना, कठोर तत्वनिष्ठा अन ठाशीव मांडणी, अन तितकेच मार्दव....
एक एक लेख उलगडत जातो त्यांच्यातला प्रत्येक पैलू
उमा, लक्ष्मी, सीता या देवता
विविध ठिकाणचे निसर्ग
मरण
गाणं
विविध सण अन त्यांचे सामाजिक महत्व
विविध व्यक्तिचित्र - खास करून विल्यम जेन्स, ईश्वरचंद्र विद्यासागर*, जॉन स्टुअर्ड मिल*, कमल देसाई
लेखनावर
कवितांवर
बाणाच्या कादंबरीवर
गांधीजी

फार फार सुंदर पुस्तक. जरूर वाचा
भावसंचित - दुर्गा भागवत

srd छान वाटलं म श्री दीक्षितांच्या पुस्तकाचा उल्लेख वाचून Happy
त्यांचे चिरंजिव डॉ. श्री म दीक्षित माझे सर. तुमचा प्रतिसाद कळवते त्यांना __/|\__

बाणाची कादंबरी हे मराठी लेखिका दुर्गा भागवत यांनी लिहिलेले पुस्तक आहे. संस्कृत कादंबरीकार बाणभट्ट यांच्या कादंबरीचा हा अनुवाद आहे.
मी मराठी वाचलेले नाही, संस्कृत कधी काळी थोडेसे वाचलेले आहे. ते अत्यंत क्लिष्ट होते हे आठवते.
थोडीफार माहिती इथेही मिळेल.
https://www.misalpav.com/node/15211

Screenshot_20250909_180409_WhatsApp.jpg

नमस्कार मंडळी,
यंदाच्या मायबोली गणेशोत्सवातील तुम्हाला आवडलेल्या शशक व पाककृतीला मतदान केलेत का? अजून नाही? मग लगेच खाली दिलेल्या लिंकवर जाऊन मतदान करा.
https://www.maayboli.com/node/87244

>>> आपला मेंदू शांत असेल तर...> काही वाईट घटना घडल्या नसतील तर मेंदू शांतच असतो.
पण कधीकधी इतका शांत असतो की तो गंजेल.

मेंदूला चालना ही हवीच. याबद्दल सहमता अहे. पण शांत म्हणजे चालना नाही असे नाही. शांत हा सकारात्मक मूल्य दाखविणारा शब्द आले. काम (काल्म)!
मंद नाही, डॉर्मन्ट ( निद्रीस्त) नाही. जड नाही. मेंदू विधायक कार्यात चाललाच पाहीजे, एन्गेज्ड पाहीजे. लेखिकेस अध्याहृत असलेली मेंदूची स्टेट (अवस्था) ही कुशाग्र, एकाग्र पण शांत आहे. मला पटते. अशी अवस्था अनुभवलेली आहे.

काल एक विचित्र योगा योग झाला,
का कुणास ठाऊक मी केव्हातरी पूर्वी विकत घेतलेली पेरी मॅसन ची The Case of the Lucky Loser ही कादंबरी वाचायला घेतली. मी रात्री साधारण साडे बाराच्या सुमारास ही कथा वाचत होतो.
योगायोग असा की ह्या कथेत जी काही कळीची घटना घडते ती नेमकी
On the morning of the twentieth—early in the the night of Between twelve-thirty and one-thirty the nineteenth and the morning of the twentieth of September of this year. म्हणजे मी ज्या दिवशी ज्या वेळी ही कथा वाचत होतो त्याच वेळी त्याच दिवशी ही कथा घडत होती.
ह्या योगायोगाने मला एका कथे साठी विषय मिळाला.
नेहमी सारखीच चित्तवेधक रहस्यकथा आहे. रहस्य कथांच्या चाहत्यांना आवडावी.

पस्तीस पाने वाचली या पुस्तकाची. एक ठराविक छाप आहे. संपत्ती - वारस - खून - शोध- वकिली मुद्दे- कलाटणी.

भैरप्पंवर कालच्या लोकसत्ता लोकरंगमधील लेखातून - प्रवाही व पकड घेणारी कथनशैली हा भैरप्पांच्या साहित्याचा मुख्य गुणधर्म आहे , त्यामुळे अनुवाद करताना कमी अडचणी येतात, असे त्यांच्या बहुसंख्य अनुवादकांनी नोंदवले आहे. भैरप्पांचे निवेदन कन्नडचे कैदी नसते , ते इतर भाषांत सहज पोचते. ( हे वाक्य हिंदी अनुवादकाचे आहे - त्याचाच अनुवाद कितपत जमलाय बघा.) भैरप्पांच्या मूळ लेखनाचे सत्त्व व सामर्थ्य एवढे मोठे असते की अनुवादाच्या प्रक्रियेत ते निसटून वा सांडून जात नाही. - हा मुद्दा लक्षणीय वाटला.

मंद्र वाचल्यावर त्यांच्या इतर साहित्याकडे न वळण्याचे ठरवले होते. हा लेख वाचल्यावर त्यांची पुस्तके समोर आली तर वाचेन, असं वाटतंय.

हो. आता त्यांच्या पुस्तकांना वाचनालयात मागणी असेल. त्यामुळे लगेच मिळायची नाहीत.

मी विवेक शानभाग सोडून एकही कन्नड लेखक वाचला नाही. खरेतर बॉर्डरवर असल्याने कानडी-मराठी अनुवादकांची संख्या किमान १० तरी असायला हवी मात्र आपल्या नशिबी उमा कुलकर्णी सोडून कुणी नाही. आणि त्याही सुमार अनुवादक आहेत.

कर्नाटक राज्य पर्यटनाला फार चांगले आहे. व्यवस्था चांगल्या, नद्या जवळपास बारा महिने पाणी असणाऱ्या स्वच्छ पाण्याच्या. ऐतिहासिक स्थळे भरपूर. पण आपला संबंध लोकांशी ,समाजाशी येत नाही. समाजात जाती आणि कुटुंब व्यवस्थेत तेढ आहे. ती भैरप्पा मांडतात. संवाद आणि घटना साध्या सोप्या शब्दांत सांगतात त्यांचे भाषांतर अवघड नाही आणि भाषा कळणारा कुणीही अनुवाद करू शकतो. काही संकल्पना आहेत त्या भाषांतरीत होऊ शकत नसतात. उदा आपल्याकडे उष्टे, खरकटे म्हणजे काय हे इंग्रजीत भाषांतरित होत नाही. त्यात काही वर्ज्य आहे. का व कसे ते समजून घ्यावे लागते. उ.प्रदेश , बिहारमध्येही शिवाशीव, अछूत कल्पना आहेत. कोणी काय करायचे काय नाही ते समाजाने स्वार्थाने ठरवले आहे.
पुस्तकांत करमणूक नाही आणि जाणून घेणेही कंटाळवाणे आहे. बरं त्यांनी समाजातील प्रवृत्तींवर उजेड पाडलाय म्हणून तो बदलणार आहे का?

वंश वृक्ष कादंबरी चे पुणे आकाशवाणी साठी केलेले रुपांतर युट्यूबवर ऐकता येईल. सध्या तीनच भाग अपलोड झाले आहेत. ही पहिल्या भागाची लिंक: https://youtu.be/Gm9at2ObJu8?si=23JI4MVvWZ_JOyLC

विवेक शानभागांच्या कुठल्या पुस्तकांचं उमा कुलकर्णींनी भाषांतर केलं आहे रॉय? मी त्यांचं घाचर घोचर इंग्रजीतून वाचलंय (ऐकलंय). त्याचं मराठी भाषांतर बहुतेक अपर्णा नायगावकरांचं आहे.

>> विवेक शानभागांच्या कुठल्या पुस्तकांचं उमा कुलकर्णींनी भाषांतर केलं आहे रॉय? <<

मी ही इंग्रजी मधूनच ऐकले आहे. मी म्हणत होतो की तेवढाच एक कन्नड लेखक मी वाचला आहे. अपर्णा नायगावकरांनी मूळ कन्नड मधून भाषांतर केले आहे की इंग्रजीमधून भाषांतर केले आहे? मूळ कन्नड मधून केले नसेल तर हा खरोखर एक आंग्ल द्राविडी प्राणायाम झाला.

अपर्णा नायगावकरांनी मूळ कन्नड मधून भाषांतर केले आहे की इंग्रजीमधून भाषांतर केले आहे? नाही माहिती मला.
उमा कुलकर्णी 'सुमार अनुवादक' आहेत आणि तुम्ही विवेक शानभाग हा एकच कन्नड लेखक वाचलाय म्हणालात म्हणून मला वाटलं की तुम्ही विवेक शानभागांचं एखादं मूळ कन्नड पुस्तक आणि त्याचं उमा कुलकर्णींनी केलेलं मराठी भाषांतर वाचलंय की काय!

मी भैरप्पांचे एकही वाचलेले नाही. आता वावेंच्या रेको वरून वंशवृक्ष वाचायला पाहिजे.

या भारतवारीत एकही पुस्तक विकत घेतले नाही. प्रयत्न मात्र २-३ दा केले. का घेतले नाही त्याची कारणे विनोदी आहेत
- डेक्कनवर बुकगंगा मधे गेलो. तेथे सध्या एक दोन मराठी साइटसवर वाचलेली नावे मिळाली नाहीत. "आर्‍या" एक आणि अजून एक दोन (मी माबो व अक्षरनामा वर नावे बघतो सहसा. भारतात सामना व इतर एक दोन पेपर्समधे चांगल्या ओळखी येतात नवीन पुस्तकांच्या). संप्रतिंच्या धाग्यावरचीही नवीन फारशी आधी पटकन आठवली नाहीत व तेथेही समोर दिसली नाहीत (नवीन प्रकाशित पैकी) - त्यामुळे समोर पाहिल्यावर आठवली असेही झाले नाही. सहसा तेथे मिळतात नवीन पुस्तके
- अत्रे हॉलजवळ अक्षरधारा पर्यंत गेलो तर तेथे चपला शूज बाहेर काढायला लावत होते. बाहेर ते सुरक्षित राहतील याची गॅरंटी वाटली नाही. नंतर पुन्हा येऊ म्हणून गेलो पण नंतर जमले नाही
- डोंबिवलीत पूर्वी मॅजेस्टिक नावाने जे दुकान होते ते आता वेगळ्या नावाने आहे. तेथेही पाहिजे असलेली पुस्तके दिसली नाहीत. आणि तेथे काही पुस्तकांची अवस्था चांगली वाटली नाही. धूळ, डाग ई. बघून घ्यावीशी वाटली नाहीत.

पूर्वी मी या तिन्ही ठिकाणी भरपूर पुस्तके घेतली आहेत.

बहुतांश दुकानात अनुवादित पुस्तके प्रचंड आली आहेत. तसेच मोटिव्हेशनलही.

शेवटी नात्यातील एकाने दिलेले "जगाला पोखरणारी डावी वाळवी" हे घेउन आलो आहे वाचायला. बघू कसे आहे ते Happy

मी पर्व वाचलं होतं भैरप्पांचं, आणि आणखी एक सामाजिक कादंबरी जिचं नाव आठवत नाही. पण ती खास न आवडल्यामुळे नंतर काही वाचलं गेलं नाही.

मी भैरप्पांचं पर्व वाचलं आहे आणि ते आवडलं नाही अजिबात. त्यामुळे पुढे कधी त्यांची पुस्तकं मुद्दाम आणून वाचली गेली नाहीत.

मी भैरप्पांचे आवरण व पर्व वाचले. दोन्ही वेगवेगळ्या कारणांसाठी आवडले. आवरण एवढ्यासाठी की कोणी ही बाजु लिहायचेही धाडस केले आणि पर्व महाभारताचा वेगळ्या दृष्टीने विचार केलाय तो विचार आवडला. आवरणचे शास्त्री दिसतात समाजात.

त्यानंतर अजुन एक कादंबरी वाचली ज्यात मुलगा परदेशी सुन आणतो. ती आवडली म्हणता येणार नाही, खुप लांबलचक वाटली पण वाचली. नंतर एक कादंबरी आणलेली, नाव आठवत नाही पण बंगळुरचे उल्लेख असावेत. तिचा मात्र कंटाळा आला. भैरप्पाच नकोत वाचायला असे वाटुन पुढे काही वाचायचा प्रयत्न केला नाही. कदाचित भाषांतरात कादंबरीचा प्राण हरवुन गेला असेल.

तेथे चपला शूज बाहेर काढायला लावत होते. बाहेर ते सुरक्षित राहतील याची गॅरंटी वाटली नाही>>>>>> हल्ली बर्‍याच ठिकाणी चपला बाहेर काढायला लावतात, आत फरशी खराब होऊन सतत साफ करायचे काम पडायला नको म्हणुन. अशा ठिकाणी चपला सहसा सुरक्षित राहतात. हल्ली देवळातही सुरक्षित राहतात. अर्थात पुण्याचा अनुभव नाही Happy

मला वाटलं की तुम्ही विवेक शानभागांचं एखादं मूळ कन्नड पुस्तक आणि त्याचं उमा कुलकर्णींनी केलेलं मराठी भाषांतर वाचलंय की काय>>>>

मलाही असेच वाटले.

कधीकधी भाषांतर इतके गचाळ असते की दोष भाषांतरकाराचा आहे हे चटकन कळते (निमकराच्या हाटेलातले डुकराचे काप आठवले Happy ). हे मी सहसा इन्ग्रजीतुन मराठीत पाहिलेय. जागोजागी अडखळायला व्हायला लागते. आणि हे मेहता पब्लिशिंगने छापलेल्या पुस्तकातही झालेले आहे.

तसे उमा कुलकर्णींचे भाषांतर वाचताना अडखळायला होत नाही, भाषांतर सहज वाटते.

बरं त्यांनी समाजातील प्रवृत्तींवर उजेड पाडलाय म्हणून तो बदलणार आहे का?>>>>>

आजवर कित्येकांनी प्रयत्न केले पण कोणीच समाज आमुलाग्र बदलू शकले नाही. म्हणुन उजेड पाडायचाच नाही असे थोडेच आहे. उजेड पाडला नाही तर ती प्रवृत्ती अप आहे हेही कित्येकांना कळत नाही. हुंडा घेणे आजही समाजात कित्येकांची सहजप्रवृत्ती आहे. त्या विरोधात लिहिलेले सतत ठळक होत राहिले तर हुंडा घेणे चुक आहे त्यांच्यापर्यंत जाते, भले ते
हुंडा घेणे सोडत नसले तरी. महात्मा फुल्यांनी लिखाणातुनच आसुड ओढले. तेव्हा सगळा समाज नसेल जागा झाला पण काही जण तरी जागे झाले, त्यांच्यापुरते तरी जग बदलले.

मी भैरप्पांचे आवरण व पर्व वाचले. दोन्ही वेगवेगळ्या कारणांसाठी आवडले. आवरण एवढ्यासाठी की कोणी ही बाजु लिहायचेही धाडस केले आणि पर्व महाभारताचा वेगळ्या दृष्टीने विचार केलाय तो विचार आवडला.
>>>> मलाही ही दोन्ही पुस्तके आवडली. बाकीची वाचली होती का आठवत नाही.

महाराष्ट्रात आणि भारतात काही समाजांत हुंडा फार मोठा फास आहे. जर का यातून कुणाला बाहेर पडायचे असेल तर त्याला कुटुंबापासून दूर जावे लागते. जमीन आणि घर त्यावरचा हक्क सोडावा लागतो( म्हणजे ते विसरूनच जायचे.) कुटुंबातच राहिला तर त्याच्या लग्नात मोठी माणसे सर्व ताबा घेतात आणि वागायला लावतात.

Pages