क्रिकेट - ९

Submitted by ऋन्मेऽऽष on 3 January, 2025 - 02:37

२०००+ पोस्ट झाल्या म्हणून नवीन धागा

बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा निर्णायक धुमाकूळ इथे घालूया Happy

क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/83589

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोणीही खेळले तरी चालेल, कोण्णीही शतक नाहि मारले तरी चालेल पण एजबॅस्टॅनची पनवती ह्या सामन्यामधे दूर व्हावी अशी आशा करूया Happy

" झेल पकडावेच लागतील " इति शुभामान गिल ! कसोटी पातळीवर पोचलेल्या खेळाडूंना आता हा धडा शिकवावा लागणं हा विनोद की शोकांतिका !!!

पहील्या कसोटीतील गोलंदाजी व फलंदाजीतील व्यक्तिगत यशापयश लक्षात घेवून आता कांहीं बदल करणं आवश्यक वाटत नाही . पण गोलंदाजीत धोरणात्मक म्हणून मात्र बदल करणं क्रमप्राप्त वाटतं . केवळ फास्ट गोलंदाजीवर अवलंबून न राहता, त्याला फिरकीची साथ असली पाहिजे, हे नक्की ! बघू काय बदल होतात ते.
शुभेच्छा !

Three changes - Reddy, Washi and Akash Deep come in. No Bumrah
England have won the toss and have opted to field.
बिच्चारा साई सुदर्शन बाहेर.

‘२० विकेट्स घेण्यासाठी ४ टेल एंडर्स सुद्धा खेळवू‘ हा इंग्लंडला टाकलेला गुगली निघाला. शेवटी परत ‘ये रे माझ्या मागल्या‘. सुंदर हा कुलदीपच्या जवळपासही नाही. रेड्डी किती ओव्हर्स टाकतो हा औत्सुक्याचा विषय आहे.

पुढच्या सामन्यात करुण नायरला पण सुट्टी. कुणि दुसरा फलंदाज आहे का त्याच्या ऐवजी? नाहीतर बोलवून घ्या कुणाला तरी.

पंत गेला
आणि रेड्डी कसा बाद झाला च्यायला.. असे इंग्लंड मध्ये खेळतात का

आता गिल ने मोठे शतक मारावे.
जडेजा आणि सुंदरने साथ द्यावी.
400 आकडा गाठावा.
ते पुरतील का याची खात्री शून्य.
पण गेम मध्ये राहण्यासाठी तितके गरजेचे..
त्याहून जास्त झाले तर चांगलेच.

अंडर नाईन्टीन मध्ये सूर्यवंशीने 9 सिक्स मारले आज
हा भारतासाठी अंडर 19 रेकॉर्ड झाला

एकूण 31 बॉल 86 मारले

सूर्यवंशी वेडा झालेला. त्याला पुढच्या टेस्ट मधे खेळवा. काय तो बाझबॉल होऊन जाऊ Wink

उद्या एक विकेट आल्या आल्या गेली तर ३५० पर्यंत सुद्धा थांबतील किंवा गिल जडेजा सुंदर चांगल्या कंडीशनचा फायदा उचलून खेळले तर ४५०-५०० सुद्धा होऊ शकतात.
आणि तसेच व्हावे.

पंत भले आज तो मोठी खेळी करू शकला नसला तरी बाद झाल्यावरची त्याची नाराजी पाहता आता तो आपल्या विकेटवर प्राईज टॅग लावून खेळतोय असे वाटते आणि हे कायम राहिल्यास या मालिकेत तो खोऱ्याने धावा करायची शक्यता आहे ज्या वेळोवेळी गेम चेंजिंग ठरतील. स्पेशली लो स्कोरिंग सामन्यात..

<<भारताचा बॉलिंग अ‍ॅटॅक(?) बघता, अजून ७०० रन्स तरी हवेत पहिल्या इनिंगला>>
क्षेत्ररक्षणाचीहि काही खात्री नाही. पंटने त्याच्या बॅटीने एक फटका जर जैस्वालच्या तंगडीवर मारला तर दोन दिवस तरी तो क्षेत्ररक्षणाला येऊ शकणार नाही. तोपर्यंत इंग्लंड खेळेलच. मग दुसर्‍या डावात जैस्वाल परत फलंदाजी करू शकेल.

प्रसिद्ध कृष्णा चांगली टाकू शकतो यावेळी.
जसे परदेशात फलंदाज अनुभवाने शिकतात तसे गोलंदाजांना सुद्धा बाहेर गेले की शिकावे लागते कुठल्या टप्प्यावर आणि कशी गोलंदाजी करावी.
आयपीएल मध्ये त्याच्या विकेट मारण्यात नव्हत्या आल्या तर चांगल्या length वर बॉल उसळवून काढल्या होत्या. थोडे कॉन्फिडन्सची गरज आहे त्याला.

त्याच्यासाठी सल्ला
सोशल मीडिया पासून दूर राहावे त्याने Happy

भारताचा बॉलिंग अ‍ॅटॅक(?) बघता, अजून ७०० रन्स तरी हवेत पहिल्या इनिंगला >> Happy आज लंचनंतरचे पिच बघता .......

आपण बऱ्याच वेळा अपेक्षा नसतानाच चांगले खेळतो. आठवा GABA कसोटी, रथी महारथी नसताना आपण जिंकलो होतो. सध्याही अशीच परिस्तिथी आहे. बघू कांय होतंय ते ह्यावेळी.

“आपण बऱ्याच वेळा अपेक्षा नसतानाच चांगले खेळतो.” - I want to believe that so badly. पण मोठा फरक वाटतो मला - अ‍ॅप्रोच चा - आऊटलूकचा. त्या टीम्स आक्रमक टेस्ट क्रिकेट खेळत होत्या - २० विकेट्स घेण्याचा माइंडसेट होता. इथे गिल तसं म्हणतोय पण कृतीत ते दिसत नाही. रेड्डी, सुंदर सारखे टी-२० ऑलराऊंडर्स कितपत यशस्वी होतील (व्हावेत) ह्याबद्दल मला साशंकता आहे.

“आज लंचनंतरचे पिच बघता” - हो, खरंय.. पंतने विकेट टाकायला नको होती. चांगल्या बॉलवर आऊट झाला असता तर इतकं वाईट वाटलं नसतं. ३००/३ ही स्कोअरलाईन रिस्पेक्टेबल वाटली असती.

गाबा कसोटीत सुद्धा शार्दूल, सुंदर, नटराजन, सैनी, नवखा सिराज असेच गोलंदाज होते. ज्यातील नटराजन, सैनी पुन्हा दिसले नाहीत. सिराज सुंदर आताही आहेत. शार्दुल असूनही आपणच त्याला बाहेर केले.

अर्थात गाबा अदभुत होते. त्याची तुलना करू शकत नाही.
पण जर झेल आणि संधी सोडल्या नाहीत, डावपेच योग्य आखले, तर इंग्लंड फलंदाजीला रोखणे अवघड नाही. इंग्लंड कमजोर गोलंदाजी आणि आपली फॉर्ममधील फलंदाजी पाहता तिथे स्कोअर करून सातत्याने गोलंदाजांना संधी मिळवून द्यावी आणि आपल्या टर्न ची वाट बघावी.

तीनही दीप हवे होते असं वाटतय.

आकाशदीप अर्शदीप सिराज
कुलदीप जडेजा

हा मेन.कोर्स

आणि तोंडी लावायला रेड्डी

अशी बोलिंग लाईनअप बघायला आवडली असती.

रेड्डी बहुतेक हा चेंडू सोडायचाच असं आधीच ठरवून खेळला असावा ! तो आयुष्यभर स्वतःला याबद्दल दोष देत राहील/ त्याने तसं राहावं. अर्थात, चूक गंभीर असली तरी अक्षम्य ठरू नये, ही आशा व प्रार्थना !
आज पंत खूप संयमाने खेळात होता. बाद झाला तो चेंडू खरंच षटकारासाठी मोहात पाडणारच होता. बॅड लक !

जयस्वाल व गिल, सलाम !
सुंदर ऐवजी कुलदीपला घेणं योग्य झालं असतं, असं मलाही वाटतं ! पण सुंदर मला खोटा ठरवेल ही आशा आहे !
साई सुदर्शनला तत्काळ वगळण तितकंस योग्य नसलं तरीही त्याच्यावर कायमची काट मारणं मात्र अगदीच अन्यायकारक होईल.
* सोशल मीडिया पासून दूर राहा वे त्याने * अर्थात, हा सल्ला वाचण्यापुरतं मात्र इथं यावं !! Wink
इंग्लंड, शिस्तबद्ध गोलंदाजी व क्षेत्ररक्षण !!!

काल पंत बाद झाल्यावरची पोस्ट
-------
आता गिल ने मोठे शतक मारावे.
जडेजा आणि सुंदरने साथ द्यावी.
400 आकडा गाठावा.

---------

गिलचे मोठे शतक द्विशतक झाले. जडेजा खेळला. सुंदर खेळतोय. भारत 500 पार जातोय.

what’s your point?
>>>>

मोठा स्कोअर करायला आधी सोच सकारात्मक करावी लागते.
भारतीय फलंदाजांनी ते करून दाखवले Happy

भारताने 600-650 पार केले तर पुढचे तीन दिवस भारत या कसोटीत फेवरेट राहील. पण सामना जिंकेल असे नाही तर अनिर्णीत सुद्धा राहू शकतो. कसोटीत फेवरेट म्हणजे केवळ जिंकने नाही याचा अर्थ भारतीय संघानेच समजावला.

गिल आयपीएल दरम्यान नेटमध्ये रेड बॉलने कसोटीची तयारी करत होता असे आता दाखवले.
हा फरक आहे ज्यामुळे पृथ्वी शॉ चा कांबळी झाला आणि याचा सचिन..
मेहनतीचे फळ मिळतेय.

Pages