Submitted by ऋन्मेऽऽष on 3 January, 2025 - 02:37
२०००+ पोस्ट झाल्या म्हणून नवीन धागा
बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा निर्णायक धुमाकूळ इथे घालूया 
क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/83589
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
एकूण भारत हरला की तुम्हाला
एकूण भारत हरला की तुम्हाला आणंदाच्या उकळ्या फुटतात.>>> अहो मी इंग्लंडचं नागरिकत्व घेतलंय. रोहित शर्मा आणि कोहली हे पण इंग्लंडकर झालेत. आमचा देश जिंकला की आनंद होणारच. समोर कोणतीही टीम असू दे. बघू, सध्या कोहली आणि शर्माला आमच्या टीमकडून खेळवायची प्लॅनिंग सुरू आहे. झालं तर चांगलंच आहे.
लोकहो, बोकलत मजा करतात.
काय बोलायचं या लोकांना. लगेच चिडतात हे. इकडे इंग्लंडमध्ये पण एक मदरस्पीकर्स नावाची वेबसाईट आहे त्यावर सगळे मस्त मजेत चर्चा करत असतात. भारत हरला तर इंग्लंडचं कौतुक इंग्लंड हारली तर भारताचं कौतुक. इकडे काय वेगळाच प्रकार आहे. म्हणून मी इकडे जास्त येत नाही हल्ली.
त्यांच्यासाठी असे शब्द वापरू नका.>>>
*अहो मी इंग्लंडचं नागरिकत्व
*अहो मी इंग्लंडचं नागरिकत्व घेतलंय.* - नुसतं लेबल बदलून फरक नाही पडत; तरीही ' मायबोली ' वर यावंसं वाटतंच ना !!
625 - 8 !!
625 - 8 !!
3 दिवस पावसाचा अंदाज होता तो धावांचा की काय?
३११ धावांच्या ओझ्याखाली आमची
३११ धावांच्या ओझ्याखाली आमची जबरदस्त फलंदाजी कशी प्रत्युत्तर देते हे पाहणे आता. उद्या इंग्लंडला ५० शतकात ३५० धावांचे टार्गेट द्यावे असे वाटतेय.
“ 3 दिवस पावसाचा अंदाज होता
“ 3 दिवस पावसाचा अंदाज होता तो धावांचा की काय?”
टीम सिलेक्शन, बॉलर रोटेशन, बॅट्समेनचं शॉट सिलेक्शन सगळंच क्वेश्चनेबल आहे. जर पाच मॅचेस साठी निवडलेला प्रसिध २ बॉलर्सच्या इंज्युरीनंतर सुद्धा, दोन मॅचेसनंतरच टीममधे येऊ शकत नसेल तर त्याची निवड कुठल्या बेसिसवर झाली होती?
एकंदरीतच गंभीर अँड को. साठी प्रश्नांची मालिका आहे.
व्होक्स
व्होक्स
१ल्या षटकात हॅटट्रिक वर. २ बाद ०
०-२ पहिल्या ओव्हरला.
०-२ पहिल्या ओव्हरला.
जैस्वाल सुदर्शन गेले तंबूत.
पाच सेशन्स खेळण्याची क्षमता नसल्याने ड्रॉ ची शक्यता नाहीच.
विजयाचा तर कितीही आशावादी माणूस असला तरी विचारही होऊ शकत नाही.
तस्मात...
गेली ही पण मॅच.
1-3 . पंत या डावात येणार
1-3 . पंत या डावात येणार नाहीये, म्हणजे 3 बाद 1 धाव. आजचा दिवस खेळले तरी खूप झले.
3 दिवस पावसाचा अंदाज होता तो
3 दिवस पावसाचा अंदाज होता तो धावांचा की काय
पार एकतर्फी होतोय हा सामना..
परदेशात इंग्लंड मध्ये आहोत असे फिलिंग पहिल्यांदा आले या मालिकेत..
3 दिवस पावसाचा अंदाज होता तो
3 दिवस पावसाचा अंदाज होता तो धावांचा की काय?
>> पहिल्या दोन दिवसांनंतर पाचव्या दिवशी आहे असे होते. अर्थात ३०० चा लीड घेऊन खेळणार असल्यामूळे आपल्यालच नडणार असे दिसतेय.
बिचार्या कंबोजचे काय झाले ह्याचे उत्तर खरच मिळायला हवे.
*अर्थात ३०० चा लीड घेऊन
*अर्थात ३०० चा लीड घेऊन खेळणार असल्यामूळे आपल्यालच नडणार असे दिसतेय.* - अपेक्षित तीन ऐवजी एकच दिवस पाऊस पडणार असेल तर निदान अख्खा 5वा दिवस तरी पड म्हणावं त्याला !
*एकंदरीतच गंभीर अँड को. साठी प्रश्नांची मालिका आहे.* +१ आणि, हे केवळ ह्या सामन्यामुळेच असं नाही !
5 वा दिवस पडून काय फायदा..
5 वा दिवस पडून काय फायदा..
जर सामना आजच संपत असेल..
आज लंच ते उद्या लंच पर्यंत पडला तर आता दोनच सेशन खेळावे लागणार म्हणून जरा जिद्द तरी दाखवू.. अन्यथा सोडून देतील हे आजच सामना
*जर सामना आजच संपत असेल..* -
*जर सामना आजच संपत असेल..* - इतकी पण वाईट नाहीत आपली पोरं !!
धीर धरी रे, धीरापोटी
असती मोठी फळे गोमटी II
<<अहो मी इंग्लंडचं नागरिकत्व
<<अहो मी इंग्लंडचं नागरिकत्व घेतलंय.>>
अरे व्वा. मज्जाय नि काय!
मग बरोबर आहे. त्याला विघ्नसंतोषी नाही म्हणता येणार.
अगदी आनंदाने लिहा. इथे उगाच आणखी भांडणे नकोत, आहेत काही ती पुरे आहेत.
आमच्या अमेरिकेची टीम अजून बाल्यावस्थेत आहे, म्हणून इंग्लंड भारत पैकी माझा पाठिंबा भारतालाच.
माझ्या हयातीत तरी मला भारताशिवाय इतर कुणाला पाठिंबा द्यायची वेळ येणार नाही.
इंग्लंड च्या दहाव्या खेळाडूनी
इंग्लंड च्या दहाव्या खेळाडूनी 54 बॉल खेळून 47 मारले
यावरून कळतंय की किती ऑर्डिनरी बॉलिंग होती आपली
राहुल शतक
राहुल शतक
गिल दीडशतक
पंत फलंदाजीला येत अर्धशतक
जडेजा पाऊण शतक
सुंदर किंवा शार्दुल मध्ये एक अर्धशतक
शेपटीचे मिळून अर्धशतक...
जोडा बघू जरा किती होतात..
500 पर्यंत जात आहेत वाटते..
जे आपल्या वाटणीच्या धावा करणार नाही तितका पाऊस पडावा..
इंग्लंड च्या दहाव्या खेळाडूनी
इंग्लंड च्या दहाव्या खेळाडूनी 54 बॉल खेळून 47 मारले
>>>>>
ते खरे तर छान वाटत होते...
ते खेळले तर आपण सुद्धा खेळू..
पण या दोघांनी पहिल्याच ओव्हरला विकेट घालवली.. ओपनर टॉप ऑर्डर आहात, नवीन बॉल खेळायला हवा होता..
पंतच्या पदार्पणाच्या सिरीजला
पंतच्या पदार्पणाच्या सिरीजला आपल्या अश्याच नवीन चेंडूवर दनादन विकेट पडल्या होत्या. मग राहुल आणि पंत यांनी शतके मारली होती. ते पुरेसे ठरले नव्हते. पण पुन्हा असे काही व्हावे.
१५० ओवर खेळायच्या आहेत..
१५० ओवर खेळायच्या आहेत..
१७ झाल्या..
इंग्लडचा दुसरा रिव्ह्यू गेला.
इंग्लडचा दुसरा रिव्ह्यू गेला.. आता घ्यायला घाबरतील
अजून अर्धा तास.. एक सेशन विकेटलेस गेले की आभाळाएवढा विश्वास येईल.. ड्रेसिंग रूम वातावरण बदलेल
एक सेशन विकेटलेस>>>>> एक
एक सेशन विकेटलेस>>>>> एक विकेट गेली की सामना लगेच संपेल
81 - 2
81 - 2
आपल्या फलंदाजीबद्दल मी आशावादी आहे !!
This is the beauty of test
This is the beauty of test cricket!
पहिल्या ओव्हरला दोन विकेट.
नंतर पूर्ण सेशन विकेट नाही.
खेळपट्टी अशीच चांगली राहिली तर गिल रनमशीन आहे. उद्याचाही दिवस खेळून काढेल..
राहुल एक चिवट आहे आणि त्यानंतर विश्वास फायटर जडेजावर...
122 - २ !!
122 - २ !!
४६ ओवर खेळलो... २ च विकेट..
४६ ओवर खेळलो... २ च विकेट..
ड्रिंक्स!
या आधी शून्य धावा दोन विकेट
या आधी शून्य धावा दोन विकेट अशी एखाद्या संघाची स्थिती कसोटीच्या इतिहासात ५२ वेळा झाली होती.
त्यानंतर तिसऱ्या विकेटसाठी फक्त २ वेळा शतकी भागीदारी झाली होती.
१०६ या आधी सर्वाधिक होती.
या दोघांची सध्या १३६ झाली आहे.
द्विशतक झाले राहुलचे..
द्विशतक झाले राहुलचे.. चेंडूंचे
“ आपल्या फलंदाजीबद्दल मी
“ आपल्या फलंदाजीबद्दल मी आशावादी आहे” - उम्मीदपें दुनिया कायम हैं!
जर आपण या मालिकेत १-३ अश्या
जर आपण या मालिकेत १-३ अश्या पिछाडीवर पडलो तर ते या संघावर अन्यायकारक ठरेल.. या एकूण मालिकेतील जास्त सेशन आपणच वरचढ होतो. त्यामुळे उद्या सामना अनिर्णीत राखणे हे डीझर्व करतात आणि तसे व्हावे ही मनापासून इच्छा !
उद्या फोरकास्ट नुसार वातावरण पावसाचे आणि ढगाळ आहे. त्याने नवीन चेंडूवर जी मदत मिळेल तो कृशिअल पिरियड असेल. तो या दोघांनीच खेळून काढावा...
*एकूण मालिकेतील जास्त सेशन
*एकूण मालिकेतील जास्त सेशन आपणच वरचढ होतो.* - याला फारसं महत्त्व देण्यात अर्थ नाही. कधी कधी डावपेच म्हणूनही कांहीं सत्रात एखादा संघ संथ खेळतो किंवा हाराकिरी करून बाद होतो. तिथे वरचढ वाटणारा संघ उलट सापळ्यात अडकत असतो. Don't judge by battles , see who wins the war !
Pages