Submitted by मानव पृथ्वीकर on 2 April, 2025 - 05:31
कायप्पावर, फेसबुक किंवा इतरत्र अनेकदा काहीच्या काही वाटावे असे निनावी लिखाण फिरत असते.
त्यातील काही खास वाटले तर आणि निनावी असले तरच शेअर करण्यास हा धागा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ऋण फेडता आले पाहिजे.
ऋण फेडता आले पाहिजे.
वनवासाच्या काळात माता सीतेला तहान लागली,
तेव्हा श्रीरामाने सर्वत्र बघितले,
पण पाणी कोठेच मिळेना.
सर्वत्र जंगलच दिसत होते.
तेव्हा श्रीरामाने *पृथ्वीमातेला* प्रार्थना केली की,
जेथे कोठे *पाणी* असेल,
तेथे जाण्याचा मार्ग आम्हांला दाखव.
तेव्हा एक मयुर तेथे आला,
व श्रीरामास म्हणाला,
येथून थोड्याशा अंतरावर एक जलाशय आहे.
चला मी आपणास दाखवतो.
पण तिथे मी उडत उडत जाईन,
आणि आपण चालत येणार,
त्यामुळे चुकामूक होऊ शकते.
म्हणून मी मार्गात एक एक पंख टाकत जाईन.
त्यामुळे आपणास मार्ग सापडेल,
व आपण जलाशया जवळ पोहचाल.
आपणास माहिती आहे की,ते माहीत नाही पण
*मयूर पंख, हॆ एक विशेष काळी,*
व एक *विशेष* ऋतुमध्ये पंख तुटून पडतात.
*पण मोराच्या इच्छेविरूद्ध पंख निघत असतील,*
तर त्याचा मृत्यु होतो.
आणि तेच झाले.
त्याचे पंख निघत होते,
त्यामुळे त्याचा मृत्यूचा काळ जवळ आला होता.
तेव्हा मोर म्हणाला की,
मी किती भाग्यशाली आहे की,
*जो जगाची तहान भागवतो,*
त्या *प्रभूची* तहान भागवण्याचे मला सौभाग्य प्राप्त झाले.
माझे जीवन धन्य झाले. आता मरताना माझी काही इच्छा शेष राहीली नाही.
तेव्हा *मर्यादा* पुरुषोत्तम श्रीरामाने मयुरास म्हटले की,
*माझ्या साठी जे मयूरपंख इच्छेविरूद्ध काढून,*
मार्गात टाकलेस, त्यामुळे तुझे माझ्यावर ऋण झाले आहे,
व जो ऋणानुबंध झाला आहे,
हे ऋण मी पुढच्या अवतारात, नक्की फेडीन.
माझ्या कृष्ण अवतारात तुला,
माझ्या माथ्यावर धारण करीन.
त्यानुसार पुढच्या अवतारात,
*श्रीकृष्ण* अवतारात त्यांनी आपल्या माथ्यावर मयूरपंख धारण करुन,
*वचना* नुसार मयुराचे ऋण उतरवले.
*तात्पर्य* हे आहे की,
*जर प्रत्यक्ष भगवंतास* मागील जन्मातले,
*ऋण पुढील जन्मात फेडावे लागले,*
मग आपण तर मनुष्य आहोत.
न जाणो आपणास कितीतरी ऋण फेडायचे आहे.
आपण तर अनेक *ऋणानुबंधनात* अडकलेलो आहोत.
ते *ऋण* फेडण्यासाठी,
कित्येक जन्म कमी पडतील.
*अर्थात*,आपणास जे काही भले करायचे आहे,
ते या जन्मात करायचे आहे.
कारण पुढचा जन्म कुठला असेल,
आपणास माहिती नाही,
आणि मनुष्य जन्मातच ऋण फेडता येते.
*एक महत्त्वाचे-*
पूर्वीचा ऋणानुबंध असल्याशिवाय,
माशी सुध्दा अंगावर बसत नाही.
त्यामुळे मागच्या जन्मातील देणेकरी, वैरी, ज्यांना त्रास दिला गेला,
हे आपल्या या जन्मी भाऊ, बहीण,नातेवाईक, शेजारी,
या रुपात आपापले ऋण वसूल करतात,
व ज्यांना आपण मदत केली,
तेही या जन्मी कोणत्या ना,
कोणत्या रुपात येवून,
परतफेड करतात.
त्यामुळे मी सरळमार्गी आहे,
मी कोणालाही त्रास दिला नाही,
मग माझ्याबाबतीत असे का होते,
याची कधीच खंत करु नका,
समर्थ रामदास स्वामी म्हणतात,
मना त्वाची रे पूर्वसंचित केले.!
तयासारिखे भोगणे प्राप्त झाले.!!
देह प्रारब्धावर सोडून,
मन *सद्गुरुचरणी*,
व वाणी नामस्मरणात गुंतविल्यास,
जीवनातील गंमत,व आनंद अनुभवता येतो...!!
बाकीचं माहिती नाही पण मयूरपंख
बाकीचं माहिती नाही पण मयूरपंख डोक्यावर धारण करण्याची कथा आवडली.
हो, पण मला हे समजले नाही की
हो, पण मला हे समजले नाही की मोराच्या इच्छेविरुद्ध पंख कसे काय निघत होते?
त्यानेच तर ऑफर केलेले ना, की मी एकेक पीस टाकत जातो तुम्ही मागेमागे या...असे?
हो, गोष्ट आवडली मलापण.
हो, गोष्ट आवडली मलापण.
त्याच जन्मी मयूरपंख का धारण
त्याच जन्मी मयूरपंख का धारण केला नाही?
आणि जगाची तहान भागवतो आणि
आणि जगाची तहान भागवतो आणि बायकोची तहान भागवता येईना!
थांबा!!! विचारांचे वारू आवरा!!!
पण म्हणजे दोन्ही जन्मांत
पण म्हणजे दोन्ही जन्मांत मयूरपंख काढून घेतले की!
पूर्वीचा ऋणानुबंध असल्याशिवाय
पूर्वीचा ऋणानुबंध असल्याशिवाय,
माशी सुध्दा अंगावर बसत नाही. >>>>>> म्हणजे नक्की काय म्हणायचे आहे
आणग तहान सीते ला लागली होती
आणि तहान सीते ला लागली होती ना मग हा मोर श्रीरामांची तहान भागवण्याचं श्रेय का घेतोय?
>>>>>>> म्हणजे नक्की काय
>>>>>>> म्हणजे नक्की काय म्हणायचे आहे

प्रत्येक गोष्टीत ऋणानुबंध,
प्रत्येक गोष्टीत ऋणानुबंध, प्रत्येक गोष्टीत कसलीतरी एनर्जी शोधणं मला चक्क डिल्युजनल वाटतं. मागे येथे गोठोत्सवात खिशात शेणकुड (गोवरी) ठेवून रेडिएशनपासून मुक्तता मिळवा असा काकाफॉ आला होता. तो आणि हा जोडून खिशात शेणकुड ठेवले तर ऋणानुबंधाची माशी व रेडिएशन थेरपी दोन्ही मिळेल.
ऋणानुबंधाच्या ऋणानुबंधाच्या
जिथून पडल्या माशा
… ऋणानुबंधाच्या
… विचारांचे वारू आवरा… 😂
… ऋणानुबंधाच्या
जिथून पडल्या माशा… 😂
चालीत गाऊन पाहिले
अरेरे त्या मोराला या जन्मी
अरेरे त्या मोराला या जन्मी मरावे लागले आणि पुढच्या जन्मात पण डोक्यावर लावायला पंख का काढून घेतले त्याचे. हे कसले ऋण उतरवणे ?!
मोराला तरी मरण्याची काय गरज होती, मोर काही फार उंच उडू शकतच नाही एवीतेवी, काही चुकामूक वगैरे झाली नसती!
त्या मोराने बिचाऱ्याने पिसे
त्या मोराने बिचाऱ्याने पिसे काढली त्याची ही तुम्ही आता पिसे काढा!
ही तिच्या वेणी तिल फुले,
लक्ष्मणा तिचीच ही पाऊले ... याची आयडिया सीतेला हा मोराने दिली.
त्या मोराने बिचाऱ्याने पिसे
त्या मोराने बिचाऱ्याने पिसे काढली त्याची ही तुम्ही आता पिसे काढा >>>
ऋणानुबंधाच्या ऋणानुबंधाच्या
ऋणानुबंधाच्या ऋणानुबंधाच्या
जिथून पडल्या माशा
>>>
गुंडाळे बुद्धी इथूनी गाशा
( तुझ्या ओळी पूर्ण केल्या गं, अस्मिता! )
त्या मोराने बिचाऱ्याने पिसे काढली त्याची ही तुम्ही आता पिसे काढा >>>
ऋणानुबंधाच्या ऋणानुबंधाच्या
ऋणानुबंधाच्या ऋणानुबंधाच्या
जिथून पडल्या माशा
>>
गुंडाळे बुद्धी इथूनी गाशा >>
त्या मोराने बिचाऱ्याने पिसे काढली त्याची ही तुम्ही आता पिसे काढा >>>
सगळेच>>>>>
सगळेच>>>>>
येथून थोड्याशा अंतरावर एक जलाशय आहे.>>>>> थोड्याच अंतरावर आहे ना? मग कशाला उडतोस?
पण तिथे मी उडत उडत जाईन>>>>>>> कोण म्हणतंय हे? मयूर? ज्याला आधीच उडायचा कंटाळा....
ऋण फेडता आले पाहिजे.>>>> खरंच ते धोतर फेडण्याईतके सोपे नक्कीच नाही.
ऋणानुबंधाच्या ऋणानुबंधाच्या
ऋणानुबंधाच्या ऋणानुबंधाच्या
जिथून पडल्या माशा
>> हाहाहा
गुंडाळे बुद्धी इथूनी गाशा >>
ऋतुराज...धमाल चाललीये
ऋतुराज...धमाल चाललीये मोरावरून.
सगळेच चोरावर मोर !
नागपंचमीच्या निमित्ताने
नागपंचमीच्या निमित्ताने सर्वात विषारी साप म्हणजे व्हॉट-साप हे पोस्ट आले का तुम्हाला ?
नाही! अशा व्हॉट्-साप ग्रुप
नागपंचमीच्या निमित्ताने
नागपंचमीच्या निमित्ताने सर्वात विषारी साप म्हणजे व्हॉट-साप हे पोस्ट आले का तुम्हाला ?
>> नाही. इकडे टाका ना.
असामी
असामी
त्याचा शेवट एकदम अॅप्ट आहे.
त्याचा शेवट एकदम अॅप्ट आहे.
नाग विषारी असतो. काही साप विषारी असतात. पण सर्वात डेंजर साप म्हणजे व्हॉट-साप ! ह्यावरून जितकं विष होतलं जातं त्याच्या ०.००००००१% सरही सर्वात विषारी सापाच्या विषाला नाही. त्यामूळे आयुष्यात कुठल्या सापापासून स्वतःला नि इतरांना खरचं वाचवायचे असेल तर व्हॉट-सापवरून येणारे आय टी सेलवाले फॉरवर्ड्स वाचणे नि इतरांना ढकलणे बंद करा.
म्हणून इथे कसा टाकू ? : D
ओह! म्हणूनच आला नाही मला!
ओह! म्हणूनच आला नाही मला!
हे तर चांगलं आहे. टॉक्सिक
हे तर चांगलं आहे. टॉक्सिक पोस्टी अंधाधुंद फॉरवर्ड करणाऱ्यांसाठी चपखल आहे.
असामी
असामी
“सर्वात विषारी साप म्हणजे
“सर्वात विषारी साप म्हणजे व्हॉट-साप” - अरे, हे खतरनाक आहे (आणि खरंही
) त्या (व्हॉट्स-अॅप) वर बंदी आली तर हा धागा पण बंद पडेल.
त्या (व्हॉट्स-अॅप) वर बंदी
त्या (व्हॉट्स-अॅप) वर बंदी आली तर हा धागा पण बंद पडेल. >> बघ ना ! नि मग त्या ऋण्म्याला धाग्यावेताळ पदवी मिळाली आहे तशी मला पदवी बहाल होईल. (मला बर्याच पदव्या सुचल्या आहेत पण कुर्हाडीचा दांडा गोतास काळ अशी गत नको व्हायला
)
Pages