Submitted by मानव पृथ्वीकर on 2 April, 2025 - 05:31
कायप्पावर, फेसबुक किंवा इतरत्र अनेकदा काहीच्या काही वाटावे असे निनावी लिखाण फिरत असते.
त्यातील काही खास वाटले तर आणि निनावी असले तरच शेअर करण्यास हा धागा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
फुलपाखरू पकडता पकडता अचानक
फुलपाखरू पकडता पकडता अचानक घोड्यावर बसवल्यावर धांदल होते>>>
मुळ फॉरवर्ड वाचायची हिम्मत नाही पण गोषवारा कळला. त्यावरुन वरिल वाक्याचा अर्थ असावा की ताई फुलपाखरे पकडत असताना म्हणजे मानसिक वय तितके असताना अचानक संसाराच्या घोड्यावर त्यांना बसवण्यात आले.
जर आपल्या पूर्वजांना विमान
जर आपल्या पूर्वजांना विमान कसे बनवायचे हे माहित नसते, तर आपल्याकडे #विमान हा शब्दही नसता.!
जर आपल्या पूर्वजांना विजेबद्दल माहिती नसते, तर आपल्याकडे #विद्युत हा शब्दही नसता.
जर "टेलिफोन" सारखे तंत्रज्ञान प्राचीन भारतात नव्हते तर आपल्याकडे #दूरसंचार हा शब्द का आहे?
अणू आणि इलेक्ट्रॉन माहित नव्हते, मग #अणु आणि #परमाणू हे शब्द कुठून आले?
शस्त्रक्रियेचे ज्ञान नव्हते, तर #शल्य_चिकित्सा हा शब्द कुठून आला?
विमान, विद्युत, दूरसंचार हे शब्द आपल्याकडेही हे तंत्रज्ञान असल्याचा स्पष्ट पुरावा आहेत.
व्याख्येशिवाय कोणताही शब्द अस्तित्वात असू शकत नाही.
सूर्यमालेत नऊ ग्रह आहेत आणि सर्व सूर्याभोवती फिरत आहेत, आणि विश्व अनंत आहे, हे आपल्या पूर्वजांना फार पूर्वीपासून माहीत होते. रामचरित्र मानसमधील काक भुसुंडी-गरुड संवाद वाचा, विश्वाचे असे वर्णन आहे, जे आजच्या विज्ञानालाही माहीत नाही.
१७-१८ व्या शतकात जेव्हा इंग्रज भारतात आले, तेव्हाच त्यांनी विज्ञान शिकले, १७ व्या शतकापूर्वी तुम्हाला एकही शास्त्रज्ञ सापडणार नाही.
१७-१८ व्या शतकापूर्वी युरोपात कोणताही शोध लागला नव्हता, इंग्रजांनी भारतात येऊन, शिकून, चोरून शोध लावला.
भारतातून केवळ पैसाच लुटला गेला नाही, तर ज्ञानाचीही लूट झाली.
#वेद हे #विज्ञान आहेत आणि आपले ऋषी वैज्ञानिक आहेत.
#जय #सनातन #जय #भारत
लेखक: अज्ञात
“ लेखक: अज्ञात” - हे एक बरं
“ लेखक: अज्ञात” - हे एक बरं झालं
फेफ
फेफ
फुलपाखरू पकडता पकडता अचानक
फुलपाखरू पकडता पकडता अचानक घोड्यावर बसवल्यावर धांदल होते >>

फेफ
फेफ
तो वरचा घोड्यावरचे फुलपाखरू लेख व्हॉट्सअॅप मधे फिरतोय. आणि ज्ये ना सर्कल्स मधे प्रचंड वाहवा मिळवतोय.
मी आहे म्हणून घोडा पळतोय.
याची लगाम धरणाऱ्याला कल्पना आहे.
तो फक्त बोलत नाही
खरं सांगते मला याची खंत नाही.
मातीलाही मो....ल असतं हे मी जाणते. >>>> यातून लगाम धरणारा महाचतुर आहे किंवा इंग्रजी बोलीभाषेत ज्याला ए पासून सुरू होणारा एक चार अक्षरी शब्द म्हणता येईल असा आहे आणि तरीही त्याचे हिला कौतुक आहे.
मोल शब्दामधले तीन डॉट्स काय आहेत?
मो...ल म्हणजे मोलच, पण मो वर
मो...ल म्हणजे मोलच, पण मो वर आघात दिला असावा, महत्त्व ठसवण्यासाठी!
वरच्या या 'अज्ञात' लेखकाला संगणक, गणकयंत्र, झालंच तर भ्रमणध्वनी वगैरे शब्द माहिती नसावेत.
फुलपाखराचे पंख लेवून कोणी
फुलपाखराचे पंख लेवून कोणी गरुडझेप कशी घेणार? बरं गरुडझेप घेऊ शकणाऱ्या व्यक्तीला इतर कुणी घोड्यावर कसं बसवेल?
आणि लेखकाला आई शब्द तर माहित
आणि लेखकाला आई शब्द तर माहित असेलच, म्हणजे त्याला AI बद्दल माहिती नसावी.
एवढं मोठं फॉरवर्ड न वाचता
एवढं मोठं फॉरवर्ड न वाचता प्रतिसाद वाचायला येते
मोल शब्दामधले तीन डॉट्स काय
मोल शब्दामधले तीन डॉट्स काय आहेत?>>>>>> ते तीन डॉट्स अनमोल आहेत.
हल्ली ए आय ची मदत घेऊन
हल्ली ए आय ची मदत घेऊन फॉरवर्ड्स छापतात बहुतेक. वरच्या फॉरवर्डमध्ये संजय आला नाही याचे वाईट वाटले व संजयच्या वतीने निषेध करावासा वाटला. तो आद्य टेलेपोर्टर. टेलेपोर्टिंग सुरु झाले की त्याचे नाव वरिल यादीत जोडले जाईल.
अंजु, मीही त्याचसाठी येते.
दशरथ राजा जन्मकथा.
दशरथ राजा जन्मकथा.
आजपर्यंत तुम्ही कधीही न वाचलेली न ऐकलेली रामायणातील ही गुढ कथा कृपया सर्वांनी वाचा..
राजा दशरथाचा जन्म एक अद्भुत पौराणिक कथा
पौराणिक धर्मग्रंथांनुसार, अयोध्येच्या राजा दशरथांचा जन्म ही एक विलक्षण आणि अद्भुत घटना मानली जाते. या घटनेचा संबंध त्यांचे वडील – महान शिवभक्त राजा अज – यांच्याशी आहे.
एकदा राजा अज दुपारची वंदना करत होते. त्या वेळी लंकेचा राजा रावण त्यांच्याशी युद्ध करण्याच्या उद्देशाने तेथे पोहोचला होता. पण राजा अज डोळे मिटून शिवध्यानात लीन होते, हे पाहून रावण काही वेळ त्यांना निरखून पाहत राहिला. वंदना संपवून राजा अजने जल अर्पण करताना नेहमीसारखे पुढे न टाकता ते मागे फेकले. हे पाहून रावणास खूप आश्चर्य वाटले. तो राजाजवळ गेला आणि विचारू लागला, “वंदनेनंतर जल नेहमी पुढे अर्पण केले जाते, आपण मागे का फेकले?”
तेव्हा राजा अज म्हणाले, “मी शिवध्यानात असताना मला एका योजन अंतरावर जंगलात एक गाय दिसली जी गवत खात होती आणि एक सिंह तिच्यावर हल्ला करत होता. त्या गायेस वाचवण्यासाठी मी जल मागे अर्पण केले.” हे ऐकून रावण अजूनच अचंबित झाला. त्याने त्या ठिकाणी जाऊन पाहिले, तर प्रत्यक्षात गाय शांतपणे गवत खात होती आणि त्या सिंहाच्या शरीरात अनेक बाण घुसलेले होते! त्याला समजले की ज्या व्यक्तीच्या केवळ जलाने बाण निर्माण होतात आणि दूरवरचे लक्ष्य साधता येते, त्याच्याशी युद्ध करणे अशक्य आहे. तो परत लंकेत निघून गेला.
याच काळात एक दिवस राजा अज जंगलात फिरताना एका अत्यंत सुंदर कमळाकडे आकर्षित झाले. ते कमळ एका जलाशयात होते आणि जसा राजा त्याच्या जवळ जात होता, तेवढेच ते अधिक दूर होत होते. शेवटी आकाशवाणी झाली — “हे राजन, तू संतानहीन आहेस, म्हणून तू या कमळास पात्र नाहीस.” ही वाणी ऐकून राजा अज खूप दुःखी झाले. परम शिवभक्त असूनही आपल्याला अपत्य नाही, ही गोष्ट त्यांना व्यथित करू लागली.
ही चिंता पाहून भगवान शिवाने धर्मराजाला बोलावले व आज्ञा दिली की, “एका वेदपाठी गृहस्थाला अयोध्येतील राजा अजकडे पाठवा, ज्यामुळे त्यांना पुत्रप्राप्ती होईल.” दुसरीकडे सरयू नदीच्या काठावर एका गरीब वेदपाठी दांपत्याची झोपडी होती. त्या वेदपाठीने एक दिवस राजा अजच्या दरबारात जाऊन आपली गरीबी व्यक्त केली. राजाने त्याला खजिन्यातील सुवर्णमुद्रा द्यायचा प्रयत्न केला, पण वेदपाठीने नकार दिला — “हे प्रजेसाठीचे धन आहे, मला तुमचे वैयक्तिक धन हवे.”
राजा अजने आपल्या गळ्यातील हार द्यायचा प्रयत्न केला, पण वेदपाठीने तेही नाकारले — “हेही राजाची संपत्ती आहे, प्रजेचेच.” हे पाहून राजा अत्यंत व्यथित झाले. एका गरीब वेदपाठीला ते काहीही देऊ शकत नाहीत, हे त्यांना असह्य वाटले. ते रात्री सामान्य मजुराचे रूप घेऊन एका लोहाराकडे गेले आणि त्याच्याकडे काम मागितले. पूर्ण रात्र ते लोखंडावर हातोडी मारत काम करत राहिले. सकाळी त्यांना त्याच्या मोबदल्यात एक टका मिळाला.
हा टका घेऊन ते पुन्हा वेदपाठीच्या घरी गेले. वेदपाठी घरी नव्हता. त्यांनी तो टका वेदपाठीच्या पत्नीला दिला आणि सांगितले की “हा तुमच्या पतीला द्या.” वेदपाठी घरी परतल्यावर त्याने तो टका जमिनीवर फेकला. तेव्हाच एक चमत्कार घडला. जिथे तो टका पडला, तिथे जमिनीत एक गड्ढा पडला. त्या गड्ढ्यातून एक सुवर्ण रथ बाहेर आला आणि आकाशात उडून गेला. असे करत करत तब्बल नऊ सुवर्ण रथ जमिनीतील गड्ढ्यातून बाहेर आले आणि आकाशात विलीन झाले.
दहाव्या रथात एक दिव्य तेजस्वी बालक होता. हा रथ मात्र जमिनीवर थांबला. वेदपाठी तो बालक घेऊन राजा अजकडे गेला आणि म्हणाला, “हे राजन, हा बालक तुमचाच पुत्र आहे. एका टक्याच्या पुण्याच्या मोबदल्यात मिळालेला. हे दहावे रथ तुमचे आहे, आणि हाच मुलगा तुमचा वारस.”
अशा अद्भुत रीतीने राजा दशरथाचा जन्म झाला. कारण ते दहा रथांच्या माध्यमातून प्राप्त झाले, म्हणून त्यांना "दशरथ" हे नाव प्राप्त झाले — जो दहा दिशांत रथ नेऊ शकतो असा पराक्रमी राजा!
- विष्णुगुप्त
शिवभक्त राजा अजाच्या तपश्चर्येने जन्मलेला दशरथ... आणि त्यांच्याच घरात जन्म घेतलेला श्रीराम!
ही कथा फक्त ऐकण्याची नाही मनात श्रद्धेने साठवून ठेवण्यासारखी आहे!
जर तुम्हालाही वाटते की आपल्या पौराणिक इतिहासात अशा कितीतरी अज्ञात पण अद्भुत गोष्टी दडलेल्या आहेत, तर
ही पोस्ट शेअर करा
पेज फॉलो करा
आणि अशाच आणखी कथा जाणून घेण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले राहा!
*आपली संस्कृती, आपला अभिमान !*
मोल शब्दामधले तीन डॉट्स काय
मोल शब्दामधले तीन डॉट्स काय आहेत?>>>>>> मोल्स असतील.
… मोल शब्दामधले तीन डॉट्स …
… मोल शब्दामधले तीन डॉट्स …
मुद्दाम घातलेत
“मोले” घातले हसावया 😀
“एका वेदपाठी गृहस्थाला
“एका वेदपाठी गृहस्थाला अयोध्येतील राजा अजकडे पाठवा, ज्यामुळे त्यांना पुत्रप्राप्ती होईल.” >>>> चहाटळपणासाठी अगदीच sorry . पण हे वाक्य प्रचंड loaded आहे.
स्वस्ती, मलाही तसेच वाटले
स्वस्ती, मलाही तसेच वाटले
दुसरीकडे सरयू नदीच्या काठावर एका गरीब वेदपाठी दांपत्याची झोपडी होती. त्या वेदपाठीने एक दिवस राजा अजच्या दरबारात जाऊन आपली गरीबी व्यक्त केली. राजाने त्याला खजिन्यातील सुवर्णमुद्रा द्यायचा प्रयत्न केला, पण वेदपाठीने नकार दिला — “हे प्रजेसाठीचे धन आहे, मला तुमचे वैयक्तिक धन हवे>>>>>>
हे गरिब लोक्स खुपच डोक्यावर चढतात. अजाच्या राज्यात राहणारा त्याची प्रजाच होतो ना? त्याचा हक्क आहे देऊ केलेल्या धनावर.
दशरथाचे फॉरवर्ड काहीही आहे
दशरथाचे फॉरवर्ड काहीही आहे
मला काय म्हणावं सुचत नाहीये यावर.
अज राजासारखी चमत्कारी धनुर्विद्या मात्र शिकायची आहे
बायदवे, रावणाचे वय काय होते नेमके? अज राजापासून पार रामापर्यंत होता तो? काय रेंज आहे!
“मोले” घातले हसावया >>
“मोले” घातले हसावया >>
गाय, गवत-बिवत ठीक आहे, पण
गाय, गवत-बिवत ठीक आहे, पण बिचार्या सिंहाचं काय? त्याने काय जेवायचं हे असले पाण्यातून बाण मारणारे ऋषी कम राजे असल्यावर? (माईंड यू, सिंह पण जंगलचा राजा आहे - ही ओळ, माँ, तू भीं तो एक माँ हैं च्या चालीवर वाचावी). गजब नाइन्साफी हैं!
बुडणाऱ्या गायीला तीन म्हशींनी
बुडणाऱ्या गायीला तीन म्हशींनी वाचवलं, राजापूरला. कुठे गेले ते महाशय म्हशींना नावं ठेवणारे, आळशी म्हणणारे.
दोघी आवडतात मला.
दुस-यांची मदत करण्यासाठी
दुस-यांची मदत करण्यासाठी कोणाकडे ही वेळ नसतो.. परंतु दुस-यांच्या कामात व्यत्यय आणण्यासाठी सर्वाकडे वेळ असतो, एवढ्या लवकर जगातली कोणतीच गोष्ट बदलत नाही, जेवढ्या लवकर माणसाची वृत्ती आणि दृष्टी बदलते.
मला दुसऱ्यांची मदत करता येत
मला दुसऱ्यांची मदत करता येत नाही.
स्वतःचीही नाही.
गायेस, गड्ढा, हे दहावे रथ,
गायेस, गड्ढा, हे दहावे रथ, आमच्यासोबत जोडलेले राहा
>>>>
सध्या इंग्लिश माध्यमात शिकणारी मुलं किंवा सो कॉल्ड मराठी पत्रकार जे बोलतात त्याहीपेक्षा भयाण मराठी आहे.
आमच्यासोबत जोडलेले राहा>>>>
आमच्यासोबत जोडलेले राहा>>>>
हा कोण राहा? कुठल्या रथाला जोडलाय वगैरे विचार करुन झाला

,,,
,,, ....
अरे पण 'एकरथ' किंवा नुसतंच
अरे पण 'एकरथ' किंवा नुसतंच 'रथ' असं बाळाचं नाव चाललं नसतं का?
दश'रथ' ठेवायचं म्हणून उगाच ९ सोन्याचे रथ ढगात पाठवायला लागले ना!
मला दुसऱ्यांची मदत करता येत
मला दुसऱ्यांची मदत करता येत नाही.
परफेक्ट!!
स्वतःचीही नाही.
>>>
'अरे मी बुडतोय. वाचवा! वाचवा!
'अरे मी बुडतोय. वाचवा! वाचवा!'
'मी तुमची काही मदत करू शकतो का?'
'नाही, तुम्ही माझी मदत करू शकत नाही' (बुडतो)
बुडणाऱ्याला "मी तुमची
बुडणाऱ्याला "मी तुमची/तुम्हाला काही मदत करू शकतो का?" विचारणे फार क्यूट आहे मोरोबा
Pages