Submitted by ऋन्मेऽऽष on 3 January, 2025 - 02:37
२०००+ पोस्ट झाल्या म्हणून नवीन धागा
बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा निर्णायक धुमाकूळ इथे घालूया 
क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/83589
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नेमका काय फरक पडलाय? >>
नेमका काय फरक पडलाय? >> शेवटचे वाचलेले त्यावर टॅनरीबद्दल संशय होता. काहीतरी बदल तिथे केला गेलाय रंग बदलण्यासाठी असा.
आज इंग्लंडच्या बेझबॉलची
आज इंग्लंडच्या बेझबॉलची परीक्षा !!
बझबॉल तर झोपवला आपण इतके
बझबॉल तर झोपवला आपण इतके टारगेट देऊन आणि हे फार उत्तम केले. आज त्यांना काय करावे हे समजणार नाही. आणि ज्याला हे समजते त्या रूटची विकेट सुद्धा गेली हे आणखी भारी काम झाले आहे.
फक्त आज सिराज आकाशदिप यांना साथ मिळायला हवी. स्पेशली प्रसिद्ध कृष्णाची. त्याने काल ज्या काही तीनचार ओव्हर टाकल्या त्यात तो चांगला वाटला. आज जर पुन्हा सुरुवात आकाशदिप आणि सिराजने झाली तर त्याची गोलंदाजी येईपर्यंत बॉल जुना आणि सॉफ्ट झाला असेल. पहिले तास दीड तास छोट्या छोट्या स्पेलमध्ये तिन्ही वेगवान गोलंदाज फिरवून वापरायला हवे. नवीन बॉल त्यांच्यातच राहायला हवा.
आज पाऊस
आज पाऊस
ओवर कमी झाल्याने दुसरा नवीन बॉल सुद्धा नशिबात नसेल. हा मोठा फटका बसेल
अर्धा दिवस तरी पाऊस आहे.
अर्धा दिवस तरी पाऊस आहे.
अजून काळे ढग जमलेत जे मैदानाच्या दिशेने येत आहेत.
साला चार दिवस नव्हता आज आला नेमका.
च्यायला पाऊस थांबला पण ढगाळ
च्यायला पाऊस थांबला पण ढगाळ वातावरण सुद्धा गेले.
सध्या कडक ऊन आले आहे.
सामना ५.१० वाजता चालू होत आहे.
१० ओवर गेल्या. ८० ओवर आज होणार.
या दहा ओवर आपल्याला दुसऱ्या नवीन बॉल वर मिळाल्या असत्या.
आशा करूया अजून पाऊस पडू नये. अन्यथा आता जितका वेळ सामना थांबेल तितक्या ओवर कमी होत जातील.
चौथी !! पोप गेला.. आकाशदिप
चौथी !!
पोप गेला.. आकाशदिप
हॅरी ब्रोक.. आकाशदीप अगेन
हॅरी ब्रोक.. आकाशदीप अगेन
5 गेले, 5 राहिले !!!९5
5 गेले, 5 राहिले !!!
पाच गोलंदाजांपैकी दोनच योगदान
पाच गोलंदाजांपैकी दोनच योगदान देत आहेत.
बाकीचे तीनांचं काय?
"What's your contribution to the team?" हा गंभीर प्रश्न सुटत नाही.
आज जिंकलो तर इतिहास घडणार आहे
आज जिंकलो तर इतिहास घडणार आहे.
India have played a total of 8 Tests at Edgbaston, Birmingham and the visitors are yet to register a victory at the venue. India have lost seven matches out of 8 while one ended in a draw.
10 विकेट्स घेऊन जिंकणे कठीण
10 विकेट्स घेऊन जिंकणे कठीण आहे आज
कोहली आणि शर्मा आता इंग्लंडचे
कोहली आणि शर्मा आता इंग्लंडचे नागरिक आहेत. ते आता इंग्लंडला सपोर्ट करताहेत. त्यामुळे इंग्लंड जिंकावी असं मला वाटतय.
आठ गेल्या, दोनच राहिल्या !!!
आठ गेल्या, दोनच राहिल्या !!!
ये रे ये रे पावसा
ये रे ये रे पावसा
ओलं कर ग्राउंड
तुला देतो पाउंड
Wat e catch सिराज.. नववी आली
Wat e catch सिराज.. नववी आली
Wat e catch सिराज.. नववी आली
Wat e catch सिराज.. नववी आली
.
.
भारताचा ऐतिहासिक विजय !!
गेले पाच दिवस इथे तिथे मी पन्नास जणांशी भांडलो असेल या संघाची बाजू घेऊन...
आज सार्थक झाले
जिंकले !!!!!!!
जिंकले !!!!!!!
अभिनंदन !!!!!!!
आकाशदिप 6 - 99 !!!!!
भारतीय संघाचं अभिनंदन
भारतीय संघाचं अभिनंदन
मस्त खेळून जिंकले...
सर अभिनंदन!
सर
अभिनंदन!
ह्या विजयात तुमचा भरघोस वाटा आहे.
मस्त विजय!
मस्त विजय!
आकाशदीप मला समहाऊ आयपीएलमधे अजिबात लक्षात नाही पाहिल्याचे किंवा किमान त्याची काही जोरदार कामगिरी.
जबरदस्त विजय!! अभिनंदन टीम
जबरदस्त विजय!! अभिनंदन टीम इंडिया!!
“ह्या विजयात तुमचा भरघोस वाटा
“ह्या विजयात तुमचा भरघोस वाटा आहे”
- सरांचाच विजय आहे. टीम इंडियाने फक्त हातभार लावलाय.
आकाशदीप मला समहाऊ आयपीएलमधे
आकाशदीप मला समहाऊ आयपीएलमधे अजिबात लक्षात नाही पाहिल्याचे किंवा किमान त्याची काही जोरदार कामगिरी.
>>>>>
कारण तो आयपीएल किंवा २० बॉलर नाहीये. म्हणजे खेळला आहे पण त्या फॉर्मेटला साजेसा नाही तर कसोटीला साजेसा गोलंदाज आहे.
या आधी तो कसोटी खेळला आहे आणि त्यात सुद्धा चांगली कामगिरी केली आहे. स्पेशली लेफ्ट हॅण्ड फलंदाजासमोर आपल्याकडील खेळपट्ट्यांवर देखील प्रभावी वाटत होता.
सर
सर
अभिनंदन!
ह्या विजयात तुमचा भरघोस वाटा आहे.
>>>>>
धन्यवाद केशवकूल

जेव्हा एखाद्या गुणी खेळाडूंच्या संघाला सपोर्टची आणि विश्वासाची गरज असते तेव्हा त्या संघाचे चाहते खरेच आपला वाटा उचलू शकतात
जिंकलो एकदाचे. पण कोहलीची टीम
जिंकलो एकदाचे. पण कोहलीची टीम हारली यात आनंद मानूयात. त्याची टीम जिंकली की वाईट घटनांची शृंखला सुरू होते.
अहाहा काय सुंदर जिंकले.
अहाहा काय सुंदर जिंकले. अपेक्षेपेक्षा सुंदर बॉलिंग केली गेली. फ्लॅट पिच नि बॉल फक्त पहिल्या नि शेवटच्या सत्राच्या काही भागातच एफेक्टिव्ह होत होता नि पाचपैकी मुख्यत्वे अडिचजणच विकेट घेऊ शकतील असे वाटत होते हे बघता तर अबॉव्ह अँड बियाँड बॉलिंग झाली आहे.
आज सिराज दमल्यासारखा वाटला. स्मिथ ला फक्त शॉर्ट पिच्ड बॉलिंग्च करायची हा प्लॅन डोक्यावरून जातो. प्रसिद्ध फॉर् अ चेंज पाचच्या खाली आहे
.
पहिल्या दोन सामन्यांमधे मिळून
पहिल्या दोन सामन्यांमधे मिळून १५०० च्या वर धावा निघाल्या आहेत. एकूण ओव्हर्स बघता शेवटच्या टेस्ट आधी बुमरा सोडा, सिराज , प्रसिद्ध नि आकाश दीपला पण विश्रांती द्यायची वेळ येणार बहुधा.
“ अबॉव्ह अँड बियाँड बॉलिंग
“ अबॉव्ह अँड बियाँड बॉलिंग झाली आहे.” - नक्कीच!! प्रामाणिकपणे सांगायचं तर अनपेक्षितपणे खूप भेदक बॉलिंग झाली. पहिल्या टेस्टमधे सिराज (काही स्पेल्स वगळता) आणि कृष्णा फारसे प्रभावी वाटले नव्हते. पण दोन मॅचेसच्या मधे इतकं अॅडाप्टेशन कौतुकास्पद आहे.
“ स्मिथ ला फक्त शॉर्ट पिच्ड बॉलिंग्च करायची हा प्लॅन डोक्यावरून जातो” - त्याला आकाशने सेट-अप छान केला आणि तो पण सहज त्या जाळ्यात सापडला. पण प्लॅन्समधे थोडी फ्लेक्झिबिलिटी बघायला आवडेल हे नक्की. उदा. जडेजा राऊंड द विकेट येऊन राइट हँडरच्या लेग स्टम्पच्या बाहेर मारा का करत होता ते कळत होतं. पण ११ नंबरच्या बशीरला ओव्हर द विकेट येऊन एलबीडब्ल्यू चा प्रयत्न पण करणं शक्य होतं. असो. All is well, that ends well. Congratulations team India!!
Pages