Submitted by ऋन्मेऽऽष on 3 January, 2025 - 02:37
२०००+ पोस्ट झाल्या म्हणून नवीन धागा
बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा निर्णायक धुमाकूळ इथे घालूया 
क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/83589
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
रोहित रीटायर झाल्यामूळे सध्या
रोहित रीटायर झाल्यामूळे सध्या संक्रांतीचा फेरा पंतवर आलेला दिसतोय. मधे जाडेजा , राहुल नि जैस्वालची पण वर्णी लागते कि काय अशी भिती वाटली होती पण ते मधे एखाद दुसरा सामना न चांगला खेळल्यामूळे बिचारा पंत एकटाच कचाट्यात सापडलाय. अश्विनबद्दल काय मत आहे मंडळी ? त्याचेही ग्रह फिरलेले दिसत आहेत
>>>>>>
थोडक्यात मी जेव्हा तेव्हा सगळ्यांचे कौतुक करून झाले आहे. पंत आणि शर्मा हे विशेष आवडीचे असले तरी...
ऑ रा
ऑ रा
म्हणजे काय?
Submitted by नन्द्या७५
>>>>>>>
In the context of celebrities, "aura" generally refers to the distinctive atmosphere or impression they project, often associated with their charisma, talent, and overall public persona. It's the intangible quality that makes them captivating and influential. This "aura" can be perceived as stylishness, confidence, or an exceptional ability, and it can be a key factor in their popularity and success.
In modern slang, "aura" often describes a person's cool factor, confidence, or stylishness.
Psychological Aspect:
Some believe that a celebrity's aura has a psychological basis, stemming from their charisma and the way they carry themselves.
Impact on Others:
A strong aura can draw people in, inspire admiration, and make others want to emulate the celebrity.
हे वरचे मराठीत लिहा ना!
हे वरचे मराठीत लिहा ना! म्हणजे आमच्या सारख्या इंग्रजांपेक्षा इंग्रजीवर जास्त राग असलेल्यांनाही कळेल.
ओके
ओके
सेलिब्रिटींच्या संदर्भात, "ऑरा" म्हणजे सामान्यतः त्यांच्या करिष्मा, प्रतिभा आणि एकूणच सार्वजनिक व्यक्तिमत्त्वाशी संबंधित विशिष्ट वातावरण किंवा छाप. ही अमूर्त गुणवत्ता त्यांना मोहक आणि प्रभावशाली बनवते. ही "ऑरा" स्टायलिश, आत्मविश्वास किंवा अपवादात्मक क्षमता म्हणून समजली जाऊ शकते आणि ती त्यांच्या लोकप्रियतेत आणि यशात एक महत्त्वाचा घटक असू शकते.
आधुनिक बोलीभाषेत, "ऑरा" बहुतेकदा एखाद्या व्यक्तीच्या थंड घटकाचे, आत्मविश्वासाचे किंवा स्टायलिशपणाचे वर्णन करते.
मानसिक पैलू:
काहींचा असा विश्वास आहे की सेलिब्रिटींच्या ऑराचा मानसिक आधार असतो, जो त्यांच्या करिष्मा आणि ते स्वतःला कसे वागवतात यावरून निर्माण होतो.
इतरांवर परिणाम:
एक मजबूत ऑरा लोकांना आकर्षित करू शकते, प्रशंसा करण्यास प्रेरित करू शकते आणि इतरांना सेलिब्रिटीचे अनुकरण करण्यास प्रवृत्त करू शकते
"अश्या अनेक संस्मरणीय खेळ्या
"अश्या अनेक संस्मरणीय खेळ्या आहेत.* - खरंय व अशा खेळीच क्रिकेटचा रसरशीत गाभा आहे . खरा क्रिकेटप्रेमी अशा खेळीचा भुकेला असतो/ असावा !!!
Trivia
भारताच्या पहिल्या चार फलंदाजांच्या प्रथम श्रेणी सामन्यांमधील धावांपेक्षा जास्त धावा इंग्लंडच्या या कसोटीतील शेवटच्या चार फलंदाजांच्या आहेत !
त्या नवीन आलेल्या डॉसनच्या
त्या नवीन आलेल्या डॉसनच्या खूप धावा आहेत.. 18 शतके आहेत..
पण गमतीशीर आकडेवारी आहे..
ज्यांना इथे असे शेअर करायला आवडते त्यांनी प्लीज शेअर करत राहा.. प्रत्येकाने कोणाला काय वाटेल याचा विचार न करता आपला फ्लेवर टाका. अन्यथा चर्चा खूप साचेबद्ध होते. तिला एखाद्या चौकटीत बांधून ठेवू नका.
मूड गेला सिरीजचा
मूड गेला सिरीजचा
*अन्यथा चर्चा खूप साचेबद्ध
*अन्यथा चर्चा खूप साचेबद्ध होते.* - फक्त, क्रिकेट हा एक मैदानी खेळ आहे, आकडेवारीचा नाही, याचं भान असावं, इतकंच ! कारण, माझ्यासारखे कांहीं बिचारेही हा क्रिकेटचा धागा आहे असं समजून इथे येतात. !!!
पंत ड्रेसिंग रूम मध्ये बसला
पंत ड्रेसिंग रूम मध्ये बसला आहे पांढऱ्या कपड्यात. गरज पडली तर फलंदाजी करायला.. अशी न्यूज आहे.
वेडा आहे का तो.. लास्ट विकेटवर स्ट्राईक द्यायला जरी आला आणि पुन्हा तिथे मार बसला तर आयुष्यातून उठेल. एकदा मरणाच्या दारातून परत आल्याने सगळे काही शक्य वाटत आहे बहुधा त्याला.
असो,
पण सुंदर आणि ठाकूर यांनीच शतकी भागीदारी करावी आणि अशी गरज पडूच नये.
क्रिकेट हा एक मैदानी खेळ आहे,
क्रिकेट हा एक मैदानी खेळ आहे, आकडेवारीचा नाही...
>>>>>
माझे मत वेगळे आहे.
पहिले म्हणजे वरील वाक्यात फक्त हा शब्द हवा.. म्हणजे
क्रिकेट हा एक मैदानी खेळ आहे, फक्त आकडेवारीचा नाही..
आणि दुसरे म्हणजे विविध प्रकारची आकडेवारी क्रिकेट या खेळाला रोचक बनवते. अन्यथा इतर कित्येक खेळात नुसते गोल आणि पॉइंट मोजणे असते.
क्रिकेटच्या सर्व पैलूंचा आनंद उचलतो मी
माझ्यासारखे कांहीं बिचारेही
माझ्यासारखे कांहीं बिचारेही हा क्रिकेटचा धागा आहे असं समजून इथे येतात. !!
>>>>
मी सुद्धा क्रिकेट संदर्भात आकडेवारी आणतो. कुठल्या खेळाडूचे कुठल्या हिरोईनशी अफेअर आहे वगैरे मैदानाबाहेरील चर्चात मी कधी आयुष्यात रस घेतला नाही.
आणि जे लोकं क्रिकेट धागा म्हणून नाही तर फक्त मला काहीतरी बोलायला येतात त्यांना तर मी उत्तर सुद्धा देत नाही.
पंतने आत्ता खेळायला येणं खरंच
पंतने आत्ता खेळायला येणं खरंच संघाच्या हिताचं होतं ? स्टोक्सचा एक चेंडू आत्ता त्याच्या छातीला स्पर्शून दंडावर आदळला ! पंत ही गोलंदाजी खेळण्याच्या अत्युत्तम शारीरिक व मानसिक स्थितीत आहे असं वाटत नाही. त्याने आणखी दुखापत ओढवून घेवू नये, ही प्रार्थना. !!
“ पंतने आत्ता खेळायला येणं
“ पंतने आत्ता खेळायला येणं खरंच संघाच्या हिताचं होतं ?” -
पहिली इनिंग आहे. जर खूप मोठी पार्टनरशिप होणार नसेल तर थोड्याफार रन्सने फार मोठा फरक पडणार नाहीये. पंतने त्याची इंज्युरी रिस्क करू नये असं वाटतं.
What a fighting spirit Pant!
What a fighting spirit Pant! Hats off!
पण फलंदाजीला नको यायला हवे होतेस तू..
काही गंभीर दुखापत होण्याऐवजी बाद झाला तर परवडेल असे वाटत आहे..
कारण आता तू जितका जास्त खेळणार धावणार तितका तुला पुढे जास्त त्रास होणार..
च्यायला...
च्यायला...
सुंदर गेला..
कंबोज गेला...
पंत आहे अजून..
५० झाले..
५० झाले..
मारला .. आर्चर सिक्स.. स्टोक्स फोर..
Respect
पंत गेला..
पंत गेला..
पण अर्धशतक करून गेला..
डब्ल्यूटीसी सर्वाधिक धावा आणि भारतातर्फे सर्वाधिक सिक्स असे दोन रेकॉर्ड करून गेला..
इंग्लडमध्ये एका सिरीजमध्ये सर्वाधिक धावा करणारा विकेटकीपर हा सुद्धा विक्रम आज झाला..
त्याने इंग्लड विकेट कीपरना सुद्धा मागे सोडले..
हे करताना भारताचा स्कोअर ३५० करून गेला..
आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे संघाचे स्पिरीट वाढवून गेला..
टेक ए बो ऋषभ पंत ❤️
पंत आज फलंदाजीला का आला?
पंत आज फलंदाजीला का आला?
तो त्याच्या चाहत्याच्या या विधानाची लाज राखायला आला !
पंत एखादे अर्धशतक तर मारेलच हे पंतबाबत सांगता येते....
पण हेच खात्रीने दुसऱ्या कुठल्या खेळाडूबद्दल नाही सांगता येत..
आजच्या तारखेला सर्वात भरवश्याचा फलंदाज आहे..
Submitted by ऋन्मेऽऽष on 22 July, 2025 - 16:50
वेडेपणा केलास... पण जिंकलेस मित्रा ❤️
कंभोज शून्यावर बाद झाला, आणि
कंभोज शून्यावर बाद झाला, आणि पहिल्याच षटकात 12 धावा दिल्या. 120 km ची गती आहे
आज पंत ला पाहून कुंबळे आठवला
आज पंत ला पाहून कुंबळे आठवला
जबडा तुटलेला असतानाही लारा ची विकेट घेणारा
अनावश्यक धाडस होतं
पण टेक अ बो...
जाम जिगरा आहे...
13 ओवर 69-0
13 ओवर 69-0
गोलंदाजी निष्प्रभ वाटत आहे सध्या. शार्दुल ठाकूरने येऊन एखादी विकेट काढून द्यायला हवी... किंवा रन रोखायला हवेत जरा.. इंग्लड वेगात पळत आहेत
इंग्लंड डॉसनवर विश्वास
इंग्लंड डॉसनवर विश्वास दाखवतात तर आपणही अधून मधून जडेजा, सुंदरला कांहीं ओव्हर्स देवून बघायला काय हरकत आहे ?
माझ्यासारखे कांहीं बिचारेही
माझ्यासारखे कांहीं बिचारेही हा क्रिकेटचा धागा आहे असं समजून इथे येतात. !! >> मम ! आधीच्या पोस्टलाही मम भाऊ. एक व्यक्ती वगळता बाकीचे सगळे ह्याच हेतूने येतात असे धरायला हरकत नाही. ह्या व्यक्तीला वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या प्रकारे सांगितल्यावरही ती आपला हेका सोडत नाही ह्यात फक्त त्या व्यक्तीची विचारसरणी उघड होते, आणखी काय !
अधून मधून जडेजा, सुंदरला
अधून मधून जडेजा, सुंदरला कांहीं ओव्हर्स देवून बघायला काय हरकत आहे ? >> कालचे पिच बघून तेच दोघे बॉलिंग करतील कि काय असे वाटले होते.
पहिली इनिंग आहे. जर खूप मोठी
पहिली इनिंग आहे. जर खूप मोठी पार्टनरशिप होणार नसेल तर थोड्याफार रन्सने फार मोठा फरक पडणार नाहीये. पंतने त्याची इंज्युरी रिस्क करू नये असं वाटतं. >> मलाही असेच वाटलेले पण बहुधा पुढच्या दोन दिवसांमधे पाऊस नाही त्यामूळे आयडीयल बॅटींग कंडीशन्स असतील (नि शेवटच्या दिवशी पाऊस असल्या मूळे चौथी इनिंग चॅलेंजिंग होउ शकेल) त्यामूळे पहिल्या इनिंगमधल्या धावा निर्णायक ठरू शकतील असा विचार केला गेला असावा. हॅट्स ऑफ टू पंत ! मला कुंबळे चि वेस्ट इंडीजमधली नि ग्रिनीजची इंग्लंडमधली इनिंग आठवली. काय जोगर लागत असेल राव !
त्यावरून दोन मुद्दे :
१. पंत ला शॉर्ट पिच्ड किंवा यॉर्क खेळणे कठीण जाईल हे लक्षात घेऊनही तसा मारा कमी केला गेला. पण त्याच बरोबर पंत सिंगल्स घेत असताना बॉलर्स फॉलो थ्रूच्या शेवटी जिथे थांबले तिथेच नि बरेचदा पंतच्या वाटेत थांबले होते असे वाटले. (हे मुद्दामहून असेल असे नाही) . अशा वेळी अॅप्रेशियेशन झाल्यावर प्लेयरला प्लेयर म्हणून ट्रीट करणे योग्य कि नाही हे संभ्रमाचे आहे.
२. एकंदर पावसाचा अदमास बघता स्टोक्स चा पहिली बॉलिंङ घेण्याचा निर्णय मला सयुक्तिक वाटला होता. त्यामूळे गिल चे "गूड टॉस टू लूज " हे झेपले नाही. हे नुसते ब्रेव्ह फेस होते असे अजिबात वाटले नाही . आपण पाऊस वगैरे गोष्टी लक्षात का घेत नाही ? अनुभवांमधून कधी शिकणार ?
चांगलीच धुलाई चालली आहे बेन
चांगलीच धुलाई चालली आहे बेन आणि क्रौले यांच्याकडून.
सगळ्या ओव्हर झाल्यास आजच ३०० क्रॉस करतील.
जेव्हा गोलंदाजांना मदत नसते
जेव्हा गोलंदाजांना मदत नसते तेव्हा इंग्लड अशीच खेळते आणि गेम मध्ये पुढे निघून जाते, म्हणजे नंतर मदत मिळू लागली आणि विकेट गेल्या तरी त्यांच्या धावा झाल्या असतील.
हाच बाझबॉल आहे.
गिल चारही टॉस हरला आहे.
गिल चारही टॉस हरला आहे.
पाऊसपाणी बघून काय निर्णय घ्यायचा याची वेळच बिचार्यावर आली नाही.
आतापर्यंत झालेल्या तिन्ही कसोटी सामन्यात आपण पहिले चार दिवस इन्ग्लंडला वरचढच होतो.
पण जिंकता एकच कसोटी आली.
आज या चौथ्या कसोटीत इन्ग्लंड आपल्याला वरचढ ठरत आहे. इथून पुढे काय होते बघूया.
जर गोलंदाज इन्ग्लंडला रोखू शकले नाहीत तर ड्रॉ हा पर्याय सुद्धा डोक्यात ठेवायला हवा.
पंतचे धावबाद होणे आणि एंज्युरी या गोष्टींनी दोन कसोटीत मोठे फटके दिले आहेत.
पाऊसपाणी बघून काय निर्णय
पाऊसपाणी बघून काय निर्णय घ्यायचा याची वेळच बिचार्यावर आली नाही. >> समोरचा काय सांगतो हे समजून उत्तरादाखल पोस्ट करायचीच नाही असे असिधारा व्रत घेतलेल्या मानवा, माझे पोस्ट गिल टॉस जिंकला किंवा नाही ह्याबद्दल नसून जिंकला असता तर काय केले असते ह्याबद्दलच्या त्याच्या विचारपद्धतीबद्दल आहे.
जर गोलंदाज इन्ग्लंडला रोखू शकले नाहीत तर ड्रॉ हा पर्याय सुद्धा डोक्यात ठेवायला हवा. >> ह्या गाण्याचा आनंद घ्या https://www.youtube.com/watch?v=cwI-PsOzcBI
Pages