मी वाचलेले पुस्तक - ३

Submitted by Admin-team on 20 April, 2022 - 18:19

आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसादांची मर्यादा ओलांडल्यामुळे हा नवा धागा सुरू करत आहे.

इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

@केशवकूल, मला वाटलं की compartments story खूप मोठी आहे पण नाही. वाचली संपूर्ण. Zoranच्या इतर गोष्टींप्रमाणे यात वाचनीय काहीही नाही. लेखक एका गाडीचा शेवटचा डबा घाईने पळत पकडतो. आतला माणूस त्याला हात देऊन वर खेचतो. पण आता आल्यावर कळतं की तो कंडक्टर आहे. "पण माझ्याकडे तिकीट नाही." " काही प्रश्न नाही." मग त्याला त्याचा एक अनुभव सांगतो आणि पहिल्या कुपेमध्ये बसण्याची व्यवस्था करतो. तिथे विचित्र बाई, तिचा नवरा आणि तीन मुली असतात. तिची कथा ऐकून तिच्या मनाप्रमाणे न केल्याने ती कुपेतून हाकलते. मग कंडक्टर दुसऱ्या एका कुपेत पाठवतो. त्यातही काही वेगळेच विक्षिप्त प्रवासी असतात. तिथूनही बाहेर पडतो. मग आणखी तीन चार कुपेतील प्रवाशांचा अनुभव घेऊन आल्यावर कंडक्टर त्याला स्टेशनवर उतरवतो. गंमतीशीर नाही आणि गूढही नाही. झोरानच्या इतर कथेमध्ये बसणारीही नाही.

ओके. आभार.
पुन्हा वाचून बघतो. काही समजतेय का.

धनश्री. ह्या संदर्भात इतिहास संशोधक आशुतोष बापट ह्यांची मुलाखत आहे. https://youtu.be/Rr75TwX0iAU?si=8jjJ2ZZyUQvf_HDb

मला ह्या गृहस्थाचे काम किंवा एकुण त्यांच्या बद्दल काहिच माहिती नाही. पण हाच विषय आहे आणि योगायोगाने मी इतक्यातच ऐकली. मला तरी सेंसिबल वाटले हे गृहस्थ.

सांप्रति,
डॉ. राजेंद्र प्रसाद सिंग, प्रसिद्ध भाषातज्ञ आणि इतिहासाचे अभ्यासक यांनी सम्राट अशोकावर पुस्तके लिहीली आहेत. मोहेंजोदडो बद्दल त्यांचे नवीन विश्लेषण सुद्धा चर्चेत आहे. त्यांची पुस्तके महाग नाहीत. अ‍ॅमेझॉनवरून मागवू शकता. हिंदीत आहेत.

सांप्रति बद्दल गुजराती लोककला, जैन धार्मिक वाड.॑मय यात उल्लेख आहेत. पण त्याला इतिहास म्हणता येत नाही. तसेच प्राचीन जैन मंदीरांवरही सांप्रतिची माहिती आहे. इतिहास नष्ट झालेला नाही. सव्वा लाख जैन मंदीरे बांधणारा तो एकमेव सम्राट होता.

>>>>>इतिहास संशोधक आशुतोष बापट ह्यांची मुलाखत आहे
बाप रे मग तसाच काहीसा हेतू असेल अर्वाचिन लोकांचा. धन्यवाद.
मी ते मत फक्त फेसबुक वा तत्सम उथळ माध्यमावर वाचलेले होते.

IMG-20260409-WA0001.jpg

१. मौर्य : चंद्रगुप्त ते सम्राट अशोक हे देविका रंगाचारी यांचं पुस्तक दोन महिन्यांपूर्वी वाचलं होतं. चांगली माहिती संकलन आणि उद्बोधक आहे. पण अशोकाच्या पुढच्या वारसांबद्दल थोडक्यात उरकलं आहे. ( पुस्तकाचा विषय तिथेच संपतो .) संप्रतिबद्दल दोन ओळी आहेत.
२. The loss of Hindustan, the invention of India या पुस्तकात Manan Ahmed Asif यांनी भारताचा इतिहास {पुराव्यांसह} किती मागे नेता येईल याचा गोषवारा घेतला आहे. तो अशोकापर्यंत मागे नेता येतो. सारनाथ येथील उत्खननात ब्रिटिश अधिकाऱ्यांनी चार सिंहांचे शिल्प मिळवले आणि ते कोणत्या खांबावरून तुटले आहे तोही मिळवला. भारतात सोन्याचा धूर यावेळी निघत होता असा निष्कर्ष काढता येतो. खूप चांगले पुस्तक आहे.
------------
३. सांप्रतिबद्द्ल शोधतो आणखी.
४. आशुतोष बापट फेसबुकवर आहेत. बरीच माहिती सांगतात. आता हळूहळू या पर्यटनाकडे लोक वळू लागले आहेत. पण जे लोक अशा विविध वारसा जागांवर जाऊन आले आहेत त्यांनी तिथे कसे गेलो वगैरे कुठेतरी लिहिले पाहिजे. उदाहरणार्थ मायबोली. किंवा blogger किंवा वर्डप्रेस.
--------------------
हा प्रतिसाद इथल्याच प्रतिसादावर होता म्हणून इथे लिहिला. नवीन धाग्यावर गेलो आहे.

आशुतोष बापट या प्रकारचं लेखन करतात, कार्यक्रम करतात, हे बरोबर.
पण त्यांना 'इतिहास संशोधक' म्हणावं का? याला माझं उत्तर 'नाही'.

श्री. गणेश मंदिर संस्थान, प्र के अत्रे वगैरे खूप दिवसांनी वाचून बरं वाटलं.

खूप वर्ष केडीएमसीची लायब्ररी होती माझी. नंतर गणपती संस्थानने चालवायला घेतली तेव्हाही होती. नंतर वाचन होईना त्यामुळे २०१९ मार्चच्या आत बंद केली. नंतर कोविड वगैरे आला. आता अजिबात वाचन होत नाही म्हणून परत सुरु नाही केली.

केडीएमसी, नालासोपारा म्युनिसिपल, श्रीरामपूर सार्वजनिक वाचनालय आणि परत केडीएमसी असा वाचनप्रवास केला. सगळीकडे खूप सुरेख पुस्तकं वाचायला मिळाली. कृतज्ञ आहे मी.

बापट इतिहास संशोधक नाहीतच. फक्त पुरातन गोष्टींना भेटी देऊन माहिती देतात. आणि आता लोकांना पुरातन गोष्टींचं काही पडलेलं नाही.
गुहागरमध्ये ग्रामदैवत दुर्गादेवी मंदिर होतं . संपूर्णपणे लाकडाचं. १९९७ -९८ नंतर कधीतरी 'जीर्णोद्धार' करून रंगीबेरंगी करून टाकलं शिमिटचं. जुन्या देवळातून काही उत्पन्न नव्हतं. असंच एक राजापूर तालुक्यातील मोठ्या लाकडी वाशांचं. ते उडवलं हल्लीच.

खरं सांगू का?
अशा गोष्टीत वेळ वाया जातो. हल्ली युट्यूबवर चिकार माहिती मिळते. पुस्तकातून अचूक माहिती मिळावी ही अपेक्षा असते. कॅज्युअल माहितीसाठी पुस्तक वाचण्याचे दिवस गेले.

श्री. गणेश मंदिर संस्थान >>>>> हो!! मी पण तेच बघितलं. फारच वर्ष झाली डोंबिवलीच्या गणपतीच्या देवळात जाऊन. पुढच्या ट्रीपला जमवायलाच हवी डोंबिवली ट्रीप Happy

देवा झिंझाड यांचं 'एक भाकर तीन चुली वाचलं' ...ठीक वाटलं..पण खूप आवडलं नाही...त्यांचा संघर्ष बराच होता हे जाणवलं पण...
सुनिता देशपांडेंचं आहे मनोहर तरी वाचतेय सध्या...खूप आवडलं..

करुणाष्टक - व्यंकटेश माडगूळकर
फार हृदयस्पर्शी व्यक्तीचित्रणे, आयुष्यातील किस्से, आठवणी आहेत. हातचे न राखता आणि माणुसकीपूर्ण असे लेखन आहे. खूप आवडले. आई वडील, भाऊ बहीण सर्वांची व्यक्तीचित्रे रंगवली आहेत. मात्र थोरले भाऊ गदिमांबद्दल जरा कमीच बोलले आहेत.

चौथा अंक हे माधवी महाजनींच पुस्तक वाचतेय.
नाही आवडलं अजिबातच.
अतिशय विस्कळीत मांडणी... मोठ मोठी नावं पुस्तकभर पेरलेली....
आणि अतिशय बावळट बाईचं लिखाण वाटलं.
महिनाभरात ह्या पुस्तकाच्या ४/५ आवृत्या कशा निघाल्या कुणास ठाऊक.

Mumbai after Ayodhya
जीतेन्द्र दीक्षित .
मुंबई आफ्टर अयोध्या
एक बदलते शहर (मराठी अनुवाद) वर्षा वेलणकर
२०२३
ISBN 9789357203524
१९६० ते २०२३ पर्यंतचा चांगला आढावा एकाच ठिकाणी वाचता येईल. दंगली, बॉमस्फोट, सरकारे, शरद पवार, बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी आणि शिवसेना, पक्षफुटी .

>>अशा गोष्टीत वेळ वाया जातो. हल्ली युट्यूबवर चिकार माहिती मिळते. ....>> Submitted by राज अज्ञानी on 10 April, 2026 - १६:१८
- बरोबर.
मुंबई आणि इतर जुन्या गोष्टींसाठी vinay khare यांचा channel मधील एक मुंबईचा वाटाड्या भाग १
https://youtu.be/pVBEsDK4JP4?si=7utjuBi1pOIgKA2W

शब्दांच धन

मारुती चितमपल्ली - अरण्यऋषी
समीकरण ऐकून माहित होतं.
पण गेल्यावर्षी मारुती चितमपल्ली यांच्या निधनानंतर त्यांच्याविषयी समाज माध्यमांवर इतकं भरभरून वाचायला मिळालं आणि त्यांनंतर खरंतर मी संभ्रमात पडले - इतका मोठा माणूस, इतका लोकप्रिय लेखक आणि आपल्याला केवळ
त्यांचं आणि जंगलाचं कनेक्शन येवढच माहिती आहे आणि ते सुद्धा शाळेत त्यांचा एक धडा होता त्यामुळे.

त्या सखेद आश्चर्यातून मग त्यांच्या अनेक मुलाखती ऐकल्या/ बघितल्या.
त्यांचं वनाधिकारी/ वन्यप्रेमी म्हणून असलेलं पशु, पक्षी, झाडं अरण्य यांविषयीचं ज्ञान थक्क करणारं आहेच. पण त्याव्यतिरिक्त त्यांनी मराठी भाषेला दिलेले शब्दकोश, मराठीत लिहिलेले विपुल साहित्य, त्यासाठी त्यांनी केलेली तपश्चर्या, त्याचं अफाट वाचन, व्रतस्थ- साधं जीवन, विनम्रता असे कितीतरी पैलू समोर येत गेले.
अजून एक गोष्ट त्यावेळी समोरी आली ती म्हणजे,
फॉरेस्ट ऑफिसर किंवा वनअधिकारी ते एका प्रतिथयश लेखकापर्यंतचा त्यांचा प्रवास अनेक मान्यवर लेखकांच्या, साहित्यिकांच्या मार्गदर्शनातून घडला आहे.

त्यातच दोन एक महिन्यांपूर्वी ‘शब्दांच धन’ हे त्यांचे पुस्तक हाती पडलं.

शब्दांच धन’

हे पुस्तक म्हणजे त्यांच्या साहित्यिक प्रवासातील वाटेवर त्यांना भेटलेले अनेक मार्गदर्शक, लेखक, साहित्यिक, पक्षीतज्ज्ञ, प्रणिततज्ञ, ग्रंथ, वृक्ष ज्यांनी ज्यांनी त्यांना समृद्ध केलं.. त्या सगळ्यांवर लिहिलेल्या लेखांचं संकलन आहे.

या लेखन प्रवासाची सुरुवात ज्यांच्याकडून प्रेरणा घेऊन झाली त्या गो. नी. दांडेकरांना त्यांनी गुरु मानलं. आणि त्यांना हे शब्दांच धन अर्पित केलं आहे.

मातृभाषा तेलगु असताना मराठीमध्ये लेखन कसे करावे हे शिकायला सुरुवात केली तेव्हा त्यांनी अनेक जुन्या ग्रंथांचा अभ्यास केला.
संस्कृत भाषा मुळातून पाठशाळेत जाऊन शिकले. त्याचबरोबर जर्मन आणि रशियन भाषेचाही त्यांनी अभ्यास केला.
अनेक भाषांमधील अनेक ग्रंथांचा अभ्यास करून त्यांनी ज्ञान मिळविले, नेटके कसे लिहावे याकरता अनेक थोर लेखकांचे साहित्य वाचून, त्याचे रसग्रहण करून किंवा प्रत्यक्ष मार्गदर्शन घेऊन त्यांची स्वतःची अशी लेखन शैली तयार झाली

वाचत असताना जाणवले की एखाद्या तपस्याप्रमाणे अनेक वर्षांची साधना करून अरण्यऋषी पद त्यांनी कमावले आहे.

या पुस्तकात पक्षीतज्ञ डॉ सलीम अली , व्यंकटेश माडगूळकर, जी. ए, नरहर कुरुंदकर, जयवंत दळवी यांसारखे अनेक लेखक/ साहित्यिक, जे कृष्णमूर्ती, रामदास स्वामी, पक्षी शास्त्रज्ञ अरिस्टॉटल, चित्रकार आलमेलकर, त्याशिवाय अनेक ग्रंथराज, वृक्ष , जेन गुडाल, जॉय ॲडमसन यांसारख्या वन्य/ प्राणीप्रेमा खातर आयुष्य वाहून घेतलेल्या व्यक्ती… असे कित्येक जण त्यांच्या नजरेतून आपल्याला भेटत जातात.. या सर्वांनी त्यांना शब्दांच धन वेचायला मदत केली.

हे शब्दांच धन जोडताना त्यांनी विपुल ग्रंथ संपत्तीही गोळा केली होती. पुस्तकात एके ठिकाणी उल्लेख येतो..
“ त्यावेळी जवळ थोडेसे पैसे होते. त्यामुळे त्यांना सापडलेला एक दुर्मिळ ग्रंथ किंवा पत्नी-लेकीची खरेदी यातील एकच करणे शक्य होते.. तेव्हा पत्नी आणि लेकीने दाखवलेला समजूतदारपणा ज्यामुळे तो ग्रंथ त्यांच्या संग्रही आला.”
तेव्हा एकमेकांविषयी आदर, जिव्हाळा असलेलं त्या तिघांचं कुटुंबही नकळत भेटून जात.

२५ पुस्तकांव्यतिरिक्त लिहिलेले पक्षीकोश, वन्य पशुकोश अथवा मृगकोश, मत्स्यकोश, वृक्षकोश म्हणजे त्यांनी मराठी भाषेला दिलेला अमूल्य ठेवा आहे.

जाणवतं, हे (शब्दांच) धन त्यांनी आपल्यासारख्या सामान्य माणसांवर उधळले.. आणि त्यांना समृद्ध करून सोडले..!

प्रकाशफुलाचं बियाणं नावाचा आता विनय हर्डीकरांवर इतरांनी लिबिलेल्या लेखांचा (गौरव्)ग्रंथ प्रकाशित होत आहे (देशमुख आणि कं).
इतके वर्ष स्वतः हर्डीकरांनी स्वतःवर लिहिले. आता त्यांनी दुसर्‍यांना सन्धी दिलेली दिसते.
रॉयची प्रतिक्रिया वाचायला पाहिजे आता

Pages