क्रिकेट - ९

Submitted by ऋन्मेऽऽष on 3 January, 2025 - 02:37

२०००+ पोस्ट झाल्या म्हणून नवीन धागा

बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा निर्णायक धुमाकूळ इथे घालूया Happy

क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/83589

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Sky वर परवा लंच ब्रेक मध्ये रहाणेची मुलाखत घेत होते. रहाणे सध्याच्या माहौलमध्ये कसा मिस फिट आहे हे समजले.

मोहालीमधे लक्षमण ने जसा थोडा आक्रमक अ‍ॅप्रोच घेतला होता तसा काल जडेजाने घेतला असता (मान्य कि सॉफ्ट बॉल नि इंग्लंडची फिल्ड प्लेसमेंट बघता उचलून मारयला लागले असते नि रिस्क वाढली असती). तर काही फरक पडला असता का ? काल शेवटच्या दो विकेट्स असताना आपण जवळजव्ळ ओव्हरला १ धाव ह्या वेगात खेळत होतो त्या रेटने ८० धावा काढायला नवीन बॉलचा सामना करायला लागला असता हा धोका होता हे बघता मधे थोडे आक्रमक खेळण्याची गरज होती का ? बुमरा नि सिराज जुन्या बॉलपुढे जेव्हढे काँफिडंट होते तेव्हढे नविन बॉलसमोर असते का ह्याबद्दल मला शंका आहे.

भाऊ तुमच्या किश्श्यासारखे केले गेले असते तर टेस्ट क्रिकेट ९० मधे बंद होऊन गेले असते. Happy

सरळसोट Calculation ने ओव्हरला 1 धाव असे वाटते पण तसेच होत नाही. कधी दोन कधी चार तर कधी समोरच्या तळाच्या फलंदाजाच्या धावा असे काहीतरी मिळायची शक्यता राहते. नंतर आलेल्या बशीरला एखाद दुसरा सिक्स फोर सुद्धा मारला असता जडेजाने.. आणि सामना नवीन बॉल येण्याआधीही संपवला असता.
जरी दहा बारा धावा शिल्लक राहिल्या असत्या तरी नवीन बॉल आला आणि पहिल्या दुसऱ्याच बॉलला विकेट गेली असेच झाले नसते. त्यातही अश्याच प्रकारे सहा सात ओवर खेळून सामना संपवता आला असता. नव्या बॉल वर दहाबारा चेंडू सिराज खेळलाही असता. किंबहुना नवीन बॉलवर सिराजच्या धावा निघायची शक्यताही वाढली असती.

सामना कुठच्या कुठून इतके जवळ आल्यावर त्यातही अमुकतमुक केले असते तर फायदा झाला असता असे वाटणे स्वाभाविक असते. पण तसे करण्यात आधीच बाद झाले असते तर आज ही चर्चाच नसती.

एखादी प्रोसेस फॉलो केली तर त्यावर पूर्ण विश्वास ठेवा हे तत्व जडेजा पाळत होता..

पण अचानक बुमराह चूक करू लागला. जडेजा नको नको म्हणत असतानाही बुमराह संयम सोडून बॅट फिरवत होता. ते सुद्धा एकही बॉल बॅटवर लागत नसतानाही, रेड सिग्नल मिळत असतानाही फिरवत होता. इतके छान खेळत होता आणि स्वतःच्याच मेहनतीवर पाणी फिरवले असे झाले. पण सिराजने मात्र जडेजावर पूर्ण विश्वास ठेवून तीच प्रोसेस पुढे फॉलो केली त्यामुळे बुमराह गेला असे वाटलेच नाही.

पण शेवटी दुर्दैव आड आले..... चटका लावून गेली त्याची विकेट.

*..तर काही फरक पडला असता का ? * -
असमिजी, माझ्याही मनात असं आलं होतं. कदाचित, पावसाची व परिणामी ड्रॉ ची शक्यताही भारताने लक्षात घेवून रिस्क घेण्यापेक्षा वेळ काढणं योग्य समजलं असावं. अर्थात, मला असं वाटण्याला कांहीं ठोस कारण नाही, हेही मान्य.

जरी दहा बारा धावा शिल्लक राहिल्या असत्या तरी नवीन बॉल आला आणि पहिल्या दुसऱ्याच बॉलला विकेट गेली असेच झाले नसते. त्यातही अश्याच प्रकारे सहा सात ओवर खेळून सामना संपवता आला असता. >> पहिल्या दोन सामन्यांमधे दणकून खेळलेला जैस्वाल दोन्ही डावांमधे दोन ओव्हर्स मधे बाद झाला तेंव्हा बुमरा नि सिराज खेळू शकले असते का ह्याबद्दल मला शंका आहे. आधीच्या पाच इनिंग मधे असे कधी वाटलेले दिसत नाही. चर्चा ह्यासाठी की - "कधीही काहीही होउ शकते"च्यापुढे जाऊन स्टॅस्टिकली काय केले असता आपण मॅच जिंकण्याच शक्यता वाढवू शकतो हे चाचपडून पाहणे ज्यातून पुढे शिकता येते का बघणे.

पावसाची व परिणामी ड्रॉ ची शक्यताही भारताने लक्षात घेवून रिस्क घेण्यापेक्षा वेळ काढणं योग्य समजलं असावं. >> इंटरेस्टींग भाऊ. मी आपण ड्रॉ चा विचार पण करत असू असे धरले नव्हते.

जयस्वालने काय केले. 200 मारणाऱ्या गिलने यंदा काय केले. या तुलनाच चुकीच्या आहेत. तसेही ते नवीन बॉल सावधपणे खेळून काढण्यात नाही तर अतिहुशारी करून मारण्यात गेले होते.

आणि अमुक तमुक ओव्हरमध्य इतक्या धावा करायच्या आहेत तर इतक्या वेगाने खेळावे असा स्टॅस्टिकली विचार केला गेला तर क्रिकेट कागदावर खेळले गेले असते, न की मैदानावर.. कारण तिथे समोरचा संघ काय डावपेच आखतो, कसे क्षेत्ररक्षण लावतो, कोणते गोलंदाज वापरतो या गोष्टी सुद्धा येतात. एकच संघ क्रिकेट खेळत नसतो.

जडेजा काय करतोय हे लक्षात आल्यावर नवीन बॉल पिक्चरमध्ये येणार हे माझ्याही डोक्यात आलेले. पण त्यावेळी नवीन बॉल पर्यंत पोहोचायला जितके ओवर खेळावे लागणार होते तेच मुळात अफाट होते. ती अफाट कामगिरी पार पाडताना त्यात आणखी नवीन बॉल कसा टाळावा याचा विचार तिथवर पोहोचायच्या इतके आधीच करून वर्क होत असलेला प्लान बदलणे हा आत्मघातीपणा ठरला असता. वर म्हटल्याप्रमाणे फक्त काही धावांचा फरक शिल्लक राहणार होता आणि तेच होत होते. जो फरक जडेजाने कदाचित बशीर समोर रिस्क घेऊन मिटवला असता किंवा नवीन बॉलचा सामना करायचे ठरवले असते. जो काही निर्णय होता तो वेळ आल्यावर, लक्ष्याच्या जवळ आल्यावर त्याने घेतला असता न की लक्ष्य दूर असताना घ्यावा असा विचार त्याने केला जो मला योग्यच वाटतो.

काही करोड क्रिकेट एक्स्पर्ट असलेला देश आहे आपला. प्रत्येकाची मते एकसारखी नसणारच. आणि अशा केसेस मध्ये कोणी चूक कोणी बरोबर असेही नसते. त्यामुळे कोणाचे मत खोडायचे नाहीये. ते आपल्या जागी बरोबर असेल..
फक्त माझ्यासारखा घरी टीव्ही समोर बसून कॉमेंट करणारा आणि मैदानात दर ओवरनंतर सिच्युएशन जोखून प्रत्यक्ष खेळणारा यात तोच योग्य निर्णय घेण्याच्या स्थितीत असतो असे मला वाटते. आणि काल जडेजा ते कमालीच्या शांत डोक्याने करत होता.. हॅट्स ऑफ!!!

इंटरेस्टींग भाऊ. मी आपण ड्रॉ चा विचार पण करत असू असे धरले नव्हते.
>>>>>>

ड्रॉ करण्यासाठी आपल्याला नवीन बॉल जास्त खेळावा लागला असता Happy

पावसाची शक्यता नव्हती. एखादी सर आली असती तरी अखेरचा दिवस होता. अतिरीक्त वेळ असतो. ठरलेल्या ओवर पूर्ण झाल्या असत्याच. आणि तितके खेळलो असतो तर तसेही लक्ष्य गाठले गेले असते. ओवर रन पेक्षा बरेच जास्त शिल्लक होत्या... (२२ धावा आणि साधारण ३३ ओवर शिल्लक होत्या)

*ड्रॉ करण्यासाठी आपल्याला नवीन बॉल जास्त खेळावा लागला असता * - ड्रॉ हा पर्याय केवळ एक शक्यता म्हणून मी मांडला होता कारण जोडीदाराला शक्यतो फलंदाजी करायला लागू नये म्हणून मिळत असलेल्या एकेरी धांवा जडेजा सोडत होता व रिस्क घेवून चौकार/ षटकार मारण्याच्या पवित्र्यातही तो दिसला नाही. अशा तऱ्हेने लक्ष्य गाठणं अशक्य वाटत होतं, म्हणूनच पावसाच्या आशेवर ड्रॉ चा पर्याय विचारात असावा अशी केवळ शक्यता सुचली, इतकंच.

अशा तऱ्हेने लक्ष्य गाठणं अशक्य वाटत होतं
>>>>
क्रिकेटमध्ये अशक्य Happy
फक्त २२ धावा कमी पडल्या आणि ते सुद्धा बुमराह वेगळे करायला गेला आणि सिराज दुर्दैवीरीत्या बाद झाला म्हणून..

ड्रॉ हा निकाल मात्र बरेपैकी जोरदार पावसाशिवाय शक्य नव्हता. पावसाची शक्यता किती होती याची कल्पना नाही.

*क्रिकेटमध्ये अशक्य " - बुमरा खेळायला आल्यापासून प्रत्येक चेंडू मी एकाग्रतेने पहीला होता व त्यावरूनच मी इतक्या मोकळेपणाने मला तसं कां वाटलं हे सांगितल्यावरही हा उपरोध अनावश्यक आहे ! व , तसं तर निसर्गातही अशक्य असं कांहींच नसतं, अचानक आलेला अनपेक्षित मुसळधार पाऊसही !!! Wink

खरं सांगायचं तर आम्ही सामना हारलो होतो. आम्ही खेळाला जास्त सिरियसली नाही घेत पण तिसऱ्या दिवशी जो राडा झाला शुभमनने बोट दाखवणं, खेळाडूनी स्लेजिंग करणं त्यामुळे आमचे खेळाडू पेटून उठले आणि विजयश्री खेचून आणली. आता पुढची मॅचला तरी खुन्नस देऊ नका नाहीतर ती पण हराल.

छे उपरोध कसला त्यात..
खरे तर रेडी बाद झाल्यावर प्रामाणिकपणे सांगा कोणाला वाटले होते की आता सामना जिंकायची दोन टक्के तरी खात्री आहे.
पण तिथून जडेजाने जी जिगर आणि जो ॲप्रोच दाखवून सामना खेचून आणला आणि दुर्दैव आड आले नसते तर जवळपास जिंकलाच होता त्यात त्याचे तितके कौतुक न होता चुका काढणे खटकत आहे इतकेच.

तो एक शापित योद्धा वाटतो मला..
बरेचदा बरेच जण त्याच्या कसोटी संघातील जागेवर सुद्धा प्रश्नचिन्ह उचलत राहतात.

४-१

मॅंचेस्टरला बुमरा नसेल पण ओव्हल ला खेळेल. (जर ३ कसोटीच खेळणार हे पक्के असेल तर)

आणि ज्या पद्धतीने भारताने दोन टेस्ट्स मधे ८०% वरचष्मा असतानाही शेवटी हरण्याची किमया करुन दाखवलेली आहे त्यावरुन असाच निक्काल लागणार.

बुमराह नसलेलीच कसोटी आपण जिंकलो आहोत आणि मोठ्या किंबहुना विक्रमी फरकाने जिंकलो आहोत.

हरलेल्या कसोटी मात्र जिंकायची संधी साधता न आल्याने गमावल्या आहेत.

बरेचदा आकडे चुकीचे चित्र दाखवतात असे.
इथे इंग्लड 2 भारत 1 ही स्कोअरलाइन सुद्धा असेच चुकीचे चित्र दाखवत आहे.

पुढे मालिकेचा निकाल काय लागेल ते माहीत नाही.
पण दोन्ही संघात काहीच फरक नाही. जो तो ज्याच्या त्याच्या दिवसाला जिंकू शकतोय.

पंत पूर्णपणे फिट होणे गरजेचे आहे.
किंवा कीपिंग भारी पडणार असेल तर नायर ऐवजी ज्युरेल संघात घेऊन पंत पूर्णवेळ फलंदाज खेळवनार का.
किंवा करून नायर जागी साई सुदर्शन याला संधी मिळणार का?
बुमराहाला विश्रांती देत आहेत..
पण सिराज काय पाच कसोटी खेळणार का?
आकाशदीप देखील चार सलग खेळणार का?
प्रसिद्ध कृष्णा नावाचा जुगार पुन्हा खेळला जाणार की अरशदीप याला आजमावणार..
रेड्डी कायम ठेवणार का? की पुन्हा फिरून शार्दुल येणार..
सुंदरने फलंदाजी गोलंदाजी दोन्हीत चांगली कामगिरी केल्याने कुलदीपचा विचार होणारच नाही का?

बरेच प्रश्न आहेत.. अमुक तमुक झालेच पाहिजे असा माझा आग्रह नाही सध्या..
फिटनेस आणि खेळपट्टी बघून योग्य निर्णय घेतील..

Zak Crawley c Yashasvi Jaiswal b Nitish Reddy 22
अशा प्रकारे रागावलेल्या Zak Crawley ने विजयासाठी लागणाऱ्या २२ धावा आधीच करून ठेवल्या होत्या. म्हणून इंग्लंड २२ धावांनी जिकला.

"....त्यात त्याचे तितके कौतुक न होता चुका काढणे खटकत आहे इतकेच.* - ही आहे माझी पोस्ट, मॅच संपण्यापूर्वीची -
"कसोटी क्रिकेटचा खरा रोमान्स आत्ताच्या सत्रात अनुभवता आला !! जडेजा, बुमरा व सिराज - सलाम , धन्यवाद व खूप खूप शुभेच्छा "!!!!!

तुमच्या अश्या एका पोस्ट बद्दल नव्हते ते..
किंबहुना माझ्या जनरल पोस्ट इथल्या कोणाला उद्देशून नसतात..
मी एकंदरीत सोशल मीडियावर जो सूर आढळतो त्यावर भाष्य करतो..
जडेजा लढत देत असतानाच त्याने मारायला पाहिजे, वाट लावतोय, चुकी करतोय वगैरे सल्ल्यानं जिथे तिथे उत आला होता..
आणि सिराज बाद होताच बघा मी बोललो होतो ना.. मारले असते जडेजाने तर जिंकलो असतो असा आवेश..

पहिल्या सामन्यानंतर देखील सोशल मिडीयावर ज्या नकारात्मक पोस्ट पडत होत्या त्यावर बोलताच इथला प्रत्येक जण आपल्या पोस्ट मध्ये काय नकारात्मक होते नव्हते हे दाखवून द्यायच्या मागे लागला.. अर्थात इथल्या असामी यांचे ४-० ५-० कोट केले होते. कारण तो मुद्दा होता.

पहिल्या सामन्यानंतर जिथे तिथे टॉप ऑर्डर फलंदाजाचे कौतुक आणि तळाच्या फलंदाजांना झोडपणे चालू होते.. तर कालच्या सामन्या नंतर ते उलट झाले.. कुणीतरी पंतला देखील शिव्या पडायला हवे म्हटले..

पहिल्या सामन्यानंतर प्रेक्षकांनी गोलंदाजांना झोडपले होते..
पुढच्या सामन्यात त्यांनीच वीस विकेट काढत जिंकून दिले.. ते देखील बुमराह नसताना..
काल देखील सुंदरने आपल्याला जिंकायची संधी उपलब्ध करून दिली.. पण बरेच जणांना ज्यांना कुलदीप हवा होता त्यांना त्याचे कौतुक करणे जड गेले..

लोकांचा कसोटीचा आनंद घ्यायचा संयम कमी पडतो हल्ली असे वाटते..
आता हे सुद्धा इथल्या कोणा एकाला उद्देशून नाही..

शेवटच्या १५ ओव्हर्स २ च्या रनरेटने खेळले जडेजा-सिराज. अजून ५ ओव्हर्समधे नवीन बॉल ड्यू होता. मॅथमॅटिकली, नवीन बॉल घेतल्यावरही १२ रन्स ची आवश्यकता असली असती. ड्रॉ ची शक्यता माझ्या डोक्यात आली नव्हती (भाऊंची पोस्ट वाचल्यावर मी तसा विचार करून पाहिला). पण खरंच नवीन बॉल, एक विकेट आणि जिंकायला १२ रन्स अशी परिस्थिती असती तर आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झाली असती.

चर्चा ह्यासाठी की - "कधीही काहीही होउ शकते"च्यापुढे जाऊन स्टॅस्टिकली काय केले असता आपण मॅच जिंकण्याच शक्यता वाढवू शकतो हे चाचपडून पाहणे ज्यातून पुढे शिकता येते का बघणे. >> ह्यापलीकडे अजून स्पष्ट लिहिता येईल असे मला वाटले नव्हते. ह्यातून जाडेजाला दोष दिलेला आहे असे वाटत असेल तर एकूणच कठीण आहे. प्लेयरने नाही तरी कोच नि कप्तनांनी हा विचार करणे शक्य असते अशी पुसटशी शंका येत नाहि का मनात ? "मी एकंदरीत सोशल मीडियावर जो सूर आढळतो त्यावर भाष्य करतो.." हा वेड पांघरून पेडगावला जायचा प्रकार आवडला. बेसिक मुद्दाच कळत नसेल तर आर्ग्यू कशाला करतात नि तेही पाच सहा पोस्ट्स देव जाणे !

पुढे शिकता येते का बघणे...
>>>
पहिल्या सामन्यानंतर हे न बघता सरळ 4-0…5-0 ठरवून मोकळे झाले होतात Happy

असो
सोडा विषय
काही रोचक आकडे बघूया...

Batting Avg on England Soil

Rishabh Pant 42.65
KL Rahul 41.20
Rohit 40.30
Jadeja 38.76
Dhoni 37.04

Kohli 33.21
Pujara 29.00
Rahane 28.80

भारतीय संघ चांगला आहेच यात वाद नाही पण आमच्या संघाविरुद्ध खेळणार म्हणजे असे अपसेट होत राहणार.

बरेचदा आकडे चुकीचे चित्र दाखवतात
काही रोचक आकडे बघूया...

>>
आपल्या मताला सपोर्टिंग आकडे असले तर रोचक
अन् नसले की चुकीचं चित्र...

आपण अंदाज वर्तवला की ते माणसाचं मन वाचण्याची कला वगैरे
इतरांनी केलं की ते काहीही ठरवून मोकळे होतात...

लगे रहो

अँकी
वरचे आकडे माझ्या कुठल्या मताला सपोर्ट करत आहेत?
माझे मत काय आहे किंवा माझ्या आवडीचा खेळाडू कोण आहे या भोवतीच चर्चा का करता?

दुसऱ्या सामन्याची गंमत सांगतो,
जेव्हा इंग्लंडची तीनशेची भागीदारी होत होती. तेव्हा आठवत असेल माझी इथे पोस्ट होती. दहा-बारा ओवर काढा, नवीन बॉल येईल आणि इंग्लंडच्या विकेट पडतील, कारण त्यांना तिथे नवीन चेंडू खेळणे जमत नव्हते हे माझ्या लक्षात आले होते. सेम पोस्ट मी आमच्या ग्रुप वर सुद्धा लिहिली होती. आणि अर्थात खरेच तसे घडले. पण ते मी म्हटलेलं असल्याने आणि माझे म्हणणे खरे होत असल्याने ग्रुप वरील काही लोकांना आनंद होण्याऐवजी दुःख होऊ लागले. तरीही वीस विकेट काही हे घेणार नाहीत आणि सामना अनिर्णितच राहणार असाच घोषा लावू लागले. पण आपण दुसऱ्या डावात सुद्धा विकेट काढत जिंकलो आणि त्या बिचाऱ्याना भारतीय विजयाचा आनंद कसा व्यक्त करावा याची चोरी झाली. मला तर त्यांच्यावर हसावे की रडावे हे कळत नव्हते.

असो,

वरचे आकडे रोचक यासाठी कारण जडेजा, शर्मा, पंत, धोनी हे पस्तीशीच्या वर आहेत तर कोहली पुजारा रहाणे खाली आहेत.

रोचक नाही का वाटत तुम्हाला हे Happy

“ तिथे नवीन चेंडू खेळणे जमत नव्हते हे माझ्या लक्षात आले” Rofl खरे मुत्सद्दी हेच. बाकी कोच-कॅप्टन-सिनियर प्लेयर वगैरे नुसतीच खोगीरभरती.

बाकी कोच-कॅप्टन-सिनियर प्लेयर वगैरे नुसतीच खोगीरभरती.
>>
ते ही सिलेक्टिव्ह कुणी असलं तर मास्टरस्ट्रोक
नसलं तर त्यांचा उल्लेख पण करायचा नाही

रोचक नाही का वाटत तुम्हाला हे
>>
नाही वाटत

जसं बुमरा च्या डेब्यू नंतर तो 43 का 46 टेस्ट खेळला अन् आपण त्यातल्या 43% म्हणजे 20 जिंकलो
अन् तो नसलेल्या 27 का 29 पैकी 70% म्हणजे 19 जिंकलो
या आकड्यात पण काहीही रोचक वाटत नाही

भले बुमरा निम्म्याहून अधिक टेस्ट ला उपलब्ध नसेल, तो नसताना आपण जिंकलेल्या सामन्याची टक्केवारी जास्त असेल. पण आज तो आपला बेस्ट बॉलर आहे अन् असल्या आकड्यांकडे पाहून त्याला बाहेर ठेवायचा मूर्खपणा कुणीही कॅप्टन किंवा कोच किंवा सिलेक्टर करणार नाही.

Pages