मी वाचलेले पुस्तक - ३

Submitted by Admin-team on 20 April, 2022 - 18:19

आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसादांची मर्यादा ओलांडल्यामुळे हा नवा धागा सुरू करत आहे.

इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

केकू नक्की काय आवडलं तुम्हाला यात ? का तुम्ही रेकमेन्ड केली कळू शकेल का? मे बी लॉस ऑफ कम्युनिकेशन/ मृत्यूभय - वगैरे? मे बी इट्स ग्रेट बट नॉट माय कप ऑफ टी. गाय दी मोम्पासाच्या अगणित सुंदर कथा वाचलेल्या आहेत. त्या मानाने ही कथा फार म्हणजे फारच बंडल वाटली.

सामो
तुम्हाला मनस्ताप झाला त्याबद्दल प्रथम माफी मागतो.
तुम्ही ही कथा वाचायला नको होती .
मी का रेको केली?
इथे वाचा . इथे कथेचे विश्लेषण आहे,
https://stephenkingly.net/stephen-kings-autopsy-room-four-analysis/
नेट वर अजूनही मिळतील.
तुम्ही आता हा लेखही वाचणार नाही. म्हणून मी इथे समरी देतो. तेव्हढी वाचा,
ephen King’s Autopsy Room Four is a chilling and suspenseful short story that explores the themes of fear, mortality, and the fragility of life. Through his use of narrative techniques such as suspense, foreshadowing, and pacing, King creates a tense and engaging reading experience.

The characters in Autopsy Room Four are complex and well-developed, each playing a crucial role in the story’s development. The setting and atmosphere also contribute significantly to the overall mood of the narrative, with King’s descriptive language creating a feeling of unease.

Inspired by other works of horror fiction, Autopsy Room Four has achieved critical acclaim and a dedicated fanbase. It remains a notable addition to Stephen King’s extensive body of work.

For readers who enjoyed Autopsy Room Four, we recommend exploring other works by Stephen King, such as The Shining, Carrie, or Pet Sematary. These stories also showcase King’s mastery of the horror genre and his ability to craft compelling narratives.

In conclusion, Autopsy Room Four is a must-read for fans of horror fiction and Stephen King enthusiasts. Its themes, characters, and storytelling techniques make it a standout addition to the genre and a testament to King’s talent as a writer.

त्या लिंकवर गेले असता मेसेज आला की ५ व्हायरस तुमच्या विंडोजमध्ये आलेले आहेत. त्यामुळे परत ती लिंक उघडायची हिंमत नाही. तुम्ही दिलेले सार वाचते.
------------------------
माबुदो. काहींना रोचक वाटेलही.

>>>>>>तुम्हाला मनस्ताप झाला त्याबद्दल प्रथम माफी मागतो.
नाही नाही. इन फॅक्ट आय अ‍ॅम सॉरी.
काहींना ही कथा नक्की आवडेल. मी देखिल खिळुन ऐकत गेले पण ... एक तर वाचणारा भयंकर लेम वाचह्त होता. आणि मे बी नॉट माय कप ऑफ टी. इतरांना आवडू शकेल.

मराठी मध्ये एक पुस्तक आहे त्यात लेखकाने सर्व पर्वतरांगांच्या माथ्यावरून प्रवास केलाय. नाशिक बागलाण तिथून मावळ कोकण असा.
नाव आठवत नाहीये पण पुस्तक फार interesting आहे
>>>
'वॉकिंग ऑन द एज' (वरती नाव आलेलंच आहे.)
समकालीन प्रकाशन.
या पुस्तकाच्या एडिटिंगमध्ये माझा सक्रीय सहभाग होता.

वॉकिंग ऑन द एज' याच नावाने मराठी अनुवाद आहे का <<>>>> मराठीच पुस्तक आहे. प्रसाद निकते लेखक आहेत. त्यांनी सलग ७५ दिवस सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरुन प्रवास केला त्याबद्दल आहे.
किंडल अनलिमिटेडवर आहे.

या पुस्तकाच्या एडिटिंगमध्ये माझा सक्रीय सहभाग होता. <<>>> वॉव. फारच छान. क्रूपया लेखकाला कळवाल का, पुस्तक खूप इन्स्पायरींग आहे.

मोठी साहस यात्रा दिसते आहे. डोंगरयात्रेत तीन चार पाच दिवसांच्या जवळजवळच्या सोप्या सहली / ट्रेक आहेत.
अशा सहललींत वाहन नेता येत नाही.कारण डोंगरावर एका बाजूने चढाई केल्यावर दुसऱ्या पलीकडच्या वाटेने उतरून पुढचे ठिकाण गाठायचे असते.

'व्हिक्टरी सिटी'- सलमान रश्दी : पुस्तक अभिप्राय

या कादंबरीत एका जादुई साम्राज्याची गोष्ट आहे. मिथक आणि इतिहासाचे जादुई मिश्रण केले आहे. विजयनगरच्या साम्राज्याचा इतिहास आधारासाठी वापरून 'बिसनागा' या काल्पनिक साम्राज्याची कहाणी सांगितलेली आहे. पम्पा कंपाना ही स्त्री यातील मुख्य पात्र असून ती ह्या बिसनागाच्या जादुई साम्राज्याच्या उदय, सुवर्णयुग आणि पतनाची कहाणी सांगते. तिला तब्बल अडीचशे वर्षे जगण्याचे वरदान लाभलेले आहे.!

ही कादंबरी म्हणजे रश्दींनी रचलेलं एक अद्भुत विश्व आहे. आणि या माध्यमातून त्यांनी जीवनाचा विराट विस्तार प्रकट केला आहे. हे पुस्तक एका साम्राज्याच्या आयुष्याबद्दल आहे, तसेच त्यातील नागरिकांच्या आयुष्यांबद्दलही आहे. बहुरंगी बहुढंगी मनुष्यस्वभावांची सूक्ष्म अंतर्दृष्टी, वैविध्यपूर्ण आणि बहुसांस्कृतिक समाजाचे राजकीय-सामाजिक-सांस्कृतिक समृद्ध चित्रण, युद्ध- प्रेम-शांती, राजकारण आणि धर्म यांचे परस्परांशी काटछेद, तसेच राज्यकारभाराबद्दलची अत्यंत शाश्वत मार्गदर्शक तत्वे, अशी सगळी रेलचेल यात बेमालूमपणे अंतर्भूत केलेली अनुभवायला मिळते.

कल्पनेची उड्डाणं, बुद्धिमान विनोद, आणि भारतीय संस्कृतीतील दंतकथांचं/ महाकाव्यांचं मर्मज्ञान यांच्या साहाय्याने हे कथन केले असल्याने हे लिखाण एकदम चैतन्यशील, मिश्किल आणि बहुमुखी असे झाले आहे. एकूण तीनशे चाळीस पानांची कादंबरी आहे.‌ म्हणजे माझ्या एरव्हीच्या स्पीडनं एका दिवसाचं काम. पण तरीही तीन दिवस लागले संपवायला, कारण यात आशयच तसा घट्ट दाबून बसवला गेलेला आहे. (तिकडे 'ट्रॉय' 'स्पार्टा' वगैरे शहरांवर जसे चांगले सिनेमे निघालेत तसा या 'व्हिक्टरी सिटी'वर ही निघावा, ते पोटेन्शिअल यात आहे म्हणजे.)

बाकी, रश्दी जसजसे वृद्ध होत चालले आहेत तसतशी त्यांची लेखणी अधिकाधिक सघन होत चाललेली आहे. या कादंबरीच्या माध्यमातून ते म्हणजे असे एकदम मानवी अस्तित्वाच्या खोलात उतरलेले दिसत आहेत. तर एकूण उच्च कोटीचा अनुभव आहे हा, घेऊन बघण्यासारखा वगैरे.

IMG_20250617_204917~2.jpg

>>>>>>>'द ओव्हरकोट' वाचून पूर्ण केली. त्यावर लिहायला सुरुवात केली आहे. झाले की देईन. Happy
जल्दी जल्दी

अमिताभ घोष यांची ibis trilogy तीन पुस्तके वाचल्यावर या कादंबरीसाठी अभ्यास करताना केलेल्या नोंदींवर शेवटचे पुस्तक smoke and ashes (२०२३) हेसुद्धा वाचले. शालेय अभ्यासक्रमात असताना ' ब्रिटिशांनी भारतात अफू आणि चहा लागवड करून भरपूर पैसा कमावला एवढं एक दोन ओळीत माहीत झालं होतं. चहाचं गिऱ्हाईक ब्रिटिशांनी भारतात तयार केलं. तर अफू चीनला विकली. पण या पुस्तकांतून अफूचं खरं स्वरूप कळलं आणि ब्रिटिशांची व्यापारी पद्धत. या सर्वांत भारतात इतर लोकांनीही पैसा कमावला. चांगली वाचनीय पुस्तके.

पर्ल बकच्या ‘द गुड अर्थ’ मधे अफुच्या व्यसनाने तिथल्या जमीनदार/उच्चभ्रु वर्गाची कशी वाट लागली याचे उल्लेख कथानकाच्या ओघात येतात. त्यामानाने भारतियांना लावलेले चहाचे व्यसन परवडले. चीनशी एकंदर व्यापारात व अफूची निर्यात करण्यात इंग्रजांना मदत केली ती पारशी समाजाने. आणि त्यांनीच भारतात विशेषतः मुंबईत अनेक समाजोपयोगी कामं केली. हा विरोधाभास मला नेहमीच बुचकळ्यात टाकतो.
आयबिस ट्रिलॉजीमधलं एक पुस्तक वाचलंय. उरलेली वाचली पाहिजेत.

‘व्हिक्टरी सिटी’ची ओळख वाचून पुस्तक वाचावेसे वाटते आहे. मागे कधीतरी रश्दीचं ‘मिडनाईटस् चिल्ड्रन’ वाचायला सुरूवात केली होती. पण ते मला पाश्चात्य देशांसाठी उगीचंच उपखंडाचं एक्झॉटिकीकरण करणारं वाटलं म्हणून बाजूला ठेवलं. पण कल्पनेची उड्डाणं हा रश्दीचा युसपी असेल तर पुन्हा नेटाने वाचायला सुरूवात केली पाहिजे.

The Fox -Frederic Forsyth वाचतेय.

आत्ता जगात जे घडतंय (इराण वर हल्ला....) ते समजून घायला खूपच मदत होतेय.

srd यांनी शेअर केलेल्या लिस्टमधे worst to best अशी फ्रेडरिक फोरसाईथच्या कादंबऱ्यांची कॅटगरी दिली. पण माझे मत थोडे वेगळे आहे. मला आयकन, द निगोशिएटर, फोर्थ प्रोटोकॉल आणि द डे ऑफ द जॅकल जास्त आवडतात. Icon is kind of epiphany which can explain rise of Putin in Russia. अर्थात त्याच्या कुठल्याही कादंबरीत जिओपॉलिटिक्सबद्दल अफाट माहिती असते. त्यामुळे पुस्तक खास नसलं तरी विसरायला होत नाही.

>>> जिओपॉलिटिक्सबद्दल अफाट माहिती असते......> तर जमवलेली सगळी माहिती लेखक संपूर्ण देतो आणि ते परिच्छेद पंतोजीनी शिकवल्यासारखे ( demogogic) होतात असं म्हटलं आहे. किंवा कंपुटरचा अभ्यास त्याचा कच्चा आहे हे समजतं. तरीही पुस्तकातून कादंबरीतून काय बिंबवायचं आहे ते पोहोचवतोच. सुरुवातीला बरीच पात्रं घेतो पण नंतर कमी करत जातो. एकूण त्यांच्या कादंबऱ्या आवडीने वाचल्या जातात.
वाचनालयात आहेत काही इंग्रजी कादंबऱ्या परंतू '७० ,'८० च्या दशकातलं लेखन आणि पेपरबॅक म्हणजे काय अवस्था झाली असेल ते समजू शकतो आता. रस्त्यावरच्या विक्रेत्यांकडेही याच अवस्थेत आहेत.

The Fox अलिकडचं लेखन आहे म्हणजे राजकीय उलथापालथ नवीन आहे. ते वाचलं पाहिजे.

ऑर्डिनरी ग्रेस - पूर्ण झालेले नाही इन फॅक्ट फारच कमी वाचलेले आहे पण आवडते आहे. सहसा मला फिक्शन आवडत नाही. पण हे पुस्तक अपवाद. यात जो नायक आहे तो आता ४० वर्षांचा आहे पण तो वयात येत असतानाचे त्याचे मनोव्यापार मांडतो विशेषतः मृत्यूविषयक अनुभव. त्याचे वडील पाद्री आहेत. एकंदर आदर्शवादी घर आहे. मग पुढे पी टी एस डी, आडनिड्या वयातील वाया जाण्याच्या मार्गावरील मुलांचे वर्तन, मित्राचा मृत्यू , शेजारील बाईविषयी आकर्षण, आईबद्दलचे प्रेम. हे सारे कंगोरे येत जातात. मिनेसोटामध्ये ही कहाणी घडते. तिथे राहीलेले असल्याने, मला सेट अप डोळ्यासमोर येतो.

William Kent Krueger हा लेखक आवडतो आहे असे वाटते.

सादत हसत मंटो यांची "ठंडा गोश्त" ही कथा वाचली. मंटोंबद्दल खूप ऐकून आहे पण फार शोध घेतला नाही कधी. आधी ह्याच कथेचा इंग्रजी अनुवाद 'कोल्ड मीट' या नावाने अर्धा ऐकला पण अभिवाचन आवडत नव्हते मग मूळ कथा शोधून ऐकली. विवादास्पद कथा आहे. फाळणीच्या काळात ज्या दंगली व्हायच्या, त्यात प्रत्येक जण चांगल्या हेतूनेच भाग घ्यायचा असे नव्हते. त्या पार्श्वभूमीवरची कथा आहे.

ईशर सिंग नावाचा सरदार आपल्या कुलवंत कौर नावाच्या रखेलीकडे बऱ्याच दिवसांनी जातो. त्याच्या अचानक समाधान न देणाऱ्या सेक्शुअल पर्फॉर्मन्समुळे तिला त्याच्या दुसऱ्या लैंगिक संबंधांच्या शक्यतेचा संशय येतो. येथे चारित्र्याचा संशय लिहिणं संयुक्तिक होणार नाही. त्यावरून राग अनावर झाल्याने ती त्याच्याच खंजीराने त्याच्यावरच हल्ला करते. प्राण जाताना तो कबूल करतो की फाळणीतल्या दंग्याच्या वेळी मुस्लिम घरांतून लूटमार करून आला आहे. त्यापैकी एका घरातील सर्वांना याच खंजीराने मारून टाकल्यावर त्याच घरातील एक सुंदर मुलगी मारून टाकण्याआधी बलात्कार करण्याच्या मिषाने खांद्यावर घेऊन लांब झाडाखाली आडबाजूला गेला होता. पण प्रत्यक्ष बलात्काराची क्रिया करताना ती आधीच मृत होऊन तिचे शरीर बर्फासारखे गार पडलेले होते. त्यामुळे तिने त्याला त्याच खंजीराने मारले हे बरे केले असेही म्हणतो. सुरवातीला फोरप्लेची चावट खरेतर सवंग वर्णनं आणि सेक्शुअल व्हॉयलेन्सही आहे. बर्फासारख्या मृतदेहावर बलात्काराचा प्रयत्न- म्हणून "थंडा गोश्त".

आवडली अशातला भाग नाही पण वाचली म्हणून येथेही लिहून टाकले.

ठंडा गोश्त वाचली आहे.
फणीश्वरनाथ रेणू यांच्या कथाही वाचण्यासारख्या आहेत. साध्या , सोप्या व्यक्तिरेखा आहेत. मारे गए गुलफाम या कथेवर तीसरी कसम हा पिक्चर बनला आहे.
रेखता वर मंटोच्या कथा आहेत.

यातले बरेच हिंदी साहित्यिक शाळेनंतर आठवत सुद्धा नव्हते. फेसबुकवरचं एक सर्कल आहे. त्यांच्या गप्पा गप्प बसून वाचताना समजत गेले.
त्या त्या काळातल्या समाजजीवनाचा आरसा असं काहीतरी चालू असतं त्यांचं. हा संदर्भ असल्याने हिंदी वाचलं गेलं.नाही तर हिंदी वाचायला जडच जातं.

सलमान रश्दींचं विक्टरी सिटी ( अनुवाद वंदना भागवत ) वाचलं. 'कल्पनेची उड्डाणं' या स,वरुपात कादंबरी लिहिली असली तरी काही समजलं नाही/ लेखन पक्कड घेऊ शकलं नाही. त्यापेक्षा हे काम ( विजयनगर साम्राज्य समजावणे) willium darlymple याने केले असतं तर बरं झालं असतं.

मॅथ्यु मॉर्गनचं 'Why we Sleep'. झोपेबद्दल सर्व काही असलेलं पुस्तक. अशी स्थिति की ज्यात आपण कुणाचीही शिकार होऊ शकतो, प्रॉडक्टिव्ह (तथाकथित) काही करु शकत नाही अशी स्थिती निसर्गाने कां दिली असेल? अशा प्रश्नानेच पुस्तकाची सुरुवात होते. मग तुम्ही ७ ते ८ तास रोज झोपणे कां आवश्यक आहे? सततच्या अपुर्‍या झोपेमुळे कॅन्सर सारख्या रोगाकडे तुम्ही कसे खेचले जाताय!, आठवडाभर ५ तास झोप आणि विकेंडला १०-१२ तास झोप घेतली म्हणजे झोप भरुन काढली हा कसा गैरसमज आहे!, वामकुक्षी, डुलकी, रात्रपाळी इ. सर्व गोष्टींचा उहापोह पुस्तकात आहे. कामाच्या ठिकाणी power nap किती आवश्यक आहे हे corporates ना case study द्वारे कसं पटवून दिलं गेलं वगैरे वेगळे कंगोरेदेखील तांत्रिक माहिती वाचतांना मजा आणतात. निरोगी रहाण्यासाठी सध्या सगळीकडे खाणे आणि व्यायाम याची माहिती सगळीकडून आपल्यावर आदळत असतांना झोप या विषयावर कमी ऐकायला/वाचायला मिळतं. हे पुस्तक झोपेबद्दल सखोल माहिती देतं व खूपशा शंकांचं निरसन करतं.

Reading 'Final diagnosis by Arthur Hailey..
यात पोस्टमॉर्टेमचं आणि पाय कापतांनाचं इतकं इत्यंभूत step by step वर्णन आहे की एखाद्या कमकुवत भावनाशील माणसाला ढवळून येईल..
किळसवाणं वगैरे अजिबात नाही पण तुमच्यासमोर ते घडतंय हा फिल देणारं लिखाण आहे..
ज्यांना रक्त पाहिलं तरी चक्कर येते अशांसाठी हे पुस्तक नव्हे!
बाकी कथानक ठिक आहे.

Len Deighton Bomber
Battle Cry by Leon Uris
Where Eagles Dare
The Guns of Navarone novel by Alistair MacLean
Flight into Danger
Airport Arthur Hailey.
ही माझी एके काळची आवडती पुस्तके/

Pages