Submitted by कुमार१ on 12 June, 2025 - 23:20

भाग ४ इथे
मार्च 2021 पासून सलग चालू असलेल्या शब्दवेधच्या पाचव्या भागात आपणा सर्वांचे मनापासून स्वागत !
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान चर्चा.
छान चर्चा.
माझ्याकडच्या एका पुस्तकात "यथार्थ आणि त्रिकालबाधित" असा अर्थ दिलाय.
ऋतं म्हणजे जे धर्मग्रंथात,
ऋतं म्हणजे जे धर्मग्रंथात, शास्त्रात सांगितले आहे ते.
सत्यं म्हणजे absolute truth जे कुणी मानवाने सांगायची गरज नाही, कुणी शिफारस करायची गरज नाही,
transcendent! जे स्वतः हून आहे ते,
Submitted by केशवकूल on 8 July, 2025 - 23:15
माझा प्रश्न असा आहे की गणपतीचे स्तोत्र म्हणताना/ प्रार्थना करताना / महती सांगताना मधेच "मी सत्य बोलतो" असे का म्हटले असावे? हे अनाठायी वाटते. पटत नाही.
हपा "इति" असे म्हणायची गरज आहेच का? आपण ते समजून घेऊ शकत नाही का?
हपा "इति" असे म्हणायची गरज
हपा "इति" असे म्हणायची गरज आहेच का? >> नाही, पण - (त्वम्) ऋतम् (असि इति) वच्मि - यातल्या कंसातलं काहीतरी एक असायला हवं नाहीतर कळणार कसं?
माझा प्रश्न असा आहे की
माझा प्रश्न असा आहे की गणपतीचे स्तोत्र म्हणताना/ प्रार्थना करताना / महती सांगताना मधेच "मी सत्य बोलतो" असे का म्हटले असावे? हे अनाठायी वाटते. पटत नाही. >> खरंय. तो अर्थ घेतला तर पटत नाही. नक्की काय अर्थ आहे ते शोधायला हवं.
"ब्रह्न सत्यं जगन्मिथ्या"
"ब्रह्न सत्यं जगन्मिथ्या"
इथे इति नाही आणि अस्ति पण नाही.
अथर्व शीर्ष माझे पाठ होते लहान पणापासून पण इथली चर्चा वाचून आता ते गूढ वाटायला लागले आहे.
इथे वच्मि असे म्हटले आहे.
इथे वच्मि असे म्हटले आहे. त्यासाठी आधी एकतर विशेषण वापरले असावे.
किंवा नाम वापरले असेल तर
"(अहं त्वां) ऋतं वच्मि" असे होऊ शकेल.
(मी तुलाच) ऋतं म्हणतोय, सत्यं म्हणतोय.
पण हे सगळेच ओढुन ताणुन वाटते.
मी योग्य बोलतोय, खरं बोलतोय हे श्लोकांमध्ये मला तरी अनाठायी वाटत नाही. द्विरूक्ती असली तरी मला अनाठायी वाटत नाही.
"ब्रह्न सत्यं जगन्मिथ्या"
"ब्रह्न सत्यं जगन्मिथ्या"
इथे इति नाही आणि अस्ति पण नाही.>> केकू पण इथे पुढे वच्मि, वदामि असे पण नाहीये. क्रियापद नसले तर चालते गृहीत धरले जाते (इथे अस्ति). पण असले तर त्याचा नीट संदर्भ लागला पाहिजे.
मानव हे सगळे मान्य आहे तरी
मानव हे सगळे मान्य आहे तरी पण काहीतरी गडबड आहे ती माझ्या पकड मध्ये येत नाहीये.
आपले पूर्वज महान होते एव्हढेच म्हणून मी माझ्या बाजूने विषयाचा समारोप करतो.
मला केकूंनी दिलेला अर्थ
मला केकूंनी दिलेला अर्थ missing piece of the puzzle इतका योग्य वाटला.
१. स्तोत्रात असं मध्येच 'मी खरं बोलतो' असं का असेल हा अनेक वर्ष पडलेला प्रश्न त्याने सुटला. स्तोत्रात सर्वसाधारणपणे दैवताची स्तुती आणि गुणवर्णन असते. उपासकांनी काय करावे हे असू शकते. स्तोत्राचा रचयीता स्वत:चा उल्लेख एकाच बाबतीत करतो - मी किती पतीत आहे अणि दैवत किती महान आहे. दैवताने माझा उद्धार करावा / रक्षण करावे. (अव त्वं माम्). मी खरं बोलतो हे खूप विजोड वाटतं.
२. गणक ऋषींबद्दल अशी काही कथा नाही की पूर्वायुष्यात काही चुका केल्या होत्या. तसं नसताना स्वतःची क्रेडिबिलीटी प्रस्थापित करायची गरज नाही (पूर्वायुष्यात चुका केल्या असल्या तरीही तशी गरज नसतेच - माणूस कोणत्याही क्षणी बदलू शकतो. उदा. वाल्मिकी. त्यांनीही रामायणात कुठे मी खरं बोलतो असं म्हटलेलं नाही)
३. स्वाती यांनी जी विश्वकोषाची लिंक दिली आहे त्यातल्या ह्या वाक्याशी केकूंचा अर्थ तंतोतंत जुळतो - The Ṛgveda (c. 1200 bce) commonly assigns to the gods such epithets as "he who possesses ṛta," "he who grows according to ṛta," or "he who is born of ṛta," descriptions representing the Vedic notion that the gods derive their strength from their adherence to cosmic law..
४. त्यामुळे 'या विश्वाची निर्मिती ज्या नियमांनी झाली ते नियम तूच आहेस (ऋत) असं मी म्हणतो, तूच कालातीत सत्य आहेस असं मी म्हणतो' हा अर्थ जास्त योग्य वाटतो.
@मानव, एक प्रश्न - प्रस्थापित अर्थानुसार (मी योग्य बोलतो) ऋत हे क्रियाविशेषण होते, विशेषण नाही (बोलणे या क्रियेचे विशेषण) . मराठी व्याकरणानुसार क्रियाविशेषण हे अव्यय आहे, म्हणजे त्याचे रुप बदलत नाही. तसे असेल तर 'ऋत' चे 'ऋतं' असे रुप व्हायला नको. रुपबदल झाला आहे म्हणजे ते विशेषण असले पाहिजे. विशेषण हे नाम किंवा सर्वनामाला उद्देशून असते. म्हणजे ते तू (गणपती) ला उद्देशून आहे, बोलणे या क्रियापदाला नाही. (संस्कृत व्याकरणात अव्ययांचे रुप बदलते का? - हा प्रश्न तुमच्यासाठी)
नामाचे विशेषण - नाम विशेषण
नामाचे विशेषण - नाम विशेषण किंवा नुसते विशेषण. क्रियापदाचे विशेषण - क्रियाविशेषण.
सर्वच क्रियाविषेशणे अव्यय नसतात. ते विकारी (लिंग, वचन, विभक्ती नुसार रूप बदलणारे) किंवा अविकारी असु शकतात. अविकारी क्रियाविशेषणे अव्यय असतात.
संस्कृतमध्येही अव्ययांचे रूप बदलत नाही.
मला इथे बोलण्याच्या क्रियेचे विशेषण नव्हे तर जे सांगितले आहे त्याचे विशेषण म्हणायचे आहे.
ऋत चा अर्थ दैवी नियम असा आहे पण तो ऋतं असा नपुंसकलिंगी शब्द आहे/होऊ शकतो का माहीत नाही.
<सर्वच क्रियाविषेशणे अव्यय
<सर्वच क्रियाविषेशणे अव्यय नसतात. >
क्रियाविशेषण अव्यय असंच म्हणतो ना आपण? विशेषणे नामाच्या वा सर्वनामाच्या लिंग, वचनाप्रमाणे बदलतात. पण क्रियाविशेषणे कुठे बदलतात?
एखादे उदाहरण?
तो चांगला बोलतो.
तो चांगला बोलतो. (बोलण्याची क्रियेबद्दल, जे बोलतो त्या विधानांबद्दल नव्हे म्हणुन चांगले असे रूप वापरले नाही.)
ती चांगली बोलते.
तो मूर्खासारखा वागतो. ती मूर्खासारखी बोलते.
मी व्याकरणाच्या पुस्तकात
मी व्याकरणाच्या पुस्तकात पाहिलं.
' चांगला' या विकारी विशेषणाबद्दल बर्याच वेळाअ ते विशेषण की क्रियाविशेषण असा घोटाळा होतो. तसा बहुधा अन्य विशेषणांबद्दल होत नाही. खालील वाक्यांत त्यांच्या रूपांवरून व उपयोगांवरून त्यासंबंधीचा घोटाळा दूर व्हावा.
१. मुलगा चांगले बोलतो.
२. मुलगी चांगले बोलते.
३. बाळ चांगले बोलते.
या तिन्ही वाक्यांत तिन्ही लिंगी कर्ते असतानाही 'चांगले' हेच रूप आहे. त्यात विकार झालेला नाही. येथे ते क्रियाविशेषणाचे कार्य करीत आहे.
१. मुलगा चांगला आहे.
२. मुलगी चांगली आहे.
३. बाळ चांगले आहे.
ही विधिविशेषणे.
भरत, वाळंबेच का? कुठली
भरत, वाळंबेच का? कुठली आवृत्ती?
नाही. वाळंबेंचं पुस्तक
नाही. वाळंबेंचं पुस्तक शुद्धलेखनाच्या नियमांवर आहे.
हे स.ध. झांबरे
अच्छा. हे वाळंबे:
अच्छा.

हे वाळंबे:
खरंतर कोणीही(/कितीही) चांगलं
खरंतर कोणीही(/कितीही) चांगलं गातो/गाते/गातात असंच हवं ते क्रियाविशेषण, नाही का? चांगला/चांगली गाते हे विचित्र वाटतंय.
हो आणि तेच मूर्खासारखं पण आहे
हो आणि तेच मूर्खासारखं पण आहे. म्हणजे, कोणीही मूर्खासारखं बोलेल.
बिब्बा बिब्बा घालणे या
बिब्बा
बिब्बा घालणे या वाक्प्रचारामुळे बिब्बा आपल्याला चांगला परिचित असतो.
त्याचा मूळ संस्कृत शब्द आणि अन्य भाषांमधले बदल पाहण्यासारखे आहेत :
भल्लातक ( सं.) >>>. भल्लाय ( प्रा) >>> बिबा / बिबवा/भिल्लावा
>> बिब्बा (म.)
हिं भिलावा; बं. भेला;
गुज. भिलामा; उत्कल. भल्लिप;
द्रा. बिडी; भिलवना; पोर्तु. कों. बिंबो
(दाते शब्दकोश)
मस्त पोस्ट. आमच्याकडे
मस्त पोस्ट. आमच्याकडे बिब्ब्याची गोडंबी खातात. उष्ण असते असे म्हणतात म्हणून हिवाळ्यात खातात व डिंकाच्या लाडूत टाकतात. गोडंबी हा प्रकार (ड्राय फ्रूट) चेस्टनट सारखा किंचित तुरट आणि स्निग्ध आहे. हा वाक्प्रचार सुद्धा बोलण्यात असतो. माझ्याकडे गोडंबीचा फोटो आहे. येथे कुणालाच ओळखू आली नाही. गोडंबी म्हणजे बिब्ब्याचे बी. मराठवाड्यात कॉमन आहे.
फोटो सापडला.
* बिब्ब्याची गोडंबी >> अरे
* बिब्ब्याची गोडंबी >> अरे वा ! नव्हती ऐकली कधी. चांगली माहिती.
बिब्बा == बिबा (आमच्याकडे)
बिब्बा == बिबा (आमच्याकडे)
काळ्या बिब्याचे तेल पायात काटा मोडला तर त्याला लावायचे. खोकला कमी होत नसेल तर दुधात एक-दोन थेम्ब टाकून प्यायचे. बिबे फोडून गोडंबी काढून खायची. डिंकाच्या लाडूंत त्या गोडंबीची पूड घालायची. पुरणाचे बिबे, म्हणजे कडक बिब्याच्या पुढचा सुकलेला फळ भाग. तो गोडसर लागतो तो खायचा. संक्रांतीला सुगड्यात घाटे, बोरं, उसाचे कांडे, पुरणाचे बिबे इ. घालायचे. बिब्याच्या तेलाचे औषधी गूण, गोडंबीचा सुकामेवा, पुरणाच्या बिब्याचा गोडवा...
बिबा हा शेतीप्रधान मराठवाड्यात अगदी उपयुक्त होता. असे असताना बिब्बा घालणे म्हणजे चांगल्या कामात विघ्न आणणे असा नकारात्मक वाक्प्रचार कसा काय निर्माण झाला असावा बरे?
हं, तळपायाच्या जाड त्वचेव्यतिरीक्त इतर ठिकाणच्या पातळ त्वचेला बिब्याच्या तेलाचा स्पर्श झाला तर तिथे फोड यायचे. हे कारण असेल का?
बिबा हा अतिशय उष्ण असतो, तो
बिबा हा अतिशय उष्ण असतो, तो जखमेवर चुकीच्या पद्धतीने घातला गेला तर उठतो, गोडंबी ने रक्त पडते..

अशा अनेक भयावह कथा लहानपणापासून ऐकल्याने, कधी आणलाच गेला नाही.
* डिंकाच्या लाडूंत त्या
* डिंकाच्या लाडूंत त्या गोडंबीची पूड घालायची. >> +१
हे आजीकडून ऐकल्याचे आठवले.
. . .
*नकारात्मक वाक्प्रचार कसा काय निर्माण झाला असावा बरे?>>
https://www.marathisrushti.com/articles/aushadhi-bibba-vruksha/#:~:text=...
त्या गरम तेलाचा चटका जालीम असतो म्हणून तसे म्हणत असावेत का ?
'बिब्बा घालणे' या अर्थाचा
'बिब्बा घालणे' या अर्थाचा खोडा घालणे हा पण एक वाक्प्रचार आहे. (= अडथळा आणणे)
खोडा = अपराध्याचे हातपाय अडकवून शिक्षा करण्याचे एक लाकडी यंत्र.
एके काळी पुण्यात आदिवासी
एके काळी पुण्यात आदिवासी बिब्ब्याच्या फुलांच्या माळा विकायला घेऊन येत असत. ते जे काय होते ते खायला चवदार लागायचे.
बिब्बा उततो जर कारण नसताना वापरला तर.
लहानपणी मला सायनसचा त्रास होत असे. मित्र म्हणायचे की कॅविटी ड्रेन करावी लागते. पण माझ्या आईने नाकावरची शीर पकडून बिब्ब्याची एक रेघ काढली. उतला नाही. पण त्याची खूण आजही आहे. पुन्हा कधी सायनसचा त्रास झाला नाही.
अवांतर बद्दल क्षमस्व.
दर आठवड्याला हिंदीच्या चार
दर आठवड्याला हिंदीच्या चार तासिका होणार आहे.
भरत ह्यांनी दुवा दिलेल्या एका बातमीतून
म्हणजे जेव्हा आपण बालपणी शाळेतले "तास" म्हणायचो त्याला आता तासिका म्हणतात का?
पाऊण तास म्हणजे एक तासिका.
बहुतेक ते शासकीय मराठी आहे.
बहुतेक ते शासकीय मराठी आहे.
( तासिका तत्वावर भरती)
तासिका शब्द लहानपणी शाळेत
तासिका शब्द लहानपणी शाळेत होता. विषयाचा तास आणि ६० मिनिटांचा तास यात गल्लत नको म्हणून असेल, विषयांच्या तासाला तासिका म्हणत. एक तासिका एका तासाची सहसा नसे.
हपा
हपा
मी तरी हा शब्द आजच वाचला.
Pages