Submitted by Admin-team on 20 April, 2022 - 18:19
आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसादांची मर्यादा ओलांडल्यामुळे हा नवा धागा सुरू करत आहे.
इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
गॉगल लावलेला घोडा (निखिलेश
गॉगल लावलेला घोडा (निखिलेश चित्रे) कथासंग्रह
अद्भुत, मॅजिकल रिअॅलिझम, फँटसी, फिक्शन - असं सगळं मिश्रण असणार्या कथा.
काही कथांमध्ये sarcasm आहे, आसपासच्या घटनांवर सूचक भाष्य आहे. एखाद्या कथेतला एखादा तपशील एकदम रिलेट होतो आणि वाचताना एक स्पार्क जाणवतो. त्या दृष्टीने 'लोकर्या' ही कथा खूप आवडली.
तशी प्रत्येक कथेत काही ना काही गंमत आहेच. काही पात्रं एकाहून जास्त कथांमध्ये येतात. ते धागे जुळवतानाही कथांमध्ये गुंतायला होतं.
शीर्षककथाच मला तितकीशी कळली नाही.
मोठा रिव्ह्यू लिहायची इच्छा असूनही लिहायला जमत नाहीये. त्याला कारणही या कथाच. मी या प्रकारचं एकगठ्ठा काहीतरी पहिल्यांदाच वाचलं. मजा आली वाचायला. पण आस्वादात्मक सविस्तर लिहायचं तर पुन्हा एकदा सर्व कथा वाचाव्या लागतील हे जाणवलं.
तरी चुकवू नये असं पुस्तक आहे इतकं नक्की सांगू शकते.
@हेम,
@हेम,
>>कामाच्या ठिकाणी power nap किती आवश्यक आहे हे corporates ना case study द्वारे कसं पटवून दिलं गेलं वगैरे वेगळे कंगोरेदेखील तांत्रिक माहिती वाचतांना मजा आणतात. <<
म्हणजे पाॅवर नॅप ही योग्य आणि हितकर आहे की तसं भासवलं गेलं आहे..? ... यावर पुस्तकात काय म्हटलं आहे ?
काही गावांत काही बँका/
काही गावांत काही बँका/ कार्यालयं दोन वेळांत चालवतात ते याच उद्देशाने असेल.
आज एका बैठकीत Why am I an
आज एका बैठकीत Why am I an atheist? हे भगतसिंग यांचे पुस्तक पूर्ण केले. हा एक निबंधच आहे तसा. छोटेसे आणि पोटेन्ट आहे. आवडले. या सगळ्याचा विचार करून झाला आहे तसा त्यामुळे पटले सुद्धा. अतिशय बुद्धिमान व्यक्तीच्या वास्तववादी विचारसरणी व अभ्यासपूर्ण चिंतनातून लिहिल्याचे जाणवते. नुसती बुद्धिमत्ता नसून त्याला धाडस व पुरेपूर आत्मभानाची जोड आहे. एवढ्या लहान वयात एवढा सगळा विचार करून, आसपास सगळे आस्तिक, धार्मिक असून अशा निष्कर्षाप्रत येणं तेही स्पष्ट शब्दांत मांडता येणं खूप कठीण आणि धाडसाचे आहे.
मला आवडले. इंग्रजी भाषा ओघवती आणि सरळ आहे. I am a realist असं वारंवार म्हटले आहे. नास्तिकता मिरवण्याची गोष्ट नाही किंवा लाजण्याचीही गोष्ट नाही. तो एक अनास्थेला आपलेसे करण्याचा रोखठोक निर्णय आहे. यांनी लिहिलेय त्यावरून त्यांना काही सिद्ध करायचे होते असे वाटले नाही फक्त आपल्याला जे वाटतं ते कशामुळे वाटतं एवढं मांडलं आहे. हे कदाचित अहंकारातून आले असेल कारण मी स्वतःला कुठेतरी ईशतुल्य समजतो किंवा मी स्वतःला देवाचा शत्रू समजतो असे गृहित धरले तर ते नास्तिकतेचे खंडण करणारे होईल. यापैकी काहीही नाही. हे सांगण्यासाठी सगळ्या धर्मांचा अभ्यास केला असावा असं वाटलं, फिलॉसॉफीचाही अभ्यास दिसला. पण तत्त्वज्ञानाचा अजून अभ्यास करायचा विचारही बोलून दाखवला आहे.
देव आपल्या कल्पनेचाच विस्तार आहे ज्यात आपण आधार शोधतो त्यामुळे नास्तिक माणसांचं आयुष्य जर काट्यावरचं असेल तर ते भयंकर कठीण असतं असं म्हटलंय. चारचौघांसारखे टिपिकल आयुष्य असताना खरंतर आस्थांनी/ अनास्थांनी फरक पडू नये आणि ही खूप खाजगी गोष्ट आहे असे मलाही वाटते.
भगतसिंगांच्या मते साधारण हा सगळा अज्ञानातून आलेला भ्रम आहे, त्यामुळे देवाची तुलना चंगेज खानशी केलेली आहे. म्हणजे तो आहे तरीही इतका अन्याय, दुःख, अस्पृश्यतेसारखी अवहेलना आहे, ह्या अर्थी तो सैतानच असला पाहिजे असे म्हटले आहे. अर्थात त्यांनी ह्यासाठी भरपूर अभ्यास केला आहे, निरीक्षण केले आहे, वेदांताचा अभ्यास व स्वतः जपजाप्यही करून बघितले आहे. उगाचच निराधार तीव्र मतं मांडलेली नाहीत. मतं अभ्यासातून आली तरच त्यात स्पष्टता येते, ती ह्यात आहे. शेवटी - अजूनही तुम्हाला हे अहंकारातून आलेले असेल असे वाटत असेल तर तसेच सही - असेही म्हटलेय. He owned himself..! पटकन 'जज' करणाऱ्या लोकांना तो अहंकार वाटू शकतो. कारण हा दुर्मिळ गुण आहे. काही सिद्ध करायचे नाही, अहंकार नाही, असुरक्षितता नाही. फक्त सेल्फ अवेअरनेस. काळाच्या मानाने फारच आधुनिक. स्टोरीटेलवर वाचले आहे. ऐकलं नाही.
Why am I an atheist?
Why am I an atheist? पुस्तकाची समीक्षा छान. वाचनीय वाटतंय. अगदी समीक्षा वाचूनही वाचल्याचा आनंद मिळत आहे.
आता ' why I am a hindu' - Shashi Tharoor वाचा. मी सुरू केलंय पण जरा वेग कमी आहे.( सतत शब्दकोशाकडे धाव घ्यावी लागते थरूरचे लेखन वाचताना. तसे किंडल मोबाईल ॲपवर dictionary तिथेच असते ते एक बरंय.) थरूरची मतं परिस्थितीजन्य असतात. खुशवंत सिंगची आठवण येते.
अस्मिता, छान लिहिलं आहेस.
अस्मिता, छान लिहिलं आहेस.
छान विवेचन Why am I an
छान विवेचन Why am I an atheist? पुस्तकाचे.
एवढ्या लहान वयात एवढी ठाम भूमिका असणे हे खरेच कौतुकास्पद. अर्थात या मागे त्यांचे वाचन आणि विवेचन आहे याची खात्री आहे. Jail Diary of Bhagat Singh वाचले आहे आणि त्यात फक्त आणि फक्त भगतसिंग कारावासात असताना त्यांनी वाचलेल्या पुस्तकांतले विचार, आवडलेली वाक्य टिपून ठेवली आहेत. समोर मृत्यू दिसत असताना माणूस एवढे अफाट वाचन करत असेल तर एरवी किती वाचत असेल?
' why I am a hindu' वाचायच्या लिस्टमध्ये आहे.
खुशवंत सिंग आणि भगत सिंग यांचा एकत्र उल्लेख आला त्यामुळे लिहावंसं वाटतंय.
खुशवंत सिंग यांचे वडील सर सोभा सिंग दिल्लीतले सरकारी कॉन्ट्रॅक्टर, बिल्डर आणि मॅजिस्ट्रेट होते. (स्वातंत्र्यपूर्व काळात) कॅनॉट प्लेस, स्वातंत्र्यानंतर भाक्रा नांगल धरण हे प्रकल्प सोभा सिंग यांनी डेव्हलप केले.
भगत सिंग व बटुकेश्वर दत्त यांनी असेम्ब्लीत बॉम्ब टाकले. त्यावेळी सोभा सिंग असेम्ब्लीमध्ये हजर होते व त्यांनी सार्जंट आणि इतर काहींना सोबत घेऊन बॉम्ब टाकणाऱ्यांचा पाठलाग केला आणि त्यांना पकडले. मॅजिस्ट्रेट असल्याने अर्थातच सोभा सिंग यांच्या जबाबाला वजन होते. परंतु त्या आधारे भगत सिंग यांच्यावर आरोप ठेवला नव्हता. (त्याची टेक्नीकलीटी माहीत नाही.) पुढे सॉन्डर्सच्या खुनाच्या आरोपावरून भगत सिंग यांना फाशीची शिक्षा झाली. कालांतराने आधी नयी दिल्ली का मालिक हे नामाभिधान असणाऱ्या सोभा सिंग यांना भगत सिंग यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याच्या बदनामीला सामोरे जावे लागले.
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=sEM8DRdlMbs
गॉगल लावलेला घोडा - निखिलेश चित्रे (एबीपी माझा - आनंदाचे पान)
निखिलेश चित्रे ह्यांची मुलाखत
पण अत्यंत त्रोटक आहे.
समोर मृत्यू दिसत असताना माणूस
समोर मृत्यू दिसत असताना माणूस एवढे अफाट वाचन करत असेल तर एरवी किती वाचत असेल?
>>>
यावरून आठवलं -
मृदुला भाटकरांनी 'गेले लिहायचे राहून' पुस्तकात जिंदा आणि सुखाबद्दल लिहिलं आहे. (जनरल अरुणकुमार वैद्य यांचे मारेकरी)
त्यात त्या म्हणतात, जिंदा कधीच आवडला नाही, जन्मत: गुन्हेगारी स्वभावाचा वाटायचा. सुखाच्या डोळ्यात दु:ख असायचं. पकडला गेला तेव्हा तो इंग्लिशमध्ये एम.ए. करत होता. त्याने लिहिलेल्या एका निबंधाचाही त्यांनी उल्लेख केला आहे.
सुखाने स्वत:ला अतिरेकी, खुनी म्हणून घ्यायला नकार दिला होता. जनरल वैद्यांनी सुवर्णमंदिरात लष्कर आणलं, म्हणून त्यांना मारलं. आम्ही खुनी असतो तर गाडीत त्यांचा अंगरक्षक आणि पत्नी यांनाही मारलं असतं, कारण ते तर आय-विटनेस होते, असं त्याचं म्हणणं होतं.
भाटकर त्याला म्हणाल्या, की आम्ही तुझं वकीलपत्र घेतलं, ते आरोपी म्हणून तुझे मूलभूत हक्क आहेत म्हणून. त्यासाठी आम्हाला कुणी गोळ्या घातल्या तर चालतील का? त्यावर तो म्हणाला, "आप तो गांधीजी जैसा आर्ग्युमेंट करती हैं"
दोघांना फाशी दिल्यावर `जनरल वैद्यांच्या हत्येला न्याय मिळाला पण सुखदेवसिंग नावाच्या वाट चुकलेल्या माणसासाठी डोळ्यात अश्रूही आले' असं त्या लिहितात.
तो अख्खा लेख जबरी आहे.
तो अख्खा लेख जबरी आहे. >>>
तो अख्खा लेख जबरी आहे. >>> १००++
हा लेख वाचला आहे. बहुतेक मृदुला भाटकरांची लेखमाला यायची लोकसत्ता पुरवणीमध्ये.
त्या लेखाची लिंक असेल तर दे
त्या लेखाची लिंक असेल तर दे ललिता प्रीती.
मधे लिंक तुटली होती, ह्या धाग्यावर काही भरही घातली नाही विशेष. पण पुन्हा प्रयत्न करत आहे. 
मस्त चर्चा. Why am I a Hindu ची नोंद घेतली आहे. Why am I an atheist? ह्या लेखात स्वातंत्र्य चळवळीबद्दल फार लिहिलेले नाही. सुखदेव सिंह आणि सन्याल यांचा उल्लेख आहे मात्र. शिवाय काकोरी जिल्ह्यातील लूट आणि बॉम्बस्फोट याचाही ओझरता उल्लेख आहे. समोर मृत्यू दिसत असताना वाचन - याला मम. प्रचंड निर्भय होते. शेवटपर्यंत देवाचं नाव घेतलं नाही, आपले तत्त्व उराशी बाळगले. आत्म्याचे अस्तित्व सुद्धा मानले नाही, त्यामुळे आता पुन्हा येणं नाही यावर ठाम होते व स्वर्गात स्थान मिळावे म्हणून सुद्धा स्वातंत्र्ययुद्धात सहभाग घेतला नाही. मला हे योग्य वाटलं, हे नाही करणार तर दुसरं काय करणार..! एवढा सरळ आणि ठाम विचार त्यामागे होता. आस्तिक असो वा नास्तिक कठीण परिस्थितीत आपल्या तत्त्वांशी ईमान राखत (स्वतःशी) सत्यनिष्ठता जपता यायला हवी. तेजस्वी व्यक्तिमत्व नक्कीच.
--------
ललिता प्रीती - तू ठाणे गटगत- रोज अर्धा तास वाचन करायला हवे असे सांगितले ते मी मनावर घेतलं आहे.
---------
हल्लीच एका रशियन कथेवर लिहिलेला लेख -
एका अदृश्य माणसाची गोष्ट - द ओव्हरकोट - निकोलाय गोगोल
हा लेख दिसलाच नाही/ आल्याचं कळलंच नाही असं काल कुणीतरी सांगितलं म्हणून लिंक देऊन ठेवतेय.
मृदुला भाटकर म्हणजे रमेश
मृदुला भाटकर म्हणजे रमेश भाटकरांची बायको ना ? त्या हल्लीच मुग्धा गोडबोलेच्या आरपार-वुमन की बात मध्ये आल्या होत्या. चांगलं बोलल्या. त्यांंचं रमेश भाटकरांवर झालेल्या केसबद्दल पुस्तक आलं आहे. मुलाखत ऐकून वाचावसं वाटलं.
ललिता, माझा अर्धातास वाचनाचा "उपक्रम" सुरु तरी चांगला झाला पण मग बाकीच्या उपक्रमांमध्ये जरा खंडीत झाला आहे. आता पुन्हा सुरू करेन.
>>>म्हणजे पाॅवर नॅप ही योग्य
>>>म्हणजे पाॅवर नॅप ही योग्य आणि हितकर आहे की तसं भासवलं गेलं आहे..? ... यावर पुस्तकात काय म्हटलं आहे ?>>>
आवश्यक आहे. ती घेतल्याने कामाचा दर्जा निश्चित सुधारतो हे लाखो केस स्टडीजच्या आधारे लेखकाने पटवून दिलंय असं म्हणायचंय.
हेम.. धन्यवाद..
हेम.. धन्यवाद..
अस्मिता, पराग,
अस्मिता, पराग,
लगे रहो! वाचते रहो!
या धाग्याच्या निमित्ताने
या धाग्याच्या निमित्ताने फणीश्वरनाथ रेणू यांच्या कथा पुन्हा वाचायचा प्रयत्न केला पण यावेळी त्या भिडल्या नाहीत. पूर्वी ज्या अधाशीपणे पुस्तक वाचल जायचं ते शून्य झालं आहे. सिनेमा बघताना सुद्धा हा अनुभव येतोय.
इंटरनेट बंद करू का?
झुंपा लाहिरी वाचा.
झुंपा लाहिरी वाचा.
कोणत्याही गटगला, वविला न जाता इथे माबोकर भेटतात.
गॉगल लावलेला घोडा: परिचय
गॉगल लावलेला घोडा: परिचय आवडला. पुस्तक वाचायच्या यादीत टाकतो.
व्हाय आय एम अथिस्ट! - परिचय सुरेख लिहिला आहेस, अगदी उत्कंठावर्धक! भगतसिंग निरिश्वरवादी होते माहित न्हवतं. स्टोरीटेलवर आहे तर ते जरा आयपॅड किंवा मोठ्या स्क्रीनवर टाकून वाचेन.
भगतसिंग कट्टर कम्युनिस्टही
भगतसिंग कट्टर कम्युनिस्टही होते. प्रात:स्मरणीयांनी त्यांना अगदी आपल्यातले करून टाकले आहे.
Red Dwarf Infinity Welcomes
Red Dwarf Infinity Welcomes Careful Drivers
इथे कुणी Red Dwarf ही TV मालिका बघितली आहे का ? ज्याना The Hitchhiker's Guide to the Galaxy आणि डग्लस अडम्सची इतर पुस्तक आवडली असतील त्यांना हे पुस्तक निश्चित आवडेल.
ह्या मालिकेत एकूण चार पुस्तकं आहेत. त्यापैकी हे पहिले. अत्यंत वाचनीय, TV मालिके पेक्षा पुस्तकात ज्यास्त माहिती आहे.
झुंपा लाहिरी वाचा. >> अच्छा.
झुंपा लाहिरी वाचा. >> अच्छा. नोट केलं.
कोणत्याही गटगला, वविला न जाता इथे माबोकर भेटतात. >> नाही समजलं.
वाचनात (फिक्शन) / सिनेमा यात रस नसल्यासारखा वाटणे यावर कदाचित अन्य धाग्यावर विचारेन. इथे कदाचित अस्थानी आहे.
त्या लेखाची लिंक असेल तर दे
त्या लेखाची लिंक असेल तर दे ललिता प्रीती.
>>> लिंक नाहीये.
त्या एका लेखापेक्षा ते पुस्तकच मिळवून आख्खं वाच.
लोकसत्ता सदरातल्या लेखांवर आम्ही (समकालीन प्रकाशन) नंतर बरंच काम केलं. त्यामुळे पुस्तक वाचायला जास्त मजा येते. मृदुला भाटकरांनाही ते एडिटिंग खूप आवडलं होतं.
Red Dwarf Infinity Welcomes
Red Dwarf Infinity Welcomes Careful Drivers
>>>
या मालिकेबद्दल माहिती नव्हतं. डग्लस अॅडम्स हे नाव किंडलमुळे माहिती आहे. त्याचं काहीही वाचलेलं नाही. पण हे पुस्तक वाचावंसं वाटतंय.
केशवकूल, पुस्तकाबद्दल आणखी थोडं सविस्तर लिहिणार का?
गटगचा उद्देश विचार जाणून घेणे
गटगचा उद्देश विचार जाणून घेणे ते इथे मायबोलीवर होतं.
ललिता-प्रीति
ललिता-प्रीति
ह्या इथे Red Dwarf सविस्तर समरी दिली आहे.
https://reddwarf.fandom.com/wiki/Infinity_Welcomes_Careful_Drivers
आधी हे वाचा आणि त्यानंतर सावकाश TV एपिसोडची ही लिंक बघायला घ्या.
https://archive.org/details/red-dwarf-s-13-e-01-the-promised-land-pt-1
ह्या उप्पर मी परिचय तो काय लिहिणार.
पुस्तक ही आर्काइव्हज वर वाचू शकाल. मात्र मेम्बर व्हावे लागेल आणि तुकड्या तुकड्याने वाचावे लागते.
वाट्टेल त्या ठिकाणाहून डाऊन लोड करायला अनमान नसेल तर मी लिंक देऊ शकेन. नाहीतर मग आमेझान आहेच.
पुस्तकात भरपूर कल्चरल संदर्भ आहेत. ते समजून घेण्यासाठी सारखा netचा आधार घ्यावा लागतो.
पुस्तकात काय नाही? ही पहा काही रत्ने.
That septic orb. That dirty, polluted world he loved. He ached for the Brillo pad sting of a breath on a city street. The oh-so-delicious stench of the oily, turdy sea in summer. The grassy parks in spring, festooned with the thrilling vibrant colours of discarded chocolate wrappers and squidgy condoms and squashed soft drink cans. He longed to look up at a winter sky and see again the huge artificial ozone plug which sat above the Earth like an absurd toupee, constructed in his lifetime to repair the damage caused by two generations of people who wanted to flavour their sweat. Earth. It was a dump. It was a sty.
But it was his home, where he belonged, and where he was finally going.
किंवा
On the toss of a coin.
But that was life, he thought. Life was the toss of a coin. You're born rich; you're born poor. You're born smart; you're born stupid. You're born handsome; you're born with a face like a post office clerk.
Heads you are, tails you aren't.
Rimmer felt that most of his life had come up 'tails'.
Relationships with women: tails. Career success: tails. Friendships: tails. His life, best out of three: tails, tails and tails.
He'd learned nothing. What had he achieved? Again, nothing. His life was a goalless draw.
अशी रत्ने पानोपानी विखुरलेली आहेत.
archive org वर login and
archive org वर login and borrow दिसतंय हे पुस्तक.( Scanned pdf पिवळट)
https://archive.org/details/reddwarf00gran/page/n7/mode/2up
थोडी पानं वाचून ठरवता येईल पुढे वाचायचं का.
Srd
Srd
तुम्ही मी वर दिलेली FANDOM ची लिंक वाचा आणि मग ठरावा. घाई नको.
बिंगमधून संक्षिप्त कथा समजली
बिंगमधून संक्षिप्त कथा समजली होती.. वैज्ञानिक कथा आणि अंतरिक्ष संभाव्य धोके आहेत.
>>डाउनलोड -वाट्टेल त्या ठिकाणाहून डाऊन लोड करायला अनमान नसेल तर... >>ती आहेच माझ्याकडे.
पण वैज्ञानिक कथा वाचणार नाही.मला कंटाळा येतो.
नेटवर वाचायला मिळेलच या
नेटवर वाचायला मिळेलच या पुस्तकाबद्दल... पण पुस्तक वाचलेल्या एखाद्याकडून त्याबद्दल ऐकायला/वाचायला मला आवडतं. त्या अर्थाने विचारलं होतं.
ठीके. बघते.
काल किंडलवर शोधलं, पण तिथे हे पुस्तक दिसलं नाही.
ललिता-प्रीति
ललिता-प्रीति
प्रयत्न करून बघेन. वेळ काढून लिहीन.
Pages